स्पर्धाAI

MPSC राज्यसेवा २०२५

GS Paper I · ८० प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न History

11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने _________________ नाकारण्यासाठी ठराव पारीत केला.

  • )क्रिप्स प्रस्ताव✓ योग्य
  • )अलिगड योजना
  • )कर्झन योजना
  • )लतीफ योजना

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल ॲक्ट, 1909 च्या द्वारे _________________ केल्या.

  • )मॉर्ले-मिंटो सुधारणा✓ योग्य
  • )मॉंटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा
  • )भारतीय शिक्षण सुधारणा
  • )भारतीय नागरी सेवा सुधारणा

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

“सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो.” हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाज सुधारक _________________ येथील होते.

  • )विदर्भ✓ योग्य
  • )मराठवाडा
  • )पुणे
  • )कोल्हापूर

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

5. बॅ. चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या चार प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले ?

  • )इंडियन्स ऑफ इंडिया
  • )इंडिया फॉर इंडियन्स✓ योग्य
  • )इंडिया ॲन्ड इंडियन्स
  • )इंडियन्स फॉर इंडिया

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

मुघल बादशहा अकबराने इ. स. 1584 मध्ये “खान-ए-खानान्” ही पदवी कोणाला दिली होती ?

  • )अबुल फजल
  • )मिया तानसेन
  • )अब्दुल रहीम✓ योग्य
  • )हकीम हुमाम

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

‘दिवाण-ए-अमीर-ए-कोही’ नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले ?

  • )अलाउद्दीन खिलजी
  • )मुहम्मद बिन तुघलक✓ योग्य
  • )बलबन
  • )फिरोज शाह तुघलक

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०History

'जातिभेद विवेकसार' हे पुस्तक यांनी लिहिले. (1) महात्मा ज्योतिबा फुले (3) विठ्ठल रामजी शिंदे (2) तुकाराम तात्या पडवळ (4) भाऊराव पायगोंडा पाटील

  • )महात्मा ज्योतिबा फुले
  • )तुकाराम तात्या पडवळ✓ योग्य
  • )विठ्ठल रामजी शिंदे
  • )भाऊराव पायगोंडा पाटील

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११History

पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते ? अ. पंडित नेहरू व चाऊ-एन-लाय ब. पंडित नेहरू व डॉ. सन-यत-सेन क. इंदिरा गांधी व माओ-त्से-तुंग ड. पंडित नेहरू व माओ-त्से-तुंग

  • )अ आणि ब
  • )क आणि अ
  • )क आणि ड
  • )फक्त अ✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३History

पुढील राजे व त्यांची राजधानी यांच्या जोड्या जुळवा. अ. अपराजित ब. आदित्य – I क. विजयालय ड. भोज – I I. पल्लव II. चोळ III. चोळ राज घराण्याचा संस्थापक IV. गुर्जर Match the following Kings and their dynasties.

  • )अ – II, ब – III, क – I, ड – IV
  • )अ – I, ब – II, क – III, ड – IV✓ योग्य
  • )अ – IV, ब – III, क – II, ड – I
  • )अ – I, ब – II, क – IV, ड – III

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४History

खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती ? अ. विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने ‘अमुक्तमाल्यदा’ हा काव्य ग्रंथ लिहिला. ब. ‘आंध्र भोज’, ‘अभिनव भोज’ असे या राजास संबोधले जात असे. क. पेद्दना हा महान तेलगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. ड. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. Which of the following statements are correct about Krishnadevaraya ?

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त अ, ब आणि क✓ योग्य
  • )फक्त ब, क आणि ड

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Geography

2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे ?

  • )चंदीगड
  • )लक्षद्वीप✓ योग्य
  • )दादरा-नगर हवेली
  • )दिल्ली

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Geography

2011 च्या भारतीय जनगणनेनुसार, राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी _______ इतका होता.

  • )55.42%
  • )61.8%
  • )66.11%✓ योग्य
  • )65.39%

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Geography

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? Which one of the following statements is false ?

  • )भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफदार आहे. The Northern tip of main land India is Defdar in Ladakh.
  • )भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे. The Southern tip of main land India is Kanniyakumari in Tamil Nadu.
  • )भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबिथू आहे. The Eastern tip of main land India is Kibithu in Assam.✓ योग्य
  • )भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहार मोता आहे. The Western tip of main land India is Ghuar mota in Gujarat.

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Geography

खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ? अ. झेलम, चिनाब, कोसी, सतलज ब. गंडक, कोसी, घाग्रा, सोन क. सतलज, बियास, रावी, चिनाब ड. काबुल, कुर्रम, स्वात, झेलम

  • )अ आणि ब बरोबर आहेत
  • )क आणि ड बरोबर आहेत✓ योग्य
  • )ब आणि ड बरोबर आहेत
  • )अ आणि क बरोबर आहेत

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Geography

भारतीय घटक राज्ये/केंद्रशासित प्रदेश (यादी - I) व त्यांचे लिंग-गुणोत्तर (यादी - II) यांच्या जोड्या लावा. यादी - I घटक राज्ये/केंद्रशासित प्रदेश अ. केरळ ब. तामिळनाडू क. पुदुचेरी ड. आंध्र प्रदेश यादी - II लिंग गुणोत्तर (जनगणना - 2011) i. 996 ii. 1037 iii. 1084 iv. 993

  • )अ ii ब iii क i ड iv
  • )अ iv ब i क ii ड iii
  • )अ i ब ii क iv ड iii
  • )अ iii ब i क ii ड iv✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Geography

भारतीय द्विपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते ?

  • )तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने
  • )तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने✓ योग्य
  • )तापमान व हवेचा दाब वाढल्याने
  • )तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Maharashtra

कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे ?

  • )सह्याद्री✓ योग्य
  • )शंभू महादेव
  • )सातपुडा
  • )बालाघाट

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Geography

24. योग्य जोड्या जुळवा. महासागर a. प्रशांत महासागर b. अटलांटिक महासागर c. हिंदी महासागर d. आर्कटिक महासागर गर्त i. जावा गर्त ii. मरियाना गर्त iii. युरेशियन गर्त iv. प्युर्टो रिको गर्त

  • )iv iii ii i
  • )i ii iii iv
  • )ii iv i iii✓ योग्य
  • )ii iii iv i

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Geography

25. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते ?

  • )गुजरात - मध्य प्रदेश - त्रिपुरा - मिझोराम✓ योग्य
  • )गुजरात - महाराष्ट्र - पश्चिम बंगाल - त्रिपुरा
  • )महाराष्ट्र - बिहार - पश्चिम बंगाल - मिझोराम
  • )गुजरात - बिहार - त्रिपुरा - पश्चिम बंगाल

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Environment

26. योग्य जोड्या लावा. जीवावरण राखीव क्षेत्र अ. निलगिरी ब. सुंदरबन क. कच्छ ड. पन्ना स्थापना वर्ष I. 2011 II. 2008 III. 1989 IV. 1986

  • )I II III IV
  • )IV III II I✓ योग्य
  • )II III IV I
  • )III IV I II

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Geography

28. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात ___________ मौसमी वारे वाहतात. Monsoon winds blow in Maharashtra from June to September.

  • )आग्नेय (South east)
  • )वायव्य (North west)
  • )नैऋत्य (South west)✓ योग्य
  • )ईशान्य (North east)

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Science

खालील विधानांचा विचार करा. अ. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढल्या उंची बरोबर कमी होते. ब. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौरप्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. आता सांगा की :

  • )दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे✓ योग्य
  • )दोन्ही विधाने चुकीची आहेत
  • )दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही
  • )पहिले विधान बरोबर आहे, परंतु दुसरे चूक आहे

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Geography

खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे ?

  • )जिप्सम✓ योग्य
  • )शेल
  • )ग्रॅनाईट
  • )पंकाश्म

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Environment

धोकादायक कचरा (व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक) नियम, 2008 नुसार हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधीत आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल. (1) पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार (2) गृह मंत्रालय, भारत सरकार (3) परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार (4) वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार

  • )पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार✓ योग्य
  • )गृह मंत्रालय, भारत सरकार
  • )परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार
  • )वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकार

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Environment

यादी – I मध्ये दिलेल्या प्रदूषकांची यादी – II मध्ये दिलेल्या त्यांच्या परिणामांशी जोड्या लावा. यादी – I प्रदूषके a. पाण्यातील फॉस्फेट खते b. हवेतील मिथेन c. पाण्यातील कृत्रिम अपमार्जके d. हवेतील नायट्रोजन ऑक्साईड यादी – II प्रदूषकांचे परिणाम i. पाण्याची जैवरासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते ii. आम्ल पर्जन्य iii. जागतिक तापमान वाढ iv. अन्नत्रिक/सुपोषण

  • )ii i iv iii
  • )iv iii i ii✓ योग्य
  • )iii ii iv i
  • )i iii ii iv

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Environment

भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही ?

  • )घारियल
  • )बंगाल फ्लोरिकन✓ योग्य
  • )फोर-टोड रिव्हर टेरापीन
  • )लेदरबॅक कासवे

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Environment

जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबद्दल पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केला ?

  • )EIA
  • )IUCN
  • )EPA
  • )HIPPO✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Environment

खालीलपैकी कोणते एक पुनर्नविकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे ?

  • )दगडी कोळसा
  • )खनिज तेल/पेट्रोलियम
  • )नैसर्गिक वायू
  • )भूऔष्णिक ऊर्जा✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Economyआयोगाने रद्द

जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत ? अ. भविष्यातील अधिग्रहणवर मर्यादा ब. एकत्रित जमीन मालकी मर्यादा क. विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा ड. रूपांतरणावर मर्यादा

  • )अ आणि ब
  • )ब आणि क
  • )क आणि ड
  • )अ आणि क

मूळ उत्तरतालिकेत: ड — आक्षेपानंतर रद्द

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ३८Polity

26 जून, 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतु पुढीलपैकी कोणता होता ? अ. राहणीमानांच्या दर्जांत सुधारणा करणे. ब. दारिद्र्य रेषेखालील लोकांना साहाय्य करणे (दारिद्र्य निर्मूलन).

  • )फक्त अ बरोबर आहे
  • )फक्त ब बरोबर आहे
  • )अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Environment

शाश्वत विकास ही संकल्पना _________ मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली.

  • )1980✓ योग्य
  • )1987
  • )1990
  • )1992

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Economy

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. अ. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता 'ट्रिकल डाऊन थिअरी' भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. ब. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून, भारताने गाठलेला उच्च विकास दर 'ट्रिकल डाऊन थिअरी' वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.

  • )विधान अ बरोबर आहे
  • )विधान ब बरोबर आहे✓ योग्य
  • )दोन्ही विधाने अ व ब बरोबर आहेत
  • )दोन्ही विधाने अ व ब चुकीची आहेत

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Economy

“विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960 च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही.” हे विधान कोणाचे आहे ?

  • )रॉबर्ट मॅकनामारा✓ योग्य
  • )रॉबर्ट क्लोवर
  • )चार्ल्स किंडल बर्जर
  • )जिन ड्रेज

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Environment

राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता ?

  • )राष्ट्रीय सौर अभियान
  • )राष्ट्रीय शाश्वत वस्तीस्थान अभियान
  • )राष्ट्रीय जल अभियान
  • )राष्ट्रीय आरोग्य अभियान✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Economy

भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणते/ती कारण/कारणे आहे/आहेत ? अ. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून. ब. उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता. क. विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर.

  • )विधाने अ व क बरोबर आहेत
  • )विधाने अ व ब बरोबर आहेत✓ योग्य
  • )केवळ विधान अ बरोबर आहे
  • )केवळ विधान ब बरोबर आहे

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Geography

2011 च्या जनगणनेनुसार, सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरांत रहात होती ? अ. मुंबई ब. चेन्नई क. कलकत्ता ड. दिल्ली As per the 2011 Census, 13% of the total urban population of the country was living in which of the following cities in 2011 ?

  • )अ आणि ड
  • )अ, क आणि ड✓ योग्य
  • )अ, ब आणि ड
  • )अ, ब आणि क

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

प्रश्न ४९Geography

2011 च्या जनगणनेनुसार, भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या _________ टक्के आहे. As per the 2011 Census, India's population percentage is _________ of the total Global population.

  • )2.4
  • )17.5✓ योग्य
  • )31.9
  • )25.1

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Science

खालीलपैकी कोणत्या निरीक्षणा द्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारीत आहे याबद्दल पुष्टी मिळते ?

  • )दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन✓ योग्य
  • )दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे निळ्या रंगाकडील विस्थापन
  • )कृष्ण विवराच्या जवळून जाताना होणारे प्रकाशाचे वक्रीभवन
  • )प्रकाशाच्या वेगाची स्थिरता

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Science

तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहीपणा/स्निग्धता (viscosity) वर कसा होतो ?

  • )मितप्रवाहीपणा/स्निग्धता (viscosity) वाढतो✓ योग्य
  • )मितप्रवाहीपणा/स्निग्धता (viscosity) कमी होतो
  • )मितप्रवाहीपणा/स्निग्धता (viscosity) स्थिर राहतो
  • )मितप्रवाहीपणा/स्निग्धता ऋण होतो

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Science

एकाच पदार्थाच्या दोन रॉडच्या लांबी त्रिज्येचे गुणोत्तर 1 : 2 आणि 2 : 3 आहे. जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल ?

  • )3 : 2
  • )4 : 3
  • )1 : 3
  • )8 : 9✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Science

खालील दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क (नेटवर्क ऑफ रेजिस्टन्सेस) मध्ये बॅटरीमधून विद्युतधारा वाहील.

  • )1.5 A
  • )3.5 A
  • )4.0 A
  • )1.0 A✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Science

सायट्रस (लिंबू) कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे (Pathogen) होतो ? Citrus canker is caused by which type of pathogen ?

  • )जीवाणू✓ योग्य
  • )बुरशी
  • )विषाणू
  • )निमॅटोड

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Science

स्क्लेरेराईड्सच्या श्रेणी ______ आहेत. अ. मॅक्रोस्क्लेरेराईड्स ब. ओस्टिओस्क्लेरेराईड्स क. ट्रॅकिड्स ड. अॅस्टेरोस्क्लेरेराईड्स वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? The categories of sclereids are ______. a. Macrosclereids b. Osteosclereids c. Tracheids d. Asterosclereids Which of the statements given above is/are correct ?

  • )फक्त अ
  • )फक्त अ आणि ब
  • )अ, ब आणि ड✓ योग्य
  • )अ, ब आणि क

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Science

जर संरक्षक पेशींमध्ये ______ घटक जमा झाले तर रंध्र उघडेल. Stomata will open if there is accumulation of the following element in the guard cells ______.

  • )मॅग्नेशियम
  • )पोटॅशियम✓ योग्य
  • )लोखंड
  • )जस्त

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Science

60. स्पायरोगायरा या शैवालासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ? अ. सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात. ब. ते सागरी पाण्यात वाढते. क. त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात. ड. ते झिग्नेमाटेसी कुटुंबातील आहे.

  • )अ, ब आणि क
  • )ब, क आणि ड
  • )अ, क आणि ड✓ योग्य
  • )अ, ब आणि ड

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Science

61. कोणत्या झाडाच्या फुले, पाने व बिया वापरून 'मारीजुआना' हे अंमली पदार्थ तयार करतात ?

  • )कॅनाबीस सॅटीव्हा✓ योग्य
  • )निकोटियाना टॅबॅकम
  • )ओपीयम पॉपी
  • )मेंथा स्पिकाटा

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Science

खालीलपैकी हार्मोन्सचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतात ?

  • )एफ.एस.एच., एल.एच., इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन✓ योग्य
  • )इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, एल.एच. व कॉर्टिकोस्टेरॉन
  • )कॉर्टिसोल, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन व एफ.एस.एच.
  • )डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन व एफ.एस.एच.

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Science

व्यावसायिक तंतुंच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो ? Which of the following is used as a substitute for wool in the production of commercial fibers ?

  • )डॅक्रॉन
  • )टेफ्लॉन
  • )पॉलीॲक्रिलोनायट्राइल✓ योग्य
  • )कॅप्रोलॅक्टम

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Science

खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते ? अ. वेरोनल ब. बेनेड्रील क. पेनिसिलिन ड. पॅरासिटामॉल Which of the following medicine can be classified as both Analgesics and Antipyretics ? A. Veronal B. Benadryl C. Penicillin D. Paracetamol

  • )फक्त अ
  • )अ आणि ड दोन्ही
  • )ब आणि क दोन्ही
  • )फक्त ड✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Science

67. योग्य जोड्या लावा : अ. मोनोसॅकॅराइड ब. डायसॅकॅराइड क. ट्रायसॅकॅराइड ड. पॉलीसॅकॅराइड i. रॅफिनोज ii. स्टार्च iii. ग्लुकोज iv. सुक्रोज

  • )अ – iii ब – ii क – i ड – iv
  • )अ – ii ब – i क – iii ड – iv
  • )अ – iv ब – iii क – ii ड – i
  • )अ – iii ब – iv क – i ड – ii✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Science

68. हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर _______________ आहे.

  • )ड्युटेरियम, प्रोटियम, ट्रिटियम; 1 : 2 : 3
  • )ट्रिटियम, ड्युटेरियम, प्रोटियम; 2 : 3 : 1
  • )ट्रिटियम, प्रोटियम, ड्युटेरियम; 2 : 3 : 1
  • )प्रोटियम, ड्युटेरियम, ट्रिटियम; 1 : 2 : 3✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Science

ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता/ते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाहीत ? अ. लाकूड ब. बायोगॅस क. भूऔष्णिक स्रोत ड. कोळसा

  • )अ आणि ब दोन्ही
  • )ब आणि क दोन्ही
  • )फक्त क✓ योग्य
  • )फक्त ड

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Science

मॅग्नेशियम क्लोराईड ह्या संयुगाची निर्मिती होतांना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणुमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो ? अ. सहसंयोजक ब. आयनिक बंध क. समन्वय सहसंयोजक बंध ड. धातू बंध

  • )फक्त ड
  • )फक्त अ
  • )फक्त अ आणि क
  • )फक्त ब✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Polity

71. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर, 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. ब. कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला. क. मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता. Select the correct statements from the following. A. The Constituent Assembly was constituted in November, 1946 under the Cabinet Mission Plan. B. Cabinet Mission rejected the idea of two Constituent Assemblies. C. The Cripps Proposal was accepted by the Muslim League.

  • )फक्त अ, ब (1) Only A, B✓ योग्य
  • )फक्त ब, क (2) Only B, C
  • )फक्त अ, क (3) Only A, C
  • )वरीलपैकी सर्व (4) All of the above

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Polity

73. खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा. अ. जी व्यक्ती, राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती, संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल. ब. कोणतीही व्यक्ती राज्य सभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही.

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त ब
  • )अ व ब दोन्ही
  • )वरीलपैकी एकही नाही

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Polity

74. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने 'महानगर नियोजन समितीच्या' स्थापनेची तरतूद केली आहे ?

  • )42 वा घटना दुरुस्ती कायदा
  • )44 वा घटना दुरुस्ती कायदा
  • )73 वा घटना दुरुस्ती कायदा
  • )74 वा घटना दुरुस्ती कायदा✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Polity

भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखा. अ. सुकाणू समिती - राजेंद्र प्रसाद ब. सल्लागार समिती - वल्लभभाई पटेल क. केंद्रीय अधिकार समिती - जे. बी. कृपलानी ड. मूलभूत हक्क उप-समिती - जवाहरलाल नेहरू Identify the incorrect pair/s of the various Committees constituted under the Indian Constituent Assembly and its Chairmans. A. Steering Committee - Rajendra Prasad B. Advisory Committee - Vallabhbhai Patel C. Central Rights Committee - J. B. Kripalani D. Fundamental Rights Sub-Committee - Jawaharlal Nehru

  • )अ आणि क 1) A and C
  • )ब आणि ड 2) B and D
  • )क आणि ड 3) C and D✓ योग्य
  • )अ आणि ब 4) A and B

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Polity

खालीलपैकी योग्य विधान/ने निवडा. अ. उपराष्ट्रपती, ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील. ब. उपराष्ट्रपती, राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल. क. लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून दूर करता येईल. Select the correct statement/s from the following. A. The Vice-President shall hold office for a term of five years from the date on which he enters upon his office. B. A Vice-President may, by writing under his hand addressed to the President, resign his office. C. A Vice-President may be removed from his office by a resolution of the House of the People passed by a majority of all the then members of the House of People and approved by the Council of States.

  • )फक्त अ 1) Only A
  • )फक्त ब, क 2) Only B, C
  • )फक्त अ, क 3) Only A, C
  • )फक्त अ, ब 4) Only A, B✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Polity

77. ॲंग्लो-इंडियन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा. अ. अनुच्छेद 335 हे राज्यांच्या विधान सभेमध्ये ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधित्वाशी निगडीत आहे. ब. ॲंग्लो-इंडियन समाजाच्या लाभाकरीता 31 मार्च, 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर, तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभांनतर पहिल्या तीन वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील. क. दर तीन वर्षांच्या अनुवर्ती कालावधीत, लगतपूर्व तीन वर्षांच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती दहा टक्क्याने कमी असू शकतील.

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त ब व क
  • )फक्त क
  • )वरीलपैकी सर्व

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Polity

खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग I मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहे/आहेत ? अ. संघराज्य व त्याच्या राज्यक्षेत्राशी ब. मूलभूत अधिकाराविषयी क. न्यायाविषयी ड. कर्तव्याविषयी

  • )फक्त ब आणि ड
  • )फक्त क आणि अ
  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त अ आणि ब

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Polity

भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उप-अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्ये ओळखा.

  • )नागालँड, आसाम
  • )मणिपूर, सिक्कीम
  • )मिझोराम, नागालँड
  • )त्रिपुरा, झारखंड✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Polity

स्वातंत्र्यानंतर पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरविण्यात आला होता ?

  • )महाराष्ट्र
  • )गुजरात✓ योग्य
  • )आंध्र प्रदेश
  • )पंजाब

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Polity

भारतात ‘नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स’ (NCPCR) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

  • )2001
  • )2005
  • )2007✓ योग्य
  • )2010

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Polity

लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ? The 'Protection of Children from Sexual Offences' (POCSO) Act was enacted in India in which year ?

  • )2009
  • )2012✓ योग्य
  • )2015
  • )2018

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polity

खालीलपैकी कोणती कार्ये 24 जानेवारी, 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत ? अ. राष्ट्र ध्वजाचा स्वीकार ब. राष्ट्र गीताचा स्वीकार क. राष्ट्र गानाचा स्वीकार ड. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड Which of the following functions were performed by Constituent Assembly on January 24, 1950 ? A. Adopted the National Flag B. Adopted the National Anthem C. Adopted the National Song D. Elected Dr. Rajendra Prasad as a First President of India

  • )फक्त अ, ब, क
  • )फक्त अ, ब, ड
  • )फक्त अ, क, ड
  • )फक्त ब, क, ड✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Economy

86. खालीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा : अ. 2025 - 26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणु ऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्यूलर अणु भट्ट्यांच्या (एसएमआर) संशोधन आणि विकासावर केंद्रीत आहे. ब. अणु ऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी, अणु ऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील. क. या सुधारणामुळे अणु ऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे.

  • )फक्त अ, ब
  • )फक्त ब, क
  • )फक्त अ, क
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Polity

88. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबत काय खरे नाही ?

  • )त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला.
  • )त्यांनी सांविधानिक कायदा व प्रशासकीय कायदा मध्ये प्रॅक्टीस केली आहे.
  • )जानेवारी 2005 रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली.✓ योग्य
  • )त्यांना मे, 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Current Affairs

89. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? अ. सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरीता आवेदनपत्रे दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागविण्यात आली. ब. राष्ट्रीय जल पुरस्कार नऊ प्रकारांमध्ये प्रदान केला जातो. क. जल शक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 वर्षापासून देण्यात येतात.

  • )अ, ब आणि क बरोबर आहेत
  • )अ, ब आणि क चूक आहेत✓ योग्य
  • )अ व ब बरोबर आहेत
  • )ब व क बरोबर आहेत

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Current Affairsआयोगाने रद्द

90. जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लावा. अ. आयर्लंड ब. ऑस्ट्रिया क. आईसलँड ड. न्यूझिलंड

  • )अ, ब, क, ड
  • )क, अ, ब, ड
  • )क, ब, अ, ड
  • )ब, क, ड, अ

मूळ उत्तरतालिकेत: ब — आक्षेपानंतर रद्द

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ९२Current Affairs

92. योग्य विधान/विधाने ओळखा : अ. भारतामध्ये 22 जानेवारी 'राष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो. ब. राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकारा जागृतीसाठी साजरा केला जातो. क. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली. Identify the correct statement/s : A. January 22 is celebrated as 'National Girl Child Day' in India. B. National Girl Child Day celebrated from 2008 to spread awareness about girl child rights. C. Beti Bachao Beti Padhao Scheme launched in 2015.

  • )फक्त अ, ब
  • )फक्त ब, क✓ योग्य
  • )फक्त अ, क
  • )वरीलपैकी सर्व

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Current Affairs

93. जोड्या लावा (ब्रिक्स शिखर परिषद) : अ ब अ. 16 वी ब्रिक्स शिखर परिषद i. नवी दिल्ली ब. 15 वी ब्रिक्स शिखर परिषद ii. बीजिंग क. 14 वी ब्रिक्स शिखर परिषद iii. जोहान्सबर्ग ड. 13 वी ब्रिक्स शिखर परिषद iv. कझान Match the pairs (BRICS Summits) : A B A. 16th BRICS Summit i. New Delhi B. 15th BRICS Summit ii. Beijing C. 14th BRICS Summit iii. Johannesburg D. 13th BRICS Summit iv. Kazan

  • )iv i ii iii
  • )iii ii i iv
  • )ii iii iv i
  • )iv iii ii i✓ योग्य

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Maharashtra

भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा. अ. ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. ब. ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे. क. या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आश्रमशाळांशी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी बनवली आहे. ड. ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये बंद केली. Identify the correct statements regarding Bhagwan Birsa Munda Road Linking Scheme.

  • )अ, ब
  • )ब, क
  • )अ, ब, क✓ योग्य
  • )अ, क आणि ड

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Current Affairs

मालदीव मध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला ?

  • )पीपल्स नॅशनल काँग्रेस✓ योग्य
  • )मालदीव नॅशनल काँग्रेस
  • )अवामी लिंग
  • )डेमोक्रॅटिक पार्टी

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Geography

सिंधू जल करार 1960 नुसार भारत ________ नद्यांचे पाणी वापरू शकतो.

  • )सतलज, इंडस (सिंधू), रावी
  • )रावी, झेलम, इंडस (सिंधू)
  • )सतलज, बियास, रावी✓ योग्य
  • )रावी, चिनाब, इंडस (सिंधू)

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

प्रश्न ९८Economy

भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत 'गिलोटिन' चा अर्थ काय आहे ? अ. सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे. ब. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेविनाच मतदानासाठी ठेवणे. क. आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत. ड. अर्थसंकल्पाच्या शेवटी संसदेकडून नकार. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त ब✓ योग्य
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त अ, ब आणि क
  • )फक्त अ

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Current Affairs

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी, 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल्य भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले ?

  • )नवी दिल्ली✓ योग्य
  • )हैदराबाद
  • )बंगळूरू
  • )लखनऊ

स्रोत: अधिकृत उत्तरतालिका (पडताळलेले).

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/rajyaseva-2025-gs-paper-i