स्पर्धाAI

MPSC गट क २०२३

Common Paper II · ८५ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Logical Reasoning

A हे C चे वडील आहेत आणि D हा B चा मुलगा आहे. E हा A चा भाऊ आहे. जर C ही D ची बहीण असेल तर B चे E शी नाते काय ?

  • )मुलगी
  • )पती
  • )दिर✓ योग्य
  • )बहीण

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

जर (A + B) म्हणजे A हा B चा भाऊ आहे; (A – B) म्हणजे A ही B ची बहीण आहे; (A × B) म्हणजे A ही B ची पत्नी आहे; आणि (A ÷ B) म्हणजे A हे B चे वडील आहेत, तर खालीलपैकी कोणता पर्याय 'O हा L चा मुलगा आहे' हे दर्शवितो ?

  • )L × M + N + O – P
  • )L ÷ M ÷ O – N ÷ P
  • )L × M ÷ N – P + O
  • )L × M ÷ N – O + P✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

आरशातून घड्याळाकडे बघितले असता त्यात 6 : 30 वाजलेले दर्शविते तर घड्याळात बरोबर किती वाजलेलेत ?

  • )6 : 30
  • )5 : 30✓ योग्य
  • )12 : 30
  • )3 : 30

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

खालील इंग्रजी वर्णमाला गट, इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या स्थानांच्या संदर्भात एक विशिष्ट आकृतिबंध तयार करतात. या आकृतिबंधावर आधारित, खालीलपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल ? HDG, NJM, TPS, ?

  • )ZVY✓ योग्य
  • )QNR
  • )RPS
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

आलेखाचे काळजीपूर्वक परीक्षण करून, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. (a) कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वात कमी फरक आहे? (b) गेल्या पाच वर्षांत, शाळेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या किती होती? (c) समान संख्येमध्ये विद्यार्थी किती वेळा नापास झालेले आहेत?

  • )2015-16, 90, चार✓ योग्य
  • )2016-17, 70, पाच
  • )2017-18, 90, पाच
  • )2015-16, 90, तीन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Logical Reasoning

आदित 20 मीटर उत्तरेला चालतो मग तो उजवीकडे वळतो व 30 मीटर चालतो. मग तो उजवीकडे वळतो व 35 मीटर चालतो. मग तो डावीकडे वळतो व 15 मीटर चालतो. मग तो पुन्हा डावीकडे वळतो व 15 मीटर चालतो. तो त्याच्यापासून, त्याच्या मूळस्थितीपासून कोणत्या दिशेने व किती मीटर दूर आहे?

  • )15 मीटर पश्चिम
  • )30 मीटर पूर्व
  • )30 मीटर पश्चिम
  • )45 मीटर पूर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Current Affairs

संयुक्त राष्ट्राची 27 वी जागतिक हवामान बदल परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

  • )इजिप्त✓ योग्य
  • )रशिया
  • )जर्मनी
  • )इटली

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Current Affairs

‘वर्ल्ड बँक ग्रुप’ चे अध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर 3 मे 2023 रोजी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे?

  • )तरनजित सिंग संधू
  • )रघुराम राजन
  • )उर्जित पटेल
  • )अजयपाल सिंग बंगा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Current Affairs

कोरवा आयुध कारखाना कोणत्या देशासोबतच्या संयुक्त उपक्रमात AK-203 असॉल्ट रायफल्सची निर्मिती करत आहे?

  • )जपान
  • )रशिया✓ योग्य
  • )यु एस ए
  • )फ्रान्स

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Current Affairs

2023 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा अंबाती थिरुपथी रायडू कोणत्या राज्याचा आहे?

  • )कर्नाटक
  • )आंध्र प्रदेश✓ योग्य
  • )तामिळनाडू
  • )केरळ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Science

भारतीय रेल्वेने सुरक्षितता वाढविण्यासाठी ‘कवच’ नावाची ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली अमलात आणली आहे. हे तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे?

  • )इस्रो / ISRO
  • )डी.आर.डी.ओ. / DRDO
  • )भारतीय रेल्वे / Indian Railway
  • )आर.डी.एस.ओ. / RDSO✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Current Affairs

प्रत्येक सिगारेटवर अनिवार्य आरोग्यविषयक चेतावणी देणारा कोणता देश जगातील पहिला देश बनला आहे?

  • )कॅनडा / Canada✓ योग्य
  • )रशिया / Russia
  • )इटली / Italy
  • )कुवैत / Kuwait

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Current Affairs

खालीलपैकी कोणते कथन/ने असत्य नाही? (a) ‘नाटो प्लस’ ही संघटना अमेरिकेने बनवली. (b) ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इजरायल, जपान, दक्षिण कोरिया हे देश या संघटनेचे सभासद आहेत. (c) अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटी ने भारताला ‘नाटो प्लस’ चा दर्जा देण्याची शिफारस केली आहे. (d) चीनच्या घेराबंदीसाठी हा दर्जा भारताला आवश्यक आहे.

  • )फक्त (a), (b) आणि (c) / Only (a), (b) and (c)
  • )फक्त (a), (c) आणि (d) / Only (a), (c) and (d)
  • )फक्त (a), (b) आणि (d) / Only (a), (b) and (d)
  • )वरील सर्व / All the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Current Affairs

'आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय' भारत सरकार यांच्याकडून राबविल्या जात असलेल्या 'आभा' कार्ड (ABHA Card) हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या उपक्रमाचा भाग आहे?

  • )आयुष्मान भारत डाटा मिशन
  • )आयुष्मान भारत डिजीटल मिशन✓ योग्य
  • )आयुष्मान भारत डाटा मॉडेल
  • )आयुर्वेदिक भारत डिजीटल मिशन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Current Affairs

भारतात दूरसंचार क्षेत्रात सर्वात प्रथम 5 जी सेवा कोणत्या कंपनीने सुरू केली?

  • )(a) भारती एअरटेल✓ योग्य
  • )(b) रिलायन्स जिओ
  • )(c) आयडीआ
  • )(d) बी.एस.एन.एल.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Current Affairs

खालीलपैकी कोणते कथन/कथने बरोबर नाही? (a) आय एन एस मोरमुगाओला इंडियन नेव्हीच्या वॉरशिप डिझाइन ब्युरो ने डिझाइन केले आहे. (b) हा एक स्टेल्थ गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. (c) हा पी-15 ब्रावो प्रोजेक्टचा दुसरा जहाज आहे. (d) यातील 90% पार्ट आपल्या देशात बनवण्यात आले आहेत.

  • )फक्त (a)
  • )फक्त (b) आणि (c)
  • )फक्त (c) आणि (d)
  • )फक्त (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Quantitative Aptitude

इमारत बांधताना विविध बाबींवरील खर्च दाखवणारा वृत्तालेख दिलेला आहे. इमारत बांधणीचा एकूण खर्च ₹ 5,40,000 आहे, त्यावरून लोखंडासाठी झालेला खर्च किती ?

  • )₹ 67,500✓ योग्य
  • )₹ 72,000
  • )₹ 65,000
  • )₹ 70,000

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Logical Reasoning

एका गावात मराठी जाणणारे 82%, हिन्दी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत, जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर त्या गावाची लोकसंख्या किती ?

  • )2200
  • )3200
  • )3400✓ योग्य
  • )3500

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Quantitative Aptitude

सोबतच्या हिस्टोग्राम मध्ये एका विशिष्ट शेअरची शेअर बाजारात बंद किंमतीची वारंवारता दिली आहे. दिलेल्या हिस्टोग्राम वरून 80 पर्सेंटाईल कोणत्या वर्गात आहे?

  • )20 - 30
  • )10 - 20
  • )40 - 50
  • )30 - 40✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Quantitative Aptitude

जोडस्तंभालेखात राहुल, निकिता व विकासने चाचणी मालिकेत मिळवलेले गुण दर्शविले आहेत. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

  • )चाचणी मालिकेत निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळविले. (1) Nikita scored more marks than Rahul and Vikas in overall test series.
  • )चाचणी मालिकेत विकासने राहुल व निकितापेक्षा कमी गुण मिळविले. (2) Vikas scored less marks than Nikita and Rahul in overall test series.
  • )चाचणी मालिकेत निकिता व राहुलने विकासपेक्षा जास्त गुण मिळविले. (3) Nikita and Rahul scored more marks than Vikas in the test series.
  • )चाचणी मालिकेत निकिता व राहुल या दोघांनीही विकासपेक्षा कमी गुण मिळविले. (4) Nikita and Rahul both scored less marks than Vikas in overall test series.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Quantitative Aptitudeआयोगाने रद्द

जर A चे 30% = 0.25, B = C/5, तर A : B : C = ?

  • )15 : 12 : 10
  • )12 : 15 : 10
  • )10 : 12 : 15
  • )10 : 15 : 12

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २७Quantitative Aptitude

मोटारगाडी A 60 कि.मी. प्रति तास वेगाने धावते तर मोटारगाडी B 75 कि.मी. प्रति तास वेगाने धावते. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात. मोटारगाडी A ही मोटारगाडी B च्या 60 कि.मी. पुढे आहे. तर मोटारगाडी B ला मोटारगाडी A पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल?

  • )15 तास
  • )4 तास✓ योग्य
  • )2 तास
  • )4.5 तास

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Quantitative Aptitude

सोडवा : (3.07)² + (0.0193)² / (0.307)² + (0.00193)²

  • )100✓ योग्य
  • )1
  • )10
  • )1/100

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न २९Quantitative Aptitude

एक दुकानदार 10 रू. ला 15 आंबे खरेदी करतो व 10 आंबे 15 रुपयाला या प्रमाणे विकतो तर त्याला शेकडा नफा किती होईल ?

  • )50
  • )66
  • )75
  • )125✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Quantitative Aptitude

4 पुरुष एक काम 8 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 8 स्त्रीया 16 दिवसांत पूर्ण करतात. हेच काम 4 पुरुष व 4 स्त्रीया किती दिवसांत पूर्ण करतील ?

  • )3 2/5 दिवसांत
  • )3 1/3 दिवसांत
  • )5 2/6 दिवसांत
  • )6 2/5 दिवसांत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Quantitative Aptitude

खालील आकृतीत ABCD हा चौरस वर्तुळात कोरला आहे. वर्तुळाचा परिघ 2π√x आहे. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती आहे ?

  • )2x
  • )πx - 2x✓ योग्य
  • )πx - 2√x
  • )1 - 2/π

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ३३Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील तरतुदींनुसार जोड्या लावा : कलम (a) कलम 7 (b) कलम 10 (c) कलम 13 (d) कलम 20 तरतूद (i) नियत कालमर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे. (ii) महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग घटित करणे. (iii) लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे. (iv) शास्ती

  • )(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
  • )(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
  • )(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
  • )(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Polity

माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार जोड्या लावा : कलम (a) कलम 4 (b) कलम 7 (c) कलम 9 (d) कलम 15 तरतूद (i) विवक्षित प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची कारणे (ii) राज्य माहिती आयोग घटित करणे (iii) सार्वजनिक प्राधिकरणांवरील आबंधने (iv) विनंतीचा अर्ज निकालात काढणे

  • )(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
  • )(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
  • )(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)✓ योग्य
  • )(a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

जोड्या लावा - (संविधान सभेतील समिती) 'A' (समिती) (a) नागरिकात्वसंबंधी तदर्थ समिती (b) प्रेस गॅलरी समिती (c) राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती (d) मूलभूत अधिकार उपसमिती 'B' (अध्यक्ष) (i) जे.बी. कृपलानी (ii) उषा नाथ सेन (iii) एस. वरदाचारी (iv) डॉ. राजेंद्र प्रसाद

  • )(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)✓ योग्य
  • )(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
  • )(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
  • )(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Polity

केंद्र सरकार राज्यसरकारंना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदोनुसार निर्देश देऊ शकते ?

  • )कलम 370
  • )कलम 356
  • )कलम 256✓ योग्य
  • )कलम 263

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Polity

खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही ?

  • )अनुच्छेद - 167 - मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये
  • )अनुच्छेद - 163 - मुख्यमंत्र्यांचा शपथविधी✓ योग्य
  • )अनुच्छेद - 164 - राज्यमंत्र्यांशी संबंधित तरतुदी
  • )अनुच्छेद - 166 - राज्यसरकारच्या कारवाया

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Polity

खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचार सरणीवर आधारित आहे? (a) अनुच्छेद 43 (b) अनुच्छेद 47 (c) अनुच्छेद 48 (d) अनुच्छेद 39 A

  • )फक्त (a), (b), (c) / Only (a), (b), (c)✓ योग्य
  • )फक्त (b), (c), (d) / Only (b), (c), (d)
  • )फक्त (a), (b), (d) / Only (a), (b), (d)
  • )फक्त (a), (c), (d) / Only (a), (c), (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Polity

“ही संविधान सभा भारताला स्वतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते.” संविधान सभेने हा उद्दिष्टाचा ठराव कधी संमत केला?

  • )26 नोव्हेंबर 1950 / 26 November, 1950
  • )26 नोव्हेंबर 1949 / 26 November, 1949
  • )26 जानेवारी 1948 / 26 January, 1948
  • )22 जानेवारी 1947 / 22 January, 1947✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Polity

मूलभूत कर्तव्यांबाबत योग्य कथन/ने ओळखा : (a) 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्यांबाबत शिफारस करण्यासाठी सरदार स्वर्ण सिंग समितीची स्थापना केली. (b) वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य 88 व्या घटना दुरुस्ती कायदा, 2002 द्वारे जोडण्यात आले.

  • )फक्त (a) / Only (a)✓ योग्य
  • )फक्त (b) / Only (b)
  • )(a) व (b) दोन्हीही / Both (a) and (b)
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Polity

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही ?

  • )शोषणाविरुद्धचा अधिकार - अनुच्छेद 23 ते 24
  • )संवैधानिक उपायांचा अधिकार - अनुच्छेद 32 ते 35
  • )धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार - अनुच्छेद 19 ते 22✓ योग्य
  • )सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार - अनुच्छेद 29 ते 30

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Polity

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचे संरक्षण करण्यात आले आहे ? (a) अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण (b) महिला वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण (c) अनुसूचित जातीच्या हितसंबंधाचे संरक्षण (d) अनुसूचित जमातीच्या हितसंबंधाचे संरक्षण

  • )(a) आणि (b)
  • )(a)✓ योग्य
  • )(b)
  • )(c) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Polity

राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहेत : (a) राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे (b) विधान सभा विसर्जित करणे (c) अध्यादेश जारी करणे (d) मंत्रिमंडळ बरखास्त करणे

  • )फक्त (a), (b), (c)✓ योग्य
  • )फक्त (b), (c), (d)
  • )फक्त (a), (c), (d)
  • )फक्त (a), (b), (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Polity

भारताच्या संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केली आहे ?

  • )2021
  • )2026✓ योग्य
  • )2031
  • )2036

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Polity

जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावरून मतभेद असतील तर संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो?

  • )राज्यसभेचे अध्यक्ष
  • )भारताचे राष्ट्रपती✓ योग्य
  • )लोकसभा अध्यक्ष
  • )भारताचे सरन्यायाधीश

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Polity

राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला ?

  • )अमेरिकन मॉडेल
  • )कॅनेडीयन मॉडेल✓ योग्य
  • )ऑस्ट्रेलियन मॉडेल
  • )जर्मन मॉडेल

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Polity

संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजे 'भारत राज्यांचा संघ असेल' असा उल्लेख आहे?

  • )अनुच्छेद - 1✓ योग्य
  • )अनुच्छेद - 2
  • )अनुच्छेद - 3
  • )अनुच्छेद - 4

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२History

ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांचा उपयोग झाला होता? (a) ज्ञानोदय (b) तारप्रसारक (c) प्रबोधय (d) सायंदीपिका

  • )(a) आणि (b) फक्त
  • )(b) and (c) only
  • )(c) आणि (d) फक्त
  • )all the above correct✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३History

खालीलपैकी कोणत्या क्रांतीकारकाने पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सशस्त्र क्रांतीचा प्रचार केला होता?

  • )विनायक देशपांडे
  • )विष्णू गणेश पिंगळे✓ योग्य
  • )शिवराम हरी राजगुरु
  • )वि.दा. सावरकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४History

शेतकरी चळवळीविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? (a) कृष्णराव भालेकर यांनी 'दिनबंधू' वृत्तपत्रातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. (b) दिनकरराव जवळकर यांचे 'तेज' वृत्तपत्र हे शेतकऱ्यांचे मुखपत्र होते. (c) पुणे येथील शेतकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल रामजी शिंदे होते. (d) साने गुरुजींनी खानदेशात शेतकऱ्यांचे संघटन केले.

  • )(a) आणि (b)
  • )(a), (b) आणि (c)
  • )(a), (b), (c) आणि (d)✓ योग्य
  • )(a) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५History

खालीलपैकी कोणास दुसरे ब्रहस्पती म्हणून संबोधले जात असे?

  • )दादोबा पांडुरंग तर्खडकर
  • )बाळशास्त्री जांभेकर
  • )कृष्णशास्त्री चिपळूणकर✓ योग्य
  • )महात्मा जोतीराव फुले

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६History

असहकार आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने खालीलपैकी कोणत्या उपायांची शिफारस केली? (a) सभा उधळून लावण्यासाठी जरूर तर गोळीबारही करावा. (b) सरकारी कायद्यामागे भरपूर शक्ती आहे हे जनतेला दाखवून देण्यासाठी गावातून लष्करी मार्च काढावे. (c) सिडीशस मीटिंग ॲक्ट कोणत्याही सरकारने लागू केला तर व्हाईसरॉय सरकार त्यास संमती देईल. (d) कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांना धीर देण्याकरिता आणि पोलीस दलाला सहाय्य म्हणून लष्कराचा भरपूर वापर करावा.

  • )(b), (c)
  • )(a), (b)
  • )(a), (c)
  • )(a), (b), (c), (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७History

इ.स. 1896 मध्ये ब्रिटीश सरकारने हिंदुस्थानची आर्थिक पाहणी करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या सहकार्याने कोणते कमिशन नेमले होते?

  • )वेल्बी कमिशन✓ योग्य
  • )वेव्हेल कमिशन
  • )रौलट कमिशन
  • )फेडरल कमिशन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८History

यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विधवांच्या उन्नतीसाठी खर्च केले, आणि ते विधवांच्या पुनर्विवाह मंडळाचे सचिव होते.

  • )महात्मा फुले
  • )सावित्रीबाई फुले
  • )रमाबाई आंबेडकर
  • )प्रा. महर्षी धोंडो केशव कर्वे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९History

इ.स. 1937 ते 1944 पर्यंत सतत सात वर्षांकरिता खालीलपैकी कोण हिंदूमाहासभेचे अध्यक्ष होते ?

  • )डॉ. बा.शि. मुंजे
  • )सर महिंद्रचंद्र नंदी
  • )डॉ. हेडगेवार
  • )वि.दा. सावरकर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०History

इ.स. 1897 च्या प्लेगच्या साथीत कोणते कामगार नेते बळी पडले ?

  • )श्री. नारायण मेघाजी लोखंडे✓ योग्य
  • )श्री. रामचंद्र शिंदे
  • )ना.म. जोशी
  • )श्री. रघु कोरगावकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Geography

खालील विधानांचा विचार करा : (a) सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण असे म्हणतात. (b) महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग/भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली. (c) कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी 700 कि.मी. पेक्षा जास्त आहे. (d) कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ 30000 चौ.कि.मी. पेक्षा जास्त आहे. वरिलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

  • )(a) फक्त / (a) only
  • )(a) आणि (b) फक्त / (a) and (b) only
  • )(a), (b) आणि (c) / (a), (b) and (c)
  • )वरील सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Geography

सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

  • )घाटमाथा (Ghatmatha)
  • )कोकण (Konkan)
  • )मावळ (Maval)✓ योग्य
  • )मराठवाडा (Marathwada)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Geography

शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो ?

  • )अजंठा डोंगर (Ajanta Hills)✓ योग्य
  • )भोर गड (Bhor gad)
  • )वणी डोंगर (Vani Hills)
  • )सातपुडा पर्वत रांग (Satpuda Mountain range)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Environment

भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा भारताच्या राजपत्र कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला ?

  • )मार्च 1986 (March 1986)
  • )मे 1972 (May 1972)
  • )मे 1986 (May 1986)✓ योग्य
  • )नोव्हेंबर 1986 (November 1986)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Science

आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयात कोणत्या वर्षी करण्यात आला ?

  • )मार्च 1974 (March 1974)
  • )मार्च 1967 (March 1967)
  • )मार्च 1999 (March 1999)✓ योग्य
  • )मार्च 1975 (March 1975)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Environment

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने खालीलपैकी कोणती पर्यावरण आरोग्य संघटना विकसित केली आहे ? (a) संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना (FAO) (b) पर्यावरण आणि वन मंत्रालय (MOEF) (c) आरोग्य पर्यावरण लिंक इनिशिएटिव्ह (HELI) (d) जागतिक निसर्ग संवर्धन संघटना (IUCN) पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (b) (Only (b))
  • )(a) आणि (b) ((a) and (b))
  • )फक्त (c) (Only (c))✓ योग्य
  • )वरील सर्व बरोबर (all are correct)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Geography

हिमालयातून वहात येणारे जलप्रवाह पायथ्यालगतीच्या प्रदेशात दगड, गोटे, वाळू यांचे संचयन करतात, त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात त्यांना ___________ म्हणतात.

  • )तराई
  • )भाबर✓ योग्य
  • )भांगर
  • )खादर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Science

भौतिक राशी व त्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांच्या जोड्या लावा. (a) हवेचा दाब (b) वाऱ्याचा वेग (c) भूकंपाची तीव्रता (d) आवाजाची तीव्रता (i) डेसिबल मीटर (ii) सिस्मो मीटर (iii) बॅरोमीटर (iv) ॲनिमोमीटर पर्यायी उत्तरे :

  • )(a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
  • )(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
  • )(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
  • )(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Science

खालील विधाने विचारात घ्या : (a) ज्या माध्यमांचा अपवर्तन निर्देशांक (RI) प्रकाशाच्या वारंवारितेवर अवलंबून असतो, तेथे प्रकाशाचे विकिरीकरण होते. (b) सर्व पदार्थ-माध्यमे विकिरीकरण करणारे आहेत, फक्त निर्वात पोकळी विकिरीकरण करणारी नाही. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

  • )(a) फक्त
  • )(a) व (b) दोन्ही✓ योग्य
  • )(b) फक्त
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Science

'मायोपीया' हा 'लघुदृष्टीदोष' असून तो या कारणामुळे होतो ....

  • )वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते, पण दृष्टीपटलावर नसते. the image of an object is formed infront of the retina and not on the retina.✓ योग्य
  • )वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे पडते. the image of an object is formed beyond the retina.
  • )वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर पडते. the image of an object is formed exactly on the retina.
  • )वरीलपैकी नाही. None of the above.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Science

सोडियमची अणु संख्या 11 आहे आणि त्याची वस्तुमान संख्या 23 आहे. तर त्यामध्ये _________ असतील.

  • )11 न्यूट्रॉन आणि 12 प्रोटॉन 11 neutrons and 12 protons
  • )12 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन 12 protons and 11 electrons
  • )11 इलेक्ट्रॉन आणि 12 न्यूट्रॉन 11 electrons and 12 neutrons✓ योग्य
  • )12 इलेक्ट्रॉन आणि 11 न्यूट्रॉन 12 electrons and 11 neutrons

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Science

खालीलपैकी कोणत्या वायुमुळे प्रदूषण होत नाही ?

  • )अमोनिया Ammonia
  • )क्लोरीन Chlorine
  • )नायट्रोजन Nitrogen✓ योग्य
  • )हायड्रोजन सल्फाईड Hydrogen Sulphide

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Science

खालीलपैकी कोणता क्षार पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात ?

  • )साबण Soap
  • )धुण्याचा सोडा Washing Soda✓ योग्य
  • )विरंजक चूर्ण Bleaching Powder
  • )खाण्याचा सोडा Baking Soda

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Science

खालीलपैकी कोणत्या जातीच्या प्राण्यात खुली रक्ताभिसरण प्रणाली आहे?

  • )आर्थ्रोपोडा / Arthropoda✓ योग्य
  • )ॲनेलिडा / Annelida
  • )सायकलोस्टोमाटा / Cyclostomata
  • )पायसेस / Pisces

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Science

खालील जोड्या जुळवा : सस्तन प्राण्याचे प्रकार (a) थैली असलेले सस्तन प्राणी (b) उडणारा सस्तन प्राणी (c) दात नसलेला सस्तन प्राणी (d) मुंग्या खाणारा सस्तन प्राणी उदाहरण (i) ब्रॅडीपस (ii) मॅक्रोपस (iii) मनीस (iv) टेरोपस

  • )(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)✓ योग्य
  • )(a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
  • )(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
  • )(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Science

भातावरील खैरा हा रोग कोणत्या सूक्ष्मपोषक घटकांच्या कमतरतेमुळे होतो ?

  • )कॉपर
  • )सोडियम
  • )झिंक✓ योग्य
  • )मॉलिब्डेनम

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Science

वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोडी जुळवा. वनस्पती गट (a) शैवाळ (b) ब्रायोफायटा (c) टेरिडोफायटा (d) अनावृतबीज पर्यायी उत्तरे : (a) शैवाळ (b) ब्रायोफायटा (c) टेरिडोफायटा (d) अनावृतबीज (i) सायकस (ii) लायकोपोडियम (iii) फ्युनारिया (iv) क्लॉमायडोमोनॉस

  • )(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
  • )(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)
  • )(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)✓ योग्य
  • )(a)-(iii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Science

खालीलपैकी वनस्पतींचे रोग व त्यांचे कारकजीव यांची अयोग्य जोडी ओळखा.

  • )लिंबू वर्गीय कॅन्कर - झान्थोमोनास सिट्राय / Citrus canker - Xanthomonas citri
  • )गव्हावरील तांबेरा - पक्सिनिया ग्रॅमिनीस ट्रिटीसाय / Rust of Wheat - Puccinia graminis tritici
  • )बाजरी वरील अरगट - सरकोस्पोरा परसोनेटा / Ergot of bajra - Cercospora Personata✓ योग्य
  • )ऊसाचा लाल कुज रोग - कोलिओट्रोटायकम फलकॅटम् / Red rot of sugarcane - Colletotrichum fulcatum

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Geography

भारतात हवाई छायाचित्रणाचे काम खालीलपैकी कोणती संस्था करते ? (a) इंडियन एअर फोर्स (b) इंडियन एअर सर्व्हे (c) एन.आर.एस.ए (d) आय.एम.डी

  • )फक्त (a) / (a) only
  • )फक्त (a) आणि (b) / (a) and (b) only
  • )वरील सर्व बरोबर / All are correct
  • )(a), (b) आणि (c) / (a), (b) and (c)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Science

व्हर्टिकल एरियल फोटोग्राफीचा वापर कार्टोग्राफी मध्ये केला जातो. त्याचा उपयोग पुढील कार्यासाठी होतो. (a) फोटोग्रामेट्रिक सर्वेक्षण (b) चित्रपट निर्मिती (c) स्थलकृती नकाशे तयार करणे (d) पॉवर लाईन तपासणी कोणते उत्तर/उत्तरे पर्याय बरोबर आहेत ?

  • )(a), (b), (c) आणि (d)
  • )(a), (b) आणि (c)
  • )(a) आणि (b)
  • )(a) आणि (c)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Science

मिथ्या वर्ण स्वरूप हवाई छायाचित्रा वाचनासाठी निरोगी वनस्पतीला कोणता रंग वापरला जातो ?

  • )पांढरा
  • )गुलाबी
  • )लाल✓ योग्य
  • )काळा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Science

जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीतील (जी.एन.एस.एस.) ग्लोनास हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे?

  • )अमेरिका
  • )रशिया✓ योग्य
  • )चीन
  • )भारत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Science

संगणक जोडणीतील दोन उपकरणांमधील डेटा संप्रेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारे केले जाते ?

  • )सिम्प्लेक्स (एक दिशा)
  • )हाफ डुप्लेक्स (एकवेळ एक दिशा)
  • )फुल डुप्लेक्स
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Science

डिजिटल इंडिया अंतर्गत ज्या सुविधा शासनाने लोकांना दिल्या त्याची प्रतिक्रिया लगेचच घेणारी जी सिस्टम तयार केली त्याचे नाव ______ आहे.

  • )रीअल टाईम असेसमेंट सिस्टीम / Real Time Assessment System
  • )रँडम असेसमेंट सिस्टीम / Random Assessment System
  • )रॅपिड असेसमेंट सिस्टीम / Rapid Assessment System✓ योग्य
  • )रिझर्व्ह असेसमेंट सिस्टीम / Reserve Assessment System

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Science

मोबाईल कॉम्प्युटिंग ______ या वातावरणाचा प्रकार देखील मानला जाऊ शकतो.

  • )ग्रिड संगणन / Grid computing
  • )आधुनिक संगणन / Modern computing
  • )वितरित संगणन / Distributed computing✓ योग्य
  • )वरीलपैकी काहीही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Science

खालीलपैकी ओळखा जे मुख्यतः होस्ट वेबसाइटसाठी वापरले जाते.

  • )मेल सर्व्हर / Mail Server
  • )तार्किक सर्व्हर / Logical Server
  • )वेब सर्व्हर / Web Server✓ योग्य
  • )वरीलपैकी काहीही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Economy

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने खालील संकल्पना विकसित केल्या.

  • )सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे निर्गुंतवणुकीकरण / Disinvestment of Public Sector enterprises
  • )भारतात बनवा / Make in India
  • )सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रतिमान / Public Private Partnership model✓ योग्य
  • )स्मार्ट शहरे / Smart cities

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Economy

मानव विकास निर्देशांकाबाबत पुढीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/त ? (a) संयुक्त राष्ट्रासंघाच्या विकास कार्यक्रमाने (UNDP) 1990 पासून आपल्या अहवालात मानव विकास निर्देशांक या संकल्पनेचा समावेश केला. (b) मानव विकास निर्देशांक या संकल्पनेचे श्रेय लॉर्ड मेघनाद देसाई व प्रा. अमर्त्य सेन यांना जाते. (c) मानव विकासाशी निगडित पाच घटकांचा समावेश मानव विकास निर्देशांकात करण्यात येतो. (d) मानव विकास निर्देशांकाचे मूल्य नेहमी शून्य आणि एक यांच्या दरम्यान असते. पर्यायी उत्तरे :

  • )(b), (c), (d)
  • )(a), (b), (c)
  • )(a), (b), (d)✓ योग्य
  • )(a), (c), (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Economy

बाजार किंमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित पद्धतीशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

  • )बाजार किंमतीनुसार स्थूल मूल्यवर्धित - स्थिर भांडवलाचा उपभोग उदा. घसारा / Gross Value added at Market Price - Consumption of fixed Capital i.e. depreciation✓ योग्य
  • )उत्पादनाचे मूल्य - मध्यवर्ती उपभोग / Value of output - intermediate consumption
  • )निव्वळ देशांतर्गत उत्पादन + परदेशातील निव्वळ घटक उत्पन्न / Net Domestic Product + Net factor income from abroad
  • )विक्री + साठ्यात बदल / Sales + Change in stocks

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Economy

भारतीय शेतीच्या उत्पादकते संदर्भात पुढील विधानांमधून अयोग्य विधान ओळखा. (a) स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात शेतीच्या उत्पादकतेत वेगाने वाढ झाली. (b) शेतीच्या उत्पादकतेतील वाढ ही देशात सर्वत्र समान होती. (c) जगातील इतर विकसित व विकसनशील देशांच्या तुलनेत भारतीय शेतीची उत्पादकता अजूनही बऱ्याच प्रमाणात कमी आहे.

  • )फक्त (a)
  • )फक्त (a), (b)✓ योग्य
  • )फक्त (c)
  • )फक्त (b), (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Economy

96. शून्याधारित अर्थसंकल्पा संदर्भात पुढील विधानातून योग्य विधान ओळखा : (a) 1980 मध्ये यू.एस.च्या कृषी विभागाने प्रथम सादर केले. (b) सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे एक पाऊल म्हणून सातव्या योजनेत शून्याधारित अर्थसंकल्पाची शिफारस केली गेली. (c) 1998 मध्ये केंद्रशासनाने शून्याधारित अर्थसंकल्पाचा दृष्टिकोन स्वीकारला.

  • )(a), (b)
  • )Only (b)✓ योग्य
  • )Only (c)
  • )(a), (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Economy

97. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. (आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत) : (a) तुलनात्मक लाभाचा सिद्धांत - ॲडम स्मिथ (b) उत्पादन घटक प्रमाण सिद्धांत - हेक्शर ओलिन (c) केवळ लाभाचा सिद्धांत - रिकार्डो

  • )Only (a), (c)
  • )Only (b)✓ योग्य
  • )Only (c)
  • )Only (a), (b)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Economy

2021 - 22 दरम्यान आरबीआयच्या निव्वळ परकीय चलन मालमत्तेत _______ होती. (a) सोने (b) रुपयाची नाणी (c) केंद्र सरकारचे रोखे (d) विदेशी चलन मालमत्ता

  • )(a) आणि (b)
  • )(a) आणि (c)
  • )(a) आणि (d)✓ योग्य
  • )(c) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2023-common-paper-ii