स्पर्धाAI

MPSC गट क २०२३

Combined Prelims · ९१ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न History

नारायण मेघाजी लोखंडे यांनी 'बॉम्बे मिल हँड असोसिएशन' ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते ? अ. केशवराव बागडे, केशवराव बोले ब. रघु भिकाजी, गेणू बाबाजी क. नारायण सुकाजी, विठ्ठलराव कोरगांवकर ड. कृष्णाजी अर्जुन केळूसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार a. Keshavrao Bagde, Keshavrao Bole b. Raghu Bhikaji, Genu Babaji c. Narayan Surkaji, Vitthalrao Korgaonkar d. Krishnaji Arjun Keluskar, Ramchandra Shinde, Narayan Pawar

  • )अ आणि ब फक्त / a and b only
  • )ब आणि ड फक्त / b and d only
  • )अ, ब आणि क फक्त / a, b and c only
  • )ब, क आणि ड फक्त / b, c and d only✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

इ.स. 1857 च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे ______ हा गव्हर्नर जनरल म्हणाला.

  • )लॉर्ड डलहौसी / Lord Dalhousie
  • )लॉर्ड रिपन / Lord Ripon
  • )लॉर्ड माउंटबॅटन / Lord Mountbatten
  • )लॉर्ड कॅनिंग / Lord Canning✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. दादोबा तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन, इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. ब. प्रार्थना समाजामार्फत 'सुबोध पत्रिका' सुरु केली. क. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना. म. जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी 'सोशल सर्व्हिस लीग'ची स्थापना केली. ड. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली.

  • )अ आणि ब फक्त
  • )ब आणि क फक्त
  • )अ, ब आणि क फक्त✓ योग्य
  • )ब, क आणि ड फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

इ.स. 1857 च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती ?

  • )(अ) नील, हॅवलॉक
  • )(ब) आउट्रॅम, लॉरेन्स बंधू
  • )(क) कॅम्पबेल, सर ह्यूज रोज✓ योग्य
  • )(ड) विल्यम डिग्बी, कॉलिन क्लार्क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

इ.स. 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते ? (अ) भिमडी, शिरूर, पारनेर, नगर (ब) इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा (क) तासगांव, शिराळा, जत; मलकापूर (ड) श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी (a) Bhimadi, Shirur, Parner, Nagar (b) Indapur, Haveli, Baglan, Satara (c) Tasgaon, Shirala, Jath, Malkapur (d) Shrigonda, Karjat, Solapur, Ratnagiri

  • )अ आणि ब फक्त / a and b only
  • )ब आणि क फक्त / b and c only
  • )अ, ब आणि ड फक्त / a, b and d only✓ योग्य
  • )क आणि ड फक्त / c and d only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

क्रांतीकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळ/आंदोलना मध्ये भाग घेतला होता ? (अ) गोवा मुक्ती संग्राम (ब) हैद्राबाद मुक्ती संग्राम (क) संयुक्त महाराष्ट्र चळवळ (ड) महाराष्ट्र – म्हैसूर-सीमा आंदोलन (a) Goa Liberation Movement (b) Hyderabad Liberation Movement (c) Samyukta Maharashtra Movement (d) Maharashtra – Mysore Border Agitation

  • )अ आणि ब फक्त / a and b only
  • )अ, ब आणि क फक्त / a, b and c only
  • )ब, क आणि ड फक्त / b, c and d only
  • )वरील सर्व बरोबर / All of the above are correct✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

इ. स. 1919 मध्ये ब्रिटीश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण अ. क्रांतिकारकांच्या चळवळी मधून भारतीयांच्यात असंतोष वाढला ब. काँग्रेस व मुस्लीम लीग यांच्यातील युती क. जहाल व मवाळ यांच्यातील युती ड. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती

  • )अ आणि ब फक्त
  • )ब आणि क फक्त
  • )ब, क आणि ड फक्त
  • )वरील सर्व बरोबर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

__________ यांनी स्वदेशी चळवळीचा 'श्री गणेश' करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली.

  • )गणेश वासुदेव जोशी✓ योग्य
  • )सीताराम हरी चिपळूणकर
  • )न्या. के. टी. तेलंग
  • )महात्मा फुले

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०History

जोड्या लावा: राष्ट्रीय सभेची अधिवेशने - ठिकाण अध्यक्ष अ. 1889 – पाचवे अधिवेशन – मुंबई I. आनंदाचार्लू ब. 1891 – सातवे अधिवेशन – नागपूर II. शंकरन नायर क. 1895 – अकरावे अधिवेशन – पुणे III. विलियम वेडरबर्न ड. 1897 – तेरावे अधिवेशन – अमरावती IV. सुरेंद्रनाथ बॅनर्जी

  • )II IV I III
  • )III I IV II✓ योग्य
  • )IV II III I
  • )II I IV III

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Geography

महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो.

  • )जांभा दगड (Laterite rock)
  • )संगमरवरी दगड (Marble rock)
  • )ग्रॅनाईट दगड (Granite rock)
  • )बेसॉल्ट दगड (Basalt rock)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Geography

13. योग्य जोड्या जुळवा : राज्य a. हरियाणा b. हिमाचल प्रदेश c. झारखंड d. बिहार लोकसंख्या घनता दर चौ. कि.मी. (2011) i. 123 ii. 414 iii. 573 iv. 1106

  • )ii i iii iv
  • )iii i ii iv✓ योग्य
  • )iii ii iv i
  • )i iii ii iv

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Geography

15. रो-रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वेमार्गावर झाली ?

  • )उत्तर-पूर्व सीमांत रेल्वेमार्ग
  • )दक्षिण रेल्वेमार्ग
  • )कोंकण रेल्वेमार्ग✓ योग्य
  • )पूर्व रेल्वेमार्ग

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Geography

16. योग्य जोड्या जुळवा : राज्य a. जम्मू व काश्मीर b. हिमाचल प्रदेश c. पंजाब d. हरियाणा पर्यटन स्थळ i. तरण तारण, बाबा बकाला ii. अंबाला, भडकल सरोवर iii. अवंतीपूर, अलचीगोम्पा iv. त्रिलोकनाथ, नैनादेवी

  • )iv iii ii i
  • )iii iv i ii✓ योग्य
  • )iii iv ii i
  • )iv iii i ii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Current Affairs

भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारी सलग तीन वेळा (2019 ते 2021) स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले ?

  • )इंदूर✓ योग्य
  • )पुणे
  • )मुंबई
  • )सुरत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Geographyआयोगाने रद्द

योग्य जोड्या जुळवा : औष्णिक विज केंद्र a. कोराडी b. पारस c. उरण d. फेकरी जिल्हा i. ठाणे ii. नागपूर iii. जळगाव iv. अकोला

  • )(a)-i (b)-ii (c)-iii (d)-iv
  • )(a)-iv (b)-iii (c)-ii (d)-i
  • )(a)-ii (b)-iv (c)-iii (d)-i
  • )(a)-ii (b)-iv (c)-i (d)-iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २०Geography

रायलसीमा पठाराचे स्थान _________ येथे आहे.

  • )कर्नाटक पठाराच्या उत्तरेला / North of Karnataka Plateau
  • )कर्नाटक पठाराच्या पश्चिमेला / West of Karnataka Plateau
  • )कर्नाटक पठाराच्या दक्षिणेला / South of Karnataka Plateau
  • )कर्नाटक पठाराच्या पूर्वेला / East of Karnataka Plateau✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Economy

खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली.

  • )दरडोई उत्पन्न प्रतिमाह ग्रामीण भागासाठी ₹ 816 व शहरी भागासाठी ₹ 1,000 / ₹ 816 and ₹ 1,000 per capita income per month in rural areas and urban areas respectively✓ योग्य
  • )दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी ₹ 47 व शहरी भागासाठी ₹ 32 / ₹ 47 and ₹ 32 per capita income per day in rural areas and urban areas respectively
  • )दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी ₹ 49.63 व शहरी भागासाठी ₹ 56.64 / ₹ 49.63 and ₹ 56.64 per capita income per day in rural areas and urban areas respectively
  • )यापैकी नाही / None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Economy

विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला अ. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ ब. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास क. दुष्काळग्रस्त भागाचा विकास ड. ग्रामीण भागात औद्योगिकीकरण

  • )अ फक्त / a only
  • )ब आणि ड फक्त / b and d only
  • )ब आणि क फक्त / b and c only✓ योग्य
  • )ड फक्त / d only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Economy

राजकोषीय नीतीची साधने कोणती ? अ. सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज ब. लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना क. कराराोपण आणि अंदाजपत्रक ड. संसद आणि प्रशासन

  • )अ फक्त / a only
  • )ब आणि क फक्त / b and c only
  • )ड फक्त / d only
  • )अ आणि क फक्त / a and c only✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Economy

उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरु केली ?

  • )केंद्र सरकार / Central Government✓ योग्य
  • )राज्य सरकार / State Government
  • )महाराष्ट्र विद्युत बोर्ड / Maharashtra Electricity Board
  • )जीवन विमा निगम / Life Insurance Corporation

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Economy

ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती ?

  • )डॉ. राजा जे. चेलैया / Dr. Raja J. Chelliah✓ योग्य
  • )एम. नरसिंहम / M. Narasimham
  • )डॉ. सुखमॉय चक्रवर्ती / Dr. Sukhmoy Chakravarty
  • )डॉ. अबीद हुसेन / Dr. Abid Husen

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Economy

2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता ?

  • )स्वयंरोजगार 52%, नियमित 18%, प्रासंगिक 30% / Self employed 52%, regular 18%, casual 30%✓ योग्य
  • )स्वयंरोजगार 30%, नियमित 52%, प्रासंगिक 18% / Self employed 30%, regular 52%, casual 18%
  • )स्वयंरोजगार 20%, नियमित 18%, प्रासंगिक 62% / Self employed 20%, regular 18%, casual 62%
  • )यापैकी नाही / None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Current Affairs

खाद्य तेलांवरील राष्ट्रीय मिशन-तेल पाम _________ मध्ये सुरु करण्यात आले.

  • )ऑगस्ट, 2020 / August, 2020
  • )ऑगस्ट, 2019 / August, 2019
  • )ऑगस्ट, 2022 / August, 2022
  • )ऑगस्ट, 2021 / August, 2021✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Economy

पीक विविधकरण कार्यक्रम 2013-14 पासून ______ ची उपयोजना म्हणून राबविण्यात आला.

  • )ऑपरेशन ग्रीन्स / Operation Greens
  • )राष्ट्रीय कृषि विकास योजना / Rashtriya Krishi Vikas Yojana✓ योग्य
  • )एक जिल्हा एक उत्पादन / One District One Product
  • )भारतीय प्राकृतिक कृषि पद्धती योजना / Bharatiya Prakritik Krishi Paddhati Programme

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Economy

2021-22 दरम्यान एम-3 (M₃) मध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहेत? अ. पोस्ट ऑफिस बचत बँक ठेवी ब. पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी क. बँकाकडील मुदत ठेवी ड. बँकाकडील मागणी ठेवी

  • )अ, ब आणि क / a, b and c
  • )क आणि ड / c and d✓ योग्य
  • )अ, ब आणि ड / a, b and d
  • )वरीलपैकी सर्व / all of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Economy

2023-24 च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्य क्रम आहेत ? अ. सर्वसमावेशक विकास ब. हरित वाढ क. युवा शक्ती ड. आर्थिक क्षेत्र

  • )a आणि d
  • )b आणि c
  • )a आणि b
  • )a, b, c आणि d✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Polity

12 व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह _________ च्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली.

  • )25 : 75
  • )50 : 50
  • )75 : 25✓ योग्य
  • )90 : 10

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Economy

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/त ? अ. युटीजीएसटी, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जातात. ब. आयजीएसटी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करतात.

  • )फक्त अ अयोग्य आहे
  • )फक्त ब अयोग्य आहे
  • )दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Economy

34. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना ______ या योजनेत एकत्रित करण्यात आल्या.

  • )संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना✓ योग्य
  • )स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना
  • )प्रधान मंत्री ग्रामोदय योजना
  • )स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Economy

वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, 2003 (एफ आर बी एम कायदा, 2003) असे नमूद करतो की केंद्र सरकारने ______ पर्यंत महसूली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.

  • )2004 – 05
  • )2008 – 09✓ योग्य
  • )2010 – 11
  • )2015 – 16

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Current Affairs

भारतातील पहिल्या सोन्याच्या एटीएम चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले ?

  • )वाराणसी / Varanasi
  • )हैदराबाद / Hyderabad✓ योग्य
  • )लखनऊ / Lucknow
  • )कोची / Kochi

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Current Affairs

खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले ?

  • )सचिन तेंडुलकर / Sachin Tendulkar
  • )महेंद्रसिंग धोनी / Mahendra Singh Dhoni
  • )विराट कोहली / Virat Kohli
  • )रोहित शर्मा / Rohit Sharma✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Current Affairs

2020 मधील लॉकडाऊन दरम्यान, कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषि उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरु केले.

  • )किसान एक्सप्रेस / Kisan Express
  • )किसान रथ / Kisan Rath✓ योग्य
  • )किसान कनेक्ट / Kisan Connect
  • )कृषि नेटवर्क / Krishi Network

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Current Affairs

पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?

  • )साहित्य / Literature
  • )संगीत / Music✓ योग्य
  • )खेळ / Sports
  • )नागरी सेवा / Civil services

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Current Affairs

2022 मध्ये आयोजित 'अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे' यजमान कोणते शहर आहे ?

  • )सुरत / Surat✓ योग्य
  • )अहमदाबाद / Ahmedabad
  • )मुंबई / Mumbai
  • )पुणे / Pune

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Current Affairs

विस्डेनने 21 व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडले आहे ?

  • )महेंद्रसिंग धोनी / Mahendra Singh Dhoni
  • )विराट कोहली / Virat Kohli
  • )रवींद्र जडेजा / Ravindra Jadeja✓ योग्य
  • )आर. अश्विन / R. Ashwin

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Current Affairs

कोणती संस्था 'अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट' (ASER) प्रसिद्ध करते ?

  • )नीती आयोग / Niti Aayog
  • )प्रथम / Pratham✓ योग्य
  • )ऑक्सफॅम इंटरनॅशनल / Oxfam International
  • )युनिसेफ / UNICEF

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Current Affairs

कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय किव-मॉस्को संवाद स्थापन केला ?

  • )आय.ए.ई.ए. / IAEA✓ योग्य
  • )युनिसेफ / UNICEF
  • )आय.एम.एफ. / IMF
  • )यु.एन.एस.सी. / UNSC

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Current Affairs

कोविड-19 या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला ?

  • )30 जानेवारी 2020, केरळ✓ योग्य
  • )31 डिसेंबर 2019, केरळ
  • )30 जानेवारी 2020, गोवा
  • )31 डिसेंबर 2019, गोवा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Current Affairs

अल मोहद-अल हिंदी हा पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये पार पडला आहे ?

  • )भारत - इराण
  • )भारत - ओमान
  • )भारत - अफगाणिस्तान
  • )भारत - सौदी अरेबिया✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Current Affairs

21 ग्रँड स्लॅम जेते पदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे ?

  • )रॉजर फेडरर
  • )राफेल नदाल✓ योग्य
  • )नोवाक् जोकोविच
  • )आंद्रे अगासी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Current Affairs

युद्धकाळात गाजविलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021 मध्ये अशोकचक्र हा सन्मान यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

  • )अल्ताफ हुसेन भट्ट
  • )ए.एस.आय. बाबू राम✓ योग्य
  • )ज्योतीकुमार निराला
  • )अश्विनीकुमार दिक्षित

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Current Affairs

2021 – 22 चा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण होते ?

  • )दामोदर मौजो✓ योग्य
  • )व्ही. एस. खांडेकर
  • )लक्ष्मणशास्त्री जोशी
  • )विंदा करंदीकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Current Affairs

जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार - 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय राज्याची निवड केली आहे ?

  • )मध्यप्रदेश
  • )छत्तीसगड
  • )ओडीशा
  • )झारखंड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Polity

महाधिवक्त्या बद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

  • )'महाधिवक्त्याची' नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात✓ योग्य
  • )राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्यसरकारला सल्ला देतात
  • )राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात
  • )संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्ये ते पार पाडतात

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Polity

भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

  • )उच्च न्यायालये ‘जनहित याचिकांशी’ संबंधित याचिका स्वीकारू शकतात
  • )उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधिशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात
  • )राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची नियुक्ती करतात✓ योग्य
  • )उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचे निवृत्तीचे वय 62 आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Polity

भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?

  • )राष्ट्रीय जन संपर्क दिन
  • )राष्ट्रीय पंचायत राज दिन✓ योग्य
  • )राष्ट्रीय मतदार दिन
  • )राष्ट्रीय साक्षरता दिन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Polity

खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषद हे सभागृह नाही ? (अ) बिहार (ब) कर्नाटक (क) केरळ (ड) राजस्थान

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क आणि ड✓ योग्य
  • )अ, ब आणि क
  • )फक्त-ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Polity

55. अचूक जोड्या लावा. अ. 61 वी घटनादुरुस्ती ब. 44 वी घटनादुरुस्ती क. 41 वी घटनादुरुस्ती ड. 73 वी घटनादुरुस्ती 1. राज्य लोक सेवा आयोगातील सदस्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे 2. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था 3. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केले 4. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकी विषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात

  • )अ – 4, ब – 3, क – 1, ड – 2
  • )अ – 3, ब – 4, क – 1, ड – 2✓ योग्य
  • )अ – 2, ब – 1, क – 4, ड – 3
  • )अ – 4, ब – 1, क – 3, ड – 2

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Polity

सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये याबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. ब. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे. क. ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. वरीलपैकी अयोग्य विधाने निवडा.

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )फक्त क✓ योग्य
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Polity

खालीलपैकी कोण सरकारीया आयोगाचे सदस्य नव्हते ?

  • )श्री. बी. शिवरामन
  • )डॉ. एस. आर. सेन
  • )रामा सुब्रमण्यम✓ योग्य
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Polity

निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली ?

  • )कलम - 324 भाग - 10 / Article - 324 Part - 10
  • )कलम - 324 भाग - 15 / Article - 324 Part - 15✓ योग्य
  • )कलम - 300 भाग - 9 / Article - 300 Part - 9
  • )कलम - 298 भाग - 6 / Article - 298 Part - 6

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Current Affairs

अचूक जोड्या लावा. I. थॉमस हॉब्ज II. फ्रेडरिक हायेक III. रॉबर्ट नॉझिक IV. रुसो अ. अँग्लो-ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ ब. फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक क. ब्रिटिश तत्त्वज्ञ ड. अमेरिकन तत्त्वज्ञ

  • )I - ब, II - अ, III - ड, IV - क / I - B, II - A, III - D, IV - C
  • )I - क, II - अ, III - ड, IV - ब / I - C, II - A, III - D, IV - B✓ योग्य
  • )I - ड, II - क, III - ब, IV - अ / I - D, II - C, III - B, IV - A
  • )I - ड, II - अ, III - ब, IV - क / I - D, II - A, III - B, IV - C

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Polity

संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा ______ मध्ये तयार केला.

  • )जानेवारी, 1947
  • )मार्च, 1947
  • )सप्टेंबर, 1947
  • )ऑक्टोबर, 1947✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Polity

भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. अ. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा. ब. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे. क. अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बळ घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण. ड. सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे.

  • )अ, ब, क, ड
  • )ड, अ, क, ब
  • )ड, क, ब, अ✓ योग्य
  • )ब, क, ड, अ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३History

मॉंटेग्यू-चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल ______ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.

  • )जून 1918
  • )ऑगस्ट 1918
  • )जुलै 1918✓ योग्य
  • )ऑक्टोबर 1918

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Polity

कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे/त ? अ. भेदभाव करण्यास मनाई - कलम 15 ब. संमेलनाचा हक्क - कलम 19 क. जीवित संरक्षणाचा अधिकार - कलम 20 ड. घटनात्मक उपायाचा अधिकार - कलम 32

  • )अ फक्त
  • )ब आणि क फक्त
  • )क फक्त✓ योग्य
  • )ड फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Polity

समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही ? अ. करारनामे ब. जंगले क. जकात ड. दिवाळखोरी आणि नादारी

  • )ब आणि क
  • )फक्त अ
  • )फक्त क✓ योग्य
  • )फक्त ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Science

शैवाळ वर्गीकरणामध्ये 'किटॉफोरॅलेस' हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो ?

  • )क्लोरोफायटा / Chlorophyta✓ योग्य
  • )कॅरोफायटा / Charophyta
  • )सियानोफायटा / Cyanophyta
  • )ऱ्होडोफायटा / Rhodophyta

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Science

अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण (1) पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते (2) मूळे ऑक्सिजनपासून वंचित होतात (3) पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते (4) वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात

  • )पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते
  • )मूळे ऑक्सिजनपासून वंचित होतात✓ योग्य
  • )पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते
  • )वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Science

नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे ?

  • )क्लोरोफायसी / Chlorophyceae
  • )मीक्झोफायसी / Myxophyceae✓ योग्य
  • )ऱ्होडोफायसी / Rhodophyceae
  • )फियोफायसी / Phaeophyceae

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Science

मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे ?

  • )लेप्टोटिन, पॅचिटिन, झायगोटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस
  • )लेप्टोटिन, डायकायनेसिस, पॅचिटिन, डिप्लोटिन, झायगोटिन
  • )लेप्टोटिन, झायगोटिन, पॅचिटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस✓ योग्य
  • )डायकायनेसिस, डिप्लोटिन, पॅचिटिन, झायगोटिन, लेप्टोटिन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Science

अँटीमोनी संयुगे _________ च्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते.

  • )एलिफंटायसीस
  • )फॅसिओलोप्सियासिस
  • )शिस्टोमियासिस✓ योग्य
  • )वरीलपैकी काहीही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Science

साधारणपणे पॉरिफेरामध्ये गेमेट कशामुळे तयार होतात ?

  • )कोयानोजाईट्स
  • )आर्किओसाईट्स✓ योग्य
  • )मायोसाईट्स
  • )पिनाकोसाईट्स

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Science

विशिष्ट उष्णतेचे, सी.जी.एस. प्रणालीतील एकक ______ हे आहे.

  • )कॅलरीज/ग्रॅम / Calories/gram
  • )कॅलरीज/ग्रॅम डिग्री सेल्सिअस / Calories/gram °C✓ योग्य
  • )कॅलरीज डिग्री सेल्सिअस/ग्रॅम / Calories °C/gram
  • )वरीलपैकी कोणतेच नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Scienceआयोगाने रद्द

विद्युतधारेने विद्युतरोधकांत खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते ?

  • )विद्युतरोधकातील विद्युत धारेचा वर्ग / Square of the current in the resistance
  • )विद्युतरोधकातील विद्युत धारेचा घन / Cube of the current in the resistance
  • )विद्युतरोधकातील विद्युत धारेचे वर्गमूळ / Square root of the current in the resistance
  • )त्यातील विभवांतराचा वर्ग / Square of the potential difference across it

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ७५Science

डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो ?

  • )स्टॅफिलोकोकस ऑरियस / Staphylococcus aureus
  • )बोर्डेटेला पर्टुसिस / Bordetella pertussis✓ योग्य
  • )स्ट्रेप्टोकोकस पायोजिनस् / Streptococcus pyogenes
  • )साल्मोनेला प्रजाती / Salmonella species

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Science

खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधीत करणारे आहे ?

  • )जीवनसत्व ए / Vitamin A
  • )जीवनसत्व डी / Vitamin D
  • )जीवनसत्व इ / Vitamin E✓ योग्य
  • )जीवनसत्व के / Vitamin K

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Science

“ॲस्पिरिन” चे रासायनिक नाव

  • )ओ-ॲसेटील सॅलिसिलिक ॲसीड✓ योग्य
  • )ओ-मिथाईल सॅलिसिलिक ॲसीड
  • )ओ-इथाईल सॅलिसिलिक ॲसीड
  • )ओ-बेंझॉईल सॅलिसिलिक ॲसीड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Quantitative Aptitude

वर्तुळाचे क्षेत्रफळ 'क्ष' चौ.सेमी असेल आणि त्याचे वर्तुळाची परिघ 'क्ष' सेमी असेल, तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल ?

  • )1 सेमी
  • )2 सेमी✓ योग्य
  • )3 सेमी
  • )4 सेमी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Quantitative Aptitude

एका दुकानदाराने 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रु. तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती ?

  • )152 रु.
  • )160 रु.✓ योग्य
  • )180 रु.
  • )230 रु.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Quantitative Aptitude

तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 6 : 7 असे होते, तर त्यांची आजचे वय किती ?

  • )20, 30, 22
  • )22, 24, 26
  • )19, 25, 28✓ योग्य
  • )17, 25, 30

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Quantitative Aptitude

एका माणसाने बँकेकडून द. सा. द. शे. 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षांनंतर त्याने रुपये 5,400 सरळ व्याज फेडले. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती ?

  • )रुपये 12,000
  • )रुपये 20,000
  • )रुपये 15,000✓ योग्य
  • )रुपये 10,500

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Quantitative Aptitude

एका 16,000 रुपये किंमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% नी कमी होते. तर दोन वर्षांनंतर त्याची किंमत किती ?

  • )15,400 रु.
  • )13,640 रु.
  • )14,440 रु.✓ योग्य
  • )15,540 रु.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Quantitative Aptitude

आगगाडीचे प्रवास भाडे 20%-वाढविले. पुन्हा-सलग दोन महिन्यात 10% व 25% ने वाढविले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली ?

  • )65✓ योग्य
  • )55
  • )60
  • )50

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Quantitative Aptitude

एक फलंदाज 19 व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19 व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे ?

  • )22
  • )24
  • )25
  • )26✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Quantitative Aptitude

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेमी, 4 सेमी व 12 सेमी त्रिज्या असणाऱ्या तीन वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजेइतके असेल, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?

  • )17 सेमी
  • )14 सेमी
  • )13 सेमी✓ योग्य
  • )16 सेमी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Logical Reasoning

खाली दोन विधाने आणि दोन अनुमाने दिली आहेत. योग्य पर्याय शोधा. विधाने : अ. सर्व शिक्षक कलाकार आहेत. ब. काही कलाकार आनंदी राहतात. अनुमाने : क. सर्व शिक्षक आनंदी राहतात. ड. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात.

  • )फक्त क सत्य
  • )फक्त ड सत्य
  • )क आणि ड दोन्ही असत्य✓ योग्य
  • )क आणि ड दोन्ही सत्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Quantitative Aptitude

अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्षे आहे. अंकिताच्या भावाचे दोन वर्षांनंतरचे वय किती असेल ?

  • )10 वर्षे
  • )14 वर्षे
  • )12 वर्षे✓ योग्य
  • )16 वर्षे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Logical Reasoning

खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. i. A, B, C, D, E, F आणि G एका भिंतीवर बसले आहेत व त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. ii. C हा D च्या तात्काळ उजवीकडे आहे. iii. B हा अगदी टोकाला आहे व त्याचा शेजारी E आहे. iv. G हा E आणि F च्या मध्यत आहे. v. D हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे. 'G' च्या उजवीकडे कोण बसले आहे ?

  • )A
  • )C
  • )D
  • )F✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Logical Reasoning

जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल ?

  • )शुक्रवार
  • )शनिवार
  • )रविवार✓ योग्य
  • )सोमवार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Quantitative Aptitude

जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22,..., ही मालिका अशीच सुरु ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही ?

  • )31
  • )32
  • )33✓ योग्य
  • )35

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Marathi Language

जर, “UNIDENTIFIED” या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लांगली असतील, तर किती अक्षरांची स्थिती अपरिवर्तित राहील ?

  • )एक✓ योग्य
  • )दोन
  • )तीन
  • )चार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Logical Reasoning

सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90° त वळते. नंतर ती 50 मी. चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135° त वळते आणि 15 मी. चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते ?

  • )ईशान्य✓ योग्य
  • )वायव्य
  • )नैऋत्य
  • )आग्नेय

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Logical Reasoning

खालील वेन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवितो ?

  • )इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र
  • )भारत, आशिया, युरोप
  • )फुले, सुवासिक, पांढरा✓ योग्य
  • )कप, बशी, चहा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2023-combined-prelims