प्रश्न ३३Logical Reasoning
खालील माहिती काळजीपूर्वक अभ्यास आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या :
बीना, मीना, टीना, रीना, करीना, हीना आणि डायना या रेल्वेचे ‘तीन स्तरीय शयनसनांच्या’ डब्यात प्रवास करीत आहेत. यापैकी प्रत्येक जण अभियंता, डॉक्टर, वास्तुविशारद, औषध निर्माता, वकील, पत्रकार आणि रोगचिकित्सातज्ञ असे विविध व्यावसायिक आहेत. त्यांची ‘सर्वात खालील दोन शयनसने’, ‘मधली तीन शयनसने’ आणि ‘सर्वात वरील दोन शयनसने’ अशी शयनसने आहेत. बीना ही अभियंता ‘वरील शयनसनावर’ नाही. वास्तुविशारद ही अशी व्यक्ती आहे की, जिच्या शयनसनांचा प्रकार हा बीनाच्या शयनसनासारखाच आहे. मीना आणि हीना या ‘मधील शयनसनावर’ नसून त्यांचे व्यवसाय अनुक्रमे रोगचिकित्सातज्ञ व वकील असे आहेत. टीना ही औषधनिर्माती आहे. डायना पत्रकार नाही आणि वास्तुविशारदही नाही. करीनांच्या शयनसनांचा प्रकार हा डॉक्टरच्या शयनसनासारखाच आहे, तर खालीलपैकी कोणत्या समूहाची शयनसने मधली आहेत ?
- अ)डायना – करीना – टीना✓ योग्य
- ब)हीना – करीना – टीना
- क)डायना – करीना – रीना
- ड)डायना – हीना – टीना
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →