स्पर्धाAI

MPSC गट क २०२२

Excise Sub Inspector Paper II · ९२ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Economy

भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र महाराष्ट्रात स्थापन झाले, कारण अ. ते कांद्याच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. ब. ते डाळीच्या उत्पादनात आघाडीवर आहे. क. ते भारतातील सोयाबीन व ऊसाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे.

  • )फक्त अ, ब / Only A, B✓ योग्य
  • )फक्त ब, क / Only B, C
  • )फक्त अ, क / Only A, C
  • )वरीलपैकी सर्व / All of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने आपल्या संपूर्ण ________ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे, जो महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकातील ठोकूर पर्यंत पसरला आहे.

  • )६४१ / 641
  • )७४१ / 741✓ योग्य
  • )७११ / 711
  • )६११ / 611

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे ?

  • )भारत / India
  • )दक्षिण कोरिया / South Korea✓ योग्य
  • )जपान / Japan
  • )तैवान / Taiwan

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

जगदीप धनखड यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही ?

  • )ते २०१ ९ मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.
  • )त्यांनी १९८ ९ मध्ये झुंझुनूमधून लोकसभेची निवडणूक जिंकली होती.
  • )त्यांनी २००१ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.✓ योग्य
  • )त्यांची भारताचे १४ वे उप-राष्ट्रपती म्हणून निवड झाली.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

सन २०२१ – २०२२ चा महाराष्ट्र पोलीस खात्यामधील ‘आदर्श प्रशिक्षक पुरस्कार’ कोणाला प्राप्त झाला आहे ?

  • )फक्त ब, क, ड
  • )फक्त अ, ब, ड
  • )फक्त अ, क, ड
  • )फक्त अ, ब, क✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

इंग्लंडच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस ह्या कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत ?

  • )कॉन्झर्व्हेटीव पार्टी✓ योग्य
  • )लेबर पार्टी
  • )स्कॉटिश नॅशनल पार्टी
  • )लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

पृथ्वी – II या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची _________ २०२२ रोजी _________ इथल्या एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रातून यशस्वी चाचणी करण्यात आली.

  • )जून १५, चांदीपूर, ओडिशा✓ योग्य
  • )जून १७, चांदीपूर, ओडिशा
  • )जून १५, सतिश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा
  • )जून १७, सतिश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

8. योग्य कथन/ने ओळखा. अ. पुणे येथे ‘विज्ञान अविष्कार शहर’ उभारण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २०२१ मध्ये मंजुरी दिली आहे. ब. बाळासाहेब ठाकरे विज्ञान अविष्कार शहर नावाच्या प्रकल्पाचा उद्देश महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढविणे हा आहे.

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त ब
  • )अ व ब दोन्ही
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Science

दक्षिण भारतामध्ये कोविड – १९ सह खालीलपैकी कोणते विषाणू आढळून आलेत ? अ. ZVD ब. NiVD क. ब्लॅक फिवर

  • )फक्त अ, ब / Only A, B
  • )फक्त ब, क / Only B, C
  • )फक्त अ, क / Only A, C
  • )वरीलपैकी सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Logical Reasoning

तिकीटाच्या रांगेत उभ्या असलेल्या जयच्या मागे 17 व्यक्ती आणि पुढे 21 व्यक्ती आहेत, तर शेवटून नवव्या व्यक्तीचा पुढून क्रमांक किती ?

  • )30
  • )28
  • )31✓ योग्य
  • )29

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Logical Reasoning

एका सांकेतिक लिपीत सबळ = ⊗☐△ आणि बदक = ☐卐☆ असे लिहितात, तर त्याच लिपीत 'सदन' हा शब्द कसा लिहिला जाईल ?

  • )⊗卐△
  • )⊗卐☆
  • )☆卐〇
  • )⊗卐〇✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Logical Reasoning

पाऊस पडण्याची शक्यता असण्यासाठी ढग असलेच पाहिजेत. हवामानाचा अंदाज स्वच्छ आकाश असा आहे म्हणजे पावसाची शक्यता नाही. वरील युक्तिवादात वापरलेल्या अनुमान प्रक्रियेची सर्वात जवळून समांतर असलेले पर्याय निवडा.

  • )जेव्हा बाहेरचे तापमान 0°C च्या खाली जाते तेव्हा घरातील सर्व जलवाहिन्या फुटण्याचा धोका असतो. म्हणूनच – 5°C तापमानाला तुमच्या घराचे सर्व जलवाहिन्या फुटतील.
  • )जेव्हा रक्तातील बिंबिका साकळतात फक्त तेव्हाच खपली धरते. जेव्हा तुमची खपली धरलेली नसते तेव्हा तुमच्या रक्तात बिंबिका नसतात.
  • )मासे जगण्यासाठी मत्स्यपेटीचे तापमान किमान 25°C असणे आवश्यक आहे. सर्व मासे जिवंत आहेत म्हणजे किमान 25°C तापमान असणार.
  • )फक्त अमावस्येच्या दिवशी जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्या दरम्यान असतो तेव्हा सूर्य ग्रहणे लागतात. पुढच्या आठवड्यापर्यंत अमावस्या नाही म्हणून आज सूर्यग्रहण असणार नाही.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Logical Reasoning

एका व्यक्तीची ओळख करून देताना भूमी म्हणाली, “हा माझ्या आईच्या आईचा एकुलता एक मुलगा आहे,” भूमी त्या व्यक्तीची कोण लागते ?

  • )बहीण
  • )मावशी
  • )भाची✓ योग्य
  • )मुलगी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Quantitative Aptitude

‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या तीन पाईपने एक पाण्याची टाकी २० तासात भरते. ‘क’ ची गती ही ‘ब’ पेक्षा दुप्पट आहे आणि ‘ब’ ची गती ‘अ’ पेक्षा तिप्पट आहे, तर फक्त ‘अ’ पाईपने ती पाण्याची टाकी किती वेळात भरेल ?

  • )२०० तास✓ योग्य
  • )२०५ तास
  • )३५२ तास
  • )४०० तास

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Logical Reasoning

सहा विधानांखाली एकत्रित केलेल्या तिघांचे चार गट दिले आहेत. तार्किकरीत्या संबंधित क्रमबद्ध संच निवडा. a. ज्या सर्वजणी चांगला स्वयंपाक बनवतात, त्या आया आहेत. b. जे सर्वजण चांगला स्वयंपाक बनवतात, ते पुरुष नाहीत. c. काही पुरुष चांगला स्वयंपाक बनवत नाहीत. d. कोणीही पुरुष आई नाही. e. जो कोणी चांगला स्वयंपाक बनवतो, तो पुरुष नाही. f. काही पुरुष आया नाहीत.

  • )d, a, b
  • )b, e, f
  • )a, c, f
  • )d, e, a✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Polity

भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेददानुसार भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट होते ? अ. अनुच्छेद १५ ब. अनुच्छेद २५ क. अनुच्छेद ४४ ड. अनुच्छेद ४० A. Article 15 B. Article 25 C. Article 44 D. Article 40

  • )फक्त अ, ब, ड / Only A, B, D
  • )फक्त ब, क, ड / Only B, C, D
  • )फक्त अ, क, ड / Only A, C, D
  • )फक्त अ, ब, क / Only A, B, C✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Polity

खाली दिलेल्या विधानसभांपैकी कोणत्या विधानसभेची सभासद संख्या सर्वात कमी आहे ?

  • )दिल्ली विधानसभा / Delhi Legislative Assembly
  • )गोवा विधानसभा / Goa Legislative Assembly
  • )मिझोराम विधानसभा / Mizoram Legislative Assembly
  • )सिक्कीम विधानसभा / Sikkim Legislative Assembly✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Polity

संविधान सभेबाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा. अ. संविधान सभेची निवडणूक जुलै-ऑगस्ट १९४६ मध्ये संपन्न झाली. ब. संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने २०८ जागा जिंकल्या व मुस्लिम लीग ने ७३ जागा प्राप्त केल्या.

  • )फक्त अ / Only A
  • )फक्त ब / Only B
  • )अ व ब दोन्ही / Both A and B✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Polity

२४. यादी - १ ला यादी - २ शी जुळवा आणि खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा. यादी - १ (संविधान सभा समिती) अ. सुकाणू समिती ब. मूलभूत हक्क उपसमिती क. केंद्रीय घटना समिती ड. प्रांतीय घटना समिती यादी - २ (अध्यक्ष) i. सरदार वल्लभभाई पटेल ii. डॉ. राजेंद्र प्रसाद iii. जे.बी. कृपलानी iv. जवाहरलाल नेहरू कोड :

  • )ii iii iv i✓ योग्य
  • )i iv iii ii
  • )ii iv iii i
  • )i iii iv ii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Polity

२५. कोणत्यावर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने प्रथमच संविधान सभेची मागणी केली ?

  • )१९३७
  • )१९३६
  • )१९३५✓ योग्य
  • )१९३४

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Polity

खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या सदस्याने अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शविली होती ?

  • )के. एम. मुन्शी
  • )के. संथानम
  • )के. टी. शाह✓ योग्य
  • )हुमायूं कबीर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Polity

योग्य कथन/ने ओळखा. अ. मूलभूत कर्तव्ये ही सर्व व्यक्तींसाठी, नागरिक असो वा परदेशी व्यक्ती असो, लागू आहेत. ब. मूलभूत कर्तव्ये ही न्यायप्रविष्ट स्वरूपाची आहेत.

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )अ व ब दोन्ही
  • )वरीलपैकी नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Polity

भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राज्याला संपूर्ण भारतीय प्रदेशात समान नागरी संहिता प्रदान करण्याचे निर्देश देते ?

  • )कलम ५१
  • )कलम ४४✓ योग्य
  • )कलम ४०
  • )कलम १९

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Polity

योग्य कथन/ने ओळखा. अ. सर बी.एन. राव यांनी शिफारस केली की, एखाद्या व्यक्तीचे हक्क न्यायप्रविष्ट व गैरन्यायप्रविष्ट अशा दोन श्रेणींमध्ये विभागले जावे. ब. मसुदा समितीने शिफारस स्वीकारल्या. मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट स्वरूपाचे आणि निर्देशक तत्त्वे जे गैर-न्यायप्रविष्ट स्वरूपाचे आहेत, संविधानाच्या भाग ३ व भाग ४ मध्ये अनुक्रमे समाविष्ट करण्यात आली.

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )अ व ब दोन्ही✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Polity

भारतीय राज्यघटनेच्या कलम १६३ मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे ?

  • )प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल
  • )राज्यपालांना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुखपदी असलेली मंत्रिपरिषद असेल✓ योग्य
  • )राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालांमध्ये निहित असतील
  • )राज्यपालांद्वारे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाईल आणि इतर मंत्री राज्यपालांकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Polity

केंद्रीय माहिती आयोगाला माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम १८ अंतर्गत चौकशी करताना अ. दिवाणाी न्यायालयाप्रमाणे, व्यक्तिला शपथेवर लेखी साक्षीपुरावा देण्यास भाग पाडता येणार नाही. ब. दिवाणाी न्यायालयाप्रमाणे, व्यक्तिला शपथेवर लेखी साक्षीपुरावा देण्यास भाग पाडता येईल. क. दिवाणाी न्यायालयाप्रमाणे, व्यक्तीस हजर राहण्यास भाग पाडता येईल.

  • )फक्त अ
  • )फक्त क
  • )फक्त ब व क✓ योग्य
  • )फक्त अ व क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Maharashtra

खालीलपैकी कोणती बाब ही महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ चा उद्देश नाही ? अ. सार्वजनिक सेवेतील पारदर्शकता वाढवणे. ब. सार्वजनिक सेवेची कार्यक्षमता वाढवणे. क. न्यायालयीन प्रक्रियेचा वेग वाढवणे.

  • )अ, ब, क
  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब
  • )फक्त क✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Polity

माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम १२ अंतर्गत कोणती तरतूद आहे ?

  • )केंद्रीय माहिती आयोग गठीत करणे✓ योग्य
  • )राज्य माहिती आयोग गठीत करणे
  • )पदावधी व सेवेच्या शर्ती
  • )राज्य माहिती आयुक्तास पदावरून दूर करणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Polity

34. माहिती अधिकार कायदा, २००५ शी संबंधित खालील विधाने विचारात घ्या. अ. या कायद्यांतर्गत केलेल्या कोणत्याही आदेशाच्या संदर्भात कोणताही खटला, अर्ज किंवा इतर कार्यवाही कोणतेही न्यायालय विचारात घेणार नाही. ब. या कायद्याखालील अपील व्यतिरिक्त असा कोणताही आदेश प्रश्नस्पद करता येणार नाही. क. लोकशाहीला निरंकुश नागरिक आणि माहितीची प्रसिद्धता आवश्यक आहे जी त्यांच्या कार्यासाठी आवश्यक आहे आणि भ्रष्टाचाराला आवर घालण्यासाठी आणि सरकार आणि त्यांच्या यंत्रणांना शासित लोकांना जबाबदार धरण्यासाठी आवश्यक आहे. वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )फक्त अ आणि क
  • )फक्त अ आणि ब✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Maharashtra

35. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ चा कलम ९(१) अंतर्गत अपवादात्मक प्रकरणी प्रथम अपील प्राधिकारी जास्तीत जास्त ________ दिवसांच्या आत प्रथम अपील दाखल करून घेऊ शकतो.

  • )६० दिवस
  • )४५ दिवस
  • )९० दिवस✓ योग्य
  • )अशी कोणतीही तरतूद या कायद्यात नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ मधील कलम ______ मध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्याची तरतूद दिलेली आहे.

  • )कलम ११ / Section 11
  • )कलम १२ / Section 12
  • )कलम १४ / Section 14
  • )वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

माहितीचा अधिकार, २००५ च्या अनुषंगाने खालील विधानांचे अवलोकन करा. विधान I : माहितीचा अधिकार कायदा २००५ ची दुसरी अनुसूची राज्यसरकारंच्या अंतर्गत असलेल्या आस्थापनांशी संबंधित आहे. विधान II : 'आसाम रायफल्स' ही संघटना माहितीचा अधिकार कायद्यांच्या द्वितीय अनुसूची अंतर्गत येते.

  • )विधान I बरोबर; II चूक / Statement I correct; II incorrect
  • )विधान II बरोबर; I चूक / Statement II correct; I incorrect✓ योग्य
  • )दोन्ही विधाने बरोबर / Both statements are correct
  • )दोन्ही विधाने चूक / Both statements are incorrect

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Polity

माहिती अधिकार कायदा, २००५ चे कलम ११ कशा बद्दल आहे ?

  • )प्रथम हस्ते द्यावयाची माहिती / First hand information
  • )तोंडी माहिती / Oral information
  • )त्रयस्थ व्यक्तीशी संबंधित माहिती / Third-party information✓ योग्य
  • )गोपनीय माहिती / Confidential information

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत जर अर्ज कलम ५ च्या उपकलम (२) नुसार फेटाळला गेला असल्यास, अपिलाची तरतूद आहे का ?

  • )नाही
  • )या तरतुदी अंतर्गत फेटाळला गेला असल्यास अपिलाची तरतूद नाही
  • )होय✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या दृष्टीने खालील विधानांचे निरीक्षण करा. विधान I : या कायद्याच्या कलम २० अंतर्गत पात्र व्यक्तीकडून विविध कागदपत्रे सादर करण्याची मागणी कमी करण्यासाठी सर्व सार्वजनिक अधिकारी वेळोवेळी प्रभावी पावले उचलू शकतात. विधान II : अशी कागदपत्रे न्यायालयीन प्रक्रियेसाठी आयोगाकडून परवानगी मिळविण्यासाठी सादर केली जातात.

  • )विधान I बरोबर आहे; II चुकीचे आहे.✓ योग्य
  • )विधान II बरोबर आहे; I चुकीचे आहे.
  • )दोन्ही विधाने बरोबर आहेत
  • )दोन्ही विधाने चुकीची आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Science

मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे खालीलपैकी कोणत्या सॉफ्टवेअर चे उदाहरण आहे ?

  • )प्रेझेंटेशन
  • )वर्ड प्रोसेसर
  • )डेस्कटॉप पब्लिशिंग
  • )स्प्रेडशीट✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Science

_________ नेटवर्किंग आज्ञा, दुसऱ्या यंत्राशी संवाद होतो की नाही हे सांगते.

  • )नेटशेअर / Netshare
  • )$ एस एस एच / $ SSH
  • )पिंग / Ping✓ योग्य
  • )कनेक्ट / Connect

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Science

खालीलपैकी हॅकर्स ची भूमिका काय ?

  • )संगणकातील महत्त्वाची संवेदनशील व गोपनीय माहिती चोरणे / Theft of important sensitive and confidential information from computer✓ योग्य
  • )संगणकातील डेटा ला सुरक्षित ठेवणे / Protect data of computers
  • )सुरक्षिततेसाठी संगणकाचा प्रोग्राम लिहिणे / Write a software program for security purpose
  • )वरीलपैकी एकही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या 'इ प्रशासन' धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात सर्वात ठळक बाब कोणती ?

  • )इ प्रशासनामध्ये इंटरनेटचा वापर / Use of Internet in 'e governance'
  • )इ प्रशासनामध्ये मोबाईल फोनचा वापर / Use of Mobile phones in 'e governance'
  • )इ प्रशासनामध्ये मराठी भाषेचा वापर / Use of Marathi language in 'e governance'✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Current Affairs

स्कूल एज्युकेशन ॲण्ड लिटरसी डिपार्टमेंट यांनी एन.आय.सी. यांच्या मदतीने शाळा, शिक्षक आणि शाळेचे प्रशासन चालवण्यासाठी जी सिस्टीम तयार केली तिचे नाव ______ आहे.

  • )सर्व शिक्षा वाहिनी / Sarva Shiksha Vahini
  • )इ-विद्या वाहिनी / E-Vidya Vahini✓ योग्य
  • )साक्षर / Sakshar
  • )इ-साक्षर / E-Sakshar

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Science

लॅन (LAN) कार्डचे दुसरे नाव काय आहे ?

  • )मोडेम / Modem
  • )एन.आय.सी. / NIC✓ योग्य
  • )नेटवर्क कनेक्टर / Network Connector
  • )इंटरनेट कार्ड / Internet Card

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Science

कॉम्प्यूटरच्या बोलीत WWWW म्हणजे

  • )वर्ल्ड वाइड वेब वॉर्म / World Wide Web Worm✓ योग्य
  • )वर्ल्ड वाइड वेस्टर्न वर्ल्ड / World Wide Western World
  • )वर्ल्ड वाइड वेस्टर्न वेब / World Wide Western Web
  • )वर्ल्ड वाइड विकी वेब / World Wide Wiki Web

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Current Affairs

महाराष्ट्र शासनाने 'इ प्रशासन' सेवेसाठी कोणती आंतरराष्ट्रीय मानके मान्य केली आहेत ?

  • )युनिकोड / UNICODE
  • )ओपन फॉर्म फॉरमॅट / Open form format
  • )लेक्सीकॉन / LEXICON
  • )वरीलपैकी सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Polity

हुंडाबंदी अधिनियम, १९६१ अंतर्गत हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा कोणताही करार ____ असेल. अ. ग्राह्य ब. अग्राह्य क. बंधनकारक ड. शून्य

  • )फक्त अ बरोबर / only a is correct
  • )फक्त ब बरोबर / only b is correct
  • )फक्त अ आणि क बरोबर / only a and c are correct
  • )फक्त ड बरोबर / only d is correct✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Polity

कोणत्याही नागरिकांना, राज्यांच्या निधीद्वारे देखरेख ठेवलेल्या विहिरी, टाक्या, आंघोळीचे घाट वापरण्यास मनाई करता येणार नाही, असे भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात म्हटले आहे ?

  • )अनुच्छेद १४ / Article 14
  • )अनुच्छेद १५ / Article 15✓ योग्य
  • )अनुच्छेद १६ / Article 16
  • )अनुच्छेद १७ / Article 17

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Polity

हुंडाबंदी अधिनियमाच्या उद्देशासाठी खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक राज्य सरकार करू शकते ?

  • )संरक्षण अधिकारी / Protection Officer
  • )हुंडा मनाई अधिकारी / Dowry Prohibition Officer✓ योग्य
  • )हुंडा संरक्षण अधिकारी / Dowry Protection Officer
  • )वरीलपैकी कोणी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Polity

भारतीय राज्यघटनेत लैंगिक समानता तत्वाचा अंतर्भाव केला आहे का ? अ. नाही ब. इतर कायद्यात आहे क. होय ड. वरीलपैकी एकही नाही

  • )फक्त अ बरोबर / Only a is correct
  • )फक्त अ आणि ब बरोबर / Only a and b are correct
  • )फक्त क बरोबर / Only c is correct✓ योग्य
  • )फक्त ड बरोबर / Only d is correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६History

खालीलपैकी कोणत्या ऐतिहासिक घटनेने मानवी हक्क विकासात महत्त्वाचे योगदान आहे ? (अ) मॅग्ना कार्टा, १२१५ (ब) द बिल ऑफ राईट्स, १६८९ (क) अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा, १७७६ (ड) द राईट्स ऑफ मॅन ॲण्ड सिटिझन्स, १७८९

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क आणि ड
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य
  • )फक्त अ, ब आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Polity

आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांचा आंतरराष्ट्रीय करारनामा कोणत्या तारखेस अंमलात आला ?

  • )१६ डिसेंबर १९६६
  • )३ जानेवारी १९७६✓ योग्य
  • )१५ डिसेंबर १९८९
  • )५ जानेवारी १९७१

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Polity

नागरी संरक्षण हक्क अधिनियम, १९५५ च्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेच्या कारणामुळे धार्मिक नि:समर्थता लादण्या बद्दल शिक्षेची तरतूद केली आहे ?

  • )कलम ५
  • )कलम ३✓ योग्य
  • )कलम ८
  • )कलम ९

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Polity

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बालकांचे मानवी हक्क जाहीरनाम्यानुसार बालकाची व्याख्या :

  • )१८ वर्षाखालील प्रत्येक पुरुष व १६ वर्षाखालील प्रत्येक महिला
  • )२१ वर्षाखालील प्रत्येक पुरुष व १८ वर्षाखालील प्रत्येक महिला
  • )२१ वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती
  • )१८ वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Polity

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५ अंतर्गत न्यायाधीश केव्हा इन कॅमेरा कामकाज करू शकतात ? अ. जेव्हा न्यायाधीशांना लक्षात येईल की संबंधित खटल्याची परिस्थितीची तशी गरज आहे. ब. जेव्हा दाव्यातील दोन्हीपैकी एक पक्षकार ख्यात नाम आहे. क. जेव्हा दाव्यातील दोन्हीपैकी एका पक्षकाराची तशी इच्छा असेल. ड. न्यायाधीशांची तशी मर्जी असेल तर. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त ?

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त अ आणि क✓ योग्य
  • )फक्त अ आणि ड
  • )फक्त ब आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Polity

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम १० नुसार, अधिकाऱ्यास दिलेले अधिकार तो आपल्या हाता खालील अधिकाऱ्याकडे प्रत्यायोजित करू शकतो का ?

  • )असे करणे घटनात्मक तरतुदींच्या विरुद्ध आहे
  • )होय✓ योग्य
  • )नाही
  • )वरीलपैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Polity

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अंतर्गत राज्य सरकार परकीय राज्य प्रमुख व इतरांस विशेष परवाना देवू शकते का ? अ. भारतीय कायदे त्यांना लागू होत नाही ब. ते राज्य प्रमुख असल्याने त्यांना परवान्याची गरज नाही क. होय ड. नाही वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?

  • )फक्त अ
  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क✓ योग्य
  • )फक्त ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Maharashtra

मी एक 'क्ष' व्यक्ती आहे. मी मळीची निर्मिती करत नाही. मात्र मला मळीचा वापर करावयाचा आहे. यासाठी मी कोणती अनुज्ञप्ती घेणे आवश्यक आहे ?

  • )एम-I
  • )एम-II✓ योग्य
  • )एम-III
  • )नमुना एम.-ए.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Maharashtra

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम २(१) नुसार प्राधिकारपत्र याचा अर्थ अन्वये धार्मिक विधीसाठी दारूचा उपयोग करण्याकरिता दिलेले प्राधिकारपत्र असा आहे. कलम ________.

  • )कलम ४३
  • )कलम ४४
  • )कलम ४५✓ योग्य
  • )कलम ४६

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Maharashtra

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील _________ मध्ये काही बाबतीत अपराध करण्यात आला आहे असे गृहीत धरले जाते.

  • )कलम ९८
  • )कलम १०१
  • )कलम १०३✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Maharashtra

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ८१ नुसार या कायद्यांतर्गत येणाऱ्या गुन्ह्यासाठी अपप्रेरणा देण्यास कोणती शिक्षा आहे ?

  • )मुख्य गुन्ह्याबद्दल असणारी शिक्षा अपप्रेरणा देणाऱ्यास दिली जाईल✓ योग्य
  • )मुख्य गुन्ह्याबद्दल असणाऱ्या शिक्षेच्या अर्धी शिक्षा अपप्रेरणा देणाऱ्यास दिली जाईल
  • )अपप्रेरणा देण्यास कोणतीही शिक्षा नाही
  • )वरीलपैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Maharashtra

पुढीलपैकी कोणता दिवस किरकोळ ताडी विक्री (टी.डी.-I) साठी ‘कोडा दिवस’ म्हणून पाळला जातो ?

  • )१५ ऑगस्ट
  • )२६ जानेवारी
  • )२ ऑक्टोबर✓ योग्य
  • )१ मे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Maharashtra

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम २(४३) नुसार “मद्यसार” (स्पिरिट) म्हणजे

  • )आत्मा
  • )नारळ किंवा कोणत्याही प्रकारच्या ताडाच्या झाडापासून काढलेला न आंबलेला रस
  • )मद्यार्क असलेली व गाळून तयार केलेली कोणतीही दारू✓ योग्य
  • )निरा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Polity

महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ११० च्या तरतुदीनुसार ताडी देणाऱ्या झाडाबद्दल द्यावयाचे शुल्क हे प्रथमतः खालीलपैकी कोणी द्यावे ?

  • )झाडाच्या मालकाने
  • )ती छेदण्याचे व त्या पासून ताडी काढण्याचे परवाना असणाऱ्या व्यक्तीने✓ योग्य
  • )दोघांकडून प्रमाणात
  • )वरीलपैकी काहीही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Economy

विदेशी मद्य गोडाऊन अथवा एफ.एल.-I अनुज्ञप्ती जागेकरीता कमीत कमी किती क्षेत्राफळाची आवश्यकता आहे ?

  • )३०० चौ.मीटर
  • )१०० चौ.मीटर किंवा एकावेळी ५००० विदेशी मद्याच्या पेट्या साठवणूक क्षमता असेल इतके✓ योग्य
  • )१५० चौ.मीटर किंवा एकावेळी १०००० विदेशी मद्याच्या पेट्या साठवणूक क्षमता असेल इतके
  • )५० चौ.मीटर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Economy

खालील विधानांचा विचार करा : अ. नमुना सी एल III मधील अनुज्ञप्तीची मद्यविक्रीची वेळ सकाळी ८ : ०० ते रात्री १० : ०० पर्यंत आहे. ब. नमुना सी एल II मधील अनुज्ञप्तीच्या कामाचा कालावधी सकाळी १० : ०० ते सायंकाळी ६ : ०० पर्यंत आहे.

  • )(अ) बरोबर; (ब) चूक✓ योग्य
  • )(अ) चूक; (ब) बरोबर
  • )(अ) आणि (ब) दोन्ही बरोबर
  • )(अ) आणि (ब) दोन्ही चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Economy

एम. एफ.-II ही अनुज्ञप्ती मोहफुले विक्रीसाठी प्रदान केली जाते. सदर अनुज्ञप्ती उघडण्याची व बंद होण्याची वेळ अनुक्रमे ______ व ______ आहे.

  • )सकाळी १०.०० ते रात्री १०.००
  • )सकाळी ०७.०० ते रात्री १०.००
  • )सकाळी ०६.०० ते सायंकाळी ०६.००✓ योग्य
  • )सकाळी ०६.०० ते रात्री ९.३०

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Economy

अनुज्ञप्ती धारकाच्या मृत्यूपश्चात अनुज्ञप्ती अनुज्ञप्तीधारकाच्या कायदेशीर वारसांकडे हस्तांतरीत करण्यासाठी इतके शुल्क आकारले जाते.

  • )अनुज्ञप्ती शुल्काच्या ५०%
  • )अनुज्ञप्ती शुल्काच्या २५%
  • )कोणतेही शुल्क नाही✓ योग्य
  • )एक हजार रुपये

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Economy

जर भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या ७५० मिलीच्या बाटलीचे घोषित निर्मिती मूल्य ₹ १५० आहे, तर विक्रीकरा सह कमाल किरकोळ किंमत ₹ ______ पेक्षा अधिक असू नये.

  • )१०५०.००✓ योग्य
  • )१५००.००
  • )१०५५.००
  • )१५०५.००

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Maharashtra

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम १४२ अंतर्गत जर सार्वजनिक शांततेस धोका असेल अथवा दंगल किंवा बेकायदेशीर जमाव होण्याची शक्यता असते अशा वेळी ज्या ठिकाणी मादक द्रव्ये किंवा भांग विकली जाते त्या जागा बंद करण्याचा अधिकार यांना आहे. i. जिल्हाधिकारी ii. कोणतेही कार्यकारी दंडाधिकारी iii. कोणतेही पोलीस अधिकारी iv. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क

  • )फक्त (i) बरोबर
  • )फक्त (i) आणि (iv) बरोबर
  • )(i), (ii) आणि (iii) बरोबर✓ योग्य
  • )सर्व (i), (ii), (iii), (iv) बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Science

जोड्या जुळवा. आसवणीतील घटक अ. मळी ब. मद्यार्क क. पाणी ड. वाफ नळमार्गाचा रंग i. लाल ii. पांढरा iii. काळा iv. हिरवा

  • )i iv iii ii
  • )iv i iii ii
  • )i iv ii iii
  • )iv i ii iii✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Maharashtra

सद्यस्थितीत उत्पादन शुल्क विभागामार्फत दिली जाणारी फक्त ____________ ही अनुज्ञप्ती निविदा वा लिलाव पद्धतीने वितरित केली जाते.

  • )एम.एफ.-II, मोहफुलांच्या विक्रीची अनुज्ञप्ती (1) MF-II, Sale of Mhowra flower licence
  • )एन-III, निरेच्या किरकोळ विक्रीची अनुज्ञप्ती (2) N-III, Retail sale of Neera licence
  • )टी.डी.-I, ताडीच्या किरकोळ विक्रीसाठीची अनुज्ञप्ती (3) TD-I, Retail sale of Toddy licence✓ योग्य
  • )एस.एम.पी.-I, मद्यासारयुक्त औषधीय सिद्धपदार्थ विक्री अनुज्ञप्ती (4) SMP-I, Sale of spirituous medicinal preparations licence

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Maharashtra

सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार पुढीलपैकी कोण CL/FL/TOD-III अनुज्ञप्ती मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात ?

  • )एफ.एल.-I अनुज्ञप्ती धारण करणारी व्यक्ती
  • )एफ.एल.-II अनुज्ञप्ती धारण करणारी व्यक्ती✓ योग्य
  • )एफ.एल.-III अनुज्ञप्ती धारण करणारी व्यक्ती
  • )सी.एल.-II अनुज्ञप्ती धारण करणारी व्यक्ती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Polity

पुढील विधानांचा विचार करा : विधान (I) : कोणतीही व्यक्तीला मादक द्रव्यासंबंधी जाहिरात कोणत्याही वृत्तपत्र पुस्तिकेत, वर्तमानपत्रात छापता येणार नाही. विधान (II) : राज्याबाहेर प्रकाशित झालेल्या वर्तमानपत्रात मादक द्रव्याबाबत जाहिरात असल्यास त्याला ही मनाई लागू होणार नाही.

  • )विधान (I) बरोबर, (II) चूक
  • )विधान (II) बरोबर, (I) चूक
  • )दोन्ही विधाने बरोबर✓ योग्य
  • )दोन्ही विधाने चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Polity

अफीम ओढण्यासाठी एकत्रित झालेल्या जमावातील एखाद्या व्यक्तीला सिद्धापराध ठरविले असता पर्यंतची कैद किंवा पर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात.

  • )सहा महीने, पाच हजार रुपये
  • )तीन महीने, ३०० रुपये
  • )सहा महीने, १००० रुपये
  • )तीन महीने, ५०० रुपये✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Polity

गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचे उत्पादन आणि निर्मिती यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत ?

  • )राज्य शासन
  • )केंद्र शासन✓ योग्य
  • )केंद्र शासन व राज्य शासन या दोघांनाही
  • )भारताचे सर्वोच्च न्यायालय

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Polity

अफूच्या बोंडांचे (पॉपी स्ट्रॉ) आंतरराज्य आयातीसाठी खालीलपैकी कोणत्या नमुन्यातील परवान्याचा वापर केला जातो ?

  • )नमुना पॉपी - 3✓ योग्य
  • )नमुना पॉपी - 1
  • )नमुना पॉपी - 2
  • )नमुना पॉपी - 4

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Polity

गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ हा कायदा खालीलपैकी कोणत्या तारखेपासून भारत सरकारने लागू केला ?

  • )१६ ऑक्टोबर १९८५
  • )१६ जानेवारी १९८५
  • )१४ नोव्हेंबर १९८५✓ योग्य
  • )२६ जानेवारी १९८६

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polity

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५ नुसार खालीलपैकी कोणत्या कालावधीला अफू चे ‘पीक वर्ष’ संबोधले जाईल ?

  • )१ जानेवारी ते ३१ डिसेंबर
  • )१ एप्रिल ते ३१ मार्च
  • )१ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट
  • )१ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Polity

पॉपी स्ट्रॉ (अफूची बोंडे) बाळगणे व विक्रीसाठी कोणती अनुज्ञप्ती प्रदान करण्यात येते ?

  • )पॉपी - २✓ योग्य
  • )पॉपी - ३
  • )पॉपी - २अ
  • )पॉपी - ४

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Polity

“गुंगीकारक औषधी द्रव्य” याची व्याख्या गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या कोणत्या कलमामध्ये विहित केलेली आहे ?

  • )कलम २ (१४) / Section 2 (xiv)✓ योग्य
  • )कलम २ (१६) / Section 2 (xvi)
  • )कलम २ (१८) / Section 2 (xviii)
  • )कलम २ (२३) / Section 2 (xxiii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Polity

कोणतीही व्यक्ती अनुज्ञप्ती, परवाना, पास शिवाय जास्तीत जास्त ______ ग्रॅम इतके पॉपी स्ट्रॉ एकावेळी जवळ बाळगू शकते.

  • )५५० ग्रॅम / 550 gm
  • )४५० ग्रॅम / 450 gm✓ योग्य
  • )३५० ग्रॅम / 350 gm
  • )२५० ग्रॅम / 250 gm

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Polity

कोणत्याही व्यक्तीला नोटिफाईड औषधे जवळ बाळगण्यासाठी खालीलपैकी कोणता परवाना धारण करणे अत्यावश्यक आहे ?

  • )नमुना एन.डी.पी. / Form N.D.P.✓ योग्य
  • )नमुना एन.डी.आर.एल. / Form N.D.R.L.
  • )नमुना एन.डी.टी. / Form N.D.T.
  • )नमुना एन.डी.ए. / Form N.D.A.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Maharashtra

महाराष्ट्र औषधी द्रव्य (नियंत्रण) नियम १९६३ नुसार एन. डी. डब्ल्यू. एल. म्हणजे

  • )किरकोळ विक्री अनुज्ञप्ती / Retailer's Licence
  • )हिशेब नोंदवही / Account Register
  • )ठोक विक्री अनुज्ञप्ती / Wholesaler's Licence✓ योग्य
  • )औषधी द्रव्ये निर्मिती अनुज्ञप्ती / Manufacturing of Drugs Licence

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Polity

महाराष्ट्र औषधी द्रव्य (नियंत्रण) नियम १९६३ च्या नियम - ७ अन्वये मंजूर करण्यात येणाऱ्या किरकोळ विक्री अनुज्ञप्तीचे मुंबई वगळून इतर ठिकाणी किती शुल्क आहे ?

  • )रु. ३० / Rs. 30
  • )रु. २० / Rs. 20✓ योग्य
  • )रु. १० / Rs. 10
  • )रु. ४० / Rs. 40

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Polity

मुंबई औषधी द्रव्य (नियंत्रण) कायदा १९५९ च्या कलम ३२ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी किंवा आयुक्त यांच्या व्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्याने पारीत केलेल्या आदेशाविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे किती दिवसांच्या आत अपील दाखल करणे आवश्यक आहे ?

  • )३० दिवस / 30 days
  • )६० दिवस / 60 days✓ योग्य
  • )९० दिवस / 90 days
  • )१२० दिवस / 120 days

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Polity

मुंबई औषधी द्रव्य (नियंत्रण) कायदा १९५९ च्या कलम ३२ नुसार जिल्हाधिकारी यांनी पारीत केलेल्या आदेशाविरुद्ध खालीलपैकी कोणाकडे अपील दाखल करता येईल ?

  • )उच्च न्यायालय / High Court
  • )जिल्हा न्यायालय / District Court
  • )आयुक्त / Commissioner✓ योग्य
  • )राज्य शासन / State Government

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Maharashtra

महाराष्ट्र औषधी द्रव्य (नियंत्रण) अनुज्ञप्त्या मंजुरी आदेश १९६३ च्या तरतुदीनुसार मुंबईब औषधी द्रव्यांच्या किरकोळ विक्रीची अनुज्ञप्ती जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील लोकांसेखेच्या प्रति _________________ लोकसंख्ये मागे एक अनुज्ञप्ती मंजूर करू शकतील.

  • )१०,०००✓ योग्य
  • )१,००,०००
  • )२,००,०००
  • )२०,०००

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Polity

मुंबई औषधी द्रव्ये (नियंत्रण) कायदा, १९५९ च्या कलम २१ मध्ये एखादा गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास कोणत्या शास्तीची तरतूद विहीत केलेली आहे ?

  • )एक वर्षापर्यंत कैद आणि रु. १,००० पर्यंत द्रव्यदंड / upto 1 year imprisonment and fine upto Rs. 1,000
  • )एक वर्षापर्यंत कैद आणि रु. २,००० पर्यंत द्रव्यदंड / upto 1 year imprisonment and fine upto Rs. 2,000
  • )दोन वर्षापर्यंत कैद आणि रु. २,००० पर्यंत द्रव्यदंड / upto 2 years imprisonment and fine upto Rs. 2,000✓ योग्य
  • )तीन वर्षापर्यंत कैद आणि रु. ३,००० पर्यंत द्रव्यदंड / upto 3 years imprisonment and fine upto Rs. 3,000

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Polity

मुंबई औषधी द्रव्ये (नियंत्रण) कायदा, १९५९ च्या कलम ३५ मधील तरतुदीनुसार त्या कायद्यान्वये प्राधिकृत असलेल्या निरीक्षक किंवा अन्य व्यक्ती त्रासदायक रीतीने एखाद्या ठिकाणी प्रवेश करील किंवा झडती घेईल किंवा एखादी वस्तू/पदार्थ जप्त करील तर ती व्यक्ती कोणत्या शिक्षेस पात्र असेल ?

  • )एक महिना कैद / one month imprisonment
  • )रु. ५०० पर्यंत द्रव्यदंड / fine upto Rs. 500✓ योग्य
  • )एक वर्ष कैद / one year imprisonment
  • )एक वर्ष कैद व रु. ५०० दंड / one year imprisonment and fine of Rs. 500

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Maharashtra

महाराष्ट्र औषधी द्रव्ये (नियंत्रण) जप्त मुद्देमाल (विल्हेवाट) नियमावली, १९६२ नुसार जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे अधिकार कोणाला प्रदान आहेत ?

  • )राज्य शासन / State Government
  • )न्यायालय / Court
  • )जिल्हाधिकारी / Collector✓ योग्य
  • )आयुक्त / Commissioner

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Maharashtra

महाराष्ट्र औषधी द्रव्य (नियंत्रण) नियम १९६३ अंतर्गत नमुना एन.डी.डब्ल्यू.एल. अनुज्ञप्ती मंजुरी प्राधिकारी कोण आहेत ?

  • )राज्य उत्पादन शुल्क आयुक्त / Commissioner of State Excise
  • )जिल्हाधिकारी / Collector✓ योग्य
  • )अन्न व औषधी द्रव्य प्रशासनाचे आयुक्त / Commissioner of Food and Drug's Administration
  • )राज्य शासन / State Government

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2022-excise-sub-inspector-paper-ii