स्पर्धाAI

MPSC गट क २०२२

Common Paper I · ९३ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'मितव्ययी' या शब्दाचा शब्दसमूह कोणता ? (a) कमी व्यस्त असलेला (b) मोजकेच खर्च करणारा (c) मोजकेच बोलणारा (d) मोजकेच काम करणारा

  • )फक्त (a) व (b) अचूक आहे
  • )फक्त (b) अचूक आहे✓ योग्य
  • )फक्त (b) व (d) अचूक आहे
  • )फक्त (c) अचूक आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'चंद्र' या शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनविलेली वाक्ये ओळखा. (a) शशी छान दिसते. (b) सुधाकर येथे उपस्थित आहे. (c) तारापती गावी गेला. (d) रजनीनाथ मंत्री झाले.

  • )फक्त (a) व (c) बरोबर
  • )फक्त (b) व (d) बरोबर
  • )फक्त (a) व (b) बरोबर
  • )सर्व पर्याय बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

ईकारान्त नामे स्त्रीलिंगी असतात मात्र काही ईकारान्त नामे पुल्लिंगी असतात ती ______ यांची असतात.

  • )पक्ष्यांची
  • )प्राण्यांची
  • )व्यावसायिकांची✓ योग्य
  • )फळांची

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'तो भरभर – बोलतो', यातील 'भरभर' हा शब्द अव्ययाचा कोणता प्रकार दर्शवितो ?

  • )क्रियाविशेषण अव्यय✓ योग्य
  • )शब्दयोगी अव्यय
  • )केवल प्रयोगी अव्यय
  • )उभयान्वयी अव्यय

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'किंवा', 'अथवा', 'की', 'अगर' – हे शब्द उभयान्वयी अव्ययातील कोणत्या प्रकारातील आहेत ?

  • )समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
  • )विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय✓ योग्य
  • )न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
  • )परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

केवलप्रयोगी अव्ययांच्या योग्य जोड्यांचे गट ओळखा. (a) शोकद्योतक – हाय रे, अयाई, आई गं. (b) स्वीकारद्योतक – ठीक, बरे, होय. (c) संबोधनद्योतक – अरे, अगो, हो. (d) आश्चर्यद्योतक – अहाहा, अरे बापरे, ओहो.

  • )फक्त (b) व (d) बरोबर
  • )फक्त (a) व (c) बरोबर
  • )फक्त (c) व (d) बरोबर
  • )सर्व पर्याय बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

'कागदपत्र', 'कामकाज', 'बाजारहाट' या अभ्यस्त शब्दांचा प्रकार कोणता ?

  • )पूर्णाभ्यस्त
  • )अंशाभ्यस्त✓ योग्य
  • )अनुकरणवाचक
  • )हे अभ्यस्त शब्द नाहीत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'आधीचे धरण भरून वाहिले. पुढील धरणांच्या साठ्यातही वाढ होत गेली.' – याचे संयुक्तवाक्य कसे होईल ?

  • )पुढील धरणांतील साठा वाढला कारण आधीचे धरण भरून वाहिले.
  • )आधीचे धरण भरून वाहिले म्हणून पुढील धरणांच्या साठ्यातही वाढ होत गेली.✓ योग्य
  • )आधीचे धरण भरून वाहिल्याने पुढील धरणांचा साठा वाढला.
  • )आधीचे धरण भरून वाहिले तर पुढील धरणांचा साठा वाढला.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

‘जगात सर्व सुखी असा कोण आहे ?’ या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते ?

  • )जगात सर्व सुखी आहेत.
  • )जगात सर्व दुःखी आहेत.
  • )जगात कुणीच दुःखी नाही.
  • )जगात सर्व सुखी असा कोणी नाही.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

श्रोत्यांनी सभागृहात शांतता राखावी. या वाक्याचा अर्थानुसार प्रकार कोणता ?

  • )होकारार्थी – आज्ञार्थ
  • )नकारार्थी – आज्ञार्थ
  • )होकारार्थी – विध्यर्थ✓ योग्य
  • )नकारार्थी – विध्यर्थ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

‘अमिता हे काम चांगले करील.’ – याचे रीतीभूतकाळ वापरून कसे रूपांतर होईल ?

  • )अमिताने हे काम चांगले केले.
  • )अमिताने हे काम चांगले केले होते.
  • )अमिता हे काम चांगले करी.✓ योग्य
  • )अमिता हे काम चांगले करत असावी.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Marathi Language

संपूर्ण कुटुंबाला कोणत्या दुहेरी काळजीने घेरले होते ?

  • )नातवंडे, पतवंडे यांनी वाडा रिकामा झाला होता आणि पणजोबांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता
  • )अपुऱ्या दिवसाचं नवजात बालक अतिदक्षता विभागात ठेवलेलं होत आणि पणजोबांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता✓ योग्य
  • )बालकाच्या बाबतीत ऑक्सिजन स्वतःचं ‘प्राणवायू’ हे नाव सार्थ करू शकला नाही आणि पणजोबांच्या मेंदूत रक्तस्राव थांबला होता
  • )पणजोबांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि बालकालाही जीवनदान मिळाले

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

आजोबांना अपराधी वाटण्याचं कारण (अ) सुनेच्या आईच्या नजरेतील नकारात्मकता (ब) बालकाचा आकांत (क) नाकातून घातलेली ऑक्सिजनची नळी (ड) आपण आता कायमचे जाणार याची खंत

  • )फक्त (क) आणि (ड) बरोबर
  • )फक्त (अ) आणि (ब) बरोबर
  • )फक्त (अ) बरोबर✓ योग्य
  • )फक्त (अ) आणि (क) बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

पणजोबांच्या मृत्यूचे कारण (अ) समाधानी जीवन (ब) बालकाच्या मृत्यूचे दुःख (क) अपराधीपणा (ड) सुनेच्या आईच्या दुःखाने धारण केलेले विकारी आणि विखारी स्वरूप

  • )फक्त (अ) आणि (ब) बरोबर
  • )फक्त (ब) आणि (क) बरोबर
  • )फक्त (क) आणि (ड) बरोबर✓ योग्य
  • )फक्त (अ) आणि (ड) बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

‘दिवस भरणे’ या वाक्प्रयोगाचा प्रस्तुत उताऱ्यात दिलेला अर्थ कोणता ? (अ) दिवस प्रकाशाने भरणे (ब) गर्भार बाईला नऊ महिने पूर्ण होणे (क) दिवस भराचे काम पूर्ण होणे (ड) एखादा माणसाने भयंकर अपराध करणे

  • )फक्त (ब) आणि (ड) बरोबर✓ योग्य
  • )फक्त (अ) बरोबर
  • )फक्त (ड) बरोबर
  • )फक्त (क) बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

‘श्रीमुखात देणे’ या शब्दाचा ध्वन्यार्थ कोणता ? (a) अभिधा (b) लक्षण-लक्षणा (c) व्यंजना (d) निरूढा लक्षणा

  • )फक्त (a) व (d) बरोबर
  • )फक्त (b) बरोबर
  • )फक्त (d) बरोबर✓ योग्य
  • )फक्त (b) व (c) बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

‘वयोमान’ या शब्दाच्या संधीमध्ये एकत्र येणारे स्वर, विसर्ग व संधी ओळखा.

  • )व् + अ + य् + ओ + म् + आ + न् + अ = मान
  • )व् + अ + य् + ओ + विसर्ग + म् + आ = मान
  • )व् + अ + य् + ओ + विसर्ग + मान = यू + ओ + मान
  • )यू + अ + विसर्ग + मान = यू + ओ + मान✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ – या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा.

  • )दानशूर
  • )तगाई
  • )तितिक्षा✓ योग्य
  • )दरवेशी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Marathi Language

गणेशने आंबा खाल्ला. (प्रयोग ओळखा)

  • )सकर्मक कर्तरी प्रयोग
  • )कर्तरी प्रयोग
  • )कर्मणी प्रयोग✓ योग्य
  • )भावे प्रयोग

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Marathi Language

‘आईने मुलीला शाळेत पाठविले’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

  • )कर्तृ-भाव संकर प्रयोग
  • )कर्म-भाव संकर प्रयोग✓ योग्य
  • )कर्तृ-कर्म संकर प्रयोग
  • )कर्म कर्तरी प्रयोग

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Marathi Language

कोणत्या विभक्तींच्या एकवचनाला प्रत्यय नाहीत ?

  • )द्वितीया व पंचमी
  • )प्रथमा व संबोधन✓ योग्य
  • )संबोधन व तृतीया
  • )फक्त प्रथमा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Marathi Language

संकेतार्थी वाक्याची उदाहरणे अचूक ओळखा. (a) मुलांनी जर मन लावून अभ्यास केला असता, तर त्यांना परीक्षेत चांगले यश मिळाले असते. (b) मुलांनी जर अभ्यासकडे दुर्लक्ष केले असते, तर त्यांना परीक्षेत चांगले यश मिळाले नसते. (c) मुलांनी जर अभ्यास केला नसता, तर त्यांना परीक्षेत चांगले यश मिळाले नसते. (d) मुलांनी जर नीट अभ्यास केला नसता, तर त्यांना परीक्षेत कमीच गुण मिळाले असते.

  • )फक्त (a) व (d) बरोबर
  • )फक्त (b) व (c) बरोबर
  • )फक्त (b) बरोबर
  • )सर्व पर्याय बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Marathi Language

'सिंह' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द अचूक ओळखून त्याचा योग्य तो पर्याय लिहा.

  • )पंचानन
  • )मृगराज
  • )केसरी
  • )शाखा मृग✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Marathi Language

'प्रश्न विचारणे हे प्रश्नार्थक सर्वनामाचे प्रमुख लक्षण आहे, पण जेथे जेथे प्रश्नार्थक सर्वनाम असेल तेथे तेथे प्रश्नार्थक वाक्य रचना असेलच असे नाही ?'

  • )या विधानाना पूर्वार्ध बरोबर आहे
  • )या विधानाना उत्तरार्ध बरोबर आहे
  • )हे संपूर्ण विधान बरोबर आहे✓ योग्य
  • )हे संपूर्ण विधान चूक आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Logical Reasoning

पुढे दिलेल्या समानार्थी शब्दांच्या पर्यायातून समानार्थी नसलेल्या शब्दांचा अचूक पर्याय ओळखा.

  • )अली, मिलिंद, मधुकर, भ्रमर
  • )चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना, यामिनी✓ योग्य
  • )भार्या, कांता, जाया, दारा
  • )नरेंद्र, भूपेंद्र, पृथ्वीपती, नरेश

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Marathi Language

खालीलपैकी अनुस्वारयुक्त चुकीचा गट ओळखा.

  • )संयम, सिंह, संहिता
  • )मुलांस, त्यांचा, देशांसाठी
  • )घरांत, संहार, मांस
  • )कामे, जाऊं, कांटा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Marathi Language

‘ससेमिरा लावणे’ याचा अर्थ (a) प्रचंड आवाज करणे. (b) धीर मिळणे. (c) एकसारखा तगादा लावणे. (d) तमाशा लावणे.

  • )फक्त (a) आणि (d) बरोबर
  • )फक्त (b) बरोबर
  • )फक्त (c) बरोबर✓ योग्य
  • )फक्त (a) बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Marathi Language

‘अनेक पदार्थ इतस्ततः अव्यवस्थितपणे पसरणे’ या अर्थाची म्हण ओळखा.

  • )बाजार करणे
  • )बाजाराला जाणे
  • )बाजार भरविणे
  • )बाजार मांडणे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Marathi Language

‘बावळी मुद्रा देवळी निद्रा’ याचा अर्थ कोणता ?

  • )बावळी मुद्रा घेवून देवळात निजणारा
  • )दिसण्यात बावळा, व्यवहारात चतुर✓ योग्य
  • )निरपराध माणसाला शिक्षा देणे
  • )शहाणपणाचे सोंग आणणारा मूर्ख

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Marathi Language

'गाव जळाला, मारुती गावानिराळा' या म्हणीचा अर्थ कोणता ?

  • )दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळा राहणे✓ योग्य
  • )गावावर संकट आले, तरी देव धावला नाही
  • )दुसऱ्यांवर कुरघोडी करणारे सुखी असतात
  • )दृष्ट कृत्य करणारे सहीसलामत सुटतात

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Marathi Language

प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात, म्हणजेच ती एकमेकांवर अवलंबून असतात.

  • )विधानाचा पूर्वार्ध बरोबर
  • )विधानाचा उत्तरार्ध बरोबर
  • )संपूर्ण विधान बरोबर
  • )संपूर्ण विधान चूक✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Marathi Language

भाववाचक नामांचा शब्द गट ओळखा. (a) देवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण (b) गरीबी, गोडी, लबाडी (c) प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व (d) गांभीर्य, धैर्य, माधुर्य

  • )फक्त (a) व (c) बरोबर
  • )फक्त (b) व (d) बरोबर
  • )फक्त (b), (c) व (d) बरोबर
  • )सर्व पर्याय बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Marathi Language

विशेष्याची माहिती देणारा व विशेषणाचे गुण सांगणारा विकारी शब्द

  • )विशेषनाम
  • )सामान्यनाम
  • )विशेषण✓ योग्य
  • )धातू

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Marathi Language

‘खर्चवेच’ हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

  • )अभ्यस्त-पूर्णाभ्यस्त
  • )अंशाभ्यस्त✓ योग्य
  • )अनुकरणवाचक
  • )यापैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Marathi Language

‘तू नियमित व्यायाम करावास्’ याचे आज्ञार्थी वाक्य करा.

  • )तू नियमित व्यायाम कर.✓ योग्य
  • )तू नियमित व्यायाम करतोस.
  • )तू नियमित व्यायाम करीत नाहीस.
  • )तू नियमित व्यायाम करीत असतोस.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Maharashtra

कोणत्या नामाचे सामान्य रूप होत नाही. (a) अकारान्त कुलनामांचे (b) एकारान्त नपुंसकलिंगी नामांचे (c) ईकारान्त ग्रामनामांचे (d) ईकारान्त कुलनामांचे

  • )(a) व (c) बरोबर
  • )(a), (b) व (c) बरोबर
  • )(a), (c) व (d) बरोबर✓ योग्य
  • )सर्व बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Maharashtra

पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.

  • )सहस्त्र किरणे
  • )साठावे वर्ष
  • )दुहेरी रंग
  • )दहा-दहांचा गट✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Maharashtra

दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 'भोजनशाळेत माणसे जेऊ लागली'

  • )द्विकर्मक क्रियापद
  • )साधित क्रियापद
  • )संयुक्त क्रियापद✓ योग्य
  • )सकर्मक क्रियापद

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Maharashtra

न, ना, या क्रियाविशेषणांचा प्रकार ओळखा. (a) सिद्ध क्रियाविशेषण अव्यये (b) साधित क्रियाविशेषण अव्यये (c) निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यये (d) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये

  • )फक्त (a) बरोबर
  • )फक्त (b) व (d) बरोबर
  • )फक्त (c) बरोबर✓ योग्य
  • )फक्त (d) बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Marathi Language

संयुक्त वाक्य असलेले पर्याय ओळखा. (a) वर्गात मुले आणि मुलीही आल्या. (b) जेव्हा मोठी घंटा होते, तेव्हा शाळा सुटते. (c) आज रविवार आहे पण शाळेला सुट्टी नाही. (d) या समारंभाला मुख्यमंत्री येतील किंवा उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील.

  • )फक्त (a) व (c) बरोबर
  • )फक्त (b) व (d) बरोबर
  • )फक्त (a), (c) व (d) बरोबर✓ योग्य
  • )सर्व पर्याय बरोबर आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Marathi Language

पुढे दिलेले वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यातून योग्य असणाऱ्या वाक्यप्रचाराचा अर्थाचा अचूक पर्याय लिहा.

  • )उखळ पांढरे होणे = भीक मागण्याची पाळी येणे
  • )दाद न देणे = पुष्कळ फायदा होणे
  • )हातावर तुरी देणे = डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे✓ योग्य
  • )उलटी अंबारी हाती येणे = पूर्णपणे दुर्लक्ष करणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Marathi Language

'शहरात नोकरी करीत असताना गोकुळला दर अकरा महिन्यांनी नवीन भाड्याच्या घरात घरसामान हलवावे लागे. त्यामुळे तो या त्रासाला अगदी कंटाळून गेला होता.' – या वाक्य समूहासाठी योग्य वाक्यप्रचाराची निवड करा.

  • )जीव लावणे
  • )जीवावर उदार होणे
  • )जीवाला घोर लागणे
  • )जीव मेटाकुटीस येणे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Marathi Language

'ठाव पाहणे' या वाक्यप्रचाराचा समर्पक उपयोग असलेले वाक्य कोणते ? (a) शेतकरी पावसाचा ठाव पाहून पेरणी करतात. (b) रमेशने गाव सोडल्यापासून त्याचा ठाव लागत नाही. (c) एखाद्याच्या मनाचा ठाव पाहणे शक्य नसते. (d) बिळातील सशाचा ठाव पाहणे कसे जमेल ?

  • )फक्त (a) व (b) बरोबर
  • )फक्त (b) व (d) बरोबर
  • )फक्त (a) बरोबर✓ योग्य
  • )फक्त (c) व (d) बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१English Language

Identify the functions of the word 'after' in the following sentences. (a) They arrived soon after. (b) He takes after his father. (c) After ages shall sing his glory. (d) We went away after they had left.

  • )adjective, preposition, adverb, conjunction
  • )conjunction, adverb, adjective, preposition
  • )adverb, preposition, adjective, conjunction✓ योग्य
  • )adverb, adjective, preposition, conjunction

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२English Language

(a) She is more charming than any other woman living. (b) I have no ulterior motive than helping you. (c) He has greater popularity than any other leader. Choose the correct sentence/s.

  • )Only (a)
  • )Only (b)
  • )Only (a) and (c)✓ योग्य
  • )Only (b) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३English Languageआयोगाने रद्द

Which of the following sentences are grammatically correct? (a) She did not break it nor lose it. (b) She did not break it or lose it. (c) A month has passed since I come here. (d) A month passed since I am coming here.

  • )Only (b) and (c)
  • )Only (a) and (b)
  • )Only (c) and (d)
  • )Only (a) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ६४English Language

He said, “I went to my friend's house yesterday”. Identify the sentence written in correct indirect narration.

  • )He said that he had gone to his friend's house yesterday.
  • )He said that he had gone to his friend's house the day before.✓ योग्य
  • )He told he had went to his friend's house the day before.
  • )He informed that he went to his friend's house the previous day.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१English Language

Match the pairs : I (a) One who tries to avoid reality (b) A person belonging to a wandering race (c) One who believes in fate (d) One who believes very easily II (i) Gipsy (ii) Fatalist (iii) Credulous (iv) Escapist

  • )(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
  • )(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
  • )(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)✓ योग्य
  • )(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७English Language

Arbitrator is __________. Complete the sentence choose the correct alternative.

  • )a person who buys goods from the producer and sells them to customer.
  • )a person who gives you social assistance.
  • )a person who advocates a particular company's product.
  • )a person who is appointed by the parties to settle their disputes.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८English Language

Identify the sentence/s grammatically correct. (a) The luggages are in the cloakroom. (b) He gave me two dozen oranges. (c) The table's leg is broken. (d) For goodness' sake forgive me !

  • )Only (a) and (c)
  • )Only (b) and (d)✓ योग्य
  • )Only (a), (b) and (c)
  • )Only (a), (b) and (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९English Language

Choose the correct option in which words are spelt correctly.

  • )reminescences, sanetorium, disastrous, compulsory
  • )reminiscences, sanatorium, disastrous, compulsory✓ योग्य
  • )remeniscences, sanatorium, desastrous, compulsory
  • )reminiscences, sanetorium, desastrous, compulsory

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०English Language

(a) They are preparing lessons for the ensuing examinations. (b) Ranjan is doing this important work for the last five days. (c) The examinees stopped writing when the invigilator entered the hall. Identify the sentence/s grammatically correct.

  • )Only (a) and (b)
  • )Only (b) and (c)
  • )Only (b)
  • )Only (a)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४English Language

Identify the correct sentence/s : (a) He is a finest young player around at the moment. (b) She was a company director when she retired. (c) Sydney is the capital city of new South Wales.

  • )Only (a)
  • )Only (b)✓ योग्य
  • )Only (a) and (c)
  • )Only (b) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७English Language

Identify the correct sentence.

  • )Not only she wrote the screenplay for the movie but also acted a role in it.
  • )She wrote not only the screenplay for the movie but also acted a role in it.
  • )She not only wrote the screenplay for the movie but also acted a role in it.✓ योग्य
  • )Not only she wrote a screenplay for the movie but acted a role in it also.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2022-common-paper-i