स्पर्धाAI

MPSC गट क २०२२

Combined Prelims · ९२ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Current Affairs

2021 च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवल मध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला?

  • )नवाजुद्दीन सिद्दिकी
  • )अक्षय कुमार
  • )पंकज त्रिपाठी
  • )धनुष✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत?

  • )प्रोफेसर दीपक धर✓ योग्य
  • )अशोक कुमार बरुआ
  • )बिमला बुटी
  • )डी.डी. भावाळकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

टोकियो 2020 (प्रत्यक्षात ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या) पॅरालिम्पिक गेम्स मध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

  • )अवनी लेखरा✓ योग्य
  • )भाविना पटेल
  • )एकता भ्यान
  • )कशिश लाकरा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

ग्लोबल ऑब्झर्व्हेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लँटेशन (GODT) या संस्थेच्या 2021 च्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात ______ क्रमांक आहे.

  • )प्रथम
  • )द्वितीय
  • )तृतीय✓ योग्य
  • )पाचवा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

'बियॉन्ड पॉसिबल' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

  • )बर्नाडेट मॅकडोनाल्ड
  • )निम्सदाई पुर्जा✓ योग्य
  • )अरुणिमा सिन्हा
  • )स्टिफन आल्टर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Environment

खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेसी संबंधित आहे?

  • )जल संधारण✓ योग्य
  • )मृदा संधारण
  • )वायु प्रदूषण
  • )मत्स्यपालन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

'मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजने' बाबत खालीलपैकी, कोणती विधाने बिनचूक आहेत? (a) ही योजना 2018 मध्ये दिल्ली सरकारने सुरू केली. (b) भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेवू शकतो. (c) या योजनेअंतर्गत भेट दयावयाच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आला आहे. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) व (b)
  • )फक्त (a) व (c)✓ योग्य
  • )फक्त (b) व (c)
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे, ते कोणत्या भारतीय राज्यात आहे?

  • )आंध्र प्रदेश
  • )कर्नाटक
  • )आसाम✓ योग्य
  • )उत्तराखंड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Current Affairs

योग्य कथन/ने ओळखा. (भारत - मध्य एशिया शिखर परिषद) (a) पहिली भारत - मध्य एशिया शिखर परिषद जानेवारी, 2022 मध्ये आयोजित करण्यात आली. (b) ताजिकिस्तान, उझबेकिस्तान ही गणराज्ये या शिखर परिषदेत उपस्थित होती. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) / Only (a)
  • )फक्त (b) / Only (b)
  • )(a) व (b) दोन्ही / Both (a) and (b)✓ योग्य
  • )यापैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Current Affairs

मे 2022 मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

  • )राजीव कुमार / Rajiv Kumar
  • )रमेश चंद / Ramesh Chand
  • )जयती घोष / Jayati Ghosh
  • )सुमन के बेरी / Suman K Bery✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Current Affairs

खालीलपैकी कोणती संस्था शालेय मुलांसाठी 'यंग सायंटिस्ट प्रोग्राम' 'युवा विज्ञानी कार्यक्रम' 'युविका' नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे?

  • )युनिसेफ - संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बालकांचा आपत्कालीन निधी / UNICEF - United Nations International Children's Emergency Fund
  • )भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर (BARC) (भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र) / Bhabha Atomic Research Centre (BARC)
  • )इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) (भारतीय अंतराळ संशोधन संघटना) / Indian Space Research Organisation (ISRO)✓ योग्य
  • )डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना) / Defence Research and Development Organisation (DRDO)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Current Affairs

'हानिकारक कायदे हटवा, सशक्त करणारे कायदे बनवा' ही कोणत्या दिवसाची थीम आहे?

  • )शून्य भेदभाव दिवस / Zero Discrimination Day✓ योग्य
  • )जागतिक एड्स दिवस / World AIDS Day
  • )जागतिक समता दिवस / World Equality Day
  • )जागतिक सामाजिक न्याय दिन / World Social Justice Day

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Current Affairs

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजेच 'इस्रो' चे अध्यक्ष म्हणून _________ यांची जानेवारी, 2022 मध्ये नियुक्ती झालेली आहे.

  • )डॉ. के. सिवन / Dr. K. Sivan
  • )डॉ. एस. सोमनाथ / Dr. S. Somnath✓ योग्य
  • )डॉ. के. राधाकृष्णन / Dr. K. Radhakrishnan
  • )प्रा. एमजीके मेनन / Prof. MGK Menon

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Current Affairs

पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली?

  • )ऑपरेशन ब्लॅक कोब्रा / Operation Black Cobra
  • )ऑपरेशन रेड रोज / Operation Red Rose✓ योग्य
  • )ऑपरेशन ब्लॅक बुल / Operation Black Bull
  • )ऑपरेशन प्रहार / Operation Prahar

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Polity

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली?

  • )14 वी घटनादुरुस्ती / 14th Amendment
  • )16 वी घटनादुरुस्ती / 16th Amendment✓ योग्य
  • )24 वी घटनादुरुस्ती / 24th Amendment
  • )39 वी घटनादुरुस्ती / 39th Amendment

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Polity

राज्यघटनेच्या भाग XVII अंतर्गत सर्व नऊ कलमे कोणती आहेत?

  • )कलम 333 ते 341 / Article 333 to 341
  • )कलम 334 ते 342 / Article 334 to 342
  • )कलम 332 ते 340 / Article 332 to 340
  • )कलम 343 ते 351 / Article 343 to 351✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९History

भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पहाण्यासाठी 1930 ते 1932 च्या दरम्यान लंडनमध्ये _________ गोलमेज परिषदा घेण्यात आल्या.

  • )दोन
  • )चार
  • )तीन✓ योग्य
  • )पाच

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Polity

भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता _________ यांच्याकडे देण्यात आली आहे.

  • )मुख्यमंत्री
  • )मंत्रिमंडळ
  • )राज्यपाल✓ योग्य
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Polity

भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, ______ पाच वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील.

  • )निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासूनच्या दिनांकापासून
  • )निवडणुका जाहीर झाल्याच्या दिनांकापासून
  • )तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून✓ योग्य
  • )पंचायत निवडणुकांच्या नंतर सुरु होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Polity

कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला?

  • )देवराज समिती
  • )करन सिंग समिती
  • )स्वर्ण सिंग समिती✓ योग्य
  • )कृपलानी समिती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Polity

खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही?

  • )ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे
  • )ग्रामसभेचा अहवाल तयार करणे
  • )शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे
  • )यापैकी नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Polity

कोणत्या घटनादुरुस्ती-नये 11 वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले? (51A(K))

  • )42 वी घटनादुरुस्ती कायदा - 1976
  • )52 वी घटनादुरुस्ती कायदा - 1980
  • )62 वी घटनादुरुस्ती कायदा - 1992
  • )86 वी घटनादुरुस्ती कायदा - 2002✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६History

नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत? (a) कामगार चळवळीचे जनक (b) 1884 मध्ये बॉम्बे मिलहँडस असोसिएशनची स्थापना (c) ब्रिटीश सरकारचा 'रावबहादूर' किताब (d) महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना पर्यायी उत्तरे:

  • )(a) आणि (b) फक्त
  • )(a), (b) आणि (c) फक्त✓ योग्य
  • )(b), (c) आणि (d) फक्त
  • )(a), (c) आणि (d) फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७History

जोड्या जुळवा : (a) रँड व आयर्स्टचा खून (b) अभिनव भारत (c) न्यायाधीश जॅक्सनचा खून (d) कर्झन वायलीचा खून (i) वि.दा. सावरकर (ii) अनंत लक्ष्मण कान्हेरे (iii) मदनलाल धिंग्रा (iv) चाफेकर बंधू पर्यायी उत्तरे:

  • )(a) (iv) (b) (i) (c) (ii) (d) (iii)✓ योग्य
  • )(a) (iii) (b) (iv) (c) (i) (d) (ii)
  • )(a) (ii) (b) (iii) (c) (i) (d) (iv)
  • )(a) (ii) (b) (i) (c) (iii) (d) (iv)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८History

खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा : (a) मराठीतील पहिले पत्रकार (b) अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक (c) मराठी वृत्तपत्रांचे जनक (d) कुलाबा वेधशाळेचे संचालक पर्यायी उत्तरे :

  • )दादाभाई नौरोजी
  • )भाऊ दाजी लाड
  • )बाळशास्त्री जांभेकर✓ योग्य
  • )जगन्नाथ शंकर शेठ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९History

कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दोन गट पुन्हा एकत्र आले?

  • )सुरत अधिवेशन
  • )लखनौ अधिवेशन✓ योग्य
  • )फैजपूर अधिवेशन
  • )अलाहाबाद अधिवेशन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०History

1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते?

  • )देवेंद्रनाथ टागोर
  • )पंडीत जवाहरलाल नेहरू✓ योग्य
  • )जयप्रकाश नारायण
  • )रविंद्रनाथ टागोर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१History

कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला?

  • )गोपाळ गणेश आगरकर
  • )न्यायमूर्ती एम.जी. रानडे
  • )केशवचंद्र सेन
  • )महर्षी धोंडो केशव कर्वे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२History

ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे : (a) भारतातील हस्तोद्योगांचा ऱ्हास (b) कुटिरोद्योगांचा ऱ्हास (c) ग्रामव्यवस्थेत सुधारणा (d) शेती सुधारणा

  • )(a) आणि (b) फक्त / (a) and (b) only✓ योग्य
  • )(b) आणि (c) फक्त / (b) and (c) only
  • )(c) आणि (d) फक्त / (c) and (d) only
  • )वरील सर्व बरोबर / All of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३History

जोड्या लावा : उठाव केंद्र (a) कोल्हापूर (b) जमखंडी (c) औरंगाबाद (d) नरगुंद नेतृत्व (i) आप्पासाहेब पटवर्धन (ii) चिमासाहेब (iii) बाबासाहेब भावे (iv) फिदा अली

  • )(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
  • )(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)✓ योग्य
  • )(a)-(ii), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(i)
  • )(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४History

अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळविणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण?

  • )सुप्रिया जोशी
  • )आनंदीबाई जोशी✓ योग्य
  • )रमाबाई रानडे
  • )अनुताई वाघ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५History

असहकार चळवळी बरोबरच महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम हाती घेतला? (a) स्वदेशीचा प्रसार (b) हिंदू-मुस्लीम ऐक्य (c) मद्यपान बंदी (d) अस्पृश्यता निवारण पर्यायी उत्तरे : (1) (a) आणि (b) फक्त (2) (c) आणि (d) फक्त (3) (a), (b) आणि (c) फक्त (4) वरील सर्व बरोबर

  • )(a) आणि (b) फक्त
  • )(c) आणि (d) फक्त
  • )(a), (b) आणि (c) फक्त
  • )वरील सर्व बरोबर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Historyआयोगाने रद्द

लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली?

  • )डेक्कन सभा
  • )सार्वजनिक सभा
  • )बहिष्कृत भारत
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ३९History

मुंबई सरकारने दक्षिणे मध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले?

  • )लँड रेव्हेन्यू ॲक्ट कमिशन
  • )डेक्कन रॉयट्स कमिशन✓ योग्य
  • )दि डेक्कन ॲग्रीकल्चर कमिशन
  • )लँड ओनर्स कमिशन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Geography

खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे?

  • )राजस्थान (Rajasthan)✓ योग्य
  • )महाराष्ट्र (Maharashtra)
  • )उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)
  • )आन्ध्र प्रदेश (Andhra Pradesh)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Geography

खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत?

  • )त्रिपुरा (Tripura)
  • )मणिपूर (Manipur)
  • )मिझोराम (Mizoram)✓ योग्य
  • )नागालँड (Nagaland)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Geography

जोड्या जुळवा : लोहपोलाद उद्योग (a) बोकारो (b) दुर्गापूर (c) रुरकेला (d) भद्रावती राज्य (i) कर्नाटक (ii) ओडिशा (iii) प. बंगाल (iv) बिहार

  • )(i) (ii) (iii) (iv)
  • )(iv) (iii) (ii) (i)✓ योग्य
  • )(ii) (i) (iv) (iii)
  • )(iii) (iv) (i) (ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Geography

महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता ?

  • )कळसूबाई, साल्हेर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर✓ योग्य
  • )साल्हेर, कळसूबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर
  • )कळसूबाई, महाबळेश्वर, साल्हेर, त्र्यंबकेश्वर
  • )कळसूबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, साल्हेर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Geography

जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर जास्त आहे?

  • )सातारा✓ योग्य
  • )औरंगाबाद
  • )बुलढाणा
  • )जळगाव

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Geography

महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांची ठिकाणे असलेले जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा : उष्ण पाण्याचे झरे (a) सालबर्डी (b) साव (c) वज्रेश्वरी (d) चांगदेव जिल्हे (i) जळगाव (ii) ठाणे (iii) रायगड (iv) अमरावती पर्यायी उत्तरे :

  • )(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
  • )(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
  • )(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
  • )(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Geography

औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते ?

  • )औरंगाबाद आणि परभणी / Aurangabad and Parbhani
  • )बीड आणि हिंगोली / Beed and Hingoli✓ योग्य
  • )नांदेड आणि हिंगोली / Nanded and Hingoli
  • )उस्मानाबाद आणि जालना / Osmanabad and Jalna

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Geography

'अस्तंभा' हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते ?

  • )महादेव / Mahadev
  • )हरिश्चंद्र / Harishchandra
  • )सातपुडा / Satpuda✓ योग्य
  • )सह्याद्री / Sahyadri

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Geography

खालील विधाने पहा : (a) भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30° ते 40° उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायुचे अस्तित्व कारणीभूत आहे. (b) भारताचा भूमीखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे. पर्यायी उत्तरे :

  • )विधान (a) बरोबर आहे / Statement (a) is correct
  • )विधान (b) बरोबर आहे / Statement (b) is correct
  • )विधान (a) आणि (b) बरोबर आहेत / Statement (a) and (b) are correct✓ योग्य
  • )विधान (a) आणि (b) बरोबर नाहीत / Statement (a) and (b) are not correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Geography

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही? (a) अमळनेर (b) दौंड (c) नाशिक (d) धुळे

  • )(a) व (b) फक्त✓ योग्य
  • )(b) फक्त
  • )(b) व (d) फक्त
  • )(d) फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३History

महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे _______.

  • )भायखळा ते ठाणे 1925
  • )मुंबई ते कुर्ला 1925✓ योग्य
  • )दादर ते बांद्रा 1918
  • )दादर ते बोरीवली 1925

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Environment

सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे?

  • )मोर
  • )रोहित
  • )माळढोक✓ योग्य
  • )हंसक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Geography

कोल्हापूर जिल्ह्यातील जोतीबा डोंगर _______ नावाने ओळखला जातो. (a) वाडी रत्नागिरी (b) करवीर (c) पन्हाळा (d) केदारेश्वरवाची टेकडी

  • )फक्त (a)✓ योग्य
  • )फक्त (b)
  • )(c) आणि (d)
  • )(a) आणि (b)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Economy

रेपो दर म्हणजे ज्या दराने

  • )व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात / Commercial banks lend to public
  • )सरकारी कर्ज घेण्यावर आकाराला जातो / The rate which is charged for Government lending
  • )रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते / R.B.I. lends to commercial banks✓ योग्य
  • )व्यापारी बँका त्यांच्याकडे असणाऱ्या बचती ठेवीवर दर आकारतात / The rate is charged on saving deposits with commercial banks

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Economy

एफ आर बी एम कायदा केव्हा पासून लागू करण्यात आला ?

  • )जानेवारी 17, 2000 / January 17, 2000
  • )डिसेंबर 30, 2003 / December 30, 2003
  • )जून 15, 2005 / June 15, 2005
  • )जुलै 5, 2004 / July 5, 2004✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Economy

जुलै 19, 1969 ला ज्या चौदा व्यापारी बँकाकडील ठेवींचे मूल्य ₹ _________ किंवा यापेक्षा जास्त होते, त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

  • )₹ 100 कोटी / ₹ 100 crore
  • )₹ 75 कोटी / ₹ 75 crore
  • )₹ 50 कोटी / ₹ 50 crore✓ योग्य
  • )₹ 125 कोटी / ₹ 125 crore

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Economy

सार्वजनिक आयव्ययाच्या खालीलपैकी कोणता विभाग आहे? (a) सार्वजनिक खर्च (b) सार्वजनिक उत्पन्न (c) सार्वजनिक कर्ज (d) सार्वजनिक स्वास्थ्य वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?

  • )फक्त (a)
  • )(a) आणि (b)
  • )(a), (b) आणि (c)✓ योग्य
  • )(a), (b) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Geography

खालील विधाने विचारात घ्या : (a) 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती. (b) 2011 च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73.0% होता. (c) देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्या साठी नेहमी अनुकूल राहिले. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?

  • )(a) आणि (b)
  • )फक्त (c)✓ योग्य
  • )(b) आणि (c)
  • )फक्त (a)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Economy

पतपुरवठा अधिकारीत योजना ______ या वर्षी सुरु करण्यात आली.

  • )आक्टोबर, 1980
  • )ऑगस्ट, 1982
  • )जानेवारी, 1979
  • )नोव्हेंबर, 1965✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Economy

नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते?

  • )अपुरी बचत✓ योग्य
  • )रोख रकमेची वाढती मागणी
  • )असंघटीत क्षेत्राची उपस्थिती
  • )वित्तीय गैरव्यवस्था

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Economy

राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत ______ याचा समावेश असतो. (a) बाजारी कर्जे (b) केंद्र सरकारकडून उचल घेणे (c) लोकांची अल्पबचत व भविष्य निर्वाह निधी योगदान (d) केंद्र सरकारकडून जी एस टी चा वाटा वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?

  • )फक्त (c), (d), (a)
  • )फक्त (b), (a), (d)
  • )फक्त (a), (b), (c)✓ योग्य
  • )फक्त (d), (b), (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Economy

कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढीलप्रमाणे असते :

  • )स्थिर / Constant
  • )वाढता / Increasing✓ योग्य
  • )घटता / Decreasing
  • )बदलता (चढउतार) / Fluctuating

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Economy

गरिबीच्या मुद्द्याचे पुनरीक्षण करण्यासाठी 2011-2012 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली ?

  • )एस. चक्रवर्ती समिती / S. Chakravarty Committee
  • )डी.टी. लकडावाला समिती / D.T. Lakdawala Committee
  • )आर.सी. दत्त समिती / R.C. Datta Committee
  • )सी. रंगराजन समिती / C. Rangarajan Committee✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Economy

भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविले जाते ?

  • )आयुर्विमा महामंडळ / LIC
  • )युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया / Unit Trust of India
  • )सहकारी बँका / Co-operative Banks
  • )भारतीय रिझर्व्ह बँक / Reserve Bank of India✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Science

कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी ______ वापरली जातात.

  • )एडी करंट (चक्राकार प्रवाह) / Eddy currents✓ योग्य
  • )विद्युत प्रवाह / Electric currents
  • )चुंबकीय प्रेरण / Magnetic induction
  • )यापैकी नाही / None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Scienceआयोगाने रद्द

सामान्य डोळा 25 सेमी पेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही कारण :

  • )डोळ्याचे नाभिय अंतर 25 सेमी आहे. / the focal length of the eye is 25 cm.
  • )दृष्टिपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर 25 सेमी आहे. / the distance of the retina from the eye-lens is 25 cm.
  • )डोळा हा नेत्रभिंग व दृष्टिपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. / the eye is not able to decrease the distance between the eye-lens and the retina beyond a limit.
  • )डोळा हा नाभिय अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. / the eye is not able to decrease the focal length beyond a limit.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ७३Science

जेव्हा-जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो. याला _________ म्हणतात.

  • )हॉयगेन्सचा प्रभाव / Huygen's effect
  • )ज्यूल्सचा प्रभाव / Joule's effect
  • )डॉप्लरचा प्रभाव / Doppler effect✓ योग्य
  • )रमणचा प्रभाव / Raman effect

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Science

जर संयुजा कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मुलद्रव्यात क्वांटम क्रमांकांचा संच : n = 2, l = 0, m = 0, s = + 1/2, असेल तर ते मूलद्रव्य _________ असेल.

  • )लिथियम / Lithium✓ योग्य
  • )बेरिलियम / Beryllium
  • )बोरॉन / Boron
  • )हायड्रोजन / Hydrogen

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Science

योग्य जोड्या लावा : गट 'A' (a) सॅलॅमॅन्डर (b) बदकचोचा (c) जळू (d) पॅरामेशिअम गट 'B' (i) शीतरक्ती (ii) सॅन्ग्वीवोरस (iii) असममित (iv) अंडज सस्तन प्राणी पर्यायी उत्तरे :

  • )(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
  • )(a)-(i), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(iii)✓ योग्य
  • )(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
  • )(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Science

हेटेरोनेरेसिस मध्ये उत्तरवर्ती भागात जननग्रंथी विकसित होतात. त्या जननग्रंथी खंडास ______ म्हणतात.

  • )एपिटोक / Epitoke✓ योग्य
  • )एटोक / Atoke
  • )हेटेरोगेनी / Heterogany
  • )मेटाबोली / Metaboły

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Science

खालीलपैकी कोणता मासा ऑस्टीकथाईज वर्गातील आहे ?

  • )शार्क / Shark
  • )स्टिंग रे / Sting ray
  • )कटला / Catla✓ योग्य
  • )इलेक्ट्रीक रे / Electric ray

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Science

कडुनिंबामध्ये ______ नावाचे कीटकनाशक असते. (a) डी.डी.टी. (b) अझॅडीयाक्टीन (c) अल्ड्रीन (d) बी. एच. सी. वरीलपैकी कोणता पर्याय/पर्याये बरोबर आहे/त ?

  • )(a) आणि (b) फक्त
  • )(b) फक्त✓ योग्य
  • )(c) फक्त
  • )(c) आणि (d) फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Science

फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? (a) अकार्यक्षम (b) उपजाऊ (c) अँपोकार्पस (d) पार्थिनोकार्पस वरीलपैकी कोणता पर्याय/पर्याये बरोबर आहे/त ?

  • )(a) फक्त✓ योग्य
  • )(a) आणि (b) फक्त
  • )(b) आणि (c) फक्त
  • )(d) फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Science

पुढील विधानांचा विचार करा : विधान I : बॅसिलस थुरिंगिएन्सिस हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे. विधान II : बेव्हेरिया बासियाना हि बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाते. पर्यायी उत्तरे : (1) विधान I बरोबर आणि विधान II चूक आहे (2) विधान I चूक आणि विधान II बरोबर आहे (3) दोन्ही विधाने चूक आहेत (4) दोन्ही विधाने बरोबर आहेत

  • )विधान I बरोबर आणि विधान II चूक आहे
  • )विधान I चूक आणि विधान II बरोबर आहे
  • )दोन्ही विधाने चूक आहेत
  • )दोन्ही विधाने बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Science

मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे कारण :

  • )प्लाझ्मोडियम हा पेशींमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो
  • )प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो
  • )प्लाझ्मोडियमला जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी दोन यजमान लागतात
  • )(1) आणि (2) दोन्ही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Science

खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्त पेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते ?

  • )लिम्फोसाइट्स
  • )मोनोसाइट्स
  • )इओसिनोफिल्स
  • )बेसोफिल्स✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Logical Reasoning

उपलब्ध असलेल्या विदेतून, एका शहरातील रस्त्यांवरील विविध वर्गांच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढीलप्रमाणे उघड झाले आहे. खाजगी चार चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात, त्याखालील बस, ट्रक आणि शेवटी दोन चाकी वाहने प्रदूषण करतात. पुढील पर्यायांतून वरील विदेच्या आधारे काढता येणारे निष्कर्ष निवडा. (a) शहरांच्या रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चारचाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे. (b) एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल. पर्यायी उत्तरे :

  • )(a) व (b) हे दोन्ही निष्कर्ष काढता येतात.
  • )फक्त (a) हा निष्कर्ष काढता येतो.
  • )फक्त (b) हा निष्कर्ष काढता येतो.
  • )(a) किंवा (b) यांच्यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Quantitative Aptitude

नियमित अंतरावर दिलेल्या खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असेल?

  • )10 व्या
  • )11 व्या✓ योग्य
  • )12 व्या
  • )9 व्या

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Environment

पुढे दिलेल्या विधानातून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष निवडा.

  • )पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारी आहार सवयीचा करून घ्यायला प्रोत्साहित केले पाहिजे.
  • )जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरणस्नेही यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्ष्यक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे.✓ योग्य
  • )सागरावर येणारा ताण टाळण्यासाठी लोकांना तळ्यात व नद्यांत रहाणारे गोड्या पाण्यातील मासे खायला प्रोत्साहन दिले पाहिजे.
  • )फक्त काही प्रजातींच्या माशांची शेती पारिस्थितिकीच्या जैवविविधतेला बाधक ठरत आहे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Logical Reasoning

अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही, तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल?

  • )मोहन, चेतन, अशोक, नरेश, कृष्णा
  • )चेतन, मोहन, अशोक, नरेश, कृष्णा
  • )चेतन, अशोक, मोहन, नरेश, कृष्णा✓ योग्य
  • )चेतन, नरेश, मोहन, अशोक, कृष्णा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Logical Reasoning

काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत. V ही व्यक्ती An च्या शेजारी आणि S ही व्यक्ती G च्या शेजारी आहे. G ही व्यक्ती Aj च्या बरोबर नाही. Aj बाकाच्या डाव्या टोकाला आणि S बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे. V ही व्यक्ती An च्या उजवीकडे आणि Aj च्या उजवीकडे आहे. V आणि S सोबतीने बसल्या आहेत. जर G आणि V यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर या माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानांपैकी सत्य नसलेले विधान निवडा.

  • )त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहीत नसल्याने स्थाने निश्चित करता येणार नाहीत. / Positions cannot be ascertained as the direction they face is not known.✓ योग्य
  • )G मधल्या स्थानावर आहे. / G occupies the middle position.
  • )V टोकाच्या स्थानावर आहे. / V occupies the end position.
  • )An दोघांपैकी एक टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे. / An occupies the second position from one of the end.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Quantitative Aptitude

जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास, याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतील, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर त्यांना किती दिवस लागतील?

  • )8
  • )5
  • )10✓ योग्य
  • )12

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Logical Reasoning

पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद यथार्थ ठरण्यासाठी जुळणीतील 3 रे विधान हे त्याआधीच्या 2 विधानांवर आधारित निष्कर्ष विधान असायला हवे. (a) काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत. (b) वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्जन करते. (c) कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. (d) काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायूंचा उत्सर्जन करत नाही. (e) वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. पर्यायी उत्तरे :

  • )(b), (e), (c)
  • )(c), (b), (e)✓ योग्य
  • )(c), (a), (d)
  • )(b), (d), (a)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Quantitative Aptitude

तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 : 3 : 4 असे आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती ?

  • )25 वर्षे
  • )30 वर्षे
  • )40 वर्षे✓ योग्य
  • )45 वर्षे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Quantitative Aptitude

रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून दोन बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी दोन बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडा.

  • )100✓ योग्य
  • )96
  • )104
  • )92

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Quantitative Aptitude

दोन संख्यांचे गुणोत्तर 3 : 4 या प्रमाणात आहेत व त्यांच्या वर्गाची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या ?

  • )12, 16✓ योग्य
  • )9, 12
  • )6, 8
  • )15, 20

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Quantitative Aptitude

नेहाचा पगार अगोदर 10% नी कमी केला व नंतर तेजीमुळे तो 30% नी वाढवला तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली ?

  • )17✓ योग्य
  • )20
  • )19
  • )18

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Logical Reasoning

सोमा पूर्वेकडे 10 km चालत गेला. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 km गेला. तो पुन्हा वळून पूर्वेकडे 2 km गेला. त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 km गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंतचे अंतर ______ आहे.

  • )13 km✓ योग्य
  • )18 km
  • )20 km
  • )दिलेल्या माहितीच्या आधारे काढणे शक्य नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Quantitative Aptitude

जर एक रक्कम द.सा.द.शे. 10 दराने 2 वर्षांसाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक ₹ 750 आहे, तर ती रक्कम किती ?

  • )75,000✓ योग्य
  • )60,000
  • )15,000
  • )90,000

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2022-combined-prelims