स्पर्धाAI

MPSC गट क २०२२

Clerk Typist Paper II · ९३ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Polity

खालील विधाने लक्षात घ्या : अ. वित्तीय बिल अस्वीकृत करणे किंवा संशोधित करणे हा अधिकार राज्यसभेस नाही. ब. राज्यसभा अनुदान मागण्यांवर मतदान करू शकत नाही. क. राज्यसभेत वार्षिक वित्तीय विवरणावर चर्चा होऊ शकत नाही. वरील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

  • )फक्त अ
  • )अ आणि ब✓ योग्य
  • )ब आणि क
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणास पदावरून हटवू शकतात ?

  • )राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष
  • )राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य
  • )राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष
  • )वरीलपैकी कोणालाही नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

भारतीय राज्यघटनेतील कार्यालयीन भाषा विषयक तरतुदींसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

  • )राज्यघटनेच्या १७ व्या भागात कार्यालयीन भाषेसंदर्भात तरतुदी केलेल्या आहेत.
  • )कलम 343 ते 351 मध्ये कार्यालयीन भाषेसंदर्भात तरतुदी दिसून येतात.
  • )देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाणारी हिंदी ही केंद्रशासनाची कार्यालयीन भाषा असेल.
  • )केंद्रशासनाच्या कार्यालयीन हेतूंकरिता वापरण्यात येणारे संख्यात्मक प्रारूप हे देवनागरी स्वरूपाचेच असेल.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

ज्या राज्यांच्या विधीमंडळा मध्ये दोन सभागृहे आहेत, त्यामधील वरिष्ठ सभागृहाला _________ म्हटले जाते आणि कनिष्ठ सभागृह _________ म्हणून ओळखले जाते, आणि जिथे केवळ एकच सभागृह असते ते _________ म्हणून ओळखले जाते.

  • )विधान परिषद, विधानसभा, विधानसभा✓ योग्य
  • )विधानसभा, विधानसभा, विधान परिषद
  • )विधानसभा, विधान परिषद, विधानसभा
  • )विधान परिषद, विधान परिषद, विधानसभा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

संसदेची मध्ये खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश आहे ? अ. प्रदर्शनासाठी चित्रपटटाला परवानगी. ब. आंतर-राज्य नदी आणि नदी खोऱ्यांचा विकास. क. वन्यप्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण. ड. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खाणी आणि खनिज विकास नियंत्रित करणे.

  • )अ, ब आणि ड✓ योग्य
  • )ब, क आणि ड
  • )क आणि ड
  • )वरीलपैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

नाना फडणवीसांनी इंग्रजांच्या विरुद्ध खालील कोणत्या सत्ताधीशांचा ‘अखिल भारतीय राज्यसंघ’ निर्माण केला होता ? (अ) मराठा सरकार (पेशवे), हैदराबादचा निजाम (ब) म्हैसूरचा हैदरअली, नागपूरकर भोसले (क) अर्काटचा नबाब, चंद्रनगरचा नबाब (ड) पंजाबचा महानसिंग, त्रावणकोरचा मार्तंड वर्मा

  • )अ आणि ब फक्त✓ योग्य
  • )ब आणि क फक्त
  • )क आणि ड फक्त
  • )अ, ब आणि क फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

इंग्रजी साम्राज्य सत्तेचे भारतीय लोकांच्या जीवनावर पडलेल्या परिणामाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. हिंदुस्थानातील उद्योगांधात वाढ झाली ब. शहरे ओस पडली क. शेती हाच प्रमुख व्यवसाय बनला ड. इंग्रजी राजवटीद्वारे समाज सुधारणेचा प्रयत्न झाला

  • )अ, ब आणि क फक्त / a, b and c only
  • )ब आणि क फक्त / b and c only
  • )ब, क आणि ड फक्त / b, c and d only✓ योग्य
  • )क आणि ड फक्त / c and d only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

सम्राट अकबराच्या नवरत्न दरबारात खालीलपैकी कोणते विद्वान समाविष्ट होते ? अ. हसन निजामी, अबुल हसन, सिराज अफीक ब. अब्दुल रहीम खान खाना, अबुल फझल, शेख फैजी क. तानसेन, राजा तोडरमल, राजा बिरबल ड. राजा मानसिंग, मुल्ला-दो-प्याजा, हकीम हुमाम

  • )अ आणि ब फक्त / a and b only
  • )ब आणि क फक्त / b and c only
  • )ब, क आणि ड फक्त / b, c and d only✓ योग्य
  • )अ, क आणि ड फक्त / a, c and d only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पदे व त्यांच्या कार्यांच्या योग्य जोड्या जुळवा पद अ. अमात्य ब. सचिव क. मंत्री ड. सुमंत कार्य i. राजपत्रबाबतचे कार्य ii. परराष्ट्र व्यवहार पाहणे iii. राज्याच्या जमाखर्च पाहणे iv. राजनैतिक जबाबदारी पार पाडणे

  • )iv ii iii i
  • )iii i iv ii✓ योग्य
  • )ii iii i iv
  • )iii iv ii i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०History

वॉरेन हेस्टींग्जच्या कारकिर्दीत (1772 ते 85) पुढीलपैकी कोणती गाजलेली प्रकरणे घडली होती ? अ. रोहिलखंड प्रकरण ब. नंदकुमारची फाशी क. चेतसिंग प्रकरण ड. अवधच्या बेगमचे प्रकरण

  • )अ आणि ब फक्त
  • )ब आणि क फक्त
  • )ब, क आणि ड फक्त
  • )वरील सर्व बरोबर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Science

जैवसंस्थामध्ये खालीलपैकी कोणता मॉलिक्युल (रेणू) ऊर्जेचे चलन म्हणून वापरला जातो ?

  • )एटीपी✓ योग्य
  • )ग्लुकोज
  • )एनएडीपी
  • )एफएडी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Science

वनस्पतींना त्यांच्या अस्तित्वासाठी, वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. खालीलपैकी कोणते पोषक घटक वनस्पतींना आवश्यक असलेल्या सूक्ष्म पोषक घटकांचा संच नाही ?

  • )बोरॉन, झिंक, मॅंगनीज
  • )तांबे, मॉलिब्डेनम, क्लोरीन
  • )नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम✓ योग्य
  • )कोबाल्ट, निकेल, लोह

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Science

______ या पेशींच्या आत्मघाती पिशव्या आहेत ज्यामध्ये एक डझनहून अधिक शक्तिशाली हायड्रोलायटिक एन्झाईम्स असतात जे पेशीतील पदार्थ पचवण्यास सक्षम असतात.

  • )सेक्रेटरी ग्रॅन्युल्स
  • )प्लाझमोसिन्स
  • )लायसोसोम्स✓ योग्य
  • )सेंट्रोसोम्स

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Science

खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव प्रोबायोटीक वर्गात मोडत नाही ?

  • )लॅक्टोबॅसीलस
  • )बायफिडोबॅक्टेरीयम
  • )स्ट्रेप्टोकोकस
  • )स्टॅफलोकोकस✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Current Affairs

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (FIPRESCI) द्वारे कोणता चित्रपट आजवरचा सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला आहे ?

  • )मुगल-ए- आझम
  • )आनंद
  • )अपराजितो
  • )पाथेर पांचाली✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Current Affairs

पुढीलपैकी कोणत्या गोलंदाजाच्या एका षटकात ऋतुराज गायकवाड ने नोव्हेंबर 2022 मध्ये सात षटकार मारले ?

  • )शिवम शर्मा
  • )शिवम-मावी✓ योग्य
  • )शिवा सिंग
  • )रिंकू सिंग

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Current Affairs

अंशु मलिक यांनी स्त्रियांच्या _________ किलो वजनी गटात, ओस्लो, नॉर्वे येथे ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या 2021 जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले.

  • )65
  • )72
  • )68
  • )57✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Current Affairs

पेरिस मधील फ्रेंच ओपन बॅडमिंटन 2022 च्या पुरुष दुहेरीची अंतिम फेरी कोणी जिंकली ?

  • )श्रीकांत किदंबी आणि लक्ष्य सेन / Srikanth Kidambi and Lakshya Sen
  • )श्रीकांत किदंबी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी / Srikanth Kidambi and Satwik Sairaj Rankireddy
  • )चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी / Chirag Shetty and Satwik Sairaj Rankireddy✓ योग्य
  • )लक्ष्य सेन आणि चिराग शेट्टी / Lakshya Sen and Chirag Shetty

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Current Affairs

67 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये मुख्य भूमिकेत (महिला) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला ?

  • )क्रिती सॅनन / Kriti Sanon✓ योग्य
  • )कियारा आडवाणी / Kiara Advani
  • )श्रद्धा कपूर / Shraddha Kapoor
  • )दीपिका पाडुकोण / Dipika Padukone

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Current Affairs

कोणत्या भारतीय बुद्धीबळपटूंनी आशियाई चेस चॅम्पियनशिप मध्ये अनुक्रमे खुल्या आणि महिलांचे विजेतेपद जिंकले ?

  • )आर. प्रज्ञानंधा आणि पी.व्ही. नंदीधा / R. Praggnanandhaa and P.V. Nandhidhaa✓ योग्य
  • )बी. अधिबान आणि कोनेरू हंपी / B. Adhiban and Koneru Humpy
  • )आर. प्रज्ञानंधा आणि कोनेरू हंपी / R. Praggnanandhaa and Koneru Humpy
  • )बी. अधिबान आणि पी.व्ही. नंदीधा / B. Adhiban and P.V. Nandhidhaa

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Current Affairs

कोणते राज्य नॉर्थ इस्ट ऑलिंपिक गेम्स 2022 चा एकूणच टीम चॅम्पियन म्हणून उदयास आले आहे ?

  • )आसाम
  • )मेघालय
  • )त्रिपुरा
  • )मणिपूर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Science

डायबोरॉन (B2H6) हा अ. कमी इलेक्ट्रॉन असलेला परमाणु आहे ब. जास्त इलेक्ट्रॉनस् असलेला परमाणु आहे क. त्रिकेंद्री बंध असलेला परमाणु आहे ड. जटिल परमाणु आहे वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )'अ' फक्त
  • )'अ' आणि 'क' फक्त✓ योग्य
  • )'अ', 'क' आणि 'ड' फक्त
  • )'ब' फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Science

जी प्रक्रिया रोधित (इन्सुलटेड) प्रणाली मध्ये किंवा आयसोलेटेड प्रणाली मध्ये होते तिला _________ प्रक्रिया म्हणतात.

  • )समोष्म✓ योग्य
  • )समतापी
  • )समभारिक
  • )समायतन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Science

थर्मोडायनामिक्स अशी विज्ञानाची शाखा आहे ज्यात

  • )ऊर्जा परिवर्तनाचा अभ्यास करतात✓ योग्य
  • )वायू परिवर्तनाचा अभ्यास करतात
  • )वस्तुमान परिवर्तनाचा अभ्यास करतात
  • )यापैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Science

31. जोड्या जुळवा : दगडी कोळसा प्रकार अ. अँथ्रासाईट ब. बिटुमिनस क. लिग्नाईट ड. पीट कार्बन प्रमाण (%) i. फक्त 30% ii. 50% iii. 40 ते 80% iv. 95%

  • )i ii iii iv
  • )iii ii i iv
  • )iv i ii iii
  • )iv iii ii i✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Geography

खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार होते ?

  • )सर्क
  • )रोशे माउटोनी
  • )फियार्ड
  • )ड्रमलिन✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Geography

भूउठावातील अपक्षरण, निक्षेपण व अवशिष्ट या प्रक्रिया कोणत्या श्रेणीत आढळतात ?

  • )(अ) चतुर्थ श्रेणीत
  • )(ब) तृतीय श्रेणीत✓ योग्य
  • )(क) द्वितीय श्रेणीत
  • )(ड) प्रथम श्रेणीत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Geography

पिग्मी लोकांचे खालीलपैकी कोणते शारीरिक वैशिष्ट्ये बरोबर आहेत ?

  • )(अ) ते जास्त उंचीचे असतात
  • )(ब) त्यांचा वर्ण पिवळसर असतो
  • )(क) त्यांचे नाक चपटे असते✓ योग्य
  • )(ड) त्यांचे ओठ बारीक असतात

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Science

चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो ?

  • )25 दिवस 5 तास / 25 days 5 hours
  • )27 दिवस 7 तास / 27 days 7 hours✓ योग्य
  • )30 दिवस 3 तास / 30 days 3 hours
  • )35 दिवस 2 तास / 35 days 2 hours

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Science

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

  • )मोडेम हे एक सॉफ्टवेअर आहे. / modem is a software.
  • )मोडेम विद्युत दाब स्थिर करण्यास मदत करते. / modem helps in stabilising the voltage.
  • )मोडेम ही डेटाबेस सिस्टिम आहे. / modem is the database system.
  • )मोडेम हे ॲनालॉग सिग्नलला डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतरित करते किंवा याच्या उलटही करते. / modem converts analog signals into digital signals and vice versa.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Science

खालील वेगवेगळ्या प्रकारच्या रॉमच्या जोड्या जुळवा. a. मार्क्ड रॉम (Masked ROM) b. प्रॉम (PROM) c. इप्रॉम (EPROM) d. इइप्रॉम (EEPROM) i. विद्युत सिग्नल ने पुसून टाकते ii. कारखान्यात एकदाच लिहिलेले जाते iii. अतिनिल प्रकाशाने मिटविले जाते iv. एकदाच लिहीता येते परंतु कारखान्यातून अनप्रोग्राम्ड करून येते म्हणजे लिहीलेले नसते

  • )a-i, b-ii, c-iv, d-iii
  • )a-ii, b-iv, c-iii, d-i✓ योग्य
  • )a-ii, b-iv, c-i, d-iii
  • )a-ii, b-i, c-iii, d-iv

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Science

बऱ्याच प्राप्तकर्त्यांना एकाच वेळी पाठवलेला एक अनपेक्षित ई-मेल संदेश म्हणजे काय ?

  • )स्पॅम / Spam✓ योग्य
  • )व्हायरस / Virus
  • )थ्रेट / Threat
  • )वॉर्म / Worm

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Current Affairs

मिडीया लॅब एशिया ने शिक्षणाचा जो विश्वकोश तयार केला आहे त्याचे नाव खालीलपैकी कोणते?

  • )ज्ञान ज्योती / gyan jyoti
  • )ज्ञान प्रकाश / gyan prakash
  • )ज्ञानोदया / gyanodaya
  • )ज्ञानपिडीया / gyanpedia✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Science

क्ष किरणे a. 1895 साली राँटजेन यांनी शोध लावला b. उच्च ऊर्जा धारक विद्युत चुंबकीय तरंग c. प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात d. स्वयंस्फूर्तीने केंद्रकामधून बाहेर पडतात

  • )a, b, c बरोबर✓ योग्य
  • )a, b, d बरोबर
  • )a, b, c, d बरोबर
  • )a, c, d बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Science

पुण्याजवळ ______ येथे जी. एम. आर. टी. या नावाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली आहे.

  • )आळेफाटा
  • )नारायणगाव✓ योग्य
  • )मंचर
  • )इंदापूर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Logical Reasoningआयोगाने रद्द

B, G, H, K, D, F, T व V या आठ व्यक्ती एका संस्थेत अध्यापन करतात. सर्वजण मिळून गणित, फिजिक्स व रसायनविज्ञान शिकवतात आणि ते दिल्ली, मुंबई, कोलकाता, रांची, पटना, भोपाळ, नागपूर आणि हैदराबाद येथून आले आहेत. मात्र ते याच क्रमाने असतील असे नाही. किमान दोन आणि जास्तीत जास्त तीन अध्यापक प्रत्येक विषय शिकवतात. G दिल्लीची व्यक्ती आहे व ती गणित शिकवते. H ही व्यक्ती रांचीची आहे पण ती फिजिक्स शिकवत नाही. हैदराबादची कोणीही व्यक्ती रसायनविज्ञान शिकवत नाही. D ही व्यक्ती रसायनविज्ञान शिकवते. G चा विषय शिकवणारी अन्य एकमेव व्यक्ती कोलकाताची आहे. D व्यक्ती हैदराबादची आहे आणि F ही व्यक्ती मुंबईची आहे. V ही व्यक्ती कोलकाताची नाही आणि D चेच विषय शिकवते. B व T या दोन्ही व्यक्ती रसायनविज्ञान शिकवतात. रसायनविज्ञान शिकवणारी एक व्यक्ती भोपाळची नाही. T ही व्यक्ती नागपूरची नाही. रसायनविज्ञान शिकवणाऱ्या व्यक्तींचा गट निवडा.

  • )BT
  • )BTF
  • )BTK
  • )BHT

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ४८Logical Reasoning

एका मजल्यावरील दोन ओळींत, उत्तरेकडे व दक्षिणेकडे दारे असलेल्या सहा खोल्या P, Q, R, S, T व U यांना दिल्या आहेत. Q ला उत्तर दिशेला दार असणारी खोली मिळाली आहे व तो S चा शेजारी नाही. S आणि U यांच्या खोल्या कर्णरेषांत परस्परविरुद्ध दिशांच्या आहेत. U चा शेजारी R ला, दक्षिणेकडे दार असणारी खोली मिळाली आहे व T ला उत्तरेकडे दार असलेली खोली मिळाली आहे. जर P व T यांनी परस्परांच्या खोल्या बदलल्या तर U च्या शेजारची खोली ताब्यात असणारी व्यक्ती निवडा.

  • )P
  • )Q
  • )T
  • )R✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Logical Reasoning

वरील युक्तिवादातील त्रुटी उत्तम प्रकारे व्यक्त करणारे विधान पुढील पर्यायातून निवडा.

  • )वन्यजीवन पर्यटकांना पारिस्थितिकीच्या संवर्धनात मनापासून स्वारस्य आहे या गृहीतकावर तो आधारित आहे
  • )काही पर्यटकांना धोक्यात आलेल्या प्राण्यांचे निरीक्षण करण्यात स्वारस्य आहे या गृहीतकावर तो आधारित आहे
  • )संवर्धन पर्यटनाच्या केवळ एका यशस्वी उदाहरणावरून सर्वसामान्यीकरणाचा युक्तिवाद केला आहे✓ योग्य
  • )वन्यजीवन पर्यटन हा लोकांना पर्यावरण साक्षर करण्याचा सर्वात उत्तम पोहोचमार्ग आहे या गृहीतकावर तो आधारित आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Quantitative Aptitude

दिलेला प्रश्न व त्यापुढील सामग्री अभ्यासून त्यासंदर्भात उचित पर्याय निवडा. एका विभागातील कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्षे आहे. पुढील वर्षी 10 कर्मचारी निवृत्त झाल्यास कर्मचाऱ्यांचे सरासरी वय काय असेल ? सामग्री : i. सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे. ii. विभागात 50 कर्मचारी आहेत.

  • )केवळ सामग्री i पुरेशी त्याचवेळी सामग्री ii उत्तरासाठी पुरेशी नाही
  • )फक्त सामग्री ii पुरेशी त्याचवेळी सामग्री i उत्तरासाठी पुरेशी नाही
  • )फक्त सामग्री i किंवा ii उत्तरासाठी पुरेशी आहे
  • )दोन्ही सामग्रीची उत्तरासाठी गरज आहे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Quantitative Aptitude

मधू नेहमी 13 रुपये किमतीला एक याप्रमाणे मिळणारे सूप पाकिटे खरेदी करतो. मागच्या आठवड्यात त्याची किंमत प्रत्येकी 11 रुपये इतकी कमी केली म्हणून त्याने 36 पाकिटे खरेदी केली. या आठवड्यात त्यांची विक्री प्रत्येकी 'दोन खरेदी करा, एक फुकट मिळवा' अशी सूट देऊ केली आहे. आताच्या आठवड्यात खरेदी करण्याऐवजी मागच्या आठवड्यात पाकिटे खरेदी केल्यामुळे मधूने मोजलेली जादा रक्कम निवडा.

  • )132 रुपये
  • )84 रुपये✓ योग्य
  • )72 रुपये
  • )60 रुपये

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Logical Reasoning

खाली दिलेल्या आकृतीतील मधली उभी रेषा पुसली तर मूळ आकृतीतील त्रिकोण आणि मधली उभी रेषा पुसल्यानंतर तयार होणाऱ्या आकृतीतील त्रिकोण यांची वजाबाकी किती येते ?

  • )16
  • )06✓ योग्य
  • )10
  • )26

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Quantitative Aptitude

अजय व अतुल हे A ते B पर्यंत अनुक्रमे 17 किमी/तास आणि 19 किमी/तास वेगाने प्रवास करतात. A हा B पासून 72 किमी दूर आहे. अतुल प्रथम B पर्यंत पोहोचून लगेच परतला. आणि C येथे अजयला भेटला. B आणि C मधील अंतर किती आहे ?

  • )10 किमी
  • )4 किमी✓ योग्य
  • )15 किमी
  • )36 किमी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Logical Reasoning

56. प्रवाह तक्ता अभ्यासून आज्ञांचे अर्थ रचा व त्यांचा उपयोग करून दिलेली समस्या सोडवा.

  • )DNHL✓ योग्य
  • )BNHL
  • )BPHL
  • )DPLH

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Marathi Language

वरील परिच्छेदाचा प्रमुख निष्कर्ष उत्तम प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा.

  • )ॲलोपथीव्यतिरिक्त काही उपचार परिणामकारक नाहीत
  • )हेरॉईन आणि कोकेनमुळे जागतिक आरोग्यावर भयंकर परिणाम झाले आहेत
  • )बनावट औषधे बेकायदेशीर औषधांइतकीच धोकादायक आहेत
  • )बनावट औषधांची समस्या हाताळण्यासाठी अधिक वेळ देण्याची प्रयत्न करण्याची गरज आहे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Logical Reasoning

खालील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि अचूक उत्तराचा पर्याय निवडा. M हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल?

  • )Q✓ योग्य
  • )L
  • )O
  • )P

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Logical Reasoning

या प्रश्नात दोन विधाने 1 आणि 2 दिलेली आहेत; त्यानंतर P आणि Q हे दोन निष्कर्ष आहेत. तुम्हाला दोन्ही विधाने खरी मानावयाची आहेत आणि त्यापासून कोणता/कोणते निष्कर्ष निश्चितपणे काढता येतील हे ठरवायचे आहे. तुमचे उत्तर पुढीलपैकी एका पर्यायाद्वारे दर्शवायचे आहे. विधाने : 1. सर्व लिपिक आधुनिक आहेत. 2. काही पुरुष लिपिक आहेत. निष्कर्ष : P. सर्व आधुनिक व्यक्ति पुरुष आहेत. Q. काही पुरुष आधुनिक आहेत.

  • )फक्त P हा निष्कर्ष निघतो / Only conclusion P follows
  • )फक्त Q हा निष्कर्ष निघतो / Only conclusion Q follows✓ योग्य
  • )P आणि Q हे दोन्ही निष्कर्ष निघतात / Both conclusions P and Q follows
  • )P आणि Q यापैकी कोणताही निष्कर्ष निघत नाही / Neither conclusions P and Q follows

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Quantitative Aptitude

वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांची एका दिवसाची मजुरी खाली दिलेली आहे. आशिष हा A गावामध्ये 105 दिवस काम करतो आणि रेणू ही C गावामध्ये 180 दिवस काम करते. कोण जास्त आणि किती कमावते ?

  • )आशिष, रेणूंपेक्षा रु. 2,685 जास्त कमावतो✓ योग्य
  • )रेणू, आशिषपेक्षा रु. 2,685 जास्त कमावते
  • )दोघेही सारखेच कमावतात
  • )रक्कमची तुलना होऊ शकत नाही कारण एका दिवसाची मजुरी ही सारखी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Quantitative Aptitude

आदित 2021 च्या पहिल्या दिवशी 1 रु., दुसऱ्या दिवशी 3 रु. आणि तिसऱ्या दिवशी 5 रु. बचत करतो, व असेच पुढे सुरू ठेवतो. त्या वर्षातील त्याच्या बचतीची एकूण रक्कम शोधा.

  • )रु. 1,33,225✓ योग्य
  • )रु. 1,32,225
  • )रु. 1,23,225
  • )रु. 1,34,225

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Logical Reasoning

देश-भक्त बेटावरचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दोन वाक्यांत देतात. त्यापैकी एक वाक्य नेहमीच खरे असते व दुसरे वाक्य नेहमीच खोटे असते. बेटावर भटकणारा नानू, तीन रहिवाशांना भेटला तेव्हा त्याने त्यांना त्यांच्या प्रादेशिक अन्नपदार्थाबद्दल विचारले तेव्हा त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे होती: अनु : डाळ-खिचडी. आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील आहेत. कनु : आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील नाहीत. आमचे प्रादेशिक अन्न वडापाव आहे. मनू : आमचे बहुसंख्य लोक सर्जनशील आहेत. आमचे प्रादेशिक अन्न डाळभात आहे. देशभक्तचे प्रादेशिक अन्न निवडा.

  • )डाळ-खिचडी
  • )वडापाव✓ योग्य
  • )डाळभात
  • )सर्व तीन पदार्थ प्रादेशिक अन्न आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Logical Reasoning

पुढील पारदर्शक कागद अभ्यासा आणि त्याची उचित एक आयताकार देणारी घडी निवडा.

  • )[Image showing a folded paper with a specific pattern of two filled squares and one empty square in a 2x2 grid]✓ योग्य
  • )[Image showing a folded paper with a specific pattern of one filled square and two empty squares in a 2x2 grid]
  • )[Image showing a folded paper with a specific pattern of two filled squares and one empty square in a 2x2 grid, different from option 1]
  • )[Image showing a folded paper with a specific pattern of one filled square and two empty squares in a 2x2 grid, different from option 2]

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Science

सोबत्तचे चित्र दोन भांड्यांचा उभा छेद दाखवते. खालचे भांडे द्रव ठेवण्यासाठी वापरतात. वरच्या भांड्यातील द्रव स्थिर गतीने खालच्या भांड्यात ते मानेचा तळ भरेपर्यंत गळतो. थोडा वेळ जाऊ दिल्यानंतर पुन्हा वरच्या भांड्यातून खालचे भांडे पूर्ण भरेपर्यंत त्याच स्थिर गतीने द्रव गळतो. या प्रक्रियेचे निरीक्षण करणाऱ्या चार मुलांनी खालच्या भांड्यातील द्रवाची खोली व त्याला लागलेला वेळ यांच्या संबंधातील बदलाची पुढे दाखवलेली आलेखीय प्रतिरूपणे स्वतंत्रपणे तयार केली आहेत. निरीक्षणाच्या सर्वात जवळ असणारा आलेख पुढील पर्यायातून निवडा.

  • )Graph (1)
  • )Graph (2)
  • )Graph (3)✓ योग्य
  • )Graph (4)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Logical Reasoning

सोनूने मागच्या आठवड्यात खर्च केलेल्या हातखर्चातील रकमेची स्वतःच्या संगणकावर नोंद केली. अपघाताने तिची विदा एकत्र झाली आणि आता ती बाजूच्या सारणीत दाखवल्यानुसार दिसते आहे. त्यातील दिवसासमोर लिहिलेली रक्कम बरोबर असेल असे नाही. सोमवार व मंगळवारची एकूण रक्कम रविवार व बुधवारच्या एकूण रकमेपेक्षा जास्त होती हे तिला आठवते आहे. रविवार आणि मंगळवारची एकूण रक्कम सोमवार व बुधवारच्या रकमेपेक्षा जास्त असल्याचीही तिला आठवते आहे. दिलेल्या माहितीच्या संदर्भात एकमेव चुकीचे विधान निवडा.

  • )रविवारची रक्कम सोमवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे
  • )सोमवारची रक्कम मंगळवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे✓ योग्य
  • )मंगळवारची रक्कम बुधवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे
  • )बुधवारची रक्कम रविवारच्या रकमेपेक्षा जास्त आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Polity

महाराष्ट्र सार्वजनिक लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या कलम 21 अन्वये, सरकार ____ साठी पुरेषा निधीचे वाटप करेल.

  • )पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या कल्याणासाठी
  • )पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या वेतनासाठी
  • )पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणासाठी✓ योग्य
  • )वरीलपैकी काहीही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Maharashtra

महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, 2015 अन्वये अपील निकाली काढतांना मुख्य आयुक्त किंवा आयुक्त अ. पदनिर्देशित अधिकारी किंवा प्रथम अपिलीय अधिकारी यांचेवर शास्ती लागू शकतात. ब. त्यांचे वर लादलेल्या शास्ती मध्ये बदल करू शकतात. क. त्यांचे वर लादलेली शास्ती रद्द करू शकतात.

  • )फक्त अ आणि ब खरे आहे / Only a and b are true
  • )फक्त अ आणि क खरे आहे / Only a and c are true
  • )फक्त ब आणि क खरे आहे / Only b and c are true
  • )अ ब क सर्व खरे आहेत / All a b c are true✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Maharashtra

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 ______ या तारखेला अंमलात आला.

  • )15 ऑगस्ट 2015 / 15th August 2015
  • )21 ऑगस्ट 2015 / 21st August 2015
  • )28 ऑगस्ट 2015 / 28th August 2015
  • )28 एप्रिल 2015 / 28th April 2015✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Polity

जर माहिती प्रकट केल्याने साध्य होणारे लोकहित हे संरक्षित हितसंबंधास होणाऱ्या हानीपेक्षा अधिक असेल तर, सार्वजनिक प्राधिकरण, माहिती अधिकार अधिनियम च्या कलम 8(1) अन्वये अपवाद केलेली माहिती पाहण्यास परवानगी देवू शकेल.

  • )विधान बरोबर आहे✓ योग्य
  • )विधान बरोबर आहे परंतु अपीलीय प्राधिकरणाच्या संमतीनंतरच असे करता येईल
  • )विधान बरोबर आहे परंतु मुख्य माहिती आयुक्तांच्या संमतीनंतरच असे करता येईल
  • )वरीलपैकी काहीही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Polity

माहिती अधिकार कायदा, 2005 ने कोणत्या कायद्याची जागा घेतली ?

  • )माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000
  • )माहितीचे स्वातंत्र्य कायदा, 2002✓ योग्य
  • )निर्मूलन कायदा, 2002
  • )वरीलपैकी काहीही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अन्वये केलेला अर्ज फेटाळल्यास अथवा सेवा प्रदान करण्यात विलंब झाल्यास अर्जदार प्रथम अपिलीय प्राधिकाऱ्यांकडे अपील करू शकतो. प्रथम अपिलीय अधिकारी हे

  • )पदनिर्देशित अधिकाऱ्याचे वरिष्ठ असतात
  • )गट 'ब' दर्जा पेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी असतात
  • )गट 'ब' अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जाचे असतात
  • )वरील सर्व बरोबर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Polity

माहिती अधिकार कायदा, 2005 च्या संदर्भात खालील विधानांचे विश्लेषण करा. अ. कोणताही नागरिक माहितीसाठी अर्ज करू शकतो. ब. अर्जदाराला माहितीसाठी कारणे नमूद करावी लागतात. क. मागवलेली माहिती वगळलेल्या बाबींशी संबंधित असू नये. वरीलपैकी चुकीचे विधान/ने ओळखा.

  • )विधाने अ व क चूक आहेत
  • )विधाने ब व क चूक आहेत
  • )फक्त विधान ब चूक आहे✓ योग्य
  • )फक्त विधान क चूक आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Polity

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 नुसार जोड्या लावा. कलम तरतूद अ. 6 i. समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे ब. 12 ii. सद्भावनापूर्वक केलेल्या कृत्यांना संरक्षण क. 21 iii. माहिती मिळण्याकरिता विनंती करणे ड. 26 iv. केंद्रीय माहिती आयोग घटित करणे

  • )iii iv ii i✓ योग्य
  • )iv iii ii i
  • )ii i iii iv
  • )i ii iii iv

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Polity

माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम ______ नुसार जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याविषयी आणि स्वातंत्र्याशी संबंधीत असलेली माहिती मागितली गेली असेल तर ती विनंती अर्ज मिळाल्या पासून ______ तासांच्या आत प्रदान केली जाईल.

  • )5(1), 72
  • )6(1), 60
  • )7(1), 48✓ योग्य
  • )8(1), 84

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Current Affairs

सप्टेंबर 2022 मध्ये भारतीय नौदलात दाखल झालेल्या आय एन एस विक्रांत विषयीच्या पुढील विधानांपैकी सत्य विधाने कोणती ते ओळखा. अ. तिचा आराखडा वॉरशिप डिझाईन ब्युरोने बनवला आहे. ब. तिची बांधणी कोचीन शिपयार्ड लिमिटेड ने केली आहे. क. ती मूळतः रशियन नौदलामध्ये दाखल झाली होती. ड. ती डिझेल टर्बाईन्स आधारे कार्यरत असते.

  • )अ, ब, क, ड / a, b, c, d
  • )अ, क, ड / a, c, d
  • )अ, ब / a, b✓ योग्य
  • )ब, ड / b, d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Current Affairs

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना (पीएमबीजेपी), भारत सरकारच्या ______________ विभागामार्फत सुरु केली गेली आहे.

  • )आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग / Department of Health and Family Welfare
  • )सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग / Department of Social Justice and Empowerment
  • )अन्न प्रक्रिया उद्योग विभाग / Department of Food Processing Industries
  • )फार्मास्युटिकल्स विभाग / Department of Pharmaceuticals✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Geography

केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या पर्यटनाच्या टॅगलाईन्स पुढे दिल्या आहेत, त्यापैकी अयोग्य जोडी कोणती ते ओळखा. अ. दिल्ली - द हब ऑफ नॉर्थ इंडिया ब. लडाख - 99% फन अँड 1% लँड क. लक्षद्वीप - गिव्ह टाईम अ ब्रेक ड. जम्मू आणि काश्मीर - लँड ऑफ हाय पासेस a. Delhi - The Hub of North India b. Ladakh - 99% Fun and 1% Land c. Lakshadweep - Give time a break d. Jammu and Kashmir - Land of High Passes

  • )अ, ब, क, ड✓ योग्य
  • )अ, ब, क
  • )अ, ब
  • )ब, क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Current Affairs

भारतीय ऑलिंपिक संघटनेमार्फत फेब्रुवारी 2018 मध्ये प्योंगचांग येथे भरवण्यात आलेल्या 23 व्या हिवाळी ऑलिंपिक मध्ये 'चेफ डे मिशन' म्हणून पुढीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती ?

  • )आर.के. गुप्ता / R.K. Gupta
  • )हरजिंदर सिंग / Harjinder Singh✓ योग्य
  • )ए.व्ही. नारायण रेड्डी / A.V. Narayan Reddy
  • )मुरलीधरन राजा / Muralidharan Raja

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Science

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने दोन विज्ञान चॅनेल सुरु केले आहे. त्यांची नावे _________ आणि _________ आहे.

  • )विज्ञान प्रसार आणि विज्ञान दर्शन / Vigyan Prasar and Vigyan Darshan
  • )डी डी सायन्स आणि इंडिया सायन्स / DD Science and India Science✓ योग्य
  • )डी डी इनोवेशन आणि डी डी डायरेक्ट / DD Innovation and DD Direct
  • )डी डी सुलभ आणि डी डी दर्शन / DD Sulabh and DD Darshan

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Current Affairs

जोड्या लावा (क्रीडा पुरस्कार, 2018) : 'अ' (वर्गवारी) अ. राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार ब. द्रोणाचार्य पुरस्कार क. अर्जुन पुरस्कार ड. ध्यानचंद पुरस्कार 'ब' (विजेता) i. हिमा दास ii. सत्यदेव प्रसाद iii. विजय शर्मा iv. एस. मिराबाई चानू

  • )iv iii i ii✓ योग्य
  • )iv iii ii i
  • )iii iv i ii
  • )i iii iv ii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Current Affairsआयोगाने रद्द

पुढीलपैकी अयोग्य जोड्या कोणत्या ते लिहा. अ. अमेरिकन नौदल ब. फ्रेंच नौदल क. ओमान नौदल ड. रशियन नौदल i. विजय प्रहार ii. शक्ती iii. नसीम-अल-बहार iv. वरुण

  • )अ, ब, क, ड
  • )अ, ब, ड
  • )ब, क
  • )क, ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ८४Current Affairs

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भेट झाली अ. जी 20 शिखर परिषद 2017 ब. एस सी ओ शिखर परिषद 2017 क. ब्रिक्स शिखर परिषद 2017

  • )फक्त अ, ब
  • )फक्त ब, क
  • )फक्त अ, क
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५History

हैद्राबाद संस्थानाशी संबंधित पुढील विधानांपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? अ. हैद्राबादची स्थापना निजाम-उल्-मुल्क असफ जहा यांनी केली. ब. या संस्थानाची स्वतःची रेल्वे, सैन्य, टपालसेवा आणि हवाई यंत्रणा होती. क. हैद्राबाद संस्थानाच्या भारतातील विलिनीकरणाशी 'ऑपरेशन पोलो' संबंधित आहे. ड. हैद्राबाद संस्थान विलीन करण्यासाठी जी सशस्त्र मोहीम हाती घेण्यात आली तिला 'ऑपरेशन विजय' म्हणण्यात आले.

  • )अ, ब, क, ड
  • )अ, ब, क✓ योग्य
  • )क, ड
  • )अ, क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Quantitative Aptitude

एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 990 चौ.सेमी आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 36 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी काढा

  • )55 सेमी✓ योग्य
  • )27.5 सेमी
  • )110 सेमी
  • )28 सेमी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Quantitative Aptitude

एका व्यक्तीने 4000 रुपयांचे कर्ज 8 हप्त्यांत परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रू जास्त दिले, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता ?

  • )375 रू.
  • )425 रू.
  • )325 रू.✓ योग्य
  • )300 रू.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Quantitative Aptitude

जर √3 = 1.732 असेल तर खालील समीकरणाची किंमत काढा √192 - 1/2 √48 - √75

  • )6.928
  • )5.196
  • )1.732✓ योग्य
  • )3.464

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ९२Quantitative Aptitude

आयताच्या लगतच्या भुजांच्या लांबीचे गुणोत्तर 5:3 आहे व त्या आयताचे क्षेत्रफळ 29.4 चौ. सेमी आहे. तर त्या आयताची लांबी व रुंदी काढा

  • )लांबी = 7 सेमी व रुंदी = 4.2 सेमी length = 7 cm and breadth = 4.2 cm✓ योग्य
  • )लांबी = 4.2 सेमी व रुंदी = 7 सेमी length = 4.2 cm and breadth = 7 cm
  • )लांबी = 7.2 सेमी व रुंदी = 4 सेमी length = 7.2 cm and breadth = 4 cm
  • )लांबी = 4 सेमी व रुंदी = 7.2 सेमी length = 4 cm and breadth = 7.2 cm

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ९३Quantitative Aptitude

3x³ – 8x² + x + 7 या बहुपदीला x – 2 या बहुपदीने संश्लेषक पद्धतीने भागा आणि उत्तर भाज्य = भाजक × भागाकार + बाकी या रूपात लिहा.

  • )3x³ – 8x² + x + 7 = (x – 2) (3x² + 2x + 3) + 1
  • )3x³ – 8x² + x + 7 = (x – 2) (3x² – 2x + 3) + 13
  • )3x³ – 8x² + x + 7 = (x – 2) (3x² + 2x – 3) + 1
  • )3x³ – 8x² + x + 7 = (x – 2) (3x² – 2x – 3) + 1✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Quantitative Aptitude

एका त्रिकोणाच्या बाजू 13 सेमी, 14 सेमी व 15 सेमी, आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा

  • )105 चौ. सेमी
  • )84 चौ. सेमी✓ योग्य
  • )91 चौ. सेमी
  • )21 चौ. सेमी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Quantitative Aptitude

राजुचा पगार अगोदर 10% नी कमी केला व नंतर तेजीमुळे तो 20% नी वाढविला तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली ?

  • )12
  • )9
  • )8✓ योग्य
  • )10

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Quantitative Aptitude

खालील आयतामध्ये Δ AOB ची परिमिती किती ?

  • )8.5 सेमी
  • )17 सेमी
  • )18 सेमी✓ योग्य
  • )34 सेमी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ९७Quantitative Aptitude

एक माणूस आता त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे. 12 वर्षांपूर्वी तो आपल्या मुलाच्या वयाच्या 4 पट वयाचा होता. तर मुलगा आता किती वर्षांचा आहे ?

  • )40
  • )30
  • )45
  • )36✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Quantitative Aptitude

एक काम पूर्ण करण्यासाठी लीनाला 6 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी मीनाला 12 दिवस लागतात तर टीनाला 4 दिवस लागतात. तिघींनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसांत संपेल ?

  • )3 दिवस
  • )2 दिवस✓ योग्य
  • )2.5 दिवस
  • )3.5 दिवस

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Quantitative Aptitude

पाच संख्यांची सरासरी 25 आहे. जर त्यांच्यातील चार संख्या 30, 29, 25 व 20 असतील तर त्यांच्यातील तीन मोठ्या संख्यांची सरासरी किती ?

  • )26
  • )27
  • )28✓ योग्य
  • )29

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2022-clerk-typist-paper-ii