स्पर्धाAI

MPSC गट क २०२१

Technical Assistant Paper II · ९३ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न History

'अभिनव भारत' या संघटनेच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? (अ) अभिनव भारत च्या सभासदांना दांडपट्टा शिकविण्यास इब्राहिम भाई होते. (ब) त्र्यंबक चक्रवर्ती मार्फत शस्त्रास्त्रे मिळविले जात. (क) कोठूर येथील बर्वेवाडा हा संघटनेचा शस्त्रागारच होते. (ड) पुणे हे अभिनव भारताचे 'केंद्र' होते. वरीलपैकी योग्य पर्याय खालील जोडीतून निवडा.

  • )(a) आणि (b) बरोबर
  • )(b) and (d) correct
  • )(c), (b) and (a) correct✓ योग्य
  • )All correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? (अ) ते प्राच्य विद्येचे उत्तम अभ्यासक होते. (ब) त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमले होते. (क) ते हिब्रू, अरबी, फारसी, तुर्की भाषेत निष्णात होते आणि त्यांना चिनी भाषेचे जुजबी ज्ञान होते. (ड) त्यांना संस्कृतचेही ज्ञान होते.

  • )माउंटस्टुअर्ट एलफिन्स्टन
  • )सर विल्यम जोन्स✓ योग्य
  • )फ्रान्स बॉप
  • )अंकेतील दयूपेरॉन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Economy

“परदेशी भांडवलाची गुंतवणूक आणि कायदा व सुव्यवस्था याचे रक्षण, हे भारताच्या विकासाचे प्रमुख साधन आहे.” असे आपल्या अर्थविषयक निबंधात लिहिणारे तंत्र :

  • )(a) जॉन स्टुअर्ट मिल✓ योग्य
  • )(b) अल्फ्रेड मार्शल
  • )(c) दादाभाई नौरोजी
  • )(d) न्या. म.गो. रानडे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

संयुक्त संस्थाने या देशाचा पूर्व-पश्चिम विस्तार अधिक असल्यामुळे येथे वेळेचे कोणते चार पट्टे आहेत ?

  • )ईस्टर्न झोन, सेंट्रल झोन, मिडल झोन व वेस्टर्न झोन
  • )ईस्टर्न झोन, मिडल झोन, सेंट्रल झोन व पॅसिफिक झोन
  • )ईस्टर्न झोन, सेंट्रल झोन, माऊंटन झोन व पॅसिफिक झोन✓ योग्य
  • )ईस्टर्न झोन, मिडल झोन, माऊंटन झोन व पॅसिफिक झोन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Environment

मानव व पर्यावरण या विषयावर संयुक्त राष्ट्राची पहिली परिषद केव्हा आयोजित करण्यात आली होती ?

  • )5 जून 1970
  • )5 जून 1972✓ योग्य
  • )5 जून 1974
  • )5 जून 1976

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

योग्य नकाशाशास्त्रीय तंत्राची निवड ही कोणकोणत्या घटकांच्या आधारे केली जाते ?

  • )गुणात्मक माहिती व संख्यात्मक माहिती
  • )माहितीचे स्वरूप, विश्लेषणाचे प्रकार व नकाशाचा उद्देश✓ योग्य
  • )प्राथमिक माहिती व द्वितीयक माहिती
  • )चिन्हांचा वापर, रंगाचा वापर व अक्षरांचा वापर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार विधान परिषद नष्ट करण्याचा किंवा निर्माण करण्याचा केलेला कायदा हा घटनादुरुस्तीचा कायदा आहे, असे मानले जाणार नाही ?

  • )कलम 169(1)
  • )कलम 169(2)
  • )कलम 169(3)✓ योग्य
  • )कलम 169(4)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Polity

घटक राज्यातील विधान परिषद संदर्भात खालीलपैकी कोणती/कोणत्या जोडी/जोड्या जुळत नाही ? (a) बिहार - 75 (b) महाराष्ट्र - 78 (c) उत्तरप्रदेश - 99 (d) कर्नाटक - 90 पर्यायी उत्तरे: (1) फक्त (b) (2) फक्त (a) आणि (d) (3) फक्त (a), (c) आणि (d) (4) फक्त (c) आणि (d)

  • )Only (b)
  • )Only (a) and (d)
  • )Only (a), (c) and (d)
  • )Only (c) and (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Polity

महाराष्ट्रात विधानसभा सदस्यांमार्फत विधान परिषदेवर किती सदस्य निवडले जातात ?

  • )31 सदस्य
  • )21 सदस्य
  • )7 सदस्य
  • )यापैकी नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Current Affairs

'मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स' या संकेतस्थळावर 13 जागतिक नेत्यांच्या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे 43 टक्के रेटिंगसह ________ क्रमांकावर आहेत.

  • )आठव्या
  • )बाराव्या
  • )दहाव्या
  • )सहाव्या✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Environment

भारतीय हवामानशास्त्र खात्याकडून विविध 'रंगांची' चेतावणी जाहीर होते त्याविषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

  • )हवामानाविषयी चेतावणी देण्यासाठी पाच विविध रंगांचा वापर केला जातो.
  • )निळ्या रंगाचा इशारा म्हणजे तातडीने कोणत्याही कृतीची गरज नाही.
  • )लाल रंगाचा इशारा म्हणजे पहा आणि सद्यस्थितीचा आढावा घेत रहा.
  • )हिरवा रंग म्हणजे कोणत्याही कृतीची गरज नाही.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Current Affairs

अजोड निसर्ग सौंदर्य आणि दोन देशातील कमी अंतर यामुळे 'भूतान' हा चिमुकला देश भारतातील पर्यटकांसाठी नेहमीच खुणावत असतो. परंतु, या देशात प्रवेश करण्यासाठी ________ या महिन्यापासून प्रत्येकी ₹ 1,200 आकारण्यात येणार आहेत.

  • )मे 2020
  • )जुलै 2020✓ योग्य
  • )जून 2020
  • )नोव्हेंबर 2020

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Logical Reasoning

सोचा-करो बेटावरचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दोन वाक्यांत देतात - त्यापैकी एक वाक्य नेहमीच खरे असते व दुसरे वाक्य नेहमी खोटे असते. बेटावर भटकणाऱ्या नीनाला, एक वकील, एक अध्यापक, आणि एक निवृत्त असे तीन रहिवासी भेटले. कोण कोण आहे या संबंधाने नीनाने प्रश्न विचारले तेव्हा त्यांचे प्रतिसाद पुढीलप्रमाणे होते. डोलू : मी शिक्षक नाही. कोलू शिक्षक नाही. मालू : डोलू वकील नाही. कोलू शिक्षक आहे. कोलू : डोलू निवृत्त नाही. मी शिक्षक नाही. पर्यायांतून सत्य विधान निवडा.

  • )कोलू शिक्षक आहे✓ योग्य
  • )डोलू निवृत्त आहे
  • )मालू वकील आहे
  • )वरील तीनपैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Polity

ज्या वेळी ताकदीच्या राजकीय नेतृत्वाचा उदय होण्याची शक्यता नसते तेव्हा काही देशांत लष्कराकडून क्रांती घडवून सत्ता ताब्यात घेतली जाण्याची शक्यता असते. डाव्या विचारांचे विद्यार्थी गट किंवा श्रमिकांच्या संघटना या विरुद्ध क्रांती घडवून पाहतात परंतु लष्कराची सत्ता ताकदीची असल्यामुळे स्वतःचे कायदे वापरून तसे घडू दिले जात नाही. लष्करी शासन आणि राजकारणामधून सत्तेची माघार याचा संबंध समाजाच्या राजकीय विकासाच्या पातळीशी असतो. राजकीय विकासाच्या संदर्भात वरील युक्तिवादाचे गृहीतक निवडा.

  • )लष्कर राजकीय पोकळी भरून काढते✓ योग्य
  • )विकासासाठी लष्करी शासन आहे
  • )विकासासाठी राजकीय नेतृत्व हा परिणामकारक पर्याय नाही
  • )वरीलपैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Logical Reasoning

पाच मित्र P, Q, R, S आणि T गोव्यातून स्वतंत्रपणे पाच शहरांसाठी प्रवास करतात. म्हणजे - चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मंगळूर आणि वाहतुकीच्या विविध साधनांनी म्हणजे बस, ट्रेन, विमान, कार आणि बोट. दिल्लीसाठी प्रवास केलेल्या व्यक्तीने बोटीचा वापर केलेला नाही. R ने मंगळूरला कारने प्रवास केला आणि S ने बोटीने प्रवास केला. Q ने कोलकातासाठी विमानाने प्रवास केलेला आहे आणि T ने ट्रेनने प्रवास केला. दिल्ली आणि चेन्नई गोव्याशी बसमार्गाने जोडलेले नाही. खालीलपैकी कोणती ठिकाणे व वाहतूक यांचे संयोजन खरे आहे?

  • )कोलकाता - बस
  • )दिल्ली - विमान
  • )मंगळूर - ट्रेन
  • )चेन्नई - बोट✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Logical Reasoning

प्रगत देशांत आरोग्य सेवांसाठी पुरवल्या जाणाऱ्या आर्थिक पातळीचा त्यांच्या लोकसंख्येच्या आरोग्यावर फारच थोडा परिणाम होतो असे सांख्यिकी विश्लेषण दाखवून देते. जरी काही देश दरडोई सहापट जास्त खर्च करतात आणि काही फक्त याच्या निम्मे खर्च करतात तरी त्यांच्या लोकसंख्येचे आयुर्मान जवळपास सारखेच आहे. यामुळे लोकांचे आरोग्य दरडोई खर्च केलेल्या पैशांच्या पुरवठ्यावर अवलंबून असते असे म्हणणे निरर्थक आहे. या युक्तिवादासंदर्भातील आधारभूत गृहीतक निवडा.

  • )लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी देशाने दरडोई अर्थपुरवठा वाढवायला हवा.
  • )लोकांचे आरोग्य त्यांच्या आयुर्मानातून निर्देशित केले जाते.✓ योग्य
  • )दरडोई अर्थपुरवठ्याचे प्रमाण हा देशातील लोकांच्या आरोग्याचा उचित निर्देशक नाही.
  • )लोकांचे आयुर्मान वाढवण्यासाठी परिणामकारक आरोग्य सेवा प्रणाली विकसित करणे ही देशाच्या प्रशासनाची जबाबदारी आहे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Logical Reasoning

स्तंभ I हे अंकांच्या संकेतात केलेले आहे ते स्तंभ II मध्ये लिहिलेले आहेत. पण अंकाचा क्रम हा वेगळा आहे. अक्षरांचा योग्य क्रम ओळखा. LJN या शब्दाचा अंक संकेत काय आहे?

  • )713
  • )910✓ योग्य
  • )610
  • )817

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Quantitative Aptitude

'A' हा वर्तुळाकार क्षेत्राभोवती एक फेरी प्रति तास या वेगाने फिरतो. तर 'B' त्याभोवती तासाला 6 फेऱ्या या वेगाने फिरतो. ते एकाच बिंदूपासून त्याचदिशेने सकाळी 7:30 वाजता फिरणे सुरू करतात. ते प्रथम एकमेकांना केव्हा ओलांडतील?

  • )सकाळी 8:30 वाजता
  • )सकाळी 8:10 वाजता
  • )सकाळी 7:48 वाजता
  • )सकाळी 7:42 वाजता✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Quantitative Aptitude

A व B यांनी X या ठिकाणापासून Y या ठिकाणापर्यंत बसने प्रवास करण्याचे ठरवले. A जवळ 10 रुपये आहेत आणि ही रक्कम दोन व्यक्तींच्या बस दराच्या 80%आहे असे A च्या लक्षात आले. स्वतःकडे 3 रुपये असल्याचे B ला आढळले आणि त्याने ती रक्कम A कडे सोपवली. या संदर्भात पर्यायांतून योग्य विधान निवडा.

  • )A ला 2 तिकिटे घेण्यासाठी अजूनही 2 रुपयांची गरज आहे.
  • )2 तिकिटे खरेदी केल्यानंतर A कडे 50 पैसे शिल्लक राहिले.✓ योग्य
  • )आता A कडे तिकिटे खरेदी करण्यासाठी नेमकी रक्कम आहे.
  • )आता A कडे असलेले पैसे दोन तिकिटे खरेदी करण्यासाठी पुरेसे नाहीत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Logical Reasoning

A$B चा अर्थ A, B चे वडील आहेत; A#B चा अर्थ A, B ची बहीण आहे; A*B चा अर्थ A, B ची मुलगी आहे आणि A@B चा अर्थ A, B चा भाऊ आहे. M, Q ची बायको आहे हे दर्शवणारा पर्याय निवडा.

  • )Q$R#T@M
  • )Q$R@T#M
  • )Q$R*T#M
  • )Q$R@T*M✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Quantitative Aptitude

7:3 असे कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापकाशी प्रमाण असलेल्या एका कारखान्यातील 70% कर्मचारी व 30% व्यवस्थापक कॅन्टीन मध्ये जेवण घेतात. तर कॅन्टीन मध्ये जेवण घेणाऱ्यांचे एकूण प्रमाण किती % आहे?

  • )100%
  • )58%✓ योग्य
  • )95%
  • )45%

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Quantitative Aptitude

एका स्पर्धा परीक्षेत ऋण गुणदान आहे. एका प्रश्न बरोबर सोडवल्यास 5 गुण तर एक प्रश्न चुकीचा सोडवल्यास – 2 गुण मिळतात. रोहितने 50 प्रश्न सोडवले त्याला 145 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले ?

  • )13
  • )15
  • )35✓ योग्य
  • )45

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Logical Reasoning

वार्षिक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सहभागी झालेले एकूण 32 संघ 8 गटांच्या 4 भागात विभागले. प्रत्येक गटातील सर्व संघ एकदा एकमेकांबरोबर खेळतात. नंतर गट विजेते बाद फेरी, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी अशी प्रगती करतात. थोडक्यात सर्व संघ किमान 3 सामने खेळतात. त्याचवेळी अंतिम सामन्यात उतरलेले दोन संघ सहा सामने खेळतात. विजेत्या संघाला चषक देण्याबरोबरच स्पर्धेच्या दरम्यान सर्वात जास्त सरासरी गोल करणाऱ्या संघालाही पारितोषिक दिले जाते. गतवर्षी चक्रवाता संघाने 4.75 ही सरासरी गाठून 'उच्च सरासरी पारितोषिक' जिंकले. गत वर्षाच्या चक्रवाता संघाच्या प्रगतीचे वर्णन करणारा पर्याय निवडा.

  • )फक्त पहिल्या फेरीपर्यंत
  • )फक्त उपांत्यपूर्व फेरीपर्यंत
  • )फक्त उपांत्य फेरीपर्यंत✓ योग्य
  • )अंतिम फेरीत पोहोचला

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Logical Reasoning

N हा वर्गात 5 व्या क्रमांकावर आहे. S हा शेवटच्या क्रमांकावरून 8 वा आहे. जर T हा N नंतर सहावा आणि N आणि S च्या मध्यभागी असेल, तर वर्गात किती विद्यार्थी आहेत?

  • )23
  • )24✓ योग्य
  • )25
  • )26

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Quantitative Aptitude

जर 14 मजूर रोज 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात तर 8 मजूर रोज 7 तास काम करून किती खेळणी बनवतील?

  • )12
  • )14✓ योग्य
  • )16
  • )18

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Logical Reasoning

शिशुवर्गात 50 विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी फक्त इंग्रजी बोलतात आणि काही फक्त हिंदीतून संवाद साधतात. 10 विद्यार्थी या दोन्ही भाषांतून अस्खलितपणे संवाद साधतात. जर इंग्रजीत संवाद साधणाऱ्यांची संख्या 21 असेल तर अनुक्रमे हिन्दी बोलणाऱ्यांची, फक्त हिन्दी बोलणाऱ्यांची व फक्त इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.

  • )अनुक्रमे 21, 11 व 29
  • )अनुक्रमे 27, 18 व 22
  • )अनुक्रमे 37, 27 व 13
  • )अनुक्रमे 39, 29 व 11✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Environment

पर्यावरण संवर्धनासाठी जलवायूमान बदलाचे परिणाम कमी करण्यात सर्वसाधारण लोकांना स्वारस्य असते. परंतु वायुमान बदलाला प्रतिसाद देऊन पर्यावरणाची काळजी घेण्याऐवजी मानव प्रजाती टिकवून ठेवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. पृथ्वी ग्रहाच्या दहा हजार वर्षांच्या इतिहासानुसार तापमानाचे सापेक्ष स्थैर्य दुर्मिळ होते. निसर्ग सातत्याने मोठ्या तापमान बदलांशी जुळवून घेत होता. परंतु हवामान विश्वासार्ह आणि अटकळ बांधण्याजोगा असतानाच्या कालखंडादरम्यान मानव संस्कृती उत्क्रांत होत होत्या. निसर्ग सतत बदलत राहतो पण मानव संस्कृतीवर हवामान बदलाचा घातक परिणाम होईल. दिलेल्यापैकी वरील युक्तिवादाच्या मुख्य निष्कर्षाची उचित अभिव्यक्ती करणारा एक पर्याय निवडा.

  • )लोक पर्यावरण संवर्धनासाठी हवामान बदल धोरणांना प्रतिसाद देतात.
  • )निसर्गापेक्षा मानव प्रजातीला तगवण्यासाठी हवामान बदलाचे व्यवस्थापन करणे अधिक महत्त्वाचे आहे.✓ योग्य
  • )आता पर्यंत मानव संस्कृती मोठ्या हवामान बदलाला सामोऱ्या गेलेल्या नाहीत.
  • )निसर्ग जुळवून घेण्याचा मार्ग शोधेल परंतु हवामान बदलांचा मानवांवर फार त्रासदायक परिणाम होईल.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Logical Reasoning

जर A × B चा अर्थ A, B च्या दक्षिणेला आहे; A + B चा अर्थ A, B च्या उत्तरेला आहे; A % B चा अर्थ A, B च्या पूर्वेला आहे; A – B चा अर्थ A, B च्या पश्चिमेला आहे; तर 'P % Q + R – S', Q च्या संदर्भात S ची दिशा निवडा.

  • )ईशान्य
  • )वायव्य
  • )नैऋत्य
  • )आग्नेय✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Logical Reasoning

पुढे दिलेल्या युक्तिवादापाठोपाठच्या तत्वाचे सर्वात उत्तम विवरण दिलेल्या पर्यायांमधून निवडा. जरी काही वाहन मालक फक्त 200 किमी आणि काही 2000 किमी रस्ता वापरतात तरी सर्वजण सारखाच रस्ताकर भरतात. हे न्याय्य नाही. महसूल मिळवण्यासाठी रस्ताकर रद्द करून इंधनावरील कर वाढवण्याची गरज आहे. या करप्रणालीमुळे जास्त प्रमाणात रस्ता वापरणारे खात्रीने जास्त पैसे भरतील. ही न्याय्य प्रणाली आहे आणि ती अधिक महसूल मिळवायला मदत देईल.

  • )दूरदर्शन वाहिन्या पाहणाऱ्या लोकांना त्या वाहिन्यांना त्यांची वर्गणी भरायला लावली पाहिजे म्हणजे फक्त त्या वाहिन्या पाहणाऱ्यांनाच पैसे मोजावे लागतील.✓ योग्य
  • )फक्त पैसे देणे शक्य होत नसेल तरच मुलींना विनामूल्य शिक्षण मिळायला हवे.
  • )विश्रांतीगृह मालकांनी घरगुती ग्राहकांपेक्षा जास्त पाणीपट्टी मोजली पाहिजे कारण प्रणाली वापरून ते नफा मिळवतात.
  • )वैद्यकीय उपचारांसाठी पगारी लोकांनी रोजंदारी करणाऱ्यांपेक्षा जास्त शुल्क मोजायला हवे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Quantitative Aptitude

8 वर्षांपूर्वी नेहा व रेखा यांच्या वयांचे गुणोत्तर 2 : 5 होते आज त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 2 आहे. तर नेहाचे आजचे वय किती ?

  • )20 वर्षे
  • )22 वर्षे
  • )25 वर्षे
  • )24 वर्षे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ३७Quantitative Aptitude

जर एका वर्तुळात विशालकंसाचे माप हे त्याच्या लघुकंसाच्या मापाच्या पाचपटीपेक्षा 48° ने अधिक आहे तर त्याच्या विशालकंसाचे माप किती ?

  • )52°
  • )308°✓ योग्य
  • )312°
  • )132°

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Quantitative Aptitude

दोन संख्यांची बेरीज 85 आहे व त्यांची वजाबाकी 15 आहे तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती ?

  • )10 : 7✓ योग्य
  • )5 : 3
  • )27 : 5
  • )5 : 1

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Quantitative Aptitude

एक ₹ 4,000 किमतीची वस्तु 10% सुट देवून विकल्यास आलेल्या किमतीवर मंदीमुळे परत 5% सुट दिली तर त्या वस्तुची विक्री किंमत किती ?

  • )₹ 3,420✓ योग्य
  • )₹ 3,500
  • )₹ 3,600
  • )₹ 3,400

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Quantitative Aptitude

सोडवा: $\frac{(x^2-y^2)(x^2+2xy+y^2)}{(x+y)^3} = ?$

  • )$x-y$✓ योग्य
  • )$x+y$
  • )$x^2-y^2$
  • )$x^2+y^2$

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ४२Quantitative Aptitude

जे काम संजू 45 दिवसात करतो तेच काम राजु 30 दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील ?

  • )15
  • )18✓ योग्य
  • )22
  • )20

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Quantitative Aptitude

रमेशला कापडाच्या ₹ 1650 बिलावर 14% सुट मिळाली तर ते कापड त्याला केवढ्यास मिळाले?

  • )₹ 1485
  • )₹ 1376
  • )₹ 1419✓ योग्य
  • )₹ 1353

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Quantitative Aptitude

एका दुकानदाराने 18 शर्ट ₹ 2,800 ला विकल्यास ₹ 80 तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती ?

  • )₹ 150
  • )₹ 140
  • )₹ 160✓ योग्य
  • )₹ 180

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Quantitative Aptitude

एक नैसर्गिक संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 असेल तर ती संख्या कोणती ?

  • )7✓ योग्य
  • )8
  • )9
  • )3

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Logical Reasoning

एका 70 व्यक्तींच्या गटात, 28 व्यक्ती फक्त चहा पितात, 32 व्यक्ती चहा व दूध पितात. तर फक्त दूध पिणाऱ्यांची संख्या किती ?

  • )12
  • )10✓ योग्य
  • )14
  • )38

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Quantitative Aptitude

सार्थकने ₹ 3.25 प्रति समोसाप्रमाणे 60 समोसे खरेदी केले. जर त्याने त्याऐवजी ₹ 39 प्रति कि.ग्रॅ. प्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती मिठाई मिळाली असती ?

  • )2 कि.ग्रॅ.
  • )5 कि.ग्रॅ.✓ योग्य
  • )500 ग्रॅम
  • )4 कि.ग्रॅ.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Quantitative Aptitude

जर 7/8, 5/9, 3/5, 1/4 आणि 1/3 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकांची बेरीज किती ?

  • )2/3
  • )9/8✓ योग्य
  • )29/24
  • )5/13

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ५१Quantitative Aptitude

एका दुकानदाराने वस्तूंच्या किमती शेकडा 15 ने वाढवून लिहिलीया आणि त्या किमतीवर शेकडा 5 सुट दिली तर त्याला शेकडा नफा किती झाला ?

  • )9%
  • )9.25%✓ योग्य
  • )9.50%
  • )9.75%

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Quantitative Aptitude

दोन वर्षांपूर्वी पेट्रोलचा दर प्रति लिटर ₹ 90 होता आणि यावर्षी तो प्रतिलिटर ₹ 120 झाला. तर पेट्रोलच्या दरात शेकडा वाढ किती ?

  • )33.33✓ योग्य
  • )66.66
  • )25
  • )35

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Polity

माहिती अधिकार कायदा 2005 नुसार प्रथम अपिलीय अधिकारी यांनी प्रथम अपीलाचा निर्णय किती दिवसात द्यावा ? (a) 30 दिवसात (b) अपवादात्मक परिस्थितीत, कारणे नोंदवून 45 दिवसात (c) अशी कोणतीही कालमर्यादा या कायद्यात दिलेली नाही पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a)
  • )फक्त (c)
  • )(a) आणि (b) खरे आहेत✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Polity

माहितीचा अधिकार 2005 प्रमाणे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण हा अधिनियम अधिनियमीत झाल्यापासून ________ दिवसाच्या आत आपली संस्था, कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील प्रसिद्ध करील आणि त्यानंतर दरवर्षी ती प्रकाशने अद्ययावत करील.

  • )30
  • )60
  • )90
  • )120✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Polity

माहिती अधिकार कायदा 2005 चा मुख्य उद्देश आहे : (a) शासकीय कामात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यास प्रोत्साहन देणे. (b) शासकीय कार्यालयावर नियंत्रण ठेवण्याचे अमर्याद अधिकार नागरिकांना देणे. (c) शासकीय कार्यालयाच्या कामात हस्तक्षेप करण्याचे मर्यादित अधिकार नागरिकांना देणे. (d) भ्रष्टाचारावर अंकुश लावणे. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (b) आणि (c) बरोबर / Only (b) and (c) are right
  • )फक्त (a) आणि (d) बरोबर / Only (a) and (d) are right✓ योग्य
  • )सर्व बरोबर आहेत / All are right
  • )वरील पैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Polity

माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती जेथे व्यक्तीच्या जीवीत अथवा स्वातंत्रेशी संबंधित असेल, ती माहिती विनंती अर्ज प्राप्त झाल्यानंतर ______ च्या आत देण्यात यावी.

  • )72 तास / 72 Hours
  • )48 तास / 48 Hours✓ योग्य
  • )24 तास / 24 Hours
  • )36 तास / 36 Hours

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Polity

माहिती अधिकार कायदा 2005 च्या कक्षेतून वगळली असल्याने खालील कोणती संस्था या कायद्याअंतर्गत येत नाही ? (a) अंमलीपदार्थ विरोधी यंत्रणा (b) राज्याने निर्मित कोणतेही विद्यापीठ (c) केंद्राने निर्मित कोणतेही विद्यापीठ पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (b) आणि (c) / Only (b) and (c)
  • )फक्त (a) / Only (a)✓ योग्य
  • )(a), (b), (c) पैकी कोणतीही नाही / None of (a), (b), (c)
  • )(a), (b), (c) हे सर्व / All among (a), (b), (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Science

माहिती व तंत्रज्ञान विभागाने भारत सरकारच्या संकेतस्थळासाठी जी नियमावली तयार केली त्यास ______ नॉर्म असे म्हणतात.

  • )डब्ल्यू.एन.जी.डब्ल्यू. / WNGW
  • )एन.एफ.जी.डब्ल्यू. / NFGW
  • )डब्ल्यू.आय.जी.डब्ल्यू. / WIGW
  • )जी.आय.जी.डब्ल्यू. / GIGW✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Current Affairs

"डिजिटल इंडिया" मुव्हमेंट मध्ये सर्व ए.पी.एम.सी. मार्केटना जोडणारी व सर्वांना सर्व माहिती देणारी पोर्टल या नावे ओळखले जाते.

  • )इ-ए.पी.एम.सी. / E-APMC
  • )इ-नाम / e-Nam✓ योग्य
  • )आय-ए.पी.एम.सी. / i-APMC
  • )आय-मार्केट / i-market

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Science

मिडीया लॅब एशियाची शैक्षणिक क्षेत्राला मदत देणारी ही सिस्टीम आहे.

  • )धारा / Dhara
  • )जीवनदीप / Jeevandeep
  • )सहायिका / Sahayika✓ योग्य
  • )इ-सिस / E-sys

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Science

सी डॅक ने तयार केलेले वेब बेस "पॉवर मॉनिटरिंग अण्ड कंट्रोलिंग टूल" ज्यामुळे जास्तीत जास्त वीज वाचवून वापर केला जातो त्यास म्हणतात.

  • )ए-मॅक / A-MAC
  • )डी-मॅक / D-MAC
  • )पी-मॅक / P-MAC✓ योग्य
  • )एम-मॅक / M-MAC

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७History

भारतात विम्याची औपचारिक सुरुवात कोणत्या शतकात झाली?

  • )अठराव्या शतकात
  • )सोळाव्या शतकात
  • )एकोणिसाव्या शतकात✓ योग्य
  • )विसाव्या शतकात

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Economy

खालील विधाने खरी आहेत किंवा खोटी याची उत्तरे द्या. (a) पुनर्वमा बाजारात प्राथमिक विमाकर्ता कंपनीला “ceding company” म्हणतात. (b) प्राथमिक विमाकर्त्याने वितरीत केलेली जोखीम पुनर्वमाकर्ता स्वीकारतो.

  • )फक्त (a) खरे
  • )फक्त (b) खरे
  • )(a) आणि (b) दोन्ही खरे✓ योग्य
  • )(a) आणि (b) दोन्ही खोटे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Economy

खालीलपैकी कोणती कार्ये IRDA ची आहेत ? (a) विमा कंपन्यांद्वारे केलेल्या निधीच्या गुंतवणुकीचे नियमन करणे (b) सॉल्व्हन्सी मार्जिनच्या देखभालीचे नियमन करणे

  • )फक्त (a)
  • )फक्त (b)
  • )(a) आणि (b) दोन्ही✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Economy

खालीलपैकी कोणता पुनर्विमा करार नाही ?

  • )वैकल्पिक पुनर्विमा करार
  • )अतिरिक्त पुनर्विमा करार
  • )मूलभूत पुनर्विमा करार✓ योग्य
  • )वाटा पुनर्विमा करार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Economy

विमा कंपन्यांचा महसूल कोठून येतो ? (1) विमाधारकाने भरलेला विमाहप्ता (2) विमा कंपनीने केलेल्या गुंतवणुकीवरील व्याजाचे उत्पन्न (3) विमा कंपनीने केलेल्या गुंतवणुकीवरील लाभांशाचे उत्पन्न (4) वरील सर्व

  • )विमाधारकाने भरलेला विमाहप्ता
  • )विमा कंपनीने केलेल्या गुंतवणुकीवरील व्याजाचे उत्पन्न
  • )विमा कंपनीने केलेल्या गुंतवणुकीवरील लाभांशाचे उत्पन्न
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Quantitative Aptitude

धोक्याची संभाव्यता अंशतः अवलंबून असेल, (a) धोका किती वारंवारतेने येऊ शकतो. (b) त्याचा प्रभाव किती गंभीर असू शकतो. पर्यायी उत्तरे : (1) फक्त (a) बरोबर आहे (2) फक्त (b) बरोबर आहे (3) दोन्ही बरोबर आहेत (4) दोन्ही चुकीचे आहेत

  • )फक्त (a) बरोबर आहे
  • )फक्त (b) बरोबर आहे
  • )दोन्ही बरोबर आहेत✓ योग्य
  • )दोन्ही चुकीचे आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ७४Economy

अधिकार आणि दायित्वे हस्तांतरित करणारा पॉलिसीधारक ______ म्हणून ओळखला जातो.

  • )अभिहस्तांकनकर्ता / assignor✓ योग्य
  • )अभिहस्तांकिती / assignee
  • )अभिहस्तांकन / assignment
  • )नामनिर्देशिक / nominatorer

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Economy

खालीलपैकी विमा बाजाराचा कोण सदस्य नाही?

  • )आय.आर.डी.ए. / I.R.D.A.
  • )टी.पी.ए. / T.P.A.
  • )एम.एम.आर.डी.ए. / M.M.R.D.A.✓ योग्य
  • )सर्वेक्षक / Surveyors

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Economy

IRDA ही एक : (a) उद्योगावर नजर ठेवणारी (b) विमा नियामक (c) परवाना प्राधिकरण पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) बरोबर आहे
  • )(b) आणि (c) बरोबर आहेत
  • )(a) आणि (b) बरोबर आहेत
  • )वरील सर्व बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Economy

भारतामध्ये जीवन विमा व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान किती भांडवल आवश्यक आहे?

  • )₹ 25 कोटी
  • )₹ 50 कोटी
  • )₹ 75 कोटी
  • )₹ 100 कोटी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Economy

पिक विम्यामध्ये खालील कुठल्या अपरिहार्य परिस्थितीत विमा संरक्षण प्रदान करण्यात येते? (a) हवामान कारणे जसे की - दुष्काळ, पूर, चक्रीवादळ (b) कीटक संसर्ग (c) वनस्पती रोग (d) दंगली आणि स्ट्राइक पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a)
  • )(a) आणि (b)
  • )(a), (b) आणि (c)
  • )सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Economy

सार्वजनिक दायित्व विमा प्रकारामध्ये खालीलपैकी कोणत्या घटना मोडतात ?

  • )अपघाती मृत्यू / Accidental death
  • )शारीरिक इजा / Physical injury
  • )विमाधारकाच्या हलगर्जीपणामुळे तृतीय पक्षांच्या मालमत्तेस झालेले नुकसान / Damage to third party property due to negligence of the insured
  • )वरील सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Economy

हा पॉलिसीधारक आहे जो पॉलिसीचे शीर्षक हस्तांतरित करतो.

  • )नेमणूक झालेला / Assignee
  • )नामनिर्देशित व्यक्ती / Nominee
  • )नेमणूक करणारा / Assignor✓ योग्य
  • )पात्रवाहक / Consignee

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Polity

मनी लॉन्डरींग प्रतिबंधक कायदा, 2002 पासून अंमलात आला.

  • )1 जुलै 2005 / 1st July 2005✓ योग्य
  • )1 सप्टेंबर 2005 / 1st Sept. 2005
  • )1 जानेवारी 2000 / 1st Jan. 2000
  • )1 जून 2003 / 1st June 2003

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polity

सार्वजनिक तक्रारींचे निवारण नियम 1998 मुळे ही प्रणाली तयार झाली :

  • )विमा एजन्सी / Insurance agency
  • )विमा लोकपाल / Insurance ombudsman✓ योग्य
  • )राज्य आयोग / State commission
  • )ग्राहक मंच / Consumer forum

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Polity

कलम 41 चा तरतुदीचे पालन करण्यात कोणतीही चूक करणारी व्यक्ती या दंडास पात्र ठरू शकते.

  • )₹ 100
  • )₹ 500✓ योग्य
  • )₹ 1000
  • )₹ 5000

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Economy

चे तत्व विमाधारकाला एका पेक्षा अधिक विमा कंपनीकडे विमा करून नफा न मिळण्याची खात्री करते.

  • )योगदान✓ योग्य
  • )सहविमा
  • )नुकसान भरपाई
  • )विशेष सरासरी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Polity

खालीलपैकी कोणाचे अधिकार इतर तिघांपेक्षा वेगळे आहेत?

  • )जिल्हा मंच
  • )राज्य आयोग
  • )राष्ट्रीय आयोग
  • )कायदा आयोग✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Economy

अर्थव्यवस्थेच्या बदलांच्या परिणामांमुळे आलेली जोखीम :

  • )स्थिर धोका
  • )सट्टा
  • )गतिमान धोका✓ योग्य
  • )शुद्ध धोका

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Economy

जीवन विमामध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या SA चा विस्तारीत फॉर्म निवडा.

  • )विमा रक्कम (Sum Assured)✓ योग्य
  • )पूरक आश्वासन (Supplementary Assurance)
  • )मुद्रांक कायदा (Stamp Act)
  • )वाचलेल्यांची वार्षिकी (Survivors Annuity)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Economy

भारतात, विमा कंपन्या विमाहप्ता गोळा करतात. (a) आगाऊ, गटात सदस्यांच्या प्रवेशाच्या वेळी (b) गोळा केलेल्या विमाहप्त्यामधून एक फंड तयार केला जातो आणि नुकसान झालेल्या सदस्यांच्या दाव्यांचा निपटारा करण्यासाठी वापरला जातो. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) बरोबर आहे
  • )फक्त (b) बरोबर आहे
  • )(a) आणि (b) दोन्हीही बरोबर आहेत✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Maharashtra

महाराष्ट्र शासनाने शासकीय विमा निधीच्या व्यवस्थापनासाठी दि. ______ रोजी स्वतंत्र विमा संचालनालयाची स्थापना केली.

  • )1 जुलै 1972
  • )1 सप्टेंबर 1972✓ योग्य
  • )1 जुलै 1971
  • )1 सप्टेंबर 1971

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Maharashtra

विमासंचालनालयाचे उपसंचालक यांना अहवाल देतात :

  • )संचालक
  • )सहसंचालक✓ योग्य
  • )आहरण व संवितरण अधिकारी
  • )वरीलपैकी नाही.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Economy

शासकीय विमा निधी खालील विभागास विमा सेवा पुरवते, (a) राज्य सरकारी विभाग (b) निमशासकीय विभाग (c) राज्य वैधानिक संस्था (d) मंडळे किंवा संस्था ज्यामध्ये सरकारचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) बरोबर / Only (a) is true
  • )फक्त (a), (b) आणि (d) बरोबर / Only (a), (b) and (d) is true
  • )फक्त (a) आणि (b) बरोबर / Only (a) and (b) is true
  • )वरील सर्व (a), (b), (c) आणि (d) बरोबर / All above (a), (b), (c) and (d) is true✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2021-technical-assistant-paper-ii