स्पर्धाAI

MPSC गट क २०२१

Industry Inspector Paper II · ८९ प्रश्न · रद्द ५ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Current Affairs

"राष्ट्रीय आरोग्य धोरण" (NHP) हे 15 वर्षांच्या कालावधी नंतर _________ मध्ये पुन्हा सुरु करण्यात आले.

  • )2010
  • )2020
  • )2017✓ योग्य
  • )2019

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

युनायटेड स्टेट्सच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रथम ब्लॅक महिला न्यायाधीश कोण आहेत ?

  • )केट्टी ऑरेंज जॅक्सन
  • )केटंजी ब्राउन जॅक्सन✓ योग्य
  • )एमिली ब्राउन जॅक्सन
  • )डॉली ऑरेंज जॅक्सन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

नुकतेच बातम्यात झळकलेल्या राखीगढी ह्या गावामध्ये हडप्पा संस्कृतीचे अवशेष आढळूण आले. हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?

  • )मध्य प्रदेश
  • )पंजाब
  • )हरियाणा✓ योग्य
  • )गुजरात

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

ब्लू पॅसिफिक उपक्रम इतक्यात बातम्यामधे होता. त्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही ?

  • )हा उपक्रम जून 2022 मध्ये जाहिर करण्यात आला.
  • )हा उपक्रम पॅसिफिकमध्ये 'समृद्धी, लवचिकता व सुरक्षा' वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतो.
  • )हा उपक्रम प्रदेशातील आर्थिक व कुटनीतिक संबंधाना चालना देतो.
  • )हा उपक्रम चीनने सुरु केला आहे.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

'आयुष्मान भारत डिजिटल मिशन' (ABDM) ची नोडल एजन्सी म्हणून खालीलपैकी कोण काम पहाते?

  • )एआयआयएमएस (AIIMS)
  • )नीती आयोग
  • )आयसीएमआर (ICMR)
  • )एनएचए (NHA)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये नुकतेच 'परम अनंत' या महासंगणकाचे अनावरण करण्यात आले?

  • )आयआयटी मद्रास
  • )एनआयटी तिरुचिरापल्ली
  • )आयआयटी गुवाहाटी
  • )आयआयटी गांधीनगर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

केरळच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतचा भाग पादाक्रांत करणारी, राज्याच्या 14 जिल्ह्यांपैकी तब्बल 11 जिल्ह्यांमधून जाणारी आणि 530 किमीचा पल्ला गाठणारी अशी ______ म्हणजे सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडोर उभारणे हा केरळच्या इतिहासातील सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होय.

  • )डायमंड लाइन
  • )गोल्डन लाइन
  • )सिल्वर लाइन✓ योग्य
  • )मेन लाइन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

जोड्या लावा (94 वे अकॅडमी पुरस्कार/ऑस्कर पुरस्कार). 'A' (व्यक्ती) (a) जेन कॅम्पियन (b) ट्रॉय कोत्सुर (c) विल स्मिथ (d) केनेथ ब्रॉनाघ 'B' (वर्गवारी) (i) उत्कृष्ट अभिनेता (ii) उत्कृष्ट दिग्दर्शक (iii) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (iv) उत्कृष्ट मूळ पटकथा

  • )(ii) (iii) (i) (iv)✓ योग्य
  • )(iii) (ii) (i) (iv)
  • )(iv) (iii) (i) (ii)
  • )(iv) (ii) (i) (iii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Current Affairs

खालीलपैकी कोणती व्यक्ती ‘लिस्बनचे गांधी’ म्हणून ओळखल्या जाते?

  • )ॲन्टोनियो ईस्टन
  • )ॲन्टोनियो ऑल्मंड
  • )ॲन्टोनियो ग्रामस्की
  • )ॲन्टोनियो कोस्टा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Logical Reasoning

एक सायकलस्वार उत्तरेकडे 30 कि.मी. अंतर गेला. त्यानंतर पूर्वेकडे वळून 40 कि.मी. अंतर गेला. त्यानंतर तो आपल्या उजवीकडे वळून 20 कि.मी. अंतर गेला. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 40 कि.मी. अंतर गेला तर तो आपल्या सुरुवातीच्या जागेपासून किती अंतरावर आहे?

  • )0 कि.मी.
  • )10 कि.मी.✓ योग्य
  • )30 कि.मी.
  • )25 कि.मी.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Logical Reasoning

सान्वी ही पौर्णिमाची मुलगी आहे. शिल्पा ही सान्वीची आत्या आहे. मिलिंद हा शिल्पाचा एकुलता एक भाऊ आहे. तर शिल्पा ही पौर्णिमाची _________ आहे.

  • )Sister-in-law✓ योग्य
  • )Brother’s wife
  • )Daughter
  • )Sister

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Logical Reasoning

दोन घन तुमच्यासमोर 'A' डावीकडे व 'B' उजवीकडे येतील अशाप्रकारे एकमेकांच्या शेजारी ठेवले आहेत. (a) 'A' या घनाच्या विरुद्ध बाजूंच्या पृष्ठांची एक जोडी लाल आहे तर दुसरी विरुद्ध पृष्ठांची जोडी निळी आहे. उरलेल्यांपैकी एक पृष्ठ पिवळे तर दुसरे जांभळे आहे. (b) 'B' या घनाची फक्त एकच विरुद्ध जोडी निळी आहे. उरलेल्या जोड्यांपैकी एका जोडीतील विरुद्ध पृष्ठांपैकी एक तपकिरी व एक हिरवे तर दुसऱ्या जोडीतील विरुद्ध पृष्ठांपैकी एक काळे तर दुसरे पांढरे आहे. (c) जर 'B' चे निळे पृष्ठ आकाशाकडे असेल व 'A' चे पिवळे पृष्ठ त्यावर ठेवले असेल तर 'A' चे कोणते पृष्ठ तुमच्यासमोर येईल?

  • )जांभळे / Violet
  • )निळे / Blue
  • )निळे किंवा लाल / Either Blue or Red✓ योग्य
  • )निळे किंवा जांभळे / Either Blue or Violet

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Logical Reasoning

नानू शब्द खेळ खेळत आहे. एखाद्या शब्दात कोणत्याही स्थानी आले तरी वर्णाक्षरांची किंमत बदलत नाही परंतु प्रत्येक वर्णाक्षराची किंमत वेगवेगळी आहे. TEAR, RITE, TREE आणि ART या शब्दांच्या किमती दिलेल्या आहेत परंतु कोणत्याही वर्णाक्षराची किंमत दिलेली नाही. या माहितीसंबंधाने दिलेल्या पर्यायातून चुकीचे विधान निवडा. (1) फक्त 1 ल्या व 2 या शब्दांच्या किमती वापरून काही वर्णाक्षरांची किंमत निर्धारित करणे शक्य आहे. (2) दिलेली माहिती फक्त प्रत्येक तीन वर्णाक्षरांच्या किमतीचे गणन करण्यासाठी पुरेशी आहे. (3) दिलेली माहिती T या वर्णाक्षराच्या किमतीचे गणन करण्याच्या दृष्टीने अपुरी आहे. (4) T व R या वर्णाक्षरांची एकूण किंमत शोधणे इतरांपैकी एका वर्णाक्षराच्या स्वतंत्र किमतीचे गणन करण्यासाठी आवश्यक आहे.

  • )फक्त 1 ल्या व 2 या शब्दांच्या किमती वापरून काही वर्णाक्षरांची किंमत निर्धारित करणे शक्य आहे. / It is possible to ascertain the value of some alphabets using values of 1st and 2nd words only.✓ योग्य
  • )दिलेली माहिती फक्त प्रत्येक तीन वर्णाक्षरांच्या किमतीचे गणन करण्यासाठी पुरेशी आहे. / Given information is sufficient for calculating individual values of three alphabets only.
  • )दिलेली माहिती T या वर्णाक्षराच्या किमतीचे गणन करण्याच्या दृष्टीने अपुरी आहे. / Given information is insufficient for calculating value of alphabet T.
  • )T व R या वर्णाक्षरांची एकूण किंमत शोधणे इतरांपैकी एका वर्णाक्षराच्या स्वतंत्र किमतीचे गणन करण्यासाठी आवश्यक आहे. / Finding total value of alphabets T and R is necessary for calculating individual value of one of the other alphabet.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Logical Reasoning

पुढील पर्यायांपैकी वरील युक्तिवादातील दोष दाखवण्यात सर्वोत्तम ठरेल असे विधान निवडा.

  • )अपेक्षा दृष्टीआड करून लैंगिक भेद विचारात न घेता कोणाही सर्वसाधारण व्यक्तीला वैज्ञानिक स्पष्टीकरणे लागू पडतात असे तो गृहीत धरतो. / It is assumed that the scientific explanations apply to the any average person irrespective of gender differences ignoring expectations.
  • )मुलांना त्यांच्या कार्यात सुधारणा करण्यासाठी मदत देण्याचा प्रयत्न पालक करत नाहीत असे तो गृहीत धरतो. / It is assumes that parents are not trying to help boys to improve their performance.
  • )पूर्वेतिहासिक कालीन पुरुषी कौशल्यांना शैक्षणिक कार्यात कोणतीही भूमिका नाही असे तो गृहीत धरतो. / It is assumed that prehistoric male skills have no role in the educational performance.
  • )लैंगिकतेमुळे कार्यमानात पडणारा फरक हा केवळ जीववैज्ञानिक फरकामुळे पडला आहे असे तो गृहीत धरतो. / It is assumed that differences in performance between genders are due solely to biological differences.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Logical Reasoning

गेल्या रात्री मी प्रश्नमंजुषेत भाग घेतला आणि माझ्या संघाने पहिले बक्षिस जिंकले. प्रश्न मंजुषेत तीन फेऱ्या होत्या. 1 ल्या फेरीत प्रत्येकी 1 गुण असणारे 20 सोपे प्रश्न होते. 2 च्या फेरीत प्रत्येकी 2 गुण असणारे 20 मध्यम प्रश्न होते. 3 च्या फेरीत प्रत्येकी 5 गुण असणारे 20 कठीण प्रश्न होते. आमचे जिंकण्यासाठीचे गुण 138 होते आणि आम्ही फक्त नऊ उत्तरे चुकीची दिली. दुसरे बक्षिस मिळालेल्या संघाला चीड आली कारण त्यांचे कमी प्रश्न चुकले होते. पण आमच्या सुदैवाने (हे थोडसं लाजिरवाणं असूनही) इतर दोन फेऱ्यांतील प्रश्नांच्या तुलनेत पहिल्या फेरीत (सोपे प्रश्न) आमचे जास्त प्रश्न चुकले होते. तर आम्ही चुकीची उत्तरे दिलेल्या पहिल्या फेरीतील प्रश्नांची संख्या निवडा.

  • )4
  • )5✓ योग्य
  • )7
  • )8

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Logical Reasoningआयोगाने रद्द

17 दिवसांनी नेल्ली तिचा प्रकल्प सादर करणार आहे. आज मंगळवार 23 फेब्रुवारी 2019 आहे. नेल्ली स्वतःचा प्रकल्प सादर करील तो वार निवडा.

  • )बुधवार
  • )गुरुवार
  • )शुक्रवार
  • )शनिवार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न १९Quantitative Aptitude

खालील वर्तुळालेख एका शहरातील साक्षर व निरक्षर-पुरुष व महिला यांची शेकडेवारी दर्शवितो. साक्षर व निरक्षर-पुरुष व महिलांची एकूण संख्या 3,50,000 आहे. तर साक्षर पुरुष व साक्षर महिला यांच्या संख्येत किती फरक आहे ?

  • )28,000
  • )1,29,500
  • )1,15,500
  • )14,000✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Logical Reasoning

खालील प्रश्नात दोन विधाने व दोन अनुमाने दिली आहेत. विधाने: (a) सर्व कावळे चिमण्या असतात. (b) काही चिमण्या कोंबड्या असतात. अनुमाने: (A) सर्व कावळे कोंबड्या असतात. (B) काही कावळे कोंबड्या असतात. कोणते अनुमान/अनुमाने सत्य आहे/त?

  • )फक्त अनुमान (A) सत्य
  • )फक्त अनुमान (B) सत्य
  • )अनुमाने (A) व (B) दोन्ही सत्य
  • )अनुमाने (A) व (B) दोन्ही असत्य✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Polityआयोगाने रद्द

लोकलेखा समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. (a) लोकलेखा समितीची स्थापना प्रथम 1923 मध्ये करण्यात आली. (b) सद्यस्थितीत लोकलेखा समिती 22 सदस्यांची मिळून बनली आहे. (c) लोकलेखा समिती सदस्यांचा कालावधी पाच वर्ष आहे. (d) मंत्री लोकलेखा समितीचे सदस्य म्हणून निवडले जाऊ शकतात. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

  • )(a), (b) आणि (c)
  • )(b), (c) आणि (d)
  • )(a), (c) आणि (d)
  • )(a) आणि (b)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २२Polity

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

  • )विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. / The Zonal Councils are Constitutional bodies.
  • )दोन किंवा अधिक विभागीय परिषदा संयुक्त बैठकीचे आयोजन करू शकतात. अशा बैठकांचे अध्यक्षस्थान हे पंतप्रधान भूषवितात. / Two or more Zonal Councils can hold joint meetings. Such meetings are presided over by the Prime-Minister.
  • )विविध राज्यांनी मंजूर केलेल्या कायद्यांमुळे एकमेकांशी संघर्ष होऊ नये हे पाहणे विभागीय परिषदांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. / The main objective of the Zonal Councils is to ensure that the laws passed by various states do not conflict with each other.
  • )वरीलपैकी एकही नाही / None of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Polity

खालील विधाने लक्षात घ्या. (a) केशवानंद भारती खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाधारे ‘संविधानाची मूलभूत चौकट’ ही संकल्पना प्रस्थापित झाली. (b) अनुच्छेद 368 नुसार संविधानात बदल करताना ‘दुरुस्ती’ अपेक्षित असून ‘परिवर्तन’ अपेक्षित नाही.

  • )(a) बरोबर (b) चूक आहे
  • )(a) आणि (b) दोन्ही चूक आहेत
  • )(b) बरोबर (a) चूक आहे
  • )(a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Polity

खालील विधाने विचारात घ्या. (a) ज्याप्रमाणे अमेरिकेच्या आणि स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेत राज्यांचा महासंघ असल्याचा औपचारिक उल्लेख आहे तसा भारत हा महासंघही नाही आणि दक्षिण आफ्रिका, जर्मनी अथवा ऑस्ट्रेलिया सारखा संघराज्यही नाही. (b) भारत हे एक वेगळ्या प्रकारचे संघीय (Union) अथवा संयुक्त राज्य (composite state) आहे, त्याने संघराज्यात्मक पद्धती असूनही राष्ट्राचे हितसंबंध सर्वश्रेष्ठ असले पाहिजे हे तत्व जपले आहे.

  • )विधान (a) बरोबर
  • )विधान (b) बरोबर
  • )दोन्हीही विधाने बरोबर✓ योग्य
  • )दोन्हीही विधाने चुकीची

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Polity

खालील विधाने लक्षात घ्या. (a) 1951 ला संविधानात पहिली दुरुस्तीद्वारे अनुच्छेद 15(4) चा समावेश करण्यात आला. (b) चंपकम दोराईराजन विरुद्ध मद्रास राज्य खटल्यात जातिआधारित आरक्षणास विरोध करण्यात आला होता. पर्यायी उत्तरे :

  • )(a) आणि (b) दोन्ही बरोबर असून (a) हा (b) चा परिणाम आहे.✓ योग्य
  • )(a) आणि (b) दोन्ही बरोबर असून (b) हा (a) चा परिणाम आहे.
  • )(a) बरोबर असून (b) चूक आहे.
  • )(a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Polity

भारताच्या महान्यायवादी या पदाबद्दल खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त? (a) महान्यायवादी पदाचा कार्यकाल राज्यघटनेने तीन वर्षे निश्चित केलेला आहे. (b) महान्यायवादी पद हे माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाही कारण ते काही सार्वजनिक प्राधिकरण नाही. (c) सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता असते ती महान्यायवादीकडे असली पाहिजे. (d) महान्यायवादीचे मानधन संसदेद्वारा निश्चित केले जाते. पर्यायी उत्तरे :

  • )(a) आणि (b)
  • )(a), (b) आणि (c)
  • )(b), (c) आणि (d)
  • )फक्त (c)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Polity

उद्देश पत्रिकेतील समाजवादी शब्दाला आज विसंगती होताना दिसते कारण

  • )शासनाचे मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण / Government’s liberal economic policy✓ योग्य
  • )जागतिक धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील दबाव / The pressure of globalization on the Indian economy
  • )शासनाने उद्योगपतींना पुरक असे केलेले कायदे / The laws created by the government in favour of the industrialists
  • )यापैकी नाही / None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Polity

अनुच्छेद 352 हे अनुच्छेद 356 पेक्षा कसे वेगळे आहे? खालील विधाने विचारात घ्या. (a) राष्ट्रीय आणीबाणीस संसदीय मान्यता एक महिन्यात मिळणे आवश्यक आहे तर राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीत दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. (b) अनुच्छेद 352 खालील आणीबाणीस मान्यतेसाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते तर राष्ट्रपती राजवटीस केवळ साध्या बहुमताची गरज असते. (c) राष्ट्रीय आणीबाणी ही दर सहा महिन्यांसाठी संसदीय मान्यतेच्या अटीवर कितीही काळ चालू राहू शकते तर राष्ट्रपती राजवटीचा कमाल कालावधी हा एक वर्षाचा असतो. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  • )(a)
  • )(b)
  • )(c)✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Maharashtra

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कोणत्या कलमांतर्गत आयोगाचे अधिकार आणि कार्ये दिली आहेत?

  • )कलम 13 / Section 13
  • )कलम 16 / Section 16✓ योग्य
  • )कलम 15 / Section 15
  • )कलम 22 / Section 22

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Polity

माहिती अधिकार कायद्यातील खालीलपैकी कोणते कलम माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्य यांच्याशी संबंधित आहे?

  • )16
  • )25
  • )19
  • )18✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Polity

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये किती प्रकरणे आणि किती कलमे आहेत ?

  • )5 प्रकरणे आणि 30 कलमे / 5 Chapters & 30 Sections
  • )6 प्रकरणे आणि 30 कलमे / 6 Chapters & 30 Sections
  • )5 प्रकरणे आणि 35 कलमे / 5 Chapters & 35 Sections
  • )6 प्रकरणे आणि 31 कलमे / 6 Chapters & 31 Sections✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कलम 2 (j) मधिल स्थानिक प्राधिकरणाच्या अर्थाच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा.

  • )महानगर पालिका / Municipal Corporation
  • )नगर परिषद / Municipal Council
  • )राज्य शासनाकडून वित्तीय सहाय्य मिळणारी अशासकीय संघटना / Any non-governmental organisation receiving financial assistance from the state government✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार मुख्य आयुक्त किंवा आयुक्त : (a) पुनर्नियुक्त केले जाऊ शकतात. (b) मुख्य न्यायमूर्ती समक्ष शपथ ग्रहण करतात. (c) राज्यपालांना उद्देशून, कोणत्याही वेळी, आपल्या पदाचा राजीनामा देवू शकतात. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) आणि (b) बरोबर आहेत / Only (a) and (b) are right
  • )फक्त (b) आणि (c) बरोबर आहेत / Only (b) and (c) are right
  • )फक्त (c) बरोबर आहे / Only (c) is right✓ योग्य
  • )फक्त (a) बरोबर आहे / Only (a) is right

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम _________ मध्ये सेवा हक्क याचा अर्थ दिलेला आहे.

  • )कलम 2 (m) / Section 2 (m)
  • )कलम 2 (n) / Section 2 (n)✓ योग्य
  • )कलम 2 (o) / Section 2 (o)
  • )कलम 2 (p) / Section 2 (p)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम _________ मध्ये प्रथम अपील प्राधिकारावर शास्ती लादण्याची तरतूद दिलेली आहे.

  • )कलम 9(2) / Section 9(2)
  • )कलम 10(1)(b) / Section 10(1)(b)
  • )कलम 10(1)(c) / Section 10(1)(c)
  • )कलम 10(2) / Section 10(2)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Polityआयोगाने रद्द

प्रथम अपिलावरील निर्णय प्राप्त झाल्यानंतर किती दिवसात दुसरे अपील दाखल करता येईल?

  • )90 दिवस / 90 days
  • )60 दिवस / 60 days
  • )45 दिवस / 45 days
  • )30 दिवस / 30 days

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ३९Polity

माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये, जनमाहिती अधिकाऱ्यावर लादण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेबाबत काय तरतूद आहे ?

  • )दंडाची एकूण रक्कम रु. 25,000/- पेक्षा अधिक असू नये. / The Total Amount of Penalty shall not exceed Rs. 25,000/-✓ योग्य
  • )दंडाची एकूण रक्कम रु. 50,000/- पेक्षा अधिक असू नये. / The Total Amount of Penalty shall not exceed Rs. 50,000/-
  • )दंडाची एकूण रक्कम जनमाहिती अधिकारी यांच्या वेतनपेक्षा अधिक असू नये. / Total Amount of Penalty shall not exceed salary of the PIO.
  • )वरीलपैकी कोणतेही नाही. / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Current Affairs

भारताचे मुख्य माहिती आयुक्त (CIC) कोण आहेत ?

  • )राधा कृष्णा माथुर (1) Radha Krishna Mathur
  • )बिमला जुल्का (2) Bimala Julka
  • )के.वाय. सिंग (3) K.Y. Singh
  • )वरीलपैकी काहीही नाही (4) None of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Science

ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज सीई.नेट : (a) एम्बेडेड डीव्हाईसेस साठी ज्यांना रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम लागते त्यासाठी विशेषत: डिझाईन केलेली आहे. (b) कर्नल ऑफ विंडोज विस्ता वर आधारित आहे. (c) ही नेटवर्किंग ऑपरेटिंग सिस्टीम आहे. (d) ही विंडोज सीई. ची नविन आवृत्ती आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे?

  • )(a) आणि (b) (1) (a) and (b)
  • )(b) आणि (c) (2) (b) and (c)
  • )फक्त (a) (3) only (a)
  • )(a) आणि (d) (4) (a) and (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Current Affairs

डिजीटल इंडिया प्रोग्रामचे स्तंभ 4 व 5 म्हणजे 'ई-गव्हर्नन्स' आणि '________'.

  • )ई-ग्रीन (1) e-Green
  • )ई-भारत (2) e-Bharat
  • )ई-क्रांती (3) e-Kranti✓ योग्य
  • )ई-कॉमर्स (4) e-Commerce

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या स्वतंत्रपणे स्थापीत डेटा सेंटर द्वारे खालीलपैकी कोणती सेवा पुरविली जाते?

  • )IaaS, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्वीस (1) IaaS, Infrastructure as a Service
  • )PaaS, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्वीस (2) PaaS, Platform as a Service
  • )क्लाउड कॉम्प्युटींग (3) Cloud Computing
  • )वरीलपैकी सर्व (4) All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Science

1968 साली अमेरिकेच्या डिफेन्स ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी आणि बी.बी.एन. या संस्थांनी एकत्र येवून खालीलपैकी कशाची निर्मिती केली?

  • )www (वर्ल्ड वाईड वेब) / www (world wide web)
  • )इंटरनेट / Internet
  • )ARPANET (अर्पानेट) / ARPANET✓ योग्य
  • )LAN (लॅन) / LAN

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Current Affairs

सेवारत व निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने 'निवारण' हे तक्रारीसाठी पोर्टल चालू केले आहे ?

  • )संरक्षण मंत्रालय / Defence Ministry
  • )दूरसंचार मंत्रालय / Telecommunication Ministry
  • )रेल्वे मंत्रालय / Railway Ministry✓ योग्य
  • )विमान उड्डाण मंत्रालय / Civil Aviation Ministry

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Science

संगणकातील हॅकिंग व त्या संदर्भातील शिक्षा हा भाग भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान ॲक्ट मधिल कोणत्या कलमात मोडतो ?

  • )कलम 61 / Section 61
  • )कलम 63 / Section 63
  • )कलम 66 / Section 66✓ योग्य
  • )कलम 69 / Section 69

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Science

ट्रॅफीक पोलीस कायदा व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मोबाईल वर चालणारी खालीलपैकी _________ ही सिस्टीम वापरतात.

  • )e-पोलीस / e-police
  • )e-ट्रॅफीक / e-traffic
  • )e-फाईन / e-fine
  • )e-चलान / e-challan✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Science

डोमेनच्या नावातील डॉट ओ आर जी (•org) ही बिरुदावली खालीलपैकी प्रकारच्या अस्थापनांसाठी वापरली जाते.

  • )शासकीय (Govt.)
  • )खाजगी (Private)
  • )इतर (Miscellaneous)✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही (None of the above)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Science

खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कॉम्प्युटर प्रणालीत एका चीप वर अनेक प्रोसेसर असून एकाच वेळेस अनेक माहितीचे विश्लेषण होते?

  • )आय.बी.एम. 360/370 (IBM 360/370)
  • )आय.बी.एम. 801 (IBM 801)
  • )एम.आय.पी.एस. (MIPS)
  • )इंटेल कोर डुओ आय3, आय5, आय7 (Intel core Duo i3, i5, i7)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Science

एम.ओ.एस.क्यु.यु.आय.टी. हे व्याधींवरील निरीक्षण प्रणाली भारतातील या कंपनीने तयार केली.

  • )सी-डॅक (C-DAC)✓ योग्य
  • )जी-कॅड (G-CAD)
  • )एन.आय.आय.टी. (NIIT)
  • )एन.आय.सी. (NIC)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Maharashtra

महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेतंर्गत प्रकल्पाच्या सामाजिक सुविधा केंद्र उभारणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर बाबींची खरेदी प्रक्रिया कोणत्या समितीमार्फत होते?

  • )राज्यस्तरीय समिती (State Level Committee)
  • )जिल्हास्तरीय समिती (District Level Committee)
  • )विभागीय समिती (Regional Committee)✓ योग्य
  • )यापैकी एकही नाही (None of the above)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Economyआयोगाने रद्द

राज्यातील महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण - 2017 नुसार पात्र उत्पादन उद्योगांना खालीलप्रमाणे लाभ दिले जातात. (a) भांडवली अनुदान - 15% ते 35% (b) व्याज दर अनुदान - 5% (c) कामगार कल्याण सहाय्य (d) वीज दर अनुदान वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहेत?

  • )फक्त (c)
  • )फक्त (d)
  • )फक्त (a) व (b)
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ५३Economy

महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2019 ची खालीलप्रमाणे उद्दिष्टे आहेत : (a) सन 2023-24 पर्यंत राज्याचा प्रकल्प उत्पन्न व उत्पादन क्षेत्राचा हिस्सा 25% गाठणेसाठी उत्पादन क्षेत्राचा वाढीचा दर 12% ते 13% पर्यंत राखणे. (b) 10 लाख कोटींचे गुंतवणूक आकर्षण करणे. (c) सन 2023-24 पर्यंत 40 लक्ष रोजगारांची संधी निर्माण करणे. उपरोक्तसाठी कोणता पर्याय बरोबर आहेत?

  • )सर्व बरोबर✓ योग्य
  • )सर्व चूक
  • )फक्त (a) व (b) बरोबर
  • )फक्त (c) बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Economy

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेमध्ये उद्योगामधील यंत्रसामग्री गुंतवणूक किती असणे आवश्यक आहे?

  • )रु. 2 लाख पेक्षा कमी✓ योग्य
  • )रु. 5 लाखाच्या वर
  • )रु. 50 लाखाच्या वर
  • )रु. 1 कोटीच्या वर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Economy

महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2019 बाबत : (a) हे धोरण शासन निर्णयाद्वारे दि. 7 मार्च 2019 रोजी जाहीर करण्यात आले. (b) सदर धोरणाचा कालावधी 1 एप्रिल 2019 पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील. (c) सन 2023-24 पर्यंत 50 लाख लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या धोरणाचा लक्षांक आहे. (d) नवीन फ्लॅगशिप योजनेचा शुभारंभ-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

  • )फक्त (d)
  • )फक्त (b), (c)
  • )फक्त (a), (b), (c)
  • )फक्त (a), (b), (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Economy

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. (a) पात्र उद्योग/व्यवसाय अंतर्गत उत्पादन प्रकाराच्या प्रवर्गातील प्रकल्पासाठी प्रकल्प किंमत कमाल मर्यादा रुपये 50.00 लाख आहे. (b) विशेष प्रवर्गामध्ये अनुसूचित जाती/जमाती/महिला/अपंग/माजी सैनिक या प्रवर्गाचा समावेश आहे. (c) पात्र उद्योग/व्यवसाय अंतर्गत सेवा प्रवर्ग प्रकल्पासाठी प्रकल्प किंमत कमाल मर्यादा रु. 30 लाख आहे. (d) शैक्षणिक पात्रता रु. 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

  • )(a) फक्त
  • )(a) आणि (b) फक्त
  • )(a), (b) आणि (c)
  • )(a), (b) आणि (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Economy

जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगार समितीचे अध्यक्ष कोण असतात?

  • )जिल्हा सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र
  • )सहायक कामगार आयुक्त
  • )महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र
  • )वरीलपैकी एकही नाही.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Economy

औद्योगिक (विकास व नियमन) अधिनियम, 1951 मधील खालील विधाने विचारात घ्या : (a) औद्योगिक (विकास व नियमन) अधिनियम, 1951 मध्ये एकूण 3 शेड्युल आहेत. (b) औद्योगिक (विकास व नियमन) अधिनियम, 1951 मधील तिसऱ्या शेड्युलमध्ये 3 अधिनियमांची यादी समाविष्ट आहे. (i) औद्योगिक सेवायोजन (स्थायी आदेश) अधिनियम, 1946 (1946 मधील 20 वा) (ii) औद्योगिक विवाद कायदा, 1947 (1947 मधील 14 वा) (iii) किमान वेतन अधिनियम, 1948 (1948 मधील 11 वा) वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

  • )(a) फक्त
  • )(a) आणि (b) दोन्ही✓ योग्य
  • )(b) फक्त
  • )यापैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Economy

MSMED कायदा, 2006 चे कोणते कलम निर्धारित तारीख आणि पुरवठादारास चक्रवाढ व्याज दराने प्रदान करण्याच्या उत्तरदायित्वा संबंधित आहे?

  • )एम एस एम ई डी कायदा, 2006 चे कलम 16 / Section 16 of the MSMED Act, 2006✓ योग्य
  • )एम एस एम ई डी कायदा, 2006 चे कलम 14 / Section 14 of the MSMED Act, 2006
  • )एम एस एम ई डी कायदा, 2006 चे कलम 13 / Section 13 of the MSMED Act, 2006
  • )एम एस एम ई डी कायदा, 2006 चे कलम 18 / Section 18 of the MSMED Act, 2006

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Economy

उद्योग (विकास व नियमन) अधिनियम 1951, कलम 6(1) नुसार, केंद्र शासन अधिसूचनेद्वारे अनुसूचित उद्योग किंवा अनुसूचित उद्योगांच्या गटासाठी व्यक्तिंचे एक मंडळ स्थापन करू शकते, ज्याला ___________ असे म्हणतात.

  • )सल्लागार परिषद / Advisory Council
  • )विकास परिषद / Development Council✓ योग्य
  • )कार्यकारी परिषद / Executive Council
  • )यापैकी नाही / None of above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Economy

उद्योग (विकास व नियमन) अधिनियम 1951, कलम 5(2) अन्वये केंद्रीय सल्लागार परिषदेत एक अध्यक्ष आणि असे इतर सदस्यांचा समावेश असेल, ज्यांची संख्या ___________ पेक्षा जास्त नसेल.

  • )25
  • )30✓ योग्य
  • )35
  • )40

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Economy

औद्योगिक (विकास व नियमन) अधिनियम, 1951 अंतर्गत औद्योगिक उपक्रमांना अनुज्ञाप्ती किंवा परवानगी देणेबाबत कोणत्या कलमान्वये विशद केले आहे?

  • )कलम 14 (आय डी आर ॲक्ट, 1951) / Section 14 of IDR Act, 1951✓ योग्य
  • )कलम 3 (आय डी आर ॲक्ट, 1951) / Section 3 of IDR Act, 1951
  • )कलम 18E (आय डी आर ॲक्ट, 1951) / Section 18E of IDR Act, 1951
  • )कलम 18FB (आय डी आर ॲक्ट, 1951) / Section 18FB of IDR Act, 1951

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Economy

उद्योग (विकास व नियमन) अधिनियम 1951 संबंधी : (a) हा अधिनियम 15 डिसेंबर 1951 पासून अंमलात आला. (b) या अधिनियमात एकूण 32 कलमे आहेत. (c) या अधिनियमात एकूण 3 परिशिष्टे आहेत. (d) या अधिनियमातील तिसरे परिशिष्ट हे विकास परिषदेकडे सोपविण्यात येऊ शकणारी कार्ये याच्याशी संबंधित आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

  • )फक्त (c) / Only (c)
  • )फक्त (a) व (d) / Only (a) and (d)
  • )फक्त (b) व (c) / Only (b) and (c)✓ योग्य
  • )वरील सर्व / All of above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Economy

सूक्ष्म आणि लघु उद्योग सुविधा परिषदेची रचना एम एस एम ई डी कायदा, 2006 च्या कलम ______ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे.

  • )एम एस एम ई डी कायदा, 2006 चे कलम 24
  • )एम एस एम ई डी कायदा, 2006 चे कलम 22
  • )एम एस एम ई डी कायदा, 2006 चे कलम 21✓ योग्य
  • )एम एस एम ई डी कायदा, 2006 चे कलम 23

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Economy

उद्योग (विकास व नियमन) अधिनियम 1951 नुसार कलम व त्याची तरतूद यांच्या जोड्या लावा : कलम तरतूद (a) 5 (i) विद्यमान औद्योगिक उपक्रमांची नोंदणी (b) 8 (ii) परिक्षणाचा अधिकार (c) 10 (iii) केंद्रीय सल्लागार परिषद – स्थापना, गठन व त्याचे कार्य (d) 19 (iv) विकास परिषदेचे विघटन

  • )(iii) (iv) (i) (ii)✓ योग्य
  • )(iv) (i) (iii) (ii)
  • )(ii) (iii) (iv) (i)
  • )(ii) (i) (iv) (iii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Economy

एम एस एम ई डी कायदा 2006 चे कलम 10 ________ संबंधित आहे.

  • )केंद्र सरकारकडून अनुदान
  • )क्रेडिट सुविधा✓ योग्य
  • )ज्या तारखेपासून आणि दराने व्याज देय आहे
  • )न्यायालयाचे अधिकार क्षेत्र

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Economy

सेझ ॲक्ट 2005 मधील कलम 12 कशाशी संबंधित आहे?

  • )विकास आयुक्तांची कार्ये✓ योग्य
  • )नवीन उद्योग घटकाची उभारणी
  • )कर, शुल्क किंवा सेसमधून सूट
  • )तपासणी एजन्सी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Polity

दि इंडियन पेटंट अँड डिझाईन ॲक्ट 1911 मधील कोणत्या कलमामध्ये 'पेटंटच्या रजिस्टर' बद्दल विशद केले आहे?

  • )कलम 20 (इंडियन पेटंट अँड डिझाईन ॲक्ट 1911) / Section 20 of Indian Patent and Design Act 1911✓ योग्य
  • )कलम 70 (इंडियन पेटंट अँड डिझाईन ॲक्ट 1911) / Section 70 of Indian Patent and Design Act 1911
  • )कलम 47 (इंडियन पेटंट अँड डिझाईन ॲक्ट 1911) / Section 47 of Indian Patent and Design Act 1911
  • )कलम 49 (इंडियन पेटंट अँड डिझाईन ॲक्ट 1911) / Section 49 of Indian Patent and Design Act 1911

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Polity

कारखाने अधिनियम 1948 नुसार 'कारखाना' याची व्याख्या कोणत्या कलमान्वये केली आहे?

  • )कारखाने अधिनियम 1948 कलम 2(b) / Section 2(b) of The Factories Act 1948
  • )कारखाने अधिनियम 1948 कलम 2(k) / Section 2(k) of The Factories Act 1948
  • )कारखाने अधिनियम 1948 कलम 2(m) / Section 2(m) of The Factories Act 1948✓ योग्य
  • )कारखाने अधिनियम 1948 कलम 2(n) / Section 2(n) of The Factories Act 1948

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Polity

कारखाने अधिनियम 1948 नुसार "कल्याण अधिकारी" यांच्या नेमणुकांविषयी कोणत्या कलमान्वये विशद केले आहे?

  • )कलम 45 / Section 45
  • )कलम 49 / Section 49✓ योग्य
  • )कलम 51 / Section 51
  • )कलम 55 / Section 55

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Polity

पेटंट ऍक्ट 1970 नुसार पेटंट दाखल करण्यास कोण पात्र आहे ? (a) शोधाचा खरा व प्रथम शोध करणाऱ्या दावा करणारा वा करणारी कोणतीही व्यक्ती (b) खरा आणि प्रथम शोध करत असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्ती द्वारे नियुक्ती केलेली कोणतीही व्यक्ती (c) मृत्युपुर्वी पेटंट करण्यास पात्र असलेल्या मृत व्यक्तीचा कायदेशीर प्रतिनिधी

  • )सर्व बरोबर / All correct✓ योग्य
  • )फक्त (b) / Only (b)
  • )वरीलपैकी कोणताही पर्याय नाही / None of the above
  • )फक्त (a) / Only (a)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Polity

कारखाने अधिनियम 1948 मधील कलम 2(k) कशाशी संबंधित आहे :

  • )उत्पादन प्रक्रिया / Manufacturing Process✓ योग्य
  • )कारखाना / Factory
  • )कामगार / Worker
  • )यापैकी एकही नाही / None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Polity

केंद्र शासनाने राष्ट्रीय कंपनी विधी अभिकरणाची स्थापना ______ पासून केलेली आहे.

  • )15 मार्च 2016
  • )1 जून 2016✓ योग्य
  • )4 ऑगस्ट 2017
  • )10 जुलै 2017

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Polity

नॅशनल कंपनी लॉ ट्रिबुनल (एन सी एल टी) नियम 2016 मधील कोणत्या कलमामध्ये "ट्रान्सफर्ड ॲप्लीकेशन अथवा ट्रान्सफर्ड पिटीशन" ची व्याख्या विशद केली आहे.

  • )कलम 2(29) (एन सी एल टी नियम 2016)✓ योग्य
  • )कलम 2(22) (एन सी एल टी नियम 2016)
  • )कलम 2(23) (एन सी एल टी नियम 2016)
  • )कलम 2(25) (एन सी एल टी नियम 2016)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polity

अपीलीय न्यायाधिकरणाच्या कोणत्याही आदेशामुळे व्यथित झालेली कोणतीही व्यक्ती अशा आदेशामुळे उद्भवणाऱ्या कायद्याच्या कोणत्याही प्रश्नावर अपीलीय न्यायाधिकरणाचा आदेश मिळाल्याच्या तारखेपासून ________ दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू शकते.

  • )30 दिवस
  • )45 दिवस
  • )60 दिवस✓ योग्य
  • )90 दिवस

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Economy

राष्ट्रीय कंपनी विधी अधिकरण (NCLT) ची स्थापना कंपनी कायदा 2013 च्या कोणत्या कलमान्वये झाली आहे?

  • )कंपनी कायदा 2013 च्या कलम 410 च्या अन्वये
  • )कंपनी कायदा 2013 च्या कलम 411 च्या अन्वये
  • )कंपनी कायदा 2013 च्या कलम 408 च्या अन्वये✓ योग्य
  • )कंपनी कायदा 2013 च्या कलम 412 च्या अन्वये

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Economy

महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2019 नुसार विशेष अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ खालील निकष पूर्ण करणाऱ्या उद्योग घटकांना देण्यात येईल. (a) एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असलेला किंवा न्यायालयाकडून नादार/दिवाळखोर म्हणून घोषित झालेला उद्योग घटक. (b) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूत्रानुसार पुनरुज्जीवनक्षम नसलेला उद्योग घटक. (c) उद्योग घटक हस्तांतरणामुळे घटकाच्या व्यवस्थापनात बदल होऊन घटक पुढे यशस्वीरीत्या चालू राहिल. (d) भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ द्वारा आजारी म्हणून घोषित उद्योग घटक. वरीलपैकी कोणता/कोणते निकष बरोबर आहेत?

  • )फक्त (b), (d)
  • )फक्त (d)
  • )फक्त (a), (b), (c)✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Polity

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एन सी एल टी) नियम 2016 मधील कोणत्या कलमामध्ये केसेस निकाली काढणेबाबत (Disposal of Cases) विशद केले आहे?

  • )कलम 144 (एन सी एल टी नियम 2016)
  • )कलम 145 (एन सी एल टी नियम 2016)
  • )कलम 146 (एन सी एल टी नियम 2016)✓ योग्य
  • )कलम 156 (एन सी एल टी नियम 2016)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Economy

सामूहिक प्रोत्साहन योजना 2019 नुसार, आजारी घटक म्हणजे _____ (a) उद्योग संचालनालयाने मानलेले व प्रमाणित केलेले सूक्ष्म आणि लघु उत्पादन उपक्रम. (b) नादारी आणि दिवाळखोरी संहिता 2016 अंतर्गत राष्ट्रीय कंपनी विधी अभिकरणाद्वारे मानले जाणारे मध्यम व मोठे उत्पादन उद्योग. (c) सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी प्रमाणित केलेले सहकारी घटक/उपक्रम. (d) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रमाणित केलेले मध्यम उत्पादन उपक्रम. वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहेत?

  • )फक्त (b) / Only (b)
  • )फक्त (d) / Only (d)✓ योग्य
  • )फक्त (a) व (c) / Only (a) and (c)
  • )वरील सर्व / All of above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Economy

औद्योगिक आणि आर्थिक पुनर्रचना मंडळ (BIFR) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

  • )सन 1987 / 1987✓ योग्य
  • )सन 1985 / 1985
  • )सन 1988 / 1988
  • )सन 1989 / 1989

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Maharashtra

मधमक्षिका पालन संचालनालय सन 1946 मध्ये _________ येथे स्थापन झाले.

  • )नागपूर
  • )लोणावळा
  • )महाबळेश्वर✓ योग्य
  • )कोल्हापूर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Economy

राज्य शासनाच्या शासकीय सुधारित खरेदी धोरणानुसार (2016) निविदा स्पर्धात्मक होण्यासाठी कमीत कमी किती निविदाकार असणे आवश्यक आहे?

  • )10
  • )15
  • )11
  • )3✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Economy

खादी व ग्रामोद्योग मंडळांमार्फत खालीलपैकी कोणत्या योजना राबविल्या जातात? (a) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (b) सुधारित बीज भांडवल योजना (c) विशेष घटक योजना (d) पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम

  • )फक्त (d)
  • )फक्त (a), (b)
  • )फक्त (a), (c), (d)✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Maharashtra

महाराष्ट्र नवीन औद्योगिक धोरण 2019 नुसार खाजगी औद्योगिक मूलभूत/पायाभूत सुविधा विकासास चालना देण्यासाठी ______ हे खाजगी औद्योगिक वसाहतीसाठी नियोजन प्राधिकरण असेल.

  • )महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ
  • )उद्योग संचालनालय
  • )महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ✓ योग्य
  • )महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Economyआयोगाने रद्द

औद्योगिक विकास महामंडळाचे गठन MIDC Act 1959 अंतर्गत कोणत्या कलमाखाली झाले आहे?

  • )कलम 1 / Section 1
  • )कलम 2 / Section 2
  • )कलम 3 / Section 3
  • )कलम 4 / Section 4

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ९७Economy

खालीलपैकी खरेदी तत्त्वे कोणती आहेत? (a) पैशांची इष्टतम किंमत किंवा आदर्श किंमत (b) शासनाची दीर्घकालीन हितसंबंध (c) टिकाऊ खरेदीचे धोरण (d) भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्याचे उपाय पर्यायी उत्तरे : (1) वरील सर्व बरोबर (2) फक्त (a) व (b) बरोबर (3) फक्त (b), (c) व (d) बरोबर (4) फक्त (c) व (d) बरोबर

  • )वरील सर्व बरोबर / All above are correct✓ योग्य
  • )फक्त (a) व (b) बरोबर / Only (a) and (b) are correct
  • )फक्त (b), (c) व (d) बरोबर / Only (b), (c) and (d) are correct
  • )फक्त (c) व (d) बरोबर / Only (c) and (d) are correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Economy

खालीलपैकी कोणती/कोणत्या योजना खादी ग्रामोद्योग मंडळाशी संबंधित आहे? (a) कारागीर रोजगार हमी योजना (b) जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना (c) सुधारित बीज भांडवल योजना (d) सामूहिक प्रोत्साहन योजना-2019 पर्यायी उत्तरे : (1) (a) फक्त (2) (a), (b), (c) (3) (c) फक्त (4) वरील सर्व

  • )(a) फक्त / (a) only✓ योग्य
  • )(a), (b), (c)
  • )(c) फक्त / (c) only
  • )वरील सर्व / All of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Maharashtra

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ______ रोजी झाली.

  • )14 नोव्हेंबर 1960
  • )1 ऑगस्ट 1962✓ योग्य
  • )29 डिसेंबर 1965
  • )12 फेब्रुवारी 1970

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2021-industry-inspector-paper-ii