स्पर्धाAI

MPSC गट क २०२१

Combined Prelims · ८८ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Current Affairs

कोव्हीड-१९ नंतरच्या जगातील सामाजिक-आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे?

  • )अरुंधती रॉय
  • )अमर्त्य सेन
  • )जयती घोष✓ योग्य
  • )रघुराम राजन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये पी.एस.ए. ऑक्सिजन प्लांट्स बसविण्यास मंजुरी देण्यात आली. पी.एस.ए. (PSA) चा विस्तार काय आहे?

  • )प्रेशर स्विंग ॲडसॉर्पशन✓ योग्य
  • )प्रेशर स्लिप ॲडजेस्टमेंट
  • )प्रायमरी स्टोरेज ॲडमिनिस्ट्रेशन
  • )प्रायमरी स्लिप ॲडजेस्टमेंट

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

ए.के.-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेटप्रुफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे?

  • )बिपीन रावत
  • )वेदप्रकाश मलिक
  • )अनुप मिश्रा✓ योग्य
  • )रंजन मथाई

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

‘माय पॅड माय राईट’ या नावाचा, नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरु झाला आहे?

  • )गुजरात
  • )तामिळनाडू
  • )त्रिपुरा✓ योग्य
  • )उत्तर प्रदेश

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी (मूळ रहिवासी) लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे?

  • )इटली
  • )फ्रान्स
  • )ऑस्ट्रेलिया✓ योग्य
  • )स्पेन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले आहे ?

  • )बांगलादेश
  • )कॅनडा
  • )भारत
  • )चीन✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

कोणत्या देशाने पहिला आर्कटिक मॉनिटरिंग उपग्रह 'आर्कटिका-एम.' प्रक्षेपित केला आहे ?

  • )रशिया✓ योग्य
  • )जपान
  • )चीन
  • )जर्मनी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

कोणत्या राज्य सरकारने 'कॉपर महसीर' नावाच्या मास्याला 'राज्य मासा' म्हणून घोषित केले ?

  • )आसाम
  • )सिक्किम✓ योग्य
  • )ओडीशा
  • )मणिपूर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे ?

  • )ऑकस✓ योग्य
  • )इंडपॅक
  • )युसा
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Current Affairs

'द बॅटल ऑफ रेझांग ला' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

  • )संतोष यादव
  • )कुलप्रीत यादव✓ योग्य
  • )नेहा सिंग
  • )विजय दहिया

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Current Affairs

भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

  • )इंग्लंड
  • )कॅनडा✓ योग्य
  • )अमेरिका
  • )फ्रान्स

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Current Affairs

भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

  • )अशोक सिंग
  • )धृती बॅनर्जी✓ योग्य
  • )स्नेहा अग्रवाल
  • )दृष्टी धामीजा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Current Affairs

इमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे ?

  • )अमेरिका
  • )ऑस्ट्रेलिया✓ योग्य
  • )जर्मनी
  • )इंग्लंड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Polity

"भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे" हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे?

  • )संविधानाच्या उद्देशपत्रिकेत / Preamble to the Constitution
  • )राज्यधोरणविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये / Directive principles of the state policy
  • )मूलभूत अधिकारांच्या वर्णनात / Fundamental Rights
  • )मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात / Fundamental Duties✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Polity

राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या : (a) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्या जवळ असणे आवश्यक असते. (b) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेषाधिकार व फायदे-संरक्षण त्यास मिळतात. (c) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. (d) त्याचा कार्यकाळ पाच वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

  • )फक्त (a) / (a) only✓ योग्य
  • )फक्त (b) / (b) only
  • )(a), (b) आणि (c) / (a), (b) and (c)
  • )(b), (c) आणि (d) / (b), (c) and (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Maharashtra

खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली ? (a) बाबूराव काळे समिती (b) पी.बी. पाटील समिती (c) बोंगिरवार समिती (d) वसंतराव नाईक समिती (a) Baburao Kale Committee (b) P.B. Patil Committee (c) Bongirwar Committee (d) Vasantrao Naik Committee

  • )फक्त (a) / Only (a)
  • )फक्त (b) / Only (b)✓ योग्य
  • )(b) आणि (c) / (b) and (c)
  • )(c) आणि (d) / (c) and (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Polity

उच्च न्यायालये कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात ?

  • )कलम - 220 / Article - 220
  • )कलम - 221 / Article - 221
  • )कलम - 213 / Article - 213
  • )कलम - 226 / Article - 226✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Polityआयोगाने रद्द

ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही ?

  • )पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात. / It is a body consisting of persons registered in the electoral rolls of a village comprised within the area of the panchayat level.
  • )पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. / It is a village assembly consisting of all the registered voters in the area of the Panchayat.
  • )ग्रामसभेचे अधिकार केंद्रसरकार निर्धारित करते. / Its powers have been determined by the Central Government.
  • )त्याची ग्रामपातळीवरील अधिकार आणि कार्य राज्यपातळीवरील राज्यविधिमंडळासारखे असतात. / Its powers and functions at village level are like State Legislature at the state level.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २१Polity

खालीलपैकी कोणते कलम केंद्रसरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानांशी संबंधित आहे ?

  • )कलम 270 / Article 270
  • )कलम 280 / Article 280
  • )कलम 275 / Article 275✓ योग्य
  • )कलम 265 / Article 265

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Environmentआयोगाने रद्द

ग्लासगो परिषदे संबंधी कोणते विधान असत्य आहे ?

  • )ग्लासगो परिषद हवामान बदलासंदर्भात आयोजित केलेली होती. / Glasgow conference was based on climate change.
  • )सर्व सहभागी देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहमत होते. / All the participating countries agreed on less Carbon Emission.
  • )भारत सन् 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल. / India will reduce Carbon Emission upto zero till 2070.
  • )भारत सन् 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल. / India will reduce Carbon Emission upto zero till 2030.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २३Polity

खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

  • )भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे.✓ योग्य
  • )42 व्या घटनादुरुस्तीन्वये 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द जोडण्यात आला.
  • )42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली.
  • )भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन (सोव्हिएट) राज्यघटनेतून घेतले आहेत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Polity

खालील विधाने लक्षात घ्या : (a) कलम 3 नुसार, संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. (b) संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते. (c) नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. (d) असे विधेयक सादर करत असतांना, संबंधित राज्याच्या विधीमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहे/आहेत ?

  • )(a) आणि (d)
  • )(a), (b) आणि (d)
  • )(a), (b) आणि (c)✓ योग्य
  • )सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Polity

खालील विधाने विचारात घ्या : (a) मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधान सभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. (b) मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये.

  • )विधान (a) बरोबर
  • )विधान (b) बरोबर
  • )दोन्हीही विधाने बरोबर
  • )दोन्हीही विधाने चुकीची✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६History

पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती ? (a) जमनालाल बजाज (b) वाडीलाल लल्लुभाई मेहता (c) घ.दा. बिर्ला (d) लाला शंकरलाल (e) वालचंद हिराचंद

  • )(a), (b), (c) फक्त
  • )(b), (c), (d) फक्त
  • )(c) आणि (e) फक्त✓ योग्य
  • )(b) आणि (d) फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९History

इ.स. 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली?

  • )जॉर्ज लाईट / George Light✓ योग्य
  • )एच. जोन्स / H. Jones
  • )लॉर्ड स्टुअर्ट / Lord Stuart
  • )लॉर्ड डर्बी / Lord Durby

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०History

खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्टे कोणते होते ?

  • )समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे / The moral progress of society✓ योग्य
  • )जातीयव्यवस्थेवर प्रहार / Oppose the caste system
  • )राष्ट्रीय जागृतीस प्रेरणा / Motivate national awareness
  • )शुद्धीकरण चळवळ / Purification movement

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१History

भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरु केली ?

  • )सातारा / Satara✓ योग्य
  • )चंद्रपूर / Chandrapur
  • )जळगाव / Jalgaon
  • )ठाणे / Thane

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२History

प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळविला ?

  • )बडोदा / Baroda✓ योग्य
  • )औंध व सातारा / Aund and Satara
  • )कोल्हापूर व बडोदा / Kolhapur and Baroda
  • )जुनागड व हैदराबाद / Junagad and Hyderabad

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३History

‘भारतीय असंतोषाचे जनक’ असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला आहे?

  • )ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूम / Allan Octavian Hume
  • )सर व्हॅलेंटाइन चिरोल / Sir Valentine Chirol✓ योग्य
  • )अरविंद घोष / Aravind Ghosh
  • )गोपाळ गणेश आगरकर / Gopal Ganesh Aagarkar

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४History

राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली ?

  • )15 ऑगस्ट 1906 / 15 August 1906✓ योग्य
  • )15 ऑगस्ट 1947 / 15 August 1947
  • )26 जानेवारी 1947 / 26 January 1947
  • )26 जानेवारी 1950 / 26 January 1950

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६History

‘अखिल भारतीय हरिजन संघाची’ स्थापना कोणी केली ?

  • )डॉ. बाबासाहेब आंबेडकर / Dr. Babasaheb Ambedkar
  • )महात्मा गांधी / Mahatma Gandhi✓ योग्य
  • )दादाभाई नौरोजी / Dadabhai Naoroji
  • )गोपाळ कृष्ण गोखले / Gopal Krishna Gokhale

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७History

जोड्या लावा : (a) मदनलाल धिंग्रा (b) अनंत लक्ष्मण कान्हेरे (c) विनायक दामोदर सावरकर (d) हेमचंद्र दास (i) ‘मित्र-मेळा’ मंडळाची स्थापना (ii) जॉन बामफिल्ड फुल्लर यांच्यावर हल्ला (iii) नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या (iv) कर्झन वायलीची हत्या

  • )(a) (iv), (b) (iii), (c) (i), (d) (ii)✓ योग्य
  • )(a) (iii), (b) (i), (c) (iv), (d) (ii)
  • )(a) (ii), (b) (iii), (c) (iv), (d) (i)
  • )(a) (iii), (b) (iv), (c) (ii), (d) (i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९History

आद्य क्रांतीकारक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

  • )वि.दा. सावरकर
  • )राजा राममोहन रॉय
  • )वासुदेव बळवंत फडके✓ योग्य
  • )श्यामजी कृष्णा वर्मा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Maharashtra

गरीब मुलाचे शिक्षण व्हावे म्हणून 'कमवा आणि शिका' ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबविली ? (a) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले (b) महात्मा फुले (c) महर्षि वि.दा. शिंदे व आगरकर (d) कर्मवीर भाऊराव पाटील

  • )(a) व (d)
  • )(b) व (d)
  • )(a) व (c)
  • )(d) फक्त✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Maharashtra

2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे ?

  • )अमरावती✓ योग्य
  • )बीड
  • )जालना
  • )नंदुरबार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Geography

भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास 'भारताचे रूर' म्हणून ओळखतात ?

  • )कोलकाता - हुगळी औद्योगिक प्रदेश
  • )अहमदाबाद - वडोदरा औद्योगिक प्रदेश
  • )मदुराई - कोईम्बतूर - बेंगळूरु औद्योगिक प्रदेश
  • )छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Maharashtra

जोड्या लावा : जिल्हा प्रकल्प (a) सातारा (i) नातुवाडी (b) अमरावती (ii) सावळी (c) हिंगोली (iii) आंधळी (d) रत्नागिरी (iv) शहानूर पर्यायी उत्तरे : (a) (b) (c) (d) (1) (iii) (iv) (ii) (i) (2) (iii) (ii) (i) (iv) (3) (iv) (i) (ii) (iii) (4) (ii) (i) (iv) (iii)

  • )(iii) (iv) (ii) (i)✓ योग्य
  • )(iii) (ii) (i) (iv)
  • )(iv) (i) (ii) (iii)
  • )(ii) (i) (iv) (iii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Geography

जोड्या लावा : अभयारण्य ठिकाण (a) तानसा (i) जळगाव (b) यावल (ii) ठाणे (c) माळढोक (iii) सोलापूर (d) नागझिरा (iv) गोंदिया पर्यायी उत्तरे :

  • )(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)✓ योग्य
  • )(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
  • )(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
  • )(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Maharashtra

जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे?

  • )औरंगाबाद / Aurangabad
  • )जळगाव / Jalgaon✓ योग्य
  • )नांदेड / Nanded
  • )यवतमाळ / Yeotmal

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Geography

खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम कोणता?

  • )आंबोली, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान / Amboli, Lonavala, Mahabaleshwar, Matheran
  • )आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा / Amboli, Mahabaleshwar, Matheran, Lonavala✓ योग्य
  • )लोणावळा, आंबोली, महाबळेश्वर, माथेरान / Lonavala, Amboli, Mahabaleshwar, Matheran
  • )आंबोली, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर / Amboli, Lonavala, Matheran, Mahabaleshwar

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Environment

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र ______ राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले.

  • )गुगामाळ / Gugamal✓ योग्य
  • )संजय गांधी / Sanjay Gandhi
  • )चांदोली / Chandoli
  • )प्रियदर्शिनी इंदिरा गांधी / Priyadarshini Indira Gandhi

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Geography

महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला 'विल्सन' धरण आणि त्याच जलाशयाला 'ऑर्थर' सरोवर म्हणून संबोधले जाते ?

  • )अप्पर वर्धा धरण / Upper Wardha dam
  • )लोअर वर्धा धरण / Lower Wardha dam
  • )उजनी धरण / Ujjani dam
  • )भंडारदरा धरण / Bhandardara dam✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Environment

भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते ? (a) वृक्षतोड (b) कुरणांचा नाश (c) भटकी शेती (d) अयोग्य लागवड

  • )फक्त (a) / Only (a)
  • )(a) आणि (b) / (a) and (b)
  • )(b), (c) आणि (d) / (b), (c) and (d)
  • )वरील सर्व / All the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Geography

आसाम येथे भारतातील सर्वात जास्त _________ चे साठे उपलब्ध आहे.

  • )खनिज तेल✓ योग्य
  • )लोह खनिज
  • )दगडी कोळसा
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Geography

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर नाही/नाहीत ? (a) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वत रांगेत आहे. (b) गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहेत. (c) बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगरांच्या उत्तरेकडे आहेत. पर्यायी उत्तरे :

  • )विधान (a) आणि (b)
  • )विधान (b) आणि (c)
  • )विधान (b)✓ योग्य
  • )विधान (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Economy

खालील विधाने विचारात घ्या : (a) निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. (b) सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. (c) दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

  • )(a) आणि (b)✓ योग्य
  • )(b) आणि (c)
  • )(a) आणि (c)
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Economy

खालीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये अयोग्य आहे/आहेत ? (a) चलनी नोटा भारत सरकार कडून जारी केल्या जातात. (b) संकुचित पैसा किंवा एम-1 मध्ये लोकांजवळील चलनांचा अंतर्भाव/समावेश असतो.

  • )(a) फक्त / Only (a)✓ योग्य
  • )(b) फक्त / Only (b)
  • )(a) आणि (b) दोन्ही / Both (a) and (b)
  • )वरीलपैकी कोणते ही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Economy

सुवर्णजयंती रोजगार योजना (SGSY) याची अंमलबजावणी ______ मार्फत होते. (a) व्यापारी बँका (b) प्रादेशिक ग्रामीण बँका (c) सहकारी बँका (d) परदेशी बँका

  • )(a) फक्त / Only (a)
  • )(b) आणि (c) / (b) and (c)
  • )(a), (b) आणि (c) / (a), (b) and (c)✓ योग्य
  • )(a), (b) आणि (d) / (a), (b) and (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Economy

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते ?

  • )चक्रीय / Cyclical
  • )तांत्रिक / Technical✓ योग्य
  • )हंगामी / Seasonal
  • )प्रच्छन्न / Disguised

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Economy

विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या ______. (a) अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात. (b) कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात. (c) नाणे बाजाराचे नियमन करतात. (d) भांडवल बाजाराचे नियमन करतात. पर्यायी उत्तरे :

  • )Only (a)
  • )(a) and (b)
  • )(b) only✓ योग्य
  • )(d) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Economy

खालील विधाने विचारात घ्या : (a) नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरीता कर्जाची सोय करून देते. (b) नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्जपुरवठा करते. (c) नाबार्ड शहरी उद्योगासाठी आर्थिक मदत करते. (d) नाबार्ड शहरी विकासासाठी आर्थिक मदत करते. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )(a) फक्त
  • )(a) आणि (b)✓ योग्य
  • )(a), (b) आणि (c)
  • )(a), (b) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Economy

खालीलपैकी कोणती संकल्पना “राष्ट्रीय उत्पन्न” या संकल्पनेशी संबंधित आहे?

  • )साठा / Stock
  • )अंशालक्षी / Micro
  • )प्रवाही / Flow✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Economy

समतोल अंदाजपत्रक म्हणजे :

  • )सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे. / Public revenue is less than public expenditure.
  • )सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे. / Public revenue is higher than public expenditure.
  • )सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे. / Public revenue and public expenditure are the same.✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही. / None of the above.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Current Affairs

ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते ? (a) ब्राझील, रशिया, भारत (b) चीन, दक्षिण आफ्रिका (c) जापान, जर्मनी, स्वित्झर्लंड (d) बेल्जियम, दक्षिण कोरीया वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

  • )फक्त (a) / Only (a)
  • )(a) आणि (b) / (a) and (b)✓ योग्य
  • )(a), (b) आणि (c) / (a), (b) and (c)
  • )(a), (b) आणि (d) / (a), (b) and (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Economy

लोकसंख्येचे स्थित्यंतर ______ यामुळे घडते. पर्यायी उत्तरे : (अ) मृत्युदर बदल (ब) जननदर बदल (क) उत्पन्न वितरणातील बदल (ड) नागरीकरण

  • )(a)
  • )(a) आणि (b)✓ योग्य
  • )(a), (b) आणि (c)
  • )(a), (b) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Current Affairs

कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते?

  • )उज्ज्वला योजना✓ योग्य
  • )सौभाग्य योजना
  • )जिवन-ज्योती योजना
  • )जन-धन योजना

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Economy

आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते?

  • )राज्य सरकार
  • )केंद्र सरकार✓ योग्य
  • )स्थानिक सरकार
  • )केंद्रशासित प्रदेश

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Economy

भारतात खालीलपैकी कोणती योजना गरीबी कमी करण्यासाठी सुरु करण्यात आलेली नाही?

  • )रोजगार हमी योजना
  • )जवाहर रोजगार योजना
  • )स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना
  • )सांस्कृतिक विकास कार्यक्रम✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Economy

'जागतिक व्यापारी संघटनेमुळे' भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे?

  • )सांस्कृतिक क्षेत्र / Cultural Sector
  • )पर्यटन क्षेत्र / Tourism Sector
  • )राजकीय क्षेत्र / Political Sector
  • )व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क / Trade Related Intellectual Property Rights (TRIPS)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Economy

खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही?

  • )महामंडळ कर / Corporation Tax✓ योग्य
  • )विक्री कर / Sales Tax
  • )उत्पादन कर / Excise Duty
  • )जकात कर / Customs Duties

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Science

किरणोत्साराचा शोध कोणी लावला?

  • )मारी क्युरी / Marie Curie
  • )रुदरफोर्ड / Rutherford
  • )आइन्स्टाईन / Einstein
  • )हेन्री बेक्वेरेल / Henry Becquerel✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Science

______ चा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो.

  • )समवतल दर्पण / Planoconvex mirror
  • )समतल दर्पण / Plane mirror
  • )अवतल दर्पण / Concave mirror
  • )उत्तल दर्पण / Convex mirror✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Science

द्रव्यमान 1 यु च्या ऊर्जेची समतुल्य _________ आहे.

  • )911 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट / 911 MeV
  • )921 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट / 921 MeV
  • )931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट / 931 MeV✓ योग्य
  • )941 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट / 941 MeV

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Science

खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही ?

  • )K / K✓ योग्य
  • )Cu / Cu
  • )Ag / Ag
  • )Au / Au

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Science

_________ हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातुक आहे.

  • )हलाइट / Halite
  • )क्रिओलाइट / Cryolite✓ योग्य
  • )पायरोल्युसाइट / Pyrolusite
  • )चालकोसाइट / Chalcocite

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Science

खालीलपैकी कोणत्या शर्तींचा संच ओबेलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो ?

  • )पॉलिमॉर्फिक, कोलोनियल, अक्वॅटिक / Polymorphic, Colonial, Aquatic
  • )मरीन, सिडेन्ट्री आणि कोलोनियल / Marine, Sedentary and Colonial
  • )मरीन, सिडेन्ट्री, पॉलिमॉर्फिक / Marine, Sedentary, Polymorphic
  • )मरीन, सिडेन्ट्री, कोलोनियल, पॉलिमॉर्फिक विथ ट्रू अल्टरनेशन ऑफ जनरेशन / Marine, Sedentary, Colonial, Polymorphic with true alternation of generation✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Science

पेरीपॅटस मध्ये पायाच्या किती जोड्या असतात ?

  • )10 - 15 जोड्या / 10 - 15 pairs
  • )10 - 20 जोड्या / 10 - 20 pairs
  • )14 - 43 जोड्या / 14 - 43 pairs✓ योग्य
  • )15 - 40 जोड्या / 15 - 40 pairs

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Science

झुरळाचे 'पेरीप्लॅनेटा' हे जेनेरीक नाव कोणी ठेवले ?

  • )लिनिअस (1758) / Linnaeus (1758)
  • )डी बीर (1973) / De Beer (1973)
  • )बुरमेरीस्टर (1838) / Burmerister (1838)✓ योग्य
  • )बेंथम (1664) / Bentham (1664)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Science

खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो ?

  • )टेरिडोफाईट्स / Pteridophytes
  • )ब्रायोफाईट्स / Bryophytes✓ योग्य
  • )जिम्नोस्पर्म्स / Gymnosperms
  • )एनजीओस्पर्म्स / Angiosperms

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Science

कीटकनाशके किटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात ?

  • )श्वसन संस्था / Respiratory system
  • )मज्जा संस्था / Nervous system✓ योग्य
  • )स्नायू संस्था / Muscular system
  • )परिवहन संस्था / Circulatory system

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Science

वेस्ट नाईल एनकेफेलायटिस ह्या रोगामध्ये ___________ सुज येते, हा रोग वेस्ट नाईल विषाणुमुळे होतो. प्रथमतः ह्या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात ___________ झाले.

  • )मेंदूला, युगांडामध्ये 1937 साली✓ योग्य
  • )मेंदूला, दक्षिण आफ्रिकेत 1999 साली
  • )चेतासंस्थेला, युगांडामध्ये 1937 साली
  • )चेतासंस्थेला, दक्षिण आफ्रिकेत 1999 साली

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Science

व्हाईट बटन मशरूमस् चे वैज्ञानिक (जीवशास्त्रीक) संबोधन ___________ असे आहे.

  • )प्लुरोटस फ्लोरिडा
  • )व्होल्व्हारिएला व्होल्व्हासिएई
  • )अगरिकस बायस्पोरस✓ योग्य
  • )एरिमोथेशियम अॅशबी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Science

शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश, सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास, ___________ संप्रेरक स्रवला जातो.

  • )क्रिएटीनीन
  • )रेनिन
  • )व्हॅसोप्रेसिन✓ योग्य
  • )ॲन्जिओटेन्सिन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Logical Reasoning

जर अक्षरगट HJLN चा संकेत ILOR असा असेल, तर त्याच तत्वाने DFHJ अक्षरगटासाठी कोणता पर्याय बरोबर असेल ?

  • )FHJN
  • )EHKN✓ योग्य
  • )EGIL
  • )FHIN

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Logical Reasoning

पुढील तथ्यांचे परीक्षण करा : (a) अनु बानोपेक्षा वजनदार आहे. (b) सिंथिया दिनापेक्षा उंच आहे. (c) बानो दिनाइतकीच उंच पण तिच्यापेक्षा वजनदार आहे. (d) दिना अनुपेक्षा उंच आहे. वरील तथ्यांवर आधारित अचूक निष्कर्ष ओळखा.

  • )सर्वात सिंथिया वजनदार आहे आणि अनु बुटकी आहे.
  • )अनु निश्चितपणे सर्वात वजनदार आणि सर्वात बुटकी आहे.
  • )सिंथिया सर्वात वजनदार आहे परंतु सर्वात उंच कोण यासंबंधाने निष्कर्ष काढणे शक्य नाही.
  • )सर्वात वजनदार कोण याविषयी निष्कर्ष काढणे अशक्य आहे परंतु अनु निश्चितपणे सर्वात बुटकी आहे.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Logical Reasoning

A, B, C व D या विद्यार्थ्यांकडे एकूण मिळून तीस पुस्तके आहेत. यातील एकाकडे तीन पुस्तके आहेत. दुसऱ्याकडे सहा आहेत, तिसऱ्याकडे नऊ आणि चौथ्याकडे बारा पुस्तके आहेत. B कडे C पेक्षा कमी पुस्तके आहेत तर D कडे A पेक्षा जास्त पुस्तके आहेत. जर C कडे D पेक्षा कमी पुस्तके असतील तर सत्य असतीलच असे/अशी नसणारे/री विधान/ने निवडा. विधाने : (a) A आणि B या दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच. (b) D आणि A या दोघांकडे मिळून किमान 15 पुस्तके असणारच. (c) C आणि D या दोघांकडे मिळून किमान 18 पुस्तके असणारच. (d) C आणि B या दोघांकडे मिळून किमान 9 पुस्तके असणारच.

  • )(a) वगळून सर्व
  • )वरील सर्व
  • )वरीलपैकी एकही नाही
  • )फक्त (a)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Logical Reasoning

पुढील दिलेल्या तीन रंगांच्या हिरवा (G), निळा (B) व लाल (R) खड्यांच्या क्रमिक माळा आहेत : X = GGBRBRRBBR Y = GBRRBRBBRG Z = RBBRGGBRBR जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवले तर यातील कोणत्या दोन माळा समान होतील ?

  • )X आणि Y
  • )Y आणि Z
  • )X आणि Z✓ योग्य
  • )कोणत्याही दोन माळा सारख्या होणार नाहीत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Quantitative Aptitude

एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदातून 1 वजा केल्यास 15/11 हा अपूर्णांक मिळतो. तर मूळचा अपूर्णांक कोणता ?

  • )3/8
  • )11/15
  • )7/12✓ योग्य
  • )1/6

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Quantitative Aptitude

वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. चार वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 6 पट होते. तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती ?

  • )35 वर्ष, 15 वर्ष
  • )38 वर्ष, 12 वर्ष
  • )40 वर्ष, 10 वर्ष✓ योग्य
  • )42 वर्ष, 8 वर्ष

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Quantitative Aptitude

एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4 : 5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती?

  • )85
  • )95✓ योग्य
  • )105
  • )115

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Quantitative Aptitude

दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2 : 5 आहे. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 कि.मी. धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती कि.मी. होईल ?

  • )165
  • )180
  • )350
  • )105✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Quantitative Aptitude

एका परिक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले. तर त्या परिक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते ?

  • )490
  • )700✓ योग्य
  • )845
  • )1300

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2021-combined-prelims