स्पर्धाAI

MPSC गट ब २०२२

STI Paper II · ९२ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Quantitative Aptitude

ढोमेला भेट दिली तेव्हा, ढोमेचे चलन झेस, नेस, मेस व हिर्र्स या चार प्रकारच्या नाण्यांचे बनलेले आहे असे मला आढळले. मला सुरुवातीला प्रत्येक नाण्याच्या सापेक्ष किंमतीची काहीही कल्पना नव्हती. तथापि माझ्या येथील आगमनानंतर लगेचच माझ्याकडे दोन हिर्र्सच्या बरोबर एक झेस आणि एक नेस यांची अदलाबदल होईल काय अशी विचारणा झाली. त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर यासारखीच, तीन हिर्र्स बरोबर एक मेस व नेस यांची अदलाबदल मी करेन काय अशी विनंती केली गेली. माझ्या या वेगळ्या अनुभवांच्या आधारे फक्त एक खात्रीचा पर्याय निवडा.

  • )एका झेसचे मोल एका नेसपेक्षा जास्त आहे
  • )एका नेसचे मोल एका मेसपेक्षा जास्त आहे
  • )एका मेसचे मोल एका हिर्र्सपेक्षा जास्त आहे✓ योग्य
  • )एका हिर्र्सचे मोल एका झेसपेक्षा जास्त आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

कोणत्याही खेळाव्यतिरिक्त, स्पर्धेत शिखरावर पोहोचलेले सर्व खेळाडू, महत्त्वाची अशी एक गुणवत्ता, म्हणजेच उच्च पातळीची स्वयं-शिस्त प्रदर्शित करतात. जरी एखाद्या खेळाबद्दलचे सुरुवातीचे औत्सुक्य हळूहळू क्षीण झाले तरीही या स्वयंशिस्तीची प्रदर्शन दीर्घ काळ पाहण्यास मिळते आणि क्रीडापटूला तर वर्षानुवर्षे वेदनादायी आणि पुनरावृत्तीच्या तालीमूतून स्वतःला तगवून ठेवावे लागते. उत्कृष्ट क्रीडापटूचे उदाहरण, विद्यार्थ्यांच्या वर्तनात व संपादनात सुधारणा करण्याचा एक उपगम सुचवते. उत्तम क्रीडापटू बनून जातात त्या तालीम सत्रासारखे उपक्रम जर लहान मुलांनी लवकर सुरु केले तर, ते देखील अभ्यासात उपयोग करण्यासाठी असाधारण पातळीची व्यक्तिगत शिस्त विकसित करू शकतील. वरील युक्तिवादातील उणीव सर्वोत्तम प्रकारे व्यक्त करणारा पुढीलपैकी एक पर्याय निवडा.

  • )कदाचित फक्त उच्च पातळीच्यांची स्वयंशिस्त उत्कृष्ट क्रीडापटू बनण्यासाठी पुरेशी ठरेल असे नाही
  • )कदाचित लहान मुलांच्या बाबतीत, ती करत असलेल्या विविध कृतींद्वारे त्याची स्वयंशिस्त विकसित होत असावी
  • )सशक्त स्वयं-शिस्त कदाचित तालमींना सुरुवात करण्याच्या वेळीच क्रीडापटूकडे मुळात असलेली त्यांची कुवत असावी✓ योग्य
  • )उत्कृष्ट क्रीडापटूंना ज्या प्रकारचे प्रशिक्षण पाठबळ मिळते तसे ते सर्वसाधारण लोकांना उपलब्ध होणे शक्य नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

सान्वीने तिच्या घरापासून सुरुवात केली आणि उत्तरेकडे 6 किमी अंतर चालत गेली, नंतर पूर्वेकडे 3 किमी, नंतर तिच्या डावीकडे 7 किमी आणि नंतर तिच्या उजवीकडे 4 किमी, नंतर दक्षिणेकडे 10 किमी आणि शेवटी तिच्या उजवीकडे 3 किमी चालत गेली, तर ती तिच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?

  • )आग्नेय
  • )नैर्ऋत्य
  • )ईशान्य✓ योग्य
  • )वायव्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

6. तीन संध्याकाळच्या नाट्य महोत्सवाच्या खास व साधारण तिकिटांच्या एकूण विक्रीचा स्तंभ तक्ता अभ्यासा. खास तिकिटे साधारण तिकिटांपेक्षा अधिक किमती असतात. दिलेल्या पर्यायांतून योग्य विधान निवडा.

  • )एकूण विक्रीतून शुक्रवार किंवा शनिवारी सर्वाधिक उत्पन्न मिळाले असावे
  • )एकूण विक्रीतून शनिवारी किंवा रविवारी सर्वाधिक उत्पन्न मिळाले असावे✓ योग्य
  • )एकूण विक्रीतून शुक्रवारी सर्वाधिक उत्पन्न मिळाले होते
  • )एकूण विक्रीतून शुक्रवार किंवा रविवारी सर्वाधिक उत्पन्न मिळाले असावे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

दिलेल्या संख्या मालिकेतील गहाळ पद शोधा. 12, 36, 80, 150, _____, 392

  • )193
  • )257
  • )191
  • )252✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न Quantitative Aptitude

गंमत-जंमत या सूत्रउद्यानाला भेट देण्यासाठी दोन प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत. 1-दिवसाचे तिकीट – फक्त खरेदीच्या दिवशी वैध 3-दिवसाचे तिकीट – खरेदीच्या दिवसाबरोबर पुढच्या फक्त दोन दिवसांसाठी वैध गेल्या आठवड्यात दिल्या गेलेल्या तिकिटांची नोंद. तिकिट प्रकार सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनि रवि 1-दिवस 417 432 440 308 319 373 526 3-दिवस 459 516 483 477 628 561 425 गेल्या आठवड्यात गुरुवारी सर्व मिळून वैध असलेल्या तिकिटांची संख्या निवडा.

  • )1476
  • )1657
  • )1784✓ योग्य
  • )1974

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Logical Reasoningआयोगाने रद्द

42 मुलांच्या गटामध्ये खालून 7 व्या क्रमांकावर कमलचे स्थान आहे, तर सूरजची जागा वरून 9 व्या क्रमांकावर आहे. मनिष त्या दोघांच्या बरोबर मध्ये आहे. तर मनिष पासून कमल कितव्या क्रमांकावर आहे ?

  • )7
  • )9
  • )12
  • )13

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ११Logical Reasoning

खालील प्रश्नात चार विधाने ही तीन अनुमाने I, II व III सह दिलेली आहेत. तुम्हाला दिलेली विधाने सत्य मानावयाची आहेत आणि दिलेल्या विधानुसार कोणती अनुमाने तार्किकदृष्ट्या काढता येतात ते ठरवा ? विधाने : काही बिया फुले आहेत. सर्व फुले झाडे आहेत. सर्व झाडे पाने आहेत. काही पाने शाखा आहेत. अनुमाने : I. काही शाखा फुले आहेत. II. काही पाने बिया आहेत. III. काही पाने फुले आहेत.

  • )I and II follow
  • )I and III follow
  • )II and III follow✓ योग्य
  • )All I, II and III follow

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Quantitative Aptitude

13. रंगानुसार वटाण्याची बीज अंकुरण टक्केवारी बदलते. जेव्हा कधी विशिष्ट रंगासाठी बिजे पेरली जातात तेव्हा त्यातील किती टक्के अंकुरतील याची खात्री असते. ही टक्केवारी सोबतच्या सारणीत दिली आहे. प्रदर्शनासाठी प्रत्येक रंगाची पन्नास रोपे हवी आहेत. लागवडीसाठी लागणाऱ्या बियांची एकूण संख्या निवडा.

  • )350
  • )375✓ योग्य
  • )500
  • )700

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Logical Reasoning

14. लोटेचे रहिवासी अपरिचितांच्या प्रश्नांची उत्तरे नेहमीच दोन वाक्यांत देतात. त्यातील एक खरे असते व दुसरे खोटे असते. जेव्हा भेटीला आलेल्याने विचारले, “काल पाऊस पडला काय ?” तेव्हा तीन रहिवाशांनी पुढीलप्रमाणे उत्तरे दिली. A : होय, काल पाऊस पडला. परंतु काल रात्री B सायकल चालवायला गेला होता. B : होय, काल पाऊस पडला. परंतु मी काही खोटं बोलत नाही. C : नाही, काल रात्री पाऊस पडला नाही. पण A ने काल तिचा प्रकल्प अहवाल पूर्ण केला. वरील उत्तरांच्या संदर्भात एक तर्कसंगत पर्याय निवडा.

  • )काल रात्री B सायकल चालवायला गेला होता
  • )A ने काल तिचा प्रकल्प अहवाल पूर्ण केला✓ योग्य
  • )काल रात्री पाऊस पडला नाही
  • )यापैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

15. पुढील युक्तिवाद अभ्यासा आणि (अ) व (ब) या रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांतून अनुक्रमे अभिव्यक्ती जोडी निवडा. शहराच्या सार्वजनिक शाळांची स्थिती भयानक झालेली असल्याने त्याकडे नक्कीच तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे परंतु आपले त्यावरचे उपचार विचारधारित आणि सर्वलक्षी असले पाहिजेत. अध्यापकांचे प्रदर्शन आणि त्यापाठोपाठचे उत्तरदायित्व याबाबतचे समुचित उपाय आपल्या शाळांत पुन्हा चैतन्य भरण्यात, महत्त्वाची भूमिका पार पाडतील यात शंका नसली तरी, याला जबाबदार असणाऱ्या खूप परस्परभिन्न अशा अन्य घटकांची/चे/च्या (अ) होईल. प्रणालीच्या भौतिक भांडवलाचा ऱ्हास आणि विद्यार्थ्यांचे घरगुती जीवन यासारख्या घटकांत व्यापक स्वरूपाची विभिन्नता आहे. यामुळे प्रज्ञावंत शिक्षकांना देखील आव्हानांना तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ, ते विद्यार्थ्यांच्या घरच्या अस्थिर, अत्याचारी वागणुकीचा त्यांच्या अध्ययनक्षमतेवर होणारा (ब)

  • )दुर्लक्ष करण्यासाठी निराकरण व परिणाम हलका करतात
  • )निराकरणाचा सार्वत्रिक उपाय व परिणाम नाहीसा करतात
  • )निराकरणाचा सार्वत्रिक उपाय व प्रभाव चिघळवतात
  • )हेळसांड करणे ही घोडचूक व परिणाम हलका करतात✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Science

कार्बन मोनोक्साईड उत्सर्जीत अ. मोटार वाहन ब. विमान क. औद्योगिक प्रक्रिया ड. शेती कचरा जाळणे पढील उत्तरे: टक्के (%) I. 2.5 II. 9.1 III. 9.8 IV. 60.1

  • )IV I III II✓ योग्य
  • )IV II I III
  • )I II III IV
  • )II IV I III

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Maharashtra

भारतीय जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांचा त्यांच्या एकूण लोकसंख्ये प्रमाणे उतरता क्रम लावा. अ. अकोला ब. चंद्रपूर क. बीड ड. लातूर इ. सातारा

  • )अ, ब, क, इ, ड
  • )क, इ, ब, ड, अ
  • )इ, क, ड, ब, अ✓ योग्य
  • )ब, इ, ड, अ, क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Geography

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. महाराष्ट्रात 73° पूर्व ते 74° पूर्व रेखावृत्तावर कमी पाऊस पडतो. ब. वर्धा-वैनगंगा खोऱ्यात ईशान्य मान्सूनचा पाऊस पडतो. क. मिरज पेक्षा चंद्रपूरचे पर्जन्याचे दिवस कमी आहेत.

  • )विधान अ आणि ब
  • )विधान ब आणि क
  • )विधान ब✓ योग्य
  • )विधान अ, ब आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Geography

महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून बॉक्साईटचे उत्पादन घेतले जात नाही ? अ. चंद्रपूर व गडचिरोली ब. कोल्हापूर व सांगली क. ठाणे व रायगड ड. रत्नागिरी व सिंधुदुर्ग पर्यायी उत्तरे:

  • )अ फक्त✓ योग्य
  • )ब फक्त
  • )ब व क फक्त
  • )ड फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Geography

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील शिखरांचा उंचीनुसार कोणता उतरता क्रम बरोबर आहे ?

  • )महाबळेश्वर - हरिश्चंद्रगड - साल्हेर - सप्तशृंगी
  • )महाबळेश्वर - साल्हेर - सप्तशृंगी - हरिश्चंद्रगड
  • )साल्हेर - महाबळेश्वर - सप्तशृंगी - हरिश्चंद्रगड
  • )साल्हेर - महाबळेश्वर - हरिश्चंद्रगड - सप्तशृंगी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Maharashtra

महाराष्ट्र राज्याचा भाग भूशास्त्रीय दृष्ट्या अतिशय भक्कम आहे कारण (1) हा भूभाग विविध खडकांपासून बनलेला आहे (2) या भूभागात रूपांतरित खडक मोठ्या प्रमाणात आढळतात (3) हा भूभाग प्राचीन खडकांपासून बनलेला आहे (4) या भूभागाचे संतुलन समान आहे

  • )This terrain is made up of different rocks
  • )Metamorphic rocks are found in abundance in this terrain
  • )This terrain is made up of ancient rocks✓ योग्य
  • )The balance of this terrain is equal

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Geography

खालीलपैकी कोणती पर्वतरांग नर्मदा व तापी खोरे यामधील जलविभाजक आहे ?

  • )अरवली
  • )विंध्य
  • )सह्याद्री
  • )सातपुडा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Maharashtra

महाराष्ट्रातील खाड्यांच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा. अ. पाताळगंगा नदीवर धरमतर खाडी आहे. ब. शुक नदीवर बाणकोट खाडी आहे. पर्यायी उत्तरे : (1) अ बरोबर ब चूक (2) अ चूक ब बरोबर (3) दोन्हीही बरोबर (4) दोन्हीही चूक

  • )अ बरोबर ब चूक✓ योग्य
  • )अ चूक ब बरोबर
  • )दोन्हीही बरोबर
  • )दोन्हीही चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Geography

महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्य व प्रादेशिक विभाग यांच्या योग्य जोड्या लावा. यादी - I (प्रादेशिक विभाग) अ. कोंकण ब. मध्य महाराष्ट्र क. मराठवाडा ड. विदर्भ यादी - II (वार्षिक पर्जन्य (से.मी.)) i. 77 ii. 100 iii. 92 iv. 287

  • )i ii iii iv
  • )iv iii i ii✓ योग्य
  • )iv iii ii i
  • )iii iv ii i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Maharashtra

खालील वर्णनावरून समाजसुधारक ओळखा. अ. लष्करी शिक्षण देणारे 'इन्फन्ट्री स्कूल' सुरु केले. ब. मूर्तिजापूरला 'गोरक्षण संस्था' व पुणे येथे 'वृद्धाश्रम' स्थापन केला. क. 'दुधगाव शिक्षण मंडळ'ची स्थापना केली. ड. 'लक्ष्मीज्ञान' व 'ग्रामरचना' या ग्रंथाचे लेखन केले. पर्यायी उत्तरे:

  • )अ: गोपाळ हरी देशमुख, ब: कर्मवीर भाऊराव पाटील, क: छत्रपती शाहू महाराज, ड: गाडगे महाराज
  • )अ: कर्मवीर भाऊराव पाटील, ब: गोपाळ हरी देशमुख, क: गाडगे महाराज, ड: छत्रपती शाहू महाराज
  • )अ: छत्रपती शाहू महाराज, ब: गाडगे महाराज, क: कर्मवीर भाऊराव पाटील, ड: गोपाळ हरी देशमुख✓ योग्य
  • )अ: गाडगे महाराज, ब: छत्रपती शाहू महाराज, क: गोपाळ हरी देशमुख, ड: कर्मवीर भाऊराव पाटील

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७History

खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींनी कामगार व शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन साम्यवादी विचारांच्या प्रसाराचे कार्य केले होते ?

  • )(अ) मुजफ्फर अहमद
  • )(ब) श्रीपाद अमृत डांगे
  • )(क) गुलाम हुसेन, सिंगरवेलू चेट्टीयर✓ योग्य
  • )(ड) माणिकलाल कोठारी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८History

जोड्या लावा: राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने व ठिकाण अ. 1890 कलकत्ता ब. 1891 नागपूर क. 1895 पुणे ड. 1897 अमरावती अध्यक्ष I. आनंदा चारलू II. शंकरन नायर III. फिरोजशहा मेहता IV. सुरेंद्रनाथ बॅनर्जी

  • )I IV II III
  • )III I IV II✓ योग्य
  • )II III I IV
  • )IV II III I

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०History

30. खालीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/त ? अ. राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात जवाहरलाल नेहरू यांनी आपण समाजवादी असल्याचे स्पष्ट केले. ब. श्रीपाद अमृत डांगे व इतरांनी सन 1925 मध्ये भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना केली. क. राम मनोहर लोहिया व अच्युतराव पटवर्धन यांचा काँग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापनेत सहभाग होता. ड. जयप्रकाश नारायण यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना केली.

  • )फक्त अ बरोबर आहे
  • )अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत
  • )अ, ब आणि क बरोबर आहेत✓ योग्य
  • )फक्त ड बरोबर आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१History

31. वृत्तपत्रांविषयीच्या जोड्या लावा : अ. विश्वनाथ नारायण मंडलिक ब. सूर्यजी कृष्णाजी क. गोविंद विठ्ठल कुंटे ड. श्रीपतराव शिंदे

  • )III I IV II
  • )IV II III I
  • )II IV I III
  • )IV III II I✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२History

जोड्या लावा : अ. एच. ए. कुलकर्णी मुकी भावीकर ब. मामा फडके क. अनंत लक्ष्मण कानहेरे ड. चिंतामण कुलकर्णी I. अभिनव भारत वाचनालय II. गोरक्षण मित्र समाज III. शिवाजी क्लब IV. औरंगाबाद गुप्ता मंडळ पर्यायी उत्तरे: अ ब क ड

  • )III IV I II
  • )IV III II I
  • )II IV I III
  • )II I IV III✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३History

1893-94 दरम्यान मवाळ राजनैतिकर टीका करणारी लेखश्रृंखला ‘न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड’ या शिर्षकाने पुढीलपैकी कोणी लिहिली ?

  • )न्यायमूर्ती रानडे
  • )लोकमान्य टिळक
  • )अरविंद घोष✓ योग्य
  • )सुरेंद्रनाथ बॅनर्जी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४History

34. जोड्या लावा : अ. धूमकेतू ब. इंदुप्रकाश क. सुबोधपत्रिका ड. काळ I. विधवा विवाह चळवळीसाठी कार्य II. विष्णु बुवा ब्रह्मचारी यांच्यावर टीका III. पारतंत्र्य आणि ब्रिटीशांची दडपशाही हे लेखनाचे विषय IV. प्रार्थना समाजाचे मुखपत्र

  • )IV III II I
  • )II IV I III
  • )III I IV II
  • )II I IV III✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५History

खालील विवरणावरून क्रांतीकारक ओळखा व योग्य पर्याय निवडा. अ. यवतमाळच्या गुप्त संघटनेत सहभाग होता ब. बीडच्या उठावाचे नेतृत्व केले क. नेपाळमध्ये बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला ड. अमरावती गुप्त संघटनेचा नेता होता

  • )अ: जनार्दन पुरुषोत्तम वाजने, ब: सदाशिव निळकंठ जोशी, क: काकासाहेब खाडिलकर, ड: दादासाहेब खापर्डे✓ योग्य
  • )अ: सदाशिव निळकंठ जोशी, ब: काकासाहेब खाडिलकर, क: जनार्दन पुरुषोत्तम वाजने, ड: दादासाहेब खापर्डे
  • )अ: दादासाहेब खापर्डे, ब: जनार्दन पुरुषोत्तम वाजने, क: सदाशिव निळकंठ जोशी, ड: काकासाहेब खाडिलकर
  • )अ: जनार्दन पुरुषोत्तम वाजने, ब: दादासाहेब खापर्डे, क: सदाशिव निळकंठ जोशी, ड: काकासाहेब खाडिलकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

नागरिकांना त्यांच्या हक्कांची हमी कोणत्या तरतूदी द्वारे दिली जाते ?

  • )संविधानातील तरतूदी (1) Constitutional provisions✓ योग्य
  • )नियमावलीतील तरतूदी (2) Regulatory provisions
  • )कायद्यातील तरतूदी (3) Legal provisions
  • )न्यायालयातील तरतूदी (4) Judicial provisions

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

'अ' गट व 'ब' गट यांच्या योग्य जोड्या लावा : 'अ' गट अ. डॉ. राजेंद्र प्रसाद ब. डॉ. बाबासाहेब आंबेडकर क. बी. एन. राव ड. वल्लभभाई पटेल 'ब' गट i. मसुदा समितीचे अध्यक्ष ii. संविधान सभेचे अध्यक्ष iii. मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष iv. संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार पर्यायी उत्तरे:

  • )अ – iv, ब – iii, क – ii, ड – i (1) a – iv, b – iii, c – ii, d – i
  • )अ – iii, ब – ii, क – i, ड – iv (2) a – iii, b – ii, c – i, d – iv
  • )अ – ii, ब – i, क – iv, ड – iii (3) a – ii, b – i, c – iv, d – iii✓ योग्य
  • )अ – i, ब – iv, क – iii, ड – ii (4) a – i, b – iv, c – iii, d – ii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Polity

राष्ट्रपतींना जर वाटले की, युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र उठावामुळे भारताच्या किंवा भारताच्या काही प्रदेशाच्या सुरक्षिततेला भयंकर धोका निर्माण झाला आहे तर ते राज्यघटनेच्या अनुच्छेद क्रमांक ______ अन्वये संपूर्ण भारतात किंवा भारताच्या काही भागात आणीबाणी जाहीर करू शकतात.

  • )123
  • )352✓ योग्य
  • )72
  • )359

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Polity

39. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला आहे ?

  • )पहिल्या
  • )दुसऱ्या
  • )तिसऱ्या✓ योग्य
  • )चौथ्या

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Polity

40. भारतीय राज्यघटनेतील कलम 36 ते 51 नुसार असलेली राज्याची मार्गदर्शक तत्वे यासंबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधाने निवडा : अ. नागरिकांसाठी समान नागरी कायदा. ब. कायद्यासमोर समानता. क. धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य. ड. औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग. पर्यायी उत्तरे:

  • )अ आणि ब
  • )ब आणि क✓ योग्य
  • )क आणि ड
  • )ड आणि अ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Polity

71 व्या घटनादुरुस्ती कायदा, 1992 द्वारे भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टामध्ये खालीलपैकी कोणत्या भाषा जोडण्यात आल्या ? (अ) कोंकणी (ब) मणिपुरी (क) नेपाळी (ड) सिंधी

  • )फक्त अ, ब, क✓ योग्य
  • )फक्त अ, ब, ड
  • )फक्त अ, क, ड
  • )फक्त ब, क, ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Polity

खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24 वी घटनादुरुस्ती कायदा संमत केला ? अ. गोलकनाथ खटला ब. मिनर्वा मिल्स खटला क. केशवानंद भारती खटला ड. शंकरी प्रसाद खटला खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? पर्यायी उत्तरे:

  • )अ फक्त✓ योग्य
  • )ब, क आणि ड फक्त
  • )ब आणि ड फक्त
  • )अ आणि ब फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Polity

कलम ______ अन्वये प्रत्येक भारतीय नागरिकाला कोणताही व्यवसाय करण्याचा किंवा कोणताही धंदा, व्यापार किंवा उद्योग करण्याचा हक्क आहे.

  • )342 अ
  • )239 अ अ
  • )81 (1) (बी)
  • )19 (1) (जी)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Polity

भारतातील अविश्वासदर्शक ठरावासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या : अ. भारताच्या राज्यघटनेमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाविरुद्धचा ‘अविश्वासदर्शक ठराव’ असा उल्लेख करण्यात आलेला नाही. ब. अविश्वासदर्शक ठराव हा केवळ लोकसभेमध्येच मांडता येतो. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहेत ?

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )दोन्ही✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Economy

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या 2018 च्या अहवालानुसार भारतामध्ये जगातील ______ टक्के बेरोजगार लोकसंख्या आहे.

  • )9.49✓ योग्य
  • )10.49
  • )11.49
  • )10.91

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Economy

1991 नंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ही ______ मुळे साध्य झाली आहे.

  • )सामाजिक सेवातील वृद्धी
  • )सेवा वृद्धी✓ योग्य
  • )विदेश व्यापार वाढ
  • )पर्यटन वृद्धी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Polity

खालील विधाने विचारात घ्या. अ. 73 व्या व 74 व्या घटना दुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थाना घटनात्मक दर्जा दिला. ब. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतीचे मजबुतीकरण करण्यासाठी सुरु केले. क. RGPSA ही राज्य सरकार प्रायोजित योजना आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

  • )अ आणि ब✓ योग्य
  • )ब आणि क
  • )फक्त क
  • )तिनही विधाने बरोबर आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Economy

मनी मार्केट म्हणजे अ. अशी जागा जिथे पैशाचा व्यवहार केला जातो. ब. ज्या बाजारात अल्प मुदतीची निधी कर्ज घेतली जातात आणि कर्ज दिली जातात. क. ज्या बाजारात दीर्घ मुदतीची निधी कर्ज घेतली जातात आणि कर्ज दिली जातात. ड. पैशाचा व्यवहार अधून मधून करणारा बाजार.

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त ब✓ योग्य
  • )फक्त अ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Economy

संपूर्ण ग्रामीण स्वरोजगार योजना केवळ _________ द्वारे राबवली जाते.

  • )पंचायत राज संस्था✓ योग्य
  • )सार्वजनिक-खाजगी भागीदारी
  • )वित्त मंत्रालय, केंद्र सरकार
  • )वित्त मंत्रालय, राज्य सरकार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Economy

दहाव्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या 22.8 टक्के वाटपासह _________ क्षेत्र हे दुसऱ्या क्रमांकावर होते.

  • )वाहतूक आणि दळणवळण
  • )सामाजिक सेवा✓ योग्य
  • )माहिती-तंत्रज्ञान
  • )लघुउद्योग

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Economy

चौथ्या पंचवार्षिक योजनेत _________ वर विशेष भर देण्यात आला होता.

  • )स्थैर्यसिह विकास✓ योग्य
  • )आर्थिक विकास आणि वृद्धी
  • )वृद्धी आणि समता
  • )शाश्वत विकास

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Economy

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीमध्ये महालनोबीस प्रतिमानात् _________ यावर भर दिलेला होता.

  • )लघु उद्योग
  • )ग्रामीण उद्योग
  • )माहिती-तंत्रज्ञान उद्योग
  • )भांडवली वस्तू आणि गुंतवणूक वस्तू✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Economy

दहाव्या योजनेत कोणत्या बाबी साध्य करणे शक्य झाले नाही ?

  • )अ. दारिद्र्य पातळी कमी करणे / a. To reduce poverty level
  • )ब. बेरोजगारी पातळी कमी करणे / b. To reduce unemployment level✓ योग्य
  • )क. स्थूल बचतीची पातळी / c. Gross domestic saving level
  • )ड. परकीय चलनाचा साठा / d. Foreign exchange reserve

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Economy

भारतातील 2019-20 दरम्यान एकूण एफडीआय इक्विटीच्या प्रवाहाबाबत खालील सेवा क्षेत्राची मांडणी चढत्या क्रमाने करा.

  • )अ. हवाई वाहतूक / a. Air Transport
  • )ब. माहिती आणि प्रसारण / b. Information and Broadcasting
  • )क. सागरी वाहतूक / c. Sea Transport✓ योग्य
  • )ड. शिक्षण / d. Education

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Economy

57. खालील विधाने विचारात घ्या : अ. आर्थिक वर्ष 2021 मध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी मूल्यांकन समितीने 07 प्रकल्पांची शिफारस केली. ब. या 07 प्रकल्पांपैकी, 03 रेल्वे क्षेत्रातील प्रकल्प, 02 बंदर क्षेत्रातील प्रकल्प आणि 02 दूरसंचार क्षेत्रातील प्रकल्प आहेत. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

  • )फक्त अ बरोबर आहे✓ योग्य
  • )दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत
  • )फक्त ब बरोबर आहे
  • )वरीलपैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Economy

खालील विधाने विचारात घ्या : अ. भारत सरकारने 2001-02 मध्ये केंद्रीय रस्ते निधी योजना सुरु केली. ब. केवळ राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी आणि देखभालीसाठी भारत सरकारने केंद्रीय रस्ते निधी योजना सुरु केली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?

  • )दोन्ही अ आणि ब योग्य आहेत
  • )फक्त अ योग्य आहे✓ योग्य
  • )फक्त ब योग्य आहे
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Current Affairs

60. पुरेसे सुरक्षित पेयजल पुरवण्यासाठीचा जल जीवन उपक्रम ______ मध्ये सुरू करण्यात आला.

  • )ऑगस्ट 2018
  • )ऑगस्ट 2019✓ योग्य
  • )एप्रिल 2020
  • )एप्रिल 2018

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Current Affairs

61. भारत सरकारचे चॅम्पियन्स ऑनलाईन पोर्टल ______ शी संबंधित आहे.

  • )आठ प्रमुख उद्योग
  • )सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग✓ योग्य
  • )खाण आणि उत्खनन उद्योग
  • )वरीलपैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Maharashtra

62. महाराष्ट्राच्या 'व्हिजन 2030' पत्रिकेनुसार, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांविषयी खालीलपैकी कोणते मुद्दे योग्य आहेत ? अ. विद्युत क्षेत्रातील खाजगी क्षेत्राचे योगदान – 50.8% ब. प्रति किमी लांबीच्या रस्त्यावरील वाहन संख्या – 93 क. आंतरराष्ट्रीय विमानतळांची संख्या – 4 ड. विद्युतनिर्मिती क्षमतेत औष्णिक ऊर्जा स्रोतांचे योगदान – 17.8% पर्यायी उत्तरे:

  • )अ, ब, क आणि ड
  • )अ, ब आणि क
  • )केवळ अ आणि ब✓ योग्य
  • )अ, ब आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Economy

खालीलपैकी कोणती एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची उद्दिष्टे आहेत ? अ. वितरण जाळे सशक्त करणे ब. शेतकऱ्यांना अनुदानित वीज पुरविणे क. ऊर्जा वितरण क्षेत्रात माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करणे पर्यायी उत्तरे:

  • )अ आणि ब फक्त
  • )ब आणि क फक्त
  • )अ आणि क फक्त✓ योग्य
  • )वरीलपैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Current Affairs

'उडे देश का आम नागरिक' अर्थात 'उडान' ही योजना ______ मध्ये सुरु करण्यात आली.

  • )सप्टें. 2016
  • )आक्टो. 2016✓ योग्य
  • )नोव्हें. 2016
  • )डिसें. 2016

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Economy

खालील विधाने विचारात घ्या : अ. भारतमाला परियोजना हा केंद्र सरकार आणि राज्य सरकाराद्वारे राबविण्यात येणारा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा कार्यक्रम आहे. ब. संत तुकाराम पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग प्रकल्पांचा भारतमाला परियोजनेत समावेश आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ? पर्यायी उत्तरे:

  • )केवळ अ योग्य आहे
  • )दोन्ही अ आणि ब योग्य आहेत
  • )केवळ ब योग्य आहे✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Economy

66. खालील विधाने विचारात घ्या: अ. इंडोनेशियातील बाली येथे 3 ते 7 डिसेंबर 2013 या कालावधीत जागतिक व्यापार संघटनेची नववी मंत्रीस्तरीय बैठक झाली होती. ब. बाली पॅकेज मधील मुख्य करार अन्न अनुदान आणि व्यापार सुलभतेशी संबंधीत आहेत. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ? पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ बरोबर आहे
  • )फक्त ब बरोबर आहे
  • )दोन्ही अ आणि ब चूक आहेत
  • )दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Economy

जीएसटीचे कोणते प्रतिमान भारतात आणण्यात आले आहे ?

  • )राष्ट्रीय स्तरावरील जीएसटी / National Level GST
  • )राज्य स्तरावरील जीएसटी / State Level GST
  • )दुहेरी जीएसटी / Dual GST✓ योग्य
  • )एकात्मिक जीएसटी / Integrated GST

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Economy

वस्तू आणि सेवा करांत कोणते कर अंतर्भूत केले आहेत ? अ. अबकारी कर. ब. उत्पन्न कर. क. मूल्यवर्धित कर. ड. सेवा कर. a. Excise duties. b. Income tax. c. Value added tax. d. Service tax.

  • )अ फक्त / a only
  • )अ, ब आणि क फक्त / a, b and c only
  • )अ, क आणि ड फक्त / a, c and d only✓ योग्य
  • )ब फक्त / b only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Economy

____________ मध्ये निर्गुंतवणूक हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला.

  • )अर्थसंकल्प 1991-92 / Budget 1991-92
  • )अर्थसंकल्प 1990-91 / Budget 1990-91
  • )अंतरिम अर्थसंकल्प 1991 / Interim Budget 1991✓ योग्य
  • )अंतरिम अर्थसंकल्प 1992 / Interim Budget 1992

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Economy

जागतिक व्यापार संघटनेत खालीलपैकी कोणते करार अंतर्भूत होतात ? अ. वस्तूंच्या व्यापारावरील बहुपक्षीय करार. ब. सेवा व्यापारावरील सामान्य करार. क. कापड आणि कपड्यांवरील करार. ड. व्यापारविषयक बौद्धिक मालमत्ता करार. a. Multilateral Agreements on Trade in goods. b. General Agreement on Trade in Services. c. Agreements on Textiles and Clothing. d. Agreement on Trade Related Intellectual Property (TRIPs).

  • )केवळ अ आणि क / Only a and c
  • )केवळ ब आणि ड / Only b and d
  • )केवळ अ, ब आणि ड / Only a, b and d
  • )वरीलपैकी सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Economy

भारत सरकारने स्वीकारलेल्या स्थूल आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रमात ______ यांचा समावेश होतो. अ. औद्योगिक खुलेपणा ब. वित्तीय सुधारणा क. व्यवहारतोल समायोजन ड. महागाई नियंत्रण a. Industrial deregulation b. Fiscal correction c. Balance of Payments adjustment d. Control of inflation

  • )अ, ब आणि क / a, b and c
  • )अ, क आणि ड / a, c and d
  • )अ, ब आणि ड / a, b and d
  • )ब, क आणि ड / b, c and d✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Economy

एमआरटीपी कायदा, 1969 रद्द करून स्पर्धा कायदा, 2002 ने बदलला व तो ______ पासून लागू करण्यात आला.

  • )1 सप्टेंबर 2002 / September 1, 2002
  • )1 सप्टेंबर 2005 / September 1, 2005
  • )1 सप्टेंबर 2007 / September 1, 2007
  • )1 सप्टेंबर 2009 / September 1, 2009✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Economy

खालील विधाने विचारात घ्या : अ. व्हॅट दर आणि नियम राज्यानुसार भिन्न आहेत. ब. जीएसटी सर्व राज्यांमध्ये एकसमान कर प्रणाली आणते. क. भारताने एकल जीएसटी मॉडेल स्वीकारले आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?

  • )अ आणि ब / a and b✓ योग्य
  • )अ आणि क / a and c
  • )ब आणि क / b and c
  • )वरीलपैकी सर्व / All of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Economy

75. खालील विधाने विचारात घ्या : अ. पीएम वाजपेयी सरकारने 1999 मध्ये नवीन निर्गुंतवणूक विभाग तयार केला. ब. 2001 मध्ये निर्गुंतवणूक विभाग पूर्ण मंत्रालय बनले. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत ? पर्यायी उत्तरे :

  • )केवळ अ
  • )केवळ ब
  • )दोन्ही अ आणि ब✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Economy

76. जागतिक व्यापार संघटनेनुसार वर्ष 2020 मध्ये भारत व्यापारीमाल निर्यातदरामध्ये आणि व्यापारीमाल आयातदरांमध्ये जागतिक क्रमवारी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या क्रमांकांवर होता ?

  • )निर्यात क्रम 12, आयात क्रम 7
  • )निर्यात क्रम 30, आयात क्रम 5
  • )निर्यात क्रम 21, आयात क्रम 14✓ योग्य
  • )निर्यात क्रम 41, आयात क्रम 21

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Current Affairs

ब्रिक्स वुमेन्स बिझनेस अलायन्स (BRICS WBA) संदर्भातील पुढील विधाने वाचा. अ. जुलै-2020 मध्ये अधिकृतपणे उपक्रमांची सुरुवात. ब. परस्पर लाभाचे प्रकल्प ओळखून आणि महिला उद्योजकांच्या व्यावसायिक हितसंबंधांना चालना देवून ब्रिक्स देशांतील द्विपक्षीय व्यापाराला चालना देणे हा त्याचा उद्देश आहे. क. ब्रिक्स देशांतील 25 महिला नेत्यांचा त्यात समावेश आहे. पर्यायी उत्तरे:

  • )अ, ब आणि क बरोबर आहेत✓ योग्य
  • )अ आणि ब फक्त बरोबर आहेत
  • )ब आणि क फक्त बरोबर आहेत
  • )अ आणि क फक्त बरोबर आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Economy

विदेशी व्यापार धोरण 2015-2020 अंतर्गत पूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्या योजनेच्या बदल्यात ‘भारतातून सेवा निर्यात’ योजना सुरु करण्यात आली ?

  • )फोकस प्रॉडक्ट योजना
  • )मार्केट लिंक्ड फोकस प्रॉडक्ट योजना
  • )सर्व्हड फ्रॉम इंडिया योजना✓ योग्य
  • )फोकस मार्केट योजना

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Economy

खालीलपैकी कोणता जागतिकीकरणाचा निकष नाही ?

  • )देशादेशांमधील व्यापारविषयक निर्बंध कमी करणे
  • )देशादेशांमध्ये भांडवलाचा मुक्त संचार
  • )तंत्रज्ञानाचा मुक्त संचार
  • )विविध देशांमध्ये श्रमाचा मुक्त संचार नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Economy

भारताच्या व्यापारातील भांडवली खात्यात ______ यांचा समावेश होता.

  • )(अ) कर्जे
  • )(ब) विमा✓ योग्य
  • )(क) रुपया कर्ज सेवा
  • )(ड) विदेशी गुंतवणूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Economy

2020-21 या कालावधीत भारतात थेट विदेशी गुंतवणुकीचा उद्योग निहाय उतरत्या क्रमाने क्रम (मांडणी) करा.

  • )(अ) वाहतूक
  • )(ब) उत्पादन
  • )(क) बांधकाम
  • )(ड) संगणक सेवा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Economy

खालील विधाने विचारात घ्या : अ. WTO ची दहावी मंत्रीस्तरीय परिषद केनिया येथे आयोजित करण्यात आली होती. ब. WTO ची अकरावी मंत्रीस्तरीय परिषद इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आली होती. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

  • )केवळ अ बरोबर आहे / Only a is correct✓ योग्य
  • )केवळ ब बरोबर आहे / Only b is correct
  • )दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत / Both a and b are correct
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Economy

खालील विधाने विचारात घ्या : अ. 2021-22 दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबिया भारताच्या पेट्रोलियम निर्यातीसाठी पाचव्या आणि सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी निर्यात ठिकाणे बनली आहेत. ब. 2021-22 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीपैकी पेट्रोलियम, तेल आणि वंगण निर्यातीचा वाटा 16.0 टक्के होता. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीची आहे/त ?

  • )फक्त अ चूक आहे / Only a is incorrect
  • )फक्त ब चूक आहे / Only b is incorrect
  • )दोन्ही अ आणि ब चूक आहेत / Both a and b are incorrect
  • )वरीलपैकी नाही / None of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Economy

85. जोड्या जुळवा. खाली दिलेल्या वर्ष 2020-21 मधील, थेट परकीय गुंतवणूक प्रवाह आकर्षित करणारी क्षेत्रे (स्तंभ 'अ') आणि त्या क्षेत्रांचा एकूण थेट परकीय गुंतवणुकीतील वाटा (स्तंभ 'ब') यांच्या योग्य जोड्या जुळवा. स्तंभ 'अ' (क्षेत्र) अ. संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ब. मोटारगाड्या (Automobile) उद्योग क्षेत्र क. सेवा क्षेत्र ड. व्यापार (Trading) क्षेत्र पर्यायी उत्तरे : (1) i ii iii iv (2) iv i iii ii (3) iii iv i ii (4) ii iii iv i

  • )i ii iii iv
  • )iv i iii ii✓ योग्य
  • )iii iv i ii
  • )ii iii iv i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Economy

खालील विधाने विचारात घ्या : अ. एफआरबीएम कायदा 5 जुलै, 2004 पासून लागू झाला. ब. एफआरबीएम कायदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना बंधनकारक आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

  • )केवळ अ बरोबर आहे✓ योग्य
  • )दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत
  • )केवळ ब बरोबर आहे
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Polity

खालील विधाने विचारात घ्या : अ. घटनेचे अनुच्छेद 275 आणि 282 सहाय्य-अनुदानाच्या प्रश्नांशी संबंधीत आहेत. ब. अनुच्छेद 275 अंतर्गत अनुदान कोणत्याही सार्वजनिक उद्देशासाठी राज्यांना दिले जाते. क. अनुच्छेद 282 अंतर्गत अनुदान राज्यांना “सहाय्याची गरज” मध्ये दिले जाते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ? पर्यायी उत्तरे :

  • )दोन्ही अ आणि क योग्य आहेत
  • )केवळ अ योग्य आहे✓ योग्य
  • )केवळ क योग्य आहे
  • )वरीलपैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Economy

मधून व्याज देयक वजा केल्यानंतर प्राथमिक तूट प्राप्त होते.

  • )महसूली तूट
  • )मौद्रिक तूट
  • )राजकोषीय तूट✓ योग्य
  • )अर्थसंकल्पीय तूट

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Economy

वित्त आयोगाने अशी शिफारस केलेली होती की 2011 च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार राज्यांना अनुदान द्यावे.

  • )पंधराव्या
  • )चौदाव्या✓ योग्य
  • )सोळाव्या
  • )तेराच्या

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Economy

15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पुढीलपैकी कोणत्या राज्याचा 2021-22 ते 2025-26 या कालावधीत केंद्रीय करांमध्ये सर्वाधिक वाटा असेल ?

  • )महाराष्ट्र
  • )मध्य प्रदेश
  • )आंध्र प्रदेश
  • )उत्तर प्रदेश✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Economy

पिकॉक आणि वाईजमन यांनी सांगितलेल्या सार्वजनिक खर्चाच्या वाढीचे अंतिम परिणाम काय आहेत ? अ. विस्थापन परिणाम ब. सखोल आणि रुंदीकरण परिणाम क. तपासणी परिणाम ड. केंद्रीकरण परिणाम.

  • )अ, ब आणि क / (1) a, b and c
  • )अ, क आणि ड / (2) a, c and d✓ योग्य
  • )ब, क आणि ड / (3) b, c and d
  • )वरीलपैकी सर्व / (4) All of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Economy

खालील विधाने विचारात घ्या : अ. अर्थसंकल्प 2021-22 मध्ये 13 क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरु केली. ब. पीएलआय योजना 2022-23 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत ?

  • )फक्त ब योग्य आहे / (1) Only b is correct
  • )दोन्ही अ आणि ब योग्य आहेत / (2) Both a and b are correct
  • )फक्त अ योग्य आहे / (3) Only a is correct✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही / (4) None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Economy

2019-20 दरम्यान एकूण कर महसूलाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. उत्पन्नावरील कर महामंडळ करापेक्षा कमी होता. ब. महामंडळ करापेक्षा वस्तू आणि सेवा कर जास्त होता. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?

  • )दोन्ही अ आणि ब योग्य आहे✓ योग्य
  • )केवळ ब योग्य आहे
  • )केवळ अ योग्य आहे
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Economy

प्रत्यक्ष करांच्या दोषांसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. प्रत्यक्ष करामुळे कामाचा प्रयत्न पुरवठा कमी होऊ शकतो. ब. प्रत्यक्ष कर बचत आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन कमी करतात. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?

  • )केवळ अ योग्य आहे
  • )केवळ ब योग्य आहे
  • )दोन्ही अ आणि ब योग्य आहेत✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Economy

भारताचा सार्वजनिक खर्च वाढण्याची यापैकी प्रमुख कारणे कोणती ? अ. प्रशासकीय यंत्रणेचा विस्तार ब. राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ क. लोकसंख्या वाढ ड. किंमत पातळीतील वाढ. पर्यायी उत्तरे:

  • )फक्त अ / Only a
  • )फक्त क / Only c
  • )क आणि ड / c and d
  • )वरीलपैकी सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Economy

आधुनिक अर्थतज्ञांच्या मते 'सार्वजनिक कर्जाचा भार ______ वर पडतो'.

  • )सध्याची पिढी / Present generation✓ योग्य
  • )पहिली पिढी / Past generation
  • )भावी पिढी / Future generation
  • )यापैकी नाही / None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Economy

1997-98 पासून ______ तुटीचा असा हिस्सा जो भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शासनास दिला जातो त्यास मुद्रीत तूट म्हणून ओळखले जाते.

  • )प्राथमिक / Primary
  • )महसूली / Revenue
  • )राजकोषीय / Fiscal✓ योग्य
  • )भांडवली / Capital

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2022-sti-paper-ii