स्पर्धाAI

MPSC गट ब २०२२

PSI Paper II · ९३ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Logical Reasoning

आठ व्यक्तींच्या कुटुंबात तीन विवाहित जोडी आहेत. सीमा ही श्रीची आजी आणि केतनची सासू आहे. संजयचा भाऊ असलेल्या अजयची नेहा ही मुलगी आहे. आर्या हे संजयचे एकुलते एक अपत्य आहे आणि ती श्रीची आई आहे. गीता ही अजयची पत्नी आहे तर आर्याची आई ______ आहे.

  • )गीता
  • )सीमा✓ योग्य
  • )नेहा
  • )निलम

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

बाहेरच्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला पिपा बेटावरील रहिवासी नेहमीच दोन वाक्यांत प्रतिसाद देतात. त्यातले एक नेहमी सत्य तर दुसरे खोटे असते, जेव्हा मिनीने विचारले, “तुमच्या बेटावरील बहुसंख्य लोक कोणत्या नाचाचा आस्वाद घेतात?” तीन बेटवासीयांनी दिलेले प्रतिसाद पुढीलप्रमाणे आहेत. अ. बहुसंख्य लोक कथकचा आस्वाद घेतात. क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते. ब. बहुसंख्य लोक कुचिपुडीचा आस्वाद घेतात. क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडत नाही. क. बहुसंख्य लोक भरतनाट्यमचा आस्वाद घेतात. क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते. पिपावरील बहुसंख्य लोक आस्वाद घेत असलेले नाचाचा प्रकार निवडा.

  • )भरतनाट्यम
  • )कथक
  • )कुचिपुडी✓ योग्य
  • )निश्चित करता येणार नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

3. अंड्याच्या कवचाचे आवरण (अ) ______ असते. यामुळे अंडे उकडायला मीठाच्या पाण्याचा उपयोग केला तर ते चवीला खारट लागते. याच कारणाने शीतकपाटात साठवताना अंडी न झाकलेल्या तीव्र गंधाच्या अन्नासोबत ठेवली तर तो अंड्यांत (ब) ______ व त्याची चव बिघडते.

  • )लवचीक व सडवतो / Flexible and addle
  • )सच्छिद्र व पाझरतो / Porous and percolate✓ योग्य
  • )न पाझरणारे व संसर्ग करतो / Impermeable and infect
  • )सच्छिद्र व सडवतो / Porous and addle

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

दिलेली माहिती वापरून संकेत प्रणाली शोधा आणि दिलेल्या पर्यायांतून rain या शब्दासाठी संकेत निवडा.

  • )8 % N
  • )8 * N
  • )18 # N✓ योग्य
  • )16 $ N

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

खालील श्रेणीतील गाळलेली संख्या शोधा.

  • )147
  • )153✓ योग्य
  • )161
  • )168

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न Quantitative Aptitude

जर ‘+’ ऐवजी ‘–’, ‘–’ ऐवजी ‘x’, ‘x’ ऐवजी ‘÷’, ‘÷’ ऐवजी ‘+’ तर 56 × 7 ÷ 13 – 11 + 15 – 8 ÷ 2 – 7 चे मूल्य किती येईल ?

  • )30
  • )60
  • )45✓ योग्य
  • )95

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

पुढील पर्यायांतून वरील युक्तिवादाचे आधारभूत गृहीतक निवडा.

  • )राजकीय घोषणा लोकांच्या दैनंदिन वर्तनावर लक्षणीय परिणाम करतात✓ योग्य
  • )कार्य आठवड्याची पुनर्मांडणी करणे अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी ठरेल
  • )कंपन्या स्वतः:च्या कामगारांना कमी कार्यकालावधी किंवा चांगला पगार देऊ शकतात
  • )कामाच्या ठिकाणी कमी ताण अनुभवणारे लोक चांगले पालक असतात

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

30 दिवसांच्या एका महिन्यात पाच शनिवार येत असतील तर त्या महिन्याचा पहिला दिवस कोणता असेल ?

  • )रविवार
  • )सोमवार
  • )बुधवार
  • )शुक्रवार✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Logical Reasoning

एका शहरात 65% लोक दूरदर्शनवर बातम्या पाहतात. 40% लोक वर्तमानपत्र वाचतात आणि 25% लोक वृत्तपत्र वाचतात आणि दूरदर्शनवर बातम्या देखील पाहतात. किती टक्के लोक दूरदर्शनवर बातम्या पाहत नाहीत किंवा वर्तमानपत्र वाचत नाहीत ?

  • )5%
  • )10%
  • )15%
  • )20%✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Quantitative Aptitude

मोठे धातुहत्यारे विकणारे दुकान मला हव्या त्या रंगाची विक्री “2 डब्यांच्या किमतीत 3 डबे” अशी करत आहे. या दुकानाच्या निष्ठाकार्डामुळे आठवड्याच्या शेवटी मला आणखी 10% सूट मिळू शकते. जर मी या आठवड्या अखेरीस रंगाचे तीन डबे खरेदी केले तर मला पूर्ण किमतीवर एकूण मिळणारी सूट निवडा.

  • )40%✓ योग्य
  • )43%
  • )55%
  • )60%

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Logical Reasoning

एकूण 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात साक्षीचे वरून 6 वे स्थान आहे. श्रुती ही साक्षीच्या 12 स्थान खाली आहे. तर श्रुती खालपासून कितव्या स्थानावर आहे ?

  • )42
  • )18
  • )43✓ योग्य
  • )19

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Quantitative Aptitude

अमित मोटार सायकल वरून पूर्वेकडे 10 km व तेवढेच अंतर दक्षिणेकडे गेला. त्यानंतर तो पूर्वेकडे वळून आणखी 5 km गेला. त्यानंतर तो केवळ डाव्या बाजूस दोन वेळा वळून प्रत्येकी 15 km अंतर गेला तर तो मूळस्थानापासून किती अंतर दूर गेला ?

  • )10 किमी
  • )7.5 किमी
  • )5 किमी✓ योग्य
  • )15 किमी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Logical Reasoning

खालील प्रश्नांत चिन्हांना पुढीलप्रमाणे वापर केलेले आहे : P @ Q म्हणजे P > Q, P φ Q म्हणजे P ≥ Q, P = Q म्हणजे P = Q, P α Q म्हणजे P < Q, P * Q म्हणजे P ≤ Q. खाली विधाने आणि अनुमाने दिली आहेत, जर तिन्ही विधाने सत्य आहे असे मानले तर दिलेल्या अनुमान I व II पैकी कोणते अनुमान निश्चितपणे सत्य आहे ते सांगा. विधाने : T = S, U @ V, V α S अनुमाने : I. V α T, II. T = V

  • )फक्त अनुमान I सत्य✓ योग्य
  • )फक्त अनुमान II सत्य
  • )अनुमाने I व II दोन्ही सत्य
  • )अनुमान एकतर I किंवा II सत्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Maharashtra

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील 'लोहार डोंगरी खाण' ______ साठी प्रसिद्ध आहे.

  • )लोह खनिज उत्पादन✓ योग्य
  • )मॅंगनीज उत्पादन
  • )बॉक्साईट उत्पादन
  • )दगडी कोळसा उत्पादन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Maharashtra

जनगणना 2011 प्रमाणे खालील नमूद महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा लोकसंख्या घनते संदर्भात चढता क्रम लावा. अ. वर्धा ब. गडचिरोली क. वाशिम ड. चंद्रपूर इ. सिंधुदुर्ग

  • )इ, ब, ड, क, अ
  • )इ, ड, ब, अ, क
  • )ब, इ, ड, अ, क✓ योग्य
  • )इ, ड, अ, क, ब

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Geography

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या यांच्या योग्य जोड्या लावा.

  • )II III IV I
  • )III I IV II
  • )IV III II I
  • )III I II IV✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Geography

महाराष्ट्रातील वनांचे प्रकार व त्या प्रदेशातील वार्षिक पर्जन्यमान यांच्या योग्य जोड्या लावा.

  • )III I IV II✓ योग्य
  • )III I II IV
  • )II I III IV
  • )IV III I II

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Geography

थंड हवेची ठिकाणे व ते कोणत्या जिल्ह्यात आहेत हे खाली दिले आहे. त्यांच्या योग्य जोड्या लावा. जिल्हा अ. सातारा ब. नंदुरबार क. पुणे ड. पालघर थंड हवेचे ठिकाण I. जव्हार II. खंडाळा III. महाबळेश्वर IV. तोरणमाळ

  • )I II III IV
  • )III II IV I
  • )II I III IV
  • )III IV II I✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Maharashtra

सन 2016-17 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यातील अतिघनदाट वनाच्छादनाचे प्रमाणानुसार जिल्ह्याचा उतरता क्रम ओळखा.

  • )गडचिरोली, गोंदिया, नांदेड, चंद्रपूर
  • )चंद्रपूर, नांदेड, गोंदिया, गडचिरोली
  • )गोंदिया, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली
  • )गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नांदेड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Maharashtra

महाराष्ट्रातील घाट व त्यांचे स्थान असलेले मार्ग यांच्या योग्य जोड्या लावा. घाट अ. आंबेनळी ब. आंबोली क. खंबाटकी ड. हनुमंते मार्ग I. पुणे - सातारा II. कोल्हापूर - कुडाळ III. महाबळेश्वर - महाड IV. बेळगांवी - सावंतवाडी

  • )IV II III I
  • )IV I II III
  • )III IV I II✓ योग्य
  • )III II I IV

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Geography

भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात केलेल्या पुढील विधानांपैकी कोणते/कोणती विधान/विधाने सत्य आहेत ? अ. कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे महाराष्ट्राचे चार हवामान उपविभाग आहेत. ब. एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी कोकणात 95 टक्के व विदर्भात 88 टक्के पाऊस नैऋत्य-मोसमी ऋतूमध्ये पडतो. क. एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी मध्य-महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुमारे 83 टक्के पाऊस नैऋत्य-मोसमी ऋतूमध्ये पडतो. ड. एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी मध्य-महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुमारे 75 टक्के पाऊस नैऋत्य-मोसमी ऋतूमध्ये पडतो. वरीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहेत ?

  • )अ फक्त
  • )अ आणि ब फक्त
  • )अ, ब आणि क✓ योग्य
  • )अ, ब आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Geography

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील “वनकुसावडे” हे ठिकाण ______ साठी प्रसिद्ध आहे.

  • )लाकूड कटाई
  • )बॉक्साईट उत्खनन
  • )पवन ऊर्जा निर्मिती✓ योग्य
  • )जलविद्युत उत्पादन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Geography

खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही ?

  • )तोरणमाळ-अस्तंभा
  • )गावीलगड-चिखलदरा
  • )आंबोली-गरमसुर✓ योग्य
  • )चिरोली-गडचिरोली

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६History

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? a. चुनीलाल मेहता यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न केला. b. डॉ. धनंजय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीचा शुभारंभ झाला. c. सन 1905 नंतर मुंबई कापड कारखानदारीमध्ये तेजी आली.

  • )a आणि b बरोबर आहेत
  • )a, b आणि c बरोबर आहेत✓ योग्य
  • )a आणि c बरोबर आहेत
  • )फक्त c बरोबर आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७History

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालक्रमानुसार रचना करा. a. मुंबई विधिमंडळात 'महार वतन सुधारण विधेयक' मांडले. / Introduced the 'Mahar Vatan Amendment Bill' in the Bombay Legislature. b. समाज समता संघाची स्थापना. / Establishment of 'Samaj Samata Sangh'. c. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना. / Establishment of 'Bahishkrit Hitkarini Sabha'. d. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. / Satyagraha for entrance to the Kalaram temple.

  • )d, c, a आणि b
  • )c, b, a आणि d✓ योग्य
  • )b, a, d आणि c
  • )b, d, a आणि c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Historyआयोगाने रद्द

25 सप्टेंबर 1930 ला चिरनेर येथील शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी झालेल्या कोणत्या कार्यकर्त्याला पोलीसांच्या खुनाचा कट केल्याच्या आरोपावरून शिक्षा दिली होती ? अ. नानासाहेब देव, त्र्यं. ब. हरोलीकर / a. Nanasaheb Dev, T.B. Harolikar ब. केशव गणेश गुप्ते, प्रभाकर रास्ते / b. Keshav Ganesh Gupte, Prabhakar Raste क. वसंत महादेव बेडेकर, नारायण धोंडो खरे / c. Vasant Mahadev Bedekar, Narayan Dhondo Khare ड. त्र्यंबक नारायण बेडेकर / d. Trimbak Narayan Bedekar

  • )अ आणि ब फक्त / a and b only
  • )ब आणि क फक्त / b and c only
  • )क आणि ड फक्त / c and d only
  • )ब, क आणि ड फक्त / b, c and d only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २९History

इ.स. 1817-18 मध्ये खालीलपैकी कोणी गोंड व इतर आदिवासींच्या जमात प्रमुखांना एकत्र आणून इंग्रजांशी लढा दिला होता ?

  • )सेवाराम घिसाडी (नांदापूर)
  • )राजे आप्पासाहेब भोसले (नागपूर)✓ योग्य
  • )आप्पासाहेब पटवर्धन (जमखंडी)
  • )चिल नाईक (हदगाव)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०History

क्रांतिकारकांच्या कार्यांविषयी योग्य जोड्या लावा. क्रांतिकारक a. डॉ. सिद्धनाथ काणे b. श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये c. सदाशिव निळकंठ जोशी d. गोविंद नारायण पोतदार कार्य I. आर्य बांधव समाज II. यवतमाळ गुप्त संघटना III. माहिम येथील बॉंब कारखाना IV. बीडचा उठाव

  • )a-IV, b-III, c-II, d-I
  • )a-III, b-IV, c-I, d-II
  • )a-II, b-I, c-IV, d-III✓ योग्य
  • )a-III, b-I, c-IV, d-II

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१History

खालील विवरणावरुन समाजसुधारक ओळखा. a. 'अरुणोदय' या आत्मचरित्राचे लेखन केले b. परमहंस सभेचे सक्रिय सदस्य बनले c. 'बायबल ट्रस्ट सोसायटी' चे संपादक होते d. इंग्रजी-मराठी या शब्दकोशाचे लेखन केले

  • )बेहरामजी मलबारी / Behramaji Malbari
  • )विष्णबुवा ब्रह्मचारी / Vishnubhuwa Brahmachari
  • )बाबा पद्मजी / Baba Padamji✓ योग्य
  • )दादोबा पांडुरंग तर्खडकर / Dadoba Pandurang Tarkhadkar

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२History

कालक्रमानुसार रचना करा. a. बॉम्बे असोसिएशन b. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन c. मद्रास महाजन सभा d. ईस्ट इंडिया असोसिएशन

  • )d c b a
  • )b d c a
  • )a d c b✓ योग्य
  • )c a d b

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५History

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी कोणत्या वृत्तपत्रात क्रांतीकारी कार्याविषयी लेखन केले होते ?

  • )केसरी (Kesari)
  • )संध्या (Sandhya)
  • )विहारी (Vihari)✓ योग्य
  • )समाज (Samaj)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

कोणत्या वर्षी सहा ते चौदा वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण (इयत्ता पहिली ते आठवी) सक्तीचे व मोफत मिळविण्याचा कायदा करण्यात आला आहे ?

  • )वर्ष – 1992
  • )वर्ष – 1952
  • )वर्ष – 2000
  • )वर्ष – 2002✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

संविधान सभेत खालील मान्यवर सदस्य सहभागी झाले होते अ. डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख ब. डॉ. राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद, हंसाबेन मेहता क. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू ड. डॉ. राजेंद्र प्रसाद, जे. बी. कृपलानी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • )केवळ अ आणि ब
  • )केवळ क आणि ड
  • )केवळ अ आणि ड
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Polity

खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे असा निर्णय दिला ? अ. आय.आर. कोएल्हो प्रकरण ब. एस.आर. बोमाई विरुद्ध भारतीय संघ क. गोलकनाथ प्रकरण ड. इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण प्रकरण वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )अ आणि क फक्त
  • )ब फक्त✓ योग्य
  • )ड आणि ब फक्त
  • )अ फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Polity

खालील विधाने विचारात घ्या विधान I : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली आणि 14 ऑक्टोबर 1994 रोजी ती अस्तित्वात आली. विधान II : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ कार्यालयात रुजू झाल्याच्या तारखेपासून 6 वर्षे किंवा 70 वर्षांचे होईपर्यंत आहे.

  • )विधान I बरोबर आहे, II चूक
  • )विधान II बरोबर आहे, I चूक
  • )दोन्ही विधाने बरोबर आहेत
  • )दोन्ही विधाने चूक आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Polity

40. खालील विधाने लक्षात घ्या : i. कलम 301 हे मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहे. ii. मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क आहे परंतु तो मूलभूत हक्क नाही. iii. केंद्रामध्ये काँग्रेसपक्षाचे सरकार असतांना 44 व्या घटनादुरुस्ती द्वारे कलम 300 (A) हे राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. वरीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहेत ?

  • )ii फक्त
  • )ii आणि iii
  • )i आणि iii✓ योग्य
  • )सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Polity

41. “धर्मनिरपेक्षता याचा अर्थ राज्याची ओळख धर्माच्या आधारावर असणार नाही व राज्य कोणत्याही धर्माच्या विरोधी राहणार नाही आणि राज्य सर्व धर्मांप्रती सारखीच श्रद्धा, विश्वास व निष्ठा बाळगेल” असे मत कोणी व्यक्त केले होते ?

  • )डॉ. राजेंद्र प्रसाद
  • )पंडित जवाहरलाल नेहरू
  • )डॉ. बी. आर. आंबेडकर
  • )डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Polity

खालीलपैकी कोणत्या कारणामुळे भारतातील एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र ठरू शकत नाही ?

  • )जर तो स्वतः निवडणुकीचा उमेदवार असेल
  • )जर त्याचे बहुमत सिद्ध व्हायचे असेल
  • )जर तो राज्यविधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असेल✓ योग्य
  • )जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Polity

आणीबाणीच्या काळात, 42 वी राज्यघटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार राज्यघटनेच्या प्रस्तावनेत हे शब्द समाविष्ट करण्यात आले.

  • )समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष✓ योग्य
  • )न्याय आणि स्वातंत्र्य
  • )समानता आणि बंधुभाव
  • )एकता आणि एकात्मता

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Polity

भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती कलमे राज्यमंत्रीमंडळाशी राज्यपालांच्या संबंधाशी संबंधित घटनात्मक तरतुदींचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त आहेत ?

  • )कलम 161, 165 आणि 166
  • )कलम 163, 164 आणि 167✓ योग्य
  • )कलम 162, 163 आणि 168
  • )कलम 164, 165 आणि 169

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Polity

जोड्या लावा - (31 डिसेंबर 1947 रोजी प्रांतानिनहाय संविधान सभेतील सदस्यत्व संख्या) अ. मद्रास ब. मुंबई क. पश्चिम बंगाल ड. मध्य प्रांत व वऱ्हाड i. 17 ii. 19 iii. 21 iv. 49

  • )अ – iv ब – ii क – i ड – iii
  • )अ – iv ब – i क – ii ड – iii
  • )अ – iv ब – iii क – ii ड – i✓ योग्य
  • )अ – iv ब – iii क – i ड – ii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Polity

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 च्या कलम 4 नुसार, जो सरकारी कर्मचारी अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीचा सदस्य नाही तो स्वतः च्या अधिन असलेल्या कर्तव्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो, त्या व्यक्तीला, ____ अशा मुदतीच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.

  • )दहा महिने परंतु ते तीन वर्षांपर्यंत वाढू शकते / Ten months but which may extend to three years
  • )आठ महिने परंतु ते दोन वर्षांपर्यंत वाढू शकते / Eight months but which may extend to two years
  • )सहा महिने परंतु ते एक वर्षांपर्यंत वाढू शकते / Six months but which may extend to one year✓ योग्य
  • )तीन महिने परंतु ते एक वर्षांपर्यंत वाढू शकते / Three months but which may extend to one year

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Polity

भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 नुसार वेगळेपण ओळखा

  • )भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य / freedom of speech and expression
  • )मालमत्ता धारणेचे स्वातंत्र्य / freedom to hold and acquire property✓ योग्य
  • )भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य / freedom to move freely throughout the territory of India
  • )शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार / freedom to assemble peaceably and without arms

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Polity

भारतीय संविधानाच्या ______ मध्ये मूलभूत कर्तव्यांच्या तरतुदी दिलेल्या आहेत.

  • )भाग – III / Part – III
  • )भाग – IV / Part – IV
  • )भाग – IV-A / Part – IV-A✓ योग्य
  • )भाग – IV-B / Part – IV-B

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Polity

जो कोणी अनुसूचित जाती किंवा जमातीच्या महिलेचे अनादर करण्याच्या किंवा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करेल किंवा शक्तीचा वापर करेल त्यास ______ काळापर्यंत वाढवण्यात येऊ शकणारी तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडाची तरतूद अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 मध्ये करण्यात आली आहे.

  • )1 महिना; दोन वर्षे / 1 month; two years
  • )2 महिने; तीन वर्षे / 2 months; three years
  • )3 महिने; चार वर्षे / 3 months; four years
  • )6 महिने; पाच वर्षे / 6 months; five years✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Polity

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 मधिल कलम ______ मध्ये पीडित आणि साक्षीदारांच्या हक्का संबंधातील तरतुदीचा सन 2016 मध्ये समावेश करण्यात आला.

  • )कलम 14 / Section 14
  • )कलम 14 A / Section 14 A
  • )कलम 15 / Section 15
  • )कलम 15 A / Section 15 A✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Polity

मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 नुसार पुढीलपैकी कोणते कलम/कलमे राज्य मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेशी संबंधित आहे/आहेत ? अ. कलम 12 ब. कलम 13 क. कलम 14 ड. कलम 15

  • )केवळ अ
  • )केवळ ब
  • )केवळ क आणि ड
  • )वरीलपैकी काहीही नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Polity

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) कायदा, 1989 नुसार अत्याचार म्हणजे अ. कलम 3 अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा ब. कलम 7 अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा क. कलम 9 अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा ड. कलम 12 अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा

  • )केवळ अ आणि ब बरोबर
  • )केवळ ब बरोबर
  • )केवळ ब आणि क बरोबर
  • )वरीलपैकी काहीही नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Polity

मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मधील कलम 36(2) नुसार आयोग किंवा राज्य आयोग मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबतची कृती ज्या दिनांकास घडल्याचे अभिकथित करण्यात आलेले असेल त्या दिनांकापासून ______ कालावधी संपल्यानंतर त्या बाबी संबंधात चौकशी करणार नाही.

  • )6 महिने
  • )1 वर्ष✓ योग्य
  • )3 वर्ष
  • )5 वर्ष

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Polity

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 अन्वये दंडाधिकाऱ्याला पीडित व्यक्ति आणि उत्तरवादी यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्यावर आणि कौटुंबिक हिंसाचार घडला आहे याची खात्री पटल्यावर, पीडीत व्यक्तिच्या बाजूने संरक्षण आदेश काढता येईल आणि उत्तरवादीस पुढील गोष्टी करण्यास मनाई करता येईल. अ. कौटुंबिक हिंसाचाराचे कृत्य करणे. ब. कौटुंबिक हिंसाचाराची कृत्य करण्यास मदत करणे व त्यास अपप्रेरणा देणे. क. पीडीत व्यक्तिशी कोणत्याही स्वरूपात संवाद साधण्याचा प्रयत्न करणे. ड. पीडीत व्यक्तिवर अवलंबून असणाऱ्या व्यक्ति, इतर नातलग किंवा तिला कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवणारी कोणतीही व्यक्ति यांना हिंसक वागणूक देणे. अचूक पर्याय निवडा

  • )पर्याय अ, ब आणि क योग्य आहेत
  • )सर्व पर्याय योग्य आहेत✓ योग्य
  • )सर्व पर्याय अयोग्य आहेत
  • )पर्याय ब, क आणि ड योग्य आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Polity

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग पुढील कार्य करते अ. मानवाधिकाराबाबत उल्लंघन झालेल्या पिडीताने सादर केलेल्या याचिकेवर स्वतः चौकशी करणे. ब. राज्य सरकारला सूचना देवून कोणत्याही तुरुंगात भेट देणे. क. मानवी हक्कांच्या क्षेत्रात संशोधन करणे आणि प्रोत्साहन देणे. ड. मानवी हक्कांबद्दल साक्षरता पसरविणे

  • )केवळ अ आणि ब बरोबर
  • )केवळ अ, ब आणि क बरोबर
  • )केवळ अ, क आणि ड बरोबर
  • )वरीलपैकी सर्व बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Polity

भारतीय संविधानातील अनुच्छेद _________ मध्ये सदसदविवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रसारा संबंधीचा स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे.

  • )कलम 23
  • )कलम 24
  • )कलम 25✓ योग्य
  • )कलम 26

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Polity

भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा.

  • )याचा 42 व्या घटना दुरुस्तीत संविधानामध्ये समावेश करण्यात आला / They are inserted into the Constitution by 42nd Amendment
  • )यामध्ये एकूण 11 कर्तव्ये दिलेली आहेत / In all 11 duties are provided
  • )ही कर्तव्ये प्रत्येकाने पाळावयाची आहेत / These duties shall be followed by every one✓ योग्य
  • )11 वे कर्तव्य 86 व्या घटना दुरुस्तीने 2002 साली समाविष्ट करण्यात आले / 11th duty inserted by 86th Constitutional Amendment in the year 2002

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Polity

मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मधील कलम 2 (d) मध्ये दिलेल्या मानवी हक्काच्या अर्थानुसार वेगळेपण ओळखा

  • )जीविताचा अधिकार / Right to life
  • )स्वातंत्र्याचा अधिकार / Right to liberty
  • )समानतेचा अधिकार / Right to equality
  • )न्यायालयाद्वारे अमलात न आणण्याजोगे अधिकार / Rights which are not enforceable by the courts✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Maharashtra

दि. 14 ऑगस्ट 2008 रोजीचा महात्मागांधी तंटामुक्त गाव मोहीम राज्यामध्ये राबविण्याबाबतचा महाराष्ट्र शासन निर्णयातील परिच्छेद 3 नुसार दिलेल्या मोहिमेचे स्वरूप व मोहिमकेंद्रित तत्त्व यांच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा

  • )आर्थिक / Economic✓ योग्य
  • )दिवाणी / Civil
  • )महसूली / Revenue
  • )फौजदारी / Criminal

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Polity

हुंडा प्रतिबंध अधिनियम, 1961 मधील कलम ______ मध्ये हुंडा प्रतिबंधी अधिकाऱ्याच्या नेमणुकीची तरतूद दिलेली आहे.

  • )कलम 8
  • )कलम 8A
  • )कलम 8B✓ योग्य
  • )कलम 9

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम ______ नुसार पोलीस अधिकाऱ्याने त्रासदायक रीतीने प्रवेश करणे, झडती घेणे, अटक करणे यासंबंधात पोलीस अधिकाऱ्याला शिक्षा करण्याची तरतूद आहे.

  • )कलम 143
  • )कलम 143A
  • )कलम 145
  • )कलम 147✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम ______ मध्ये पायवाट न अडविण्याबाबतची तरतूद दिलेली आहे.

  • )कलम 102
  • )कलम 103✓ योग्य
  • )कलम 104
  • )कलम 105

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, नुसार सर्वात कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी कोण आहे ?

  • )तलाठी
  • )पोलीस शिपाई✓ योग्य
  • )कोतवाल
  • )अंमलदार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कोणते कलम कर्तव्य बजावण्यात हयगय वगैरे केल्याबद्दल विभागाद्वारे पोलीस दलातील दुय्यम दर्जाच्या व्यक्तींना शिक्षा करण्याशी संबंधीत आहे ?

  • )कलम 24 / Section 24
  • )कलम 23 / Section 23
  • )कलम 25 / Section 25✓ योग्य
  • )कलम 26 / Section 26

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम ______ मध्ये पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये दिलेली आहेत.

  • )कलम - 61 / Section - 61
  • )कलम - 62 / Section - 62
  • )कलम - 63 / Section - 63
  • )कलम - 64 / Section - 64✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम ______ नुसार आयुक्त किंवा अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या स्थानात ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार दिलेला आहे.

  • )कलम 34
  • )कलम 35
  • )कलम 36✓ योग्य
  • )कलम 37

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 33 नुसार सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या विनियमासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियमन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे ?

  • )जिल्हा दंडाधिकारी
  • )जिल्हा न्यायाधीश
  • )पोलीस अधिकारी
  • )आयुक्त✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Polity

भारतीय दंड संहिता 1860, मधील कलम ________ नुसार जर कोणी कबुलीजबबाब जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी गैर परिरोध केला तर तो शिक्षेस पात्र असतो.

  • )कलम 346
  • )कलम 347
  • )कलम 348✓ योग्य
  • )कलम 349

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Polity

भारतीय दंड संहितेतील कलम 124-अ कशाशी संबंधित आहे ?

  • )राजद्रोह✓ योग्य
  • )युद्ध पुकारणे
  • )शस्त्र गोळा करणे
  • )बंडाची चिथावणी देणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Polity

भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 354 मध्ये खालील अपराध दिलेला आहे

  • )अपहरण
  • )कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपहरण करणे
  • )फौजदारीपात्र बलप्रयोग
  • )स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Polity

भारतीय दंड संहितेच्या कलम ________ नुसार, दोन किंवा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी भांडण केले, सार्वजनिक शांतता बिघडवली तर ते ________ साठी दोषी आहेत.

  • )159/ मारामारी✓ योग्य
  • )160/ राजद्रोह
  • )170/ षडयंत्र
  • )180/ विश्वासभंग

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Polity

भारतीय दंड संहिता 1860, मधील तरतुदीनुसार जोड्या लावा. कलम i. 300 ii. 304-ब iii. 312 iv. 319 तरतुद A. दुखापत B. गर्भस्त्राव घडवून आणणे C. खून D. हुंडा बळी

  • )i-A ii-C iii-D iv-B
  • )i-D ii-A iii-B iv-C
  • )i-B ii-C iii-A iv-D
  • )i-C ii-D iii-B iv-A✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Polity

भारतीय दंड संहिता 1860, मधील कलम ________ नुसार लोक सेवकास खोटी माहिती पुरवल्यास तो गुन्हा ठरतो.

  • )कलम 175 / Section 175
  • )कलम 177 / Section 177✓ योग्य
  • )कलम 180 / Section 180
  • )कलम 181 / Section 181

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Polity

भारतीय दंड संहिता 1860, मधील तरतुदीनुसार जोड्या लावा. कलाम i. 78 ii. 81 iii. 86 iv. 88 तरतुद A. मृत्यु घडवून आणण्याचा उद्देश नसताना व्यक्तीच्या हितासाठी तिच्या संमतीने सद्भावपूर्वक केलेली कृती B. ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढवलेल्या व्यक्तीने केला असता C. अपहानी करण्याचा संभव असलेली पण गुन्हेगारी उद्देशाशिवाय आणि अन्य अपहानी होऊ नये म्हणून केलेली कृती D. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाला किंवा आदेशाला अनुसरून केलेली कृती

  • )i-A ii-B iii-C iv-D
  • )i-D ii-C iii-B iv-A✓ योग्य
  • )i-B ii-D iii-A iv-C
  • )i-A ii-B iii-D iv-C

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Polity

भारतीय दंड संहिता 1860 कलम ______ नुसार सात वर्षांवरील व बारा वर्षांखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती अपराध होत नाही.

  • )कलम 80 / Section 80
  • )कलम 81 / Section 81
  • )कलम 82 / Section 82
  • )कलम 83 / Section 83✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Polity

भारतीय दंड संहिता, 1860 मधील तरतुदीनुसार जोड्या लावा. कलाम i. 141 ii. 146 iii. 152 iv. 159 तरतूद A. बेकायदेशीर जमाव B. दंगा करणे C. दंगल D. लोक सेवक दंगा इत्यादी शमवीत असताना त्याच्यावर हल्ला करणे किंवा त्याला अटकाव करणे

  • )i-A ii-B iii-D iv-C✓ योग्य
  • )i-A ii-B iii-C iv-D
  • )i-B ii-A iii-D iv-C
  • )i-D ii-A iii-C iv-B

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Polity

म्हणजे, भारतीय दंड संहितेच्या कलम नुसार एखाद्या व्यक्तीला निवारा, अन्न, पेय, पैसा, दारुगोळा आणि वाहतुकीची साधने किंवा कायद्याची भीती टाळण्याचे कोणतेही साधन पुरवणे.

  • )लाड करणे / 100
  • )भडकावणे / 42
  • )आश्रय देणे / 52 – अ✓ योग्य
  • )मार्गदर्शन करणे / 53

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कोणत्या कलमा खाली खाजगी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस अटक करू शकतो?

  • )कलम 42
  • )कलम 43✓ योग्य
  • )कलम 44
  • )कलम 45

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Polity

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 6 नुसार किती प्रकारची फौजदारी न्यायालये असतात?

  • )दोन
  • )तीन
  • )चार✓ योग्य
  • )पाच

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील जामीन व बंधपत्रे याबाबतच्या तरतुदींच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा.

  • )कलम 436
  • )कलम 437
  • )कलम 438✓ योग्य
  • )कलम 439

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील कलम मध्ये न्यायालयाला दोषारोपात फेरबदल करण्याचा अधिकार दिलेला आहे.

  • )कलम 211
  • )कलम 213
  • )कलम 215
  • )कलम 216✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील कलम 2 (वअ) मधील संज्ञा 'बळी' च्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा.

  • )बळी
  • )बळीचे पालक
  • )बळीचे मित्र✓ योग्य
  • )बळीचे कायदेशीर वारस

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार जोड्या लावा. कलम i. 170 ii. 172 iii. 173 iv. 174 तरतुद अ. अन्वेषणातील कार्यवाहीचा रोजनामा ब. जेव्हा पुरावा पुरेसा असेल तेव्हा दंडाधिकाऱ्याकडे पाठवावयाची प्रकरणे क. आत्महत्या, इत्यादीबाबत पोलिसांनी चौकशी करणे व अहवाल देणे ड. अन्वेषण पूर्ण झाल्यावर पोलीस अधिकाऱ्याचा अहवाल

  • )i-अ ii-क iii-ड iv-ब
  • )i-ब ii-क iii-ड iv-अ
  • )i-ब ii-ड iii-क iv-अ
  • )i-ब ii-अ iii-ड iv-क✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील कलम 196 नुसार देशविरोधी अपराधांबद्दल व असा अपराध करण्याविषयीच्या फौजदारीपात्र कटाच्या खटल्याच्या अनुषंगाने वेगळेपण ओळखा.

  • )भारतीय दंड संहिता, 1860 कलम 120 B / The Indian Penal Code, 1860 Section 120 B
  • )भारतीय दंड संहिता, 1860 कलम 153 A / The Indian Penal Code, 1860 Section 153 A
  • )भारतीय दंड संहिता, 1860 कलम 495 / The Indian Penal Code, 1860 Section 495✓ योग्य
  • )भारतीय दंड संहिता, 1860 कलम 505 / The Indian Penal Code, 1860 Section 505

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील कलम ______ मध्ये दखलपात्र अपराध करण्यास प्रतिबंध करण्यासाठी अटक करण्याचा अधिकार पोलीस अधिकाऱ्यास दिलेला आहे.

  • )कलम 149 / Section 149
  • )कलम 150 / Section 150
  • )कलम 151 / Section 151✓ योग्य
  • )कलम 152 / Section 152

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 20 नुसार राज्य सरकार एखाद्या जिल्ह्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून किती व्यक्तींची नियुक्ती करू शकते ?

  • )पाच पेक्षा कमी / less than five
  • )सात पेक्षा कमी / less than seven
  • )दहा पेक्षा कमी / less than ten
  • )राज्य शासनास योग्य वाटतील तितक्या व्यक्तींची / as many persons as State Government thinks fit✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील प्रकरण ______ मध्ये विवक्षित प्रकरणांमधील सहाय्यासाठी अन्योन्य व्यवस्था आणि संपत्तीच्या जप्तीसाठी आणि समपहरणासाठी कार्यपद्धती दिलेली आहे.

  • )प्रकरण 7A / Chapter 7A✓ योग्य
  • )प्रकरण 7B / Chapter 7B
  • )प्रकरण 7C / Chapter 7C
  • )प्रकरण 8 / Chapter 8

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Polity

भारतीय पुरावा कायद्यानुसार खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाही/त ? अ. लेखन एक दस्तऐवज आहे ब. मुद्रित, लिथोग्राफ केलेले किंवा छायाचित्रित केलेले शब्द दस्तऐवज आहेत क. नकाशा हा दस्तऐवज नाही ड. धातूच्या पट्टीवरील किंवा दगडावरील शिलालेख हा एक दस्तऐवज आहे इ. व्यंगचित्र हा दस्तऐवज नाही

  • )अ आणि ड / A and D
  • )क आणि इ / C and E✓ योग्य
  • )ब आणि ड / B and D
  • )अ आणि ब / A and B

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Polity

पुरावा कायद्याचे कलम 137 हे पुढील बाब सांगते

  • )सरतपासणी / Examination-in-Chief
  • )उलट तपासणी / Cross examination
  • )पुनर्तपासणी / Re-examination
  • )वरीलपैकी सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Polity

भारतीय पुरावा अधिनियम, 1872 प्रमाणे दस्तऐवज म्हणजे काय ?

  • )अ आणि ब / a and b
  • )क आणि ड / c and d
  • )फक्त अ / a only
  • )अ, ब, क, ड / a, b, c, d✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Polity

भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 137 नुसार साक्षीदाराची मुख्य तपासणी म्हणजे _________ ने केलेली तपासणी असते.

  • )विरुद्ध पक्षाद्वारे / the opposite party
  • )उलटतपासणी नंतर त्याला बोलावणाऱ्या पक्षाद्वारे / the party who called him following the cross examination
  • )त्याला बोलावणाऱ्या पक्षाद्वारे / the party who calls him✓ योग्य
  • )तपास करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याद्वारे / the police officer who is conducting investigation

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Polity

भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 135 नुसार, न्यायालयाच्या समोर हजर करण्याचा आणि साक्षीदारांची तपासणी करण्याचा आदेश कायद्याद्वारे नियंत्रित केला जातो परंतु असा कोणताही कायदा नसताना, ________ च्या विवेकबुद्धीनुसार ठरवू शकतो.

  • )अर्जदाराचे वकील
  • )बचावपक्षाचे वकील
  • )न्यायालय✓ योग्य
  • )तक्रारदार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Polity

भारतीय पुरावा अधिनियम, 1872 मधील कलम ________ नुसार पोलीस अधिकाऱ्याकडे दिलेला कोणताही कबुलीजबोब कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तिविरुद्ध साबित करता येणार नाही.

  • )कलम 22
  • )कलम 24
  • )कलम 25✓ योग्य
  • )कलम 26

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Polity

भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ________ नुसार, जे प्रकरण ________ खाली नमूद आहे, जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही वस्तुस्थितीचे अस्तित्व आहे हे सिद्ध करण्यास बांधील असते, तेव्हा असे म्हणतात की पुराव्याचा भार त्या व्यक्तीवर असतो.

  • )47/V
  • )101/VII✓ योग्य
  • )100/VIII
  • )96/VI

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Polity

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गृहीतक मानणेकरिता मृत्यू हा लग्नानंतर पुढील ______ वर्षांचा आत झालेला पाहिजे.

  • )5
  • )6
  • )7✓ योग्य
  • )10

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Polity

भारतीय पुरावा अधिनियम, 1872 मधील कलम ______ मध्ये जी व्यक्ती मरण पावली आहे किंवा जिचा शोध लागू शकत नाही अशा व्यक्तीने केलेले संबद्ध तथ्याचे कथन हे, ज्यामध्ये संबद्ध असते अशा प्रकरणाची तरतूद दिलेली आहे.

  • )कलम 30 / Section 30
  • )कलम 31 / Section 31
  • )कलम 32 / Section 32✓ योग्य
  • )कलम 38 / Section 38

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Polity

भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ______ नुसार, जर शासकीय अधिकाऱ्याचे असे मत असेल की त्याला कोणत्याही व्यक्ती द्वारे अधिकृत विश्वासात केलेले संप्रेषण जर सार्वजनिकरित्या उघड केले तर ______ बाधक ठरेल, तर अशा अधिकाऱ्याला खुलासा करण्यास भाग पाडले जाणार नाही.

  • )124/सार्वजनिक हितास / 124/public interest✓ योग्य
  • )118/सार्वजनिक मतस / 118/public opinion
  • )112/वैयक्तीक हितास / 112/personal interest
  • )126/वैयक्तीक मतस / 126/personal opinion

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2022-psi-paper-ii