स्पर्धाAI

MPSC गट ब २०२२

Common Paper I · ९६ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

जोड्या जुळवा. a. गणवाचक विशेषणे b. क्रमवाचक विशेषणे c. पृथकत्ववाचक विशेषणे d. आवृत्तीवाचक विशेषणे i. प्रथम, विसावा, दुसरा ii. हरएक, दरएक, एकेक iii. हजार, कोटी, अर्धा iv. एकेरी, त्रिगुणी, चौपट

  • )a – iv b – iii c – ii d – i
  • )a – iii b – i c – ii d – iv✓ योग्य
  • )a – ii b – iv c – iii d – i
  • )a – iii b – iv c – i d – ii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 'मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले.'

  • )उभयविध क्रियापद
  • )द्विकर्मक क्रियापद✓ योग्य
  • )शक्य क्रियापद
  • )प्रयोजक क्रियापद

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

जी सहाय्यक क्रियापदे सर्व काळी, सर्व पुरुषी चालत नाहीत त्यांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हणतात ?

  • )मुख्य क्रियापदे
  • )गौण क्रियापदे✓ योग्य
  • )उभयविध क्रियापदे
  • )संयुक्त क्रियापदे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

साधित क्रियाविशेषणे व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. a. नामसाधित b. विशेषणसाधित c. अव्ययसाधित d. समासघटित i. शास्त्रदृष्ट्या, दररोज ii. पूर्वीचा, आरंभीला iii. एकदा, सर्वत्र iv. सकाळी, प्रथमतः

  • )a – iv b – iii c – i d – ii
  • )a – iii b – ii c – iv d – i
  • )a – iv b – iii c – ii d – i✓ योग्य
  • )a – ii b – iv c – iii d – i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील क्रियाविशेषणांच्या त्यांच्या प्रकारानुसार जोड्या लावा. 'अ' गट a. स्थलवाचक b. कालवाचक c. संख्यावाचक d. गुणवाचक 'ब' गट i. जसे, तसे, उगीच ii. आज, उद्या, काल iii. पहिला, दोनदा, चौपट iv. समोर, वर, खाली

  • )a b c d (1) iv ii iii i✓ योग्य
  • )a b c d (2) ii iv i iii
  • )a b c d (3) iv i iii ii
  • )a b c d (4) iii ii i iv

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'गळ्याला तात लावणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

  • )गुप्त ठेवणे
  • )प्राणांतिक संकटात घालणे✓ योग्य
  • )आत्महत्या करायला लावणे
  • )समूळ नायनाट करणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'हात ओला करणे' या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे ?

  • )हात धुऊन घेणे
  • )हातपाय गाळणे
  • )पैसा मिळणे✓ योग्य
  • )हातावर पाणी टाकणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'अनेक जणांवर सोपवलेले काम कोणीच नीट पार पाडत नाहीत.' या अर्थाची म्हण ओळखा.

  • )बिगारीचे घोडे तरवटाचा फोक
  • )बारभाईची शेती काय लागेल हाती✓ योग्य
  • )भ्रमाची पुडी नि हिंगाचा वास
  • )भरवशाची मोट पाण्यात लोट

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

म्हण पूर्ण करा. 'मोले घातले राडाया ________.'

  • )हासती साऱ्या बाया
  • )नाही आसू नाही माया✓ योग्य
  • )सारे पडती पाया
  • )सारे गेले वाया

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

'गंगेचे पाणी घेऊन गंगोदक अर्घ्य' या म्हणीच्या अर्थासारखी दुसरी म्हण पर्यायातून निवडा.

  • )घरोघर मातीच्या चुली
  • )जशी देणावळ तशी घेणावळ
  • )गुळाचा गणपती, गुळाचा नैवेद्य✓ योग्य
  • )गुरुची विद्या गुरुस फळली

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय ?' या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ?

  • )बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध असतो ?
  • )बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काहीच नसतो.✓ योग्य
  • )बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध असतो.
  • )बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध असतो का ?

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Marathi Language

संयुक्त वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. 'माझा अभ्यास झाला नाही म्हणून मी शाळेत जाणार नाही.'

  • )माझा अभ्यास न झाल्यामुळे शाळेत जाणार नाही.
  • )मी शाळेत जाणार नाही कारण माझा अभ्यास झाला नाही.✓ योग्य
  • )माझा अभ्यास झाला नाही मी शाळेत जाणार नाही.
  • )माझा अभ्यास झाला असता तर मी शाळेत गेलो असतो.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या व नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दांस ___________ म्हणतात.

  • )उद्देश
  • )पूरक
  • )समानाधिकरण✓ योग्य
  • )विधेयपूरक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

'ज्याचे आपल्यावर उपकार आहेत, त्याची आपण स्वाभाविकपणे स्तुती करतो' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

  • )सुताने स्वर्ग गाठणे
  • )कोल्हेकुई करणे
  • )वर्चस्व प्रस्थापित करणे
  • )ज्याची खावी भाकरी, त्याची करावी चाकरी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य नाही ? a. गतीयुक्त आणि व्यावहारिक लिपी b. वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण c. दुहेरी लिपीचिन्हांचा समावेश d. ऱ्हस्व आणि दीर्घ मात्रांची व्यवस्था

  • )फक्त a आणि b
  • )फक्त b आणि d
  • )फक्त c✓ योग्य
  • )फक्त b

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा. 'सदाचार' a. सद् + आचार b. सत् + आचार c. सदा + चार d. सच्च् + आचार

  • )फक्त a बरोबर
  • )फक्त b बरोबर✓ योग्य
  • )a आणि b बरोबर
  • )c आणि d बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Marathi Languageआयोगाने रद्द

समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा. a. सुधा, तनया, आत्मजा b. सरिता, कोमल, राधू c. अनुज, उद्योगी, अनिल d. पाय, पान, पाणी

  • )फक्त a बरोबर बाकी सर्व चूक
  • )फक्त d बरोबर बाकी सर्व चूक
  • )a व c बरोबर
  • )b व d बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २१Marathi Language

देवालय, हिमालय हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ?

  • )विसर्ग संधी
  • )स्वर संधी✓ योग्य
  • )व्यंजन संधी
  • )हल संधी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

'शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले.' या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा.

  • )शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काहीच केले नाही.
  • )शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काहीच केले नाही असे नाही.
  • )शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी थोडे केले नाही.
  • )शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काही करायचे बाकी ठेवले नाही.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

'विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

  • )केवल वाक्य
  • )संयुक्त वाक्य
  • )मिश्र वाक्य✓ योग्य
  • )गौण वाक्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Languageआयोगाने रद्द

खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषणांचा गट ओळखा ? a. दररोज, प्रतिक्षण b. दुहेरी, तिहेरी c. पहिला, दुसरा d. असला, तसला

  • )फक्त a बरोबर
  • )फक्त c बरोबर
  • )फक्त a आणि b बरोबर
  • )फक्त d बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २६Marathi Language

खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखा. a. आगंतुक × आमंत्रित b. कृपण × शूर c. अनुज × अनुचित d. शुद्धपक्ष × वद्यपक्ष

  • )b व c अयोग्य जोडी✓ योग्य
  • )c व d अयोग्य जोडी
  • )फक्त c अयोग्य जोडी
  • )फक्त d अयोग्य जोडी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Marathi Language

‘भाकरी करण्याची लाकडी परात’ या शब्दसमुहासाठी खालीलपैकी योग्य शब्द ओळखा.

  • )काटवट
  • )काथवट✓ योग्य
  • )कातवट
  • )घंगाळ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Marathi Language

पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत ? a. कान, चाक, आग b. घर, गाव, काम c. गुरु, पुष्प, अग्नि d. पोट, रेडा, चिमणी

  • )फक्त a बरोबर
  • )फक्त a आणि b बरोबर✓ योग्य
  • )फक्त c बरोबर
  • )फक्त c आणि d बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Marathi Language

परकीय शब्द व भाषा यांच्या योग्य जोड्या जुळवा. a. अरबी b. जपानी c. कन्नड d. रशियन i. हाराकिरी ii. स्फूटनिक iii. फायदा iv. टपाल

  • )a – iii b – iv c – ii d – i
  • )a – iv b – iii c – i d – ii
  • )a – iii b – i c – iv d – ii✓ योग्य
  • )a – ii b – i c – iv d – iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Marathi Language

'आंबा चवीला गोड होता.' या वाक्यातील चतुर्थीच्या उपपदार्थाचा अर्थ काय ?

  • )परिणाम
  • )मूल्य
  • )विषय✓ योग्य
  • )योग्यता

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Marathi Language

तद्धित प्रत्यय कोणत्या शब्द जातींना लागतात ? a. क्रियापद b. नाम c. विशेषण d. अव्यये

  • )फक्त a बरोबर
  • )फक्त b व c बरोबर
  • )फक्त d बरोबर
  • )b, c व d बरोबर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Marathi Language

ऊकारान्त स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्यरूप एकारान्त होते व अनेकवचनात ________ होते.

  • )याकारान्त
  • )वाकारान्त✓ योग्य
  • )आकारान्त
  • )ईकारान्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Marathi Language

जोड्या लावा. 'अ' गट a. कर्तरी प्रयोग b. कर्मणी प्रयोग c. भावे प्रयोग d. संकीर्ण प्रयोग 'ब' गट i. रामाने रावणास मारले. ii. तू त्याला न्यायचे होतेस. iii. त्याने कविता लिहिली. iv. तो जातो.

  • )iv iii i ii✓ योग्य
  • )iii iv i ii
  • )ii i iv iii
  • )iv i ii iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

लोकशाहीचे प्राणतत्त्व कोणते ?

  • )माध्यमांशी इमान राखणे
  • )विचारस्वातंत्र्य✓ योग्य
  • )विद्यावंत असणे
  • )समाजाचे अंतिम कल्याण

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Marathi Language

प्रत्येक माणसाच्या मनावर कशाची छाया असते ?

  • )समाजाशी द्रोह करण्याची
  • )स्वार्थाखातर सत्याकडे पाठ फिरविण्याची
  • )पूर्वसंस्कारांची, परंपरागत मूल्यसरणीची✓ योग्य
  • )आत्मवंचना होण्याची

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Marathi Language

शास्त्रीय दृष्टी आत्मसात करण्याचा एकमेव उपाय कोणता ?

  • )संकुचित दृष्टी ठेवणे
  • )पूर्वग्रहांवर मात करणे✓ योग्य
  • )सदैव अनुसंधान राखणे
  • )कार्यक्षेत्राच्या मर्यादा ओळखणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Marathi Language

निष्पक्षपातीपणे विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी काय केले पाहिजे ? अ. इतिहास क्रमाचे स्थूल मानाने पण साकल्याने ज्ञान करून घेणे. ब. सामाजिक जीवनातील प्रवाहाशी समरस होणे. क. सभाभैदान गाजवणे.

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )ब आणि क
  • )अ आणि ब✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Marathi Language

सामाजिक जीवनात समरस होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज नाही असे लेखकाला वाटते ?

  • )आपली अभ्यासिका सोडून सभामैदान गाजवावे
  • )राजकारणाच्या आखाड्यात उतरावे
  • )आर्थिक संघर्षात सहभागी व्हावे
  • )वरील तीनही पर्याय योग्य आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Marathi Language

खालीलपैकी देशी शब्द कोणता ? a. कोवळा b. भगवान c. ढेकूण d. बटन

  • )a आणि b बरोबर
  • )c आणि d बरोबर
  • )फक्त c बरोबर✓ योग्य
  • )फक्त d बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Marathi Language

शुद्ध शब्दांचा गट ओळखा. a. कर्मेद्रिय, कबुलिजबाब, प्रतीकात्मक b. कर्मेंद्रिय, कबुलीजबोब, प्रतीकात्मक c. उच्छृंखल, असेतुहिमालय, गप्पिष्ट d. उच्छृंखल, असेतूहिमालय, गप्पीष्ट

  • )a व c बरोबर
  • )b व d बरोबर
  • )a, b, c बरोबर
  • )b व c बरोबर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Marathi Language

संख्याविशेषणे आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावा. 'अ' गट a. संख्यावाचक b. क्रमवाचक c. आवृत्तीवाचक d. अनिश्चित 'ब' गट i. दुप्पट, चौपट, दुहेरी, तिहेरी ii. दोघे, तिघे, पाची, साती iii. थोडा, फार, सर्व, इतर iv. पहिला, पाचवा, दहावा, शंभरावा

  • )ii iv i iii✓ योग्य
  • )iii ii i iv
  • )iv iii ii i
  • )ii i iv iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Marathi Language

'अवग्रह' हे विरामचिन्ह कधी वापरले जाते ?

  • )अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचवण्यासाठी✓ योग्य
  • )उच्चारात खंड आहे हे दाखवण्यासाठी
  • )दोन शब्द जोडण्यासाठी
  • )एखाद्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करण्यासाठी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Marathi Language

की, ता, ई, ई हे प्रत्यय लागून साधलेली भाववाचक नामे कोणत्या लिंगी असतात ?

  • )पुल्लिंगी
  • )स्त्रीलिंगी✓ योग्य
  • )नपुंसकलिंगी
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Marathi Language

शब्दयोगी अव्यये व त्याची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. a. विशेषणसाधित b. धातुसाधित c. क्रियाविशेषणसाधित d. संस्कृतशब्दसाधित i. देखील, लागी. ii. जवळून, मागून. iii. योग्य, विरुद्ध. iv. पर्यंत, सक्षम.

  • )a – iii b – iv c – i d – ii
  • )a – iv b – iii c – ii d – i
  • )a – iii b – i c – ii d – iv✓ योग्य
  • )a – ii b – i c – iv d – iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Maharashtra

खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य केवलप्रयोगी अव्ययाचे नाही ? a. ती वाक्याच्या आरंभी येतात. b. ती वाक्याचा भाग नसल्याने त्यांना विभक्ति प्रत्यय नसतो. c. एकच उद्गारवाचक शब्द विविध भावना व्यक्त करतो. d. केवलप्रयोगी अव्ययांचे प्रकार त्याच्या स्वरूपावरून ठरतात.

  • )फक्त b बरोबर
  • )फक्त c बरोबर
  • )फक्त a व c बरोबर
  • )फक्त d बरोबर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Maharashtra

'शूलपाणी', 'मनधन', 'काळतोंड्या' हे शब्द बहुव्रीही समासाच्या कोणत्या उप-प्रकाराचे आहेत ?

  • )चतुर्थी बहुव्रीही
  • )पंचमी बहुव्रीही
  • )षष्ठी बहुव्रीही✓ योग्य
  • )सप्तमी बहुव्रीही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Marathi Language

जोड्या जुळवा. 'अ' गट a. सिद्ध शब्द b. साधित शब्द c. सामासिक शब्द d. अभ्यस्त शब्द 'ब' गट i. घरघर, हळूहळू, शेजारीपाजारी ii. देवघर, पोळपाट, नीळकंठ iii. शिलाई, लढाऊ, पुजारी iv. जा, ये, कर, खा, पी, घे

  • )iv iii ii i✓ योग्य
  • )i ii iii iv
  • )ii iii iv i
  • )iii i ii iv

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Maharashtra

तत्पुरुष समास व उदाहरणे यांच्या जोड्या जुळवा. a. तृतीया तत्पुरुष b. चतुर्थी तत्पुरुष c. षष्ठी तत्पुरुष d. सप्तमी तत्पुरुष i. व्याहीभोजन, वाटखर्च ii. घरधंदा, विद्यापारंगत iii. उपासमार, दयार्द्र iv. ज्ञानयज्ञ, गणपती

  • )a – iii, b – i, c – ii, d – iv
  • )a – iv, b – iii, c – ii, d – i
  • )a – ii, b – i, c – iii, d – iv
  • )a – iii, b – i, c – iv, d – ii✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३English Language

The doctor asked the patient, “Did you eat anything this morning ?” (Change into indirect speech)

  • )The doctor asked the patient if he ate anything that morning.
  • )The doctor asked the patient that whether he had eaten anything that morning.
  • )The doctor asked the patient whether he had been eaten anything that morning.
  • )The doctor asked the patient whether he had eaten anything that morning.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५English Language

Identify the correct conditional sentence/s. a. If it rains, we would stay indoors. b. If the thief would come into my room, I would hit him. c. If you had come five minutes earlier, you would have got a seat.

  • )Only a
  • )Only b
  • )Only c✓ योग्य
  • )Only b and c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७English Language

Identify the voice of the following sentences from options given below : a. Do not insult the poor. b. Let the poor be not insulted.

  • )a-Passive voice, b-Active voice
  • )a-Active voice, b-Passive voice✓ योग्य
  • )both a and b are in Active voice
  • )both a and b are in Passive voice

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०English Language

Which one of the following sentences is wrong/incorrect ? a. Those sort of messages are not to my taste. b. Those sort of messages is not to my taste.

  • )a is wrong b is correct✓ योग्य
  • )a is correct b is wrong
  • )both a and b are correct
  • )both a and b are incorrect

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१English Language

Why did he punish you ? Which of the following options is the correct passive voice of the above sentence ? a. Why you were punished by him ? b. Why was he punished by you ? c. Why were you punished by him ? d. Who was punished by you ?

  • )a only
  • )a and b only
  • )c only✓ योग्य
  • )c and d only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८English Language

Identify the correct sentence/s. a. The animals which destroy our health property must be destroyed. b. Before building new colonies we can see the builders reviving the process of civilization. c. We must be friendly towards animals even if they are vicious. d. Some of the animals serve human beings affectionately.

  • )Only a and b
  • )Only b, c and d
  • )Only a and c
  • )Only a, b and d✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९English Language

According to the passage which of the following is/are correct ? a. The domesticated animals are as humble and helpless as the poor labourers b. The animals which serve man are our equal companions. c. Some of the animals are capable of devoting themselves to God.

  • )Only a and b✓ योग्य
  • )Only b and c
  • )Only a and c
  • )Only c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६English Language

Read the sentences carefully and find out which one of the two is incorrect/correct from the options given below. a. The insurance company has to pay for the damages to my scooter. b. The insurance company has to pay for the damage to my scooter.

  • )a is incorrect b correct✓ योग्य
  • )both a and b are incorrect
  • )a is correct b is incorrect
  • )both a and b are correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८English Language

Read the following sentences carefully and find out the correct answer from the options below. a. John is my cousin brother. b. John is my cousin.

  • )a is incorrect b is correct✓ योग्य
  • )a is correct b is incorrect
  • )both a and b are incorrect
  • )both a and b are correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९English Language

The meaning of the word ‘Laissez – Faire’ is expressed by the phrase

  • )Capable of being clearly read
  • )Capable of being clearly heard
  • )Non-interference of government in trade, commerce, industry etc.✓ योग्य
  • )The government of a few select people

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०English Language

Choose the option showing the correct meaning of the words underlined. a. The road winds up the mountain. b. The campaign was winding down. c. He is still trying to get his wind back.

  • )a – turns, b – came to an end, c – breath✓ योग्य
  • )a – brings to close, b – twists, c – breeze
  • )a – irritates, b – conclude, c – gale
  • )a – wraps, b – twisted, c – breathe

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Current Affairs

भारत, मोझांबिक, टांझानिया त्रिपक्षीय सराव (IMT TRILAT) संयुक्त सागरी सरावाची पहिली आवृत्ती येथे 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

  • )नवी दिल्ली
  • )दार इस सलाम✓ योग्य
  • )मापुटो
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Current Affairs

फिफा U-17 महिला जागतिक चषक 2022 बाबत अयोग्य कथन ओळखा.

  • )फिफा U-17 महिला जागतिक चषक 2022 चा आयोजक भारत आहे.
  • )फिफा U-17 महिला जागतिक चषक दर तीन वर्षांनी आयोजित करण्यात येते.✓ योग्य
  • )फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन द्वारे ही स्पर्धा आयोजित केली जाते.
  • )फिफा U-17 महिला जागतिक चषक 2022 ही फिफा U-17 महिला जागतिक चषकाची सातवी आवृत्ती आहे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Current Affairs

84. योग्य जोड्या जुळवा. (राज्य) अ. आंध्रप्रदेश ब. गुजरात क. केरळ ड. महाराष्ट्र (लोकनृत्य) i. मोहिनीअट्टम ii. दहिकाला iii. विलासिनी नाट्यम iv. भवाई

  • )i ii iii iv
  • )ii iii iv i
  • )iii iv i ii✓ योग्य
  • )iv i ii iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Current Affairs

85. ग्रंथ आणि लेखक यांच्या जोड्या लावा. [2022 बुकर पुरस्कार] 'अ' (ग्रंथ) अ. ग्लोरी ब. स्माल थिंग्ज लाईक दीज क. ट्रियाकल वॉकर ड. द सेवन मून्स अँट माली अलमाईडा 'ब' (लेखक) i. शेहन करुणातिलका ii. ॲलन गार्नर iii. क्लेअर किगन iv. नो वायलेट बुलावायो

  • )i iii iv ii
  • )iv iii ii i✓ योग्य
  • )iv ii iii i
  • )i iv ii iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Geography

खालीलपैकी कोणती राज्ये महादयी नदीच्या पाणी वाटपाच्या वादात सहभागी आहेत ? (अ) गोवा (ब) कर्नाटक (क) तेलंगाणा (ड) आंध्रप्रदेश

  • )फक्त ब, क आणि ड
  • )फक्त अ आणि ब✓ योग्य
  • )फक्त क आणि ड
  • )अ, ब, क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Current Affairs

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला फ्रेंच सरकारचा सर्वोच्च सन्मान - शेवॉलिअर डे आय ऑर्ड्रे डेस आर्ट एट डेस पुरस्काराने 2022 मध्ये सन्मानित करण्यात आले आहे ?

  • )करुणा साईराम
  • )प्रभा अत्रे
  • )अरुणा साईराम✓ योग्य
  • )लता मंगेशकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Geography

खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरीच्या उजव्या तीराच्या उपनद्या आहेत ? अ. प्रवरा ब. मांजरा क. मनेर ड. पूर्णा ई. इंद्रावती

  • )फक्त अ, ब आणि क / only a, b and c✓ योग्य
  • )फक्त क, ड आणि ई / only c, d and e
  • )फक्त अ, ब, ड आणि ई / only a, b, d and e
  • )अ, ब, क, ड आणि ई / a, b, c, d and e

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Science

खालीलपैकी कोणत्या इनोव्हेशन ट्रेंडचा 2022 मध्ये कृषी तंत्रज्ञानावर अधिक परिणाम झाला होता ?

  • )रोबोटिक्स / Robotics
  • )आर्टिफिशियल इंटेलिजन्स / Artificial Intelligence
  • )इंटरनेट ऑफ थिंग्ज / Internet of Things✓ योग्य
  • )ड्रोन्स / Drones

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ नुसार खालील विधानांचे अवलोकन करा. विधान I : या कायद्याचे कलम 3, सार्वजनिक सेवांच्या वितरणासाठी 'माहिती तंत्रज्ञानाचा' वापराशी संबंधित आहे. विधान II : कलम 3(a) सार्वजनिक सेवांच्या वितरणासाठी 'माहिती तंत्रज्ञानाचे' प्रकार प्रदान करते.

  • )विधान I बरोबर; II चूक / Statement I correct; II incorrect
  • )विधान I चूक; II बरोबर / Statement I incorrect; II correct
  • )दोन्ही विधाने बरोबर / Both statements are correct
  • )दोन्ही विधाने चूक / Both statements are incorrect✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत पदनिर्देशित अधिकाऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याला प्रदान करता येईल a. प्रोत्साहनपर रोख रक्कम b. प्रशस्ती पत्र c. सेवा अभिलेखात तशी नोंद d. सेवेत पदोन्नती वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ?

  • )फक्त a, b, c / only a, b, c✓ योग्य
  • )a, b, c आणि d / a, b, c and d
  • )फक्त b, c, d / only b, c, d
  • )फक्त a, d / only a, d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Polity

माहिती अधिकार अधिनियम, २००५ अन्वये खालील विधानांचे अवलोकन करा. विधान I : सदर कायद्याच्या कलम 16(1) मध्ये 'केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या सेवा कार्यकाल आणि सेवेच्या अटी' विहित केलेल्या आहेत. विधान II : कायद्याच्या कलम 16(1) मध्ये सुधारणा अधिनियमाच्या कलम 3 नुसार 'ते ज्या तारखेला कार्यालयात प्रवेश करतात त्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी' हे शब्द सुधारित करून समाविष्ट केले आहेत.

  • )विधान I बरोबर; II चूक
  • )विधान I चूक; II बरोबर
  • )दोन्ही विधाने बरोबर
  • )दोन्ही विधाने चूक✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Polity

'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५' चे कोणते कलम शासनास, सार्वजनिक प्राधिकरणास दिशानिर्देश जारी करण्यासाठी अधिकार प्रदान करतात ?

  • )कलम २४✓ योग्य
  • )कलम २७(ब)
  • )कलम २९
  • )कलम २९(ब)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Polity

माहिती अधिकार अधिनियम, २००५ नुसार खालील विधानांचे अवलोकन करा. विधान I : ‘न्यायालयांच्या अधिकारांतेस आडकाठी’ च्या बाबतीत माहिती अधिकार कायदा, २००५ च्या कलम २३ अंतर्गत सांगितले आहे. विधान II : माहितीचा अधिकार (दुरुस्ती) कायद्यामधील कलम ४ ‘न्यायालयाच्या न्यायाधिकार क्षेत्रांच्या’ संदर्भात तपशीलवार तरतूद प्रदान करते.

  • )विधान I बरोबर; II चूक✓ योग्य
  • )विधान I चूक; II बरोII
  • )दोन्ही विधाने बरोबर
  • )दोन्ही विधाने चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Science

ICT च्या सीमावर्ती भागात (frontier areas) R&D ची कार्ये हाती घेण्यासाठी 1988 मध्ये विभागाच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात वैज्ञानिक सोसायटी म्हणून ________ ची स्थापना करण्यात आली.

  • )ई-गव्हर्नन्स
  • )आय.टी.ई.एस.
  • )आय.टी. फॉर मासेस
  • )सी-डी.ए.सी.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Polity

आय.टी. अधिनियम, 2008 मध्ये आय.टी. अधिनियम, 2000 च्या तुलनेत कोणते मोठे बदल केले गेले ?

  • )सायबर गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा वाढवणे / Increasing prison term for cyber crimes
  • )सायबर गुन्ह्यांसाठी दंडाची मुदत वाढवणे / Increasing penalty term for cyber crimes
  • )इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीला कायदेशीर वैधता / Legal validity to Electronic signature✓ योग्य
  • )PKI ओळखणे / Recognizing to PKI

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Current Affairs

खालीलपैकी कोणता प्रकल्प हा ग्राम पंचायतींना भारतभर जोडणारा आहे ज्याची निर्मिती बी.बी.एन.एल. द्वारे झाली आहे ?

  • )इंडीया नेट / India Net
  • )भारत नेट / Bharat Net✓ योग्य
  • )भारती टेल / Bharti Tel
  • )अल्का टेल / Alka Tel

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Science

ओळखले जात नसताना खाजगी संभाषण ऐकण्याची क्रिया हा कोणत्या प्रकारचा हल्ला होय ?

  • )पासवर्ड अंदाज / Password guessing
  • )कानावर पडणे / Eavesdropping✓ योग्य
  • )पाशवी शक्ती / Brute force
  • )स्पूफिंग / Spoofing

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Science

संगणकावर दूरस्थपणे लॉगिन करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो ?

  • )टेलनेट / Telnet✓ योग्य
  • )एच.टी.टी.पी. / HTTP
  • )डी.एन.एस. / DNS
  • )एस.एम.टी.पी. / SMTP

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2022-common-paper-i