स्पर्धाAI

MPSC गट ब २०२२

ASO Paper II · ९० प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Logical Reasoning

शोक्वे लोक काडी वापरून ती पार्श्वभूमीपासून दूर न करता सोना रचना पूर्ण करतात. दिलेल्या पर्यायांतून विसंगत रचना निवडा.

  • )Pattern 1
  • )Pattern 2
  • )Pattern 3✓ योग्य
  • )Pattern 4

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

2. त्याच्या 6 वीच्या वर्गाकडून प्रकाशित होणाऱ्या दैनिकाचे सदर लिहिण्यासाठी उमेदला यादृच्छिकरित्या निवडलेल्या कुटुंबांकडून कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या उपायांची माहिती गोळा करायची होती. त्याने 57 कुटुंबांना आवश्यक माहिती मिळवण्यासाठी खास रचलेली प्रश्नावली पूर्ण करण्याची विनंती करणारे पत्र पाठवले. प्रत्येक विनंतीसोबत त्याने त्यात स्वतःचा पत्ता लिहून तिकीट चिकटवलेला लिफाफाही ठेवला. या प्रत्येक तिकिटाची किंमत 6.6 रु. आहे. त्याला त्यातील 33 जणांकडून प्रतिसाद मिळाला तेव्हा तो खुश झाला. या खटपटीत उमेदला पोस्टाच्या तिकिटांसाठी किती खर्च आला याचा हिशेब करण्यासाठी वरीलपैकी गरज नसलेल्या माहितीची निवड करा.

  • )प्रत्येक विनंतीसोबत त्याने त्यात स्वतःचा पत्ता लिहून तिकीट चिकटवलेल्या लिफाफ्यांची संख्या
  • )उमेदने 57 कुटुंबांना पत्रे लिहिली
  • )प्रत्येक तिकिटाची किंमत 6.6 रुपये आहे
  • )33 कुटुंबांनी प्रतिसाद दिला✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

प्रश्नचिन्हाच्या जागेसाठी प्रतिमा निवडा.

  • )3x3 grid of circles. Center circle has a cross. Black circle is at the bottom-center position.
  • )3x3 grid of circles. Center circle has a cross. Black circle is at the bottom-right position.✓ योग्य
  • )3x3 grid of circles. Center circle has a cross. Black circle is at the bottom-left position.
  • )3x3 grid of circles. Center circle has a cross. Black circle is at the top-right position.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

खालील आकृतीत तीन व्यावसायिकांचे गट दाखविले आहेत. षटकोन क्रिकेटपटू, आयत इंजिनियर्स व लंबगोल डॉक्टर दर्शविते, तर ज्या व्यक्ती डॉक्टर आहेत पण क्रिकेटपटू व इंजिनियर नाहीत ते कशाने दर्शविले आहे ?

  • )R
  • )T✓ योग्य
  • )Q
  • )S

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

सोबतची गालिच्याची आकृती अभ्यासा. ती उजव्या व डाव्या बाजूला असलेले दोन काळे पट्टे, मध्ये पांढरा चौरस, आणि केंद्रस्थानी असलेले पान यांची बनवलेली आहे. पांढऱ्या चौरसाची रुंदी काळ्या पट्ट्याच्या रुंदीच्या दुप्पट मोठी आहे. पानाने मधल्या चौरसाचा पाव भाग व्यापलेला आहे. गालिच्याच्या संदर्भात काळ्या क्षेत्राचे पांढऱ्या क्षेत्राशी असलेले गुणोत्तर निवडा.

  • )2 : 1
  • )3 : 5
  • )5 : 3✓ योग्य
  • )5 : 4

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

प्रसाद, मिलिंद व अल्विन हे तीन मित्र त्यांच्या उंचीविषयी बोलत आहे. सर्वांनाच माहित आहे की, त्यांची उंची वेगवेगळी आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकजण तीन वाक्ये बोलतात. तसेच प्रत्येकजण खरे बोलणाऱ्या, खोटे बोलणाऱ्या व आलटून पालटून खरे खोटे बोलणाऱ्या गटातील आहे. त्यांनी पुढीलप्रमाणे विधाने केली : प्रसाद : मी सर्वात उंच आहे. मी नेहमी खरे बोलतो. मिलिंद नेहमी खोटे बोलतो. मिलिंद : मी सर्वात उंच नाही. प्रसाद खोटारडा आहे. अल्विन सर्वात ठेंगणा आहे. अल्विन : प्रसाद खोटारडा आहे. मी उलटसुलट बोलणारा नाही. मी सर्वात ठेंगणा नाही. तर सर्वात उंच कोण ?

  • )मिलिंद✓ योग्य
  • )अल्विन
  • )प्रसाद
  • )सांगता येत नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Logical Reasoning

सरिता ही सोमेशच्या आईच्या नातवाची पत्नी आहे. सोमेशचा सरिताशी काय संबंध आहे ?

  • )आजी / Grandmother
  • )वडील / Father
  • )सासरा / Father-in-law✓ योग्य
  • )नवरा / Husband

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Quantitative Aptitude

QUESTION या शब्दामधून 5 मूळाक्षरांची अशी निवड करावयाची आहे की, ज्यात कमीत कमी 2 स्वरांचा समावेश असेल आणि कोणत्याही मूळाक्षराची पुनरावृत्ती झालेली नसेल, तर अशी निवड किती प्रकारे करता येईल ते शोधा.

  • )24
  • )25
  • )48
  • )52✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Environment

2011 साली जपानमध्ये फुकुशिमा अणु ऊर्जा यंत्रणेत अपघात झाला होता. यामुळे या भागात किरणोत्सर्गी प्लुटोनियम विखुरला गेला आणि शासनाला जवळपास पाच लाख लोकांना त्यातून विस्थापित करावे लागले. किरणोत्सर्गाच्या संपर्कात आरोग्याला पोहोचणाऱ्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी, या भागात पुन्हा परतायला लोकांवर बंदी घालण्यात आली. पण फुकुशिमासारख्या चेर्नोबिल येथे घडलेल्या तशाच परिस्थितीच्या अभ्यासाने, जरी व्यक्तींचे सरासरी आयुर्मान घटले तरी त्याला पूर्णपणे किरणोत्सर्गामुळे झालेला कर्करोग कारणीभूत नव्हता असे दाखवून दिले. जन्मभराच्या निर्वासिततेमुळे आलेली खिन्नमनस्कता, दारूचे व्यसन आणि आत्महत्त्या ही घटलेल्या आयुर्मानाची प्रमुख कारणे होती. म्हणजेच कायमच्या निर्वासिततेमुळे झालेले मनोवैज्ञानिक परिणाम कदाचित किरणोत्सर्गाच्या शारीरिक परिणामांपेक्षा अधिक गंभीर होते. किरणोत्सर्गाच्या सुरक्षितता पातळीबद्दल वैज्ञानिकांत सहमती नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून आता इच्छा असल्यास फुकुशिमा निर्वासितांना स्वतःच्या मूळ निवासात परतायची मोकळीक दिली पाहिजे. वरील युक्तिवादाचा सर्वात उत्तम प्रकारे प्रमुख निष्कर्ष व्यक्त करणारे पुढीलपैकी एक विधान निवडा.

  • )किरणोत्सर्गाच्या संपर्काच्या परिणामी निर्माण होणाऱ्या कर्करोगाचा धोका अतिरंजित केला जातो
  • )किरणोत्सर्गाच्या सुरक्षितता पातळीविषयी वैज्ञानिकांत सहमती नाही
  • )जेव्हा लोकांवर स्वतःची घरे कायमची सोडण्यासाठी बळजबरी केली जाते तेव्हा त्यांचे आयुर्मान घटते
  • )जर लोकांना किरणोत्सर्गाचा धोका माहीत असेल तर अपघाताची जागा कायमची सोडायची वा नाही याची निवड लोकांची असायला हवी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Quantitative Aptitude

हॅपी देशातील सहा क्षेत्रांपैकी प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक व्यक्तीच्या एकूण वार्षिक उत्पन्नावर स्वतःचा आयकर दर लागू करते. पुढील सारणी सहा भिन्न व्यक्तींच्या आयकराची माहिती दाखवते. एका वर्षात तिर्थइतकीच आयकर रक्कम देणाऱ्या व्यक्तीचे नाव दर्शवणारा पर्याय निवडा.

  • )नीना
  • )दिनू✓ योग्य
  • )रमण
  • )विल्मा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Geography

खालीलपैकी महाराष्ट्रातील बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे जिल्हे कोणते ?

  • )अमरावती, भंडारा, गोंदिया
  • )यवतमाळ, नांदेड, परभणी
  • )चंद्रपूर, गोंदिया, नागपूर
  • )कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Science

जोड्या जुळवा. खनिजे अ. सिलिकेट ब. जिप्सम क. पोटॅश ड. लाईम स्टोन प्रमुख वापर I. खते II. सिमेंट कारखाना III. प्लास्टर वॉल बोर्ड IV. काच कारखाना

  • )IV III I II✓ योग्य
  • )IV II I III
  • )III II IV I
  • )IV I II III

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Polity

खालीलपैकी कोणती विधाने ग्रामीण समाजाचे वैशिष्ट्ये आहेत ? अ. दाट लोकसंख्या ब. शेती प्रधान समाज क. पितृसत्ताक कुटुंब पद्धती ड. शैक्षणिक मागासलेपण

  • )फक्त अ
  • )अ, ब आणि क
  • )ब, क आणि ड✓ योग्य
  • )फक्त ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Geography

पुढील विधानांचा विचार करा. विधान – I : मुंबई-नागपूर व मुंबई-पुणे दुहेरी ब्रॉडगेजचे रेल्वेमार्ग आहेत. विधान – II : मुंबई-नागपूर व मुंबई-पुणे मार्गावर विजेवर चालणाऱ्या आगगाड्या आहेत.

  • )विधान I आणि II बरोबर आहेत✓ योग्य
  • )विधान I आणि II चुकीची आहेत
  • )विधान I बरोबर परंतु II चूक आहेत
  • )विधान I चूक परंतु II बरोबर आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१History

प्रो.आर.डी. कर्वे यांनी 1925 मध्ये पहिले संतती नियमन केंद्र कोणत्या शहरात सुरु केले ?

  • )पुणे / Pune
  • )मुंबई / Mumbai✓ योग्य
  • )ठाणे / Thane
  • )कुलाबा / Kulaba

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Geography

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

  • )ठाणे / Thane
  • )रायगड / Raigad✓ योग्य
  • )रत्नागिरी / Ratnagiri
  • )पुणे / Pune

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Geography

२०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार चढती क्रमवारी लावावी व योग्य पर्याय निवडा.

  • )नंदुरबार – बीड – जालना – उस्मानाबाद / Nandurbar – Beed – Jalana – Usmanabad
  • )नंदुरबार – जालना – बीड – उस्मानाबाद / Nandurbar – Jalana – Beed – Usmanabad
  • )उस्मानाबाद – जालना – बीड – नंदुरबार / Usmanabad – Jalana – Beed – Nandurbar
  • )उस्मानाबाद – बीड – जालना – नंदुरबार / Usmanabad – Beed – Jalana – Nandurbar✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Economy

महाराष्ट्रात विविध प्रकारची फळे पिकविण्यात ___________ जिल्ह्यांचा पहिला क्रमांक आहे.

  • )अहमदनगर / Ahamadnagar✓ योग्य
  • )पुणे / Pune
  • )सोलापूर / Solapur
  • )औरंगाबाद / Aurangabad

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Geographyआयोगाने रद्द

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

  • )चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता (जनगणना 2011) वर्धा जिल्ह्या पेक्षा जास्त आहे
  • )जनगणना 2011 प्रमाणे बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या 25 कोटी पेक्षा जास्त होती
  • )माणगंगा नदी सातारा जिल्ह्यातून वाहते.
  • )कळमनुरी हे हिंगोली जिल्ह्यातील तालुका ठिकाण आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २६History

इ.स. १९३३ मध्ये मुंबईत निर्भीड या साप्ताहिकाचे प्रकाशन सुरु झाले. त्याचे मालक आणि संपादक कोण होते ?

  • )अनंतराव गद्रे✓ योग्य
  • )दिनकरराव जवळकर
  • )केशवराव जेधे
  • )गणपतराव जाधव

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७History

खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना राजर्षी शाहू महाराजांनी नैतिक आणि आर्थिक पाठबळ दिले ? अ. विजय मराठा ब. दीनमित्र क. तरुण मराठा ड. संदेश

  • )अ आणि क
  • )अ, ब आणि क✓ योग्य
  • )ब, क आणि ड
  • )अ, ब, क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८History

पुढील विधाने काळजीपूर्वक वाचा. अ. २८ सप्टेंबर १९१९ च्या आदेशानुसार छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य मानलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या स्वतंत्र शाळा बंद केल्या. ब. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीच्या आठपैकी तीन शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव होत्या. क. राजपुत्र शिवाजी यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्तीसाठी कोल्हापूर संस्थानाबाहेरच्या अस्पृश्य मुलीही पात्र मानल्या जात.

  • )अ, ब, क चूक आहेत / A, B and C are false
  • )अ, ब, क बरोबर आहेत / A, B and C are true✓ योग्य
  • )केवळ अ चूक आहे / Only A is false
  • )अ आणि क चूक आहेत / A and C are false

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९History

राजर्षी शाहू महाराजांनी जबाबदारीच्या पदांवर अधिकारी म्हणून अस्पृश्य मानल्या गेलेल्या व्यक्तींच्या नेमणुका केल्या. खालीलपैकी कोणते अधिकारी त्यांच्या महसूल खात्यात कार्यरत होते? अ. रामचंद्र सखाराम कांबळे ब. यल्लाप्पा बाळा नाईक क. धोंडदेव रामचंद्र व्हटकर ड. दत्तू संतराम पवार

  • )सर्व अ, ब, क आणि ड / All A, B, C and D
  • )फक्त क / Only C
  • )फक्त अ, क आणि ड / Only A, C and D✓ योग्य
  • )फक्त ब आणि क / Only B and C

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०History

खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या घटना लोकमान्य टिळकांशी संबंधित होत्या ?

  • )फक्त अ, ब आणि क
  • )फक्त ब, क आणि ड✓ योग्य
  • )फक्त अ, क आणि ड
  • )फक्त क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Maharashtra

राजर्षी शाहू महाराजांच्या सहकार्याने गंगाराम कांबळे यांनी कोल्हापूर मध्ये सुरु केलेल्या हॉटेलचे नाव काय होते ?

  • )सत्यशोधक हॉटेल
  • )सत्यसुधारक हॉटेल✓ योग्य
  • )सत्यार्थ हॉटेल
  • )सत्यमय हॉटेल

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३History

लॉर्ड कर्झन यांनी दुष्काळ निवारणार्थ दिलेल्या करसवलतीबद्दलची इंग्रज सरकारची जाहिरातबाजी आणि सरकारी खर्चाच्या सबबीवर तीन कोटी तीस लाख रुपयांची नव्याने लादलेला कर यामधील विरोधाभास ______ यांनी आपल्या अर्थसंकल्पावरील भाषणातून दाखवून दिला.

  • )गोपाळ कृष्ण गोखले✓ योग्य
  • )दादाभाई नौरोजी
  • )विल्यम वेडरबर्न
  • )सय्यद अहमद खान

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Maharashtra

नारायण मेघाजी लोखंडे यांनी 'बॉम्बे फॅक्टरी कमिशन' पुढे कोणत्या मागण्या मांडल्या होत्या ? अ. रविवारी पगारी सुट्टी द्यावी. ब. कामाच्या दिवशी दुपारी एक तास सुट्टी द्यावी. क. गिरणीची वेळ सकाळी साडेसहा ते सायंकाळ असावी. ड. कामाच्या वेळी कामगारास दुखापत झाल्यास कामगार कामावर परत येईपर्यंत वेतन मिळावे.

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त अ, क आणि ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Maharashtra

कोल्हापुरातील 'शिवाजी क्लब' याच्याशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या ? (अ) हणमंतराव कुलकर्णी, रामचंद्र गद्रे (ब) दामोदर हरी जोशी, गणेश मोडक (क) हनुमंत देशपांडे, गंगाधर गोखले (ड) हरिभाऊ चिटणीस, सदाशिव चित्रे

  • )फक्त अ, ब आणि क / Only a, b and c✓ योग्य
  • )फक्त ब, क आणि ड / Only b, c and d
  • )फक्त अ आणि ब / Only a and b
  • )फक्त क आणि ड / Only c and d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशापर्यंत विस्तारलेले आहे ?

  • )केरळ / Kerala✓ योग्य
  • )तामिळनाडू / Tamil Nadu
  • )मुंबई / Mumbai
  • )दिल्ली / Delhi

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार, राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांतींल खालीलपैकी कोणत्या अनुच्छेददातील तत्त्वांची अंमलबजावणी करण्यात आली आहे ?

  • )अनुच्छेद ३९ / Article 39
  • )अनुच्छेद ४० / Article 40✓ योग्य
  • )अनुच्छेद ४२ / Article 42
  • )अनुच्छेद ४३ / Article 43

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Polity

भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य राहील याची हमी कितव्या घटनादुरुस्तीत देण्यात आली आहे ? अ. ४० व्या ब. ४२ व्या क. २३ व्या ड. ४४ व्या वरीलपैकी योग्य पर्याय निवडा.

  • )फक्त ब आणि क
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९History

कोणत्या वर्षी ब्रिटीश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केली ?

  • )१९४६
  • )१९४५
  • )१९४०✓ योग्य
  • )१९३९

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Polity

खालीलपैकी कोणते विषय ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे १९७६ मध्ये राज्य सूचीमधून समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केले गेले ? अ. वीज ब. शिक्षण क. वजन व मापे ड. विवाह आणि घटस्फोट वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ?

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क✓ योग्य
  • )फक्त ड आणि क
  • )फक्त ड आणि अ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Polity

राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये भारतातील घटकराज्यांची नावे व त्यांचा भौगोलिक विस्तार याबाबतच्या तरतूदी केल्या आहेत ?

  • )पहिले✓ योग्य
  • )चौथे
  • )पाचवे
  • )सातवे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Polity

भारतीय संविधानातील भाग – III मध्ये खालील बाबींचा समावेश होतो. अ. शिक्षणाचा हक्क ब. सार्वजनिक नोकरीच्या बाबतीमध्ये समान संधी क. ग्रामपंचायतीचे संघटन ड. समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य

  • )अ, ब आणि क
  • )ब, क आणि ड
  • )अ आणि ब✓ योग्य
  • )क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Polity

पुढील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? i. अनुच्छेद ७४ मंत्रिमंडळाच्या स्थानासंबंधी आहे. ii. अनुच्छेद ७५ मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाल, जबाबदारी, पात्रता, शपथ आणि वेतन व भत्ते यासंबंधी आहे. iii. अनुच्छेद ७६ मंत्रिमंडळ संयुक्तरीत्या राष्ट्रपतींना उत्तरदायी असेल.

  • )i आणि ii / i and ii✓ योग्य
  • )ii आणि iii / ii and iii
  • )i, ii आणि iii / i, ii and iii
  • )iii आणि i / iii and i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Polity

खालील विधाने विचारात घ्या (नियंत्रक व महालेखापरीक्षक – CAG). i. भारताच्या राज्यघटनेत (अनुच्छेद १४८) भारताच्या महालेखापरीक्षकाच्या स्वतंत्र पदाची तरतूद केली आहे. ii. तो सार्वजनिक कोशाचा संरक्षक असतो. iii. केंद्र व राज्य दोन्ही स्तरांवर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतो. iv. त्यांचा कार्यकाल ५ वर्षे असतो. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )i, ii आणि iii / i, ii and iii✓ योग्य
  • )ii आणि iii / ii and iii
  • )i, ii, iii आणि iv / i, ii, iii and iv
  • )ii, iii आणि iv / ii, iii and iv

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Polity

योग्य कथन/ने ओळखा (संसदेचे दुहेरी सदस्यत्व). अ. जर एका सभागृहातील सदस्य दुसऱ्या सभागृहात निवडून आला तर त्याची जागा पहिल्या सभागृहात रिकामी होते. ब. जर एखादी व्यक्ती सभागृहातील दोन जागांवर निवडून आली तर त्याने त्यापैकी एक जागेचा पर्याय निवडवा अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतील.

  • )Only A
  • )Only B
  • )Both A and B✓ योग्य
  • )None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Polity

भारताच्या उपराष्ट्रपतींच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? i. तो संसदेच्या कोणत्याही गृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. ii. राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. iii. तो भारताचा नागरिक असावा.

  • )Only i
  • )Only i and ii
  • )i, ii and iii✓ योग्य
  • )None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Polity

खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये आहे ? अ. दिल्ली ब. पुदुच्चेरी क. जम्मू व काश्मीर ड. चंदीगड इ. लडाख फ. लक्षद्वीप

  • )फक्त अ, ब, क✓ योग्य
  • )फक्त अ, क, ड
  • )फक्त क, ड, इ
  • )फक्त अ, इ, फ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Polity

योग्य कथन/ने ओळखा. अ. राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती ही राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. ब. राज्य निवडणूक आयुक्ताची पदच्युती राज्यपाल करू शकतो.

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त ब
  • )अ व ब दोन्ही
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Polity

५२. केंद्र-राज्य कायदेविषयक संबंधाबाबत जोड्या लावा. अनुच्छेद तरतूद अ. २४७ i. आणीबाणीची घोषणा लागू असल्यास राज्य सूचीमधील विषयांबाबत कायदे करण्याचा संसदेचा अधिकार ब. २४८ ii. कायदेविषयक उर्वरित अधिकार क. २४९ iii. काही अतिरिक्त न्यायालये स्थापन करण्याविषयी संसदेचा अधिकार ड. २५० iv. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्य सूचीमधील विषयांबाबत कायदे करण्याचा संसदेचा अधिकार

  • )i ii iii iv
  • )ii iii iv i
  • )iii ii iv i✓ योग्य
  • )iv i ii iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Polity

खालीलपैकी कोणती भारतीय संविधानाची एकात्मक वैशिष्ट्ये आहेत ? अ. स्वतंत्र न्यायपालिका ब. सत्तेचे विभाजन क. एकात्मक न्यायपालिका ड. संविधानाची लवचिकता इ. राज्य प्रतिनिधित्वामध्ये समानता नाही

  • )फक्त अ, ड, क
  • )फक्त ब, ड, इ
  • )फक्त क, ड, इ✓ योग्य
  • )फक्त अ, ब, क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Polity

राज्य मंत्रिमंडळाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. i. मंत्रिमंडळ संयुक्तरीत्या राज्य विधानसभेला उत्तरदायी असेल. ii. मंत्र्यांचा कार्यकाल मुख्यमंत्र्याच्या मर्जीनुसार असेल. iii. मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतेही न्यायालय चौकशी करू शकत नाही. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

  • )फक्त i आणि ii
  • )फक्त ii आणि iii
  • )फक्त i आणि iii✓ योग्य
  • )i, ii आणि iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Polity

खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत ? i. अरुणाचल प्रदेश ii. गोवा iii. मणिपूर iv. मिझोरम v. सिक्कीम vi. त्रिपुरा

  • )i, ii, iii and iv
  • )iii, iv, v आणि vi
  • )i, ii, iii आणि vi✓ योग्य
  • )ii, iii, v आणि vi

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Polity

पुढील विधानांचा अभ्यास करा. i. मंत्रिमंडळ राष्ट्रपतींची मर्जी असे पर्यंत अधिकारावर रहाते. ii. मंत्रिमंडळ लोकसभेत बहुमताच्या जोरावर अधिकारावर रहाते.

  • )केवळ i बरोबर आहे
  • )केवळ ii बरोबर आहे
  • )i व ii दोन्ही बरोबर आहेत✓ योग्य
  • )i व ii दोन्ही चूक आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Polity

योग्य कथने ओळखा. अ. 1952 च्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत के. टी. शाह हे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार होते. ब. 1969 च्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत एन. संजीवा रेड्डी हे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार होते. क. 1992 च्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत टी. एन. शेषन हे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार होते.

  • )फक्त अ, ब✓ योग्य
  • )फक्त ब, क
  • )फक्त अ, क
  • )वरीलपैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Polity

खालील विधाने विचारात घ्या. i. विधानसभा हे कायमस्वरूपी गृह आहे. ii. विधानसभेमध्ये सार्वत्रिक प्रौढ मतधिकारांनुसार थेट निवडून आलेले जनतेचे प्रतिनिधी असतात. iii. विधानसभेची कमाल सदस्य संख्या ५०० आणि किमान सदस्य संख्या ६० ठरविण्यात आली आहे. iv. आणीबाणी उठविल्यानंतर सहा महिन्यांच्या काळात विधानसभेची निवडणूक झाली पाहिजे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )Only i, ii and iii
  • )Only ii, iii and iv✓ योग्य
  • )Only iv, i and iii
  • )Only ii and iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Polity

भारताच्या राष्ट्रपतींच्या निर्वाचक मंडळासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. i. संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सदस्य. ii. राज्य विधानसभेतील निवडून आलेले सदस्य. iii. राज्यातील विधानपरिषदेचे सदस्य. iv. दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांतील निवडून आलेले सदस्य. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त i आणि ii
  • )फक्त i, ii आणि iii
  • )फक्त i, ii आणि iv✓ योग्य
  • )फक्त iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Polity

जोड्या लावा (केंद्र-राज्य संबंध). 'अ' (अनुच्छेद) अ. अनुच्छेद २८० ब. अनुच्छेद २७७ क. अनुच्छेद २७५ ड. अनुच्छेद २७९ ए 'ब' (विषय वस्तु) i. बचत ii. वित्तीय आयोग iii. वस्तु व सेवा कर परिषद iv. काही राज्यांना केंद्राकडून अनुदान

  • )iv ii i iii
  • )iv i iii ii
  • )ii iii i iv
  • )ii i iv iii✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Polity

जेव्हा दोन किंवा अधिक राज्यांचे विधिमंडळे राज्य सूचीतील एखाद्या विषयावर संसदेला कायदे करण्याची विनंती करणारा ठराव संमत करतात, तेव्हा संसद त्या विषयावर नियमन करण्यासाठी कायदे करू शकते. खालीलपैकी कोणता कायदा भारतीय संविधानाच्या वरील तरतुदीशी संबंधित नाही ?

  • )बक्षिस स्पर्धा अधिनियम, १९५५
  • )वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२
  • )जल (संरक्षण व प्रदूषण नियंत्रण) कायदा, १९७४
  • )वरीलपैकी नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Polity

योग्य जोड्या जुळवा. लोकसभा सभापती अ. मनोहर जोशी ब. पी. ए. संगमा क. सोमनाथ चटर्जी ड. सुमित्रा महाजन कार्यकाल i. २०१४ - २०१९ ii. २००४ - २००९ iii. २००२ - २००४ iv. १९९६ - १९९८

  • )iv iii ii i
  • )iii iv ii i✓ योग्य
  • )ii i iii iv
  • )i ii iii iv

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Polity

ब्रिटिश संसदीय लोकशाही व्यवस्थेतून पुढीलपैकी कोणती गोष्ट भारतीय संविधानात स्वीकारली गेली ? i. राज्याचा प्रमुख म्हणून वारसा हक्काने राजा अथवा राणीची निवड ii. संसदीय वर्चस्व iii. कार्यकारी मंडळाचे कायदे मंडळाप्रती सामूहिक उत्तरदायित्व iv. सर्व प्रकारच्या घटनात्मक वादावर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संसदेकडे

  • )केवळ i व ii
  • )केवळ iii व iv
  • )केवळ iii✓ योग्य
  • )केवळ i, ii व iv

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Polity

भारतातील सर्वोच्च कायदा अधिकारी कोणाला मानले जाते ?

  • )महाधिवक्ता
  • )भारताचे सरन्यायाधीश
  • )कायदा आणि न्यायमंत्री
  • )भारताचा महान्यायवादी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Polity

लोकसभेच्या प्रोटेंम स्पीकर बाबत योग्य कथने ओळखा. अ. पंतप्रधान हे लोकसभेच्या सदस्याला प्रोटेंम स्पीकर म्हणून नियुक्त करतात. ब. प्रोटेंम स्पीकरला अध्यक्षाचे पूर्ण अधिकार प्राप्त असतात. क. तो नवनिर्वाचित लोकसभेच्या पहिल्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवितो.

  • )फक्त अ, ब
  • )फक्त अ, क
  • )फक्त ब, क✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Polity

खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले होते ? i. मीरा कुमार ii. प्रमोद महाजन iii. सुमित्रा महाजन iv. प्रणव मुखर्जी

  • )i आणि ii
  • )iii आणि iv
  • )ii आणि iv
  • )i आणि iii✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Polityआयोगाने रद्द

खालीलपैकी कोणते भारताचे पंतप्रधान हे राज्यसभेचे सदस्य होते ? अ. इंदिरा गांधी (१९६६) ब. डॉ. मनमोहन सिंह (२००४) क. आय. के. गुजराल (१९९७) ड. एच. डी. देवेगौडा (१९९६)

  • )फक्त अ, ब, क
  • )फक्त ब, क, ड
  • )फक्त अ, क, ड
  • )फक्त अ, ब, ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ६८Polity

भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकी बाबतचे विवाद कोण सोडवितो ?

  • )सर्वोच्च न्यायालय / The Supreme Court✓ योग्य
  • )सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय / Supreme Court and High Courts
  • )संसद / The Parliament
  • )भारताचे निर्वाचन आयोग / The Election Commission of India

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Polity

कोणाच्या शिफारशीवरून अर्थ विधेयक राज्य विधिमंडळात मांडता येते ? i. सभापती ii. वित्तमंत्री iii. मुख्यमंत्री iv. राज्यपाल योग्य पर्याय निवडा.

  • )फक्त i आणि ii / Only i and ii
  • )फक्त iii आणि iv / Only iii and iv
  • )फक्त iv / Only iv✓ योग्य
  • )फक्त i / Only i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Polity

योग्य कथन/ने ओळखा. अ. भारतीय पोस्ट ऑफिस (दुरुस्ती) विधेयकाच्या संदर्भात 1986 मध्ये राष्ट्रपती झैल सिंह यांनी पॉकेट विटोचा वापर केला होता. ब. संविधान दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात राष्ट्रपतींना नकाराधिकार (विटो अधिकार) नसतो.

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )अ व ब दोन्ही✓ योग्य
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Polity

भारतीय राज्यघटनेच्या अकराव्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश होतो ? (1) पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या (2) प्रशासनाच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधी तरतुदी (3) राज्यसभेतील जागांची वाटणी (4) शपथांचे किंवा प्रतिज्ञेचे नमुने

  • )Powers, authority and responsibilities of Panchayats✓ योग्य
  • )Provisions as to disqualification on ground of defection
  • )Allocation of seats in the Council of States
  • )Forms of oaths or affirmations

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Polity

जिल्हा परिषदेबाबत खालील विधाने विचारात घ्या : अ. जर कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याने गैरवर्तन केल्याबद्दल राज्य शासनास योग्य वाटल्यास जिल्हा परिषदेच्या ह्याला अध्यक्षाने व मतदान करणाऱ्या परिषद सदस्यांपैकी दोन तृतीयांश (2/3) पेक्षा कमी नाहीत इतक्या सदस्यांनी जिल्हा परिषदेला शिफारशीसहित असा सदस्यत्व अधिकार वगळूनच दूर करता येते. ब. जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी शिवाय जिल्हा परिषदेच्या बैठकींना लागोपाठ सहा महिने गैरहजर असेल तर असा जिल्हा परिषद सदस्याचे अधिकार पद रिकामे होईल.

  • )Only statement A is correct
  • )Only statement B is correct
  • )Both statements are correct✓ योग्य
  • )Both statements are false

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Polity

जोड्या लावा: अनुच्छेद अ. 243-S ब. 243-Q क. 243-R ड. 243-U तरतूद I. नगरपालिका गठीत करणे II. वार्ड समित्या गठीत करणे आणि त्यांची रचना इ. III. नगरपालिकांचा कालावधी इ. IV. नगरपालिकांची रचना

  • )IV II I III
  • )III IV II I
  • )I II III IV
  • )II I IV III✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Polity

महाराष्ट्र राज्यात किती लोकसंख्या असलेल्या नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर करता येते ? अ. दोन लाखांपेक्षा जास्त ब. तीन लाखांपेक्षा जास्त क. एक लाखांपेक्षा जास्त ड. नव्वद हजारांपेक्षा जास्त वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )Only d
  • )Only c and a
  • )Only b✓ योग्य
  • )Only a

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Polity

७३ वी घटनादुरुस्ती महत्त्वपूर्ण का समजली जाते ? अ. मतदारांना वये २१ वर्षांवरून १८ वर्षे करण्यासाठी. ब. पंचायत राज व्यवस्था व लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना मजबूत करण्यासाठी. क. दादरा आणि नगर हवेली याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यासाठी. ड. पक्षांतर बंदी कायदा करण्यासाठी. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )Only a and c
  • )Only a and b
  • )Only b✓ योग्य
  • )Only d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Polity

खालीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? अ. सध्या (२०१९) देशात ६२ छावणी मंडळे आहेत. ब. भारतात छावणी मंडळांना तीन प्रकारात विभागले जाते. क. निर्वाचित मंडळाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. ड. त्या ठिकाणचा प्रमुख सैनिक अधिकारी हा छावणी मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

  • )फक्त अ आणि ब / Only a and b
  • )फक्त अ, क आणि ड / Only a, c and d✓ योग्य
  • )फक्त ब, क आणि ड / Only b, c and d
  • )फक्त अ, ब आणि ड / Only a, b and d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Polity

७४ व्या घटनादुरुस्तीने खालीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट आहेत ? अ. जिल्हा नियोजनबाबत समिती ब. वित्त आयोग क. महानगर नियोजनबाबत समिती

  • )अ आणि ब / a and b
  • )ब आणि क / b and c
  • )अ, ब व क / a, b and c✓ योग्य
  • )यापैकी नाही / None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Polity

७३ वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागू होत नाही ?

  • )अ व ब / a and b
  • )अ, ब व ड / a, b and d
  • )अ, ब, क व ड / a, b, c and d✓ योग्य
  • )ब व क / b and c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Polity

महाराष्ट्रातील शहरी स्थानिक संस्था खालीलपैकी कोणत्या आहेत ?

  • )फक्त अ, ब आणि क / Only a, b and c
  • )फक्त अ आणि ब / Only a and b
  • )अ, ब, क आणि ड / a, b, c and d✓ योग्य
  • )फक्त ड, अ आणि क / Only d, a and c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Polity

राज्यमंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली आहे ?

  • )एल.एम. सिंघवी समिती / L. M. Singhvi Committee
  • )अशोक मेहता समिती / Ashok Mehta Committee✓ योग्य
  • )बलवंत राय मेहता समिती / Balwant Rai Mehta Committee
  • )जी.व्ही.के. राव समिती / G.V.K. Rao Committee

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polity

छावणी मंडळाची रचना, कार्ये व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

  • )अ आणि ब
  • )✓ योग्य
  • )
  • )क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Polity

पुढीलपैकी कोणती रिट याचिका ही व्यक्ती स्वातंत्र्यांसंबंधी आहे ?

  • )हेबियस कॉर्पस✓ योग्य
  • )मॅण्डामस
  • )को-वारंटो
  • )सरशिओररी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Polity

______ च्या अनुसार संसद दोन किंवा त्या पेक्षा जास्त राज्यांकरिता संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना करू शकते.

  • )भारताचे संविधान✓ योग्य
  • )दिवाणी प्रक्रिया संहिता
  • )राष्ट्रपतींचे आदेश
  • )फौजदारी प्रक्रिया संहिता

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Polity

लोक अदालत्ची स्थापना खालीलपैकी कोणत्या कायद्या अंतर्गत केली जाते ?

  • )दिवाणी प्रक्रिया संहिता, 1908
  • )विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987✓ योग्य
  • )मानव अधिकार संरक्षण अधिनियम, 1993
  • )फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Polity

जोड्या लावा : A. सर्वोच्च न्यायालयाची दिवाणी प्रक्रियेसंबंधी अपील अधिकारिता B. सर्वोच्च न्यायालयाची अपिलास विशेष अनुज्ञा C. सर्वोच्च न्यायालयाची फौजदारी प्रक्रियेसंबंधी अपील अधिकारिता D. सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता i. अनुच्छेद 131 ii. अनुच्छेद 133 iii. अनुच्छेद 134 iv. अनुच्छेद 136

  • )i ii iv iii
  • )iii i ii iv
  • )ii iv iii i✓ योग्य
  • )iv iii i ii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Polity

समग्र न्यायाचा अधिकार वापरताना, सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या बाबींचा विचार करून योग्य ते सहाय्य करू शकते ?

  • )जेथे अधिकार क्षेत्राची गरज असते
  • )जेथे काही बेकायदेशीर बाबी प्रकट होतात
  • )जेथे काही अन्याय प्रकटपणे दिसून येतो
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Economy

सामाजिक विकास सूचित करतो. अ. मानवाचे कल्याण ब. GNP मध्ये वाढ क. सामाजिक संघटनेत सुधारणा ड. सामाजिक न्याय

  • )अ, क व ड✓ योग्य
  • )अ, ब व क
  • )अ, ब व ड
  • )ब, क व ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Polity

‘आर्थिक नियोजन’ ही बाब भारतीय राज्यघटनेच्या मध्ये समाविष्ट आहे.

  • )केंद्र सूची
  • )राज्य सूची
  • )समवर्ती सूची✓ योग्य
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Economy

तेडुलकर समितीने २००४-०५ साठीचा अखिल भारतीय दारिद्र्य रेषेचा अंदाज ग्रामीण भागासाठी रु. ______ दरमहा दरडोई इतका अंदाजित केला होता. आणि शहरी भागासाठी रु. ______

  • )४४६ आणि ८७८
  • )४४६ आणि ५७८✓ योग्य
  • )५७८ आणि ७७८
  • )५७८ आणि ६७८

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Economy

वर्ष २०१६-१७ मध्ये भारताच्या निर्यात उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तू उत्पादनांनी अग्रक्रम मिळवला ?

  • )इंजिनिअरिंग वस्तू✓ योग्य
  • )मौल्यवान खडे (रत्ने) आणि दागिने
  • )कृषि उत्पादने
  • )वस्त्रोत्पादने

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Economy

पाचव्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे कोणती होती ? अ. दारिद्र्य निर्मूलन ब. स्वावलंबिता प्राप्त करणे क. उद्योगांचा विकास ड. स्थैर्यसह वृद्धी

  • )फक्त अ
  • )अ आणि ब✓ योग्य
  • )फक्त क
  • )यापैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Economy

वितरणात्मक विषमतेशी कोणत्या बाबी संबंधित आहेत ? अ. लोकसंख्या वृद्धी ब. गरीबी क. बेरोजगारी ड. भाववाढ

  • )अ आणि ब
  • )फक्त ब
  • )यांपैकी सर्व✓ योग्य
  • )यांपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Economy

आर्थिक विकासाचे आर्थिक घटक हे आहेत. अ. भांडवल निर्मिती ब. विकास साधण्याची इच्छा क. विक्रीयोग्य शेतमालाचे आधिक्य ड. विदेशी व्यापार

  • )ब, क व ड
  • )अ, ब व क
  • )अ, ब व ड
  • )अ, क व ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Economy

भारतात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते ?

  • )(अ) छुपी बेरोजगारी
  • )(ब) संरचनात्मक बेरोजगारी
  • )(क) हंगामी बेरोजगारी
  • )(ड) शिक्षित बेरोजगारी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2022-aso-paper-ii