स्पर्धाAI

MPSC गट ब २०२०

STI Paper II · ८५ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Quantitative Aptitude

कोणत्याही धन पूर्णांकाला जर त्याच्या स्वतःखेरीज आणि एक या संख्येखेरीज कोणत्याही धन संख्येने भाग जात नसेल तर तो धन पूर्णांक मूळ संख्या असते. x हा पूर्णांक 7 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे तर (x² – 1) ला _______.

  • )कधीही 6 ने भाग जाणार नाही / never divisible by 6
  • )नेहमीच 24 ने भाग जाईल / always divisible by 24✓ योग्य
  • )नेहमीच 6 ने भाग जाईल आणि कदाचित 12 ने भाग जाईल किंवा भाग जाणार नाही / always divisible by 6, and may or may not be divisible by 12
  • )नेहमीच 12 ने भाग जाईल आणि 24 ने कदाचित भाग जाईल किंवा जाणार नाही / always divisible by 12 and may or may not be divisible by 24

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

वेन आकृतीच्या नामनिर्देशित आकारात तो विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवली आहे. 500 विद्यार्थ्यांची पाहणी करून ही आकृती तयार केली आहे. सर्व तीनही विषयांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचे गणित विषय न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांशी असलेले गुणोत्तर काय ?

  • )2/9✓ योग्य
  • )6/3
  • )1/9
  • )4/27

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

वाहनतळावर 36 वाहने एका ओळीने उभी केलेली आहेत. पहिल्या कारनंतर एक स्कूटर, दुसऱ्या कारनंतर दोन स्कूटर्स, तिसऱ्या कारनंतर तीन स्कूटर्स ...... अशा पद्धतीने वाहने उभी केलेली आहेत. ओळीच्या दुसऱ्या अर्ध्या भागात किती स्कूटर्स आहेत हे शोधा ?

  • )14
  • )15✓ योग्य
  • )16
  • )17

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न Marathi Language

दितीच्या स्वतःच्या निरीक्षणासंबंधातील भाष्यावर हेलीने दिलेल्या प्रतिसादाचे उचित वर्णन करणारा पर्याय निवडा.

  • )असंबद्ध आहे.
  • )मृदुसाहित्य तंत्रज्ञ व सफाई कामगार यांच्या मोबदल्यात फरक असायला नको हे सुचवतो.
  • )आर्थिक विषमता कमी करण्याचा पर्याय सुचवतो.
  • )दितीने दुर्लक्षित केलेला पैलू समोर आणला आहे.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

एका कुटुंबातील जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वडिलांचे वय त्यांच्या मुलीच्या वयाच्या चारपट आहे आणि मुलाचे वय त्याच्या आईच्या वयाच्या एकतृतीयांश आहे. पत्नी तिच्या पतीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे आणि भाऊ त्याच्या बहिणीपेक्षा चार वर्षांनी मोठा आहे. तर आईचे वय किती ?

  • )40 वर्षे
  • )48 वर्षे
  • )54 वर्षे
  • )60 वर्षे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

चहासाठी बनवलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर 5 : 1 आहे. यात 5 लिटर पाणी घातले तर हे गुणोत्तर 5 : 2 असे होते. या मिश्रणातील दुधाची राशी निवडा.

  • )15 ली.
  • )25 ली.✓ योग्य
  • )20 ली.
  • )10 ली.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

वेळ सांगण्याची विनंती केल्यावर व्यक्ती म्हणाली, “मध्यरात्रीपासून आतापर्यंतच्या वेळेच्या चौथ्या भागात आतापासून येणाऱ्या मध्यरात्रीच्या वेळेचा निम्मा भाग मिळवा. तुम्हाला आताची वेळ मिळेल”. व्यक्ती वर्णन करत असलेली वेळ निवडा.

  • )8 : 36
  • )9 : 36✓ योग्य
  • )9 : 38
  • )10 : 38

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

मन निवांत असेल तर ज्या ठिकाणांना पुनर्भेट द्यायला मी सहज तयार असतो, अशी जास्त ठिकाणे नाहीत की ज्या ठिकाणी मी पूर्वी कधीही गेलो नव्हतो. त्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणांशी माझा फार पूर्वीपासून परिचय आहे. त्यांच्याशी (असलेल्या) माझ्या दाट सख्याचे स्वरूप इतके प्रेमळ आहे की मी स्वतःला ते (सख्य) बदलणार नाही याची खात्री देण्यात विशेष रुची घेतो. रॉबिन्सन क्रुसोच्या बेटावर मी कधीही गेलो नव्हतो पण मी वारंवार तेथे परतत असतो. जेथे गिल ब्लेस रहात होता त्या चोरांच्या गुहेत मी कधीही गेलो नव्हतो, पण मी वारंवार जातो आणि तेथील सापळ्याच्या दरवाजाला उचलायला पूर्वीप्रमाणेच जड आहे असे मला आढळते. डॉन क्विक्झोने ज्या अभ्यास खोलीत उभे राहून काल्पनिक राक्षसाचा वध करेपर्यंत शौर्यावरची त्याची पुस्तके वाचली, त्या खोलीत मी कधीही गेलो नव्हतो परंतु मला माहीत झाल्याखेरीज तुम्ही तेथील एकही पुस्तक हलवू शकणार नाही. केवळ पहिले विधान वाचून थांबल्यास परिच्छेदाच्या आशयाचे सर्वात उचित वर्णन करणारा शब्द निवडा.

  • )विनोदी
  • )विरोधाभासात्मक✓ योग्य
  • )अविश्वसनीय
  • )असत्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

जया व किम या दोन पॅराशूटर्सनी विमानातून ते एक एकक उंचीवर असताना उड्या मारल्या. उड्या घेताच दोघांच्या छड्या उघडल्या. जयाचा जमिनीवर येण्याचा वेग ताशी 10 एकक आहे. किम जयाच्या तुलनेत तीनपट मंद गतीने जमिनीवर येत आहे. जया जमिनीवर उतरल्यानंतर जितक्या वेळानंतर किम खाली येईल तो दर्शवणारा पर्याय निवडा.

  • )3 मिनिटे
  • )6 मिनिटे
  • )9 मिनिटे
  • )12 मिनिटे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Logical Reasoning

आपापसात सर्वात उत्तम निवडण्यासाठी भावंडांच्या दोन जोड्या, साहील आणि त्याची बहीण नूरी आणि नान्सी व तिचा भाऊ पन्नू, हे बुद्धिबळ खेळले. फक्त पहिल्या सामन्यातील दोन खेळाडू भावंडे होती. पहिल्या सामन्यात हरलेला खेळाडू पुढच्या सामन्यासाठी बाद केला आणि जिंकलेला खेळाडू नंतरचा सामना खेळला व यानंतर याप्रमाणे सामने झाले. अशा रीतीने फक्त तीन सामने झाले. नूरी व तिचा भाऊ यांनी दुसऱ्या भावंडांच्या जोडीपेक्षा जास्त सामने जिंकले. मुलाग्यांनी दोन सामने जिंकले तर मुलींनी फक्त एक जिंकला. तर सामना न हरलेली व्यक्ती निवडा.

  • )साहील / Sahil
  • )पन्नू / Pannu
  • )नान्सी / Nancy✓ योग्य
  • )न हरलेली व्यक्ती शोधण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही. / Data is not sufficient for finding person who did not lose any game.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Logical Reasoning

वैध निष्कर्ष निवडा : सत्य विधाने : काही पतंग पायऱ्या आहेत. काही पायऱ्या तारे आहेत. सर्व तारे टाचण्या आहेत. निष्कर्ष : (a) काही टाचण्या पायऱ्या आहेत. (b) काही तारे पतंग आहेत. (c) एकही तारा पतंग नाही. (d) काही पायऱ्या पतंग आहेत. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) व (d) / Only (a) and (d)✓ योग्य
  • )फक्त (b) व (d) / Only (b) and (d)
  • )फक्त (b) व (c) / Only (b) and (c)
  • )फक्त (a), (d) व (b) किंवा (a), (d) व (c) / Only (a), (d) and (b) or (a), (d) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Logical Reasoning

जॉन्सन् त्याच्या कार्यालयाकडे कारने निघाला. तो उत्तरेकडे 15 किमी गेला नंतर 10 किमी पश्चिमेकडे गेला. नंतर तो दक्षिणेकडे वळून 5 किमी गेला. पूर्वेकडे वळून त्याने 8 किमी अंतर पार केले. शेवटी त्याने उजवीकडे वळून 10 किमीचा प्रवास केला. प्रारंभिक बिंदूपासून आता तो किती दूर व कोणत्या दिशेला असेल?

  • )2 किमी, पश्चिम✓ योग्य
  • )5 किमी, पूर्व
  • )6 किमी, दक्षिण
  • )7 किमी, उत्तर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Quantitative Aptitude

कधीच पूर्ण वर्ग असणार नाही अशी राशी निवडा ज्यात n ही नैसर्गिक संख्या आहे. (a) 5n – 1 (b) 5n + 1 (c) 8n + 1 (d) 3n + 1 पर्यायी उत्तरे :

  • )सर्व
  • )एकही नाही✓ योग्य
  • )फक्त (a) आणि (b)
  • )फक्त (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Quantitative Aptitude

आठवड्याची सुटी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नानू बाइकस्वारी करतो. कामाच्या ठिकाणी जा-ये करताना तो 120 किमी अंतर कापतो. बारा आठवड्यांनंतर त्याच्या वाहनाने 9000 किमी प्रवास नोंदवला. तर बारा आठवड्यांच्या कालावधीत नानूने केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त नानूने केलेला प्रवास दर्शवणारा पर्याय निवडा.

  • )1600
  • )1400
  • )1800✓ योग्य
  • )1200

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Quantitative Aptitude

M ला एकूण मुले किती या प्रश्नासंदर्भात दिलेल्या पुढील विदेचा पुरेपणा निश्चित करा. विडा विधाने : (a) जुळ्या मुली असलेल्या J चा M हा नवरा असून, तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. (b) K ला एक नातू असून, ती J ची सासू आहे.

  • )(अ) व (ब) दोन्ही आवश्यक व पुरेशी आहे. / Both (a) and (b) are necessary and sufficient.✓ योग्य
  • )फक्त (अ) पुरेशी आहे. / (a) alone is sufficient.
  • )फक्त (अ) किंवा (ब) पुरेशी आहे. / Either (a) or (b) is sufficient.
  • )फक्त (ब) पुरेशी आहे. / (b) alone is sufficient.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Environment

जोड्या जुळवा : चक्रीवादळ वर्ष (a) निसर्ग (i) 2021 (b) तौक्ते (ii) 2020 (c) फयान (iii) 2009 (d) क्यार (iv) 2019

  • )(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
  • )(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
  • )(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)✓ योग्य
  • )(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Maharashtra

महाराष्ट्रातील चाळी व घरे यांचा विकास करणारी संस्था म्हाडा (MHADA) केव्हा उदयास आली ?

  • )जून 1975
  • )जानेवारी 1985
  • )डिसेंबर 1957
  • )डिसेंबर 1977✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Environment

खालीलपैकी कोणते अभयारण्य/राष्ट्रीय उद्यान भौगोलिक क्षेत्रफळाने मोठे आहे ?

  • )अंधारी✓ योग्य
  • )तानसा
  • )चांदोली
  • )नागझिरा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Economy

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2019-20 नुसार राज्यात 2018-19 साली एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र वनाखाली होते ?

  • )20.10✓ योग्य
  • )18.40
  • )17.90
  • )14.13

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Geography

जनगणना 2001 प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता 200 पेक्षा कमी होती ?

  • )नांदेड
  • )जालना
  • )अहमदनगर
  • )यवतमाळ✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Geography

खालीलपैकी पूर्णा नदीच्या उजव्या तिरावरील कोणत्या उपनद्या आहेत ? (a) काटेपूर्णा (b) बिसवा (c) भूलेश्वर (d) शहानूर पर्यायी उत्तरे :

  • )(a) आणि (b)
  • )(b) आणि (c)
  • )(c) आणि (d)✓ योग्य
  • )(a), (b) आणि (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Geography

खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते क्षेत्र मॅंगनीज खाणी संदर्भात महत्त्वाचे नाही ?

  • )चिखला
  • )सीता साओंगी
  • )डोंगरी बुजुर्ग
  • )वरोरा-वैतरणा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Maharashtra

कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्ह्याची संख्या अधिक आहे ?

  • )पुणे विभाग / Pune Division
  • )नागपूर विभाग / Nagpur Division
  • )कोकण विभाग / Konkan Division
  • )औरंगाबाद विभाग / Aurangabad Division✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Maharashtra

जनगणना 2011 प्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचा स्त्री-पुरुष प्रमाण दर किती होता ?

  • )700 ते 800 दरम्यान / Between 700 to 800
  • )800 ते 900 दरम्यान / Between 800 to 900
  • )900 ते 1000 दरम्यान / Between 900 to 1000✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६History

जगन्नाथ शंकरशेठ यांना कशाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते ?

  • )महाराष्ट्राचे / Maharashtra
  • )मुंबईचे / Mumbai✓ योग्य
  • )रेल्वेचे / Railway
  • )शिक्षणाचे / Education

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७History

सोलापूर नगरपालिकेवरील राष्ट्रध्वज उतरविण्यास ________ यांनी नकार दिला.

  • )माणिकचंद शाह / Manikchand Shah✓ योग्य
  • )दादासाहेब खापर्डे / Dadasaheb Khaparde
  • )सोमन देशपांडे / Soman Deshpande
  • )शंकरराव देव / Shankarrao Deo

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८History

‘तरुण मराठा’ पक्ष कोणी स्थापन केला ?

  • )पांडुरंग राजभोज / Pandurang Rajbhoj
  • )वि.रा. शिंदे / V.R. Shinde
  • )मल्हारी मार्तंड डिखळे / Malhari Martand Dikhale
  • )केशवराव मारुतीराव जेधे / Keshavrao Marutirao Jedhe✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९History

पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमे यादी करा : (a) लाहोर येथे भरलेल्या मुस्लीम लीगच्या अधिवेशनात पाकिस्तानच्या मागणीचा ठराव केला. (b) अलाहाबाद येथे डॉ. महंमद इकबाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानची कल्पना मांडली. (c) बॅरिस्टर जीना यांनी मुस्लिमांच्या मागण्यांसाठी चौदा मुद्दे मांडले. (d) पंडित जवाहरलाल नेहरू हंगामी सरकारचे पंतप्रधान झाले. तो दिवस मुस्लीम लीगने शोकदिन म्हणून पाळला. पर्यायी उत्तरे :

  • )(b), (a), (c), (d)
  • )(c), (a), (b), (d)
  • )(a), (b), (c), (d)
  • )(c), (b), (a), (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Maharashtra

दिनकरराव जवळकरांनी ‘विजयी मराठा’ या वृत्तपत्रात कोणत्या टोपण नावाने लिखाण केले ?

  • )भाई महाजन
  • )भवानी तलवारे✓ योग्य
  • )मल्हारी डिखळे
  • )दलित कैवारी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२History

नाशिक येथील क्रांतीकारी चळवळीचे प्रमुख ________________ हे होते.

  • )डॉ. मुंजे
  • )उत्तमराव पाटील
  • )गणेश दामोदर सावरकर✓ योग्य
  • )विनायक दामोदर सावरकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३History

विष्णूबुवा ब्रह्मचारी यांना 'साम्यवादाचा पहिला प्रतिपादक' असे कोणी म्हटले ?

  • )लोकमान्य टिळक
  • )साने गुरुजी
  • )म.ज्व. माडखोलकर✓ योग्य
  • )म.गो. रानडे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४History

मुंबई इलाक्याचे शिक्षण तपासनीस आणि एल्फिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून कोण कार्यरत होते ?

  • )महात्मा फुले
  • )कर्मवीर भाऊराव पाटील
  • )बाळशास्त्री जांभेकर✓ योग्य
  • )लोकहितवादी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे महत्वाचे वैशिष्ट्य/ष्ट्ये आहेत ? (a) अध्यक्षीय शासनपद्धती (b) प्रभावशाली केंद्रशासन (c) दुहेरी न्यायपालिका (d) द्विगृही कायदेमंडळ योग्य पर्याय निवडा :

  • )फक्त (a)
  • )(b) आणि (d)✓ योग्य
  • )(b), (c), (d)
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

सरकारीया कमिशन हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? (a) केंद्र-राज्य संबंध (b) निवडणूक सुधारणा (c) बँकींग व वित्तीय विभाग वरीलपैकी योग्य पर्याय निवडा :

  • )फक्त (a) / Only (a)✓ योग्य
  • )फक्त (b) / Only (b)
  • )(a) आणि (b) / (a) and (b)
  • )वरील सर्व / All the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Polity

माहितीचा अधिकार ______ आहे.

  • )मूलभूत अधिकार / Fundamental Right
  • )कायदेशीर अधिकार / Legal Right✓ योग्य
  • )मूलभूत अधिकार नाही व कायदेशीर अधिकार ही नाही / Neither fundamental right nor legal right
  • )मूलभूत अधिकार व कायदेशीर अधिकार हे दोन्ही आहेत / Both fundamental right as well as legal right

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Maharashtra

कार्यकाळानुसार योग्य क्रम लावा – (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री) : (a) ए.आर. अंतुले (b) शिवाजीराव निलंगेकर (c) वसंतराव नाईक (d) बाबासाहेब भोसले पर्यायी उत्तरे :

  • )(c), (a), (d), (b)✓ योग्य
  • )(c), (d), (b), (a)
  • )(a), (c), (d), (b)
  • )(a), (d), (b), (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Polity

खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळलेली नाही ?

  • )मूलभूत कर्तव्ये - भाग-IV A
  • )राज्यधोरणाची निर्देशक तत्वे - भाग-IV
  • )मूलभूत अधिकार - भाग-III
  • )यापैकी नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Maharashtra

योग्य कथने ओळखा : (a) ‘फिफ्टी इयर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह कौन्सिल इन महाराष्ट्र’ हा ग्रंथ यशवंतराव चव्हाण यांनी लिहिला. (b) महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा वर्धापन दिन 20 जुलै आहे. (c) महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये राज्यपालांद्वारे नियुक्त 12 सदस्य असतात. (d) महाराष्ट्राच्या विधान परिषदेची गणपूर्ती संख्या 10 सदस्य एवढी आहे.

  • )फक्त (b), (c)
  • )फक्त (c), (d)
  • )फक्त (a), (b), (c)
  • )फक्त (b), (c), (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Polity

भारताच्या कोणत्या राज्याची केंद्रशासित प्रदेश वर्गवारीमधून राज्यांच्या वर्गवारीमध्ये बढती करण्यात आली ? (a) मिझोरम (b) अरुणाचल प्रदेश (c) गोवा (d) सिक्कीम

  • )फक्त (a), (b)
  • )फक्त (b), (c), (d)
  • )फक्त (a), (b), (c)✓ योग्य
  • )फक्त (c), (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Polity

खालीलपैकी कोणती उदाहरणे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची आहेत?

  • )(a) किमान वेतन कायदा, 1948
  • )(b) मातृत्व लाभ कायदा, 1961
  • )(c) राष्ट्रीय वन धोरण, 1988
  • )(d) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, 2006✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Current Affairs

नोव्हेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधान परिषदेत सर्वाधिक जागा कोणत्या राजकीय पक्षाकडे आहेत ?

  • )राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
  • )भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • )शिवसेना
  • )भारतीय जनता पार्टी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Polity

खालीलपैकी कोणते/ही मूलभूत कर्तव्य/ये नाहीत ? (a) भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकवणे व संरक्षित करणे. (b) सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी आपल्या प्रतिनिधीकाराचा वापर करणे. (c) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वैभवशाली वारसाचे मूल्य जतन करणे.

  • )Only (a) and (b)
  • )Only (b)✓ योग्य
  • )Only (b) and (c)
  • )Only (a) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Polity

संविधानामध्ये _______ स्थापन करण्याची तरतूद आहे ज्यामार्फत जिल्ह्यातील पंचायत आणि नगरपालिकांनी तयार केलेल्या योजना एकत्रित करणे आणि नंतर संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रारूप आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. (1) जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन (3) जिल्हा सांख्यिकी समित्या

  • )जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन / District Social and Economic Review
  • )जिल्हा नियोजन समित्या / District Planning Committees✓ योग्य
  • )जिल्हा सांख्यिकी समित्या / District Statistical Committees
  • )जिल्हा संसाधन समित्या / District Resource Committees

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Economy

2004-05 च्या किंमतीनुसार 2010-11 मध्ये निव्वळ घरगुती उत्पादनात तृतीयक क्षेत्राचा वाटा _______ इतका होता.

  • )60.3 टक्के / 60.3 percent✓ योग्य
  • )26.5 टक्के / 26.5 percent
  • )24.7 टक्के / 24.7 percent
  • )18.2 टक्के / 18.2 percent

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Polity

खालीलपैकी कोणते अनुच्छेद पंचायत राजशी संबंधित आहे ?

  • )अनुच्छेद 324 / Article 324
  • )अनुच्छेद 243 / Article 243✓ योग्य
  • )अनुच्छेद 124 / Article 124
  • )अनुच्छेद 356 / Article 356

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Economy

‘भौतिक साधनांसोबतच सांस्कृतिक पातळी उंचीवणे’ हे खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट होते ?

  • )गांधीचे वृद्धी प्रतिमान / Gandhi model of growth✓ योग्य
  • )नेहरूचे वृद्धी प्रतिमान / Nehru model of growth
  • )खाजगीकरण प्रतिमान / Privatization model
  • )आचार्य अग्रवाल प्रतिमान / Acharya Agrawal model

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Economy

खालीलपैकी कोणते धोरण अन्न सुरक्षेचा भाग आहे ? (a) सार्वजनिक वितरण व्यवस्था सशक्त करणे. (b) पोषणविषयक उद्दिष्टे निश्चित करणे. (c) अन्नधान्याच्या किमान आधारभूत किंमती निश्चित करणे. (d) देशांतर्गत उत्पादन अधिकाधिक वाढवण्यास प्राधान्य देणे. वरीलपैकी योग्य पर्याय निवडा :

  • )(a) आणि (b)
  • )(a) आणि (d)
  • )फक्त (c)
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Polity

74 व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारांना कोणती बाब आवश्यक करण्यात आली ? (a) तालुका समितीची स्थापना (b) शिक्षणाचा हक्क (c) जिल्हा विकास समितीची स्थापना (d) जिल्हा नियोजन समितीची स्थापना पर्यायी उत्तरे :

  • )(a) फक्त
  • )(b) आणि (c)
  • )(d) फक्त✓ योग्य
  • )यापैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Economy

अर्थव्यवस्था विकसित होत असताना, देशाची व्यावसायिक रचना साधारणपणे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या बाजूने बदलते?

  • )प्राथमिक / Primary
  • )द्वितीयक / Secondary
  • )तृतीयक / Tertiary
  • )द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्र / Secondary and Tertiary Sectors✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Current Affairs

भारतमाला परियोजनेचे हे लक्ष्य आहे : (a) वाहतुकीत महत्तम कार्यक्षमता साधणे. (b) आर्थिक विधी (मार्गिका) विकसित करणे. (c) सागरकिनारे आणि बंदरे यांची जोडणी सुधारणे.

  • )(a) आणि (b) फक्त / (a) and (b) only
  • )(b) आणि (c) फक्त / (b) and (c) only
  • )(a) आणि (c) फक्त / (a) and (c) only
  • )वरीलपैकी सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Current Affairs

जोड्या जुळवा : स्तंभ - 'अ' (a) निष्ठा (b) दीक्षा (c) ध्रुव स्तंभ - 'ब' (l) कौशल्य विकासासाठी हुशार विद्यार्थी यांचा शोध घेणे. (m) अध्ययन व अध्यापनासाठीचा तंत्रज्ञानावर आधारित मंच. (n) शाळेच्या मुख्याध्यापकांच्या समग्र शैक्षणिक उन्नतीसाठीचा उपक्रम

  • )(a)-(n), (b)-(m), (c)-(l)✓ योग्य
  • )(a)-(l), (b)-(m), (c)-(n)
  • )(a)-(n), (b)-(l), (c)-(m)
  • )(a)-(m), (b)-(l), (c)-(n)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Economy

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? (a) सागरमाला विकास कंपनी मर्यादित हीची स्थापना सन् 2014 मध्ये झाली. (b) सागरमाला अंतर्गत प्रकल्पांची अंमलबजावणी खाजगी किंवा सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने होते.

  • )(a) फक्त बरोबर आहे.
  • )(b) फक्त बरोबर आहे.✓ योग्य
  • )(a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
  • )(a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Economy

टेलीफोन खात्याचा कारभार, 'भारत संचार निगम लिमिटेड' कडे ______ मध्ये हस्तांतरीत करण्यात आला.

  • )1991
  • )1994
  • )2000✓ योग्य
  • )2005

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Economy

खालीलपैकी रस्ते वाहतुकीच्या मुख्य समस्या कोणत्या आहेत ? (a) रस्ते विकासाची मंदगती (b) निकृष्ट दर्जा (c) विषम वितरण (d) उच्च वाहतूक खर्च पर्यायी उत्तरे :

  • )(a) फक्त
  • )(a) आणि (b) फक्त
  • )(a), (b) आणि (d) फक्त
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२History

भारतात कोळसा खाणीची सुरुवात सर्वप्रथम ______ येथे झाली.

  • )मध्य प्रदेश
  • )ओरीसा
  • )पश्चिम बंगाल✓ योग्य
  • )आंध्र प्रदेश

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Current Affairs

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 'भारत नेट' प्रकल्पाचे हे उद्देश आहेत : (a) ऑप्टीक फायबर जाळ्याने ग्रामपंचायती जोडणे. (b) दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबाना विनामूल्य नेटवर्क पुरविणे. पर्यायी उत्तरे :

  • )(a) फक्त बरोबर आहे✓ योग्य
  • )(b) फक्त बरोबर आहे
  • )(a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत
  • )(a) आणि (b) दोन्हीही चूक आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Economy

भारतातील पायाभूत सोयींचा विकास केवळ शहरांच्या बाजूने झुकणारा आहे असे नव्हे तर तो ______ बाजूनेही झुकणारा आहे.

  • )गरिबांच्या / poor
  • )श्रीमंताच्या / rich✓ योग्य
  • )कामगारांच्या / workers
  • )शेतकऱ्यांच्या / farmers

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Current Affairs

खालील विधाने पहा : (a) नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन योजना (NEMMP) चा उद्देश इंधन बचत आणि कर्ब उत्सर्जन कमी करणे आहे. (b) फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ (हायब्रीड) इलेक्ट्रिक व्हेईकल्स (FAME) ही केंद्रीय योजना आहे. पर्यायी उत्तरे : (1) (a) फक्त बरोबर विधान आहे. (2) (b) फक्त बरोबर विधान आहे. (3) (a) आणि (b) दोन्ही विधाने चूक आहेत. (4) (a) आणि (b) दोन्ही विधाने बरोबर आहेत.

  • )(a) फक्त बरोबर विधान आहे. / only (a) is correct statement.
  • )(b) फक्त बरोबर विधान आहे. / only (b) is correct statement.
  • )(a) आणि (b) दोन्ही विधाने चूक आहेत. / (a) and (b) both are incorrect statements.
  • )(a) आणि (b) दोन्ही विधाने बरोबर आहेत. / (a) and (b) both are correct statements.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Economy

जागतिक व्यापार परिषदेच्या बौद्धिक संपदाविषयक अधिकारांत खालीलपैकी कोणत्या कलमांचा समावेश होतो ?

  • )पेटंटशी संबंधित कलम / Patent related clause✓ योग्य
  • )व्यापारातील गुंतवणूकविषयक योजना संबंधित कलम (TRIMs) / Trade related investment measures (TRIMs)
  • )व्यापारशुल्क आणि व्यापारविषयक सामान्य करार (GATT) / General agreement on tariff and trade
  • )सामाजिक कलम / Social clause

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Economy

खालीलपैकी अचूक विधान कोणते ?

  • )परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते तर रोखेसंग्रही गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेत अस्थिरता येते. FDI helps to increase the productive capacity of the economy while FPI leads to volatility.✓ योग्य
  • )परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेत खरेदीशक्ती वाढते तर रोखेसंग्रही गुंतवणुकीमुळे परदेशी रोखे बाजाराचा फायदा होतो. FDI leads to increased purchasing power in the economy whereas FPI benefits foreign share market.
  • )भारतात परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीपेक्षा रोखेसंग्रही गुंतवणुकीचा फायदा अधिक आहे. FPI is more beneficial than FDI in India.
  • )परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक ही केवळ विकसनशील देशांसाठीच फायदेशीर आहे. FDI is beneficial for developing nations only.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Economy

खाजगीकरणाच्या संकल्पनेत खालील बाबींचा समावेश होतो : (a) सार्वजनिक उद्योगांच्या मालकीचे खाजगी उद्योगांकडे हस्तांतरण. (b) सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांची संमिश्र भागीदारी. (c) सार्वजनिक उद्योगातील मालमत्तेची विक्री. (d) खाजगी व्यवस्थापनाकडे हक्क हस्तांतरित करणे. अचूक उत्तरे निवडा.

  • )(a) आणि (b) (a) and (b)
  • )(b) आणि (c) (b) and (c)
  • )(c) आणि (d) (c) and (d)
  • )वरील सर्व All above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Science

खालीलपैकी कोणत्या जैविक उत्पादनाचे पेटंट आव्हानीत होते आणि ते भारताने अमेरिका या देशाकडून पुन्हा मिळवले ?

  • )हळद Turmeric✓ योग्य
  • )कारले Bitter gourd
  • )दुधी भोपळा Bottle gourd
  • )तुळस Basil

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Economy

भारतीय दूरसंचार जाळे हे संपूर्ण जगात ________ क्रमांकाचे आहे.

  • )तिसऱ्या Third
  • )दुसऱ्या Second✓ योग्य
  • )पहिल्या First
  • )पाचव्या Fifth

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Economy

रंगराजन समिती (2014) नुसार 2011-12 साठी दारिद्र्य रेषेची व्याख्या शहरी भागासाठी ₹ ______ व ग्रामीण भागासाठी ₹ ______ दरडोई दरदिवशी अशी करण्यात आली.

  • )47 आणि 39
  • )47 आणि 31
  • )67 आणि 32
  • )47 आणि 32✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Current Affairs

सन् 2018 चा ऑक्सफॅम अहवाल असे सांगतो की भारतातील एक टक्के श्रीमंत लोक ______ टक्के एवढे राष्ट्रीय उत्पन्न मिळवितात.

  • )50
  • )45
  • )73✓ योग्य
  • )68

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Economy

विशेष आहरण अधिकार (SDR) हे :

  • )आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आंतरराष्ट्रीय रोखेतील उपाययोजनेसाठी निर्माण केलेले परकीय चलनसाठ्याविषयक अधिकार आहेत.✓ योग्य
  • )आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे गुंतवणूक साठ्याविषयक व परकीय चलनविषयक अधिकार आहेत.
  • )जागतिक बँकेशी संबंधित विकसनशील देशांच्या विकासा निधी विषयक अधिकार आहेत.
  • )आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचे कर्जविषयाविषयक व आंतरराष्ट्रीय रोखेविषयक अधिकार आहेत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Economy

जागतिक व्यापार संघटनेचा प्रतिनिधी म्हणून भारताने आपल्या बांधील (बध्य-बाउंड) जकातीमध्ये पुढील प्रमाणे वाढ केली ?

  • )(iii)
  • )(i)✓ योग्य
  • )(ii)
  • )वरीलपैकी कुठलेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Economy

खालीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून जागतिक व्यापारी संघटना भारतीय अर्थव्यवस्थेला फायदेशीर नाही ?

  • )सांस्कृतिक विकास
  • )पर्यटन विकास
  • )राजकीय विकास
  • )व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचे हक्क✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Economy

GATS व्यापाराबाबत करार हा ______ च्या व्यापाराशी संबंधित आहे.

  • )सेवांच्या✓ योग्य
  • )स्वामित्व हक्क (पेटंट)
  • )प्रतिलिपी अधिकार (कॉपीराईट)
  • )व्यापारी चिन्हांशी (ट्रेडमार्क)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Economy

जागतिकीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे : (a) आर्थिक एकीकरणात जास्त सखोलता येते (b) आर्थिक पारदर्शकता वाढते (c) सीमेपलीकडील दहशतवादात वाढ होते (d) आर्थिक परस्परावलंबित्व वाढते

  • )(a), (b) व (c)
  • )(b), (c) व (d)
  • )(a), (b) व (d)✓ योग्य
  • )(a), (c) व (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Economy

खालीलपैकी कोणते व्यापाराशी संबंधित गुंतवणूक उपाययोजनांच्या (TRIMS) संदर्भातील उद्दिष्टे/उद्दिष्टे नाही/नाहीत ? (a) यजमान देशाकडून निर्यातीला प्रोत्साहन. (b) मालावर अंकित केलेली व्यापारी मुद्रा/बोधचिन्हासह सेवा चिन्ह. (c) प्रगत आर्थिक आणि सामाजिक धोरणाचे ध्येय. (d) तंत्रज्ञानाचे हस्तांतरण.

  • )केवळ (a)
  • )केवळ (b)✓ योग्य
  • )(a) आणि (d)
  • )(b) आणि (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Economy

विकसनशील देशांच्या संदर्भात जागतिकीकरणाच्या समर्थनार्थ खालीलपैकी कोणते मुद्दे समर्पक आहेत ? (a) जागतिकीकरणामुळे प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीस चालना मिळते व देश आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्जबाजारी होत नाही. (b) जागतिकीकरणामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होतो व देशांना संशोधनात भर न घालता तंत्रज्ञान मिळते. (c) जागतिकीकरण प्रक्रियेमुळे विकसनशील देशातील दारिद्र्य दूर झाले आहे. (d) जागतिकीकरणामुळे ज्ञानाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होते. वरीलपैकी योग्य उत्तर कोणते ?

  • )(a), (b) आणि (c)
  • )(b), (d) आणि (c)
  • )(a), (c) आणि (d)
  • )(a), (b) आणि (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Economy

व्यापारासंबंधीत बौद्धिक संपत्ती हक्कामध्ये (TRIPS) खालील हक्कांचा समावेश होतो : (a) प्रतिलिपी हक्क (b) व्यापार चिन्ह (c) शेतीविषयक करार वरीलपैकी कोणते हक्क जागतिक व्यापार संघटनेने (WTO), ट्रीप्स अंतर्गत प्रस्थापित केले ?

  • )फक्त (a)
  • )फक्त (a) आणि (b)✓ योग्य
  • )फक्त (a) आणि (c)
  • )(a), (b) आणि (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Economy

जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) सर्वोच्च अधिकार ______ ला आहेत. (1) विवाद समझोता मंडळ (2) मंत्रिमंडळ परिषद (3) महासंचालक (4) सर्वसाधारण मंडळ

  • )Dispute Settlement Body
  • )Ministerial Conference✓ योग्य
  • )Director General
  • )General Council

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Economy

______ ने गुंतवणुकीत भारतीय गुंतवणूक दाराएवढेच परदेशी गुंतवणूक दारांना अधिकार मिळतील.

  • )बुद्धी संपदा मालमत्ता अधिकार / Trade Related Intellectual Property Rights
  • )गुंतवणूक उपाय योजना व्यापाराबाबतचा करार / Trade Related Investment Measures✓ योग्य
  • )सेवेतील व्यापाराबाबतचा करार / General Agreement on Trade in Services
  • )वरीलपैकी एकही नाही / None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Current Affairs

खालीलपैकी कोणत्या राज्याला 2018-19 मध्ये सर्वाधिक महसूल ₹ 90,140 कोटी इतका SGST मधून मिळाला आहे ?

  • )तामिळनाडू / Tamilnadu
  • )उत्तर प्रदेश / U.P.
  • )कर्नाटक / Karnataka
  • )महाराष्ट्र / Maharashtra✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Economy

तुटीचा अर्थभरणा केल्याचा परिणाम म्हणून __________ होते. (1) किंमत पातळीत वाढ (3) उत्पादन पातळीत घट

  • )Rise in price level✓ योग्य
  • )Government faces loss
  • )Declining output level
  • )None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Economy

__________ या क्षेत्राला 2019-20 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक सबसिडी मिळाली आहे.

  • )Maharashtra State Electricity Distribution Company✓ योग्य
  • )Incentives to industrial units
  • )Food grain distribution for Annapurna etc.
  • )Maharashtra State Road Transport Corporation

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Economy

1987-88 नंतर केंद्रसरकारचे सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते.

  • )संरक्षणखर्च आणि नागरीखर्च
  • )विकास आणि विकासेतर खर्च✓ योग्य
  • )महसूली आणि भांडवली खर्च
  • )चालूखर्च आणि भांडवली खर्च

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Economy

मार्च 2012 च्या नियोजन आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण 2009-10 मध्ये ______ इतके खाली आले.

  • )19.8%
  • )21.9%
  • )29.8%✓ योग्य
  • )45.0%

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Environment

खालीलपैकी कोणता ऊर्जा स्रोत अपारंपरिक आहे ?

  • )प्राण्यांचे शेण
  • )कृषी कचरा
  • )जळाऊ लाकडे
  • )सौर ऊर्जा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2020-sti-paper-ii