स्पर्धाAI

MPSC गट ब २०२०

PSI Paper II · ९६ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न History

माणगाव येथील परिषदेत डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करावे असे कोणी सांगीतले ?

  • )छ. शाहू महाराज✓ योग्य
  • )आप्पासाहेब पाटील
  • )वि.रा. शिंदे
  • )गंगाराम कांबळे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? अ. रामकृष्णा विश्वनाथ यांनी आधुनिक मराठीतील पहिला अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिला. ब. न्यायमूर्ती रानडे यांनी भारताच्या आर्थिक शोषणास 'खंडणी' असे म्हटले. क. गोपाळ हरी देशमुख यांनी 'लक्ष्मी ज्ञान' या ग्रंथाचे लेखन केले. ड. रमेशचंद्र दत्त यांनी भारतीय दारिद्र्याचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा मांडला.

  • )विधान अ, ब आणि क योग्य आहेत✓ योग्य
  • )विधान ब, क आणि ड योग्य आहेत
  • )विधान अ आणि ड योग्य आहेत
  • )विधान अ आणि ब योग्य आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Historyआयोगाने रद्द

1885 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी ______ मध्ये आर्य समाजाची स्थापना केली.

  • )जालंधर
  • )रावळपिंडी
  • )लाहोर
  • )मुंबई

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न History

आदिवासी लोकांच्या सुधारणेबाबत, खालील जोड्या जुळवा : कार्य अ. ‘आदिवासी सेवा मंडळ’ व ‘खरेदी-विक्री संघाची’ स्थापना केली ब. आदिवासी सेवा सुधार समितीची स्थापना क. आदिवासींच्या मुलांसाठी अंगणवाड्या सुरु केल्या ड. ‘जंगल बचाव’ व ‘मानव बचाव’ हे आंदोलन सुरु केले सुधारक i. ताराबाई मोडक ii. सुखदेव उईके iii. कॉ. रेवजी चौधरी iv. डॉ. रामराव वाडिवे

  • )i ii iii iv
  • )iv iii ii i
  • )iii iv i ii✓ योग्य
  • )ii i iv iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

यांनी अनार्य दोष परिहारक मंडळीची स्थापना केली.

  • )किसन फागु बनसोडे
  • )बाबासाहेब आंबेडकर
  • )गोपाळ बुवा वलंगकर✓ योग्य
  • )शिवराम जानबा कांबळे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Historyआयोगाने रद्द

शेतकरी चळवळीविषयी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. भारतात शेतकऱ्यांतर्फे सरकारकडे दाद मागण्याची चळवळ प्रथम सार्वजनिक सभेने केली. ब. दख्खन दंगे म्हणून ओळखला जाणारा उठाव महाराष्ट्रात 1867 मध्ये सुरु झाला. क. 1936 मध्ये लखनौ येथे स्थापन झालेल्या भारतीय किसान सभेचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. ड. खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या साराबंदीच्या चळवळीत इंदुलाल पारिख व ना.म. जोशी हे काँग्रेस नेते सामील झाले.

  • )विधान अ आणि ब बरोबर आहेत
  • )विधान अ आणि ड बरोबर आहेत
  • )विधान ब, क आणि ड बरोबर आहेत
  • )विधान अ, क आणि ड बरोबर आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न History

महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या बंडाला ___________ असे म्हटले.

  • )दख्खनचे दंगे / Deccan Riots✓ योग्य
  • )शेतकऱ्यांची क्रांती / Farmers' Revolution
  • )मुळशी सत्याग्रह / Mulshi Satyagraha
  • )जंगल सत्याग्रह / Jungle Satyagraha

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

1911 मध्ये ना.म. जोशी यांनी ___________ ही संस्था स्थापन केली.

  • )सोशल सर्विस लीग / Social Service League✓ योग्य
  • )कामगार हितवर्धक सभा / Kamgar Hitwardhak Sabha
  • )अखिल भारतीय ट्रेड युनियन / All India Trade Union
  • )हिंद मजूर पंचायत / Hind Mazdoor Panchayat

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

'वेदोक्त धर्मप्रकाश' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

  • )लोकमान्य टिळक / Lokmanya Tilak
  • )राजर्षी शाहू महाराज / Rajarshi Shahu Maharaj
  • )डॉ. आंबेडकर / Dr. Ambedkar
  • )विष्णू भिकाजी गोखले / Vishnu Bhikaji Gokhale✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०History

नाना शंकरशेट यांनी खालीलपैकी कोणती सोसायटी स्थापन करण्यात पुढाकार घेतला ?

  • )ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया / Agri Horticultural Society of Western India✓ योग्य
  • )जिओ हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया / Geo Horticultural Society of Western India
  • )सोशो हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया / Socio Horticultural Society of Western India
  • )इको हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया / Eco Horticultural Society of Western India

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Polity

पुढीलपैकी योग्य रीतीने जुळलेली जोड्या सांगा : भारताच्या संविधान सभेतील प्रतिनिधीचे नाव अ. के.एम्. मुन्शी ब. वल्लभभाई पटेल क. फिरोज गांधी ड. राजेंद्र प्रसाद इ. के.सी. नियोगी प्रांताचे नाव ज्या मधून प्रतिनिधी संविधान सभेवर निवडला गेला - बॉम्बे/मुंबई - बॉम्बे/मुंबई - संयुक्त प्रांत - बिहार - बॉम्बे/मुंबई पर्यायी उत्तरे :

  • )अ, ब, क, ड आणि इ
  • )अ, ब, क आणि ड✓ योग्य
  • )ब आणि ड
  • )ब, क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Polity

संपूर्ण भारताच्या भूमीवर नागरिकांत “समान नागरी संहिता” प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे ?

  • )कलम 44✓ योग्य
  • )कलम 25
  • )कलम 48
  • )कलम 30

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Polity

संसद सदस्यांना अधिवेशन काळात पोलीसांना अटक करता येत नाही, परंतू अधिवेशनापूर्वी व नंतर सुद्धा किती दिवस अटक करता येत नाही ?

  • )10 दिवस पूर्वी व नंतर
  • )20 दिवस पूर्वी व नंतर
  • )30 दिवस पूर्वी व नंतर
  • )40 दिवस पूर्वी व नंतर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Polity

डॉ. आंबेडकर यांना 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' म्हटले जाते. कारण अ. त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला ब. ते घटना समितीचे अध्यक्ष होते क. ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते योग्य पर्याय निवडा :

  • )अ आणि ब
  • )ब आणि क
  • )फक्त क✓ योग्य
  • )फक्त ब

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Polity

'राज्यपाल' पदाबाबतच्या तरतुदींची, कलमे/घटना दुरुस्त्यांशी जुळणी करा : 'अ' अ. घटक राज्याकरिता राज्यपालपदाची तरतूद ब. राष्ट्रपतीकडून नेमणूक क. एका व्यक्तीची दोन किंवा अधिक घटक राज्याकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते ड. भारताच्या राष्ट्रपतीकडून पदमुक्तता 'ब' i. कलम 156(1) ii. 7वी घटनादुरुस्ती, 1956 iii. कलम 155 iv. कलम 153

  • )i ii iii iv
  • )iv iii ii i✓ योग्य
  • )iii iv i ii
  • )ii i iv iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Polity

16. घटनादुरुस्ती आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये झालेल्या बदलाबाबत जोड्या लावा : 'अ' अ. 42वी घटनादुरुस्ती ब. 44वी घटनादुरुस्ती क. 86वी घटनादुरुस्ती ड. 97वी घटनादुरुस्ती 'ब' i. गरिबांना समान न्याय व कायदेविषयक मोफत साहाय्य ii. सहकारी संस्थांची ऐच्छिक स्थापना, स्वायत्त कार्ये व लोकसत्ताक नियंत्रण यात वृद्धी करणे iii. उत्पन्न, दर्जा, सुविधा आणि संधी यांच्याबाबत असलेली विषमता कमी करणे iv. सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना प्रारंभिक बाल्यवस्थात देखभाल आणि शिक्षण उपलब्ध करून देणे

  • )i ii iii iv
  • )i iii iv ii✓ योग्य
  • )iv iii i ii
  • )iv i ii iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Polity

उप-मुख्यमंत्री पदाबाबतच्या विधानांचा विचार करा : अ. पद घटनात्मक नाही. ब. राजकीय सोय म्हणून नेमणूक केली जाते. क. हे पद कॅबिनेट मंत्राच्या दर्जाचे आहे. ड. हे पद आघाडीच्या आणि स्थानिक राजकारणाची निष्पत्ती आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त अ आणि क
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Polity

सहाव्या अनुसूची संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

  • )सहाव्या अनुसूचीखालील स्वायत्त जिल्हे हे राज्याच्या कार्यकारी अधिसत्तेच्या बाहेर आहेत. / Autonomous districts related under Sixth Schedule fall outside the executive authority of the state.
  • )सहाव्या अनुसूचीतील स्वायत्त जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये वाढ करणे अथवा कमी करणे हे फक्त राष्ट्रपतीच करू शकतात. / Only the President can increase or decrease the area of autonomous districts under Sixth Schedule.
  • )या क्षेत्रातील जिल्हा आणि प्रादेशिक परिषदा यांना जमीन महसुलाचे मूल्यांकन आणि संकलन करण्याचा अधिकार आहे. / The district and regional councils in these regions are empowered to assess and collect land revenue.✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Polity

भारतीय निवडणूक आयोगाबद्दल खालील विधाने विचारात घ्या : अ. अनुच्छेद-324 मध्ये निवडणूक आयुक्तांसाठी असलेले पात्रतेचे निकष सांगितलेले आहेत. ब. अनुच्छेद-324 मध्ये निवडणूक आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य दोन निवडणूक आयुक्त यांचा मिळून बनलेला असेल असे नमूद केले आहे. क. मुख्य निवडणूक आयुक्त हे अन्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णयाची पायमल्ली करू शकत नाहीत. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?

  • )अ आणि ब
  • )फक्त क✓ योग्य
  • )ब आणि क
  • )अ, ब आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Polity

खालीलपैकी कोणता भाग हा भारतीय संविधानाची मूलभूत संरचना म्हणून मान्य केला जातो ?

  • )वैधानिक पद्धती
  • )लोकसभेचे अध्यक्ष
  • )संसदीय लोकशाही✓ योग्य
  • )उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Polity

महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम, 2005 मधील कलम 3 मध्ये ______ ची तरतूद आहे.

  • )संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक / Appointment of protection officers
  • )संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्ये व कार्ये / Duties and functions of protection officers
  • )शासनाची कर्तव्ये / Duties of government
  • )कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या / Definition of domestic violence✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Polity

हुंडा प्रतिबंध कायदा, 1961 च्या कलम 3 प्रमाणे, जर कोणतीही व्यक्ती हुंडा देते किंवा घेते किंवा हुंडा देण्यास व घेण्यास उद्युक्त करते, तर त्यास ______ वर्षांपेक्षा कमी इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा जे ______ रुपयांपेक्षा कमी असणार नाही, किंवा अशा हुंड्याच्या किमतीची रक्कम जे काही अधिक असेल ते, अशी शिक्षा होईल.

  • )चार, दहा हजार / four, ten thousand
  • )पाच, पंधरा हजार / five, fifteen thousand✓ योग्य
  • )सहा, वीस हजार / six, twenty thousand
  • )दहा, पंचवीस हजार / ten, twenty-five thousand

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Polity

मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 च्या कलम 14 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद आहे ?

  • )अन्वेषण / Investigation✓ योग्य
  • )कबुली जबाब / Confession
  • )मानवी हक्क आयोगाची कार्ये / Functions of Human Rights Commission
  • )मानवी हक्क आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती / Terms and conditions of appointment of members of Human Rights Commission

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Polity

मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मधील कलम 31 मध्ये ______ ची तरतूद आहे.

  • )मानवी अधिकार न्यायालय / Human Rights Courts
  • )लेखा परीक्षक / Auditor
  • )राज्य मानवी हक्क आयोग / State Human Rights Commission
  • )विशेष सरकारी अभियोक्ता / Special Public Prosecutor✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Polity

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम, 1989 मधील कलम 3 मध्ये ______ ची तरतूद आहे.

  • )अत्याचाराच्या प्रकारांची / Types of Atrocities
  • )शिक्षेची / Punishment
  • )अत्याचाराचे गुन्हे व त्यांच्या शिक्षा / Atrocities (offences) and respective punishment✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Polity

मानव अधिकार संरक्षण अधिनियम, 1993 खाली गठीत समितीच्या शिफारसीवरून ______ हे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक करतात.

  • )कायदा मंत्री / The Law Minister
  • )पंतप्रधान / The Prime Minister
  • )राष्ट्रपती / The President✓ योग्य
  • )सर्वोच्च न्यायालय / The Supreme Court

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Polity

संयुक्त राष्ट्राच्या महासभेने मे 2002 मधील बालकांसाठी विशेष अधिवेशनात “अ वर्ल्ड फिट फॉर चिल्ड्रन” (मुलांसाठी योग्य जग) शीर्षक असलेले फलित दस्तऐवज चा स्वीकार केला. त्यास अनुसरून भारताने बालकांचे अधिकार संरक्षण ______ अधिनियम, 2005 तयार केला.

  • )आयोग / Commissions✓ योग्य
  • )न्यायालय / Courts
  • )संस्था / Institutions
  • )सुधारणा / Reformation

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Polity

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 अंतर्गत दंडाधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध खालीलपैकी कोणत्या न्यायालयाकडे अपील दाखल करता येते ?

  • )सत्र न्यायालय / Court of Session✓ योग्य
  • )कौटुंबिक न्यायालय / Family Court
  • )उच्च न्यायालय / High Court
  • )भारतात सर्वोच्च न्यायालय / Supreme Court of India

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Polity

शारीरिक दृष्ट्या दुर्बळ व्यक्तीचा (दिव्यांग) (समान संधी, अधिकार संरक्षण व पूर्ण सहभागासंबंधी) अधिनियम, 1995 मधील प्रकरण VII मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद आहे.

  • )समन्यायी कृती / Affirmative Actions✓ योग्य
  • )समानता / Equality
  • )भेदभाव प्रतिबंध / Non-Discrimination
  • )शास्ती / Punishment

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Polity

हुंडा प्रतिबंध अधिनियम, 1961 मधील कलम 8ब मध्ये ______ ची तरतूद आहे.

  • )हुंडा घेण्याचा अपराध / Offence of Dowry
  • )हुंडा घेण्याचे प्रकार / Types of Dowry
  • )हुंडा प्रतिबंध अधिकारी / Dowry Prohibition Officers✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Polity

संविधानाच्या अनुच्छेद ______ अनुसार कोणत्याही नागरिकाशी राज्याच्या, कोणत्याही रोजगार किंवा कार्यालयीन पदासाठी लिंगाच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही.

  • )14
  • )15
  • )16✓ योग्य
  • )21

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Polity

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 च्या कलम 22 अन्वये, पीडित व्यक्तीच्या अर्जानुसार, न्यायदंडाधिकारी, जाब देणाऱ्यास, कौटुंबिक हिंसेच्या कृत्यामुळे झालेल्या हानीसाठी आणि नुकसान भरून देण्याचे आदेश देऊ शकतात.

  • )नुकसानभरपाई / compensation✓ योग्य
  • )पोटगी / maintenance
  • )आयकर / income tax
  • )हुंडा / dowry

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Polity

महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम, 2005 मधील कलम 20 मध्ये ______ ची तरतूद आहे.

  • )सेवा पुरविणारे
  • )नोटीस बजावणे
  • )आर्थिक सहाय्य✓ योग्य
  • )अधिकारिता

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Polity

हुंडाबंदी अधिनियम, 1961 मधील कलम 2 च्या स्पष्टीकरण नुसार 'किंमती ऐवज' म्हणजे ______.

  • )भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 30 अनुसार लावलेला अर्थ✓ योग्य
  • )फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 नुसार लावलेला अर्थ
  • )वरीलपैकी दोन्हीही
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Maharashtra

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये राबविण्यात येत आहे, ला त्याचा घटक म्हणून नेमण्यात आले आहे, व त्यास 'गाव' संबोधण्यात येईल.

  • )ग्राम पंचायत✓ योग्य
  • )जिल्हा परिषद
  • )नगरपालिका
  • )जिल्हा विभाग

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 99 ते 116 चे उल्लंघन करण्यास कोणत्या कलमाअंतर्गत शिक्षेची तरतूद केलेली आहे ?

  • )कलम 114
  • )कलम 115
  • )कलम 116
  • )कलम 117✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम ______ मध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यास किंवा उप-विभागीय दंडाधिकाऱ्यांना अपराध करण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तींना आपल्या कार्य क्षेत्रातून घालवून देण्याचा अधिकार दिलेला आहे.

  • )56✓ योग्य
  • )57
  • )62
  • )63 A

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 55 मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद दिलेली आहे ?

  • )आयुक्त किंवा अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा जनतेस निर्देश देण्याचा अधिकार.
  • )गायन, वादन आवाज किंवा गोंगाट चालू ठेवण्यास मनाई वगैरे करण्याचे अधिकार.
  • )मनोरंजनाची स्थाने-जाहीर सभा यातील अव्यवस्था वगैरेबद्दल पोलीसांनी बंदोबस्त करणे.
  • )टोळया व जमाव यांची पांगा पांग करणे.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम ______ मध्ये अव्यवस्थेला प्रतिबंध करण्यासाठी विवक्षित कृतींना मनाई करण्याचा अधिकार आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आपआपल्या प्रभावाखाली असलेल्या क्षेत्रात दिलेला आहे.

  • )34
  • )35
  • )36
  • )37✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 कलम 49 अन्वये कलम ______ किंवा ______ खाली कोणताही वाद उपस्थित झाल्यास बृहन्मुंबईत मुख्य शहर दंडाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी यांचा, रक्कम किती द्यावयाची व कोणी द्यायची याबाबतचा निकाल निर्णायक असेल आणि याप्रमाणे ठरविलेली रक्कम ही, मुख्य शहर दंडाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी यांनी मागणी केली असता, ती देण्याबद्दल जी व्यक्ती जबाबदार असल्याचे आढळून आले असेल तिने देणे असलेली रक्कम जमीन महसुलाची थकबाकी आहे असे समजून जिल्हाधिकारी ती वसूल करील.

  • )45, 46
  • )50, 51
  • )44, 45
  • )47, 48✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 76 मधील तरतुदीनुसार ज्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे ______ अन्वये प्राणी आणण्यात आला आहे तो अधिकारी शक्य तितक्या लवकर त्याची तपासणी करील व अशा तपासणीचे अहवाल तयार करील. जर आरोपी व्यक्ती अहवालाच्या प्रतीकरिता अर्ज करील तर त्याची एक प्रत आरोपीस विनामूल्य देईल.

  • )72
  • )73
  • )74✓ योग्य
  • )75

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 कलम 21(1) अन्वये आयुक्तास, अधीक्षकास किंवा राज्य शासनाने याबाबतीत विशेषरित्या शक्ती प्रदान केलेल्या कोणत्याही दंडाधिकाऱ्यास आपल्या प्रभाराखाली येणाऱ्या हद्दीत कोणत्याही वेळेस उदाहरणार्थ दंगा इत्यादी वेळेस स्वतःच्या सही व शिक्क्यानिशी दिलेल्या आदेशाद्वारे पोलीस दलास कोणत्याही प्रसंगी मदत करण्यासाठी त्यास योग्य वाटेल अशा ______ आणि ______ वर्षांच्या कोणत्याही धडधाकट पुरुषाची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करता येईल.

  • )21 आणि 45
  • )18 आणि 35
  • )21 आणि 50
  • )18 आणि 50✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कोणत्या तरतुदीप्रमाणे पोलीस दलाची रचना स्पष्ट केली आहे ?

  • )कलम 8
  • )कलम 6
  • )कलम 5✓ योग्य
  • )कलम 7

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कोणत्या कलमाद्वारे धार्मिक समारंभ इत्यादी ठिकाणी सुव्यवस्था राखणेबद्दल आदेश काढण्याची तरतूद स्पष्ट केले आहे ?

  • )कलम 40✓ योग्य
  • )कलम 38
  • )कलम 41
  • )कलम 42

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम ______ नुसार पोलीसांना दावा न सांगितलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार दिलेला आहे.

  • )73
  • )80
  • )81
  • )82✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Polity

भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम ______ मध्ये कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने करण्यात येणाऱ्या अपराधाची तरतूद दिलेली आहे.

  • )295
  • )295 A✓ योग्य
  • )296
  • )298

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Polity

'A' याने प्रथम पत्नी 'B' जिवंत असताना आणि घटस्फोट झालेले नसताना 'C' शी दुसरे लग्न केले. उपरोक्त अपराधाचे वर्गीकरण करा.

  • )अजमानिपत्र व दखलपात्र
  • )जामिनपात्र व अदखलपात्र✓ योग्य
  • )अजमानिपत्र व अदखलपात्र
  • )जामिनपात्र व दखलपात्र

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Polity

भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 230 नुसार वेगळेपण ओळखा.

  • )कवढ्या
  • )छाप नसलेले तांब्याचे तुकडे
  • )भारतीय नाणे✓ योग्य
  • )पदके

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Polity

भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 36 नुसार उत्तर द्यावे : 'अ' हा अंशतः 'ब' ला अन्न देण्याचे अवैधपणे टाळून व अंशतः 'ब' ला मारहाण करून उद्देशपूर्वक 'ब' चा मृत्यु घडवून आणतो. 'अ' ने ______ अपराध केलेला आहे.

  • )मानवतेच्या विरोधी
  • )खून✓ योग्य
  • )अंशतः खून
  • )क्रूरपणे इजा करण्याचे कृत्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Polity

गुन्हा आणि त्या संबंधीत भारतीय दंड विधानातील तरतूदीशी जोड्या जुळवा : तरतूद अ. दुखापत ब. हल्ला क. चुकीची बंदी (गैर परिरोध) ड. अपहरण कलम i. कलम 340 ii. कलम 319 iii. कलम 351 iv. कलम 362 पर्यायी उत्तरे :

  • )ii, iii, i, iv✓ योग्य
  • )iii, i, ii, iv
  • )iv, i, ii, iii
  • )i, iv, iii, ii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Polity

भारतीय दंड संहिता, 1860 मध्ये निवडणुकीसंबंधी च्या अपराधांचा समावेश कोणत्या प्रकरणामध्ये केलेला आहे ?

  • )प्रकरण VIII
  • )प्रकरण IX
  • )प्रकरण IX A✓ योग्य
  • )प्रकरण IX B

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Polity

'A' हा 'B' ला त्याच्या पत्नीचा खून करण्यास चिथावणी देतो 'B' मान्य करतो, परंतु प्रत्यक्ष खून करत नाही. 'A' ला भारतीय दंड संहितेनुसार काय शिक्षा होईल ?

  • )शिक्षा होणार नाही कारण खून झाला नाही
  • )7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड✓ योग्य
  • )फक्त दंड
  • )1 वर्षांपर्यंत कारावास, दंड नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Polity

भारतीय दंड विधान, कलम 82 नुसार कोणत्या वयाच्या बालकाने केलेली कोणतीही गोष्ट ही अपराध होत नाही ?

  • )सहा वर्षा खालील
  • )सात वर्षा खालील✓ योग्य
  • )नऊ वर्षा खालील
  • )बारा वर्षा खालील

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Polity

भारतीय दंड संहितेतील _________ कोणताही लोकसेवक आपले कायदेशीर काम करीत असताना कामकाजात अडथळे आणण्याकरिता । त्याचे कर्तव्य करीत असताना दुखापत करण्यापासून संरक्षण करते ?

  • )कलम 326
  • )कलम 332✓ योग्य
  • )कलम 324
  • )कलम 330

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Polity

भारतीय दंड विधानाच्या खालीलपैकी कोणता प्रकरण हा फक्त धर्माबद्दलच्या गुन्ह्यांशी संबंधित आहे ?

  • )प्रकरण XII
  • )प्रकरण XV✓ योग्य
  • )प्रकरण XIV
  • )प्रकरण XVII

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Polity

अटक झालेल्या व्यक्तीस पुढील वेळेत न्यायालयासमोर आणले पाहिजे.

  • )8 तासात
  • )24 तासात✓ योग्य
  • )48 तासात
  • )वेळेचे बंधन नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Polity

फौजदारी प्रक्रिया संहितेतील खालीलपैकी कोणते कलम एखाद्या व्यक्तीला जर तिच्या इच्छेविरुद्ध चुकीच्या पद्धतीने कैद करून ठेवले तर शोध घेऊन सुटका करण्याच्या तरतुदी बाबत आहे ?

  • )95
  • )97✓ योग्य
  • )153
  • )293

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील खालीलपैकी कोणत्या कलमा अंतर्गत गुन्ह्यास बळी पडलेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई देण्याच्या योजने संदर्भात तरतूद करण्यात आली आहे ?

  • )कलम 354
  • )कलम 357
  • )कलम 357 A✓ योग्य
  • )कलम 357 B

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Polity

फौजदारी कायद्याचे एक मूलभूत तत्व असे आहे की, एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीस पुन्हा त्याच गुन्ह्यासाठी शिक्षा दिली जाऊ नये. हे तत्व घटनेच्या अनुच्छेद 20(2) मध्ये आणि फौ.प्र.सं च्या कलम ______ मध्ये आहे.

  • )200
  • )229
  • )300✓ योग्य
  • )305

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 2(n) नुसार “अपराध” याचा अर्थ त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्या प्रमाणे शिक्षपात्र केलेली कोणतीही कृती अगर अकृती होय आणि ज्या कृतीबद्दल “गुन्हे अतिक्रमण कायदा, 1871” मधील ________ प्रमाणे फिर्याद देता येईल अशा कोणत्याही कृतीचा त्यात समावेश आहे ?

  • )कलम 18
  • )कलम 14
  • )कलम 22
  • )कलम 20✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Polity

जर यथायोग्य तत्परता दाखवूनही, फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ______ व ______ प्रमाणे समन्सची बजावणी करता येत नसेल तर बजावणी करणारा अधिकारी समन्सची एक प्रत समन्स काढलेल्या व्यक्तीच्या राहत्या घरात किंवा घरवाडीत सामान्यपणे राहत असेल तेथे ठळकपणे दिसेल अशा जागी लावेल आणि तदनंतर न्यायालय योग्य वाटतील अशा चौकश्या केल्यानंतर समन्स रीतसर बजावण्यात आले आहे असे घोषित करू शकेल.

  • )63, 64, 65
  • )64, 65, 66
  • )61, 62, 63
  • )62, 63, 64✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Polity

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ______ अन्वये केंद्र किंवा राज्य सरकारकडून विनंती केल्यास, उच्च न्यायालय सर्वसाधारण अधिकाराने किंवा विशेष आदेशाने कोणत्याही व्यक्तीस विशिष्ट प्रकरणांच्या संदर्भात त्याला सर्व अधिकार देईल जे प्रथम श्रेणीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांना किंवा न्यायिक दंडाधिकारी दुसरा वर्ग यांना देऊ शकते. अशा दंडाधिकाऱ्यांना विशेष न्यायिक दंडाधिकारी असे संबोधले जाईल, आणि त्यांची नेमणूक एका वेळी एका वर्षापेक्षा जास्त नसावी.

  • )11
  • )12
  • )13✓ योग्य
  • )14

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 कलम 174(3) अन्वये जिल्हा न्यायदंडाधिकारी ______ कारणांकरिता प्रेताचे पोस्टमार्टम शल्यचिकित्सक किंवा शासन नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सक्तीचे करतो.

  • )3
  • )5✓ योग्य
  • )4
  • )6

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Polity

भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, 1872 मधील कितव्या प्रकरणामध्ये लेखी पुराव्या मुळे तोंडी पुरावा अपवर्जन करण्याच्या तरतूदी दिलेल्या आहेत ?

  • )प्रकरण IV
  • )प्रकरण IV A
  • )प्रकरण V
  • )प्रकरण VI✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Polity

भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, 1872 मधील खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये शासनाच्या प्राधिकरणा-न्वये तयार केलेले नकाशे किंवा आराखडे या संबंधीच्या गृहीतकाची तरतूद दिलेली आहे ?

  • )कलम 81
  • )कलम 83✓ योग्य
  • )कलम 85 A
  • )कलम 85 C

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Polity

भारतीय साक्षीपुरावा कायदा अधिनियमातील तरतूदी खालीलपैकी कोणत्या न्यायिक कार्यवाहींना लागू आहे? अ. दिवाणी न्यायालये ब. फौजदारी न्यायालये क. लष्करी न्यायालय ड. लवाद

  • )फक्त अ आणि ड
  • )फक्त अ, ब आणि क✓ योग्य
  • )फक्त ब फक्त
  • )वरीलपैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Polity

भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, 1872 मधील कलम 14 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद दिलेली आहे ?

  • )एखादा हक्क किंवा रूढी याबाबत प्रश्न असेल तेव्हा संबंध असलेले तथ्ये. / Facts relevant when right or custom is in question.
  • )मानसिक किंवा शारीरिक अवस्था अथवा शारीरिक संवेदना यांचे अस्तित्व दर्शविणारी तथ्ये. / Facts showing existence of state of mind or of bodily feelings.✓ योग्य
  • )एखादी कृती अपघाती होती की उद्देशपूर्ण होती या प्रश्नाशी संबंधित तथ्ये. / Facts bearing on question whether act was accidental or intentional.
  • )व्यवहारक्रमाचे अस्तित्व केव्हा संबंधित असते. / Existence of course of business when relevant.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Polity

भारतीय साक्षी पुराव्याच्या अधिनियमानुसार गृहितकाचे _________ प्रकार आहेत.

  • )तीन / three✓ योग्य
  • )दोन / two
  • )चार / four
  • )पाच / five

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Polity

भारतीय साक्षीपुरावा कायद्याच्या कोणत्या कलमाद्वारे अग्रगण्य/गर्भित प्रश्नांची व्याख्या दिलेली आहे ?

  • )कलम 2(f) / Section 2(f)
  • )कलम 2(m) / Section 2(m)
  • )कलम 141 / Section 141✓ योग्य
  • )कलम 142 / Section 142

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Polity

विशिष्ट अटींची पूर्तता केल्यास इलेक्ट्रॉनिक नोंदी दस्तऐवज म्हणून धरता येतील आणि पुरावा म्हणून त्याचा वापर करता येईल. वरील सुधारणा भारतीय साक्षीपुरावा कायदा, 1872 मध्ये _________ या वर्षी करण्यात आली.

  • )1999
  • )1960
  • )2000✓ योग्य
  • )2008

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Polity

‘अ’ वर गुन्ह्याचा आरोप आहे. गुन्हा घडल्यानंतर लगेचच ‘अ’ हा आपल्या घरातून परागंदा झाला हे तथ्य वादतथ्यांच्या नंतरचे आणि त्यांच्यामुळे परिणाम झालेले वर्तन म्हणून भारतीय साक्षीपुरावा अधिनियम च्या कलम _________ खाली संबंध आहे.

  • )5
  • )7
  • )9
  • )8✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Polity

पुढील उदाहरणाचा भारतीय साक्षीपुरावा कायद्याच्या संदर्भात विचार करा : “A ने B वर ₹ 2,00,000 (₹ दोन लाख) वसूल करण्यासाठी दावा लावला. त्याने त्यासंबंधी नोंदी आपल्या जमाखर्चाच्या वहीत केल्या होत्या. त्या B ला दाखवल्या आणि B हा तेवढ्या रुपयांचे आपल्याला देणे लागतो असे म्हटले.” वरील उदाहरणाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते ?

  • )नोंदी समर्पक नाहीत.
  • )नोंदी समर्पक असून पुरेशा आहेत.
  • )नोंदी समर्पक आहेत, परंतु कर्ज सिद्ध करणारा आणखी एखादा पुरावा असल्याशिवाय पुरेशा नाहीत.✓ योग्य
  • )नोंदी समर्पक व पुरेशा नाहीत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Polity

भारतीय साक्षीपुरावा कायद्यासंदर्भात पुढील विधानांचे परिक्षण करा. A. पुरावा कायद्याचा मूलभूत नियम असा आहे की ऐकीव पुरावा सहसा ग्राह्य धरत नाहीत. B. तोंडी पुरावा याचा अर्थ साक्षीदारांनी कोर्टासमोर केलेली विधाने. योग्य उत्तर निवडा.

  • )A बरोबर असून, B चूक आहे
  • )A चूक असून, B बरोबर आहे
  • )A आणि B दोन्ही बरोबर आहेत✓ योग्य
  • )A आणि B दोन्ही चूक आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Quantitative Aptitude

एका मुलाकडे पिवळा व निळा मेणखडू आहे आणखी एका मुलाकडे हिरवा आणि निळा मेणखडू आहे. तत्त्वकडे पिवळा खडू नाही. सुमाकडे हिरवा खडू आहे, परंतु लाल रंगाचा नाही. जानकडे पिवळा मेणखडू आहे. दोन्हीकडे निळा खडू आहे परंतु हिरवा नाही. 'प्रत्येकाकडे असलेले खडूचे रंग कोणते आहेत' या प्रश्नासंदर्भात खाली दिलेल्या अधिकच्या विदेचा पुरेसेपणा/आवश्यकता निश्चित करा. जास्तीची विदा विधाने: अ. प्रत्येक मुलाकडे फक्त दोनच खडू आहेत. ब. प्रत्येक रंगाचे फक्त दोन खडू आहेत.

  • )परिच्छेदात दिलेली विदा आवश्यक व पुरेशी आहे. / Data given in the paragraph is necessary and sufficient.
  • )फक्त अ आवश्यक व पुरेशी आहे. / Only a is necessary and sufficient.
  • )अ व ब या दोन्ही आवश्यक व पुरेशा आहेत. / Both a and b are necessary and sufficient.✓ योग्य
  • )फक्त ब आवश्यक व पुरेशी आहे. / Only b is necessary and sufficient.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ७७Logical Reasoning

C चे U शी नाते काय आहे या प्रश्नासंदर्भात दिलेल्या पुढील विदेचा पुरेेपणा निश्चित करा. विदा विधाने : अ. R ची बहीण J हिने C चा भाऊ L शी लग्न केले असून, तो आईवडिलांचा एकटा मुलगा आहे. ब. U ही L आणि J यांची एकटी मुलगी आहे.

  • )फक्त अ पुरेशी आहे आणि ब ची आवश्यकता नाही.
  • )अ आणि ब या दोन्ही आवश्यक आणि पुरेशी आहे.✓ योग्य
  • )फक्त अ किंवा ब पुरेशी आहे.
  • )अ किंवा ब याशिवाय अधिक विदा आवश्यक आहे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Logical Reasoning

A, B, C व D या चार संशयितांची चौकशी झाली. जर या पैकी एक व्यक्ती खोटे बोलत असेल तर त्यांचे प्रतिसाद अभ्यासून योग्य पर्याय निवडा. a. B ने फसवल्याशिवाय C फसवणार नाही. b. A किंवा B ने फसवले. c. B ने फसवले नाही, मी फसवले. d. B ने फसवले.

  • )C खोटे बोलली, B ने फसवले.✓ योग्य
  • )B खोटे बोलली, B ने फसवले.
  • )A खोटे बोलली, C ने फसवले.
  • )D खोटे बोलली, C ने फसवले.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Logical Reasoning

पुढे सहा विधाने आणि त्यानंतर त्याताल्या तीन विधानांचे एकत्रीकरण दिले आहे. तर्कसंगत एकत्रीकरण निवडा. विधाने : अ. सर्व चेंडू बाहुल्या आहेत. ब. सर्व दांडफळ्या बाहुल्या आहेत. क. सर्व दांडफळ्या चेंडू आहेत. ड. काही दांडफळ्या बाहुल्या आहेत. इ. काही बाहुल्या चेंडू आहेत. फ. एकही चेंडू बाहुली नाही. पर्यायी उत्तरे :

  • )c, d and e✓ योग्य
  • )c, e and f
  • )a, c and d
  • )b, e and f

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Quantitative Aptitude

गावाच्या लोकसंख्येत एकावर्षी 5% ने वाढ होते, तर त्याच्या पुढच्या वर्षी 5% ने घट होते. दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस जर लोकसंख्या 35,112 होती, तर पहिल्या वर्षाच्या सुरुवातीस गावाची लोकसंख्या किती होती ?

  • )35,100
  • )35,200✓ योग्य
  • )35,204
  • )35,225

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Logical Reasoning

एका गावातील 800 लोकांपैकी 288 लोक चहा घेतात, 188 कॉफी घेतात व 324 दूध घेतात. एकूण लोकांपैकी 84 दूध व चहा घेतात. 80 कॉफी व दूध, 100 कॉफी व चहा ही दोन्ही पेये घेतात. 20 लोक तीनही पेये घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या लोकांची संख्या किती ?

  • )576
  • )468
  • )332
  • )244✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Logical Reasoning

पुढील परिच्छेदात वापरलेली अनुमान प्रक्रिया अभ्यासा आणि यादीतील सर्वात जवळून त्याच प्रकारची अनुमान प्रक्रिया वापराला युक्तिवाद निवडा. त्यावेळेच्या आर्थिक परिस्थितीमुळे शासनाला एकतर चलनाला परदेशी बाजारात थेट पाठबळ देणे किंवा व्याजदर वाढ करणे भाग होते. तथापि राजकीय आत्मघात टाळण्यासाठी त्याने व्याजदर वाढवले नाहीत. त्यामुळे रुपयाचे दुर्भिक्ष आहे हे माहीत असूनही रुपयाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला.

  • )जर राजाने डॉक्टरांच्या सल्ला मानला असता आणि तो घरी राहिला असता तर एव्हाना तो पूर्णतया बरा झाला असता. तथापि त्याने वेळ काढला नाही आणि तो अजूनही बरा झालेला नाही.
  • )आरोग्य केंद्रात पॉल आणि जगन हे दोन डॉक्टर आहेत. पॉल व्यक्तिगत चौकशी करत रुग्णांचे स्वागत करतो, परंतु जगनला फक्त आरोग्य समस्यांत अधिक रस असतो. म्हणून मला जगनला भेटण्याची इच्छा आहे.
  • )तुला एकतर वावडे झाले असावे किंवा जिवाणू संसर्ग झाला असावा असे या लक्षणांवरून दिसत आहे. जर तो विषाणू असेल तर त्यावर उपयुक्त उपचार उपलब्ध नाही म्हणून तू त्यावर ते वावडे आहे असे धरून उपचार चालू करू शकलेस.
  • )कार्लला वेदनाशामक गोळीची गरज होती आणि आम्ही एकतर पॅरासिटेमॉल किंवा ॲस्पिरिन ठेवतो. पण त्याला पॅरासिटेमॉलचे वावडे असल्यामुळे त्याला ॲस्पिरिन घ्यावे लागले.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Logical Reasoning

जमिल त्याच्या सायकलवरून त्याच्या घराच्या पूर्वेला 2 किमी त्याच्या मैत्रिणीला, दानाला तिच्या घरी भेटायला गेला. या ठिकाणाहून हे दोन मित्र स्वतंत्र सायकलवरून 5 किमी दक्षिणेला मैत्रिणीला, सुमाला तिच्या घरी भेटायला गेले. या ठिकाणाहून हे तिघे मित्र स्वतंत्र सायकलवरून 9 किमी उत्तरेला, 2 किमी पश्चिमेला आणि शेवटी 9 किमी दक्षिणेला गेले व येथे त्याची सायकलस्वारी संपली. कोण त्याच्या/तिच्या/त्यांच्या घराच्या सर्वात जवळ आहे/आहेत ?

  • )जमिल आणि दाना
  • )दाना आणि सुमा
  • )जमिल आणि सुमा
  • )सुमा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Logical Reasoning

काही मित्र कबड्डी पाहत आहेत. हाना 308 या आसनावर बसली आहे. हानाच्या उजव्या बाजूला 311 च्या आसनावर मंजू बसली आहे. हानाच्या डाव्या बाजूच्या आसनावर गगन बसला आहे. अब्बास गगनच्या डाव्या बाजूला बसला आहे. अब्बास व गगन यांच्या दरम्यानच्या तीन आसनांवर या सर्वांना अपरिचित असलेले लोक बसले आहेत. अब्बास बसलेल्या आसनाचा क्रमांक दिलेल्या पर्यायातून निवडा.

  • )313
  • )314
  • )303✓ योग्य
  • )302

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Logical Reasoning

एका अशासकीय संस्थेला चार मुलांना राज्यस्तरीय सायकल स्पर्धेसाठी प्रायोजित करायचे आहे. निवडीसाठी सारख्या क्षमतेची सात मुले उपलब्ध आहेत. रॉजर, तानू, सिसिलिया, अमन, धनू, मीरा आणि गुणा ही ती मुले आहेत. अशासकीय संस्थेला एका कुटुंबातून एकच मूल निवडायचे आहे आणि मुलगे व मुली यांची संख्या समान ठेवायची आहे. यापैकी सिसिलिया, मीरा व गुणा या मुली आहेत. रॉजर व तानू हे दोघे भाऊ आहेत. सिसिलिया ही एकुलती मुलगी अमनची एकुलती बहीण आहे. मीरा व गुणा या एका कुटुंबातील नाहीत. पुढील पर्यायातून सर्वात अधिक स्वीकारार्ह गट दिलेल्या माहितीच्या आधारे निवडा :

  • )रॉजर, धनू, अमन व सिसिलिया
  • )तानू, सिसिलिया, मीरा व अमन
  • )अमन, गुणा, रॉजर व मीरा✓ योग्य
  • )सिसिलिया, तानू, मीरा व रॉजर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Quantitative Aptitude

A या लेखकाची 5 वेगवेगळी पुस्तके, B या लेखकाची 3 वेगवेगळी पुस्तके आणि C या लेखकाची 6 वेगवेगळी पुस्तके आहेत. यातील किमान एक पुस्तक किती प्रकारे वाचकाला देता येईल ती संख्या निवडा.

  • )2¹⁰ – 1
  • )2¹¹ – 1
  • )2¹² – 1
  • )2¹⁴ – 1✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Maharashtra

कोणते विधान महाराष्ट्रातील शहरीकरणाच्या संदर्भात चुकीचे आहे ?

  • )सर्वात जास्त प्रमाणात नागरीकरण मुंबई व भोवतालच्या परिसरात केंद्रीत झाले आहे.
  • )लहान व मध्यम शहरे एकात्मिक विकास योजना (IDSMT) डिसेंबर 1985 ला सुरु झाली.✓ योग्य
  • )1951 नंतर वर्ग – 5 व वर्ग – 6 शहरांची लोकसंख्या हळूहळू कमी होत गेली.
  • )1951 नंतर वर्ग – 1 शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढीस लागली.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Maharashtra

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे उत्पादन घेतले जाते ?

  • )कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग✓ योग्य
  • )नागपूर, भंडारा, यवतमाळ
  • )औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद
  • )नंदुरबार, धुळे, जळगाव

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Maharashtra

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उन्हाळ्यात दैनिक तापमान-कक्षा सर्वात कमी असेल ?

  • )पुणे
  • )सोलापूर
  • )रत्नागिरी✓ योग्य
  • )अमरावती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Geography

कोणत्या जिल्ह्यांची सीमा ही कर्नाटक व तेलंगणा या दोन राज्यांना लागून आहे/आहेत ?

  • )लातूर
  • )नांदेड आणि लातूर
  • )गडचिरोली आणि नांदेड
  • )नांदेड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Environment

फयान चक्रीवादळ महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर दरम्यान आढळले.

  • )11 नोव्हेंबर, 2009✓ योग्य
  • )12 डिसेंबर, 2007
  • )01 नोव्हेंबर, 2006
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Geography

खालील ठिकाणांचा त्यांच्या उंची प्रमाणे उतरता योग्य क्रम लावा :

  • )क, ब, ड, अ, इ / c, b, d, a, e
  • )क, ड, अ, ब, इ / c, d, a, b, e✓ योग्य
  • )क, अ, ड, ब, इ / c, a, d, b, e
  • )ड, अ, ब, क, इ / d, a, b, c, e

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Maharashtra

98. जोड्या जुळवा : जिल्हा वनक्षेत्र अ. चंद्रपूर i. येडशी-रामलिंग ब. यवतमाळ ii. अंधारी क. उस्मानाबाद iii. पैनगंगा ड. रायगड iv. कर्नाळा

  • )iii ii iv i
  • )i iii ii iv
  • )ii iii i iv✓ योग्य
  • )iv ii iii i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Polity

महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) अध्यक्ष कोण आहेत ?

  • )मुख्यमंत्री / Chief Minister✓ योग्य
  • )उपमुख्यमंत्री / Deputy Chief Minister
  • )मुख्य सचिव / Chief Secretary
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Geography

खालील विधाने पहा : अ. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेस स्थित आहे. ब. वर्धा आणि वैनगंगा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत.

  • )विधान अ बरोबर आहे / Statement a is correct
  • )विधान ब बरोबर आहे / Statement b is correct
  • )विधान अ आणि ब बरोबर आहेत / Statements a and b are correct✓ योग्य
  • )विधान अ आणि ब बरोबर नाहीत / Statements a and b are not correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2020-psi-paper-ii