स्पर्धाAI

MPSC गट ब २०१९

PSI Paper II · ९२ प्रश्न · रद्द ५ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Logical Reasoning

एका प्राचीन संस्कृतीतील बांधकाम कामगार अन्य बांधकाम कामगारांना शुभेच्छा देतांना “सुंदर बांधकाम” असे म्हणायचे असेल तर “gengro yatju” असे म्हणतो. जेव्हा बांधकाम कामगार घरी परततो तेव्हा मुले “बांधकाम सुंदर होतं?” असे विचारण्यासाठी “Ern yatju gengro” ? असे म्हणतात. यावर बांधकाम कामगार “Ern gengro” (“सुंदर होतं”) किंवा “Ern gangro yatju!” असे उत्तरतो. जर gangro हे शब्दचिन्ह gengro च्या विरोधी अर्थाने वापरले जात असेल तर दिलेल्या पर्यायांतून “Ern gangro yatju!” चा सर्वात अनुचित अर्थ निवडा.

  • )घृणास्पद बांधकाम होतं.
  • )ओंगळ बांधकाम होतं.
  • )विद्रूप बांधकाम होतं.
  • )उपयुक्त बांधकाम होतं.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

“राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो” या विधानासंबंधात जर फक्त थेट वा थोड्या दूरच्या नातेसंबंधाचा विचार केला तर योग्य निष्कर्ष निवडा. निष्कर्ष : (a) जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरच विधान सत्य ठरेल. (b) त्या आजोबांच्या मुलाची राणी मुलगी असली तरीही विधान असत्य ठरेल. (c) तो आजोबांचा मुलगा राणीचा काका असला तरीही विधान सत्य ठरेल. (d) तो आजोबांचा मुलगा राणीचा मामा असला तरीही विधान सत्य ठरेल. पर्यायी उत्तरे : (1) (b) सोडून सर्व सत्य (2) (a) सोडून सर्व असत्य (3) फक्त (c) सत्य (4) (a) किंवा (b) सत्य

  • )All are true but (b)✓ योग्य
  • )All are false but (a)
  • )Only (c) is true
  • )Either (a) or (b) is true

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

वरील नोंदीच्या संदर्भात सत्य नसलेले/ली विधान/ने निवडा.

  • )(a) सिंहावलोकन करणाऱ्याच्या मते, डे बॉटन यांचा बातम्यांच्या भूमिकेबाबतचा आदर्शवाद पूर्णपणे निरुपयोगी विचार प्रयोग ठरतो कारण त्यासाठी आदर्श बातमीची व्याख्या, भूमिका, मर्यादा इत्यादींचा शोध घेण्याची गरज आहे.
  • )(b) लुई बॉवडन यांच्या मते आपली जीवने सधन करणे वा ती अधिक समाधानी करणे ही बातम्यांची भूमिका नाही.
  • )(c) अर्थपूर्ण चर्चेसाठी आदर्श बातम्यांसंबंधाने आधार पुरवलेले नाहीत ही 'The News' या पुस्तकाची प्रमुख त्रुटी आहे.
  • )(d) परोपकारी भाष्य करणाऱ्या परोपकारी व्यक्ती देखील डे बॉटन यांच्या बातम्यांच्या लोकांच्या जीवनातील भूमिकेबाबत सहमत होणार नाहीत.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

प्लायवुड हे जरी लाकडाचे नेत्रसुखद स्वरूप नसले तरी दर्जेदार प्लायवुड अतिशय महत्त्वाचे बांधकाम साहित्य बनले आहे. ते लवचीक, तुलनेने स्वस्त, वाळवीविरोधीक व टिकाऊ आहे. लाकडाच्या भुशाचे थर एकमेकांवर चिकटवले गेल्यामुळे त्याचे प्रत्येक थराचा कण खालच्या कणांशी काटकोन करत एकमेकांवर येतो त्यामुळे त्याला मजबूती येते. लाकडाच्या कणांच्या पापुद्र्याचे असे थर प्लायवुडला भक्कम बनवतात. लाकडाच्या कणांच्या विशिष्ट मांडणीमुळे त्याला मिळालेल्या भक्कमपणामुळे प्लायवुडला प्राप्त होणारा गुणधर्म निवडा.

  • )पर्यावरण स्नेही
  • )टिकाऊ✓ योग्य
  • )वाळवी निरोधक
  • )स्वस्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

“लंडन ते दुबई प्रवास लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा जलद होतो”. हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरणारी दोन तथ्ये ओळखा. तथ्ये : (a) लंडन ते दुबई उड्डाण 7 तासांचे आहे. (b) न्यूयॉर्क ते लंडन उड्डाण 6 तासांचे आहे जे परतीच्या उड्डाणापेक्षा 1 तासाने कमी आहे. (c) लंडन ते दुबई उड्डाण 9 तासांचे आहे. (d) न्यूयॉर्क ते दुबई उड्डाण 11 तासांचे आहे, जे लंडन ते न्यूयॉर्क उड्डाणापेक्षा 3 तासांनी जास्त आहे.

  • )(a), (d)✓ योग्य
  • )(a), (c)
  • )(a), (b)
  • )(b), (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही तर गरिबी ही समस्या आहे. बेरोजगारीचा 4.8 हा दर ही समस्या नाही पण आपले कष्टकरी बळ म्हणजे “काम करणारे गरीब” आहेत ही समस्या आहे. वरील युक्तिवाद दुबळा करणारे विधान निवडा.

  • )गरीब लोकांना बेकार राहून चालत नाही म्हणून ते जेमतेम मजुरीवर काम करणारे स्वयं-रोजगार करतात आणि ही स्वतःच केलेली स्वतःची पिळवणूक आहे.
  • )विविध सरकारी योजनांतून गरीब व बेकार लोक मजुरी मिळवतात व प्रतिष्ठेचे जीवन जगतात.✓ योग्य
  • )भारतातील बहुतेक धाडसी उद्योग हे अनौपचारिक असतात, त्यांची उत्पादकता कमी असते व ते कमी मजुरी देतात.
  • )भारतातील अनौपचारिक नोकऱ्यांचे प्रमाण 90% आहे आणि अनौपचारिक धाडसी उद्योगांना आकर्षक वेतन देणे शक्य नसते.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

परमितने बियांचे रोजपेक्षा जास्त नमुने गोळा केले. रोजने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. नीलने परमितपेक्षा जास्त नमुने गोळा केले. ऋताने परमितपेक्षा जास्त परंतु नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. सर्वात जास्त नमुने गोळा करणारी व्यक्ती दर्शवणारा पर्याय निवडा.

  • )परमित
  • )ऋता
  • )नील✓ योग्य
  • )रोझ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

नेमीला प्रत्येक 25 किग्रॅचे 122 खोके आणि प्रत्येक 20 किग्रॅचे 90 खोके तळमजल्यावरून 6 व्या मजल्यावर असलेल्या भांडारात न्यायचे आहेत. मुसळधार पावसामुळे त्याला मदत करण्यासाठी कोणीही उपलब्ध नाही. लिफ्टमध्ये सूचना आहे : 'कमाल भार 5 व्यक्ती किंवा 400 किग्रॅ'. जर नेमीचे वजन 65 किग्रॅ आहे तर हे काम सुरक्षितपणे करण्यासाठी त्याला तळमजला ते 6 वा मजला याप्रमाणे माराव्या लागणाऱ्या किमान फेऱ्या निवडा. (या फेऱ्यांत घनफळाचे व्यवस्थापन करता येईल असे गृहीत धरा)

  • )14
  • )15✓ योग्य
  • )12
  • )13

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

सना, दीपा, अनिता, सविता, अल्या, कविता, सुनिता आणि वनिता वर्तुळाकार टेबलावर खेळ खेळतात. (a) अनिता आणि अल्या यांची तोंडे परस्परांसमोर आहेत. (b) सना आणि दीपा या अनिता आणि अल्याच्या शेजारी नाहीत. (c) वनिता ही सनाच्या उजवीकडे आहे आणि अनिताच्या शेजारी आहे. (d) कविता ही अल्याच्या शेजारी नाही आणि सविता ही दीपाच्या शेजारी नाही. जर सविता आणि दीपा यांनी जागेची अदलाबदल केल्यास पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरेल?

  • )दीपा ही कविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे.✓ योग्य
  • )सुनिता ही सविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे.
  • )दीपा ही कविताच्या समोर आहे.
  • )सविता ही कविताच्या उजवीकडे लागून आहे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Quantitative Aptitude

दोन शहरांदरम्यानच्या बस प्रवासासाठी दोन व्यक्तींना जे भाडे द्यावे लागते ते त्याच शहरांदरम्यान एका व्यक्तीला लागणाऱ्या रेल्वे प्रवासाच्या 4/3 आहे. या शहरांदरम्यान सहा व्यक्तींनी बस प्रवास केला व आठ व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला तेव्हा त्यांना एकूण ₹ 1,536 खर्च आला. तर या शहरांदरम्यान एका व्यक्तीसाठी लागणारे रेल्वे भाडे सांगणारी संख्या निवडा.

  • )126
  • )128✓ योग्य
  • )120
  • )114

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Logical Reasoning

प्रतिमा मालिकेच्या 5 व्या जागेसाठी उचित प्रतिमा निवडा.

  • )Image with arrow (top-left, up-right), square (top-right), circle (bottom-left).
  • )Image with arrow (top-left, up-right), square (top-right), circle (bottom-right).
  • )Image with arrow (top-left, up-right), square (top-left), circle (bottom-left).✓ योग्य
  • )Image with arrow (top-left, up-right), square (top-left), circle (bottom-right).

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Quantitative Aptitude

पुढील विधानाच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. (x+a) (x-b) (x+c) (x-d) (x+e) . . . . . . . (x+y) (x-z) = ?

  • )a x z
  • )26
  • )x चा 26 वा घातांक
  • )शून्य✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न १३Quantitative Aptitudeआयोगाने रद्द

एका शाळेत पक्षी निरीक्षण, रंगकला, बागकाम, चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन अशी पाच छंद मंडळे आहेत. पक्षी निरीक्षण गट प्रत्येक 6 व्या दिवशी, चित्रपट आस्वाद गट दर 5 व्या दिवशी, पुस्तक वाचन गट दर 4 थ्या दिवशी, रंगकला गट दर 3 ऱ्या दिवशी आणि बागकाम गट दर 2 ऱ्या दिवशी एकत्र येतात. शाळेच्या 180 दिवसांच्या कालावधीत हे गट जितक्या वेळा एका दिवशी भेटतील त्या संबंधीचे चुकीचे विधान निवडा.

  • )चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन गट 9 दिवस एकत्र भेटतील.
  • )सर्व गट 3 दिवस एकत्र भेटतील.
  • )चित्रपट आस्वाद, बागकाम आणि पुस्तक वाचन गट 8 दिवस एकत्र भेटतील.
  • )पक्षी निरीक्षण आणि रंगकला गट 10 दिवस एकत्र भेटतील.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न १४History

भारताने देव देवतांना मूर्तीरूपात व्यक्त केले, यक्षिणी, अभिसारिका आणि दैनंदिन जगण्यातील विविध कृती यांची बारकाव्यांशी शिल्पे खोदली पण राजकीय इतिहास नोंदवून ठेवण्याकडे किंवा आपल्या राजांच्या प्रतिमा तयार करण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. आपल्या राजांना त्यांच्या काळातल्या नाण्यांवर स्थान नाही. प्राचीन भारतीय धातुविज्ञानात व मूर्तीविज्ञानात पारंगत असूनही त्यांनी पाडलेली नाणी लाजू वाटायची इतकी ओबडधोबड आहेत. जेव्हा भारत-अफगाण सीमेवरील बॅक्ट्रियातील डेमेट्रियस व मिनांडर हे भारतीय-ग्रीक शासक स्वतःच्या हुबेहूब प्रतिमा छापलेली नाणी पाडत होते तेव्हा आमचे, अजातशत्रु, बिंबिसार आणि अगदी चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक हे ओबडधोबड ठोकळेली नाणी जारी करत होते. अधोरेखित विधानांचे सर्वात जास्त तर्कसंगत अर्थनिर्वचन करणारा पर्याय निवडा.

  • )जरी भारतीय धातुविज्ञानात व मूर्तीविज्ञानात पारंगत होते तरी त्यांना नाणी पाडण्याचे ज्ञान नव्हते.
  • )मूर्तीविज्ञानाच्या अभावामुळे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उपयुक्त ठरू शकली असती अशी राजांच्या प्रतिमा असलेली नाणी भारतात नाहीत.
  • )जरी भारतीय मूर्तीविज्ञानात पारंगत होते तरी त्यांनी, त्याचा उपयोग त्यांनी राजांच्या प्रतिमा असलेल्या नाण्यांची निर्मितीसाठी केला नाही.
  • )भारतीयांनी मूर्तीवैज्ञानिक व धातुवैज्ञानिक कौशल्ये, ज्यांचा उपयोग महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उपयोग झाला असता अशी राजांच्या प्रतिमा असलेली नाणी पाडण्यासाठी वापरली नाहीत.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Logical Reasoning

पुढे दिलेला युक्तिवाद अभ्यासा आणि सर्वात जवळून यासारखीच अनुमान प्रक्रिया असणारा युक्तिवाद दर्शवणारा पर्याय निवडा. जर तुम्ही बासरी वादनाचा सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. मी तबलावादनाचा सराव केला नाही म्हणून माझे तबला वादन सुधारले नाही. पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे. म्हणून चांगले काम करण्यासाठी मी कष्ट केले पाहिजेत.

  • )सायकलस्वारीसाठी तुम्ही कष्ट केले तर तुमचा वेग वाढेल. वेग वाढवण्यासाठी मी खूप कष्ट केले आणि स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे. जर मला उत्तीर्ण व्हायचे असेल तर मला अभ्यास करत राहिले पाहिजे.
  • )जर सूरपेटी वादनाचा तुम्ही नियमित सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. रसिकाने फारसा सराव केला नाही परंतु तिचे वादन सुधारले म्हणजे तिने पुरेसा सराव केला असला पाहिजे. कदाचित ती हे वर्ष संपेपर्यंत येणाऱ्या विशारद परीक्षेतसुद्धा उत्तीर्ण होऊ शकेल.
  • )जर तुम्ही गायनासाठी खूप कष्ट केले तर तुमचे गायन सुधारेल. मी माझ्या नृत्य कौशल्यांसाठी काही कष्ट केलेले नाहीत म्हणून माझे नृत्य सुधारलेले नाही. येत्या दोन महिन्यात माझी परीक्षा आहे म्हणून त्यात उच्च श्रेणी मिळवण्यासाठी मी नियमित सराव केला पाहिजे.✓ योग्य
  • )परिपूर्णतेच्या प्राप्तीसाठी सरावाची गरज आहे. समस्यानिराकरण कौशल्यात मला लवकरच पारंगत झाले पाहिजे म्हणून मी परिश्रमपूर्वक सराव केला. लवकरच होऊ घातलेल्या स्पर्धेत मी सहभागी होणार आहे आणि खात्रीने ती जिंकणार आहे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Geography

खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारच्या वनांची आहेत? (a) वृक्षांची मुळे दलदलीतून वर आलेली असतात. (b) वृक्षांच्या खोडांना सर्व बाजूंनी मुळे फुटलेली असतात. (c) वृक्षांची उंची फारसी नसते.

  • )उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने
  • )आर्द्र पानझडी वने
  • )किनारी वने✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Scienceआयोगाने रद्द

जोड्या लावा: मृदा (a) कृतीशून्य (b) अल्कधर्मी (c) साधारण अम्ल (d) मध्य अम्ल pH मूल्य (i) 4.5 ते 5.5 (ii) 5.5 ते 6.5 (iii) 7.5 ते 6.5 (iv) 6.5 ते 7.5

  • )(i) (ii) (iii) (iv)
  • )(ii) (iii) (iv) (i)
  • )(iii) (iv) (ii) (i)
  • )(iv) (iii) (ii) (i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २०Economy

'फलोत्पादन विकास' कार्यक्रमाचा उद्देश कोणता होता?

  • )मजुरांना काम देणे
  • )शेतीची किफायतशीरता वाढवणे
  • )साधन संपत्तीची निर्मिती करणे
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Geography

जोड्या लावा : विज निर्मिती प्रकल्प (a) भातसा (b) राधानगरी (c) कोयना (d) माजलगाव सुरुवात वर्ष (i) 1962 (ii) 2002 (iii) 1952 (iv) 1991 पर्यायी उत्तरे :

  • )(i) (ii) (iii) (iv)
  • )(iv) (iii) (ii) (i)
  • )(iii) (i) (iv) (ii)
  • )(iv) (iii) (i) (ii)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Geography

खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येळदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत ?

  • )तापी
  • )मांजरा
  • )पूर्णा✓ योग्य
  • )गिरणा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Geography

महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरु आहे ?

  • )चिखलदरा
  • )मालेगाव
  • )कळसूबाई
  • )साक्री✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६History

भारतीय राष्ट्रीय सभेच्या इ.स. 1887 च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

  • )ब. बदुद्दीन तय्यबजी✓ योग्य
  • )डॉ. ॲनी बेझंट
  • )गोपाळकृष्ण गोखले
  • )उमेशचंद्र बॅनर्जी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Historyआयोगाने रद्द

हे पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य नव्हते.

  • )म.गो. रानडे
  • )गो.ग. आगरकर
  • )जी.व्ही. जोशी
  • )एस.एच. साठे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २८History

1890 मध्ये ________ हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले.

  • )महादेव गोविंद रानडे
  • )गणेश वासुदेव जोशी
  • )विश्वनाथ नारायण मंडलिक
  • )गोपाळ कृष्ण गोखले✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९History

जोड्या जुळवा : (a) ह्यूम (b) दिनशा वाचा (c) गोपाळ कृष्ण गोखले (d) दाजी आबाजी खरे (i) भारतीय राष्ट्रीय सभेचे सरचिटणीस (ii) भारतीय राष्ट्रीय सभेचे सचिव (iii) भारतीय राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव (iv) भारतीय राष्ट्रीय सभेच्या सचिवालयातील गोखलेंचे उपराधिकारी पर्यायी उत्तरे :

  • )(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)✓ योग्य
  • )(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
  • )(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
  • )(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०History

कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉ. बी.आर. आंबेडकराना मदत केली होती.

  • )'हरिजन बंधु' च्या प्रकाशनासाठी / For the publication of "Harijan Bandu"
  • )'स्वराज्याच्या' प्रकाशनासाठी / For the publication of "Swarajya"
  • )'मूक नायकांच्या' प्रकाशनासाठी / For the publication of "Mook Nayak"✓ योग्य
  • )'बहिष्कृत भारत' च्या प्रकाशनासाठी / For the publication of "Bahiskrut Bharat"

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१History

नेटीव्ह जनरल लायब्ररी, फिमेल हायस्कूल, वेस्टर्न इंडीया इंडस्ट्रियल असोसिएशनची सुरूवात केली.

  • )रा.गो. भांडारकर / R.G. Bhandarkar
  • )गो.कृ. गोखले / G.K. Gokhale
  • )गो.ग. आगरकर / G.G. Agarkar
  • )म.गो. रानडे / M.G. Ranade✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३History

33. जोड्या लावा. (a) रमाबाई रानडे (b) जनाक्का शिंदे (c) पंडिता रमाबाई (d) ताराबाई शिंदे (i) स्त्री पुरुष तुलना (ii) आर्य महिला समाज (iii) डिप्रेस्ड क्लास मिशन (iv) हिंदू लेडिज सोशल क्लब

  • )(iv) (iii) (ii) (i)✓ योग्य
  • )(iv) (i) (iii) (ii)
  • )(iii) (iv) (i) (ii)
  • )(i) (ii) (iii) (iv)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४History

34. लो. टिळकांनी 23 एप्रिल 1916 ला पुण्यामध्ये ______ ची स्थापना केली.

  • )प्रभाकर
  • )डेक्कन एज्युकेशन सोसायटी
  • )फर्ग्युसन कॉलेज
  • )होमरूल लिग✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५History

'द हायकास्ट हिंदू वुमन' हे पुस्तक ______ यांनी लिहीले.

  • )लेडी फॉकलंड
  • )पंडिता रमाबाई✓ योग्य
  • )रमाबाई आंबेडकर
  • )लेडी वेलिंग्टन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित केल्याचे खालीलपैकी कोणते आवश्यक परिणाम होतातच असे नाही ? (a) राज्य विधान सभेचे विसर्जन (b) राज्य विधान परिषदेचे विसर्जन (c) राज्यातील मंत्री परिषदेची पदच्युती खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर द्या :

  • )(b), (c)
  • )(a), (c)
  • )(a), (b)✓ योग्य
  • )(a), (b), (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

राज्यातील जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात ?

  • )उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
  • )राज्यपाल✓ योग्य
  • )राज्याचे मंत्रिमंडळ
  • )राज्याचे महाधिवक्ता

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Polity

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामुळे सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे आदेश व निकालाचा पुनर्वचार करण्याचा अधिकार आहे?

  • )अनुच्छेद 137✓ योग्य
  • )अनुच्छेद 143
  • )अनुच्छेद 136
  • )अनुच्छेद 138

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Polity

राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे याबाबत जोड्या लावा : अनुच्छेद तरतूद (a) 39A (i) उद्योगांधांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग (b) 40 (ii) नागरिकांसाठी समान नागरी संहिता (c) 43A (iii) समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य (d) 44 (iv) ग्रामपंचायतींचे संघटन पर्यायी उत्तरे :

  • )(i) (ii) (iii) (iv)
  • )(iii) (iv) (i) (ii)✓ योग्य
  • )(ii) (i) (iv) (iii)
  • )(iv) (iii) (ii) (i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Polity

भारतातील सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशाच्या अधिकार क्षेत्रासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

  • )सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नाही तर इतर कारणांसाठीही आदेश काढू शकते तर उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढू शकतात. / The Supreme Court can issue writs not only for the purpose of inforcement of Fundamental Rights but also for any other purpose, whereas High Courts can issue writs only for the purpose of inforcement of Fundamental Rights.
  • )उच्च न्यायालय निषेधाज्ञाचा आदेश काढू शकतात तर सर्वोच्च न्यायालय निषेधाज्ञाचा आदेश काढू शकत नाहीत. / High Courts can issue the writ of Injunction whereas the Supreme Court cannot issue the writ of Injunction.
  • )सर्वोच्च न्यायालय केवळ अपिलाच्या बाबतीत आदेश काढू शकते तर जेव्हा एखादा पक्षकार उच्च न्यायालयाकडे थेट गेला तरच उच्च न्यायालय आदेश काढू शकतात. / The Supreme Court can issue writs only in the case of appeal, whereas High Courts can issue writs only when the party directly approaches it.
  • )उच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नाही तर इतर कारणांसाठीही आदेश काढू शकतात तर सर्वोच्च न्यायालय केवळ मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढू शकतात. / High Courts can issue writs not only for the purpose of inforcement of Fundamental Rights but also for any other purpose, whereas the Supreme Court will issue writs only for the purpose of Inforcement of Fundamental Rights.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Polity

1976 च्या 42 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  • )सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन नवीन शब्द जोडण्यात आले. / Added only two new words i.e. socialist and secular in the Preamble.✓ योग्य
  • )मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. / Made the President bound by the advise of the Cabinet.
  • )सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायिक पुनर्विलोकनाचे आणि प्राधिलेख काढण्याचे अधिकार क्षेत्र मर्यादित करण्यात आले. / Curtailed the power of judicial review and writ jurisdiction of the Supreme Court and High Courts.
  • )लोकसभेचा आणि राज्य विधानसभांचा कार्यकाळ 5 वर्षांवरून 6 वर्षांपर्यंत वाढविण्यात आला. / Raised the tenure of Lok Sabha and State Legislative Assemblies from 5 to 6 years.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Polity

खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?

  • )(a) भारतीय संघराज्याच्या घटकराज्यांचा भूप्रदेश (सीमा) संसद साध्या बहुमताने बदलू शकते.
  • )(b) संसदेला राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्वित्तराणी करण्याअगोदर राज्य विधिमंडळाची संमती आवश्यक असते.
  • )(c) कोणत्याही राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्वित्तराणी संबंधिचे विधेयक संसदेमध्ये सादर करण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते.
  • )(d) राज्याच्या नावामध्ये बदल करण्यासंबंधी विधेयकाची शिफारस करण्याअगोदर राष्ट्रपतीकडे राज्याचा अभिप्राय प्राप्त झाला पाहिजे.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Polity

खालील विधाने विचारात घ्या : (a) अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळास जबाबदार असतो. (b) संसदीय पद्धतीत राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो. (c) अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शासन प्रमुख आहे. (d) भारतातील संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

  • )(a), (b)
  • )(b), (c), (d)
  • )(a), (d)
  • )(b), (c)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Polity

योग्य विधाने ओळखा. (a) पंतप्रधान हे आंतर-राज्य परिषदेचे अध्यक्ष असतात. (b) सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे आंतर-राज्य परिषदेचे सदस्य असतात. (c) भारतीय संविधानाचे अनुच्छेद 273 हे आंतर-राज्य परिषदेशी संबंधित आहे.

  • )फक्त (a), (b)✓ योग्य
  • )फक्त (a), (c)
  • )फक्त (b), (c)
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Polity

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  • )खाजगीपणाचा हक्क (Right to Privacy) हा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे.
  • )खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे.
  • )एम.पी. शर्मा खटला (1954) आणि खरक सिंग खटला (1962) यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की, खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही.
  • )वरीलपैकी एकही नाही.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Polity

“बेकायदेशीर गतिविधी (प्रतिबंध) अधिनियम, 1967” जो कोणती अनुसूची प्रतिबंधित दहशतवादी संघटनांची यादी प्रदान करते ?

  • )पहिली अनुसूची / The First Schedule✓ योग्य
  • )दुसरी अनुसूची / The Second Schedule
  • )तिसरी अनुसूची / The Third Schedule
  • )वरीलपैकी काहीही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Polity

भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद ______ खाली प्रत्येक नागरिकास न्याय मिळविण्याची संधी देणे व आर्थिक किंवा कोणत्याही परिस्थितीत ती नाकारली जाऊ नये याची हमी देणे हे राज्याचे कार्य आहे.

  • )39
  • )39-A✓ योग्य
  • )51
  • )51-A

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Polity

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचाराचे निवारण) अधिनियम, 1989 च्या कोणत्या कलमांतर्गत विशेष न्यायालयाची तरतूद केली आहे?

  • )14✓ योग्य
  • )17
  • )21(1)
  • )21(3)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Polity

सार्वजनिक सेवकास लाच देण्यासंबधीचा अपराध हा भ्रष्टाचार प्रतिबंधक (दुरुस्ती) अधिनियम, 2018 मधील कोणत्या कलमाशी संबंधित आहे?

  • )कलम 7A
  • )कलम 8(1)✓ योग्य
  • )कलम 9(1)
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Polity

अनुसूचित जाती व जमाती (अत्याचारास प्रतिबंध) कायदा, 1989 च्या कलम 2(1)(e) अन्वये 'विशेष सरकारी अभियोक्ता' याचा अर्थ, ______ मध्ये उल्लेखिलेला विशेष सरकारी अभियोक्ता किंवा अधिवक्ता म्हणून निर्देश केलेला सरकारी अभियोक्ता असा आहे.

  • )कलम 15✓ योग्य
  • )कलम 13
  • )कलम 16
  • )कलम 14

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Current Affairs

मानव-तस्करी विरोधी मोहिमेच्या कार्यासाठी खालीलपैकी 2018 साली कोणाला "अमेरिकन प्रेसिडेंट्स पुरस्कारा" ने सन्मानित करण्यात आले?

  • )अंबिका पटेल-लुईस
  • )मिनल पटेल डेविस✓ योग्य
  • )कामिनी पटेल-लुईस
  • )एल्डा डी'मेलो

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Current Affairs

मानवी हक्काच्या सार्वभौम घोषणापत्रावरील महत्त्वपूर्ण कागदपत्रे तयार करण्यात भारतीय सुधारकाने भूमिका बजावल्याबद्दल संयुक्त राष्ट्राचे मुख्य अँटोनियो गुटेरेस यांनी खालील कोणत्या मानवाधिकार कार्यकर्त्याचे कौतुक केले?

  • )पुष्पा जिवराज भावे
  • )चारुशिला अमृतभाई सदावर्ते
  • )हंसा जिवराज मेहता✓ योग्य
  • )पुष्पा विनोद देशपांडे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Polity

नागरी हक्क संरक्षण कायदा, 1955 च्या कलम ______ नुसार 'अस्पृश्यता' निवारणातून उदयास आलेले अधिकार संबंधित व्यक्तीला उपभोगी पडतील याची हमी देण्याचे राज्य सरकारचे कर्तव्य आहे.

  • )16
  • )16-A
  • )15
  • )15-A✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Polity

आंतरराष्ट्रीय मानवीय कायदा ______ शी संबंधित आहे.

  • )समुद्रा संबंधीचा कायदा / Laws of sea
  • )युद्ध संबंधीचा कायदा किंवा सशस्त्र विवादा संबंधीचा कायदा / Laws of war or Law of armed conflict✓ योग्य
  • )आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततापूर्ण सोडवणुकीचा कायदा / Laws of peaceful settlement of International Dispute
  • )मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास हस्तक्षेप कायदा / Law of Intervention in case of violation of Human Rights

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Polity

भारत खालीलपैकी याचा भागीदार आहे. (a) नागरी आणि राजकीय अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार. (b) आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) / Only (a)
  • )फक्त (b) / Only (b)
  • )(a) आणि (b) दोन्ही / Both (a) and (b)✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Current Affairs

'एमनेस्टी इंटरनॅशनल' ची स्थापना ______ यांनी केली.

  • )पीटर जॉन्सन यांनी सन 1961 मध्ये / Peter Jonson in 1961
  • )पीटर बेनेनसन यांनी सन 1961 मध्ये / Peter Benenson in 1961✓ योग्य
  • )लारसन एमनेस्ट यांनी सन 1961 मध्ये / Larsen Amnest in 1961
  • )उपरोक्त पैकी कोणीही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Polity

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 दिनांक ______ रोजी अंमलात आला.

  • )17 सप्टेंबर 1989 / 17th September 1989
  • )30 जानेवारी 1990 / 30th January 1990✓ योग्य
  • )29 नोव्हेंबर 1990 / 29th November 1990
  • )12 सप्टेंबर 1989 / 12th September 1989

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Polity

हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 कलम 2 अन्वये स्पष्ट केलेले 'मूल्यवान वस्तू' याचा अर्थ भारतीय दंड विधान, 1860 मधील ______ याप्रमाणेच आहे.

  • )कलम 32 / Section 32
  • )कलम 45 / Section 45
  • )कलम 38 / Section 38
  • )कलम 30 / Section 30✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Polity

चौर्य जोड्या जुळवा : खटला (a) मध्य प्रदेश सरकार वि. बाबूनाथ (b) बच्चनसिंग वि. पंजाब सरकार (c) जी.एन. गोडसे वि. महाराष्ट्र सरकार (d) एस.एन. भाडोळकर वि. महाराष्ट्र सरकार निर्णय (i) सर्वसाधारण अपवाद सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची असते. (ii) जन्मठेपेचा कालावधी 20 वर्षे इतका गणला जावा. (iii) शिक्षेच्या धोरणाबाबत मार्गदर्शन (iv) दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्यासाठीच मृत्युदंडाची शिक्षा दिली जावी. पर्यायी उत्तरे :

  • )(i) (iii) (iv) (ii)
  • )(iii) (iv) (ii) (i)✓ योग्य
  • )(i) (iii) (ii) (iv)
  • )(iii) (iv) (i) (ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Polity

खालीलपैकी कोणत्या बाबी पोलीसांची कायदेशीर कर्तव्ये नाहीत ? (a) एखाद्या नशेतोल व्यक्तिचा ताबा घेणे. (b) लोकांना निर्माण झालेले धोका टाळणे. (c) बालकल्याण निधीला योगदान देणे.

  • )फक्त (a)
  • )फक्त (c)✓ योग्य
  • )दोन्ही (a) आणि (c)
  • )फक्त (b)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Polity

खालीलपैकी कोणते विधान/ने चूक आहे/त ? (a) पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केल्यास त्याचे सर्व अधिकार व कार्य देखील निलंबित होतात. (b) निलंबित पोलीस अधिकारी त्याच्या सर्व विशेषाधिकारांपासून वंचित केला जात नाही. (c) निलंबित पोलीस अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असतो.

  • )फक्त (b)✓ योग्य
  • )फक्त (c)
  • )फक्त (a) आणि (c)
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Polity

भारतीय दंड संहिता 1860 मधील प्रकरण _________ मध्ये निवडणूक संबंधित अपराधांची तरतूद दिलेली आहे.

  • )प्रकरण IX / Chapter IX
  • )प्रकरण IX A / Chapter IX A✓ योग्य
  • )प्रकरण X / Chapter X
  • )प्रकरण XI A / Chapter XI A

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Polityआयोगाने रद्द

भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर नाही/त ? (a) कोणत्याही न्यायालयासमोर बालगुन्हेगारीत्वाचा बचाव दाखल करता येतो. (b) फौजदारी खटला पूर्ण संपल्यानंतर बालगुन्हेगारीत्वाचा बचाव दाखल करता येत नाही. (c) मॅकनॉटनचा नियम मनोविकलेतेच्या बचावाशी संबंधित आहे. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (b) / Only (b)
  • )फक्त (c) / Only (c)
  • )फक्त (b) आणि (c) / Only (b) and (c)
  • )फक्त (a) / Only (a)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ६७Polity

भारतीय दंड संहिता 1860 मधील _________ मध्ये जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याच्या संभव असलेले घातक कृतीच्या अपराधाची तरतूद दिलेली आहे.

  • )कलम 268 / Section 268
  • )कलम 270 / Section 270✓ योग्य
  • )कलम 279 / Section 279
  • )कलम 294 A / Section 294 A

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Maharashtra

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 2(4) मधील व्याख्येच्या अनुषंगाने योग्य पर्याय निवडा.

  • )पोलीस शिपाई / Constable✓ योग्य
  • )आयुक्त / Commissioner
  • )अधीक्षक / Superintendent
  • )उप आयुक्त / Deputy Commissioner

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Polity

भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालीलपैकी कोणती बाब ही ''अपप्रेरणा'' या गुन्ह्याचा घटक नाही? (a) गुन्हा करण्यास चिथावणी देणे. (b) फौजदारीपात्र कटात सहभागी होणे. (c) गुन्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे.

  • )फक्त (a) आणि (b)
  • )फक्त (b)
  • )फक्त (c)✓ योग्य
  • )फक्त (a)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Polity

खालीलपैकी कोणत्या बाबींच्या संदर्भात दंडाधिकारी अधीक्षकांकडून अहवाल मागवू शकतात? (a) सराहित गुन्हेगारांचा प्रतिबंध (b) जमावाचे नियमन (c) मनोरंजनाचे नियमन

  • )फक्त (a)
  • )फक्त (a) आणि (b)
  • )फक्त (b) आणि (c)
  • )सर्व (a), (b), (c)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Polity

भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहे/आहेत? (a) “कपटपणा” हा स्वतंत्र गुन्हा आहे. (b) कपटपणाने संपत्ती लपवणे गुन्हा आहे. (c) कपटपणाने लग्न करून घेणे गुन्हा आहे. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) / Only (a)✓ योग्य
  • )फक्त (c) / Only (c)
  • )फक्त (b) / Only (b)
  • )फक्त (b) आणि (c) / Only (b) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Polity

भारतीय दंड संहिता 1860 मधील सर्वसाधारण अपवादांच्या अनुषंगाने जोड्या लावा : कलम | तरतूद (a) 80 | (i) कायदेशीर कृती करताना अपघात (b) 84 | (ii) मनोविक्ल व्यक्तीची कृती (c) 95 | (iii) अल्पसा अपाय करणारी कृती (d) 97 | (iv) शरीराचा व मालमत्तेचा खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क पर्यायी उत्तरे :

  • )(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
  • )(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
  • )(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)✓ योग्य
  • )(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Polity

पोलिसांच्या खालीलपैकी कोणत्या कृतीला तापदायक कृती म्हणतात? (a) योग्य कारणांशिवाय एखाद्या ठिकाणी प्रवेश करणे. (b) संपत्तीचा अनावश्यक ताबा मिळवणे. (c) ताब्यातील व्यक्तीचा वैयक्तिक छळ करणे.

  • )फक्त (b) / Only (b)
  • )फक्त (c) / Only (c)
  • )फक्त (b) आणि (c) / Only (b) and (c)
  • )सर्व (a), (b), (c) / All (a), (b), (c)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Polity

पोलीसांना काही ठिकाणांवर मुक्त प्रवेशाचा अधिकार आहे अशी ठिकाणे म्हणजे : (a) मनोरंजनाचे ठिकाण (b) जमावाची जागा (c) सभेचे ठिकाण वरीलपैकी कोणते बरोबर आहे/त ?

  • )फक्त (a) / Only (a)
  • )फक्त (c) / Only (c)
  • )दोन्ही (a) आणि (c) / Both (a) and (c)
  • )सर्व (a), (b), (c) / All (a), (b), (c)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Polity

भारतीय दंड संहिता 1860 नुसार “दस्तावेज” च्या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत? (a) कोणत्याही घटकावर कोणताही मजकूर वर्णिला असेल की जो पुराव्यादाखल स्विकारता येईल तर त्याला दस्तऐवज म्हणतात. (b) धनकोवर काढलेल्या धनादेशाला दस्तऐवज म्हणता येत नाही. (c) एखादा नकाशा व आराखडा पुराव्यादाखल स्विकारता येत असेल तर त्याला दस्तऐवज म्हणतात. पर्यायी उत्तरे:

  • )फक्त (a)
  • )फक्त (c)
  • )फक्त (a) आणि (c)✓ योग्य
  • )सर्व (a), (b), (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Polity

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अपराध व शिक्षांच्या अनुषंगाने जोड्या लावा. कलम: (a) 108 (b) 110 (c) 122 (d) 123 तरतूद: (i) सार्वजनिक विहिरी वगैरे मधील पाणी दूषित करणे. (ii) लोकांसमोर असभ्य वर्तन करणे. (iii) सूर्यास्त व सूर्योदय यांच्या दरम्यान संशयास्पद स्थितीत सापडणे. (iv) प्राधिकारावाचून शस्त्र बाळगणे.

  • )(i) (ii) (iii) (iv)✓ योग्य
  • )(ii) (i) (iv) (iii)
  • )(iii) (iv) (ii) (i)
  • )(iv) (iii) (i) (ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 41 अन्वये पोलिसांना वॉरंटशिवाय गुन्हेगारास केव्हा अटक करता येते ?

  • )पोलीस आयुक्तांचा आदेश असेल तर / On the orders of the Police Commissioner
  • )पालिका आयुक्तांच्या आदेशावरून / On the orders of the Municipal Commissioner
  • )दखलपात्र गुन्हा असेल तर / If it is a cognizable offence✓ योग्य
  • )वर्तमानपत्रातील प्रसिद्ध झालेल्या लेखावरून / On the basis of a article published in the newspaper

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Polity

जोड्या लावा : (a) अटकपूर्व जामीन (b) समरी खटला (c) दखलपात्र गुन्हा (d) जामीनपात्र किंवा अजामीनपात्र गुन्हा (i) पहिली अनुसूची (ii) वॉरंट शिवाय अटक (iii) अटकेची शक्यता (iv) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी

  • )(a)-(i), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(ii)
  • )(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
  • )(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)✓ योग्य
  • )(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Polity

योग्य उत्तर निवडा फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार एकदा काढलेले वॉरंट किती कालावधीसाठी अंमलात असते ? (a) एक वर्ष (b) पाच वर्ष (c) ज्या कोर्टाने काढले असेल त्या कोर्टाकडून रद्द होईपर्यंत (d) त्याची अंमलबजावणी होईपर्यंत

  • )फक्त (a) / (a) only
  • )फक्त (b) / (b) only
  • )फक्त (d) / (d) only
  • )(c) आणि (d) / (c) and (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Polity

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 125 अन्वये कोणाला निर्वाह भत्ता मिळू शकतो ?

  • )व्यक्तीची, स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेली पत्नी. / Person's wife who is unable to maintain herself.
  • )व्यक्तीचे, स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेले औरस व अनौरस अज्ञान बालक / Person's legitimate or illegitimate minor child, who is unable to maintain itself.
  • )व्यक्तीचे, स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेले वडील किंवा आई / Person's father or mother, who is unable to maintain himself or herself.
  • )वरील सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polity

भारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या कोणत्या कलमान्वये गुन्ह्यातील बळीचे चारित्र्य अथवा त्याचा लैंगिक पूर्वानुभव याचा गुन्हा सिद्ध करताना संबंध नसतो ?

  • )कलम 50 / Section 50
  • )कलम 52 / Section 52
  • )कलम 53-A / Section 53 A✓ योग्य
  • )कलम 54 / Section 54

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Polity

पुढील विधानांचा भारतीय साक्षी पुरावा कायद्यासंदर्भात विचार करा. (a) एखाद्या व्यक्तीची सही अथवा हस्ताक्षर तज्ज्ञाकडे न पाठवता देखील कोर्टात शाबित करता येवू शकतील. (b) मृत्युपूर्व जबाबाचा ठराविक नमुना असतो, त्याच नमुन्यात तो घ्यावा लागतो. योग्य उत्तर निवडा.

  • )(a) बरोबर असून (b) चूक आहे. / (a) is correct and (b) is wrong.✓ योग्य
  • )(a) चूक असून (b) बरोबर आहे. / (a) is wrong and (b) is correct.
  • )(a) आणि (b) दोन्ही विधाने बरोबर आहेत. / (a) and (b) both the statements are correct.
  • )(a) आणि (b) दोन्ही विधाने चूक आहेत. / (a) and (b) both the statements are wrong.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Polity

पुढील विधानांचा विचार करा : (a) फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या तरतूदी जम्मू काश्मीर राज्य सोडून संपूर्ण भारतास लागू होतात. (b) भारतीय पुरावा कायदा 1872 च्या तरतूदी जम्मू काश्मीर राज्यासह संपूर्ण भारतात लागू होतात. योग्य उत्तर निवडा :

  • )विधान (a) चूक असून (b) बरोबर आहे.
  • )विधान (a) बरोबर असून (b) चूक आहे.✓ योग्य
  • )(a) आणि (b) दोन्ही विधाने चूक आहेत.
  • )(a) आणि (b) दोन्ही विधाने बरोबर आहेत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Polity

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कोणत्या कलमासाठी जिल्हा दंडाधिकारी त्याच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक सीमांच्या आत, कोणत्याही मिरवणुकीत शस्त्रे बाळगण्यास प्रतिबंध करू शकतो ?

  • )कलम 149
  • )कलम 144 A✓ योग्य
  • )कलम 144 (1)
  • )कलम 152 A

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Polity

भारतीय साक्षी पुरावा कायद्यांतर्गत पुढीलपैकी कोणता कबुलीजबान कोर्टात अ-ग्राह्य असतो ?

  • )पोलीस अधिकार्याससमोर आरोपीने धमकी पोटी दिलेला कबुलीजबान.
  • )कनिष्ठाने वरिष्ठ अधिकार्याससमोर दबावाखाली दिलेला कबुलीजबान.
  • )पोलिसांचे सान्निध्यात असताना दिलेला कबुलीजबान.
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Polity

पुढीलपैकी कोणत्या कार्यवाहीस भारतीय साक्षी पुरावा कायदा लागू होत नाही ?

  • )जिल्हा न्यायालयाची कार्यवाही
  • )सत्र न्यायालयाची कार्यवाही
  • )लवादा पुढील कार्यवाही✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Polity

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या व योग्य उत्तर निवडा : (a) विशेष न्याय दंडाधिकारी आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी या समानअर्थी संज्ञा आहेत. (b) समन्स केस म्हणजे ज्या मध्ये गुन्हेगारीकरीता फाशीची किंवा जन्मठेपेची किंवा 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असते.

  • )विधान (a) बरोबर असून (b) चूक आहे.
  • )(a) विधान चूक असून (b) विधान बरोबर आहे.
  • )(a) आणि (b) दोन्ही विधाने बरोबर आहेत.
  • )(a) आणि (b) दोन्ही विधाने चूक आहेत.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Polity

ज्या गुन्ह्याला फाशीची अथवा जन्मठेपेची शिक्षा आहे, असा अपराध केला असला तरी फौजदारी प्रक्रिया संहिता मधील तरतुदीनुसार पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या आरोपींना जामिनावर सोडता येते ? (a) 16 वर्षांपेक्षा कमी वयाचा आरोपी (b) कोणत्याही वयाची स्त्री (c) कोणताही आजारी अथवा दुर्बळ व्यक्ती पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a)
  • )(a) आणि (c)
  • )(b) आणि (c)
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Polityआयोगाने रद्द

भारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या संदर्भात जोड्या लावा. (A) (a) खंडनयोग्य गृहीतक (b) अखंडनीय गृहीतक (c) तथ्यासंबंधी गृहीतक (B) (i) गृहीत धरले जाईल (ii) निर्णायक पुरावा (iii) गृहीत धरू शकतो पर्यायी उत्तरे:

  • )(i) (iii) (ii)
  • )(ii) (i) (iii)
  • )(iii) (ii) (i)
  • )(i) (ii) (iii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ९५Polity

भारतीय साक्षी पुरावा कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणता दस्तऐवज सार्वजनिक दस्तऐवज नाही ?

  • )केंद्र सरकार अगर राज्य सरकार यांनी पास केलेले कायदे.
  • )परकीय देशाचे कायदे आणि त्याचे रेकॉर्डस.
  • )आयकर खात्याकडे भरलेले रिटर्न्स.
  • )खाजगी नागरीकाचे नोंदणी न केलेले मृत्युपत्र.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Polity

एखाद्या व्यक्तीच्या ठावठिकाणा कळळा नसेल तर ती व्यक्ती ज्ञात नाही असे गृहीत धरले जाते.

  • )12 वर्षे
  • )10 वर्षे
  • )7 वर्षे✓ योग्य
  • )3 वर्षे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Polity

भारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या कलम 91 नुसार जेव्हा कायद्याने लोक अधिकारी म्हणून लेखी नेमणूक करणे गरजेचे असते व कोणी विशिष्ट व्यक्ती असा अधिकारी म्हणून वागला आहे असे जेव्हा दाखविण्यात येते तेव्हा ज्याद्वारे त्याची नेमणूक केली तो लेखी कागद ________.

  • )सिद्ध करावा लागतो
  • )संबंधित नसतो
  • )गृहीत धरला जात नाही
  • )सिद्ध करावा लागत नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Polity

पुढील विधानांचा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या संदर्भात विचार करा : (a) वॉरंटसाठी जामिन देता येतो. (b) पकड वॉरंटाची अंमलबजावणी भारतात किंवा भारताबाहेर कोठेही करता येते. योग्य उत्तर निवडा :

  • )(a) विधान बरोबर असून (b) चूक आहे.✓ योग्य
  • )(b) विधान बरोबर असून (a) चूक आहे.
  • )(a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.
  • )(a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Polity

जेव्हा देण्यात येणारा पुरावा हा राज्याच्या कामकाजाच्या अप्रकाशित नोंदीशी संबंधित असेल तेव्हा असा पुरावा देण्यासाठी भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 123 नुसार कोणाच्या परवानगीची गरज असते ?

  • )राज्याचे मुख्यमंत्री
  • )राज्याचे राज्यपाल
  • )राज्याचे गृहमंत्री
  • )संबंधित विभाग प्रमुख✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Polity

100. ______ यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसींवरून 2013 मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेत सुधारणा करण्यात आली.

  • )न्यायमूर्ती पी.बी. सावंत
  • )न्यायमूर्ती जे. एस. वर्मा✓ योग्य
  • )न्यायमूर्ती श्रीकृष्ण
  • )न्यायमूर्ती रंजना देसाई

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2019-psi-paper-ii