स्पर्धाAI

MPSC गट ब २०१९

Common Paper I · ९२ प्रश्न · रद्द ५ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'जो झाडे वाढवितो तोच निसर्गाचा खरा उपासक होय.' या विधानाबद्दल माहिती पुढे वाचा : व योग्य विधान कोणते, ते सांगा. अ. वरील वाक्य हे मिश्र वाक्य आहे. ब. जो झाडे वाढवितो हे प्रधान वाक्य आहे. क. तोच निसर्गाचा खरा उपासक होय, हे गौण वाक्य आहे. ड. जो झाडे वाढवितो या वाक्याला विशेषण वाक्य असेही म्हणता येईल. पर्यायी उत्तरे :

  • )अ ब ड बरोबर✓ योग्य
  • )अ, ब आणि क बरोबर
  • )ब आणि क बरोबर
  • )वरीलपैकी सर्व बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Languageआयोगाने रद्द

संस्कृतमधून अनेक साधित शब्द मराठीत आले आहेत त्यांना ______ अशी संज्ञा आहे.

  • )तत्सम
  • )अभ्यस्त
  • )तद्भव
  • )सामासिक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न Marathi Language

तर, जरी, म्हणजे, की, तरी या उभयान्वयी अव्ययांचा प्रकार कोणता?

  • )स्वरूपदर्शक
  • )कारणदर्शक
  • )उद्देशदर्शक
  • )संकेतदर्शक✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

'तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे ?' या वाक्यातील ऐकवते या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

  • )शक्य क्रियापद✓ योग्य
  • )प्रयोजक क्रियापद
  • )सिद्ध क्रियापद
  • )साधित क्रियापद

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'क्', 'च्', 'त्', 'ट्', 'प्' हे परंपरागत व्यंजनध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात ?

  • )महाप्राण
  • )अनुनासिके
  • )उष्मे
  • )अल्पप्राण✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Marathi Language

पुढील वाक्यप्रचाराची चुकीची जोडी ओळखा.

  • )अर्ध्या वचनात असणे - एखाद्याने सांगितलेले सर्व ऐकणे
  • )अवाच्या सव्वा - खूप जास्त वाढवून सांगणे
  • )औट घटकेचे राज्य - दीर्घकाळ टिकणारे वैभव✓ योग्य
  • )षष्ठी करणे - झालेल्या चुकांबद्दल रागावणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

'केसरी' या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता ? योग्य पर्याय निवडा. अ. पंचानन ब. केशर क. सिंह ड. पंचेंद्रीय

  • )फक्त अ पर्याय अचूक आहे
  • )फक्त अ आणि क पर्याय अचूक आहेत✓ योग्य
  • )फक्त ब आणि क पर्याय बरोबर आहे
  • )फक्त क आणि ड पर्याय अचूक आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

'पात्र' या शब्दाचे विविध अर्थ घेऊन खालील वाक्ये तयार केली आहेत. त्यापैकी पात्र या शब्दाचा योग्य अर्थ असलेली वाक्ये ओळखा. अ. देवपूजेसाठी हे पात्र काय कामाचे ? ब. हा बावळट माणूस येथे काय उपयोगाचा ? क. नदीला पूर आल्याने नदीचा विस्तार मोठा झाला आहे. ड. त्याला शिक्षक होण्यासाठी डी.एड. व बी.एड. करणे जरुरीचे आहे.

  • )पर्याय अ, ब, क व ड हे सर्व चूक आहेत.
  • )पर्याय अ व ब बरोबर आहेत. बाकीचे चूक.
  • )पर्याय ब व ड बरोबर आहेत. बाकीचे चूक.
  • )पर्याय अ, ब, क व ड बरोबर आहेत.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

‘लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

  • )मिश्र वाक्य
  • )विकल्पबोधक संयुक्त वाक्य✓ योग्य
  • )परिणामबोधक संयुक्त वाक्य
  • )उद्देशबोधक मिश्र वाक्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

‘त्याच्या अंगात आले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • )शक्य कर्मणी
  • )समापन कर्मणी
  • )अकर्तुक भावे✓ योग्य
  • )संकीर्ण

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? अ. ओझरत्या अन स्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात. ब. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण. क. ज्या वर्णाचा उच्चार स्वराच्या साहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. ड. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ चूक✓ योग्य
  • )फक्त ब व क चूक
  • )फक्त ड चूक
  • )वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

शहाणा – शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

  • )भाववाचक नाम✓ योग्य
  • )विशेष नाम
  • )समुदायवाचक नाम
  • )सामान्य नाम

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

ग्रंथकार, गृहस्थ, द्विज या शब्दांचा समास कोणता ?

  • )उपपदतत्पुरुष✓ योग्य
  • )षष्ठी तत्पुरुष
  • )चतुर्थी तत्पुरुष
  • )व्याधिकरण तत्पुरुष

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ

  • )कोल्ह्याला काकडी आवडते.
  • )द्राक्षे आंबट असतात म्हणून कोल्हा काकडी खातो.
  • )क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.✓ योग्य
  • )सर्व पर्याय चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Marathi Languageआयोगाने रद्द

पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता, ते अचूक सांगा.

  • )मृत्युंजय
  • )मृत्युपत्र
  • )मृत्यु
  • )वरीलपैकी सर्व बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २८Marathi Language

‘चतुर्भुज होणे’ याचा समानार्थी वाक् प्रचार

  • )हळद लागणे.✓ योग्य
  • )पदराला गाठ मारणे.
  • )पदरात घालणे.
  • )ओटीत देणे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Marathi Language

फक्त हनुमंतच समुद्र ओलांडून जाऊ शकतो. या वाक्याचा अर्थ बदलू न देता नकारार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? अ. हनुमंताखेरीज दुसरा कोणताही वानर समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही. ब. हनुमंताशिवाय समुद्र ओलांडून जाणारा दुसरा कोणीच नाही. क. हनुमंताशिवाय समुद्र ओलांडून जाऊ शकणारा नाहीच. ड. दुसरा कोणीही हनुमंतासारखा समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही. पर्यायी उत्तरे :

  • )अ, ब, क व ड सर्व चूक
  • )फक्त क बरोबर आहे. बाकी सर्व चूक.
  • )फक्त ब बरोबर आहे. बाकी सर्व चूक.
  • )अ, ब, क व ड हे सर्व बरोबर आहेत.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१History

नामदेव प्रभूती संतांच्या अभंगात कशाचा अंश अधिक आहे ?

  • )भावनेद्रेकाचा✓ योग्य
  • )बौद्धिक कुंचंबणेचा
  • )कर्मठपणाचा
  • )पंडितकेचा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३History

नामदेवांच्या कृपेने कुणाला नवी वाट गवसली होती ?

  • )विसोबा खेचर
  • )जगमित्र नामा
  • )चोखामेळा✓ योग्य
  • )ज्ञानेश्वर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Historyआयोगाने रद्द

चोखामेळा पराकाष्ठेची लीनता का स्वीकारतात ? अ. सनातन्यांच्या रोषांमुळे ब. सामाजिक गुलामगिरीमुळे क. अठराविश्वे दारिद्र्यामुळे ड. अस्पृश्य जातीत जन्मल्यामुळे

  • )ब, क आणि ड बरोबर
  • )फक्त ड बरोबर
  • )फक्त ब बरोबर
  • )फक्त अ आणि क बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ३५Marathi Language

गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली. या वाक्यातील ध्वन्यर्थ कोणता ?

  • )वाच्यार्थ
  • )लक्ष्यार्थ✓ योग्य
  • )व्यंग्यार्थ
  • )कोणताही ध्वन्यर्थ नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Marathi Language

रामा जलद वाचतो व रामा फार उतावळा आहे. ही वाक्ये कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत ?

  • )क्रियाविशेषण अव्यय✓ योग्य
  • )शब्दयोगी अव्यय
  • )उभयान्वयी अव्यय
  • )केवलप्रयोगी अव्यय

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Marathi Language

समासाचा विग्रह करताना ज्या ज्या विभक्ती प्रत्ययांचा संबंध येतो, त्यावरून तत्पुरुष समासाचे प्रकार पडतात. खालील चतुर्थी तत्पुरुष समासाच्या प्रकाराचे उदाहरण अचूक सांगा.

  • )वादग्रस्त – वादाने ग्रस्त
  • )स्वर्गप्राप्त – स्वर्गाला प्राप्त
  • )डोईजड – डोईला जड✓ योग्य
  • )भक्तिवश – भक्तीने वश

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Marathi Language

'गळ्याशी येणे' या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ असलेला पर्याय ओळखा.

  • )भाड भीड घालणे
  • )लचांड मागे लागणे
  • )अंगाल्ट येणे✓ योग्य
  • )नावडी वस्तू अथवा काम मिळणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Marathi Language

पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते, ते ओळखा.

  • )तुम्ही स्वतः या किंवा गड्याला पाठवा.
  • )रामा, गोविंदा व विष्णू मुंबईला गेले.
  • )यंदा पुष्कळ पाऊस पडला, परंतु तो अवेळळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही.✓ योग्य
  • )घोडा हा चपळ व उमदा प्राणी आहे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Marathi Language

निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते. कारण – योग्य म्हणीचा वापर करा.

  • )दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
  • )दुभत्या गाईच्या लाथा गोड.✓ योग्य
  • )पळसाला पाने तीनच.
  • )भुकेला कोंडा निजेला घोडा.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Marathi Language

'घर फिरले की घराचे वासेही फिरतात.' या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण

  • )घराची ओज अंगण सांगते.
  • )घरोघरी मातीच्या चुली.
  • )घरासारखा पाहुणा होतो पण पाहुण्यासारखे घर होत नाही.
  • )यापैकी एकही पर्याय बरोबर नाही.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Marathi Language

पुढे काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत. त्यापैकी चुकीचा गट कोणता, ते सांगा.

  • )हिरण्यगर्भ, सहस्रांशु, वासरमणी
  • )दिनमणि, दिवाकर, दिनराज
  • )रवि, भानु, अर्क, तपन
  • )दिनकर, सुधाकर, दिगंबर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Marathi Language

योग्य जोड्या जुळवा. 'अ' गट क. पाणी पडणे ख. पाणी पाजणे ग. पाणी सोडणे घ. पाणी मुरणे 'ब' गट i. खूप घोर येणे ii. वाया जाणे iii. दोघांला आग्रा असणे iv. त्याग करणे पर्यायी उत्तरे : क ख ग घ

  • )i ii iii iv
  • )ii i iv iii✓ योग्य
  • )i iii ii iv
  • )iv iii i ii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Marathi Language

नाचणारा, वाकलेला व जळता हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल?

  • )क्रियाविशेषण
  • )धातुसाधित विशेषण✓ योग्य
  • )क्रियाविशेषण अव्यय
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Marathi Language

पुढील ओळींतील अलंकार ओळखा. गगन राज्य अफाट तथा रवी उगरूनी जुपती बहुतोषवी म्हणून पक्षीच भाट सुखावले करिती गान ही स्तुती भासले

  • )स्वरूप्नोत्प्रेक्षा
  • )हेतूत्प्रेक्षा
  • )फलोत्प्रेक्षा✓ योग्य
  • )मालोत्प्रेक्षा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Marathi Language

पुढील पर्यायात जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी नसलेला पर्याय कोणता?

  • )दंगामस्ती, धडामस्करी – फार्शी + मराठी
  • )बाजारहाट, अंमलबजावणी – मराठी + फार्शी
  • )अक्कलहुशारी, डावपेच – (फार्शी + फार्शी)✓ योग्य
  • )वरीलपैकी सर्वच बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Marathi Language

खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोडशब्द ओळखा. वधू + आगमन = ?

  • )वधूगमन
  • )वधूआगमन
  • )वध्वागमन✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Marathi Language

पुढील विधान वाचा : 'मी प्रेम करीत राहीन' या रीतीभूतकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप असलेला पर्याय निवडा.

  • )मी प्रेम करीन
  • )मी प्रेम करीत असेन✓ योग्य
  • )मी प्रेम केले असेन
  • )मी प्रेम करीत असे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Marathi Language

पुढील वाक्ये वाचा : अ. आंधळ्याला आरशाचा काय उपयोग ? ब. लबाडाचे आमंत्रण जेवल्यावर खरं. या दोन्ही वाक्यातील नामाचा प्रकार कोणता ? पर्यायी उत्तरे :

  • )विशेषणसाधीत नाम✓ योग्य
  • )नामसाधाधीत विशेषण
  • )अव्ययसाधीत नाम
  • )क्रियावाचक नाम

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Marathi Languageआयोगाने रद्द

Identify the sentence(s) punctuated correctly.

  • )Many people, unfortunately are poor.
  • )Come, with me friend.
  • )He is a non-vegetarian; she is a vegetarian.
  • )We have, of course, to learn by experience.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ५७English Language

As soon as the doctor opened the heart for surgery, he found the tricuspid valve out of order. Which of the following transformations is correct?

  • )Scarcely the doctor opened the heart for surgery then he found the tricuspid valve out of order.
  • )No sooner did the doctor open the heart for surgery than he found the tricuspid valve out of order.✓ योग्य
  • )No sooner did the doctor opened the heart for surgery then he found the tricuspid valve out of order.
  • )No sooner does the doctor open the heart for surgery than he found the tricuspid valve out of order.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९English Language

Which bank serves the public best? Select the correct passive voice of the sentence. a. By which bank the public is served best? b. By which bank is the public served best? c. Which is the bank that served the public best?

  • )Only a
  • )Only b✓ योग्य
  • )Only c
  • )All of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२English Language

Which of the following are not meanings of the word in capitals ? I was absolutely FLABBERGASTED when she told me the price. Answer options : a. Filled with shock b. Filled with appreciation c. Filled with wonder

  • )Only a
  • )Only b✓ योग्य
  • )Only a and c
  • )a, b and c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३English Language

a. One has to work hard to be a successful person. b. Vasant seldom comes to see his aged parents. c. I sometimes feel that I have done nothing important in my life. d. One has to walk fast in the treadmill-test. The underlined words in the above sentences are Answer options :

  • )Prepositions
  • )Conjunctions
  • )Adjectives
  • )Adverbs✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०English Language

Point out the sentence that has the incorrect spelling. a. Hippocrasy is a well-known personality trait of the politicians. b. While changing your name, you will have to publish it in the gazet. c. Not all catelogs are correct in any educational institute. d. He always says that he is the captan of his soul. Answer options :

  • )Only a and b
  • )Only c and d
  • )All of the above✓ योग्य
  • )None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५History

Which statements are true according to the passage ? a. Eastern rulers kept themselves away from the public. b. It was a crime to utter the Eastern rulers' names with disrespect. c. Louis the Fourteenth was a learned person. d. Louis the Fourteenth was a crafty person.

  • )Only a and c
  • )Only b and d
  • )Only a and b✓ योग्य
  • )Only c and d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६History

Louis the Fourteenth passing off on his people as being above humanity is extraordinary because a. he hid from his subjects b. he made a show of his daily routine c. he impressed his people greatly even if he exposed himself to the public d. he could not maintain his dignity

  • )Only a and c
  • )Only b and c✓ योग्य
  • )Only c and d
  • )Only a and d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८English Language

This proposal is objected to by us. Which one of the following is the correct active structure corresponding to the above sentence ?

  • )We object these proposal.
  • )This proposal is objected.
  • )We object to this proposal.✓ योग्य
  • )This proposal is subject to objection.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९English Language

Choose the correct alternative for the underlined words in the following sentences : a. I had a brief look at the report. b. It was my brief to make sure that the facts were set down accurately. c. I was briefed about the incident. d. Introduction was brief and polite. Answer options :

  • )short, instruction, informed, succinct✓ योग्य
  • )scanty, hasty, directed, concise
  • )little, pointed, directive, lengthy
  • )compact, advise, updated, instruct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 नुसार ________________ हे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारशी नुसार राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्ताची नियुक्ती करतील.

  • )राष्ट्रपती / The President
  • )पंतप्रधान / The Prime Minister
  • )राज्यपाल / The Governor✓ योग्य
  • )राज्याचे कायदा मंत्री / The Law Minister of State

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या कलम 5(2) च्या अन्वये ज्या व्यक्तीचा अर्ज फेटाळल्याचा आदेश मिळाल्याच्या दिनांका पासून तीस दिवसांच्या कालावधीच्या आत ________________ कडे कलम 9(1) अन्वये अपील दाखल करू शकते.

  • )जिल्हाधिकारी / District Collector
  • )प्रथम अपील प्राधिकारी / First Appellate Authority✓ योग्य
  • )अपील आयोग / The Appeal Commission
  • )उच्च न्यायालय / The High Court

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Polity

खालीलपैकी कोणत्या संस्थेने/संस्थांनी माहिती अधिकार अधिनियम, 2005 नुसार माहिती देणे बंधनकारक नाही ?

  • )बॉर्डर रोड डेव्हलपमेंट बोर्ड / Border Road Development Board
  • )एव्हीएशन रिसर्च सेंटर / Aviation Research Centre
  • )दोन्ही (1) व (2) / Both (1) and (2)✓ योग्य
  • )वरीलपैकी काहीही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Polity

माहिती अधिकार अधिनियमांतर्गत, केंद्रीय माहिती आयुक्तांची संख्या ही ________________.

  • )कमीत कमी 5 असेल / Minimum 5
  • )10 पेक्षा जास्त नसेल / Not exceeding 10✓ योग्य
  • )मर्यादा नाही / No limit
  • )वरीलपैकी काहीही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polity

केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती ________________ हे करतात.

  • )माहिती निबंधक / Registrar of Information
  • )पंतप्रधान / Prime Minister
  • )राष्ट्रपती / President✓ योग्य
  • )राज्यपाल / Governor

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Science

महाराष्ट्र शासनाच्या 'ई-प्रशासन' धोरणानुसार मान्य असलेल्या 'सी एल डी आर' [CLDR] ह्या आंतरराष्ट्रीय मानकाचे पूर्ण रूप काय ?

  • )कॉमन लोकल डेटा रीपॉझिटरी / Common Local Data Repository✓ योग्य
  • )सेंट्रली लॉक्ड डेटा रिसोर्स / Centrally Locked Data Resource
  • )वरीलपैकी सर्व / All of the above
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Science

HTML हे खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रूप आहे ?

  • )हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज / Hyper Text Markup Language✓ योग्य
  • )हायपर टेक्स्ट मेकअप लँग्वेज / Hyper Text Makeup Language
  • )हायपर टेक्स्ट मॅनिपुलेशन लँग्वेज / Hyper Text Manipulation Language
  • )हायपर टेक्स्ट मॉडीफाईड लँग्वेज / Hyper Text Modified Language

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Science

डॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ________ वाईल्ड कार्ड, कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात ?

  • )?
  • )*✓ योग्य
  • )#
  • )&

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Science

योग्य जोड्या जुळवा: ऑपरेटिंग सिस्टीम अ. सिम्बियन ब. पाम क. विंडोज सीई.नेट ड. डॉस अॅप्लीकेशन (उपयोगिता) I. आय बी एम पीसी साठी प्रथम ऑपरेटिंग सिस्टीम II. एम्बेडेड डिव्हाइसेस ज्यांना रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम लागते त्यासाठी डिझाईन केलेली. III. हाताने धरलेल्या उपकरणांसाठी उदा. पीडीए IV. स्मार्ट सेल फोन्स मध्ये वापरतात

  • )IV III II I✓ योग्य
  • )II I IV III
  • )III II IV I
  • )IV II III I

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Science

www तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता ?

  • )टीम बर्नर्स ली / Tim Berners-Lee✓ योग्य
  • )जेम्स गोस्लिंग / James Gosling
  • )लिनस तोरवाल्ड्स / Linus Torvalds
  • )अँड्र्यू टेननबम / Andrew Tanenbaum

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Science

ब्लॅक होल ची पहिली प्रतिमा टिपण्यासाठी खगोल शास्त्रज्ञांनी वापरलेल्या दुर्बिणीचे नाव काय ?

  • )इव्हेंट हॉरायझन टेलिस्कोप / Event Horizon Telescope✓ योग्य
  • )फर्मी गॅमा-रे स्पेस टेलिस्कोप / Fermi Gamma-ray Space Telescope
  • )हार्ड एक्स-रे मॉड्यूलेशन टेलिस्कोप / Hard X-ray Modulation Telescope
  • )लूनार-बेस्ड अल्ट्रा व्हायोलेट टेलिस्कोप / Lunar-based Ultra Violet Telescope

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Current Affairs

2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये खालीलपैकी कोणत्या मतदारसंघामध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली ?

  • )कडलोर / Cuddalore
  • )चिदंबरम / Chidambaram
  • )धर्मपुरी / Dharmapuri
  • )वेल्लोर / Vellore✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Polity

पंतप्रधान मोदी सरकारने नवीन मंत्रालयाची स्थापना केली आहे. ह्या मंत्रालयाचे नाव _________ आहे.

  • )संसाधन शक्ती / Sansadhan Shakti (Resources)
  • )जल शक्ती / Jal Shakti (Water)✓ योग्य
  • )स्त्री शक्ती / Stree Shakti (Women)
  • )नैसर्गिक शक्ती / Naisargik Shakti (Natural)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Current Affairs

‘सप्रीती - 2019’ हा संयुक्त सैनिक अभ्यास खालीलपैकी कोणत्या दोन देशां दरम्यान होता ?

  • )भारत आणि बांगलादेश / India and Bangladesh✓ योग्य
  • )भारत आणि यू.एस. / India and US
  • )भारत आणि इराण / India and Iran
  • )भारत आणि ब्राझील / India and Brazil

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Economy

'युरोनेक्स्ट' म्हणजे काय आहे?

  • )शेअर बाजार / A stock exchange✓ योग्य
  • )फिल्म निर्मिती कंपनी / A film producing company
  • )सॉफ्टवेअर कंपनी / A software company
  • )उपग्रहाशी संबंधित कंपनी / A company dealing with satellites

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Current Affairs

सोशल मीडिया द्वारे ज्या स्त्रियांनी समाजावर प्रभाव टाकला आहे. त्यांच्या असामान्य यशाची दखल घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ______ सुरु केले आहे.

  • )वेब-वंडर वुमेन कॅम्पेन / web-wonder women campaign✓ योग्य
  • )वंडर-वेब वुमेन कॅम्पेन / wonder-web women campaign
  • )वंडर-वुमेन वेब कॅम्पेन / wonder-women web campaign
  • )वुमेन वेब-वंडर कॅम्पेन / women web-wonder campaign

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Current Affairsआयोगाने रद्द

टेलिकम्युनिकेशनस विभागा (DOT) कडून कोणत्या दूरसंचार कंपनीला इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी परवाना मंजूर झाला आहे?

  • )वोडाफोन आयडीया लिमिटेड / Vodafone Idea Limited
  • )रिलायन्स कम्युनिकेशन्स / Reliance Communications
  • )भारत संचार निगम लिमिटेड / Bharat Sanchar Nigam Limited
  • )भारती एअरटेल लिमिटेड / Bharati Airtel Limited

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न १००Current Affairs

भारतीय सैन्याने 'मैत्री' नावाचा सर्वात लांब सस्पेंशन पूल कोणत्या नदीवर बांधला?

  • )ब्रह्मपुत्र / Brahmaputra
  • )यमुना / Yamuna
  • )सिंधू / Indus✓ योग्य
  • )गोदावरी / Godavari

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2019-common-paper-i