स्पर्धाAI

MPSC गट ब २०१९

Combined Prelims · ८९ प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Environment

खालील विधाने विचारात घ्या : (a) 2017 साली जगात कार्बन डायऑक्साईड चे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये भारताचे चौथे स्थान आहे. (b) 2017 मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जंनामध्ये हिस्सा 58 टक्के आहे. (c) जागतिक उत्सर्जंनामध्ये भारताचा हिस्सा 15 टक्के आहे. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

  • )फक्त (a)
  • )(a) आणि (b)✓ योग्य
  • )फक्त (b)
  • )(a), (b) आणि (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

महिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे ज्यामुळे केंद्रसरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल?

  • )SHE-पॉवर
  • )SHE-प्रोटेक्ट
  • )SHE-बॉक्स✓ योग्य
  • )Fem-बॉक्स

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Science

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? (1) भारताच्या गगनयान या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारा दोषा भारतीयांना अंतराळात पाठविले जाणार आहे. (2) नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी ₹ 10,000 कोटीची तरतूद मंजूर केली आहे. (3) गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनी सर्वप्रथम केली होती. (4) वरीलपैकी एकही नाही

  • )भारताच्या गगनयान या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारा दोषा भारतीयांना अंतराळात पाठविले जाणार आहे.✓ योग्य
  • )नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी ₹ 10,000 कोटीची तरतूद मंजूर केली आहे.
  • )गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनी सर्वप्रथम केली होती.
  • )वरीलपैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

'सुकन्या समृद्धी योजने' बाबत पुढीलपैकी कोणते विधान/ने अयोग्य आहे?

  • )(a) 2015 मध्ये ही योजना सुरु झाली.
  • )(b) 'बेटी बचाओ बेटी पढाओ' आंदोलनाचा ही योजना भाग आहे.
  • )(c) मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्णसाठी टपालखात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे.✓ योग्य
  • )(d) या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

2018 च्या 'पद्मभूषण' पुरस्काराबाबत जोड्या लावा : व्यक्ती (a) आर. नागास्वामी (b) वेद प्रकाश नंदा (c) अरविंद पारिख (d) लक्ष्मण पै क्षेत्र (i) साहित्य-शिक्षण (ii) कला - संगीत (iii) पुरातत्वशास्त्र (iv) कला - रंगचित्रकला

  • )(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
  • )(a)-(ii), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(i)
  • )(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)✓ योग्य
  • )(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  • )श्री. दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर, 2017 मध्ये निवड झाली.
  • )श्री. भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली.
  • )1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयात ब्रिटीश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ आहे.
  • )यापैकी एकही नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? (a) साहित्य अकॅडमीची स्थापना मार्च 1954 मध्ये झाली आहे. (b) संस्था नोंदणी अधिनियम 1860 च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 मध्ये नोंदणीकृत आहे. (c) त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. (d) अकॅडमीने 24 भाषांना मान्यता दिलेली आहे.

  • )फक्त (a)
  • )फक्त (c)✓ योग्य
  • )(c) आणि (d)
  • )फक्त (b)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

मुंबई शहरासंबंधी पुढील विधानांपैकी कोणते विधान/विधाने असत्य आहेत? (a) मुंबई हे बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. (b) मुंबई शहरातील चार प्रमुख नद्या म्हणजे मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा. (c) दहिसर, पोईसर आणि मिठी नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतो.

  • )(a)
  • )(b)
  • )(c)✓ योग्य
  • )(a), (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

भारतीय शासनाने सुरु केलेले ‘ई-चरक’ नावाचे पोर्टल कशासंदर्भात आहे?

  • )ऑनलाईन आयुर्वेद औषधालय / Online ayurvedic drug shoppee.
  • )ऑनलाईन आयुर्वेदाविषयीचे मासिक / Online magazine about Ayurveda.
  • )ऑनलाईन आयुर्वेदाच्या औषधांसंबंधीचे मार्गदर्शन / Online consultancy for Ayurvedic medicines.
  • )ई-चॅनेल वनौषधी, सुगंधी, कच्च्यामाल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी / e-Channel for Herbs, Aromatic, Raw material and knowledge of Ayurveda.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Current Affairs

‘पेन्सिल’ (PENCIL) ऑनलाईन पोर्टल हे _________ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे.

  • )बाल मजूर कायदा आणि राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प / Child Labour Act and National Child Labour projects.✓ योग्य
  • )बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, (RTE) 2009 / The Right to children to free and compulsory Education (RTE) Act, 2009.
  • )एकात्मिक बाल विकास सेवा / Integrated Child Development Services.
  • )लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायदा / Protection of children from Sexual Offences Act.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Current Affairs

या वकील, पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्यांचा फेब्रुवारी 2018 मध्ये निधन झाले.

  • )हिना खान / Hina Khan
  • )अस्मा जहांगीर / Asma Jahangir✓ योग्य
  • )खालिदा भुट्टो / Khalida Bhutto
  • )नूरजहाँ शेख / Noorjahan Shaikh

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Current Affairs

डिसेंबर 2017 मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ (Intangible Cultural Heritage) म्हणून मान्यता दिली आहे?

  • )योगा / Yoga
  • )कुंभ मेळा / Kumbh Mela✓ योग्य
  • )रामलीला / Ramlila
  • )छऊ नृत्य (Chhau Dance) / Chhau Dance

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Current Affairs

जगातील सात समुद्रांची यशस्वी जलतरण मोहिम करणारा पहिला भारतीय कोण आहे?

  • )तारानाथ शेणॉय / Taranath Shenoy
  • )रोहन मोरे / Rohan More✓ योग्य
  • )वीरधवल खाडे / Veerdhaval Khade
  • )अश्विन मेनन / Ashwin Menon

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Current Affairs

खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इनजेकटेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे ?

  • )गुजरात / Gujarat
  • )राजस्थान / Rajasthan
  • )तामिळनाडू / Tamil Nadu
  • )महाराष्ट्र / Maharashtra✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Polity

बलवंत राय मेहता समितीची स्थापना _________ या हेतूने करण्यात आली होती.

  • )लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. / suggesting measures for democratic de-centralization.
  • )सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलबजाव्यात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. / suggesting measures for better efficiency in the implementation of the community development projects.✓ योग्य
  • )तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कामकाजाची माहिती मिळविणे. / reporting on the working of the Village Panchayats at that time.
  • )तत्कालीन ग्रामपंचायतींच्या पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे. / investigating the adequate financial resources of the Village Panchayat at that time.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Maharashtra

महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

  • )सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव दोन-तृतीयांश सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. / No-confidence motion cannot be moved against the Sarpanch without the approval of two-third of the members.
  • )अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी तीन-चतुर्थांश बहुमताची आवश्यकता असते. / No-confidence motion required to be passed by three-fourth majority.
  • )जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा दोन वर्ष तो मांडता येणार नाही. / If the no-confidence motion is rejected, it cannot be tabled for two years.
  • )सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. / No-confidence motion cannot be moved during the last year of the Sarpanch's tenure.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Polity

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? (a) निती आयोगात निती (NITI) म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. (b) 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली. (c) पंतप्रधान या निती आयोगाचे अध्यक्ष असतात.

  • )(a)✓ योग्य
  • )(b)
  • )(c)
  • )कोणतेही नाही / None

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Polity

खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे?

  • )संसदेची निर्मिती - कलम 81
  • )राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत - कलम 54
  • )भारताचा उपराष्ट्रपती - कलम 64
  • )भारताचा महान्यायवादी - कलम 76✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Polity

खालील विधाने लक्षात घ्या : (a) भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. (b) उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. (c) भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. (d) स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील चौथे उच्च न्यायालय आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहेत?

  • )फक्त (a)
  • )(b) आणि (c)
  • )(a) आणि (d)
  • )सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Polity

खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद -164 मध्ये आहेत ? (a) मुख्यमंत्री राज्यपालांकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालांकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. (b) राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. (c) मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल. (d) मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधान सभेतील एकूण सभासद संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.

  • )(a), (b), (c)
  • )(b), (c), (d)
  • )(a), (c), (d)✓ योग्य
  • )(a), (b), (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Polity

भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे ?

  • )अमेरिका / USA
  • )जपान / Japan✓ योग्य
  • )कॅनडा / Canada
  • )फ्रान्स / France

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Polity

भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात ?

  • )अनुच्छेद क्र. 152 / Art. 152
  • )अनुच्छेद क्र. 154 / Art. 154
  • )अनुच्छेद क्र. 160 / Art. 160
  • )अनुच्छेद क्र. 163 / Art. 163✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Polity

जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान/विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा : (a) मुक्त आणि निःपक्षपाती निवडणुका (b) व्यक्तीची प्रतिष्ठा (c) अल्पसंख्याकांचे शासन (d) कायद्यासमोर समानता

  • )फक्त (a)
  • )(b) आणि (c)
  • )फक्त (c)✓ योग्य
  • )(a) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Polity

पुढीलपैकी योग्य जोडी पर्याय निवडा :

  • )(a) दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य - राज्य सूची
  • )(b) टपाल खाते (पोस्ट ऑफिस) बचत खाते - संघ सूची✓ योग्य
  • )(c) बँकिंग - संघ सूची
  • )(d) सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणांची तीर्थ यात्रा - राज्य सूची

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Maharashtra

छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती ? (a) विजय मराठा (b) तरुण मराठा (c) कैवारी (d) तेज

  • )(a) फक्त / (a) only
  • )(a) आणि (b) / (a) and (b) only
  • )(a), (b) आणि (c) फक्त / (a), (b) and (c) only
  • )(a), (b), (c), (d) / (a), (b), (c), (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७History

सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना यांनी पाठिंबा दिला.

  • )नाना शंकरशेट / Nana Shankarshet✓ योग्य
  • )भाऊ दाजी लाड / Bhau Daji Laad
  • )बाळशास्त्री जांभेकर / Balshastri Jambhekar
  • )भाऊ महाजन / Bhau Mahajan

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Historyआयोगाने रद्द

पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालेयपयोगी पुस्तके लिहिली ? (a) काशीनाथ छत्रे (b) जगन्नाथशास्त्री क्रमवंत (c) हरी केशवजी (d) कॅप्टन जॉर्ज जर्व्हिस

  • )(a) आणि (b) फक्त / (a) and (b) only
  • )(b) आणि (d) फक्त / (b) and (d) only
  • )(a) आणि (c) फक्त / (a) and (c) only
  • )(a), (b), (c) आणि (d) / (a), (b), (c) and (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २९History

शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले?

  • )सदाशिवराव भाऊ बोकील
  • )सदाशिवराव भाऊसाहेब
  • )सदाशिवराव बेनाडीकर✓ योग्य
  • )सदाशिवराव आठवले

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१History

'उल्गुलन' नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता?

  • )संथाळ लोक
  • )संबुदान नागा (जादूगार)
  • )बिर्सा मुंडा✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणीही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२History

28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते ?

  • )ॲलन ह्युम, हेन्री कॉटन व विल्यम वेडरबर्न✓ योग्य
  • )ॲलन ह्युम, व्हाईसरॉय डफरिन व जॉर्ज यूले
  • )विल्यम वेडरबर्न, व्हाईसरॉय डफरिन व हेन्री कॉटन
  • )ॲलन ह्युम, लॉर्ड कर्झन व विल्यम वेडरबर्न

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३History

"स्त्री शिक्षणाची दिशा" हा स्त्री शिक्षणावरील लेख ______ या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता.

  • )केसरी✓ योग्य
  • )दर्पण
  • )धुमकेतू
  • )राष्ट्रवीर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४History

1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी ______ यांना त्याचे अध्यक्ष नियुक्त केले.

  • )भास्करराव जाधव✓ योग्य
  • )अण्णासाहेब लठ्ठे
  • )हरिभाऊ चव्हाण
  • )म.ग. डोंगरे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६History

जोड्या जुळवा : (a) म.गो. रानडे (b) गो.ग. आगरकर (c) वि.रा. शिंदे (d) गो.ह. देशमुख (i) पुणे (ii) जामखंडी (iii) टेंभू (iv) निफाड

  • )(iv) (iii) (ii) (i)✓ योग्य
  • )(iv) (i) (ii) (iii)
  • )(iv) (ii) (i) (iii)
  • )(i) (ii) (iii) (iv)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७History

खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?

  • )अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत.
  • )1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवणी मिळाली.
  • )लॉर्ड कॉर्नवालीस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली.
  • )प्रिगलेची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८History

या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होल्या.

  • )पंडिता रमाबाई
  • )आनंदीबाई उर्फ बाया कर्वे✓ योग्य
  • )ताराबाई शिंदे
  • )रमाबाई रानडे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Polity

1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली?

  • )दादाभाई नौरोजी
  • )नेताजी सुभाष बोस
  • )चित्तरंजन दास
  • )भूपेंद्रनाथ बसू✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०History

बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर ______ यांनी लेख लिहिले.

  • )बैरामजी मलबारी / Bairamji Malabari✓ योग्य
  • )बाळशास्त्री जांभेकर / Balshastri Jambhekar
  • )पंडिता रमाबाई / Pandita Ramabai
  • )रमाबाई रानडे / Ramabai Ranade

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Geography

खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता?

  • )जुन्नर / Junnar✓ योग्य
  • )मावळ / Maval
  • )मेढा / Medha
  • )चंदनगड / Chandangad

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Geography

महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते?

  • )तापी पूर्णा खोरे / Tapi Purna basin
  • )गोदावरी खोरे / Godavari basin✓ योग्य
  • )कृष्णा खोरे / Krushna basin
  • )भीमा खोरे / Bhima basin

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Science

जोड्या लावा : स्तंभ - I (प्राणी) (a) गाई (b) म्हशी (c) शेळी (d) मेंढी स्तंभ - II (ब्रीड) (i) मेहसाना (ii) गिर (iii) गड्डी (Gaddi) (iv) जमुनापुरी

  • )(ii) (iii) (iv) (i)
  • )(i) (ii) (iv) (iii)
  • )(ii) (i) (iv) (iii)✓ योग्य
  • )(ii) (i) (iii) (iv)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Geography

जोड्या जुळवा : (प्रदेश/राज्य) (a) पश्चिम घाट (b) मेघालय (c) मध्य प्रदेश (d) ओरिसा (स्थलांतरित शेतीचे नाव) (i) पेंडा (ii) कुमारी (iii) पोडू (iv) झूम

  • )(a) (ii) (b) (iii) (c) (iv) (d) (i)
  • )(a) (ii) (b) (iv) (c) (i) (d) (iii)✓ योग्य
  • )(a) (iii) (b) (ii) (c) (iv) (d) (i)
  • )(a) (ii) (b) (i) (c) (iii) (d) (iv)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Geography

महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?

  • )खोपोली
  • )कोयना✓ योग्य
  • )वैतरणा
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Geography

महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?

  • )शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, सातमाळ, अजंठा
  • )अजंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव✓ योग्य
  • )सातमाळ, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, अजंठा
  • )अजंठा, सातमाळ, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Geographyआयोगाने रद्द

जोड्या लावा स्तंभ - I (धातू) (a) मॅंगनीज (b) बॉक्साइट (c) चुनखडी (d) क्रोमाईट स्तंभ - II (खाणउद्योग जिल्हे) (i) कोल्हापूर (ii) यवतमाळ (iii) भंडारा (iv) उस्मानाबाद

  • )(iii) (i) (iv) (ii)
  • )(iii) (i) (ii) (iv)
  • )(i) (iii) (ii) (iv)
  • )(iv) (ii) (i) (iii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ४९Geography

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो?

  • )मराठवाडा
  • )विदर्भ
  • )पश्चिम महाराष्ट्र✓ योग्य
  • )कोंकण

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Geography

जोड्या लावा : स्तंभ - I (जलविद्युत केंद्र) (a) भिरा (b) विर (c) भंडारदरा (d) उजनी स्तंभ - II (जिल्हा) (i) अहमदनगर (ii) रायगड (iii) सोलापूर (iv) पुणे

  • )(ii) (iv) (iii) (i)
  • )(ii) (iv) (i) (iii)✓ योग्य
  • )(ii) (i) (iv) (iii)
  • )(iii) (iv) (i) (ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Geography

वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखविला आहे. खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आणि वर्तुळाने (O) दाखविलेले जिल्हा मुख्यालय बरोबर आहे?

  • )पुणे विभाग - सातारा
  • )नाशिक विभाग - धुळे
  • )औरंगाबाद विभाग - औरंगाबाद✓ योग्य
  • )नागपूर विभाग - गडचिरोली

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Geographyआयोगाने रद्द

जोड्या लावा : स्तंभ - I ( पुळण) (अ) उभादांडा (ब) नंदगाव (क) मार्वे (ड) सातपाटी स्तंभ - II ( जिल्हे) (i) ठाणे (ii) रायगड (iii) मुंबई (iv) सिंधुदुर्ग

  • )(a)-(iv), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(i)
  • )(a)-(i), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(ii)
  • )(a)-(iv), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iii)
  • )(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ५४Geography

खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे ?

  • )15° 44' उत्तर ते 22° 6' उत्तर (1) 15° 44' North to 22° 6' North✓ योग्य
  • )15° 44' दक्षिण ते 22° 6' दक्षिण (2) 15° 44' South to 22° 6' South
  • )15° 33' उत्तर ते 22° 8' उत्तर (3) 15° 33' North to 22° 8' North
  • )15° 33' दक्षिण ते 22° 8' दक्षिण (4) 15° 33' South to 22° 8' South

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Geography

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते ?

  • )घटप्रभा (1) Ghatprabha
  • )कृष्णा (2) Krishna
  • )गोदावरी (3) Godavari
  • )तापी (4) Tapi✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Economy

भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या 2016-2017 वर्षातील आयात भागीदारीतील महत्त्वा नुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा. देश : सौदी अरेबिया, चीन, यु.एस.ए., इंडोनेशिया, द.कोरिया, इराक, यु.ए.ई.

  • )चीन, सौदी अरेबिया, यु.ए.ई., यु.एस.ए., द.कोरिया, इंडोनेशिया, इराक (1) China, Saudi Arabia, U.A.E, U.S.A, South Korea, Indonesia, Iraq
  • )यु.एस.ए., चीन, यु.ए.ई., सौदी अरेबिया, द.कोरिया, इंडोनेशिया, इराक (2) U.S.A, China, U.A.E, Saudi Arabia, South Korea, Indonesia, Iraq
  • )चीन, यु.एस.ए., यु.ए.ई., सौदी अरेबिया, इंडोनेशिया, द.कोरिया, इराक (3) China, U.S.A, U.A.E, Saudi Arabia, Indonesia, South Korea, Iraq✓ योग्य
  • )यु.एस.ए., सौदी अरेबिया, चीन, इराक, द.कोरिया, यु.ए.ई., इंडोनेशिया (4) U.S.A, Saudi Arabia, China, Iraq, South Korea, U.A.E, Indonesia

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Economy

जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत ______ या बरोबर दिली जाते.

  • )दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ
  • )बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता✓ योग्य
  • )गरीब स्त्रीया ज्यांचे दवाखान्यात बाळंत होण्याचे प्रमाण कमी आहे त्यावर अधिक भर
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Economy

थॉमस पिकेटी चे पुस्तक “कॅपिटल” (2013) खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते ? योग्य पर्याय निवडवा : (a) भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे (b) भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे (c) विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय (d) विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय

  • )फक्त (a)
  • )फक्त (b)
  • )फक्त (c)✓ योग्य
  • )(a) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Economy

दारिद्र्य मापनासंबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या : (a) उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे (दारिद्र्य रेषा उष्मांकाधारीत न ठेवणे). (b) दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे. (c) शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे. वरीलपैकी कुठले/ले विधान/ने बरोबर आहे/त?

  • )(a) आणि (c) फक्त / (a) and (c) only
  • )वरील सर्व / all the above✓ योग्य
  • )(a) आणि (b) फक्त / (a) and (b) only
  • )(b) आणि (c) फक्त / (b) and (c) only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Economy

आर्थिक सुधारणांनंतर 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर _________ प्रवृत्ती दर्शवितो.

  • )स्थिर / stable
  • )घटती / declining
  • )वाढती / increasing✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतीही नाही / none of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Economy

एन.एस.एस.ओ. नुसार 'श्रमशक्ती' म्हणजे : (a) अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत. (b) अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे. पर्यायी उत्तरे :

  • )(a) किंवा (b) कुठलेच नाही / Neither (a) nor (b)
  • )फक्त (a) / Only (a)
  • )फक्त (b) / Only (b)
  • )दोन्ही (a) आणि (b) / Both (a) and (b)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Economy

व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो? (a) निधी वरील खर्च (b) रेपो रेट (c) रोकड रोखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च (d) कमीत कमी परतावा दर पर्यायी उत्तरे :

  • )वरील सर्व
  • )(a), (c) आणि (d) फक्त✓ योग्य
  • )(a), (b) आणि (d) फक्त
  • )(a), (b) आणि (c) फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Economy

(a) मुद्रा योजनेचे उद्दीष्ट असंघटित/बिन नोंदणीकृत (नॉन कॉर्पोरेट) छोट्या उद्योग धंद्यांना वित्त पुरवठा करणे. (b) 'मिसींग मिडल' ('हरवलेला मध्य') म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे. वरीलपैकी कुठले/ली विधान/ने बरोबर आहे/त ?

  • )(a) आणि (b) दोन्ही✓ योग्य
  • )फक्त (a)
  • )फक्त (b)
  • )वरीलपैकी कुठलेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Economy

भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये ________ चा समावेश होतो.

  • )अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित खर्च
  • )भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च✓ योग्य
  • )महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च
  • )वरील सर्व तिन्ही प्राप्ती आणि खर्च

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Economy

भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य (बँकांमधील) ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे?

  • )गुजरात
  • )तामिळनाडू
  • )पंजाब
  • )महाराष्ट्र✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Economy

1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्रसरकारच्या दायित्वांमध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या?

  • )External liabilities
  • )Internal debt
  • )Internal liabilities✓ योग्य
  • )RBI funds & deposits

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Economy

लिंग अंदाजपत्रक म्हणजे

  • )financial provision of more gender equal society✓ योग्य
  • )financial provision for more gender unequal society
  • )financial provision to achieve human development
  • )financial provision for equality of every citizen

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Economy

खालील विधाने लक्षात घ्या : (a) आर्थिक नियोजनाच्या पहिल्या चार दशकांमध्ये वस्तू करांवरील भर वाढला होता. (b) त्यांचा (वस्तू करांचा) केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये सन 1990-91 मध्ये 84% हिस्सा होता. (c) अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.7% इतके होते. वरीलपैकी कुठले/कुठली विधान/ने चुकीची आहे/त?

  • )All the above
  • )(b) only
  • )(c) only
  • )None✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Economy

बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 च्या ________ समाविष्ट नाहीत.

  • )दुसऱ्या✓ योग्य
  • )पहिल्या
  • )तिसऱ्या
  • )वरीलपैकी कोणत्याही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Economy

मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश : (a) कर्ज चिरस्थायी पातळी पर्यंत घटविणे (b) राजकोषीय तुटीत वाढ करणे (c) चालू खात्यावरील तूट कमी करणे (d) अर्थसाहाय्य कमी करणे पर्यायी उत्तरे :

  • )(a) आणि (b) (a) and (b)
  • )(a), (b), (c) (a), (b), (c)
  • )फक्त (c) only (c)✓ योग्य
  • )फक्त (d) only (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Science

पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? (a) अपवर्तन (b) अपस्करण (c) अंतर्गत परावर्तन (d) बाह्य परावर्तन खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

  • )(a) व (b) फक्त (a) and (b) only
  • )(a), (b) व (c) फक्त (a), (b) and (c) only✓ योग्य
  • )(a), (b), (c) व (d) (a), (b), (c) and (d)
  • )(a), (b) व (d) फक्त (a), (b) and (d) only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Science

खालीलपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर आहेत? (a) ध्वनी तरंग हे अवतरंग असतात. (b) ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगांची वारंवारिता 20 kHz आणि त्यापेक्षा अधिक असते. (c) ध्वनी तरंगांच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते. (d) अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ (Noise) म्हटले जाते. पर्यायी उत्तरे :

  • )(a) and (b)
  • )(a) and (c)
  • )(b) and (c)
  • )(c) and (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Science

खालील विधाने विचारात घ्या : (a) प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. (b) वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

  • )Statement (a) is correct and (b) is correct explanation.✓ योग्य
  • )Statements (a) and (b) both are correct but (b) is not its correct explanation.
  • )Statement (a) is correct but (b) is wrong.
  • )Statements (a) and (b) both are wrong.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Science

एककेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठाचे छेद खालीलप्रमाणे असतील तर त्या समपृष्ठाचे मिलर निर्देशांकाचे परिगणन करा : 2a, 3b, 4c

  • )6, 4, 3✓ योग्य
  • )2, 3, 4
  • )4, 6, 8
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Science

जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराइड मधून 100 A विद्युत प्रवाह 965 से. करिता प्रवाहित केला, तर (Na=23, Cl=35.5)

  • )23 ग्रॅ. सोडियम ॲनोडवर निक्षेप होईल आणि 35.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा कॅथोडवर निकास होईल.
  • )23 ग्रॅ. सोडियम कॅथोडवर निक्षेप होईल आणि 35.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा ॲनोडवर निकास होईल.✓ योग्य
  • )23 ग्रॅ. सोडियम कॅथोडवर निक्षेप होईल आणि 17.5 ग्रॅ. क्लोरीन वायुचा ॲनोडवर निकास होईल.
  • )23 ग्रॅ. सोडियम कॅथोडवर निक्षेप होईल आणि 71 ग्रॅ. क्लोरीन वायुचा ॲनोडवर निकास होईल.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Science

प्लॅटेहेल्मिन्थस्चे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले आहे :

  • )फ्लॅटवर्म्स, ट्रिप्लोब्लास्टिक, असिलोमेट प्राणी / Flatworms, triploblastic, acoelomate animal✓ योग्य
  • )फ्लॅटवर्म्स, डिप्लोब्लास्टिक, असिलोमेट प्राणी / Flatworms, diploblastic, acoelomate animal
  • )फ्लॅटवर्म्स, ट्रिप्लोब्लास्टिक, सिलोमेट प्राणी / Flatworms, triploblastic, coelomate animal
  • )फ्लॅटवर्म्स, ट्रिप्लोब्लास्टिक, स्यूडोसिलोमेट प्राणी / Flatworms, triploblastic, pseudocoelomate animal

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Science

डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे?

  • )राष्ट्रीय धनुर्वात नियंत्रण कार्यक्रम / National tetanus control programme
  • )राष्ट्रीय विषमज्वर नियंत्रण कार्यक्रम / National typhoid control programme
  • )राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम / National tuberculosis control programme✓ योग्य
  • )राष्ट्रीय एडस् नियंत्रण कार्यक्रम / National AIDS control programme

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Science

खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतासंवेदनावाहक म्हणून प्रमाणित केले आहेत? (a) ॲसीटाईल कोलीन व गॅमा अमिनो ब्युटीरीक ॲसीड (b) डोपामाईन व नॉरॲड्रेनालीन (c) लायसीन व हिस्टामाईन (d) पायruvic ॲसिड व ॲसीटाईल कोए

  • )फक्त (a) / (a) only
  • )फक्त (c) / (c) only
  • )(a) आणि (b) / (a) and (b)✓ योग्य
  • )(c) आणि (d) / (c) and (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Logical Reasoning

राम आणि शाम दोघेही 'A' बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहे. राम 3 मी. व शाम 4 मी. चालले. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मी. चालला आणि शाम सुद्धा डावीकडे वळून 5 मी. चालला. आता त्यांच्यामधील अंतर किती?

  • )19.5 मी. / 19.5 m
  • )10 मी. / 10 m
  • )16 मी. / 16 m
  • )11.40 मी. / 11.40 m✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Logical Reasoning

P, Q, R, S, T, U, V आणि W हे मध्यकाडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत. खालील विधाने लक्षात घेऊन प्रश्नाचे उत्तर निवडा : (a) P हा T च्या उजवीपासून दुसरा आहे तसेच तो R आणि V चा सलग शेजारी आहे. (b) S हा P चा शेजारी नाही. (c) V हा U चा शेजारी आहे. (d) 'Q' हा S आणि W च्या मध्ये नाही, 'W' हा U आणि S च्या मध्ये नाही. खालीलपैकी कोणते दोन शेजारी नाहीत?

  • )UV
  • )RP
  • )SW
  • )RV✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Quantitative Aptitude

तळ्यात एक स्तंभ आहे. निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे. त्याच्या वर एक तृतीयांश भाग पाण्यात बुडालेला आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे, तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा.

  • )42✓ योग्य
  • )35
  • )28
  • )26

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Logical Reasoning

दुहेरी मध्यस्थीचा संशय असलेले तीन हेर आहेत. त्यांच्यापैकी फितूर व्यक्ती खोटे बोलतात आणि इतर मध्यस्थ खरे बोलतात. त्या तिघांत फक्त एक फितूर आहे. जर चौकशीला त्यांनी पुढील प्रतिसाद दिले असतील तर फितूर निर्देशित करणारा पर्याय निवडा. अली : “बेला फितूर आहे.” बेला : “सारा फितूर आहे.” सारा : “बेला खोटे बोलते.”

  • )सारा
  • )अली
  • )बेला✓ योग्य
  • )त्यांच्या प्रतिसादात तार्किक संगती नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Quantitative Aptitude

अजय आणि विकास यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3 : 11 आहे. विकास हा मिनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. मिनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. जर अजयच्या वडिलांचे वय 25 वर्ष अजय पेक्षा जास्त आहे, तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती?

  • )67 वर्ष
  • )43 वर्ष✓ योग्य
  • )45 वर्ष
  • )84 वर्ष

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Quantitative Aptitude

X ही बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरलेली आहे. त्यात 1 लीटर लिंबू रस आहे. हंसाने Y व Z या दोन रिकाम्या बाटल्यांत X मधला रस ओतला. Y बाटलीची धारकता X बाटलीच्या निम्मे आहे. यानंतर X बाटलीत आणखी 0.6 लीटर रस शिल्लक आहे; Y या बाटलीची 1/5 धारकता रसाने भरलेली आहे. हंसाने Z ही बाटली पाण्याने पूर्णपणे भरली. Z बाटलीतील द्रवाची राशी लीटरमध्ये निवडा.

  • )0.1
  • )0.3
  • )0.4
  • )0.6✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Logical Reasoning

जेव्हा गुलाबी X आहे, पांढरा Y आहे. जेव्हा गुलाबी X नाही, पिवळा Z आहे. परंतु पिवळा Z असेपर्यंत पांढरा Y असणार नाही. जर सर्व माहिती सत्य असेल तर सत्य विधान निवडा.

  • )पिवळा Z असताना, गुलाबी X आहे. / While yellow is Z, pink is X.
  • )पांढरा Y नसताना, पिवळा Z नाही. / While white is not Y, yellow is not Z.
  • )पिवळा Z असल्याने, गुलाबी X नाही. / Since yellow is Z, pink is not X.✓ योग्य
  • )पांढरा Y असताना, गुलाबी X नाही. / While white is Y, pink is not X.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Logical Reasoning

एका राज्याच्या शिक्षण विभागाने 14 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांना गीतेचे पाठांतर करून शाळेच्या प्रार्थनागृहात दर दिवशी तज्ञांच्या पर्यवेक्षणाखाली तो तोंडपाठ म्हणून दाखवून न्याहारीपत्रक मिळवण्यास उत्तेजन देत आहे. तरुण व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवन तत्त्वज्ञानासंबंधाने त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने ही योजना रचली आहे. या योजनेत भाग घेऊन आणि गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्त्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील. वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्याप्रकारे व्यक्त करणारा एक पर्याय निवडा :

  • )तरुण व्यक्ती मुळातच गीतेच्या तत्त्वज्ञानाबाबत जागरूक आहेत.
  • )भारतीय तत्त्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्हाला गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही.
  • )जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे.✓ योग्य
  • )पाठांतरासाठी काही शिकणे म्हणजे तुम्ही स्वतः सर्जनशील आहात असे नाही.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Polity

अलीकडच्या काही वर्षांत अनेक लोकांनी सायकलचा वापर करू लागलेले आहेत. लोकांना सुदृढ रहायला याची मदत होते या कारणाने ही बाब स्वागतार्ह आहे. पण जर शिरस्त्राण घालण्याची सक्ती केली तर लोक सायकल चालविणे टाळतील. प्रत्येक गोष्टीत धोका असतो आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची हे लोकांना माहीत आहे. लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यामध्ये शासनाची कोणतीच भूमिका नाही. सायकल चालविणाऱ्यांवर शिरस्त्राण घालण्याची बळजबरी करणे ही सरकारची व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे आणि ते लोकशाही जीवनमार्गाच्याही विरोधी आहे. वरील युक्तिवादात वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण करणारे विधान निवडा.

  • )व्यावसायिक सायकल चालविणाऱ्यांनी शिरस्त्राण वापरणे प्रस्थापित करायला हवे.
  • )मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना वा औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी.✓ योग्य
  • )खूपच खर्चिक असल्यामुळे दारुड्यांना त्यांच्या व्यसनांवर उपचार करण्यासाठी सार्वजनिक निधी मिळता नये.
  • )मुले जर परवानगीशिवाय शाळेत अनुपस्थित रहात असतील तर त्यांच्या पालकांना दंड करणे योग्य आहे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Quantitative Aptitude

एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किमी गतीने चालला तर तो तीन मिनिटे उशिरा पोहोचतो. जर तो ताशी 6 किमी गतीने चालला तर तो सात मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि कारखाना यातील अंतर किलोमीटरमध्ये निवडा.

  • )4
  • )5✓ योग्य
  • )6
  • )7

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ९९Marathi Language

प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसून दिलेल्या संदर्भात दोन स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्ये तयार करतील अशी शब्दजोडी वा शब्दसमूह जोडी निवडा. जगभरातील प्राचीन संस्कृती देवतांचे शांतवन करण्यासाठी रक्त अर्पण केले जात होते आणि मानवी बळी दिला जात होता असे असले तरी शेजारच्या टोळ्यांतील कैद्यांना बळी देण्याबाबतचा माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना ____ करत होता.

  • )कारणीभूत (उरत), विस्तारित / engendered and expatiated
  • )अस्वस्थ आणि अपमानित / disquieted and affronted✓ योग्य
  • )अपमानित आणि बंदिवान / affronted and imprisoned
  • )अस्वस्थ आणि माफ / disquieted and condoned

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2019-combined-prelims