विधाना अ आणि ब यांचे परिक्षण करून योग्य पर्याय निवडा. विधान 'अ' : सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही तिला पृथ्वीची भू-धवलता असे म्हणतात. विधान 'ब' : हवेचे अणू, लहान धुलिकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून विकिरण व परावर्तन क्रियेमुळे उष्णता लघुहरीद्वारे अवकाशात पाठविली जाते.
Examine the statement A and statement B. Statement 'A' : 35% solar energy is not useful for the heating of Earth's surface as well as atmosphere, that heat is called “Albedo of the Earth's surface”. Statement 'B' : Through Short Waves, Scattering and Reflection process of the air molecules, heat is transferred by the small dust particles, clouds and earth's surface in the space.
- (अ)(1) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य असून 'ब' हे 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.✓ योग्य उत्तर
- (ब)(2) विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही सत्य असून 'ब' हे 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
- (क)(3) विधान 'अ' सत्य असून विधान 'ब' असत्य आहे.
- (ड)(4) विधान 'अ' असत्य असून विधान 'ब' सत्य आहे.
स्पष्टीकरण
पृथ्वीवर येणाऱ्या सौरउर्जेपैकी सुमारे 35% उर्जा परावर्तित होऊन परत अवकाशात जाते, याला पृथ्वीची भू-धवलता (Albedo) म्हणतात. हवेतील अणू, धुलिकण, ढग आणि पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यामुळे विकिरण आणि परावर्तन क्रिया होते. या क्रियेमुळे सौरउर्जेचा काही भाग लघुतरंगांद्वारे परत अवकाशात पाठविला जातो. विधान 'ब' मध्ये नमूद केलेली विकिरण व परावर्तन प्रक्रिया हीच भू-धवलताची कारणे आहेत. म्हणूनच विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही विधाने वैज्ञानिक दृष्टीने सत्य आहेत.
संदर्भ: भूगोल पाठ्यपुस्तके (इयत्ता 11वी - भूगोलाची मूलतत्त्वे)