माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 कलम 26(3) नुसार समुचित शासन, आवश्यक असल्यास, पोटकलम (2) मध्ये निर्दिष्ट केलेली मार्गदर्शक तत्वे नियमित कालांतराने अद्ययावत करून प्रसिद्ध करील आणि विशेषतः व पोटकलम (2) च्या सर्वसाधारणतेला बाधा न येऊ देता या मार्गदर्शक तत्वांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल : (a) या अधिनियमाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांच्या किंवा लादलेल्या कर्तव्यांच्या बाबतीतील कृती किंवा कृती करण्यात केलेली कसूर या संबंधातील कायद्यातील उपाययोजना, तसेच आयोगाकडे अपील दाखल करण्याची पद्धती. (b) या अधिनियमाची उद्दिष्ट्ये. (c) माहिती मिळवण्यासाठी केलेल्या विनंतीच्या संबंधात घालावयाच्या फी बाबतची नोटीस. (d) या अधिनियमानुसार माहिती मिळवण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही अतिरिक्त विनियम. अचूक पर्याय निवडा.
As per section 26(3) of Right to Information Act, 2005 the appropriate Govt. shall if necessary, update and publish the guidelines referred to in sub-sec (2) at regular intervals which shall, in particular and without prejudice to the generality of sub-sec (2) include : (a) All remedies in law available regarding an act or failure to act in respect of a right or duty conferred or imposed by this act including the manner of filing an appeal to the Commission. (b) The objects of this act. (c) The notices regarding fees to be paid in relation to requests for access to an information. (d) Any additional regulations. Choose the correct options :
- (अ)(1) पर्याय (a), (b) आणि (c) योग्य आहेत / Option (a), (b) and (c) are correct
- (ब)(2) पर्याय (b), (c) आणि (d) योग्य आहेत / Option (b), (c) and (d) are correct
- (क)(3) वरील सर्व पर्याय योग्य आहेत / All options are correct✓ योग्य उत्तर
- (ड)(4) फक्त पर्याय (a) आणि (c) योग्य आहेत / Only option (a) and (c) are correct