'स्वामित्व' (SVAMITVA) योजनेची उद्दिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत ? अ. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. ब. शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे. क. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे. ड. मालमत्ता कर निश्चित करणे.
Which of the following are the objectives of the 'SVAMITVA' Scheme ? A. Ensure financial stability to villagers by letting them use their property to take loans. B. Create precise land records for urban planning and implementation. C. Lessen property related disputes. D. Determine property tax.
- (अ)(1) केवळ अ
- (ब)(2) ब, क आणि ड
- (क)(3) अ, क आणि ड✓ योग्य उत्तर
- (ड)(4) वरील सर्व
स्पष्टीकरण
स्वामित्व (SVAMITVA) योजना हि केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे जी २०२० मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य ग्रामीण भागातील मालमत्तेचे डिजिटल सर्व्हे करून अचूक नकाशे तयार करणे आहे. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड मिळतील ज्यामुळे ते बँकेतून कर्ज घेऊ शकतील आणि आर्थिक स्थिरता मिळेल. या योजनेमुळे जमिनीबाबत होणारे वाद कमी होतील कारण अचूक नोंदी असतील. तसेच सरकारला मालमत्ता कर निश्चित करण्यात मदत होईल. पण हि योजना फक्त ग्रामीण भागासाठी आहे, शहरी नियोजनासाठी नाही.
संदर्भ: Based on Government Schemes (SVAMITVA)