पुढे दिलेला युक्तिवाद अभ्यासा आणि सर्वात जवळून यासारखीच अनुमान प्रक्रिया असणारा युक्तिवाद दर्शवणारा पर्याय निवडा. जर तुम्ही बासरी वादनाचा सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. मी तबलावादनाचा सराव केला नाही म्हणून माझे तबला वादन सुधारले नाही. पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे. म्हणून चांगले काम करण्यासाठी मी कष्ट केले पाहिजेत.
Study the argument given below and select the option that indicates argument with most closely similar reasoning. If you practice playing flute, your playing will get better. I have not practiced playing tabla, so my playing has not got better. There is a competition next month. So I must work hard to do well.
- (अ)(1) सायकलस्वारीसाठी तुम्ही कष्ट केले तर तुमचा वेग वाढेल. वेग वाढवण्यासाठी मी खूप कष्ट केले आणि स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे. जर मला उत्तीर्ण व्हायचे असेल तर मला अभ्यास करत राहिले पाहिजे.
- (ब)(2) जर सूरपेटी वादनाचा तुम्ही नियमित सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. रसिकाने फारसा सराव केला नाही परंतु तिचे वादन सुधारले म्हणजे तिने पुरेसा सराव केला असला पाहिजे. कदाचित ती हे वर्ष संपेपर्यंत येणाऱ्या विशारद परीक्षेतसुद्धा उत्तीर्ण होऊ शकेल.
- (क)(3) जर तुम्ही गायनासाठी खूप कष्ट केले तर तुमचे गायन सुधारेल. मी माझ्या नृत्य कौशल्यांसाठी काही कष्ट केलेले नाहीत म्हणून माझे नृत्य सुधारलेले नाही. येत्या दोन महिन्यात माझी परीक्षा आहे म्हणून त्यात उच्च श्रेणी मिळवण्यासाठी मी नियमित सराव केला पाहिजे.✓ योग्य उत्तर
- (ड)(4) परिपूर्णतेच्या प्राप्तीसाठी सरावाची गरज आहे. समस्यानिराकरण कौशल्यात मला लवकरच पारंगत झाले पाहिजे म्हणून मी परिश्रमपूर्वक सराव केला. लवकरच होऊ घातलेल्या स्पर्धेत मी सहभागी होणार आहे आणि खात्रीने ती जिंकणार आहे.