स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 29 Aug, Shift 1 · ९६ प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'पक्षी जाय दिगंतरा' या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

  • )मारुती चितमपल्ली✓ योग्य
  • )मंगेश पाडगावकर
  • )इंदिरा संत
  • )बा. सी. मर्ढेकर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'जर पाऊस आला तर क्रिकेटचा सामना होणार नाही.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

  • )केवळ वाक्य
  • )संयुक्त वाक्य
  • )मिश्र वाक्य✓ योग्य
  • )प्रश्नार्थक वाक्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य' या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे?

  • )निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात.✓ योग्य
  • )मूर्ख माणसाचे कृत्य व्यर्थ जाते.
  • )गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही.
  • )चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'चित्रलिपी' हा कवितासंग्रह कोणत्या कवीचा आहे?

  • )दिलीप चित्रे
  • )अरुण कोल्हटकर
  • )ग्रेस
  • )वसंत आबाजी डहाके✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

नामदेवने आपला चष्मा घरभर शोधला. शेवटी तो त्याच्या डोक्यावरच सापडला. म्हणतात ना ________.

  • )आपलेच दात आपलेच ओठ
  • )नाव मोठं लक्षण खोटं
  • )दृष्टीआड सृष्टी
  • )काखेत कळसा गावाला वळसा✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ११Marathi Language

'अजातशत्रू' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

  • )हितशत्रू
  • )अनेक जातीचे शत्रू
  • )सर्व बाजूंनी शत्रू
  • )कुणाशीही शत्रुत्व नसलेला✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १२Marathi Language

पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. काव्यगायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता. म्हणतात ना __________.

  • )गाढवाला गुळाची चव काय?✓ योग्य
  • )पालथ्या घड्यावर पाणी
  • )पिकते तिथे विकत नाही.
  • )दुष्काळात तेरावा महिना.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १३Marathi Language

'प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच' या अर्थाची म्हण ओळखा.

  • )गाड्याबरोबर नळ्याची यात्रा.
  • )खाईंन तर तुपाशी नाही तर उपाशी
  • )चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे✓ योग्य
  • )घरोघरी मातीच्या चुली

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १४Marathi Language

खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा. 'मी शाळेतून आत्ताच आलो.'

  • )कर्तरी प्रयोग✓ योग्य
  • )भावे प्रयोग
  • )शक्य कर्मणी
  • )कर्मणी प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

'बारा पिंपळावरचा मुंजा' या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा.

  • )बारा भानगडीत अडकलेला.
  • )एका जागी स्थिर न राहणारा✓ योग्य
  • )अनेक कामे हाती घेऊन एकही काम व्यवस्थित न करणारा
  • )अनुभवी माणूस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. धरणी

  • )भूगर्भ
  • )भूमी✓ योग्य
  • )शेत
  • )माती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १८Marathi Language

खाली दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा. गैरहजर

  • )तत्पुरुष समास
  • )अव्ययीभाव समास✓ योग्य
  • )बहुव्रीही समास
  • )द्वंद्व समास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

खालील शब्दांमधून बहुव्रीही सामासिक शब्द ओळखा. पंचवटी, क्षणोक्षणी, पाप-पुण्य, चक्रपाणी

  • )पंचवटी
  • )पाप-पुण्य
  • )क्षणोक्षणी
  • )चक्रपाणी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा. 'नळे इंद्रासी असे बोलिजेते'.

  • )नवीन कर्मणी प्रयोग
  • )समापन कर्मणी प्रयोग
  • )पुराण कर्मणी प्रयोग✓ योग्य
  • )शक्य कर्मणी प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

'पाताळयंत्री' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे?

  • )अर्थ समजून न घेता पाठांतर करणारा.
  • )कारस्थान करणारा✓ योग्य
  • )दुसऱ्यांची चूक स्वतःवर ओढून घेणारा.
  • )कसलीही पारख नसलेला.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

'शेजारचे घर पावसाळ्यात गळते.' - या वाक्याचा प्रकार ओळखा.

  • )संयुक्तवाक्य
  • )केवळ वाक्य✓ योग्य
  • )मिश्र वाक्य
  • )नकारार्थी वाक्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीच्या समानार्थी म्हण सांगा.

  • )पळसाला पाने तीन✓ योग्य
  • )ध्वनी तसा प्रतिध्वनी
  • )बळी तो कान पिळी
  • )गर्वाचे घर खाली

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

'रानवाटा' हे पुस्तक कुणी लिहिले आहे?

  • )ग्रेस
  • )राजन गवस
  • )ना. धो. महानोर
  • )मारुती चितमपल्ली✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २७English Language

Select the most appropriate articles to fill in the blanks (ø indicates no article needed). Someone stole all ______ gold ornaments from ______ Durga temple yesterday.

  • )the; ø
  • )a; the
  • )the; the✓ योग्य
  • )ø; the

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३०English Languageआयोगाने रद्द

Complete the sentence using the most suitable form of the verb 'visit'. A. “Hey, we are going to Paris in the summer of 2023. Have you ever been there?” B. “Yes, I ______ Paris way back in 2005.”

  • )am visiting
  • )visit
  • )had visited
  • )visited

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ३१English Language

The given sentence has an error. Select the option that rectifies the error. Simran working for 10 years for that company, after which she got a promotion.

  • )Simran work
  • )she get a promotion
  • )she was getting a promotion
  • )Simran had been working✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३२English Language

Select the most appropriate preposition to fill in the blank. Harish was not quite satisfied ______ the way the interview went.

  • )about
  • )with✓ योग्य
  • )for
  • )on

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३३English Language

Select the most appropriate meaning of the given idiom. The ball is in your court

  • )To be responsible for making the next move✓ योग्य
  • )To be careless about making the next move
  • )To be responsible for making the previous move
  • )To be unsure about making a move

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३४English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. Many people acquire animals on impulse, / often based solely on looks, / without consider for / what's best for the animals or their wants and needs.

  • )what's best for the animals or their wants and needs
  • )without consider for✓ योग्य
  • )often based solely on looks
  • )Many people acquire animals on impulse

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. A leopard doesn't change its spots.

  • )Basic characteristics can never be altered✓ योग्य
  • )An honest person always keeps his promises
  • )A wild animal never leaves its habitation
  • )One's thought process must not be modified

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३७English Language

Select the most appropriate adjective to fill in the blank. I like both dark chocolate and milk chocolate, but I prefer the _______.

  • )better
  • )former✓ योग्य
  • )later
  • )earlier

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४१English Language

Select the most appropriate punctuation to fill in the blank. What a huge house this is _________

  • )' (single quotation mark)
  • )(period)
  • )! (exclamation mark)✓ योग्य
  • )? (question mark)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४५English Language

The following sentence has been divided into three segments. One of them may contain an error. Select the option that has the segment with the error. If you don't find any error, select 'No error' as your answer. Beside 24th March, 1992, I met the person / who later turned out to be my / spiritual Guru in the journey of life.

  • )spiritual Guru in the journey of life.
  • )No error
  • )who later turned out to be my
  • )Beside 24th March, 1992, I met the person✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४८English Language

Select the most appropriate meaning of the given idiom. The devil is in the details.

  • )The details are important but can be ignored.
  • )The details are important and can cause problems if not attended to.✓ योग्य
  • )The details are unimportant and must be ignored.
  • )The devil is literally in the details.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९English Language

Select the most appropriate past tense form of the verb 'rebut' to fill in the blank. The victim _______ all the allegations levelled against him.

  • )is rebutting
  • )will be rebutting
  • )rebutted✓ योग्य
  • )have been rebutting

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५१General Knowledge

भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा यापैकी कोणती आहे?

  • )आग्नेयेकडून नैऋत्येकडे
  • )ईशान्येकडून नैऋत्येकडे
  • )वायव्येकडून ईशान्येकडे
  • )नैऋत्येकडून ईशान्येकडे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

खालीलपैकी कोण सध्याच्या मेघालय राज्यातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक होते?

  • )वीर सुरेंद्र साई
  • )तिरोत सिंग✓ योग्य
  • )टेकांगा खारिया
  • )गोविंद गुरु

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 अंतर्गत स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या खंड (c) मध्ये खालीलपैकी काय नमूद करण्यात आले आहे?

  • )संघटना किंवा संघ बनविण्याचा अधिकार✓ योग्य
  • )भारताच्या कोणत्याही भागामध्ये राहणे आणि स्थानिक होणे
  • )शस्त्रास्त्रांशिवाय शांतपणे एकत्र येणे
  • )भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५६General Knowledge

एप्रिल 2023 मध्ये, नथू ला येथे हिमस्खलन घडले. ही दुर्घटना कोणत्या राज्यात घडली?

  • )पश्चिम बंगाल
  • )मेघालय
  • )अरुणाचल प्रदेश
  • )सिक्कीम✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

खालीलपैकी कोणत्या महिला सुधारकाला पंडिता ही पदवी मिळाली होती आणि त्यांनी 'मुक्ती मिशन' नावाच्या ख्रिस्ती मिशनची स्थापना केली होती?

  • )अनिता देशपांडे
  • )अनाबाई दमानी
  • )रमा डोंगरे✓ योग्य
  • )नीती कर्मकर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५८General Knowledge

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका विश्लेषणानुसार, 2022 मध्ये कोणत्या शहराची PM2.5 पातळी ही सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट असून त्याला भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे?

  • )मुंबई
  • )दिल्ली✓ योग्य
  • )कोलकाता
  • )चेन्नई

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६०General Knowledge

मूळ माहितीचा अधिकार (RTI) अधिनियम (वर्ष 2005 मधील पहिला माहिती अधिकार अधिनियम) केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांचे वेतन, भत्ते आणि इतर सेवा अटी या ________ यांच्याप्रमाणेच विहित केलेल्या आहेत.

  • )कॅबिनेट सचिव
  • )मुख्य निवडणूक आयुक्त✓ योग्य
  • )भारताचे सरन्यायाधीश
  • )UPSC चे अध्यक्ष

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

Namaste is a Central Sector Scheme of the Ministry of Social Justice and Empowerment (MoSJE) as a joint initiative of the MoSJE and the ________.

  • )Ministry of Rural Development
  • )Ministry of Agriculture & Farmers Welfare
  • )Ministry of Labour and Employment
  • )Ministry of Housing and Urban Affairs✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

नागांचे स्वराज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने 1927 च्या हेरका चळवळीत सामील झालेली महिला स्वातंत्र्यसैनिक खालीलपैकी कोण होती?

  • )ॲनी मस्करिन
  • )पूर्णिमा बॅनर्जी
  • )राणी गाईदिनल्यू✓ योग्य
  • )राजमोहिनी देवी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६३General Knowledge

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने पहिली भारत महिला परिषद सुरू केली होती आणि भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते?

  • )मादाम भिकाजी कामा
  • )ताराबाई शिंदे
  • )रमाबाई रानडे✓ योग्य
  • )फातिमा शेख

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledgeआयोगाने रद्द

राज्य माहिती आयुक्त ________ वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाची ________ वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहतील.

  • )3; 60
  • )3; 62
  • )5; 65
  • )6; 62

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ६५General Knowledge

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, सर्वात कमी शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात नोंदली गेली?

  • )महाराष्ट्र
  • )पश्चिम बंगाल
  • )हिमाचल प्रदेश✓ योग्य
  • )उत्तर प्रदेश

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

राज्य हे, कामाबाबत न्याय्य आणि मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी आणि प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करेल" हा ___________ चा एक भाग आहे.

  • )मूलभूत हक्क
  • )राज्याच्या धोरणांची निर्देशक तत्त्वे✓ योग्य
  • )प्रस्तावना
  • )मूलभूत कर्तव्ये

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६८General Knowledge

1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नेमण्यात आली होती?

  • )बटलर
  • )हंटर✓ योग्य
  • )फ्रेझर
  • )मुदिमान

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६९General Knowledge

द्वीपक्लपीय पठाराच्या दख्खन पठार विभागाला कोणते विधान अचूकपणे लागू होते?

  • )नर्मदा नदीच्या दक्षिणेला असलेला हा भूभाग आहे.✓ योग्य
  • )ते पूर्वेला उंच आहे आणि पश्चिमेला उतारावर आहे.
  • )त्यातून चंबळ आणि बेतवा नद्या वाहतात.
  • )त्यात माळवा पठाराचा प्रमुख भाग व्यापला जातो.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१General Knowledge

जुलै 2022 मध्ये, आसामने 'स्वनिर्भर नारी योजना' सुरू केली होती. ही योजना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गटासाठी आहे?

  • )स्थानिक विणकर✓ योग्य
  • )कुंभार
  • )स्वयंसेवी संस्था
  • )आदिवासी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३General Knowledge

Which of the following is/are the feature(s) of E-Waste (Management) Rules, 2022 as notified in November 2022? I)All the manufacturers, producers, refurbishers and recyclers are required to register on the portal developed by CPCB. II)Provision for reduction of hazardous substances in manufacturing of Electrical and Electronic Equipment (EEE). III)Authorisation has now been been replaced by registration through online portal and only manufacturers, producers, refurbishers and recyclers require registration.

  • )Only II and III
  • )I, II and III✓ योग्य
  • )Only I and III
  • )Only I and II

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७४General Knowledge

गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 साली खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?

  • )बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी
  • )धर्मसभा
  • )भारत सेवक समाज✓ योग्य
  • )परमहंस मंडळी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा-2022 मधील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू हशिका रामचंद्र खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होती?

  • )तिरंदाजी
  • )बॅडमिंटन
  • )कुस्ती
  • )जलतरण✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६General Intelligence

अक्षरगटांच्या खालील चार जोड्यांपैकी तीन जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी अक्षरगट जोडी निवडा.

  • )HD-KG
  • )JF-MI
  • )ZD-GC✓ योग्य
  • )QM-TP

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

एक काम पूर्ण करण्यासाठी P ला Q पेक्षा दुप्पट किंवा R पेक्षा तिप्पट वेळ लागतो. मिळून काम केल्यास ते 2 दिवसांत त्या कामाला पूर्ण करू शकतात. Q हा एकट्याने ते काम किती दिवसांत पूर्ण करू शकतो?

  • )6 दिवस✓ योग्य
  • )12 दिवस
  • )4 दिवस
  • )8 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमानुसार आधारित एका तर्कानुसार 'EPZK' हे 'CNXI' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'MYEI' हे 'KWCH' शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, 'UIWA' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

  • )SUGY
  • )SUYG
  • )SYUG
  • )SGUY✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७९General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? CE6, DG12, EI20, ?

  • )GK30
  • )FK30✓ योग्य
  • )FJ40
  • )GM35

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 10, 40, 90, 160, ?, 360

  • )200
  • )250✓ योग्य
  • )220
  • )270

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

Read the given statement(s) and conclusions carefully. Assuming that the information given in the statements is true, even if it appears to be at variance with commonly known facts, decide which of the given conclusion(s) logically follow(s) from the statement(s). Statements: All shoes are sandals. All sandals are crocs. Conclusion (I): Some crocs are shoes. Conclusion (II): All shoes are crocs.

  • )Neither conclusion (I) nor (II) follows.
  • )Only conclusion (I) follows.
  • )Only conclusion (II) follows.
  • )Both conclusions (I) and (II) follow.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८३General Intelligence

दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेले संबंधप्रमाणोच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. PFV : UKA LCS : QHX

  • )DYJ : JEP
  • )KBR : QHX
  • )QAJ : UEO
  • )HTC : MYH✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

एका व्यक्तीने एका शर्टची विक्री 4% तोट्याने ₹960 किमतीला केली, तो 20% नफ्याने एक स्वेटर ₹840 किमतीला विकतो. तर त्याचा निव्वळ नफा किंवा तोटा शोधा.

  • )तोटा, ₹123
  • )नफा, ₹123
  • )तोटा, ₹100
  • )नफा, ₹100✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

काजूच्या एक डब्याचे वजन 1 kg 650 g आहे. किलोग्राममध्ये अशा 9 डब्यांचे एकूण वजन किती असेल?

  • )15.65 kg
  • )15.85 kg
  • )14.85 kg✓ योग्य
  • )14.65 kg

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८General Intelligence

A, B आणि C या तीन तोट्या 6 तासांत एक टाकी भरू शकतात. याप्रमाणे एकत्रितपणे 2 तास काम केल्यानंतर C ला बंद केले जाते आणि उर्वरित टाकीला A व B हे 7 तासांत भरू शकतात. फक्त C ने टाकी भरण्यासाठी किती तास लागतील?

  • )12
  • )14✓ योग्य
  • )16
  • )10

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या (?) जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? AZ2 YB6 CX12 WD20 ?

  • )FV32
  • )EU32
  • )UF30
  • )EV30✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९०General Intelligence

एक वस्तू ₹19.50 किमतीला विकून, एका व्यक्तीला 30% नफा होतो. 40% नफा मिळवण्यासाठी त्याने विक्री किंमत किती वाढवली पाहिजे?

  • )₹1.50✓ योग्य
  • )₹4.00
  • )₹1.90
  • )₹2.00

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

एक नाव स्थिर पाण्यात 13 km/h वेगाने नौकायन करू शकते. प्रवाहाचा वेग 4 km/h असल्यास, प्रवाहाच्या दिशेने 68 km जाण्यासाठी नावेला लागणारा वेळ शोधा.

  • )2 तास
  • )4 तास✓ योग्य
  • )5 तास
  • )3 तास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

A हा सकाळी 9:00 वाजता X पासून प्रवासाला सुरुवात करतो आणि त्याच दिवशी Y पर्यंत दुपारी 1:00 वाजता पोहोचतो. त्याच दिवशी B हा देखील Y पासून सकाळी 9:00 वाजता प्रवासाला सुरुवात करतो आणि A प्रमाणेच समान मार्गाचे अनुसरण करून X पर्यंत दुपारी 3 वाजता पोहोचतो. ते दोघे किती वाजता भेटतील?

  • )10:00 वाजता
  • )11:30 वाजता
  • )11:24 वाजता✓ योग्य
  • )11:12 वाजता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३General Intelligence

रुद्र 5:30 p.m. वाजता त्याचा गृहपाठ करण्यास सुरुवात करतो आणि 1 तास 30 मिनिटांनी गृहपाठ पूर्ण करतो. तो किती वाजता त्याचा गृहपाठ पूर्ण करतो?

  • )7:00 a.m.
  • )7:30 p.m.
  • )7:00 p.m.✓ योग्य
  • )7:30 a.m.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९४General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 1, 5, 11, 19, 29, ?

  • )45
  • )47
  • )41✓ योग्य
  • )39

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

जर 'A' चा अर्थ '÷' आहे, 'B' चा अर्थ 'x' आहे, 'C' चा अर्थ '+' आणि 'D' चा अर्थ '-' आहे, तर खालीलपैकी कशाची परिणामी संख्या 156 असेल?

  • )105 D 15 A 22 B 13 C 11
  • )105 C 15 A 22 B 13 D 11
  • )105 A 15 B 22 C 13 D 11✓ योग्य
  • )105 B 15 A 22 D 13 C 11

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligenceआयोगाने रद्द

The following contain two pairs of words which are related to each other in a certain way. Three of the following four word pairs are alike as these have the same relationship and thus form a group. Which word pair is the one that does NOT belong to that group? (The words must be considered as meaningful English words and must not be grouped based on the number of letters/number of consonants/vowels in the word)

  • )Heater : Hot
  • )Tiles : Slippery
  • )Wallet : Money
  • )Cement : Strong

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ९७General Intelligence

व्याजाची 10-मासिक गणना करून, दरसाल 12% दराने 2½ वर्षानंतर ₹x ही रक्कम ₹50,578 एवढी होते. तर x चे मूल्य किती आहे?

  • )38,000✓ योग्य
  • )36,000
  • )40,000
  • )42,000

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९८General Intelligence

Refer to the following series and answer the question (all numbers are single digit numbers only). (Left) 2 8 9 3 5 7 6 3 1 4 8 9 3 5 1 5 6 2 1 4 7 5 2 3 8 2 9 (Right) How many such odd digits are there each of which is immediately preceded by an odd digit and also immediately followed by an even digit?

  • )Three
  • )Four✓ योग्य
  • )Six
  • )Five

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? JEU, OHS, TKQ, YNO, ?

  • )DQN
  • )DPM
  • )DQM✓ योग्य
  • )DPN

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

Michel walks to her office 5 km away from home. In the morning she covers the distance in 1 hour, whereas while returning home in the evening, she takes 15 more minutes to cover the same distance. Find her average speed (in km/h) during the two-way journey.

  • )3 3 — 5
  • )4 4 — 9✓ योग्य
  • )4 2 — 3
  • )3 1 — 8

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-29aug-shift1