स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 28 Aug, Shift 2 · ९५ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक कोण आहेत?

  • )भालचंद्र फडके
  • )सदानंद देशमुख
  • )भालचंद्र नेमाडे✓ योग्य
  • )किरण नगरकर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

पुढीलपैकी कोणती योग्य वाक्यरचना आहे?

  • )वैचारिक निबंधात विचाराला महत्त्व असते.✓ योग्य
  • )कुमुदची स्वभाव मला माहीत आहेत.
  • )मानव जीवनाला भाषाच महत्त्वाचे स्थान असते.
  • )कुणाचेही चिंतू तुम्ही नका बाईट.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य तयार करा. 'भर (पाऊस) फूटपाथवरील त्या (लोक) हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही.'

  • )भर पावसात फूटपाथवरील त्या लोकांचा हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही.
  • )भर पावसासाठी फूटपाथवरील त्या लोकांशी हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही.
  • )भर पावसाला फूटपाथवरील त्या लोकांचे हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही.
  • )भर पावसात फूटपाथवरील त्या लोकांचे हाल होत असलेले बघून मला आनंद होणार नाही.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभितो' अधोरेखित शब्दाचा समास कोणता आहे?

  • )द्विगू समास
  • )अलुक तत्पुरुष समास
  • )समाहार द्वंद्व समास
  • )उपपद तत्पुरुष समास✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'असंगाशी संग प्राणाशी गाठ' या म्हणीचा अर्थ ओळखा.

  • )दुष्ट माणसे समाजविघातक असतात.
  • )दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो.✓ योग्य
  • )दुर्जन माणसाची संगत केल्यास प्राण परत येतो.
  • )दुष्ट माणसे बेरकी असतात.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

‘जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुलें, तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा.’ - ही पंक्ती कोणी रचली आहे?

  • )संत नामदेव
  • )संत जनाबाई
  • )संत एकनाथ
  • )संत तुकाराम✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

खालीलपैकी कोणती म्हण चूक आहे?

  • )विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर
  • )थेंबे थेंबे तळे साचे
  • )नदी राखी तो पाणी चाखी✓ योग्य
  • )राजाला दिवाळी काय माहीत?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ११Marathi Language

पुढील म्हण पूर्ण करा. 'गरज सरो, ___________

  • )साहेब मरो
  • )वैद्य मरो✓ योग्य
  • )प्रगती करो
  • )बैल मरो

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १३Marathi Language

‘ढोंगी’ या शब्दाचे दोन अर्थ शोधा.

  • )गुन्हेगार, आरोपी
  • )इमानी, विश्वासू
  • )दांभिक, भोंदू✓ योग्य
  • )प्रामाणिक, सच्चा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १५Marathi Language

'नदीष्ट' कादंबरी कुणाची आहे?

  • )मनोज बोरगावकर✓ योग्य
  • )राजन खान
  • )राजन गवस
  • )रंगनाथ पठारे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १६Marathi Language

खाली अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ दिलेले आहेत, त्यांतील चुकीचा पर्याय शोधा.

  • )कर्णाचा अवतार - उदार मनुष्य
  • )कुंभकर्ण - अत्यंत पराक्रमी✓ योग्य
  • )देवमाणूस - चांगला सज्जन
  • )अकलेचा कांदा - मूर्ख

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा. 'अ' गट a. कणीक तिंबणे b. खडे फोडणे c. चंग बांधणे d. कूच करणे 'ब' गट i.निश्चय करणे ii.वाटचाल करणे iii.दोष देणे iv.खूप मार देणे v.मेहनत करणे

  • )a-iv, b-iii, c-i, d-ii✓ योग्य
  • )a-i, b-iii, c-iv, d-ii
  • )a-iv, b-v, c-i, d-ii
  • )a-i, b-ii, c-v, d-iii

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १८Marathi Language

'अक्षयमध्ये एक गुण लपलेला आहे.' - अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?

  • )निर्गुण
  • )सगुण
  • )अवगुण✓ योग्य
  • )बेइमान

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

'अंगावर काटा येणे' या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

  • )भारताने विश्वकप जिंकताच धोनीच्या अंगावर काटा आला.
  • )समोर दहा फूट साप पाहताच रोहनच्या अंगावर काटा आला.✓ योग्य
  • )गुलाबाचे सुंदर फूल पाहताच विशाखाच्या अंगावर काटा येत होता.
  • )प्रेमळ पतीच्या सहवासात प्राचीच्या अंगावर काटा येतो.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २१Marathi Language

अव्ययीभाव समासात _________ पद मुख्य असते.

  • )पहिले✓ योग्य
  • )दुसरे
  • )तिसरे
  • )पहिले व दुसरे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २२Marathi Language

खालीलपैकी कोणते पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे?

  • )तू मला वाचवलेस.
  • )जो-जो कीजे परमार्थ लाहो.✓ योग्य
  • )राधिका केर काढते.
  • )रामायण महाकाव्य आहे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

खाली विरुद्ध अर्थाच्या शब्दजोड्या दिलेल्या आहेत, त्यांतील कोणती जोडी चुकीची आहे?

  • )उन-सावली
  • )न्याय-अन्याय
  • )आत-खोल✓ योग्य
  • )सुख-दुःख

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. 'दातखिळी बसणे'

  • )दातात खिळा ठोकणे
  • )बोलती बंद होणे✓ योग्य
  • )दाताची शस्त्रक्रिया करणे
  • )आनंद वाटणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. The famous musician composed the song.

  • )The famous musician was composing the song.
  • )The song was composed by the famous musician.✓ योग्य
  • )The song was being composed by the famous musician.
  • )The song was composed by the musician.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. Had Soapy / not reached the avenues in time, / the villagers will have / lost their wealth.

  • )lost their wealth
  • )not reached the avenues in time
  • )Had Soapy
  • )the villagers will have✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Don't cry over spilled milk.

  • )To feel happy about something that has already happened
  • )To remain indifferent about something that has already happened
  • )Not to feel sorry or sad about something that has already happened✓ योग्य
  • )To feel sorry or sad about something that has already happened

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९English Languageआयोगाने रद्द

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. Studies have found that / people from cultures that embraced more collectivist ideals thinking / happiness more in terms of harmony and contentment, / while more individualistic-minded people connect it to feelings of exuberance and joy.

  • )people from cultures that embraced more collectivist ideals thinking
  • )Studies have found that
  • )happiness more in terms of harmony and contentment
  • )while more individualistic-minded people connect it to feelings of exuberance and joy

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ५२General Knowledge

मार्च 2023 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणाची नेमणूक ही तज्ञमंडळाद्वारे करण्याची संबंधित निर्णय दिला?

  • )मुख्य निवडणूक आयुक्त✓ योग्य
  • )CBI चे संचालक
  • )UPSC चे अध्यक्ष
  • )नीती (NITI) आयोगाचे CEO

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

खालीलपैकी कोणी 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' लिहिले आहे?

  • )वसंत राव
  • )शंकर खेडकर
  • )दादोबा पांडुरंग✓ योग्य
  • )प्रबोधनकार ठाकरे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

खालीलपैकी कोणते विधान हे स्वातंत्र्यपूर्व भारतात 1878 च्या शस्त्र अधिनियमाबाबत सत्य आहे?

  • )भारतीयांना परवान्याशिवाय शस्त्र बाळगता येणार नाही.✓ योग्य
  • )भारतीय आयात केलेली शस्त्रे खरेदी करू शकत नाहीत.
  • )भारतीय आयात केलेली शस्त्रे खरेदी करू शकतात.
  • )भारतीय मर्यादित शस्त्रे वापरू शकतात.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

मार्च 2023 मध्ये इस्रोने खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक आपत्तीशी संबंधित भारताचा नकाशासंग्रह (atlas of India) सादर केला?

  • )पूर
  • )भूस्खलन✓ योग्य
  • )हिमस्खलन
  • )भूकंप

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६General Knowledge

खालीलपैकी कोणती माहिती भारताच्या माहिती अधिकार अधिनियमांतर्गतच्या प्रकटीकरणातून (disclosure) वगळलेली नाही?

  • )भारताच्या सार्वभौमत्वावर आणि एकात्मतेवर बाधक परिणाम करणारी माहिती.
  • )संबंधित अधिकाऱ्याला सामयिक करण्यात रस नसलेली माहिती.✓ योग्य
  • )संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग करणारी माहिती.
  • )राज्याच्या वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधांवर बाधक परिणाम करणारी माहिती.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८General Knowledge

राज्यघटनेच्या अनुच्छेद ______ मध्ये असे म्हटले आहे, की जात, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादी कारणांवरून कोणत्याही नागरिकाशी भेदभाव केला जाणार नाही.

  • )अनुच्छेद 22
  • )अनुच्छेद 12
  • )अनुच्छेद 15✓ योग्य
  • )अनुच्छेद 19

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

What was the theme of the third session of National Platform for Disaster Risk Reduction held in March 2023?

  • )Traditional approach toward mitigating climate change
  • )Building local resilience in a changing climate✓ योग्य
  • )Climate Change – A Global Concern
  • )Strategies to combat climate change

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६०General Knowledge

खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्यसैनिक आणि सुधारकाने तरुणांना शिक्षित करण्यासाठी 'ऐक्य वर्धिनी सभे'ची स्थापना केली?

  • )महादेव गोविंद रानडे
  • )लहुजी राघोजी साळवे
  • )लक्ष्मण नरहर इंद्रापूरकर
  • )वासुदेव बळवंत फडके✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

2023 च्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली?

  • )लक्षद्वीप
  • )महाराष्ट्र
  • )उत्तराखंड
  • )जम्मू आणि काश्मीर✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

Which of the following recommendations was NOT made by the Verma Committee on Fundamental Duties?

  • )Establish the Co-operative Society✓ योग्य
  • )Public officials should maintain honesty while in office
  • )Integrity should be the main principle in the functioning of public office
  • )Holders of public office must be accountable for their decisions and actions

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३General Knowledge

परतीच्या मान्सूनचा परिणाम म्हणून कोणत्या राज्यात पाऊस पडतो?

  • )गुजरात
  • )महाराष्ट्र
  • )पंजाब
  • )तामिळनाडू✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

विश्व भारती विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली?

  • )रवींद्रनाथ टागोर✓ योग्य
  • )राजा राममोहन रॉय
  • )द्वारकानाथ टागोर
  • )सत्येंद्रनाथ टागोर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६५General Knowledge

भारताचे मुख्य माहिती आयुक्त हे _________ पर्यंतच्या कालावधीसाठी पदभार धारण करतील.

  • )त्यांनी पदभार धारण केल्याच्या तारखेपासून 3 वर्षे✓ योग्य
  • )त्यांनी पदभार धारण केल्याच्या तारखेपासून 5 वर्षे
  • )त्यांनी पदभार धारण केल्याच्या तारखेपासून 4 वर्षे
  • )त्यांनी पदभार धारण केल्याच्या तारखेपासून 6 वर्षे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

कोणत्या शहराने प्रतिष्ठित जागतिक हरित शहर पुरस्कार (World Green Cities Award) 2022 जिंकला?

  • )हैदराबाद✓ योग्य
  • )मुंबई
  • )कोलकाता
  • )चेन्नई

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

2011 च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे?

  • )मध्य प्रदेश
  • )बिहार
  • )पश्चिम बंगाल
  • )उत्तर प्रदेश✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९General Knowledge

घाटांच्या पश्चिमेला असलेल्या प्रदेशात अतिवृष्टी होण्याचे प्राथमिक कारण यापैकी कोणते आहे?

  • )मान्सूनच्या वाऱ्याचा पश्चिमी विशेषभावी होणारा परस्परसंबंध
  • )घाटाच्या पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने
  • )पश्चिम घाटातून मान्सूनच्या वाऱ्यांना अडथळा✓ योग्य
  • )दख्खनच्या पठारावरून व्यापारी वाऱ्यांच्या अडथळ्यामुळे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

1836 मध्ये स्थापन झालेल्या बंगभाषा प्रकाशिका सभेसी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध नव्हता?

  • )आत्माराम पांडुरंग✓ योग्य
  • )कालिनाथ चौधरी
  • )द्वारकानाथ टागोर
  • )प्रसन्नकुमार ठाकूर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledge

कर्नाटकने ऑक्टोबर 2022 मध्ये, SC साठीचे आरक्षण हे 15% वरून किती टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठीचा अध्यादेश मंजूर केला आहे?

  • )28%
  • )25%
  • )17%✓ योग्य
  • )19%

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३General Knowledge

Which of the following species shares a connection with the Olive ridley?

  • )Fish species
  • )Syngonium species
  • )Turtle species✓ योग्य
  • )Pothosspecies

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७४General Knowledge

भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद हा पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट स्थलांतरितांच्या नागरिकत्वाच्या हक्कांशी संबंधित आहे?

  • )अनुच्छेद 5
  • )अनुच्छेद 7✓ योग्य
  • )अनुच्छेद 8
  • )अनुच्छेद 6

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७५General Knowledge

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने खालीलपैकी कोणत्या लढाईनंतर भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नियुक्त केले?

  • )स्वॅलीची लढाई
  • )प्लासीची लढाई
  • )गोल्डन रॉकची लढाई
  • )बक्सारची लढाई✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७६General Intelligence

एका विशिष्ट तर्कानुसार 'CE4' हे 'HJ16' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'QS6' हे 'VX36' शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, 'IK8' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

  • )MP64
  • )MN64
  • )NQ66
  • )NP64✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

खालील मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येणारे पद दिलेल्या पर्यायांतून निवडा. FW3, HS6, JQ9, LM12, ?, PG18

  • )OL21
  • )OJ15
  • )NK15✓ योग्य
  • )NH21

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या (?) जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? IH57 HJ49 JG42 GK36 ?

  • )KF31✓ योग्य
  • )KP31
  • )KG31
  • )LG32

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१General Intelligence

खालील चारपैकी तीन पर्यायांत एक विशिष्ट साम्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता पर्याय त्या गटात बसत नाही?

  • )PXB
  • )GOS
  • )TBH✓ योग्य
  • )JRV

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

दिलेल्या मालिकेमध्ये ? च्या स्थानी काय आले पाहिजे? 1, 5, 22, 91, 368, ?

  • )1477✓ योग्य
  • )1479
  • )1478
  • )1472

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८३General Intelligence

रमेशने दरसाल 5% दराने ₹1,232 बँकेत गुंतविले. 3 वर्षांनंतर त्याला किती रक्कम मिळेल?

  • )₹1,285.80
  • )₹1,416.80✓ योग्य
  • )₹2,145.80
  • )₹1,848.80

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८४General Intelligence

जर '+' आणि '-' यांची अदलाबदल केली आणि 'x' आणि '÷' यांची अदलाबदल केली, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 14 ÷ 12 + 103 – 841 × 29 = ?

  • )104
  • )49
  • )96
  • )94✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५General Intelligence

अक्षरे, संख्या, चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. (डावे) A R % G 7 F 4 # 6 N @ 2 < W J & 3 5 L 1 * P > (उजवे) येथे अशी किती चिन्हे आहेत, ज्यांच्या ताबडतोब आधी एक संख्या आणि ताबडतोब नंतर एक अक्षर देखील आहे?

  • )दोन✓ योग्य
  • )एक
  • )तीन
  • )एकही नाही

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

A आणि B या दोन तोट्यांनी एका मोठ्या टँकरला अनुक्रमे 60 मिनिटांत आणि 40 मिनिटांत भरता येते. जर B चा वापर अर्धा वेळ केला आणि A व B यांचा एकत्रित वापर अर्धा वेळ केला, तर रिकामा टँकर भरण्यासाठी किती मिनिटे लागतील?

  • )15 मिनिटे
  • )30 मिनिटे✓ योग्य
  • )27.5 मिनिटे
  • )20 मिनिटे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

दिलेले/ली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष विधान/नांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: सर्व आरसे, कंगवे आहेत. सर्व कंगवे, पावडर आहेत. सर्व पावडर, क्रीम आहेत. निष्कर्ष (I): काही आरसे, पावडर आहेत. निष्कर्ष (II): सर्व क्रीम, कंगवे आहेत.

  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत आहेत.
  • )फक्त निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.
  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.
  • )फक्त निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८General Intelligence

P हा Q पेक्षा 30% अधिक कार्यक्षम आहे. त्यांनी मिळून काम केल्यास, एकट्या P कडून 23 दिवसांत पूर्ण होऊ शकणाऱ्या कामासाठी त्यांना किती वेळ लागेल?

  • )10 दिवस
  • )11 दिवस
  • )13 दिवस✓ योग्य
  • )20 3/17 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

श्रीमती खन्ना यांनी एका किराणा दुकानातून 10 kg 400 g तांदूळ, 15 kg 500 g गहू आणि 4 kg 600 g साखर खरेदी केली. तिने खरेदी केलेल्या वस्तूंचे एकूण वजन शोधा.

  • )30 kg 500 g✓ योग्य
  • )30 kg 400 g
  • )30 kg 450 g
  • )30 kg 550 g

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligenceआयोगाने रद्द

खालील मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येणारे पद दिलेल्या पर्यायांतून निवडा. V29G, R26H, OB3J, M20M, ?

  • )L27Q
  • )L17Q
  • )K25P
  • )K28P

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ९१General Intelligence

दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. FJI : KON OFC : TKH

  • )SQZ : YWE
  • )DLO : JRT
  • )JPC : PVH
  • )WGL : BLQ✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९२General Intelligence

एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत त्याच्या मूळ किमतीच्या 1 2/5 पटीने चिन्हांकित केली आणि त्याने ती छापील किमतीच्या 17/20 दराने विकली. त्या वस्तूवरील त्याची नफ्याची टक्केवारी किती आहे?

  • )19%✓ योग्य
  • )17%
  • )20%
  • )23%

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

एक ट्रेन उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे जात आहे. ती त्याच दिशेने 2 km/h आणि 4 km/h या वेगाने चालत असलेले राज आणि मधुर यांना अनुक्रमे 9 सेकंदात आणि 10 सेकंदात ओलांडते. जर ट्रेनची लांबी x मीटर असेल, तर x चे मूल्य शोधा.

  • )70
  • )50✓ योग्य
  • )30
  • )90

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

त्रैमासिक गणनेनुसार, वार्षिक 40% दराने ₹40,000 रकमेवर 1 वर्षात कमावलेले चक्रवाढ व्याज किती येईल?

  • )₹28,564
  • )₹18,564✓ योग्य
  • )₹28,264
  • )₹18,264

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७General Intelligence

अक्षरगटांच्या खालील चार जोड्यांपैकी तीन जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी अक्षरगट जोडी निवडा.

  • )BK-CL
  • )XG-YH
  • )JS-KT
  • )ZI-LV✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

6 वस्तूंची मूळ किंमत ही 10 वस्तूंच्या विक्री किमतीएवढी आहे. नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा.

  • )40% नफा
  • )60% नफा
  • )40% तोटा✓ योग्य
  • )60% तोटा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

यास सरळरूप द्या. 0.72 × 0.72 × 0.72 - 0.39 × 0.39 × 0.39 -------------------------------------------------- 0.72 × 0.72 + 0.72 × 0.39 + 0.39 × 0.39

  • )0.3333
  • )0.333
  • )0.33✓ योग्य
  • )0.3334

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १००General Intelligence

एक कार 2¼ तासांत 36 मैल/तास वेगाने एक ठराविक अंतर पार करते आणि दुसरे अंतर 1¾ तासांत 56 मैल/तास या वेगाने पार करते. कारने पार केलेले एकूण अंतर (मैलांमध्ये) शोधा.

  • )159
  • )200
  • )139
  • )179✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-28aug-shift2