स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 26 Aug, Shift 2 · ९५ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

“सज्ञान” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

  • )साक्षर
  • )ज्ञान
  • )सुज्ञ✓ योग्य
  • )अज्ञान

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

“संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेलं” या वाक्याचा प्रकार ओळखा.

  • )मिश्र वाक्य
  • )संयुक्त वाक्य
  • )केवल वाक्य✓ योग्य
  • )आज्ञार्थी वाक्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

“पोक्त” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

  • )अल्लड✓ योग्य
  • )सुजन
  • )भोळा
  • )असभ्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

खालीलपैकी कोणते कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे?

  • )तिने गाणे म्हटले.
  • )तिला आता चालवते.
  • )मुलींनी हरिण पाळले.
  • )गायत्री मुलांना शिकवते.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

“जीवाचे रान करणे” याचा समानार्थी वाक्प्रचार सांगा.

  • )हाडे झिजवणे
  • )हाड मोडून पडणे
  • )हाडाची काडे करणे✓ योग्य
  • )हाडाचे पाणी करणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

अभूतपूर्व या शब्दासाठी अचूक पर्याय शोधा.

  • )पूर्वी कधीही न ऐकलेला
  • )ज्याचा कधीही वीट येत नाही असे
  • )पूर्वी कधीही न घडलेला✓ योग्य
  • )कधीही विसरता न येणारे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

“वळीव” या प्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत?

  • )वि. स. खांडेकर
  • )शंकर पाटील✓ योग्य
  • )अरुण साधू
  • )भास्कर चंदनशिवे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १२Marathi Language

“मुलांनी आपला अभ्यास करायला नको का?” या वाक्याचे विधानार्थी वाक्यातील रूपांतर ओळखा.

  • )मुलांनी आपला अभ्यास जरूर करायला हवा.✓ योग्य
  • )मुलांनी आपला अभ्यास करावा.
  • )मुले आपला अभ्यास करत नाहीत का?
  • )मुले आपला अभ्यास करत नाहीत.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १३Marathi Language

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. अ) खितपत पडणे ब) खो घालणे क) खडे फोडणे ड) खडे चारणे 1. क्षीण होत जाणे 2. दोष देणे 3. शरण येण्यास भाग पडणे 4. विघ्न निर्माण करणे

  • )अ-1 ब-4 क-2 ड-3✓ योग्य
  • )अ-4 ब-3 क-1 ड-2
  • )अ-3 ब-4 क-1 ड-2
  • )अ-2 ब-3 क-1 ड-4

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

“साखरेचे खाणार त्याला देव देणार” या म्हणीचा अर्थ निवडा.

  • )देवाने दिले तर गोड खावे.
  • )जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो.✓ योग्य
  • )गोड खाल्ले की देव भरपूर देतो.
  • )जशी इच्छा तसे फळ मिळत नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Marathi Language

“सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.” यातील प्रयोग ओळखा.

  • )सकर्मक कर्तरी
  • )अकर्मक कर्तरी
  • )कर्मणी✓ योग्य
  • )कर्तरी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

“गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल” याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करा.

  • )गर्दीत म्हातारा किती वेळ थांबू शकणार आहे?
  • )गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही.✓ योग्य
  • )गर्दीत जास्त वेळ थांबणे म्हाताऱ्यास अशक्य आहे.
  • )गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबणार नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १९Marathi Language

"ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा" या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

  • )ज्ञानी
  • )बहुश्रुत✓ योग्य
  • )पंडित
  • )विद्वान

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २०Marathi Language

"आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमत" या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय कोणता आहे?

  • )संपत्ती असलेल्या व्यक्तीकडे सर्वजण येतात
  • )माणसाच्या बाह्य स्वरूपावरून त्याच्या कार्याचा अंदाज करता येत नाही
  • )एकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे
  • )माणसाला योग्य ठिकाणीच किंमत मिळते✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

"चातुर्मास" या शब्दाचा समास ओळखा.

  • )कर्मधारय समास
  • )द्विगु समास✓ योग्य
  • )बहुव्रीही समास
  • )द्वंद्व समास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २९English Language

Choose the most appropriate antonym of the given word. Churl

  • )Brute
  • )Lout
  • )Profligate✓ योग्य
  • )Niggard

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३३English Language

Select the most appropriate option for the given blank. _______ twelve years old, Ken was almost as tall as he was.

  • )At✓ योग्य
  • )With
  • )In
  • )On

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३५English Language

Select the most appropriate option for the given blank. You like to go out for a walk, ______ ?

  • )does you
  • )didn't you
  • )is you
  • )don't you✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३६English Language

Select the most appropriate option for the given blank. He was not brave ______ to fight the pressure of society like his brothers.

  • )enough✓ योग्य
  • )too
  • )much
  • )mostly

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३७English Language

Select the most appropriate option for the given blank. Deby's Christmas cookies ______ so good that I can't resist them.

  • )taste✓ योग्य
  • )is tasting
  • )tasted
  • )tasting

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३८English Language

Select the most appropriate option for the given blank. ______ first five children will play this game with their parents.

  • )A
  • )The✓ योग्य
  • )An
  • )No article

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४१English Language

Select the most appropriate option for the given blank. I will be having dinner when I ____ this work.

  • )will finish
  • )would finish
  • )finish✓ योग्य
  • )finishes

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४४English Language

Find the part of the sentence that has a grammatical error. In the ancient world, man wanted guidance from the gods on what he has to do.

  • )what he has to do✓ योग्य
  • )In the ancient world,
  • )the gods on
  • )man wanted guidance from

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४५English Language

Find the part of the sentence that has a grammatical error. Since the landed proprietors disposed churches and convents, it became possible for them to commit the sin of simony.

  • )Since the landed proprietors
  • )disposed churches and convents, it✓ योग्य
  • )became possible for them to
  • )commit the sin of simony

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७English Language

Select the most appropriate option for the given blank. I have not been feeling very well ____.

  • )latest
  • )later
  • )lately✓ योग्य
  • )latter

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५२General Knowledge

भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत? I. राज्यघटनेत मूलतः सहा मूलभूत अधिकार सूचीबद्ध केले गेले होते. II. 42 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे समानतेचा अधिकार वगळण्यात आला.

  • )I किंवा II पैकी एकही नाही✓ योग्य
  • )I आणि II दोन्ही
  • )फक्त I
  • )फक्त II

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५३General Knowledge

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, लक्षद्वीपचा साक्षरता दर किती आहे?

  • )95.85%
  • )91.85%✓ योग्य
  • )81.85%
  • )87.85%

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५४General Knowledge

खालीलपैकी कोणती प्रार्थना समाजाची तत्वे होती? I. मूर्तीपूजेला विरोध II. एकेश्वरवाद III. कर्मकांडाला विरोध

  • )फक्त I आणि II
  • )फक्त II आणि III
  • )I, II आणि III✓ योग्य
  • )फक्त I आणि III

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५५General Knowledge

फेब्रुवारी 2023 मध्ये बातम्यांमध्ये दिसून आलेला 'जादुई पिटारा' हा/ही एक ___________ आहे.

  • )नवीन स्वयंचलित अँटी-टँक क्षेपणास्त्र
  • )ऑनलाइन नागरी सेवक तक्रार पोर्टल
  • )खेळ-आधारित अध्ययन-शिक्षण संबंधित साहित्य✓ योग्य
  • )कृत्रिम बुद्धिमत्ता प्रेरित ड्रोन सिस्टम

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६General Knowledge

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, ___________ समुदायाच्या लोकसंख्येचा वाढीचा दर 15.5% आहे.

  • )ख्रिश्चन✓ योग्य
  • )मुसलमान
  • )हिंदू
  • )शीख

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

स्थायू अवस्थेचे, द्रव अवस्थेतून न जाता थेट वायू अवस्थेत होणारे रूपांतर म्हणजे ______ होय.

  • )बाष्पन
  • )विलयन
  • )बाष्पीकरण
  • )संप्लवन✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते?

  • )दीपक संधू
  • )ए.एन. तिवारी
  • )सुषमा सिंह
  • )वजाहत हबीबुल्लाह✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६०General Knowledge

कृष्णा नदीची लांबी सुमारे ________ किलोमीटर आहे.

  • )1600
  • )1800
  • )860
  • )1400✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६१General Knowledge

मुंगीच्या दंशात खालीलपैकी कोणते आम्ल असते?

  • )ऑक्झॅलिक आम्ल
  • )मिथेनोईक आम्ल✓ योग्य
  • )ॲसिटिक आम्ल
  • )टार्टरिक आम्ल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

मधीळ 42 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.

  • )1978
  • )1976✓ योग्य
  • )1970
  • )1972

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३General Knowledge

भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 3 हा ______ शी संबंधित आहे.

  • )पाकिस्तानातील काही स्थलांतरितांचे नागरिकत्वाचे अधिकार
  • )राज्यघटनेच्या प्रारंभाच्या वेळी नागरिकत्व
  • )संघराज्याचे नाव आणि प्रदेश
  • )नवीन राज्यांची निर्मिती आणि अस्तित्वातील राज्यांचे क्षेत्र, सीमा किंवा नाव यांतील बदल✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

______ 2022 मध्ये, वित्त मंत्रालयाने भारताच्या पहिल्या सॉव्हरिन ग्रीन बाँड फ्रेमवर्कला मान्यता दिली.

  • )ऑगस्ट
  • )नोव्हेंबर✓ योग्य
  • )ऑक्टोबर
  • )सप्टेंबर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

जून 2023 मध्ये, केंद्रीय ________ यांनी भारतातील काही राज्यांमधील उष्णतेच्या लाटांच्या स्थितीशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.

  • )कृषी मंत्री
  • )आरोग्य मंत्री✓ योग्य
  • )पर्यावरण मंत्री
  • )पृथ्वी विज्ञान मंत्री

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

ब्लीचिंग पावडरबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? I. तिची निर्मिती ही कोरड्या विरलेल्या चुन्यावर केलेल्या क्लोरीनच्या अभिक्रियेमुळे होते. II. ती पिण्याच्या पाणी जंतुमुक्त करण्यासाठी वापरली जाते.

  • )फक्त II
  • )I आणि II दोन्ही✓ योग्य
  • )फक्त I
  • )I किंवा II पैकी एकही नाही

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान, कोणत्या वर्षी सविनय कायदेभंग चळवळीची गती मंदावली?

  • )1928
  • )1938
  • )1934✓ योग्य
  • )1936

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

मार्च 2023 मध्ये, ______ हे आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले भारतीय राज्य बनले.

  • )राजस्थान✓ योग्य
  • )हरियाणा
  • )केरळ
  • )बिहार

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६९General Knowledge

पृथ्वीचे कवच हे तिच्या आकारमानाच्या ______ टक्के आहे.

  • )1✓ योग्य
  • )10
  • )5
  • )20

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७०General Knowledge

खालीलपैकी कोणते विधान पंडित रमाबाईंबाबत बरोबर आहे? I. त्या संस्कृतच्या उत्तम विद्वान होत्या. II. त्यांनी उच्चवर्णीय हिंदू स्त्रियांच्या दयनीय जीवनाबद्दल एक पुस्तक लिहिले होते.

  • )फक्त II
  • )फक्त I
  • )I आणि II दोन्ही✓ योग्य
  • )I किंवा II पैकी एकही नाही

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३General Knowledge

कॉम्प्युटर मेमरीच्या बाबतीत, 1 टेराबाइट = ________.

  • )1024 एक्झाबाईट
  • )1024 गीगाबाईट्स✓ योग्य
  • )1024 पेटाबाईट
  • )1024 मेगाबाईट्स

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

यांनी शारदा सदनाची स्थापना केली आणि अपंग मुले आणि महिलांची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली.

  • )ताराबाई शिंदे
  • )सावित्रीबाई फुले
  • )रमाबाई रानडे
  • )पंडिता रमाबाई✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

12 ऑगस्ट 1765 रोजी, मुघल सम्राटाने ईस्ट इंडिया कंपनीला ______ म्हणून नियुक्त केले.

  • )बॉम्बेचा दिवाण
  • )बंगालचा दिवाण✓ योग्य
  • )पंजाबचा दिवाण
  • )मद्रासचा दिवाण

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६General Intelligence

एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायांतून ती मालिका पूर्ण करणारा पर्याय निवडा. PQ, LZ, HI, DR, ?

  • )ZM
  • )ZT
  • )ZA✓ योग्य
  • )ZS

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

खालील प्रश्नात, अक्षरांचे दोन गट दिलेले आहेत. प्रत्येक गटातील अक्षरे काही तर्क/नियम/संबंधाने त्याच गटातील अक्षरांशी संबंधित आहेत. दिलेल्या पर्यायांतून, समान तर्क/नियम/संबंध असणारा अक्षरांचा समूह निवडा. (FVZ, EUX, DTV), (RZG, QYE, PXC)

  • )(BJN, AIM, ZHK)
  • )(OXP, NWM, MVK)
  • )(OPT, NOR, MNP)✓ योग्य
  • )(TVJ, SUH, RTG)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायांतून ती मालिका पूर्ण करणारा पर्याय निवडा. BMRQ, IRAB, PWJM, WBSX, ?

  • )DMRQ
  • )DTBI
  • )DGBI✓ योग्य
  • )DHNM

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९General Intelligence

खालील प्रश्नात काही विधाने आणि त्या विधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. विधानात दिलेली माहिती, जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी भिन्न असल्याचे दिसत असले तरी, सत्य आहे असे गृहीत धरा. दिलेले सगळे निष्कर्ष वाचा आणि त्यानंतर दिलेल्यांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत, ते ठरवा. विधाने: I. एकही B हा A नाही. II. काही C हे B आहेत. निष्कर्ष: I. काही C हे A नाहीत. II. सर्व A हे C आहेत.

  • )I आणि II दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत.
  • )केवळ निष्कर्ष I तर्कसंगत आहे✓ योग्य
  • )केवळ निष्कर्ष II तर्कसंगत आहे
  • )एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

खालील प्रश्नात काही विधाने आणि त्या विधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. विधानात दिलेली माहिती, जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी भिन्न असले तरी, सत्य आहे असे गृहीत धरा. दिलेले सगळे निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत, ते ठरवा. विधाने: I. सर्व नकाशे लाल आहेत. II. काही गुलाबी लाल आहेत. निष्कर्ष: I. काही लाल नकाशे आहेत. II. सर्व गुलाबी नकाशे आहेत. III. एकही नकाशा गुलाबी नाही.

  • )केवळ निष्कर्ष III तर्कसंगत आहे
  • )केवळ निष्कर्ष I तर्कसंगत आहे✓ योग्य
  • )एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही.
  • )केवळ निष्कर्ष II तर्कसंगत आहे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

ज्याप्रमाणे पहिली अक्षर-जोडी ही दुसऱ्या अक्षर-जोडीशी संबंधित आहे आणि तिसरी अक्षर-जोडी ही चौथ्या अक्षर-जोडीशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे समान संबंध असणारी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जोडी निवडा (पाचवी अक्षरजोडी : सहावी अक्षरजोडी). GE : HH :: RT : SW :: ?

  • )SF : WJ
  • )IA : JD✓ योग्य
  • )UG : VK
  • )CM : GQ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३General Intelligence

खालील प्रश्नात, दिलेल्या पर्यायातून संबंधित अक्षरे निवडा. UH : RE :: TG : ?

  • )RC
  • )QD✓ योग्य
  • )QC
  • )US

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८४General Intelligence

एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायांतून ती मालिका पूर्ण करणारा पर्याय निवडा. OLQ, RQR, UVS, XAT, ?

  • )AFU✓ योग्य
  • )UFA
  • )AEM
  • )MRQ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८General Intelligence

खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. 840, 765, 860, 745, 880, 725, ?

  • )900✓ योग्य
  • )940
  • )910
  • )920

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

एका वर्गातील मुले आणि मुलींच्या संख्येचे गुणोत्तर 10 : 11 आहे. वर्गातील मुले आणि मुलींचे सरासरी वजन अनुक्रमे 21 kg आणि 84 kg आहे. सर्व मुला-मुलींचे मिळून सरासरी वजन किती आहे?

  • )65 kg
  • )62 kg
  • )59 kg
  • )54 kg✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligence

रमेश, सुरेश आणि महेश यांनी मिळून एक काम पूर्ण केले. रमेश आणि सुरेश यांनी मिळून 35 टक्के काम पूर्ण केले आणि सुरेश आणि महेश यांनी मिळून 75 टक्के काम पूर्ण केले. तिघांपैकी कोण सर्वाधिक कार्यक्षम आहे?

  • )सुरेश
  • )रमेश
  • )सर्वजण समान प्रमाणात कार्यक्षम आहेत
  • )महेश✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

L आणि M हे दोन नळ अनुक्रमे 20 तासांत आणि 24 तासांत एक टाकी भरू शकतात. जर पहाटे 4 वाजता दोन्ही नळ एकत्र उघडले, तर बरोबर दुपारी 4 वाजता टाकी पूर्णपणे भरण्यासाठी नळ L किती वाजता बंद केला पाहिजे?

  • )दुपारी 4 : 00 वाजता
  • )दुपारी 2 : 00 वाजता✓ योग्य
  • )दुपारी 1 : 00 वाजता
  • )दुपारी 3 : 00 वाजता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

एक दूध विक्रेता 40 लिटर दूध हे 30 रुपये प्रति लिटर दराने विकत घेतो आणि त्यात 5 लिटर पाणी मिसळतो (पाणी विनामूल्य आहे). हे मिश्रण त्याने रु. 36 प्रति लिटर दराने विकले, तर नफ्याची टक्केवारी किती आहे?

  • )35 टक्के✓ योग्य
  • )25 टक्के
  • )33.33 टक्के
  • )30 टक्के

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

एक स्कूटर P ते Q पर्यंत 40 km/hr वेगाने आणि Q ते P पर्यंत 30 km/hr वेगाने प्रवास करते. संपूर्ण प्रवासात स्कूटरचा सरासरी वेग किती आहे?

  • )240/7 km/hr✓ योग्य
  • )35 km/hr
  • )40 km/hr
  • )260/7 km/hr

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

एका रकमेवर 2 वर्षांसाठी मिळणारे चक्रवाढ व्याज (वार्षिक चक्रवाढ) रु.6600 आहे. जर व्याजाचा वार्षिक दर 20 टक्के असेल, तर ती रक्कम किती आहे?

  • )रु.12500
  • )रु.15000✓ योग्य
  • )रु.12000
  • )रु.17000

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

एका सायकलच्या चाकाचा व्यास 5.6 cm आहे. एका सायकलस्वाराला 23.1 km/hr वेगाने गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी 24 मिनिटे लागतात. प्रवासदरम्यान चाकाच्या किती फेऱ्या होतील?

  • )52500✓ योग्य
  • )67500
  • )60500
  • )43500

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७General Intelligence

1 5x7 + 1 7x9 + 1 9x11 + ... + 1 89x91 चे मूल्य किती आहे?

  • )86 455
  • )43 455✓ योग्य
  • )43 910
  • )41 910

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १००General Intelligence

एक विशिष्ट रक्कम ही चक्रवाढ व्याजाने 7 वर्षांत, तिच्या स्वतः:च्या 3 पट होत असेल, तर किती वर्षांत ती तिच्या स्वतः:च्या 9 पट होईल?

  • )14 वर्षे✓ योग्य
  • )15 वर्षे
  • )18 वर्षे
  • )16 वर्षे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-26aug-shift2