स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 21 Aug, Shift 3 · ९७ प्रश्न · रद्द ४ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून अचूक वाक्य बनवा. (शाळा) घरी आलो की बाबा नेहमी (अभ्यास) शहानिशा करतात.

  • )शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची शहानिशा करतात.✓ योग्य
  • )शाळा घरी आलो की बाबा नेहमी अभ्यास शहानिशा करतात.
  • )शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाचा शहानिशा करतात.
  • )शाळेला घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची शहानिशा करतात.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

योग्य जोड्या लावा. 'अ' गट a. आसक्ती b. ऱ्हस्व c. सह्य d. कोमल 'ब' गट i. असह्य ii. अनासक्ती iii. दीर्घ iv. गुरु v. कठोर

  • )a-i, b-iii, c-iv, d-ii
  • )a-ii, b-iv, c-i, d-v
  • )a-iii, b-ii, c-i, d-v
  • )a-ii, b-iii, c-i, d-v✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे.' - अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

  • )जवळ✓ योग्य
  • )सौम्य
  • )लांब
  • )परका

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'जनात एक मनात एक' या म्हणीचा वाक्यात उपयोग करा.

  • )सुशील हा जनात एक मनात एक असा अभ्यास करतो.
  • )जनात एक मनात एक करून भावे काका तीर्थयात्रा करतात.
  • )लोकांना जाऊन उपदेश करणे म्हणजे जनात एक मनात एक
  • )जनाबाई सर्वांसमोर आपल्या सुनेचे तोंड भरून कौतुक करते; घरात मात्र पावलोपावली खार खाऊन असते. म्हणतात ना जनात एक मनात एक.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

योग्य जोड्या लावा. 'अ' गट a. ठोकर लागणे b. गाळण उडणे c. दृष्ट लागणे d. जगाचा निरोप घेणे 'ब' गट i. नजर लागणे ii. अद्दल घडणे iii. मरण येणे iv. नमस्कार करणे v. घाबरगुंडी उडणे

  • )a-iii, b-iv, c-i, d-ii
  • )a-ii, b-v, c-i, d-iii✓ योग्य
  • )a-i, b-v, c-iii, d-ii
  • )a-ii, b-v, c-i, d-iv

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'कुणालचे अस्थिपंजर रूप पाहून मेघा अवाक झाली.' - अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा.

  • )निरक्षर मनुष्य
  • )अत्यंत काटकूळी व्यक्ती✓ योग्य
  • )अर्धवट ज्ञान
  • )निरुपयोगी व्यक्ती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

सामासिक शब्दाचा विग्रह 'भोजनभाऊ'

  • )भोजन व भाऊ
  • )भोजनापुरता भाऊ✓ योग्य
  • )भोजन आणि भाऊ
  • )भोजनाचा भाऊ

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

खालील शब्दसमूह वापरून योग्य वाक्य तयार करा. अ. कोरली गेली आहे आ. आम्हां भावंडांच्या मनात इ. बाबांनी सांगितलेली ई. हृदय आठवण

  • )बाबांनी सांगितलेली हृदय आठवण आम्हां भावंडांच्या मनात कोरली गेली आहे.✓ योग्य
  • )बाबांनी सांगितलेली कोरली गेली आहे हृदय आठवण आम्हां भावंडांच्या मनात.
  • )कोरली गेली आहे आम्हां भावंडांच्या मनात बाबांनी सांगितलेली हृदय आठवण.
  • )हृदय आठवण बाबांनी सांगितलेली कोरली गेली आहे आम्हां भावंडांच्या मनात.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही?

  • )चांगदेवपासष्टी
  • )ज्ञानेश्वरी
  • )दासबोध✓ योग्य
  • )अमृतानुभव

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ११Marathi Language

'त्याने शंकराला प्रसन्न केले.' - या वाक्याचे समापन कर्मणी प्रयोगात रूपांतर करा.

  • )तो शंकराला प्रसन्न करतो.
  • )त्याचे शंकराला प्रसन्न करून झाले.✓ योग्य
  • )तो शंकराला प्रसन्न करीन.
  • )तो शंकराला प्रसन्न करत आहे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Marathi Language

खालीलपैकी कोणता ग्रंथ महानुभाव पंथीयांच्या सात ग्रंथांपैकी नाही?

  • )वच्छा हरण
  • )सह्याद्रीवर्णन
  • )शिशुपालवध
  • )भावार्थरामायण✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

खाली समानार्थी वाक्यप्रचारांच्या जोड्या आहेत, त्यांतील चुकीचा पर्याय शोधा.

  • )गवगवा होणे - टिमकी वाजवणे✓ योग्य
  • )फडशा पाडणे - फस्त करणे
  • )चेहरा काळवंडणे - चेहरा उतरणे
  • )अर्धचंद्र देणे - गचांडी देणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

खालीलपैकी कोणते समासाचे वैशिष्ट्य नाही?

  • )दोन शब्द एकत्रित येताना त्यांतील वर्णांची कधीच संधी होत नाही.✓ योग्य
  • )समास होताना दोन शब्दांतील विभक्तिप्रत्यय किंवा दोन शब्दांना जोडणारे शब्द लोप पावतात.
  • )एकत्रित आलेल्या शब्दसंयोगातून नवीन अर्थाचा एक शब्द तयार होतो.
  • )समासामध्ये दोन किंवा अधिक शब्द एकत्रित येतात.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

'काशीत मल्हारी महात्म्य' - म्हणीचा अर्थ कोणता आहे?

  • )वाराणसीत मल्हारीची पूजा करणे
  • )नको तेथे नको ती गोष्ट करणे✓ योग्य
  • )काशीत खंडोबाचे गुणगान गाणे
  • )संपत्तीचे प्रदर्शन करणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १८Marathi Language

कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामभट्टाची तट्टाणी' या म्हणीची समानार्थी म्हण निवडा.

  • )नाव मोठं लक्षण खोटं
  • )आधीच मर्कट त्यात मद्य प्यायलेला
  • )कोठे राजा भोज कोठे गंगू तेली✓ योग्य
  • )यथा राजा तथा प्रजा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Marathi Language

आई व तिच्या बाळाच्या प्रेममय नात्याचा ऋणानुबंध अत्यंत घट्ट असतो. ती कुठेही असली तरी बाळाचे आचरण, त्याची प्रत्येक हालचाल याकडे बारकाईने लक्ष देऊन असते. म्हणूनच म्हणतात '____________' रिकाम्या जागी योग्य म्हण लिहा.

  • )चित्त नाही थारी, बावन तीर्थ करी
  • )घार फिरे आकाशी, तिचे लक्ष पिल्लांपाशी✓ योग्य
  • )कुडास कान, ठेवी ध्यान
  • )घरोघरी मातीच्या चुली

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Languageआयोगाने रद्द

खालीलपैकी कोणती वाक्यरचना व्याकरणाच्या नियमांनुसार नाही?

  • )वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणा जिंकला.
  • )वयाच्या जिंकला सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणा.
  • )वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणा जिंकला सोळाव्या वयाच्या.
  • )तोरणा छत्रपती शिवरायांनी जिंकला वर्षी सोळाव्या वयाच्या.

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न २२Marathi Language

‘शिवाजी महाराज सुरत लुटतात.’ - प्रयोग ओळखा.

  • )कर्तरी प्रयोग✓ योग्य
  • )कर्मणी प्रयोग
  • )भावे प्रयोग
  • )संकर प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

'ग्रामगीता' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

  • )संत तुकाराम
  • )लोकमान्य टिळक
  • )रामानुजाचार्य
  • )संत तुकडोजी महाराज✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २६English Language

Select the most appropriate question tag to fill in the blank. We're having a great time, _?

  • )aren't we✓ योग्य
  • )won't we
  • )couldn't we
  • )don't we

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २७English Languageआयोगाने रद्द

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. My teacher told me that she was regularly monitor my progress in academics.

  • )monitor my progress
  • )in academics
  • )My teacher told me
  • )that she was regularly

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न २८English Language

Select the most appropriate ANTONYM of the underlined word. His boss accused him of swindling the money.

  • )defamed
  • )dedicated
  • )deceased
  • )defended✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३१English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Barking dogs seldom bite.

  • )Little persons are commonly passionate.
  • )People who threaten a great deal, seldom put their threats in practice.✓ योग्य
  • )Persons of the same character generally associated together.
  • )People who are reduced to extreme circumstances will resort to most unlikely means.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४English Language

Select the sentence with the correct punctuation to convey the right meaning: The astrologer said you were left for dead. Am I right?

  • )The astrologer said, You were left for dead. Am I right?
  • )The astrologer said “You were left for dead. Am I right?”
  • )The astrologer said, “You were left for dead. Am I right?”✓ योग्य
  • )The astrologer said; “You were left for dead”. Am I right?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५English Language

Select the most appropriate option to fill in the blank. But the law can only protect us _______ material attack.

  • )in
  • )against✓ योग्य
  • )with
  • )on

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३६English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. His father decided / to divide his property / among his two sons / before leaving the country.

  • )before leaving the country.
  • )His father decided
  • )among his two sons✓ योग्य
  • )to divide his property

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४१English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. The renowned orator wrote the speech.

  • )The speech was being written by the renowned orator.
  • )The renowned orator was writing the speech.
  • )The speech had been written by the renowned orator.
  • )The speech was written by the renowned orator.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४English Languageआयोगाने रद्द

Select the most appropriate option to fill in the blank. The athlete ______ the world record in the 100-metre dash.

  • )break
  • )breaking
  • )broke
  • )breaks

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ४५English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Still waters run deep.

  • )It is said about a thing that looks small, but great in quality.
  • )It is said about a person who says little, but who might in fact know a lot.✓ योग्य
  • )It is said about a water repository that is lengthy in area.
  • )It is said about a person who says more, and who might in fact know a lot.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४७English Language

Select the most appropriate option to substitute the underlined segment in the given sentence. As climate change became an urgent concern, governments and organisations worldwide are intensifying efforts to mitigate its effects.

  • )has became an urgent
  • )becomes an urgent✓ योग्य
  • )becoming an urgent
  • )are becoming an urgent

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९English Languageआयोगाने रद्द

Select the option that expresses the given sentence in passive voice. Suraj and his sister Namrata brought these fresh flowers.

  • )These fresh flowers were been brought by Suraj and his sister Namrata.
  • )These fresh flowers are been brought by Suraj and his sister Namrata.
  • )These fresh flowers had been brought by Suraj and his sister Namrata.
  • )These fresh flowers have been brought by Suraj and his sister Namrata.

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ५१General Knowledge

फेब्रुवारी 2023 मध्ये, कोणत्या उच्च न्यायालयाने आपल्या नुकत्याच दिलेल्या निर्णयांपैकी दोन निर्णयांचे स्थानिक भाषेमध्ये प्रकाशन केले?

  • )कर्नाटक
  • )आसाम
  • )तामिळनाडू
  • )केरळ✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२General Knowledge

खालीलपैकी कोणती चुकीची जुळणी आहे?

  • )अनुच्छेद 14 - कायद्यापुढे समानता
  • )अनुच्छेद 20 - सेनाविषयक आणि विद्याविषयक वगळता किताब नष्ट करणे✓ योग्य
  • )अनुच्छेद 16 - सार्वजनिक सेवायोजनांच्या बाबतीत समान संधी
  • )अनुच्छेद 17 - अस्पृश्यता निर्मूलन आणि तिच्या प्रथेवर बंदी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

जेव्हा उंचपणासाठी विषमयुग्मनजी असलेलेली एखादी वनस्पती स्वयंफलन घडविते, तेव्हा F2 पिढीमध्ये उंच आणि बुटक्या अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पती अस्तित्वात असतात, तेव्हा कोणते तत्त्व सोदाहरण स्पष्ट होते?

  • )फलन
  • )उत्परिवर्तन
  • )विलगनीकरण✓ योग्य
  • )प्रभाविता

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP India) चा पहिला युथ चॅम्पियन कोण बनला?

  • )प्राजक्ता कोळी✓ योग्य
  • )सुष्मिता सेन
  • )आयुष्मान खुराणा
  • )युवराज सिंग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५५General Knowledge

खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्त्व क्रांतिकारी विचारधारेतून गांधी तत्त्वज्ञानाकडे वळले होते आणि त्यांना सेनापती बापट या नावाने ओळखले जात असे?

  • )गणेश बापट
  • )घनश्याम बापट
  • )पांडुरंग महादेव बापट✓ योग्य
  • )माधव बापट

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६General Knowledge

खालीलपैकी कोणते आंतरिय विभाजी ऊतीचे विशिष्ट कार्य आहे?

  • )वनस्पतीची जाडी वाढवणे
  • )वनस्पतीचे आकारमान कमी करणे
  • )खोडाची रुंदी कमी करणे
  • )खोडाची लांबी वाढवणे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या अनुसूचीत मुख्य माहिती आयुक्तांनी घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञापत्राचे आवेदन नमूद केले आहे?

  • )पहिली अनुसूची✓ योग्य
  • )तिसरी अनुसूची
  • )दुसरी अनुसूची
  • )चौथी अनुसूची

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५८General Knowledge

समितीच्या शिफारशीवर भारताच्या राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश आहे?

  • )पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताच्या राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित केंद्रीय मंत्री
  • )पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री✓ योग्य
  • )पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश
  • )पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सीव्हीसी (CVC)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

मूलभूत कर्तव्यांमध्ये खालीलपैकी काय नमूद केलेले नाही?

  • )स्मारकशिल्पे आणि सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे.✓ योग्य
  • )देशाचे रक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
  • )आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून ते जतन करणे
  • )राज्यघटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श आणि संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील अनुसूचित जमातीच्या (ST) लोकसंख्येचा साक्षरता दर किती आहे?

  • )45.5%
  • )59.0%✓ योग्य
  • )64.8%
  • )72.4%

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

Which of the following nutrients is necessary for a healthy immune system and the strength of connective tissues?

  • )Vitamin B2
  • )Vitamin C✓ योग्य
  • )Vitamin B6
  • )Zinc

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६३General Knowledge

5 नोव्हेंबर 2022 रोजी जागतिक सुनामी जागरूकता दिवस साजरा केला गेला, ज्याचा विषय ______ होता.

  • )विकसनशील देशांत सुनामीबाबतची जागरूकता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करणे
  • )सेंदाई सेव्हन (Sendai Seven) मोहीम
  • )प्रत्येक सुनामीपूर्वी पूर्वचेतावणी आणि प्रारंभिक कृती✓ योग्य
  • )आर्थिक नुकसान कमी करणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

वेबसाईट ॲड्रेसमध्ये वापरल्या जाणाऱ्या www चे पूर्ण रूप काय आहे?

  • )वर्ल्ड वाईड वर्ड (World Wide Word)
  • )वर्ल्ड वाईड वर्म (World Wide Worm)
  • )वर्ल्ड वाईड वेब (World Wide Web)✓ योग्य
  • )वर्ल्ड वाईड विंग्ज (World Wide Wings)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

भारतीय समाजातील विविध घटकांसाठी महात्मा गांधींनी केलेल्या अकरा मागण्या या खालीलपैकी कोणत्या भारतीय व्हाईसरॉयकडे केल्या होत्या?

  • )लॉर्ड माउंटबॅटन
  • )लॉर्ड कॅनिंग
  • )लॉर्ड रिपन
  • )लॉर्ड आयर्विन✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

In January 2023, Union Government had approved PMGKAY, the new integrated food security scheme. What does A stand for in PMGKAY?

  • )Ajivika
  • )Ann✓ योग्य
  • )Antodaya
  • )Anndata

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६८General Knowledge

स्वदेशी उत्पादने आणि कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र भारतात उत्पादक आणि ग्राहक यांच्यात निकटवर्ती संबंध स्थापन करण्याच्या हेतूने, ______ यांच्याद्वारे बाय इंडियन लीग (Buy Indian League) ची स्थापना करण्यात आली होती.

  • )खुदीराम बोस
  • )मातंगिनी हाजरा
  • )सुभाषचंद्र बोस
  • )आचार्य प्रफुल्लचंद्र राय✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६९General Knowledge

अधिकारपृच्छा लेखाचे उद्दिष्ट काय आहे?

  • )व्यक्तीचे निरपराधीत्व ठरविणे
  • )एखाद्या व्यक्तीस सार्वजनिक कार्यालयातून काढून टाकणे
  • )एखादी व्यक्ती कोणत्या अधिकाराने सार्वजनिक कार्यालयावर दावा करत आहे याची चौकशी करणे✓ योग्य
  • )व्यक्तीच्या गोपनीयतेची तपासणी करणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

1756 साली इंग्रजांच्या कारखान्यावर ताबा मिळवण्यासाठी सिराज-उद-दौलाने कलकत्त्याकडे केलेले कूच हे खालीलपैकी कोणत्या लढाईचे प्रमुख कारण बनले?

  • )प्लासीची लढाई✓ योग्य
  • )बेदराची (Bedara) लढाई
  • )बक्सारची लढाई
  • )पानिपतची तिसरी लढाई

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१General Knowledge

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने भूदान चळवळ सुरू केली होती?

  • )बाबा आमटे
  • )विनोबा भावे✓ योग्य
  • )वीरेश लिंगम
  • )धोंडो केशव कर्वे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७२General Knowledge

मार्च 2023 मध्ये, आठव्या राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार सोहळ्यात खालीलपैकी कोणाला या वर्षातील सर्वोत्कृष्ट हौशी छायाचित्रकार (Amateur Photographer of the Year) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

  • )सुदिप्तो दास
  • )ससी कुमार रामचंद्रन
  • )सिप्रा दास
  • )अरुण साहा✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३General Knowledge

खालीलपैकी कोणत्या खेळाडूला मार्च 2023 मध्ये, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमेन्स प्राईज -2022 ने सन्मानित करण्यात आले होते?

  • )एमसी. मेरी कोम
  • )सायना नेहवाल
  • )मीराबाई चानू✓ योग्य
  • )पी. व्ही. सिंधू

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

भारतातील गुणवत्तेवर आधारित आधुनिक नागरी सेवेची संकल्पना ____ मध्ये प्रस्तावित केली गेली.

  • )1855
  • )1858
  • )1851
  • )1854✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

ऑगस्ट 2022 मध्ये, मेघालय सरकारने खालीलपैकी कशाशी संबंधित असलेली रूरल बॅकयार्ड (Rural Backyard) योजना प्रारंभ केली?

  • )वराहपालन✓ योग्य
  • )शेणखत
  • )मेंढीपालन
  • )रेशीमकिड्याचे पालन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६General Intelligence

A, B आणि C या तीन तोट्या एक टाकीला 5 तासांत पूर्ण भरतात. तोटी C च्या प्रवाहाचा वेग हा B च्या दुप्पट आहे आणि B च्या प्रवाहाचा वेग हा A च्या दुप्पट आहे. फक्त A तोटी उघडल्यास टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?

  • )20 तास
  • )25 तास
  • )40 तास
  • )35 तास✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

200 मीटर अंतरावर असलेल्या एका पोलिसाला पाहून, एक चोर 8 km/h वेगाने पळू लागतो. पोलीस 9 km/h वेगाने त्याचा ताबडतोब पाठलाग करतो आणि चोराला पकडतो. चोर किती अंतर धावतो?

  • )1600 मीटर✓ योग्य
  • )2000 मीटर
  • )1000 मीटर
  • )1200 मीटर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७९General Intelligence

दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीचा ज्याप्रमाणे एकमेकांशी संबंध आहे त्याचप्रमाणे समान संबंध असलेला अक्षर-समूह पर्यायातून निवडा. GKH : LPM NEP : SJU

  • )YHN : DNT
  • )MTR : RYw✓ योग्य
  • )IKE : OQJ
  • )UJM : APR

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

₹275 ही छापील किंमत असलेली एक वस्तू 5% सवलतीने विकली जाते. विक्रेत्याला तरीदेखील 4.5% नफा होतो. तर त्यासाठी त्याने किती देय दिले होते?

  • )₹200
  • )₹250✓ योग्य
  • )₹225
  • )₹125

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१General Intelligence

डेव्हिडचे वजन रॉबिनपेक्षा 4.15 kg ने कमी आहे. डेव्हिडचे वजन 58.32 kg असल्यास, रॉबिनचे वजन शोधा.

  • )62.67 kg
  • )62.57 kg
  • )62.37 kg
  • )62.47 kg✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वेगाने वाढते. जर 2 वर्षांपूर्वी तेथील लोकसंख्या 10,000 होती, तर सध्याची लोकसंख्या किती आहे?

  • )12100✓ योग्य
  • )11000
  • )12000
  • )12400

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८३General Intelligence

जर 'A' चा अर्थ 'x' आहे, 'B' चा अर्थ '÷' आहे, 'C' चा अर्थ '-' आणि 'D' चा अर्थ '+' आहे, तर खालीलपैकी कशाची परिणामी संख्या 215 असेल?

  • )55 A 3 C 40 B 4 D 60✓ योग्य
  • )55 D 3 B 40 A 4 C 60
  • )55 A 3 C 40 D 4 B 60
  • )55 C 3 A 40 B 4 D 60

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

सोडवा : 5 × 4 ÷ 2 + 2.

  • )5
  • )6
  • )10
  • )12✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८६General Intelligence

अक्षरगटांच्या खालील चार जोड्यांपैकी तीन जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी अक्षरगट जोडी निवडा.

  • )OQ-KM
  • )CE-YA
  • )KM-GI
  • )WY-UV✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८७General Intelligence

एका वस्तूची मूळ किंमत ही छापील किमतीच्या 64% आहे. 4% सवलत दिल्यानंतर होणाऱ्या नफ्याच्या टक्केवारीची गणना करा.

  • )40%
  • )45%
  • )60%
  • )50%✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 5, 20, 45, 80, 125, ?

  • )180✓ योग्य
  • )195
  • )185
  • )190

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? LMO, HNI, DOC, ZPW, ?

  • )VQQ✓ योग्य
  • )NQQ
  • )NQP
  • )MQP

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligence

एका रकमेची सरळव्याजाच्या विशिष्ट वार्षिक दराने 2 वर्षांसाठी गुंतवणूक केली. सध्याच्या दरापेक्षा वार्षिक 2% जास्त दराने गुंतवणूक केली असती, तर 2 वर्षांत जमा होणारे सरळव्याज ₹240 अधिक झाले असते. तर गुंतवलेली रक्कम शोधा.

  • )₹24,000
  • )₹6,000✓ योग्य
  • )₹8,000
  • )₹16,000

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. LPN : QUS CJK : HOP

  • )HCF : MGJ
  • )AFK : FKO
  • )ERU : JVY
  • )GMS : LRX✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

अक्षरे, चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. (डावे) S A ! X @ D # E $ R % F ^ V & B * G T U > O < I M L (उजवे) येथे अशी किती चिन्हे आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर आहे परंतु ताबडतोब नंतर एक स्वर नाही?

  • )चार
  • )तीन
  • )दोन✓ योग्य
  • )एक

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: सर्व खांब, टेबले आहेत. काही टेबले, पेन आहेत. सर्व पेन डोअरमॅट आहेत. निष्कर्ष 1: काही डोअरमॅट, टेबले आहेत. निष्कर्ष 2: काही टेबले, खांब आहेत.

  • )केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे.
  • )किंवा 2 पैकी एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही.
  • )किंवा 2 हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत.✓ योग्य
  • )केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

₹62/kg च्या चहाला ₹72/kg च्या चहामध्ये किती प्रमाणात मिसळला गेला पाहिजे, जेणेकरून मिश्रणाची किंमत ₹64.50/kg असेल?

  • )1 : 2
  • )2 : 1
  • )4 : 1
  • )3 : 1✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? NO2, QR6, TU12, ?

  • )WX20✓ योग्य
  • )VW20
  • )WV25
  • )XY22

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

अक्षरगटांच्या खालील चार जोड्यांपैकी तीन जोड्या एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी अक्षरगट जोडी निवडा.

  • )CX-YB
  • )OK-JR✓ योग्य
  • )MN-IR
  • )RI-NM

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९७General Intelligence

इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? R, Q, O, L, H, ?

  • )A
  • )C✓ योग्य
  • )G
  • )F

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९८General Intelligence

एका व्यक्ती 20 m/min या वेगाने 100 मिनिटे प्रवास करतो आणि 70 m/min या वेगाने 50 मिनिटे प्रवास करतो. तर त्याचा सरासरी वेग किती आहे?

  • )35 m/min
  • )70 3 m/min
  • )110 3 m/min✓ योग्य
  • )25 m/min

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

A हा दिवसाचे 8 तास काम करून, एका कामाला 12 दिवसांत पूर्ण करू शकतो. B हा त्याच कामाला, दिवसाचे 10 तास काम करून 8 दिवसांत पूर्ण करू शकतो. जर A आणि B या दोघांनी मिळून दिवसाचे 8 तास काम केले, तर ते किती दिवसांत त्या कामाला पूर्ण करू शकतील?

  • )5 5 11✓ योग्य
  • )5 6 11
  • )6 5 11
  • )6 6 11

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याच आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, निष्कर्षांपैकी कोणता/ते दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने : सर्व पक्षी, कुत्री आहेत. काही कुत्री, हत्ती आहेत. काही हत्ती, प्राणी आहेत. निष्कर्ष (I): सर्व हत्ती, पक्षी आहेत. निष्कर्ष (II): काही प्राणी, कुत्री आहेत.

  • )केवळ निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत नाहीत.
  • )निष्कर्ष (I) किंवा निष्कर्ष (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.✓ योग्य
  • )केवळ निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-21aug-shift3