स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 21 Aug, Shift 2 · ९२ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'पौराणिक चित्रपटाच्या सेटवर अभिनय करताना प्रणवने हे औट घटकेचे राज्य मनापासून जगून घेतले.' - या वाक्यातील 'औट घटकेचे राज्य' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे?

  • )उत्कृष्ट अभिनय करणे
  • )कायम टिकणारे ऐश्वर्य
  • )मायावी शक्ती
  • )थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'कबीर सदोदित जप करत असतो.' - अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?

  • )नियमित
  • )निरंतर
  • )पीछेहाट
  • )क्वचित✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'वडिलांनी मुलाला शाळेत घातले.' - प्रयोग ओळखा.

  • )शक्य कर्मणी
  • )शक्य भावे
  • )कर्तुर्कर्म भावे
  • )कर्म-भाव संकर✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'हौशी' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

  • )कपटी
  • )हताश
  • )रसिक
  • )अरसिक✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'तृप्तीने दोन बाहुल्यांची एका दिवसात वाट लावली.' - वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे?

  • )हाकलून देणे
  • )खाऊन टाकणे
  • )आपल्या वाटेतून काढून टाकणे
  • )तोडून टाकणे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ११Marathi Language

‘(शेजार) गावात एक बलाढ्य सावकार मरण (पावणे) बातमी ऐकून वामनने ताडकन उडी मारली.’ कंसातील शब्दांचे योग्य रूप बनवून योग्य वाक्य तयार करा.

  • )शेजारचा गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून वामनने ताडकन उडी मारली.
  • )शेजारची गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्या बातमी ऐकून वामनने ताडकन उडी मारली.
  • )शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून वामनने ताडकन उडी मारली.✓ योग्य
  • )शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावणे बातमी ऐकून वामनने ताडकन उडी मारली.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Marathi Languageआयोगाने रद्द

‘तो पत्र लिहितो.’ - या वाक्याचे समापन कर्तरी प्रयोगात रूपांतर करा.

  • )त्याने पत्र लिहावे
  • )त्याचे पत्र लिहून झाले.
  • )तो पत्र लिहील.
  • )तो पत्र लिहित आहे.

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न १४Marathi Language

'घरकोंबडा' म्हणजे ___________ होय.

  • )घरात बसून राहणारा✓ योग्य
  • )घराचा कोंबडा
  • )पहाटे उठून पूजा करणारा
  • )अत्यंत जवळची व्यक्ती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे?

  • )श्लील x अश्लील
  • )सध्या x पूर्वी
  • )विषम x सम
  • )अनुपम x अनुनय✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

खाली वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग केलेला आहे त्यांमधील चुकीचा पर्याय ओळखा.

  • )आज पाली भाषा लोप पावण्याच्या उंबरठ्यावर आहे.
  • )आपला मुलगा अट्टल चोर आहे असे कळताच दगडाला पाझर फुटला.✓ योग्य
  • )गावाच्या हितासाठी दोन्ही गटांनी आपापसातील मतभेदांना मूठमाती दिली.
  • )तुषारने लावालावी केल्याने आरती व भारतीमध्ये भांडण झाले.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

सामासिक शब्दांचा खाली विग्रह केलेला आहे त्यांतील अयोग्य पर्याय कोणता आहे?

  • )पंकजेरुह - चिखलात माखलेला✓ योग्य
  • )कर्तरीप्रयोग - कर्त्याचा प्रयोग
  • )कुंभकार - कुंभ करणारा
  • )कर्मणीप्रयोग - कर्मणीचा प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २०Marathi Language

'समाजातीत' या शब्दाचा अर्थ कोणता आहे?

  • )ज्याला समाजाची जरूर आहे असा
  • )दोन समाजाला जोडणारा
  • )ज्याला समाजाची जरूर नाही असा✓ योग्य
  • )समाजातील महत्त्वाचा घटक

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २१Marathi Language

तेजीत चालणाऱ्या व्यवसायाचे दिवाळे निघाल्याने जवळचे नातेवाईकही पंकजला टाळू लागले म्हणतात ना, _____

  • )अपमानाची पोळी सर्वांग जाळी
  • )जगाच्या हाती दोन धोंडे
  • )असतील शिते तर जमतील भुते
  • )घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

लेखन नियमांनुसार अचूक वाक्यरचना ओळखा.

  • )थकला होता तो खूप आता.
  • )एकदा राजा आमच्या शाळेत आला.✓ योग्य
  • )सांगू लागला प्रत्येकजण आपली आठवण.
  • )केला मी पायाला स्पर्श नमस्कार करून.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

'गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य.' - म्हणीचा अर्थ कोणता आहे?

  • )गाढव शेतात चरले तर पाप लागते.
  • )गाढवाला शेतात जाऊ देऊ नये.
  • )दुर्जनावर उपकार केला तरी काही उपयोग नसतो.✓ योग्य
  • )निरुद्योगी माणसांपासून दूर राहावे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६English Language

Select the most appropriate option to fill in the blanks. All ____ disciples of ____ hermit had gathered outside the hermitage.

  • )a; the
  • )the; a
  • )the; the✓ योग्य
  • )a; a

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २८English Languageआयोगाने रद्द

The following sentence contains an error. Parts of the sentence have been given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. We had been having dinner at Sara's house last night when the building nearby fell.

  • )building nearby felt
  • )were having
  • )building had fallen
  • )had had

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ३०English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. The circle of Willis, a loop of blood vessels near the bottom of the brain that connects major arteries, / circulates blood from the front of the brain to the back / and helps the arterial systems / communicating with one another.

  • )circulates blood from the front of the brain to the back
  • )The circle of Willis, a loop of blood vessels near the bottom of the brain that connects major arteries
  • )and helps the arterial systems
  • )communicating with one another✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error. As the teacher / stepped in the room / the students stood up / to greet him.

  • )to greet him.
  • )the students stood up
  • )stepped in the room✓ योग्य
  • )As the teacher

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२English Language

Select the most appropriate question tag to fill in the blank. My friends had not gone there, ______ ?

  • )haven't they
  • )could they
  • )have they
  • )had they✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३४English Language

Choose the correct set of punctuation marks to be used in the given sentence. Option (i) includes the first two blanks. Other blanks may or may not be used. (i)_________ Arihant is trying hard this academic year (ii), _________ said Mr. Agarwal (iii)_________ his father.

  • )(i) Quotation mark, (ii) Colon, (iii) Quotation mark
  • )(i) Apostrophe, (ii) Quotation mark, (iii) Comma
  • )(i) Quotation mark, (ii) Quotation mark, (iii) Comma✓ योग्य
  • )(i) Parentheses, (ii) Colon, (iii) Parentheses

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५English Language

Select the most appropriate option to fill in the blank. I only care about three things nowadays _________ my family, my health, and my personal growth.

  • ); (Semi-colon)
  • )(Full stop)
  • )(Colon)✓ योग्य
  • )! (Exclamation mark)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३६English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Make hay while the sun shines.

  • )Circumstances sometimes compel us to do things which we do not like to do.
  • )A person will enjoy freely when master is away.
  • )Avail yourself of opportunities when they occur.✓ योग्य
  • )Do not examine a free gift too critically.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७English Language

Select the INCORRECTLY spelt word in the following sentence. The student was awarded a scholorship for her academic achievements.

  • )scholorship✓ योग्य
  • )student
  • )awarded
  • )achievements

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४२English Language

Select the most appropriate synonym of the given word. Reprimand

  • )Rebuke✓ योग्य
  • )Greet
  • )Vanish
  • )Spoil

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४३English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. The blue-eyed boy kicked a ball.

  • )A ball has kicked the blue-eyed boy.
  • )A ball were kicked by the blue-eyed boy.
  • )A ball is kicked by the blue-eyed boy.
  • )A ball was kicked by the blue-eyed boy.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४४English Language

Select the option that expresses the given sentence in active voice. Savita was attacked by a dangerous snake in the garden.

  • )The dangerous snake was attacked by Savita in the garden.
  • )Savita attacked the snake in the garden.
  • )The dangerous snake attacked Savita in the garden.✓ योग्य
  • )The garden attacked dangerous snake by Savita in the garden.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Actions speak louder than words.

  • )One must always speak loudly after a prolonged silence
  • )Practical experience can help one speak better
  • )The first step should always be taken after consulting others.
  • )What one does is more important than what one says✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०English Language

In the following sentence, four words are underlined out of which one word is misspelled. Find the INCORRECTLY spelt word. The use of pillows remained uncommon after the fall of the Roman Empire and throughout the Middle Ages, as the only people who could reliably affrod such a luxurious use of fabric were nobility.

  • )affrod✓ योग्य
  • )Empire
  • )reliably
  • )nobility

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१General Knowledge

संपूर्णपणे जल आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या विमानतळाबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहे/आहेत? I) दिल्लीच्या या विमानतळाचे नाव इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळ आहे. II) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळाने आपल्या वापराच्या गरजांसाठी 1 जून 2022 पासून अक्षय शक्ती ऊर्जा अवलंबिले आहे. III) येथील 94% ऊर्जा ही सौरऊर्जा संयंत्रातून येत आहे.

  • )I आणि III
  • )फक्त III
  • )फक्त I
  • )I आणि II✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

रेल्वे आरक्षण प्रणालीच्या संदर्भात PQWL चे पूर्ण रूप काय आहे?

  • )पब्लिक क्यू वेटिंग लिस्ट (Public Queue Waiting List)
  • )प्रायमरी क्यू वेटिंग लिस्ट (Primary Queue Waiting List)
  • )पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट (Pooled Quota Waiting List)✓ योग्य
  • )पूअर क्यू वेटिंग लिस्ट (Poor Queue Waiting List)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मोतीलाल नेहरूसोबत स्वराज पक्षाची स्थापना केली?

  • )आर. सी. दत्त
  • )महात्मा गांधी
  • )डब्ल्यू. सी. बॅनर्जी
  • )सी. आर. दास✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

आंतरराष्ट्रीय सीमेपासून 150 यार्डाच्या आत, महिला आणि मुलांच्या तस्करीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी, 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने भारतासोबत 52 वी बीएसएफ (BSF) डीजी (DG) स्तरावरील द्विपक्षीय चर्चा केली होती?

  • )पाकिस्तान
  • )नेपाळ
  • )भूतान
  • )बांगलादेश✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६General Knowledge

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा-2022 ची ट्रॅक सायकलिंग स्पर्धा ______ येथे आयोजित करण्यात आली होती.

  • )मध्य प्रदेश
  • )हरियाणा
  • )नवी दिल्ली✓ योग्य
  • )गुजरात

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

ऑगस्ट 2022 मध्ये, गुजरातच्या कोणत्या शहरात मोदी शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन केले गेले?

  • )राजकोट
  • )पोरबंदर
  • )अहमदाबाद✓ योग्य
  • )सुरत

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५९General Knowledge

फेब्रुवारी 2023 मध्ये, भारताच्या आदिवासी वारसाचे भव्यदिव्य चित्रण सादर करणारा आदी महोत्सव कोठे पार पडला होता?

  • )नागालँड
  • )ओडिशा
  • )नवी दिल्ली✓ योग्य
  • )झारखंड

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

1951 मध्ये बापू धर्म सभा आदिवासी सेवा मंडळाची स्थापना ______ यांनी केली होती.

  • )कमला चट्टोपाध्याय
  • )सावित्रीबाई फुले
  • )राजमोहिनी देवी✓ योग्य
  • )कित्तूर चेन्नम्मा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६१General Knowledge

भारताच्या कोणत्या प्रदेशात शेकरू (इंडियन जायंट स्क्विरल) आढळते?

  • )पश्चिम घाट✓ योग्य
  • )सुंदरबन
  • )थारचे वाळवंट
  • )माळवा पठार

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

महात्मा गांधींनी ______ येथील साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत मिठाचा सत्याग्रह काढला होता.

  • )पोरबंदर
  • )बडोदा
  • )अहमदाबाद✓ योग्य
  • )जामनगर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६३General Knowledge

भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद जर्मनीच्या घटनेतून स्वीकारण्यात आलेली आहे?

  • )आणीबाणीदरम्यान मूलभूत हक्कांचे निलंबन✓ योग्य
  • )राज्यसभा सदस्यांची निवडणूक
  • )शेषाधिकार केंद्राकडे असणे
  • )समवर्ती सूचीची संकल्पना

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

नोव्हेंबर 2022 मध्ये, भारतीय वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉ. पूर्णिमा देवी बर्मन यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) सर्वोच्च पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या कोणत्या समूहाचे नेतृत्व करतात?

  • )टायगर ग्रुप
  • )हरगिला आर्मी✓ योग्य
  • )पिकॉक आर्मी
  • )ग्रेट बस्टर्ड ग्रुप

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६५General Knowledge

खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 Q अंतर्गत कोणतेही क्षेत्र 'संक्रमणशील क्षेत्र' म्हणून विनिर्दिष्ट करण्याचा अधिकार आहे?

  • )मुख्यमंत्री
  • )राष्ट्रपती
  • )पंतप्रधान
  • )राज्यपाल✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांना ______ द्वारे विहित केल्यानुसार, देय असलेले वेतन आणि भत्ते दिले जातील.

  • )राज्याची विधानसभा
  • )केंद्र सरकार✓ योग्य
  • )राज्य सरकार
  • )राज्याचे राज्यपाल

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६७General Knowledge

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या समाजसेवकाने आनंदवनाची स्थापना केली आणि कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी केलेल्या सेवेसाठी ते ओळखले गेले?

  • )शिवरामपंत दामले
  • )सिंधुताई सपकाळ
  • )पांडुरंग सदाशिव साने
  • )बाबा आमटे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

दर्पण हे मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले?

  • )भाऊ दाजी लाड
  • )पांडुरंग सदाशिव साने
  • )बाळशास्त्री जांभेकर✓ योग्य
  • )सार्वजनिक काका

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९General Knowledge

कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात, 42 वा घटनादुरुस्ती अधिनियम 1976 द्वारे राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली गेली?

  • )मोरारजी देसाई
  • )राजीव गांधी
  • )चरण सिंह
  • )इंदिरा गांधी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७१General Knowledge

खालीलपैकी कोणाला 'आउटलाइन फॉर डेअरी टेक्नॉलॉजी' (Outline for Dairy Technology) या पुस्तकाचे लेखक म्हणून श्रेय दिले जाते?

  • )जेन डेव्हिस
  • )हिना शर्मा
  • )सुकुमार डे✓ योग्य
  • )रॉबर्ट विल्सन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledge

RTI अधिनियम संपूर्ण भारतात ___________ पासून लागू झाला.

  • )जानेवारी 2006
  • )ऑक्टोबर 2006
  • )डिसेंबर 2005
  • )ऑक्टोबर 2005✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७३General Knowledge

केंद्रीय भूवैज्ञानिक मंत्रालयाने हाती घेतलेल्या समुद्रयान मोहिमेचा एक भाग म्हणून, किती व्यक्तींना समुद्रात/सिंधुमधून 6000 मीटर खाली पाठविण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे?

  • )3✓ योग्य
  • )2
  • )4
  • )5

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

लाखेच्या (lac) उत्पादनाचा स्त्रोत काय आहे?

  • )कीटक✓ योग्य
  • )मासे
  • )पाने
  • )उंदीर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७५General Knowledge

खालीलपैकी कोणती नदी ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे?

  • )मांडवी नदी
  • )दिबांग नदी✓ योग्य
  • )यमुना नदी
  • )कृष्णा नदी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७६General Intelligence

दिलेल्या मालिकेत ? च्या जागी काय यायला हवे? 1, 9, 25, 43, 79, 117, 193, 271, ?, 585

  • )472
  • )512
  • )427✓ योग्य
  • )521

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७७General Intelligence

A, B आणि C हे एक काम अनुक्रमे 20, 30 आणि 60 दिवसांत करू शकतात. दर तिसऱ्या दिवशी B आणि C यांची मदत घेतल्यास, A हा किती दिवसांत ते काम करू शकेल?

  • )12 दिवस
  • )15 दिवस✓ योग्य
  • )16 दिवस
  • )18 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७९General Intelligence

एक रेल्वेगाडी सोमवारी 525.80 km, आणि मंगळवारी 514.75 km अंतर पार करते. तीन दिवसांत पार केलेले एकूण अंतर 1600 km असल्यास, बुधवारी ती किती अंतर पार करेल?

  • )558.55 km
  • )558.45 km
  • )559.45 km✓ योग्य
  • )559.55 km

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? 2, 8, 18, 32, 50, ?

  • )65
  • )80
  • )72✓ योग्य
  • )88

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८१General Intelligence

वेंकट एक सेकंड-हँड स्कूटर खरेदी करतो आणि तिच्या दुरुस्तीसाठी किमतीच्या 10% खर्च करतो. त्याने ती स्कूटर ₹2,200 नफ्याने विकली. जर त्याने 20% नफा कमावला असेल, तर दुरुस्तीवर किती खर्च केला?

  • )₹400
  • )₹1,200
  • )₹1,000✓ योग्य
  • )₹750

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८२General Intelligence

दिलेले/ली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने : सर्व चपला, बूट आहेत. सर्व बूट, मोजे आहेत. निष्कर्ष (I): सर्व मोजे, चपला आहेत. निष्कर्ष (II): काही चपला, मोजे आहेत.

  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत आहेत
  • )निष्कर्ष (I) किंवा निष्कर्ष (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.
  • )केवळ निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.✓ योग्य
  • )केवळ निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८३General Intelligence

एका विशिष्ट तर्कानुसार 'YV2' हे 'TQ4' शी संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'NK6' हे 'IF12' शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, 'SP10' हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

  • )LM21
  • )NK20✓ योग्य
  • )NH20
  • )MK20

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

जर 'A' चा अर्थ '+' आहे, 'B' चा अर्थ 'x' आहे, 'C' चा अर्थ '-' आणि 'D' चा अर्थ '÷' आहे, तर खालीलपैकी कशाची परिणामी संख्या 1820 असेल?

  • )68 D 2 B 54 A 11 C 27✓ योग्य
  • )68 A 2 B 54 C 11 D 27
  • )68 C 2 A 54 B 11 D 27
  • )68 D 2 B 54 C 11 A 27

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५General Intelligence

प्रवाहाच्या दिशेने एका माणसाचा वेग 15 km/h आहे आणि प्रवाहाचा वेग 2.5 km/h आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने माणसाचा वेग किती आहे?

  • )8.5 km/h
  • )12.5 km/h
  • )9 km/h
  • )10 km/h✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे? EF, JK, OP, TU, ?

  • )WX
  • )UW
  • )YZ✓ योग्य
  • )YX

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी ? च्या स्थानी काय आले पाहिजे? N, 2, Q, 3, T, 5, W, 7, Z, ?

  • )11✓ योग्य
  • )9
  • )13
  • )8

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८८General Intelligence

एका पोलिसाला 100 मीटर अंतरावर एक चोर दिसतो आणि तो त्याचा पाठलाग करू लागतो. चोर त्याला बघतो आणि तो देखील धावण्यास सुरुवात करतो. जर चोर 8 km/h या वेगाने धावत असेल आणि पोलीस 10 km/h वेगाने धावत असेल, तर पोलीसाद्वारे पकडले जाण्यापूर्वी चोराने पार केलेले अंतर शोधा.

  • )250 मीटर
  • )401 मीटर
  • )400 मीटर✓ योग्य
  • )450 मीटर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (सर्व संख्या केवळ एक-अंकी संख्या आहेत) (डावी) 5 3 2 6 8 1 9 6 4 7 3 2 6 8 4 8 9 5 4 7 1 8 5 6 3 5 2 (उजवी) यात असे किती विषम अंक आहेत, ज्यांच्या प्रत्येकाच्या लगेचच आधी एक सम अंक येतो आणि लगेचच नंतर एक विषम अंकदेखील येतो?

  • )तीन
  • )सहा
  • )चार
  • )पाच✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९०General Intelligence

मेघनाने प्रत्येकी ₹1.2 ला 8000 उत्पादने खरेदी केली, प्रत्येकी ₹1.4 ला आणखी 5000 उत्पादने आणि प्रत्येकी ₹1.5 ला आणखी 3000 उत्पादने खरेदी केली. प्रति उत्पादनाची सरासरी किंमत शोधा. (उत्तर दोन दशांश स्थानांपर्यंत पूर्णांकित करा.)

  • )₹1.41
  • )₹1.32✓ योग्य
  • )₹1.27
  • )₹1.39

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या (?) जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला पाहिजे? QT18 OR27 LO36 HK45 ?

  • )DF55
  • )CF54✓ योग्य
  • )DG54
  • )CE55

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९७General Intelligence

दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीचा ज्याप्रमाणे एकमेकांशी संबंध आहे त्याचप्रमाणे समान संबंध असलेला अक्षर-समूह पर्यायातून निवडा. HLG : MQL DAV : IFA

  • )UJM : ZPS
  • )YHN : ENS
  • )BUT : GZY✓ योग्य
  • )TGB : ZMG

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षाही वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: सर्व प्लास्टिक पडदे आहेत. एकही पडदा गाय नाही. निष्कर्ष 1: एकही गाय प्लास्टिक नाही. निष्कर्ष 2: सर्व गायी पडदे आहेत.

  • )केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे.
  • )केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे.✓ योग्य
  • )1 किंवा 2 हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत.
  • )1 किंवा 2 पैकी एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

एका कपाटाची विक्री किंमत दुप्पट केली, तर नफा तिप्पट होतो. तर सुरुवातीची नफ्याची टक्केवारी शोधा.

  • )50%
  • )100%✓ योग्य
  • )25%
  • )10%

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-21aug-shift2