स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 19 Aug, Shift 3 · ९६ प्रश्न · रद्द ३ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

पुढीलपैकी कर्मकर्तरी प्रयोग ओळखा.

  • )सुमनने गाईस बांधले.
  • )गाय सुमनकडून बांधली जाते.✓ योग्य
  • )सुमनने गाय बांधली.
  • )सुमन गाय बांधते.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'ती अडचणीत आहे, तिला मदत केली तर ती तुम्हाला ______' रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार कोणता आहे?

  • )दुवा देईल.✓ योग्य
  • )पाण्उतारा करेल.
  • )नाकी नऊ आणेल.
  • )सोंग करेल.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'खऱ्याला मरण नाही' या म्हणीचा अर्थ म्हणजे______

  • )सत्य कधी लपत नाही✓ योग्य
  • )खूप कष्ट करूनही फळ दुसऱ्याला मिळणे
  • )आई वडिलांप्रमाणे त्यांची मुले असतात
  • )पैशांचा माज करू नये

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'किती सुंदर दिसतोय हा सूर्योदय !' हा वाक्याचा प्रकार सांगा.

  • )प्रश्नार्थी
  • )नकारार्थी
  • )उद्गारार्थी✓ योग्य
  • )विधानार्थी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'नियमित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

  • )नियम
  • )अविनाशी
  • )अप्रमाण
  • )अनियमित✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

'काट्याचा नायटा करणे' या म्हणीचा अर्थ सांगणारी दुसरी म्हण शोधा.

  • )डोंगर पोखरून उंदीर काढणे
  • )वाघाच्या गुहेत प्रवेश करणे
  • )राईचा पर्वत करणे✓ योग्य
  • )दुधाची तहान ताकावर भागवणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

पुढीलपैकी पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकाचे नाव सांगा.

  • )बहुरूपी
  • )स्वामी
  • )स्मरणगाथा
  • )व्यक्ती आणि वल्ली✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'श्री विठ्ठल: एक महासमन्वय' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

  • )विश्वास पाटील
  • )विश्राम बेडेकर
  • )प्रभाकर पाध्ये
  • )रा. चिं.ढेरे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व ज्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, तेव्हा त्यास कोणता समास म्हणतात?

  • )विभक्ती तत्पुरुष
  • )द्विगु✓ योग्य
  • )उपपद तत्पुरुष
  • )द्वंद्व

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

'चैनीच्या गोष्टी महाग आहेत.' हे वाक्य नकारार्थी करा.

  • )किती महाग आहेत या चैनीच्या गोष्टी!
  • )चैनीच्या गोष्टी खूप स्वस्त आहेत.
  • )चैनीच्या गोष्टी स्वस्त नाहीत.✓ योग्य
  • )चैनीच्या गोष्टी महाग असाव्यात.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १५Marathi Language

भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे?

  • )जरीला
  • )टीका स्वयंवर✓ योग्य
  • )मेलडी
  • )कोसला

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.

  • )क्षुद्र माणसांचे वाईट बोलणे थोरांच्या कार्यात बाधा आणू शकत नाही.✓ योग्य
  • )मूळ स्वभाव बदलत नाही
  • )रक्षकाने चोरी करणे
  • )मनास अपराधाची टोचणी लागणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Marathi Language

'सहलीहून येताना लवकर सांजावले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  • )कर्मणी
  • )भावे✓ योग्य
  • )अकर्मक कर्तरी
  • )सकर्मक कर्तरी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

'प्रासाद' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

  • )आरती
  • )खिरापत
  • )तीर्थ
  • )महाल✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २२Marathi Language

'मुळात नसलेले रूप धारण करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगणारा वाक्यप्रचार कोणता आहे?

  • )मुखभंग करणे
  • )पाझर फुटणे
  • )पारखे होणे
  • )मुखवटा चढवणे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

'त्वरा' या शब्दाचा अर्थ सांगा.

  • )तात्पर्य
  • )घाई✓ योग्य
  • )ताफा
  • )निरुपाय

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २५Marathi Language

'उत्पातात होणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

  • )अनर्थ होणे✓ योग्य
  • )व्रत करणे
  • )गैरसमज करून घेणे
  • )खूप त्रास देणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३English Language

Identify the part/parts of the given sentence that require punctuation marks. Please and Thank you are the small change with which we pay our ways as social beings.

  • )'Thank You'
  • )'Please'
  • )'Please' and 'Thank you'✓ योग्य
  • )'Please and Thank you'

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३८English Language

How will you tell everyone in passive voice that your friend got a job yesterday? Choose the correct option.

  • )My friend selected a job yesterday
  • )A job was offered to my friend yesterday✓ योग्य
  • )My friend had been selecting for a job yesterday
  • )A job has been selected by my friend yesterday

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४०English Language

Select the most appropriate adverb to fill in the blank. He is _________ vegetarian but eats eggs sometimes.

  • )rarely
  • )usually
  • )completely
  • )almost✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४२English Languageआयोगाने रद्द

Select the most appropriate synonym of the underlined word. Hastily I took that trail which took me from a narrow gorge to an open field.

  • )Chasm
  • )Glut
  • )Gully
  • )Nibble

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ४३English Language

A part of the given sentence has been underlined. It contains an error. The underlined part is given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. Though the parents have asked the boy to stop playing, he was playing.

  • )he played
  • )he is played
  • )he is playing✓ योग्य
  • )he had been playing

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६English Language

Select the most appropriate adjective to fill in the blank. Most doctors are ___ when suggesting any prescription to their patients, due to possible allergic reactions.

  • )rapid
  • )filthy
  • )cautious✓ योग्य
  • )messy

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४७English Language

The given sentence has an error. Select the appropriate tense option which rectifies the sentence. Mrs Suma will have being teach for twenty years this coming September.

  • )Mrs Suma will have been teach
  • )Mrs Suma should
  • )Mrs Suma was
  • )Mrs Suma will have been teaching✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९English Language

Select the INCORRECTLY spelt word in the following sentence. He is an excelent guitar player and performs at local venues.

  • )local
  • )player
  • )excelent✓ योग्य
  • )guitar

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५१General Knowledge

खालीलपैकी कोणाकडे नागरिकत्वाच्या हक्काचे विनियमन करण्याचा अधिकार आहे?

  • )सर्वोच्च न्यायालय
  • )केंद्रीय मंत्रिमंडळ
  • )राष्ट्रपती
  • )संसद✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५३General Knowledge

एप्रिल 2023 मध्ये, केरळ शिपिंग अँड इनलँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशनने कार्यान्वित केलेल्या आणि कोची बॅकवॉटरमध्ये नौकानयनासाठी सज्ज झालेल्या पहिल्या सौर-ऊर्जा चालित पर्यटक जहाजाचे नाव काय आहे?

  • )आरव्ही बंगाल गंगा (RV Bengal Ganga)
  • )हेरिटेज-I (Heritage-I)
  • )सूर्यांशू (Sooryamshu)✓ योग्य
  • )गंगा व्होयाजर-I (Ganga Voyager-I)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

2023 मध्ये, खालीलपैकी कोणाला जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या हस्ते वन्यजीव संवर्धन पुरस्काराने सन्मानित केले गेले असून त्या केंद्रशासित प्रदेशातील आपल्या संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी पुरस्कृत होणारी पहिली महिला ठरल्या आहेत?

  • )मेहरुननिसा बेगम
  • )नुसरत जहाँ
  • )आलिया मीर✓ योग्य
  • )हुस्ना कुरेशी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

युग्मविकल्पीची (Alleles) अनुवंशदृष्ट्या व्याख्या ______ अशी केली जाते.

  • )गुणसूत्रे जे समजातीय आहेत
  • )जीनचे पर्यायी रूप✓ योग्य
  • )जीन्स जी संलग्न आहेत
  • )प्रभावी जीन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५६General Knowledge

दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल कोण होते?

  • )वॉरन हेस्टिंग्ज
  • )रॉबर्ट क्लाइव्ह
  • )लॉर्ड वेल्सली✓ योग्य
  • )लॉर्ड कर्झन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

2011 च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण लोकसंख्या किती आहे?

  • )1.36 अब्ज
  • )1.14 अब्ज
  • )1.21 अब्ज✓ योग्य
  • )1.01 अब्ज

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५८General Knowledge

खालीलपैकी कोणी गिजूभाई बधेका यांच्यासोबत मुलांसाठी 'नूतन बाल शिक्षण संघ' स्थापन केला?

  • )एन. जी. गोरे
  • )क्रांतिसिंह नाना पाटील
  • )आचार्य विनोबा भावे
  • )ताराबाई मोडक✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 रौप्यपदक विजेती प्रियांका गोस्वामी खालीलपैकी कोणत्या स्पर्धेशी संबंधित आहे?

  • )तिहेरी उडी
  • )उंच उडी
  • )भाला फेक
  • )रेस वॉक✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

2022 मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी निराधार आणि भिकारी यांच्या सतत उद्भवणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे?

  • )SMARTH 75
  • )LIFE 75
  • )SMILE 75✓ योग्य
  • )MILE 75

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

सरकारच्या संसदीय स्वरूपाची खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांतर्गत येत नाही?

  • )कार्यकारी हे विधिमंडळाचे सदस्य असतात
  • )बहुमत मिळवलेल्या पक्षाचे शासन
  • )वरिष्ठ सभागृहाचे विसर्जन✓ योग्य
  • )सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२General Knowledge

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'कार्यक्रम तयार करण्यासाठी योग्य सरकार' याबद्दल उल्लेख आहे?

  • )कलम 25
  • )कलम 26✓ योग्य
  • )कलम 28
  • )कलम 27

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६३General Knowledge

संगणकाच्या हार्ड डिस्कवरील एखाद्या फोल्डरच्या आत असलेल्या फोल्डरला ______ म्हणतात.

  • )पेरेंट फोल्डर
  • )सब फोल्डर✓ योग्य
  • )बेबी फोल्डर
  • )चाइल्ड फोल्डर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६४General Knowledge

नोव्हेंबर 2022 मध्ये, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जागतिक आर्थिक सुधारणा, जागतिक आरोग्य पायाभूत संरचना, डिजिटल परिवर्तन, शाश्वत ऊर्जा संक्रमण आणि हवामान बदल यावर केंद्रित असलेली तसेच 'रिकव्हर टुगेदर, रिकव्हर स्ट्रॉंगर' हे विषयसूत्र असलेलेली दोन दिवसीय G-20 शिखर परिषद पार पडली?

  • )हनी लँकुना (Honey Lacuna)
  • )बाली (Bali)✓ योग्य
  • )पनॉम पेन (Phnom Penh)
  • )मनिला (Manila)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६५General Knowledgeआयोगाने रद्द

केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त ___________ यांना उद्देशून आपला राजीनामा देऊ शकतात.

  • )संबंधित राज्याचे मुख्यमंत्री
  • )लोकसभेचे अध्यक्ष
  • )भारताचे पंतप्रधान
  • )भारताचे उपराष्ट्रपती

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ६६General Knowledge

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत? 1) 1802 मध्ये वसईचा तह झाला. 2) 1804 मध्ये इंग्रजांशी राजापूरघाटचा तह झाला. वरील दोन विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते बरोबर आहे?

  • )फक्त 2
  • )1 आणि 2 दोन्ही
  • )1 किंवा 2 पैकी एकही नाही
  • )फक्त 1✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६७General Knowledge

2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात महिला साक्षरता दर सर्वाधिक आहे?

  • )चंदीगड
  • )दिल्ली
  • )लक्षद्वीप✓ योग्य
  • )पुदुचेरी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६८General Knowledge

सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक (द बुक ऑफ द टू फेथ) ________ हे यांनी लिहिले होते.

  • )अरविंद घोष
  • )रवींद्रनाथ टागोर
  • )बाबासाहेब आंबेडकर
  • )ज्योतिबा गोविंदराव फुले✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय केव्हा दिला की, कोणत्याही कायद्याची संविधानिकता ठरवताना, जर एखाद्या न्यायालयाला असे आढळले की, विचाराधीन कायदा हा मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी करू इच्छित आहे, तर अनुच्छेद 14 किंवा 19 च्या संदर्भात असा कायदा 'वाजवी' मानू शकतात?

  • )1994
  • )1995
  • )1992✓ योग्य
  • )1991

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledge

भारतातील स्तर-II आणि स्तर-III च्या शहरांमधील स्टार्ट-अप्स शोधणे, त्यांचे समर्थन करणे, त्यांना वाढवणे आणि यशस्वी बनवणे यासाठी पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया वीक 2022 (Digital India Week 2022) मध्ये, _______ या नॅशनल डीप-टेक स्टार्टअप प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले.

  • )डिजिटल इंडिया ओॲसिस (Digital India OASIS)
  • )डिजिटल इंडिया प्रॉडिजी (Digital India PRODIGY)
  • )डिजिटल इंडिया एक्सलन्स (Digital India EXCELLENCE)
  • )डिजिटल इंडिया जेनेसिस (Digital India GENESIS)✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७३General Knowledge

सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि 'गौठान' (गोशाळा) यांना उपजीविकेचे केंद्र बनविण्यासाठी राज्यामध्ये 300 ग्रामीण औद्योगिक उद्याने उभारली आहेत.

  • )छत्तीसगड✓ योग्य
  • )झारखंड
  • )महाराष्ट्र
  • )उत्तराखंड

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४General Knowledge

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत? A) लॉर्ड लिटनने व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1878 मध्ये सादर केला होता. B) सोम प्रकाश, भरत मिहीर, डक्का प्रकाश आणि समाचार यांच्याविरुद्ध व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली.

  • )A आणि B दोन्ही✓ योग्य
  • )A ही नाही किंवा B ही नाही
  • )केवळ B
  • )केवळ A

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारिकेने 1889 मध्ये मुंबई येथे 'शारदा सदन' सुरू केले?

  • )पंडिता रमाबाई✓ योग्य
  • )सावित्रीबाई फुले
  • )ताराबाई मोडक
  • )ताराबाई शिंदे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७६General Intelligence

एक कार दोन शहरांदरम्यान 60 km/h वेगाने प्रवास करते आणि परत येताना तिचा वेग 40 km/h असतो. ती पुन्हा मूळ वेगाच्या दुप्पट वेगाने पहिल्या शहरातून दुसऱ्या शहरात जाते आणि परतीच्या मूळ वेगाच्या निम्म्या वेगाने परत येते. तर संपूर्ण प्रवासादरम्यानचा तिचा सरासरी वेग शोधा.

  • )40 km/h✓ योग्य
  • )55 km/h
  • )50 km/h
  • )48 km/h

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

खालील अक्षरसमूह-जोड्यांमधील अक्षर-समूहांचा ज्याप्रकारे एकमेकांशी संबंध आहे त्याचप्रकारे संबंध असलेली अक्षरसमूह-जोडी दिलेल्या पर्यायांमधून निवडा. DGJ : FFL LNP : NMR MRV : OQX

  • )HMQ : JLS✓ योग्य
  • )PLT : SEC
  • )ABC : CBA
  • )MOE : TUV

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? LDV12, EWO18, XPH24, ? (टीप: सर्व संख्या या केवळ दोन-अंकी संख्या आहेत.)

  • )PIA32
  • )QIA30✓ योग्य
  • )QIA32
  • )QLB30

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९General Intelligence

एक रक्कम 15 वर्षांत चक्रवाढ व्याजाने तिच्या स्वतःच्या दुप्पट होते. किती कालावधीत ती तिच्या स्वतःच्या 8 पट होईल (वार्षिक गणना लक्षात घेऊन)?

  • )60 वर्षे
  • )40 वर्षे
  • )45 वर्षे✓ योग्य
  • )30 वर्षे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०General Intelligence

सरळ रूप द्या : 3.5 ÷ 4.9 + 0.5 × 0.3 – 0.1.

  • )0.864
  • )0.224
  • )0.764✓ योग्य
  • )0.324

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८१General Intelligence

इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार 'NRVH' हे 'PTXJ' शी विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याचप्रकारे, 'PDXI' हे 'RFZK' शी संबंधित आहे, तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय TLQM शी संबंधित असेल?

  • )WNSO
  • )VOSO
  • )WOTP
  • )VNSO✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

खालील अक्षर, संख्या, चिन्हांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी) Q W 3 * 8 5 U K @ P J + 3 # & T L H (उजवी) तेथे अशा किती संख्या आहेत, ज्यांच्या लगटच आधी एक अक्षर आणि लगटच नंतर एक अक्षर येते?

  • )एक
  • )दोन
  • )तीन
  • )एकही नाही✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८३General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: सर्व पुरुष, माकडे आहेत. काही कलाकार, पुरुष आहेत. निष्कर्ष: (I): एकही कलाकार, माकड नाही. (II): सर्व कलाकार, पुरुष आहेत.

  • )फक्त निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.
  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.✓ योग्य
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत नाहीत.
  • )फक्त निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

जर 'A' चा अर्थ '÷' असेल, 'B' चा अर्थ 'x' असेल, 'C' चा अर्थ '-' असेल आणि 'D' चा अर्थ '+' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 44 D 44 A 2 B 3 C 49 = ?

  • )53
  • )57
  • )61✓ योग्य
  • )55

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८५General Intelligence

900 km च्या प्रवासासाठी, एक ट्रक 50 km/h वेगाने पहिले 300 km अंतर प्रवास करतो. उर्वरित अंतर किती वेगाने पार केले पाहिजे, जेणेकरून सरासरी वेग 60 km/h असेल?

  • )52 km/h
  • )200 3 km/h✓ योग्य
  • )72 km/h
  • )750 11 km/h

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

एका विशिष्ट संख्येच्या वस्तू ₹150 किमतीला 3 याप्रमाणे खरेदी केल्या आणि त्या सर्व ₹180 किमतीला 4 या प्रमाणे विकल्या. नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा.

  • )11.11% तोटा
  • )10% तोटा✓ योग्य
  • )10% नफा
  • )11.11% नफा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

एका वस्तूची खरेदी किंमत ₹1,200 आहे आणि विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या 5/4 पट आहे. नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा.

  • )20% तोटा
  • )25% तोटा
  • )25% नफा✓ योग्य
  • )20% नफा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९General Intelligence

काही माणसे 12 दिवसांत एक काम करू शकतात. अशा माणसांच्या दुप्पट संख्येस् त्या कामाचा निम्मा भाग करण्यास किती दिवस लागतील?

  • )4 दिवस
  • )3 दिवस✓ योग्य
  • )6 दिवस
  • )12 दिवस

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligence

एक कार 60 km/h वेगाने जात आहे. 3 तासांनंतर, तिचा वेग 80 km/h पर्यंत वाढविला जातो आणि कार पूर्णपणे थांबण्यापूर्वी हा वेग 2 तासांसाठी राखला जातो. तर गाडीने पार केलेले अंतर किती आहे?

  • )300 km
  • )350 km
  • )320 km
  • )340 km✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? MG2, OH4, QI6, ?

  • )AB5
  • )BA5
  • )SJ8✓ योग्य
  • )JS8

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९२General Intelligenceआयोगाने रद्द

पाईप C एकट्याने एका टाकीला 12 मिनिटांत भरू शकतो तर पाईप A आणि पाईप B एकत्र मिळून 6 मिनिटांत भरू शकतात. जेव्हा पाईप A ने एक मिनिट भरू दिली, मग पुढची 2 मिनिटे पाईप C ने भरू दिली आणि नंतर पाईप A ने आणि असेच यापुढे सुरु ठेवल्यास, ती टाकी 16 मिनिटांत भरते. तर वेगवान पाईपला टाकी एकट्याने भरण्यासाठी किती मिनिटे लागतील?

  • )12 मिनिटे
  • )36 मिनिटे
  • )18 मिनिटे
  • )16 मिनिटे

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ९३General Intelligence

A आणि B एक काम अनुक्रमे 6 दिवसात आणि 8 दिवसांत करू शकतात. C च्या मदतीने, त्यांनी 3 दिवसांत ते काम पूर्ण केले आणि ₹1,848 कमावले. त्यातील C चा वाटा किती होता?

  • )₹231✓ योग्य
  • )₹462
  • )₹324
  • )₹693

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९४General Intelligence

चार शब्द-जोड्या दिल्या आहेत, ज्यांपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी निवडा.

  • )पंचकोन - आठ✓ योग्य
  • )चौरस - चार
  • )त्रिकोण - तीन
  • )षटकोन - सहा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९५General Intelligence

एक रक्कम 2 वर्षांसाठी सरळव्याजच्या विशिष्ट वार्षिक दराने गुंतवली गेली. विद्यमान दरापेक्षा दरसाल 3% अधिक दराने गुंतवले असते, तर 2 वर्षांत जमा झालेले सरळव्याज ₹240 अधिक असते. तर गुंतवलेली रक्कम शोधा.

  • )₹16,000
  • )₹6,000
  • )₹4,000✓ योग्य
  • )₹24,000

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकणारे अक्षरांक पद दिलेल्या पर्यायांतून निवडा. SD86, YX77, ER68, ?

  • )KL59✓ योग्य
  • )JK51
  • )MN54
  • )MK59

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

चार अक्षरगट दिले आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अक्षरगटएक वेगळा आहे. तो वेगळा अक्षरगट निवडा.

  • )WUP
  • )LJF✓ योग्य
  • )TRM
  • )OMH

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याची आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा. विधाने: सर्व पक्षी प्राणी आहेत. एकही माणूस प्राणी नाही. निष्कर्ष: (I): काही माणसे पक्षी आहेत. (II): सर्व पक्षी माणसे आहेत.

  • )फक्त निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.
  • )फक्त निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.
  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.✓ योग्य
  • )निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत आहेत.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-19aug-shift3