स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 06 Sep, Shift 1 · ९९ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

जर मी तिथे ______ तर हे भांडण होऊच

  • )होते, दिले
  • )असावे, द्यावे
  • )असते, दिले नसते.✓ योग्य
  • )असेन, दिले नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

पुढील पैकी कोणते द्विगु समासाचे उदाहरण नाही?

  • )नवरात्र
  • )त्रिभुवन
  • )चारपाच✓ योग्य
  • )पंचवटी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरा. (मी) ______ (भाषा) ______ अभ्यास चांगला सुरु आहे.

  • )माझा, भाषेचा✓ योग्य
  • )माझा, भाषेची
  • )मला, भाषेची
  • )मी, भाषेत

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न Marathi Language

आकाश ढगांनी भरलेले होते. 'ढगांनी भरलेले' यासाठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरा.

  • )नीलाच्छादित
  • )आच्छादित
  • )शुभाच्छादित
  • )मेघाच्छादित✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

आर्याभारत ही रचना कोणाची आहे?

  • )संत तुकाराम
  • )तुकडोजी महाराज
  • )मोरोपंत✓ योग्य
  • )संत रामदास

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १३Marathi Language

वर्ष २००६ मध्ये आशा बगे यांच्या भूमी या कोणत्या लेखनप्रकाराला साहित्य अकादमी पारितोषिक जाहीर झाले.

  • )कादंबरी✓ योग्य
  • )कथासंग्रह
  • )समीक्षा
  • )कवितासंग्रह

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १४Marathi Language

योग्य जोडी ओळखा.

  • )त्याला आज मळमळते – कर्मकर्तरी
  • )तो खूप बडबडत होता – कर्मणी
  • )त्याला आता बसवते – कर्तरी
  • )त्याचे काम करून झाले – समापन✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १६Marathi Language

वाकुल्या दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

  • )नीटनेटके करणे
  • )धपाटे घालणे
  • )वेडावून दाखवणे✓ योग्य
  • )हैराण करणे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

पुढील पैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा.

  • )जर अधिकारी आले, तर सर्व उपस्थित राहतील.
  • )सर्वांनी उपस्थित राहा.✓ योग्य
  • )सर्व उपस्थित राहिले.
  • )सर्वांनी उपस्थित राहावे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १९Marathi Language

सुनंदा आणि मुली घरातून बाहेर ____ आणि ____ रिक्षात बसल्या.

  • )पडल्या, त्या✓ योग्य
  • )पडले, त्याने
  • )पडली, त्यांनी
  • )पडल्या, ती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

पुढीलपैकी कोणते मिश्र वाक्य नाही?

  • )बाहेर जाता आले, म्हणून मी भाजी आणली.
  • )मी बाहेर गेल्यावर भाजी आणीन.✓ योग्य
  • )जर मला बाहेर जाता आले तर मी भाजी आणीन.
  • )जर मी बाहेर गेले तर मी भाजी आणीन.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

प्रामुख्याने गझल या काव्यप्रकारात रचना करणारे प्रसिद्ध कवी कोण?

  • )विंदा करंदीकर
  • )ऐश्वर्य पाटेकर
  • )बा. सी. मर्ढेकर
  • )सुरेश भट✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २७English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. Will he use the bridge once it is constructed?

  • )Will the bridge be used by him once it had been constructed?
  • )Will the bridge be used by him once it was constructed?
  • )Will the bridge be used by him once it is constructed?✓ योग्य
  • )Will the bridge be used by him once it had constructed?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८English Language

Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select 'No article'. My brother needs ________ dictionary to enrich his vocabulary.

  • )a✓ योग्य
  • )No article
  • )an
  • )the

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३१English Language

Select the most appropriate ANTONYM of the underlined word. Reading the thought-provoking novel had a profound impact on her, causing her to reflect deeply on the complexities of human nature and the meaning of life.

  • )Deep
  • )Intense
  • )Superficial✓ योग्य
  • )Extensive

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३३English Language

The given sentence has an error. Select the option which rectifies the sentence to its past tense. Select the option 'No error identified' if there is none. She walked into the station only to find that the train left.

  • )She walked into the station only to find that the train had left.✓ योग्य
  • )She was walking in the station only to find that the train will leave.
  • )She walked in the station to find out the train left.
  • )No error identified.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६English Languageआयोगाने रद्द

Select the most appropriate ANTONYM of the given word. Varied

  • )Painful
  • )Secured
  • )Homogenous
  • )Distinctive

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ३७English Language

In the following sentence, four words are given in bold. Out of which one word is misspelled. Find the misspelled word. With all the extraordinary characters, the play is difficult to understand without assistance.

  • )assistance
  • )characters
  • )extraordinary✓ योग्य
  • )difficult

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८English Language

Select the most appropriate option to fill in the blank. We ______ obey the traffic rules to save our life as well that of others.

  • )will
  • )should✓ योग्य
  • )may
  • )would

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३९English Language

Select the correctly punctuated phrase to fill in the blank. There was something strangely incongruous in this oriental figure framed in the commonplace ______.

  • )door-way of a third rate suburban dwelling-house
  • )door-way of a third-rate suburban dwelling-house✓ योग्य
  • )door way of a third rate suburban dwelling house
  • )door-way of a third rate suburban dwelling house

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. One swallow doesn't make a summer.

  • )Hardest of temperaments can't be melted with warmth.
  • )It is difficult swallow one's pride and submit to insults.
  • )It is difficult to swallow some dishes until its summer.
  • )One fact does not prove something, as it may be an exception to the rule.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२English Language

The given sentence has an error. Select the option which rectifies the sentence in its past tense. Select the option 'No error identified' if there is none. I had been meant to call my parents, but I was not able to find a phone box.

  • )I mean to call my parents, but I wasn't able to find a phone box.
  • )I had meant to call my parents but I wasn't able to find a phone box.✓ योग्य
  • )I meant to called by my parents, but I wasn't able to find a phone box.
  • )No error identified

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७English Language

Select the option that expresses the given sentence in passive voice. Did your team leader ask you to prepare that presentation again?

  • )Haven't you been asked by your team leader to prepare that presentation again?
  • )Were you asked by your team leader to prepare that presentation again?✓ योग्य
  • )Have you been asked by your team leader to prepare that presentation again?
  • )Were you being asked by your team leader to prepare that presentation again?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. You can't have your cake and eat it too

  • )It's impossible to have both cake and other desserts.
  • )Eating cake is a luxury for the non-deserving.
  • )You can't enjoy both of two desirable but mutually exclusive alternatives.✓ योग्य
  • )You can have your cake and eat it too if you manage your time well.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९English Language

Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. The(1) furniture in(2) the living room are(3) arranged in a(4) cozy and inviting manner.

  • )(4) the
  • )(2) at
  • )(1)No article
  • )(3) is✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०English Languageआयोगाने रद्द

Select the most appropriate present tense verb form to fill in the blank. Shakespeare __________, “Life is but a walking shadow.”

  • )say
  • )said
  • )will say
  • )will be saying

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ५१General Knowledge

भारताच्या भूस्खलन नकाशासंग्रहात (लँडस्लाईड ॲट्लसमध्ये) हिमालय आणि पश्चिम घाटातील भारतातील _________ आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील भूस्खलन-प्रवण प्रदेशांचा माहितीसाठी (डेटाबेस) समाविष्ट आहे.

  • )11 राज्ये
  • )17 राज्ये✓ योग्य
  • )7 राज्ये
  • )15 राज्ये

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२General Knowledge

ब्यास (बियास) नदी ही ___________ ची उपनदी आहे.

  • )सतलज नदी✓ योग्य
  • )गंगा नदी
  • )गोदावरी नदी
  • )ब्रह्मपुत्रा नदी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५४General Knowledge

खालीलपैकी कोणती जोडी अचूकरीज्या जुळवलेली आहे? A: जमनालाल बजाज : वर्धा येथील सत्याग्रह आश्रम B: दादाभाई नौरोजी : बॉम्बे असोसिएशन C: डॉ. बी. आर. आंबेडकर : शेड्युल कास्ट फेडरेशन D: बाळ गंगाधर टिळक : सत्यशोधक सभा

  • )फक्त A आणि C
  • )फक्त B आणि C
  • )फक्त A आणि B
  • )A, B आणि C✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५६General Knowledge

20 ऑक्टोबर 2022 रोजी _________ येथे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस श्री. अँटोनियो गुटेरेस यांच्या उपस्थितीत, लाईफ-लाईफस्टाईल फॉर एन्वायर्नमेंट (LiFE-Lifestyle for Environment) सुरु करण्यात आले होते.

  • )केरळ
  • )गोवा
  • )महाराष्ट्र
  • )गुजरात✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५७General Knowledge

‘लीडर’ हे वृत्तपत्र मूलतः खालीलपैकी कोणाच्या धोरणांचे मुखपत्र होते?

  • )सनातनी
  • )पुराणमतवादी
  • )साम्यवादी
  • )उदारमतवादी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८General Knowledge

बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) सुधारणा अधिनियम, ____ द्वारे बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, 1967 मध्ये सुधारणा केली गेली.

  • )2021
  • )2019✓ योग्य
  • )2018
  • )2020

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

ब्राह्मो समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने धर्मसभा आयोजित केली?

  • )शिव नारायण अग्निहोत्री
  • )गोपाळ गणेश आगरकर
  • )राधाकांत देव✓ योग्य
  • )नारायण मल्हार जोशी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

खालीलपैकी कोणत्या धार्मिक परंपरेमध्ये 'संसार' आणि 'निर्वाण' या संकल्पनेवर विश्वास ठेवला जातो?

  • )ख्रिश्चन धर्म
  • )बौद्ध धर्म✓ योग्य
  • )इस्लाम
  • )शीख धर्म

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

सी नटेश मुदलियार यांनी 20 नोव्हेंबर ____ रोजी, टी. एम. नायर, पी. थेगराया शेट्टी आणि अलमेलू मंगाई थयाराममल (Alamelu Mangai Thayarammal) यांच्या मदतीने जस्टिस पार्टीची स्थापना केली.

  • )1918
  • )1916✓ योग्य
  • )1922
  • )1920

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६२General Knowledge

पारशी धार्मिक सुधारणा संघटनेची स्थापना कोणत्या प्रांतात झाली?

  • )बॉम्बे✓ योग्य
  • )मद्रास
  • )कलकत्ता
  • )म्हैसूर

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३General Knowledge

ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले होते?

  • )भारत पाकिस्तान तुलना
  • )ब्राह्मण दलित तुलना
  • )स्त्रीपुरुष तुलना✓ योग्य
  • )हिंदू मुस्लिम तुलना

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६४General Knowledge

MS-पॉवरपॉईंटच्या फाइलसाठी खालीलपैकी कोणते एक्सटेंशन वापरले जाते?

  • )ppt✓ योग्य
  • )pwpt
  • )cpp
  • )doc

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६५General Knowledge

एप्रिल 2023 मध्ये, राणी रामपाल ही स्वतःच्या नावाचे स्टेडियम असलेली, ______ मधील पहिली महिला ठरली.

  • )बॅडमिंटन
  • )हॉकी✓ योग्य
  • )मुष्टियुद्ध
  • )कुस्ती

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६General Knowledge

खालीलपैकी कोणत्या अनुच्छेददात "राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही" असे अनुसूचित केले गेले आहे?

  • )अनुच्छेद 18
  • )अनुच्छेद 16
  • )अनुच्छेद 19
  • )अनुच्छेद 14✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

दिल्ली पोलीस आस्थापना अधिनियम, 1964 माहितीचा अधिकार (RTI) अधिनियम, 2005 अंतर्गत, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? A. ज्या माहितीच्या प्रकटीकरणामुळे संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारली जाऊ शकते. B. ज्या माहितीच्या प्रकटीकरणामुळे राज्य विधानमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारली जाऊ शकते. C. ज्या माहितीचा खुलासा केल्याने संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारता येऊ शकत नाही. D. ज्या माहितीचा खुलासा केल्याने राज्य विधानमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती नाकारता येऊ शकत नाही.

  • )फक्त D आणि A
  • )फक्त C आणि D✓ योग्य
  • )फक्त A आणि B
  • )फक्त B आणि C

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

पेशी चक्रात प्रामुख्याने G1, S, G2 आणि M असे चार टप्पे असतात. येथे 'S' टप्पा काय दर्शवतो?

  • )प्रथिन संश्लेषण टप्पा
  • )DNA संश्लेषण टप्पा✓ योग्य
  • )प्रतिलेखन टप्पा
  • )पेशी विभाजन टप्पा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९General Knowledge

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदार्तगत 'कायद्यापुढे समानता' ही संकल्पना मांडण्यात आली आहे?

  • )अनुच्छेद 14✓ योग्य
  • )अनुच्छेद 15
  • )अनुच्छेद 17
  • )अनुच्छेद 16

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

जुलै 2022 मध्ये, ________ यांच्याद्वारे 'स्वनिर्भर नारी' (SWANIRBHAR NAARI') ही वैशिष्ट्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली.

  • )अशोक गेहलोत
  • )हिमंत बिस्वा सरमा✓ योग्य
  • )के. चंद्रशेखर राव
  • )एम. के. स्टॅलिन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१General Knowledge

1833 च्या चार्टर ॲक्टबद्दल खालील विधाने विचारात घ्या : 1) बंगालचा गव्हर्नर-जनरल हा संपूर्ण ब्रिटिश भारतात अनन्य वैधानिक अधिकार असलेला भारताचा गव्हर्नर-जनरल बनला. 2) लॉर्ड विल्यम बेंटिंक हा भारताचा पहिला गव्हर्नर-जनरल होता. दिलेल्या विधानांपैकी कोणते योग्य आहे?

  • )फक्त 1
  • )फक्त 2
  • )1 किंवा 2 यापैकी एकही नाही
  • )1 आणि 2 हे दोन्ही✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२General Knowledge

खालीलपैकी कोणते हे जागतिक तापमानवाढीचे (ग्लोबल वार्मिंग) एक कारण नाही?

  • )जंगलतोड
  • )वाळूची वादळे✓ योग्य
  • )जीवाश्म इंधनाचे ज्वलन
  • )औद्योगिक उपक्रम

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३General Knowledge

खालीलपैकी कोणत्या राज्याने 2023 मध्ये 'मुख्यमंत्री लाडली बहना योजना' सुरु केली होती?

  • )महाराष्ट्र
  • )पश्चिम बंगाल
  • )मध्यप्रदेश✓ योग्य
  • )उत्तर प्रदेश

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७४General Knowledge

कच्छचे रण हे हंगामी खारकक्ष/खाजण कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे?

  • )गुजरात✓ योग्य
  • )गोवा
  • )महाराष्ट्र
  • )मध्यप्रदेश

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७५General Knowledge

एप्रिल 2023 मध्ये, ______ येथे आपत्ती प्रतिरोधक पायाभूत संरचनांवरील (Disaster Resilient Infrastructure) पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

  • )नॉएडा
  • )नवी दिल्ली✓ योग्य
  • )मुंबई
  • )चेन्नई

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६General Intelligence

अक्षर, संख्या, चिन्हे यांच्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी) M + Z 7 D ^ T (5 % A 9 @ 8 S * P 3 Y # E (उजवी) अशी किती चिन्हे आहेत, ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर आणि ताबडतोब नंतर देखील एक अक्षर आहे?

  • )2
  • )0
  • )3✓ योग्य
  • )1

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

एक माणूस स्थिर पाण्यात 8 km/h वेगाने पोहू शकतो आणि नदी 2 km/h वेगाने वाहत आहे. जर त्या व्यक्तीला एका ठिकाणी जाऊन परत येण्यासाठी 1 तास लागला, तर ते ठिकाण किती अंतरावर आहे?

  • )3.75 km✓ योग्य
  • )2.75 km
  • )1.75 km
  • )4.75 km

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९General Intelligence

संख्या आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावयाची आहे. (डावी) £ 5 % 6 @ $ 2 & 1 * 4 7 & 3 Ω 9 8 # (उजवे) यात अशी किती चिन्हे आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक संख्या आणि ताबडतोब नंतर अन्य चिन्ह देखील आहे?

  • )0
  • )2
  • )3
  • )1✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८०General Intelligence

X आणि Y या दोन तोट्या अनुक्रमे 21 तासांत आणि 24 तासांत एका टाकीला भरू शकतात. एकाच वेळी तोट्या उघडण्यात आल्या आणि तळापाशी गळती झाल्याने टाकी भरण्यासाठी 48 मिनिटे जास्त लागल्याचे आढळून आले. टाकी भरलेली असताना, त्या वेळेदरम्यान कोणतीही तोटी न उघडल्यास टाकी किती वेळात त्या गळतीमुळे रिकामी होईल?

  • )130 तास
  • )120 तास
  • )144 तास
  • )168 तास✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८१General Intelligence

एक भांडे द्रवाने भरलेले आहे, ज्यापैकी 3 भाग पाणी आणि 5 भाग शाई आहे. त्या मिश्रणात अर्धा भाग पाणी आणि अर्धा भाग शाई असण्यासाठी, मिश्रणाचा किती भाग काढून त्याच्या जागी पाणी घातले पाहिजे?

  • )1/7
  • )1/3
  • )1/5✓ योग्य
  • )1/4

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२General Intelligence

जर 4 + 4^(n + 5) = 260 आहे, तर 5^(n + 3) चे मूल्य शोधा.

  • )49
  • )25✓ योग्य
  • )16
  • )36

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८३General Intelligence

खालील चारपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा.

  • )RTO
  • )GIE✓ योग्य
  • )JLG
  • )OQL

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४General Intelligence

हरीने ₹4 प्रति किलो दराने एका प्रकारचा 25 किलो गहू खरेदी केला आणि ₹4.50 प्रति किलो दराने दुसऱ्या प्रकारचा 35 किलो गहू खरेदी केला. त्याने हे मिश्रण ₹4.25 प्रति किलो या दराने विकले. त्याचा नफा किंवा तोटा शोधा.

  • )₹3.50, नफा
  • )₹2, तोटा
  • )₹2.50, तोटा✓ योग्य
  • )₹3, नफा

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५General Intelligence

चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे, वेगळी असलेली शब्द-जोडी निवडा.

  • )मेंढी : बें बें करणे
  • )घुबड : घूत्कार
  • )उंट : घरघर
  • )गाढव: खिंकाळणे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांतील माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी आढळली तरी, ती सत्य आहे, असे गृहीत धरून दिलेल्यांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/त ते ठरवा. विधाने: सर्व शर्ट हे टाय आहेत. काही शर्ट हे परफ्युम्स आहेत. निष्कर्ष: (I) काही टाय हे परफ्युम्स आहेत. (II) काही शर्ट हे परफ्युम्स नाहीत.

  • )निष्कर्ष (I) आणि (II) दोन्ही तर्कसंगत आहेत.
  • )निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.
  • )केवळ निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे
  • )केवळ निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligence

एक टाकी 300 l पाण्याने भरलेली होती. दिवसाभरात, 87 l 225 ml पाणी वापरण्यात आले. दिवसाअखेर टाकीत किती पाणी शिल्लक होते?

  • )212 l 825 ml
  • )212 l 875 ml
  • )212 l 775 ml✓ योग्य
  • )212 l 675 ml

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८General Intelligence

एक बस 40 km/h या वेगाने 80 km अंतराचा प्रवास करते आणि पुढील 30 km अंतराचा प्रवास 10 km/h या वेगाने करते. तिचा सरासरी वेग किती आहे?

  • )22 km/h✓ योग्य
  • )30 km/h
  • )20 km/h
  • )40 km/h

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८९General Intelligence

चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे, वेगळी असलेली शब्द-जोडी निवडा.

  • )प्लॅटिनम : सोने✓ योग्य
  • )पितळ : तांबे
  • )पोलाद : लोह
  • )ड्युराल्युमिन : ऍल्युमिनियम

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligence

जर ‘P’ म्हणजे ‘+’, ‘Q’ म्हणजे ‘-’, ‘R’ म्हणजे ‘x’ आणि ‘S’ म्हणजे ‘÷’ असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 25 Q 6 R 3 P 12 S 2 = ?

  • )13✓ योग्य
  • )12
  • )9
  • )15

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

वार्षिक 12% दराने 1 वर्षासाठी ₹5,000 रकमेवरील अर्ध-वार्षिक गणना करून येणारे चक्रवाढ व्याज शोधा.

  • )₹624
  • )₹618✓ योग्य
  • )₹612
  • )₹600

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९२General Intelligence

खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे? (या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दांतील अक्षरे/व्यंजन/स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचे गट पाडले जाऊ नयेत)

  • )भाऊ : बहीण
  • )पती : पत्नी
  • )कुत्रा : सिंह✓ योग्य
  • )वडील : आई

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३General Intelligence

चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे, वेगळी असलेली शब्द-जोडी निवडा.

  • )डी-जीवनसत्त्व : बालशोथ
  • )आयोडीन : गलगंड
  • )सोडियम : मुदुदूस✓ योग्य
  • )लोह : रक्तक्षय

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे तुम्हाला ठरवायचे आहे. विधाने : सर्व बूट, विजारी आहेत. सर्व विजारी, टाय आहेत. काही विजारी, पट्टे आहेत. निष्कर्ष (I): काही पट्टे, टाय आहेत. निष्कर्ष (II): काही टाय, विजारी आहेत.

  • )फक्त निष्कर्ष I सत्य आहे.
  • )फक्त निष्कर्ष II सत्य आहे.
  • )निष्कर्ष I आणि II हे दोन्ही सत्य आहेत.✓ योग्य
  • )निष्कर्ष I किंवा निष्कर्ष II पैकी एकही सत्य नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६General Intelligence

दिलेल्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 36, 34, 30, 28, 24, ?

  • )26
  • )20
  • )23
  • )22✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९८General Intelligence

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा. 7, 13, 25, 43, 67, ?

  • )87
  • )90
  • )97✓ योग्य
  • )95

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९General Intelligence

एका विक्रेत्याने एका रुपयास 6 लिंबू खरेदी केले. 20% नफा मिळवण्यासाठी त्याने एका रुपयात किती लिंबू विकले पाहिजेत?

  • )6
  • )4
  • )5✓ योग्य
  • )8

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

BO 17 हा ZM 24 शी एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे, TD 24 हा RB 31 शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते VZ 36 शी संबंधित आहे?

  • )UZ 44
  • )SY 46
  • )TX 43✓ योग्य
  • )SY 43

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-06sep-shift1