स्पर्धाAI

तलाठी भरती २०२३

Combined — 01 Sep, Shift 2 · ९७ प्रश्न · रद्द ४ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

'दोन हात करणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )दोन हात करत लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढले.
  • )दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले.✓ योग्य
  • )दोन हात करत भरधाव वेगाने वाहण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावला.
  • )कृष्णभेटीस जाणाऱ्या सुदाम्याने दोन हात करत पोह्याची पुरचुंडी दिली.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'तटस्थ रहाणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )पत्नीने केलेल्या चवदार स्वयंपाकाचा रामरावांनी तटस्थ राहून आस्वाद घेत कौतुक केले.
  • )भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेटप्रेमींनी तटस्थ राहून जल्लोष केला.
  • )मुलाच्या अपघाताची बातमी ऐकताच आईने तटस्थ राहून हंबरडा फोडला.
  • )मुख्याध्यापकांनी तटस्थ राहून शाळेच्या वादविवाद स्पर्धेचे परीक्षण केले.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. पाल किडा पकडते.

  • )कर्तरी प्रयोग✓ योग्य
  • )पुराण कर्मणी
  • )भावे प्रयोग
  • )कर्मणी प्रयोग

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'तळपायाची आग मस्तकात जाणे' या शब्दप्रयोगाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • )रामरावांना लॉटरी लागल्याचे कळताच त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली.
  • )मुलाच्या प्रथम क्रमांकाची बातमी ऐकून आईची तळपायाची आग मस्तकात गेली.
  • )निलेशला बढती मिळाली आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली.
  • )महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाचून माझी तळपायाची आग मस्तकात जाते.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पी हळद आणि हो गोरी.

  • )काम करीत राहील, त्यालाच खायला मिळेल.
  • )कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे.✓ योग्य
  • )ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे ज्याला त्याला मिळते.
  • )कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अंगवळणी पडतो, त्याचे दुःख वाटत नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

'स्मृतिचित्रे' हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

  • )सावित्रीबाई फुले
  • )रणजीत देसाई
  • )शिवाजी सावंत
  • )लक्ष्मीबाई टिळक✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १५Marathi Language

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पिकते तिथे विकत नाही.

  • )थोडक्यावर निभाबणे.
  • )स्थानिक गोष्टींचे किंवा व्यक्तींचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही.✓ योग्य
  • )दुसऱ्याच्या वेदनांचे आपल्याला महत्त्व वाटत नाही.
  • )फुकटच्या वस्तूचा भरपूर फायदा करून घेणे.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Marathi Language

'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र कोणी लिहिले? Ans

  • )ना. स. इनामदार
  • )पु.ल.देशपांडे
  • )यशवंतराव चव्हाण✓ योग्य
  • )शिवाजी सावंत

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न १७Marathi Language

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. गरुडाकडून साप पकडला गेला. Ans

  • )कर्मणी प्रयोग
  • )पुराण कर्मणी
  • )समापन कर्मणी प्रयोग
  • )नवीन कर्मणी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Marathi Language

'ताव मारणे'या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

  • )समज देणे.
  • )मर्यादा सोडणे.
  • )भरपूर खाणे.✓ योग्य
  • )विचार न करता बोलणे..

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

खालीलनकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. रोहन बेजबाबदार युवक नाही.

  • )किती बेजबाबदार आहे रोहन!
  • )रोहन जबाबदार युवक आहे.✓ योग्य
  • )रोहन बेजबाबदार आहे का?
  • )किती जबाबदार आहे रोहन!

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २२Marathi Language

खालीलप्रार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. अन्वी, चांगला अभ्यास करशील?

  • )अन्वी, चांगला अभ्यास करशील तर पास होशील.
  • )अन्वी, चांगला अभ्यास कर.✓ योग्य
  • )अन्वी चांगला अभ्यास करते.
  • )अन्वी, किती चांगला अभ्यास करते!

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २४Marathi Language

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत बागेत जातात किंवा मंदिरात जातात.

  • )संकेतार्थीवाक्य
  • )केवलवाक्य
  • )संयुक्तवाक्य✓ योग्य
  • )मिश्रवाक्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २५Marathi Language

खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. रोख

  • )रंक
  • )उधार✓ योग्य
  • )रुची
  • )रोखठोक

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २६English Language

The given sentence has an error. Select the option that rectifies the error. If she had known him to be a bully, she might not marry him.

  • )If she had known him to be a bully, she may not have married him.✓ योग्य
  • )If she had known him to be a bully, she had not married him.
  • )If she had known him to be a bully, she would not marry him.
  • )If she had known him to be a bully, she should not marry him.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न २७english languageआयोगाने रद्द

Fill the appropriate punctuation mark in the blank space to complete the sentence meaningfully. Student ____ council elections were held every year.

  • )Student's council elections were held every year.
  • )No change
  • )Students- council elections were held every year.
  • )Student"s council elections were held every year.

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ३०English Language

Part of the given sentence that has been underlined contains an error. Select the option that rectifies the error. Ravi will emailed you the complete information by the end of the day.

  • )will have been emailed
  • )will email✓ योग्य
  • )will be emailed
  • )will emailing

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१english languageआयोगाने रद्द

Select the most appropriately punctuated option to complete the following sentence. The shepherd, finding his flock destroyed, exclaimed, ________

  • )"I have been rightly served, why did I trust my sheep to a wolf!!"
  • )I have been rightly served; why did I trust my Sheep to a Wolf.
  • )I have been rightly served- why did I trust my sheep to a wolf?
  • )"I have been rightly served. Why did I trust my sheep to a wolf?"

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ३२English Language

Select the most appropriate synonym of the given word. Sympathy

  • )Curiosity
  • )Discord
  • )Disdain
  • )Affinity✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३६English Language

Select the option that expresses the given sentence in active voice. The task will be finished by Radha in a fortnight.

  • )Radha will be finishing the task in a fortnight.
  • )Radha will finish the task in a fortnight.✓ योग्य
  • )Radha will have finished the task in a fortnight.
  • )Radha will be finish the task in a fortnight.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ३७English Language

The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains an error. Bill was very young / when they left, / and he could no longer remember / live in the house.

  • )and he could no longer remember
  • )when they left
  • )live in the house✓ योग्य
  • )Bill was very young

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८English Language

Select the most appropriate meaning of the given proverb. Avarice is the root of all evils

  • )Unemployment has forced youth to follow the wrong path.
  • )Dishonesty is the root cause of corruption.
  • )The desire to progress in life is the root cause of unsatisfaction.
  • )The desire to obtain and amass it is the reason human do evil things to one another.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०English Language

Select the option that expresses the given sentence in active voice. This building was designed by one of the best architects of those times.

  • )One of the best architects of those times designed this building.✓ योग्य
  • )The best building of those times was designed by one of the architects.
  • )This architect was designed for one of the best buildings of those times.
  • )One the best buildings of those times was designed by this architect.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४१English Language

The given sentence may have an error. Select the option that expresses the sentence correctly in its past tense. Select the option 'No error identified' if there is none. I hoped for a relaxed day, but my cousin and her five children were arriving unexpectedly.

  • )No error identified
  • )I had hoped for a relax day, but my cousin and her five children arrive unexpectedly
  • )I had hoped for a relaxing day, but my cousin and her five children arrived unexpectedly.✓ योग्य
  • )I will have hoped for a relax day, but my cousin and her five children arrived unexpectedly.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२English Language

Complete the following conversation using a negative question tag from the following options. A: Can you show me where his department is? B: Why? ________

  • )Haven't you been there before?✓ योग्य
  • )You went there before?
  • )Did you go there before?
  • )Shall we go there?

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३English Language

Select the most appropriate verbs to fill in the blank. Even though it ____________ continuously since last night, Mira still wants to ____________ with the concert.

  • )has been raining; carry on✓ योग्य
  • )raining; carrying on
  • )was raining; carrying on
  • )has had rain; carrying on

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५English Language

Select the INCORRECTLY spelt word in the given sentence. Growth in any business depends upon flexibility, adaptability and ettiquete awareness, which help in developing interpersonal relations with customers.

  • )flexibility
  • )ettiquete✓ योग्य
  • )adaptability
  • )interpersonal

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४६English Language

Select the most appropriate option to fill in the blank. I have a toothache, so I can't eat _____.

  • )1. real things
  • )2. something
  • )3. things
  • )4. anything✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४७English Language

Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains an error. He is famous of his exceptional talent at playing multiple instruments.

  • )1. multiple instruments
  • )2. of his exceptional talent✓ योग्य
  • )3. at playing
  • )4. He is famous

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ४९English Language

Select the most appropriate option to fill in the blank. Although he has been singing for ages, it will be the first time he has appeared ____ the Opera House.

  • )from
  • )at✓ योग्य
  • )on
  • )in

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५०English Language

Select the INCORRECTLY spelt word in the following sentence. He was a faithful friend and remarkable for his punctell attendance.

  • )punctell✓ योग्य
  • )remarkable
  • )attendance
  • )faithful

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ५२General Knowledge

‘इंडिया डिव्हायडेड (1946)’ चे लेखक खालीलपैकी कोण आहेत?

  • )बी. आर. आंबेडकर
  • )राजेंद्र प्रसाद✓ योग्य
  • )जवाहरलाल नेहरू
  • )सरोजिनी नायडू

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३General Knowledge

भूस्खलनाच्या घटनांमुळे कधीकधी बातम्यातून दिसून येणारे जोशीमठ हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

  • )अरुणाचल प्रदेश
  • )उत्तराखंड✓ योग्य
  • )सिक्कीम
  • )हिमाचल प्रदेश

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४General Knowledge

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) द्वारे 2022 च्या आपत्ती निवारण क्षमता वाढीच्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ते दिल्लीमधील विज्ञान भवनात झाले, तेव्हा खालीलपैकी कोण हे प्रमुख पाहुणे म्हणून तेथे उपस्थित होते?

  • )अमित शहा✓ योग्य
  • )रामनाथ कोविंद
  • )द्रौपदी मुर्मू
  • )नरेंद्र मोदी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५General Knowledge

भारताचे महानिबंधक (RGI) यांच्या नमुना नोंदणी प्रणाली (SRS) परिपत्रकानुसार, राष्ट्रीय स्तरावरील अर्भक मृत्यू दर (IMR) हा 2015 मध्ये प्रति 1000 जिवंत जन्मामागे 37 इतका होता, तो 2019 मध्ये प्रति 1000 जिवंत जन्मामागे ____ इतका कमी झाला.

  • )32
  • )30✓ योग्य
  • )31
  • )33

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६General Knowledge

खालीलपैकी कोणते 'चांगले कोलेस्टेरॉल' म्हणून ओळखले जाते?

  • )अत्यल्प-घनता असलेले लिपोप्रोटिन
  • )उच्च-घनता असलेले लिपोप्रोटिन✓ योग्य
  • )ट्रायग्लिसराइड
  • )अल्प-घनता असलेले लिपोप्रोटिन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७General Knowledge

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ('PMMVY') अंतर्गत, माता आणि बाल आरोग्याशी संबंधित विशिष्ट परिस्थितीबाबतच्या अटींचे पालन केल्यास, कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यासाठी गरोदर महिला आणि स्तनदा माता (PW&LM) च्या बँक/पोस्ट ऑफिस खात्यात ____ चे रोख प्रोत्साहन थेट दिले जाते.

  • )₹20,000
  • )₹15,000
  • )₹10,000
  • )₹5,000✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८General Knowledge

खालीलपैकी कोणी शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी पूना सार्वजनिक सभा (पूना पब्लिक सोसायटी) स्थापन केली?

  • )ईश्वरचंद्र विद्यासागर
  • )महादेव गोविंद रानडे✓ योग्य
  • )दयानंद सरस्वती
  • )बाळ गंगाधर टिळक

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९General Knowledge

नागरिकत्व अधिनियम, 1955 च्या कलम 5(1) अंतर्गत _________ द्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते.

  • )वंशपरंपरा
  • )जन्म
  • )नागरिकीकरण
  • )नोंदणी✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०General Knowledge

खालीलपैकी कोणी ईपीएफओ (EPFO) सदस्यांसाठी ई-पासबुक सुरु केले?

  • )सुब्रह्मण्यम जयशंकर
  • )नितीन गडकरी
  • )नरेंद्रसिंह तोमर
  • )भूपेंद्र यादव✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१General Knowledge

भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे?

  • )दमण आणि दीव
  • )पुदुच्चेरी
  • )लक्षद्वीप
  • )दादरा आणि नगर हवेली✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४General Knowledge

भारतीय राज्यघटनेतील तरतुदींबाबतचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  • )केंद्रीय संसद आणि राज्य विधानमंडळे हे समवर्ती सूचीमधील कायदे लागू करू शकतात.
  • )1950 च्या संविधानात मुळात नागरिकांच्या कर्तव्यांची कोणतीही यादी नव्हती.
  • )राज्यघटनेच्या पहिल्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे की भारत हा राज्यांचा संघ आहे.
  • )मार्गदर्शक तत्त्वे न्याय्य आहेत आणि मूलभूत अधिकार न्याय्य नाहीत.✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५General Knowledge

खालीलपैकी कोण प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते होते?

  • )डॉ. आंबेडकर, महात्मा फुले आणि पेरियार
  • )एम. जी. रानडे, आर. जी. भांडारकर आणि एन. जी. चंदावरकर✓ योग्य
  • )गांधीजी, पंडित नेहरू आणि सरदार पटेल
  • )मौलाना आझाद, डॉ. इक्बाल आणि सर सय्यद अहमद खान

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७General Knowledge

मध्ये 31 अनुच्छेद आहेत.

  • )मानवी हक्क अधिनियम, 1993
  • )माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000
  • )परिसिमन अधिनियम, 2002
  • )माहिती अधिकार अधिनियम, 2005✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८General Knowledge

दख्खनच्या पठाराचा योग्य आकार खालीलपैकी कोणता आहे?

  • )चौरस
  • )त्रिकोणी✓ योग्य
  • )वर्तुळाकार
  • )षटकोनी

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ६९General Knowledge

मार्च 1784 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोणासोबतच्या मंगळूरच्या तहावर स्वाक्षरी करून दुसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धाची समाप्ती केली?

  • )हैदर अली
  • )सिराजुद्दौला
  • )वाजिद अली शाह
  • )टिपू सुलतान✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०General Knowledge

शेष भारत (रेस्ट ऑफ इंडिया) संघाने 2022-23 ची इराणी ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

  • )क्रिकेट✓ योग्य
  • )फुटबॉल
  • )हॉकी
  • )बॅडमिंटन

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७१General Knowledgeआयोगाने रद्द

समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. 1) त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 2) 'सार्वजनिक सत्य धर्म' आणि 'गुलामगिरी' ही ज्योतिबा फुले यांची कार्ये आहेत.

  • )फक्त 1
  • )1 आणि 2 दोन्ही
  • )1 किंवा 2 पैकी एकही नाही
  • )फक्त 2

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ७२General Knowledge

राष्ट्रपती हे नवनियुक्त ________ यांना पदाची शपथ देतात.

  • )मुख्यमंत्री
  • )राज्याचे कॅबिनेट मंत्री
  • )मुख्य माहिती आयुक्त (CIC)✓ योग्य
  • )सीबीआय (CBI) प्रमुख

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७३General Knowledge

विंडोज 10 हे विंडोजच्या कोणत्या फॅमिलीतील आहे?

  • )विंडोज AP
  • )विंडोज 7X
  • )विंडोज NET
  • )विंडोज NT✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ७४General Knowledge

कोणता मूलभूत हक्क हा सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत धर्म किंवा वंशावर आधारित कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला प्रतिबंध करतो?

  • )अनुच्छेद 17
  • )अनुच्छेद 16(2)✓ योग्य
  • )अनुच्छेद 15(2)
  • )अनुच्छेद 18(2)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५General Knowledge

प्रखर प्रकाशाच्या संपर्कात आल्याने, हरितद्रव्याच्या (chlorophyll) रासायनिक संरचनेचे अवक्रमण (degrades) होते, तेव्हा त्याला ______ असे म्हणतात.

  • )प्रकाशऑक्सिडन (photooxidation)✓ योग्य
  • )प्रकाशीय श्वसन (photorespiration)
  • )प्रकाशफॉस्फोरिलन (photophosphorylation)
  • )प्रकाश-अपघटन (photolysis)

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६General Intelligence

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. 23, 26, 31, 38, 49, ?

  • )64
  • )61
  • )62✓ योग्य
  • )67

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७General Intelligence

45.5 लिटर तेलाला 5 डब्यांमध्ये समान प्रमाणात भरायचे आहे. प्रत्येक डब्यांमध्ये भरल्या जाणाऱ्या तेलाचे प्रमाण किती आहे?

  • )8.7 l
  • )9.1 l✓ योग्य
  • )8.1 l
  • )9.7 l

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८General Intelligence

तेरा क्रमागत पूर्णांकांची सरासरी 36 आहे. या 13 पूर्णांकांपैकी सर्वात लहान पूर्णांकाच्या दुप्पटीला या 13 पूर्णांकांपैकी सर्वात मोठ्या पूर्णांकात मिळवल्यास बेरीज किती येईल?

  • )102✓ योग्य
  • )121
  • )115
  • )110

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९General Intelligence

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे तुम्हाला ठरवायचे आहे. विधाने : सर्व उषा, बेडशीट आहेत. काही बेडशीट, पडदे आहेत. एकही पडदा, दरवाजा नाही. निष्कर्ष (I): काही दरवाजे, बेडशीट असू शकतात. निष्कर्ष (II): एकही उशी, दरवाजा नाही.

  • )निष्कर्ष I आणि II हे दोन्ही सत्य आहेत.
  • )फक्त निष्कर्ष I सत्य आहे.✓ योग्य
  • )फक्त निष्कर्ष II सत्य आहे.
  • )निष्कर्ष I किंवा निष्कर्ष II पैकी एकही सत्य नाही.

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१General Intelligence

सुक्या मेव्याने भरलेल्या एका डब्याचे वजन 12.650 kg आहे. सुक्या मेव्याचे वजन 9 kg 800 gm असल्यास, रिकाम्या डब्याचे ग्रॅममधील वजन शोधा.

  • )2725 gm
  • )2825 gm
  • )2850 gm✓ योग्य
  • )2750 gm

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८२General Intelligence

एक व्यक्ती 62.4 km/h वेगाने गाडी चालवतो. तो 10 मिनिटांत किती मीटर अंतर पार करतो?

  • )12,480
  • )10,400✓ योग्य
  • )6,240
  • )5,200

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८४General Intelligence

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? 42, 56, 84, 126, ?, 252

  • )210
  • )182✓ योग्य
  • )238
  • )154

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८५General Intelligence

ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर-समूह संबंधित आहेत, त्याच प्रकारे संबंधित अक्षर-समूह असलेला संच निवडा. EI - GD - FJ

  • )PT - RO - QV
  • )NR - PM - OT
  • )LP - NK - MR
  • )JN - LI - KO✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६General Intelligence

जर 'A' म्हणजे '+', 'B' म्हणजे '-', 'C' म्हणजे 'x' आणि 'D' म्हणजे '÷' असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल? 6 B 18 D 2 A 7 C 3 = ?

  • )17
  • )18✓ योग्य
  • )15
  • )20

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७General Intelligenceआयोगाने रद्द

अक्षर, संख्या, चिन्हे यांच्या दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी) E @ Y 7 M ^ Z 5 % A 9 + 8 6 S * P 3 F # X (उजवी) अशा किती संख्या आहेत, ज्यांच्या ताबडतोब आधी एक चिन्ह आहे आणि ताबडतोब नंतर एक अक्षर देखील आहे?

  • )1
  • )0
  • )3
  • )2

स्रोत: आक्षेपांवरील अधिकृत निर्णय — आयोगाने प्रश्न रद्द / सर्वांना गुण. गुणांकनातून वगळला.

प्रश्न ८८General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? KAM, QDO, WGQ, CJS, ?

  • )JNV
  • )IMU✓ योग्य
  • )KNU
  • )JMT

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ८९General Intelligence

वार्षिक आकारणीच्या बाबतीत, चक्रवाढ व्याजाने एक रक्कम 5 वर्षांत स्वतःच्या दुप्पट होते. ती स्वतःच्या आठ पट रक्कम होण्यासाठी लागणारा कालावधी किती असेल?

  • )10 वर्ष
  • )12 वर्ष
  • )20 वर्ष
  • )15 वर्ष✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०General Intelligence

एक व्यक्ती 25% नफ्याने एक वस्तू विकतो. जर त्याने ती 20% कमी दराने विकत घेतली असती आणि ₹10.50 कमी दराने विकली असती, तर त्याला 30% नफा झाला असता. त्या वस्तूची मूळ किंमत शोधा.

  • )₹125
  • )₹100
  • )₹25
  • )₹50✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१General Intelligence

ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर-समूह संबंधित आहेत, त्याच प्रकारे संबंधित अक्षर-समूह असलेला संच निवडा. DG - EH - JL

  • )IL - JM - OP
  • )JM - KN - PR✓ योग्य
  • )PS - QT - VY
  • )LO - MP - RS

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२General Intelligence

एक व्यापारी त्याच्या मालाला मूळ किमतीच्या 20% जास्त चिन्हांकित करतो आणि त्यावर 15% सूट देतो. त्याची नफ्याची टक्केवारी शोधा.

  • )4%
  • )1%
  • )3%
  • )2%✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३General Intelligence

एक पोलिस हा 500 मीटर अंतरावरुन एका चोराला पाहतो. पोलिसांनी पाठलाग सुरु केल्यावर, चोरही पळू लागतो. जर चोराचा वेग 10 km/h आणि पोलिसाचा वेग 12 km/h आहे, तर चोर हा पकडला जाण्यापूर्वी किती अंतर धावला असेल?

  • )1.1 km
  • )1.5 km
  • )2 km
  • )2.5 km✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४General Intelligence

वार्षिक 5% व्याजदराने ₹2,100 या रकमेवर ₹525 चे सरळव्याज मिळण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे?

  • )3 वर्षे
  • )5 वर्षे✓ योग्य
  • )6 वर्षे
  • )8 वर्षे

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९५General Intelligence

वर्णक्रमानुसार चार अक्षर-समूह दिले आहेत त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळा आहे. वेगळा असलेला अक्षर-समूह निवडा.

  • )CGJ
  • )EIL
  • )OSU✓ योग्य
  • )MQT

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

प्रश्न ९६General Intelligence

दोन तोट्या अनुक्रमे 10 तासांत आणि 8 तासांत एक टाकी भरू शकतात. तिसरी तोटी तिला 15 तासांत रिकामी करू शकते. या सर्व तोट्या एकत्रितपणे उघडल्यास, रिकामी टाकी भरायला किती वेळ लागेल?

  • )7 तास
  • )6 13/19 तास
  • )6 तास
  • )6 6/19 तास✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७General Intelligence

इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारलेल्या, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे? PDS, OFV, NHY, MJB, ?

  • )NMF
  • )MMF
  • )MNE
  • )LLE✓ योग्य

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८General Intelligence

जर पुस्तकाच्या एका स्तंभात मुद्रित केलेल्या 9 ओळींमध्ये 36 शब्द असतील, तर 51 ओळी असलेल्या स्तंभात किती शब्द असतील?

  • )196
  • )204✓ योग्य
  • )208
  • )192

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००General Intelligence

खालील चारपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा.

  • )TPN✓ योग्य
  • )MIF
  • )NJG
  • )ZVS

स्रोत: TCS अधिकृत प्रतिसाद पत्रक.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/talathi-2023-01sep-shift2