स्पर्धाAI

MPSC गट क २०२४

Common Paper II · ९१ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Quantitative Aptitudeआयोगाने रद्द

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सूचवा.

  • )X 6 B
  • )F 4 Q
  • )F 4 P
  • )M 8 Q

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न Logical Reasoning

खालील वेन आकृतीनुसार, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडला आहे ?

  • )Mathematics
  • )Science✓ योग्य
  • )Geography
  • )History

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

श्याम हा रामपेक्षा उंच आहे. राम हा अमिरपेक्षा उंच आहे. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. तर सर्वात कमी उंच कोण ?

  • )समीर
  • )शिशिर
  • )अमिर✓ योग्य
  • )राम

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

दिलेल्या उदाहरणात, पहिल्या तीन मांडण्यांचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते निवडा.

  • )300
  • )529
  • )361
  • )441✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

एक विशिष्ट रक्कम A, B आणि C मध्ये अनुक्रमे 2 : 3 : 4 या प्रमाणात वितरीत करायची होती, परंतु ती चुकीने अनुक्रमे 7 : 2 : 5 या प्रमाणात वितरित केली गेली. याचा परिणाम म्हणून B ला रु. 30,000/- कमी मिळाले. तर ती रक्कम किती होती ?

  • )रु. 1,57,500/-✓ योग्य
  • )रु. 1,54,000/-
  • )रु. 57,500/-
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न Logical Reasoning

समजा तुमच्या घड्याळात नऊ वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे आहे, तर मिनिट काटा कोणत्या दिशेला राहील ?

  • )यापैकी नाही / None of these
  • )पश्चिम / West
  • )दक्षिण / South
  • )उत्तर / North✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

पंकज, किरण व अनिल या तिघांना रु. 1,000/-, 2 : 3 : 5 या प्रमाणात वाटले. तर किरणच्या वाट्याला किती रुपये येतील ?

  • )200 रु. / Rs. 200/-
  • )250 रु. / Rs. 250/-
  • )300 रु. / Rs. 300/-✓ योग्य
  • )350 रु. / Rs. 350/-

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Current Affairs

खालीलपैकी योग्य विधान/ने निवडा : अ. PRERNA चा 15 जानेवारी 2024 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीत गुजरातदमधील वाडनगर येथील एका स्थानिक शाळेत प्रायोगिक टप्पा सुरु झाला. ब. PRERNA हा साप्ताहिक निवासी कार्यक्रम आहे, जो इयत्ता V ते VIII पर्यंतच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी संरचित केलेला आहे.

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त ब
  • )अ व ब दोन्हीही
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२History

भारतीय संसदेच्या नूतन इमारतीमध्ये स्थापित करण्यात आलेला 'सेंगोल' राजदंड हा कोणत्या साम्राज्याचे/राजवटीचे प्रतीक आहे ?

  • )चोल✓ योग्य
  • )मौर्य
  • )चालुक्य
  • )मराठा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Current Affairs

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अरिजित सिंग ला ________ गीतासाठी प्रदान करण्यात आला.

  • )जो तुम साथ हो
  • )तेरे हवाले
  • )झूमे जो पठाण
  • )केसरीया✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Current Affairs

जानेवारी 2025 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिव पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

  • )अचलकुमार ज्योती
  • )जय शहा
  • )देवजीत सैकिया✓ योग्य
  • )सौरव गांगुली

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Current Affairs

जोड्या लावा – (अर्जुन पुरस्कार, 2024). अ. वांतिका अग्रवाल / A. Vantika Agrawal ब. जर्मनप्रीत सिंह / B. Jarmanpreet Singh क. अभय सिंह / C. Abhay Singh ड. स्वप्नील कुसळे / D. Swapnil Kusale i. नेमबाजी / i. Shooting ii. स्क्वॅश / ii. Squash iii. हॉकी / iii. Hockey iv. बुद्धिबळ / iv. Chess

  • )iv ii iii i
  • )iii iv ii i
  • )iii i ii iv
  • )iv iii ii i✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Current Affairs

दरवर्षी कोणता दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो ?

  • )10 मार्च / 10 March
  • )20 मार्च / 20 March✓ योग्य
  • )23 मार्च / 23 March
  • )02 मार्च / 02 March

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Geography

लेक व्हिक्टोरिया खालीलपैकी कोणत्या देशांच्या सीमानी वेढलेले आहे ?

  • )टांझानिया, युगांडा आणि केनिया / Tanzania, Uganda and Kenya✓ योग्य
  • )इथिओपिया, सुदान आणि काँगो / Ethiopia, Sudan and Congo
  • )नामिबिया, झांबिया आणि अंगोला / Namibia, Zambia and Angola
  • )सुदान, सोमालिया आणि नामिबिया / Sudan, Somalia and Namibia

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Current Affairs

पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्राप्त झाला आहे ?

  • )प्रतिभाताई पाटील / Pratibhattai Patil
  • )देवेंद्र फडणवीस / Devendra Fadanvis
  • )सुधा मूर्ती / Sudha Murthy✓ योग्य
  • )नारायण राणे / Narayan Rane

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Quantitative Aptitude

समजा A, B आणि C एखादे काम अनुक्रमे 20, 30 व 60 दिवसांत पूर्ण करू शकतात. A नेहमी काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी B आणि C त्याला मदत करतात. तर या प्रकारे काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील ?

  • )12 दिवस
  • )15 दिवस✓ योग्य
  • )16 दिवस
  • )18 दिवस

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Quantitative Aptitude

प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिंपियाड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांमधील फरकाच्या किती पट आहे ?

  • )1
  • )2
  • )3
  • )4✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Quantitative Aptitude

खाली दिलेल्या जोड स्तंभालेखात हा वेगवेगळ्या वर्षी घेतलेल्या प्रवेश परीक्षेची माहिती दर्शवितो. CEE २००० ते CEE २००६ पर्यंत प्रश्न किती टक्क्यांनी कमी झाले ?

  • )37.5 %
  • )27.27 %✓ योग्य
  • )15 %
  • )80 %

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Quantitative Aptitude

एका संख्येला ५ ने भागले असता बाकी ३ उरते. जर त्याच संख्येच्या वर्गाला ५ ने भागले तर बाकी काय असेल ?

  • )
  • )
  • )
  • )✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Quantitative Aptitude

एका शेतकऱ्याने 20,000 रु. कर्जऊ घेतले. त्याने ही रक्कम व त्यावरील 2,800 रु. हे एकूण व्याज 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 रु. कमी आहे. तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती ?

  • )2,450 रु.✓ योग्य
  • )2,400 रु.
  • )2,350 रु.
  • )2,250 रु.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Quantitative Aptitude

सोबतच्या पाय आकृतीत (pie diagram) कुशल कामगारांचे वर्गीकरण दर्शविले आहे. जर उत्पादन क्षेत्रात 450 कामगार कार्यरत असतील तर बांधकाम क्षेत्रात किती कुशल कामगार कार्यरत असतील ?

  • )360✓ योग्य
  • )180
  • )72
  • )90

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Logical Reasoning

खालील वेन आकृतीचा अभ्यास करा. i. आयत म्हणजे डॉक्टर दर्शविते. ii. त्रिकोण म्हणजे गायक दर्शविते. iii. वर्तुळ म्हणजे कलाकार दर्शविते. iv. चौकोन म्हणजे खेळाडू दर्शविते. खालीलपैकी कोण गायक किंवा खेळाडू नाही परंतु कलाकार आणि डॉक्टर आहे ?

  • )
  • )
  • )
  • )१२✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Quantitative Aptitude

धातूच्या तीन भरीव घनांना वितळवून एक मोठा भरीव घन तयार करण्यात आला. तीन घनांच्या बाजूंची लांबी 3 cm, 4 cm व 5 cm असल्यास त्या तीन घनांच्या एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर किती ?

  • )5 : 18
  • )10 : 9
  • )25 : 18✓ योग्य
  • )50 : 9

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ३०Quantitative Aptitude

एक ट्रेन पूर्ण प्रवासी घेऊन निघते. पहिल्या स्थानकावर ती एक तृतीयांश प्रवासी उतरवते आणि 280 अधिक घेते. दुसऱ्या स्थानकावर नवीन एकूण पैकी अर्धे प्रवासी उतरवते व 12 अधिक घेते. तिसऱ्या स्थानकावर पोहोचल्यावर 248 प्रवासी त्यात असल्याचे माहीत होते. तर सुरुवातीची प्रवासी संख्या काढा.

  • )268
  • )288✓ योग्य
  • )198
  • )192

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Polity

महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम, 2015च्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये वारंवार केल्या जाणाऱ्या कसूरी बदल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती देण्यात आली आहे ?

  • )कलम 12✓ योग्य
  • )कलम 14
  • )कलम 40
  • )कलम 28

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Polity

माहिती अधिकार कायदा, 2005च्या कलम 6(3) नुसार, जेथे माहितीसाठी विनंती करणारा अर्ज सार्वजनिक प्राधिकरणाकडे केला, जी दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे आहे अशा वेळी, ज्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असा अर्ज केला आहे ते खालीलपैकी या कमाल कालावधीमध्ये तो अर्ज त्या दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करेल ______.

  • )अर्ज प्राप्त झाल्या तारखेपासून सात दिवसांच्या आत
  • )अर्ज प्राप्त झाल्या तारखेपासून पाच दिवसांच्या आत✓ योग्य
  • )अर्ज प्राप्त झाल्या तारखेपासून तीन कामकाजाच्या दिवसांच्या आत
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

खालीलपैकी योग्य कथने ओळखा. अ. कोणतीही व्यक्ती, ती भारतीय नागरिक आणि 35 वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही. ब. राज्यपाल, संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधान मंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही. क. जेव्हा एकाच व्यक्तीस दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल त्याबाबतीत, राज्यपालास द्यावयाच्या वित्तलब्धी आणि भत्ते यांचा खर्च, संसद आदेशाद्वारे निर्धारित करील अशा प्रमाणात त्या राज्यांमध्ये विभागून दिला जाईल.

  • )फक्त अ, ब✓ योग्य
  • )फक्त ब, क
  • )फक्त अ, क
  • )वरीलपैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा. अ. प्रत्येक राज्याचा राज्यपाल, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महा अधिवक्ता म्हणून नियुक्त करील. ब. महा अधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करील आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करील असे पारिश्रमिक मिळेल.

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त ब
  • )अ व ब दोन्ही
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Polity

खालील राज्यांची त्यांच्या विधान परिषदेच्या जागांनुसार चढत्या क्रमाने मांडणी करा. अ. महाराष्ट्र ब. आंध्र प्रदेश क. उत्तर प्रदेश ड. तेलंगणा ई. कर्नाटक

  • )ड, ब, ई, अ, क✓ योग्य
  • )ड, ई, ब, अ, क
  • )ड, ब, अ, ई, क
  • )ड, अ, ब, ई, क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Polity

संविधान सभेबाबत अयोग्य कथन ओळखा. अ. ‘सिंह’ हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. ब. बी. एन. राव यांची संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली. क. एच. व्ही. आर. अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते.

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त ब
  • )फक्त क
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Polity

खालीलपैकी अयोग्य कथन/ने ओळखा. एखादी व्यक्ती, भारतीय नागरिक, आणि ________________ असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही. अ. एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा दोन किंवा अधिक न्यायालयांची निदान सलग दहा वर्ष न्यायाधीश. ब. एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा दोन किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग पाच वर्ष अधिवक्ता. क. राष्ट्रपतीच्या मते विख्यात विधिवेत्ता.

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )अ व ब दोन्ही✓ योग्य
  • )अ व क दोन्ही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Polity

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा. अ. अनुच्छेद 137 – संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या किंवा अनुच्छेद 145 अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांना अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाला त्याने अधिघोषित केलेला कोणताही न्यायनिर्णय किंवा केलेला आदेश याचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार असेल. ब. अनुच्छेद 141 – सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा, भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असेल.

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )अ व ब दोन्ही✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Polity

मुख्यमंत्र्यांबाबत योग्य कथने ओळखा. अ. तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो. ब. तो झोनल कौन्सिलचा अध्यक्ष असतो. क. तो आंतर-राज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो. ड. तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो.

  • )फक्त अ, ब, ड
  • )फक्त अ, क, ड
  • )फक्त क, ब
  • )फक्त अ, ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Polity

खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही ?

  • )स्मारके आणि सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे✓ योग्य
  • )राष्ट्रगीताचा आदर करणे
  • )नैसर्गिक वातावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे
  • )सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Polity

जोड्या लावा – (राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वांवरील टीका).

  • )अ – iv, ब – i, क – ii, ड – iii✓ योग्य
  • )अ – iii, ब – ii, क – i, ड – iv
  • )अ – ii, ब – i, क – iii, ड – iv
  • )अ – iv, ब – ii, क – i, ड – iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Polity

संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेददात संरक्षण दिले आहे ?

  • )अनुच्छेद 105✓ योग्य
  • )अनुच्छेद 108
  • )अनुच्छेद 109
  • )अनुच्छेद 115

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Maharashtra

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण कुटुंबांसाठी स्वच्छतागृह की योजना कोणत्या वर्षी सुरु केली ?

  • )१९९५✓ योग्य
  • )१९६०
  • )१९९२
  • )१९९०

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Polity

खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते ?

  • )सी. राजगोपालाचारी✓ योग्य
  • )मोहम्मद सादूल्ला
  • )बी. एल. मिट्टर
  • )एन. गोपाळस्वामी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१History

भाऊ महाजन यांनी खालील वर्तमान पत्रे सुरु केली.

  • )शतपत्रे, ज्ञानोदय व ज्ञानप्रकाश
  • )ज्ञानदर्शन, धुमकेतू व प्रभाकर✓ योग्य
  • )प्रभाकर, ज्ञानदर्शन व इंदुप्रकाश
  • )धुमकेतू, ज्ञानप्रकाश व प्रभाकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२History

31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुणाच्या अध्यक्षतेखाली भरले ?

  • )मोतीलाल नेहरू
  • )लाला लजपत राय✓ योग्य
  • )श्रीपाद अमृत डांगे
  • )केशवराव जोगळेकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३History

२१ मार्च १९२० रोजी कागळ जहागिरीतल्या माणगाव येथे भरलेल्या परिषदेत खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?

  • )आप्पासाहेब दादगोंडा पाटील
  • )दादासाहेब गायकवाड✓ योग्य
  • )तुकाराम गणेशचार्य
  • )गंगाराम कांबळे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Geography

ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्ह्यातल्या उंबरगाव, डहाणू, पालघर आणि जव्हार संस्थानच्या भागात कोणत्या आदिवासी जमातीची वस्ती अधिक होती ?

  • )कोकणा आदिवासी जमात
  • )महादेव कोळी
  • )वारली✓ योग्य
  • )भिल्ल

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५History

नारायण ग. चंदावरकर यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? अ. २८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेस स्थापनेच्या अधिवेशनाला नारायण ग. चंदावरकर उपस्थित राहिले. ब. नारायण ग. चंदावरकर यांच्या मते हिंदुस्थानच्या वाढल्या दारिद्र्याचे कारण वाढती लोकसंख्या आहे. क. नारायण ग. चंदावरकर यांनी १८८९ च्या मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिश सरकारच्या वाढल्या लष्करी खर्चावर टीका केली. ड. नारायण ग. चंदावरकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु पद भूषविले.

  • )फक्त अ आणि ब
  • )वरीलपैकी सर्व
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त अ, क आणि ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६History

१९१८ फेब्रुवारीत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या निमंत्रणावरून अखिल भारतीय हिंदू परिषदेस हजर राहण्यासाठी अलाहाबाद येथे खालीलपैकी कोण गेले ?

  • )लोकमान्य टिळक
  • )स्वा. वि. दा. सावरकर
  • )डॉ. कुर्तकोटी✓ योग्य
  • )न्यायमूर्ती रानडे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७History

१९४५ मध्ये ‘आझाद दल’ ही भूमिगत कार्यकर्त्यांची लष्करी संघटना कोणी उभारली ?

  • )नागनाथ नायकवडी✓ योग्य
  • )यशवंतराव चव्हाण
  • )नाना पाटील
  • )बापूसाहेब लाड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८History

सार्वजनिक सभा या नामवंत सभेने (संस्थेने) २४ सप्टेंबर १८९४ मध्ये पुणे येथे कोणाचा सत्कार केला ?

  • )न्यायमूर्ती रानडे
  • )छत्रपती शाहू✓ योग्य
  • )महात्मा फुले
  • )लोकमान्य टिळक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९History

पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. अ. मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना स्थापना. ब. पहिला फॅक्टरी कायदा. क. कामगार हितवर्धक सभा स्थापन करण्यात आली. ड. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना.

  • )ब, अ, क आणि ड✓ योग्य
  • )ब, क, ड आणि अ
  • )क, ड, अ आणि ब
  • )ड, अ, ब आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Environment

ताजमहालाला औद्योगिक प्रदूषणापासून वाचवण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका कोणी दाखल केली होती ?

  • )सुंदरलाल बहुगुणा
  • )रामचंद्र गुहा
  • )कपिल सिब्बल
  • )महेश चंद्र मेहता✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Environment

खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतातील संयुक्त वन व्यवस्थापनाचा पहिला ठराव मंजूर केला ?

  • )पश्चिम बंगाल
  • )ओडिशा✓ योग्य
  • )कर्नाटक
  • )हिमाचल प्रदेश

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Environment

1972 मध्ये झालेल्या जागतिक वसुंधरा परिषदेमध्ये पश्चिम घाटाची गणना जगातील कितव्या क्रमांकाचा अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला आहे ?

  • )7
  • )9
  • )18✓ योग्य
  • )16

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Environment

भारतीय वन सर्वेक्षणानुसार, २०१३ ते २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खारफुटीच्या वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे ?

  • )पालघर
  • )रायगड✓ योग्य
  • )रत्नागिरी
  • )सिंधुदुर्ग

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Geography

खालील महाराष्ट्रातील नदी खोऱ्याना उत्तरेकडून तर दक्षिणेकडे अशा क्रमाने मांडा. अ. कृष्णा नदी खोरे ब. भीमा नदी खोरे क. तापी नदी खोरे ड. प्रवरा नदी खोरे

  • )अ, ब, क, ड
  • )ड, अ, ब, क
  • )ड, क, ब, अ
  • )क, ड, ब, अ✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Maharashtra

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील ______ प्रशासकीय विभागात सर्वात कमी बाल्य लिंग गुणोत्तर होते.

  • )कोंकण
  • )औरंगाबाद✓ योग्य
  • )नाशिक
  • )अमरावती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Environment

क्योतो प्रोटोकॉल अंतर्गत विकसित देशामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये तो कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करण्याची गरज आहे ?

  • )हरित वायूचे उत्सर्जन✓ योग्य
  • )झाडे तोडण्यावर नियंत्रण
  • )घरगुती कचरा
  • )रासायनिक शेती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Science

खालील जोड्या जुळवा. वनस्पती अ. हिरडा ब. खैर क. रोशा गवत ड. तेंदू पाने उत्पादने i. सुगंधी तेल ii. टॅनिन iii. बिडी iv. काथा

  • )अ – iv, ब – iii, क – i, ड – ii
  • )अ – i, ब – iv, क – ii, ड – iii
  • )अ – ii, ब – iv, क – i, ड – iii✓ योग्य
  • )अ – ii, ब – iii, क – iv, ड – i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Science

२२० V (व्होल्ट) घरगुती विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या व ०.२५ A (अँम्पीअर) विद्युत धारा वाहून नेणाऱ्या बल्बची विद्युत शक्ती (पॉवर वॅटेज) किती असेल ?

  • )२५ W (वॅट) / 25 W
  • )२२ W (वॅट) / 22 W
  • )५५ W (वॅट) / 55 W✓ योग्य
  • )१०० W (वॅट) / 100 W

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Science

कोणता किरणोत्सर्गी घटक अणुऊर्जा प्रकल्पामध्ये इंधन म्हणून वापरतात ?

  • )रेडियम / Radium
  • )युरेनियम / Uranium✓ योग्य
  • )पोलोनियम / Polonium
  • )हेलियम / Helium

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Science

बरोबर विधान निवडा. i. आवाज निर्वात पोकळीतून प्रवास करतो. ii. ऐकू येणाऱ्या आवाजाची वारंवारता 20 Hz ते 20000 Hz असते. iii. गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताची वारंवारता वेगळी असते. iv. गतिमान असणाऱ्या आवाजाच्या स्रोताच्या वारंवारतेत बदल म्हणजे डॉप्लर परिणाम होय.

  • )फक्त i विधान बरोबर आहे
  • )फक्त i, ii विधाने बरोबर आहे
  • )फक्त ii, iii, iv विधाने बरोबर आहे✓ योग्य
  • )फक्त i, ii, iii विधाने बरोबर आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Environment

बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) व केमिकल ऑक्सिजन डिमांड (COD) या संज्ञा कशाची प्रदूषण पातळी मोजण्यासाठी वापरतात ? अ. हवा ब. ध्वनी क. माती ड. पाणी

  • )ब आणि क फक्त / b and c only
  • )अ आणि ब फक्त / a and b only
  • )क आणि ड फक्त / c and d only
  • )ड फक्त / d only✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Science

खाली दिलेल्या पर्यायांपैकी, कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड चे सामान्य नाव ______ असे आहे. अ. मोरचूद ब. टाकणखार क. ग्रीन व्हीट्रीओल ड. विरंजक चूर्ण

  • )फक्त अ आणि ब चुकीचे आहेत / Only a and b are incorrect
  • )फक्त ड बरोबर आहे / Only d is correct✓ योग्य
  • )फक्त क बरोबर आहे / Only c is correct
  • )फक्त ब बरोबर आहे / Only b is correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Science

खालीलपैकी कोणते माशाचे उदाहरण नाही ?

  • )स्कोलिओडॉन / Scoliodon
  • )हिप्पोकॅम्पस / Hippocampus
  • )इक्थिओफिस / Ichthyophis✓ योग्य
  • )लेबिओ / Labeo

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Science

संबंधित फायलम व त्यातील प्राण्याची जोडी लावा. फायलम a. प्रोटोझुआ b. सिलेंटेरटा c. आर्थ्रोपोडा d. इकिनोडर्म्याटा प्राणी i. बटरफलाय ii. प्लाझमोडियम iii. स्टारफिश iv. हायड्रा

  • )iii iv i ii
  • )ii iv i iii✓ योग्य
  • )i iii ii iv
  • )iv iii ii i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Science

पिकांवर होणाऱ्या किटकविकारांवर उपाय करण्यासाठी जास्त टिकाऊ व पर्यावरणपूरक अशी पुढील दिल्या प्रमाणे कोणते उपाय जास्त उपयोगी आहेत ? i. रासायनिक किटकनाशके ii. मायकोराईझा (मूळकवक) iii. पिक रोटेशन (फिरवणे) iv. दगडफुले वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )i, ii, iii आणि iv
  • )i, ii आणि iv
  • )ii आणि iii✓ योग्य
  • )i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Science

वनस्पतींचे पहिले नैसर्गिक वर्गीकरण कुठल्या वर्षी आणि कोणी सादर केले होते ?

  • )१७८९, अँटोईन लरँट डी जुसी✓ योग्य
  • )१८३६, एनी कॅसिमीर डी कॅन्डॉल
  • )१८७३, ऑगस्तीन पिरॅमस डी कॅन्डॉल
  • )१८८३, जी. बेन्थॅम आणि जे. डी. हुकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Geography

जी.आय.एस. मध्ये खालीलपैकी कोणते गुणविशेष आधारसामग्रीचे उदाहरण आहे ?

  • )अक्षांश व रेखांश समन्वय
  • )भूमिउपयोजन वर्गीकरण माहिती✓ योग्य
  • )स्थान आणि विस्तार
  • )वरीलपैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Geography

खालीलपैकी कोणते साधन हवाई छायाचित्र त्रिमिती सम्यक दर्शन होण्यासाठी वापरले जाते ?

  • )स्टेरिओग्राफ
  • )स्टेरिओस्कोप✓ योग्य
  • )स्टेरिओफोन
  • )फ्लॉपी डिस्क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Geography

उपग्रह व विमानांद्वारे मिळविलेल्या सांख्यिकी आणि प्रतिमा प्राप्त करणे, प्रक्रिया करणे व अर्थ लावण्याच्या शास्त्रास खालीलपैकी कोणते शास्त्र म्हणतात ?

  • )हवाई छाया चित्रण
  • )सुदूर संवेदन✓ योग्य
  • )भौगोलिक माहिती प्रणाली
  • )ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Geography

इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा खालीलपैकी कोणता भाग रिमोट सेन्सिंगमध्ये वापरला जातो ?

  • )व्हिजिबल रिजन/दृश्यभाग
  • )मायक्रोव्हेव रिजन/सूक्ष्मतरंग भाग
  • )इन्फ्रारेड रिजन/अवरक्त भाग
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Science

मॉनिटर किंवा व्हिडिओ डिस्प्ले युनिटचा आकार स्क्रीनच्या _________ लांबीमध्ये मोजला जातो.

  • )आडवी / Horizontal
  • )उभी / Vertical
  • )कर्ण / Diagonal✓ योग्य
  • )आडवी + उभी / Horizontal + Vertical

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Science

यु.आर.एल. (U.R.L.) म्हणजे _________.

  • )युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर / Uniform Resource Locator✓ योग्य
  • )युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर / Universal Resource Locator
  • )युनिफॉर्म रिसोर्स लिंक / Uniform Resource Link
  • )युनिव्हर्सल रिसोर्स लिंक / Universal Resource Link

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Science

OSI मॉडेलमध्ये डेटा लिंक लेयरची खालीलपैकी कोणती प्राथमिक जबाबदारी आहे ?

  • )अनेक नेटवर्कसमधून पॅकेट्सना त्यांच्या गंतव्यस्थानावर मार्गनिश्चिति (राउट) करणे / Routing packets to their destination across multiple networks
  • )प्रेप्रणासाठी (ट्रान्समिशनसाठी) नेटवर्क लेयर पॅकेट्सना फ्रेम्समध्ये बंदिस्त करणे / Encapsulating network layer packets into frames for transmission✓ योग्य
  • )पूर्णतः संवाद व्यवस्थित करणे आणि विश्वसनीय वितरण सुनिश्चित करणे / Managing end-to-end communication and ensuring reliable delivery
  • )भौतिक प्रसारणासाठी डेटाचे इलेक्ट्रिकल सिग्नल्समध्ये रूपांतर करणे / Converting data into electrical signals for physical transmission

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Polity

_________ रोजी 'माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000' च्या तरतुदी लागू झाल्या.

  • )०९ जून, २००० / 09 June, 2000
  • )१७ जून, २००० / 17 June, 2000
  • )०९ ऑक्टोबर, २००० / 09 October, 2000
  • )१७ ऑक्टोबर, २००० / 17 October, 2000✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Current Affairs

वर्ल्ड हॅपीनेस अहवाल २०१८ मधील सर्वात दुःखी देश कोणता ?

  • )दक्षिण सुदान / South Sudan
  • )बुरुंडी / Burundi✓ योग्य
  • )अफगाणिस्तान / Afghanistan
  • )भारत / India

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Economy

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, २००० नुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचे उद्दिष्ट आहे ?

  • )२०१५
  • )२०४५✓ योग्य
  • )२०३०
  • )२०३५

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Economy

योग्य पर्यायांची जोडी ओळखा. 'अ' i. आर्थिक नियोजन ii. १२ वी पंचवार्षिक योजना iii. नीती आयोग iv. नीती आयोगाचे उपाध्यक्ष 'ब' अ. पंतप्रधानाकडून निवड ब. भारत सरकारचे धोरण राबविणारा विचार गट क. जलद व शाश्वत वृद्धी ड. कालबद्ध कार्यक्रम

  • )i – क, ii – अ, iii – ड, iv – ब / i – c, ii – a, iii – d, iv – b
  • )i – ड, ii – ब, iii – अ, iv – क / i – d, ii – b, iii – a, iv – c
  • )i – ड, ii – क, iii – ब, iv – अ / i – d, ii – c, iii – b, iv – a✓ योग्य
  • )i – ब, ii – ड, iii – क, iv – अ / i – b, ii – d, iii – c, iv – a

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Economy

निरपेक्ष दारिद्र्याचे मापन _________ या द्वारे केले जाते.

  • )ऊष्मांक / Calories✓ योग्य
  • )उत्पन्न / Income
  • )संपत्ती / Wealth
  • )राहणीमान / Standard of living

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Economy

फिलिप्स वक्र _________ यांच्यातील संबंध दर्शवितो.

  • )महागाई आणि बेरोजगारी / Inflation and Unemployment✓ योग्य
  • )महागाई आणि उत्पादन / Inflation and Production
  • )रोजगार आणि लोकसंख्या / Employment and Population
  • )वस्तूंची मागणी आणि पुरवठा / Demand and Supply of goods

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Economy

कोणते विधान बरोबर आहे ? अ. अवमूल्यन म्हणजे चलनाचे विनिमय मूल्य किंवा इतर देशाच्या चलनांच्या तुलनेत त्याची खरेदीशक्ती कमी करणे. ब. अवमूल्यनाचा मोठा फायदा म्हणजे आयात वाढणे.

  • )फक्त अ बरोबर (1) Only A is correct✓ योग्य
  • )फक्त ब बरोबर (2) Only B is correct
  • )दोन्ही बरोबर आहेत (3) Both are correct
  • )दोन्ही चूक आहेत (4) Both are incorrect

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Economy

शासनाकडून आपला खर्च भागविण्यासाठी निधी उभारण्याचा अत्यंत महत्त्वाचा व पारंपरिक मार्ग म्हणजे विविध कर हा होय या संदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ते सांगा. अ. वस्तू वरील कर हे सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर असतात. ब. वस्तू व सेवा कर (GST) प्रणाली 1 जुलै 2014 पासून संपूर्ण भारतात अंमलात आलेली आहे. क. “एक देश, एक कर” (One Nation One Tax) हा जी.एस.टी. चा गाभा आहे. ड. वस्तू व सेवा कर हा पूर्वीच्या अनेक केंद्रीय व राज्य अप्रत्यक्ष करांऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच प्रत्यक्ष कर आहे.

  • )अ आणि ड (1) a and d
  • )ब फक्त (2) b only
  • )क फक्त (3) c only✓ योग्य
  • )ब आणि क (4) b and c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Polity

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, २०१३ महाराष्ट्रात कधी लागू झाला ?

  • )१ फेब्रुवारी २०१४✓ योग्य
  • )१ जानेवारी २०१६
  • )१ फेब्रुवारी २०१६
  • )१ जानेवारी २०१४

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2024-common-paper-ii