स्पर्धाAI

MPSC गट क २०२४

Combined Prelims · ८७ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न History

प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? (a) सोशल सर्व्हिस लीग – ना.म. जोशी (b) सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी – गो.कृ. गोखले (c) आर्य समाज – दयानंद सरस्वती (d) डिप्रेस्ड क्लासेस मिशन – वि.रा. शिंदे पर्यायी उत्तरे :

  • )(a) आणि (b) फक्त / (a) and (b) only
  • )(b) आणि (c) फक्त / (b) and (c) only
  • )(a), (b) आणि (d) फक्त / (a), (b) and (d) only✓ योग्य
  • )(b), (c) आणि (d) फक्त / (b), (c) and (d) only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन ‘गुलामगिरीची एक नवी सनदच’ असे केले?

  • )मोर्ले–मिंटो सुधारणा कायदा, 1909 / The Morley-Minto Reforms Act, 1909
  • )मॉंटेग्यु–चेम्सफर्ड सुधारणा कायदा, 1919 / The Montagu-Chelmsford Reforms Act, 1919
  • )भारत सरकार कायदा, 1935 / The Government of India Act, 1935✓ योग्य
  • )रोलेट कायदा, 1919 / Rowlatt Act, 1919

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या 'एनफिल्ड रायफल' हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती? (a) अंबाला (b) कलकत्ता (c) सियालकोट (d) डम डम

  • )(a), (b) आणि (c)
  • )(b) आणि (d)
  • )(a), (c) आणि (d)✓ योग्य
  • )(a), (b) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

कोणत्या व्हॉईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डांची स्थापना झाली?

  • )लॉर्ड रिपन✓ योग्य
  • )लॉर्ड लिटन
  • )लॉर्ड कर्झन
  • )लॉर्ड वेल्सली

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली 'दुष्काळ संहिता' तयार करण्यात आली?

  • )सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग✓ योग्य
  • )जॉर्ज कॅम्पबेल आयोग
  • )मॅकडोनाल्ड आयोग
  • )सर जेम्स ल्याल आयोग

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

'सत्यशोधक जलसा' या कलाप्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते?

  • )होनाजी बाळा✓ योग्य
  • )भाऊराव पाटोळे
  • )रामचंद्र घाटगे
  • )जोतीराव फाळके

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न History

स्ट्रॅची आयोग कशासंबंधी होता?

  • )शैक्षणिक सुधारणा
  • )आरोग्य सुधारणा
  • )दुष्काळ उपाययोजना✓ योग्य
  • )बालविवाह रोखणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०History

1920 मध्ये स्थापन झालेल्या ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

  • )लाला लजपत राय✓ योग्य
  • )लोकमान्य टिळक
  • )श्रीपाद अमृत डांगे
  • )अशोक मेहता

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Geography

खालील विधाने विचारात घ्या. (a) महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. (b) महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. (c) महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 कि.मी. आहे. (d) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.कि.मी. आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

  • )फक्त (a)
  • )फक्त (a) आणि (b)
  • )फक्त (c) आणि (b)
  • )(a), (c) आणि (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Geography

पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा. (a) मकालू (Makalu) (b) नंदादेवी (Nandadevi) (c) अन्नपूर्णा (Annapurna) (d) बद्रीनाथ (Badrinath)

  • )(d), (a), (b), (c)
  • )(b), (d), (c), (a)
  • )(a), (c), (b), (d)✓ योग्य
  • )(c), (b), (a), (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Geography

भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे?

  • )नेपाळ (Nepal)
  • )बांगलादेश (Bangladesh)✓ योग्य
  • )पाकिस्तान (Pakistan)
  • )भूतान (Bhutan)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Maharashtra

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावा. जिल्हे (a) अहिल्यानगर (b) यवतमाळ (c) सातारा (d) लातूर शहरी लोकसंख्या (%) (i) 25.47 (ii) 18.98 (iii) 21.59 (iv) 20.10

  • )(ii), (i), (iv), (iii)
  • )(i), (ii), (iii), (iv)
  • )(iv), (iii), (ii), (i)✓ योग्य
  • )(iii), (iv), (i), (ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Geography

जोड्या जुळवा : स्तंभ अ (a) भंडारा (b) नंदुरबार (c) उदयपूर (d) छ. संभाजी नगर स्तंभ ब (i) यशवंत तलाव (ii) सिटी ऑफ लेक्स (iii) सिटी ऑफ गेट्स (iv) तलावांचा जिल्हा

  • )(i) (ii) (iii) (iv)
  • )(iii) (iv) (ii) (i)
  • )(iv) (i) (ii) (iii)✓ योग्य
  • )(iv) (ii) (i) (iii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Maharashtra

खालील विधाने पहा : (a) फॅमीन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषि खात्याची स्थापना जून 1881 मध्ये केली गेली. (b) महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर, पुणे येथे आहे. (c) कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो.

  • )फक्त विधान (a) बरोबर आहे. / Only Statement (a) is correct.
  • )फक्त विधान (c) बरोबर आहे. / Only Statement (c) is correct.✓ योग्य
  • )विधान (a) आणि (c) बरोबर आहेत. / Statement (a) and (c) are correct.
  • )विधान (b) आणि (c) बरोबर आहेत. / Statement (b) and (c) are correct.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Geography

18. योग्य जोड्या लावा : यादी – I (जिल्हे) (a) पुणे (b) रत्नागिरी (c) अहिल्यानगर (d) नागपूर यादी – II (लिंगगुणोत्तर प्रमाण [जनगणना–2011]) (i) 939 (ii) 951 (iii) 915 (iv) 1122 पर्यायी उत्तरे :

  • )(i) (ii) (iii) (iv)
  • )(ii) (i) (iii) (iv)
  • )(iii) (iv) (i) (ii)✓ योग्य
  • )(iii) (iv) (ii) (i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Geography

जोड्या जुळवा : जिल्हे (a) सोलापूर (b) सातारा (c) रायगड (d) सांगली जलविद्युत प्रकल्प (i) कणहेर (ii) भिरा (iii) वारणा (iv) उजनी

  • )(i) (ii) (iii) (iv)
  • )(iv) (ii) (iii) (i)
  • )(iv) (i) (iii) (ii)
  • )(iv) (i) (ii) (iii)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Geography

जोड्या लावा : मासेमारी बंदर (a) डहाणू (b) माहिम (c) दाभोळ (d) विजयदुर्ग जिल्हे (i) मुंबई (ii) पालघर (iii) सिंधुदुर्ग (iv) रत्नागिरी पर्यायी उत्तरे :

  • )(ii) (i) (iv) (iii)✓ योग्य
  • )(i) (ii) (iii) (iv)
  • )(ii) (iv) (i) (iii)
  • )(iii) (ii) (i) (iv)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Economy

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात ____________ कराचा सर्वाधिक हिस्सा आहे.

  • )विक्री कर
  • )व्यापार कर
  • )वस्तु व सेवा कर✓ योग्य
  • )सामाजिक सेवा कर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Economy

भारतातील औद्योगिक संस्था व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावा. औद्योगिक संस्था (a) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ (IFCI) (b) भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI) (c) राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (d) राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ स्थापना वर्ष (i) 1964 (ii) 1948 (iii) 1954 (iv) 1955

  • )(i) (iii) (iv) (ii)
  • )(ii) (i) (iv) (iii)✓ योग्य
  • )(iii) (iv) (ii) (i)
  • )(iv) (iii) (ii) (i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Current Affairs

भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधान/ने ओळखा. (a) हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. (b) हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि मानवी विकासासाठीची संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. (c) अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवरील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पर्यायी उत्तरे :

  • )(a) and (b)
  • )(a) and (c)
  • )(b) and (c)✓ योग्य
  • )Only (a)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Economy

खालील विधाने विचारात घ्या : (a) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली. (b) भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले. (c) जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. (d) रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/त?

  • )(a) and (b)
  • )(b) and (c)
  • )(c) and (d)
  • )(a), (c) and (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Economy

राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मुळवर्षाऐवजी C.S.O. द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला ? (a) 1994-1995 (b) 1997-1998 (c) 1999-2000 (d) 2000-2001 पर्यायी उत्तरे :

  • )(a) फक्त
  • )(b) फक्त
  • )(b) आणि (c)
  • )(c) फक्त✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Current Affairs

गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये ___________ कायदा लागू केला आहे.

  • )मैत्री✓ योग्य
  • )माहिती तंत्रज्ञान
  • )एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग
  • )आई महिलाभिमुख पर्यटन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Economy

पंचवार्षिक योजना व विकासाचे निर्धारित लक्ष यांच्या जोड्या लावा. (पंचवार्षिक योजना) (a) पाचवी योजना (1974-79) (b) सहावी योजना (1980-85) (c) नववी योजना (1997-2002) (d) बारावी योजना (2012-17) (निर्धारित लक्ष) (i) 4.4 (ii) 5.2 (iii) 6.5 (iv) 8.0

  • )(i) (ii) (iii) (iv)✓ योग्य
  • )(ii) (iii) (iv) (i)
  • )(iii) (iv) (i) (ii)
  • )(i) (iv) (iii) (ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Economy

खालीलपैकी कोणते विधान/विधाने लेखापालनाच्या फायद्या संबंधित योग्य आहेत? (a) सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झाल्यामुळे ही माहिती भविष्यकाळात संदर्भासाठी वापरता येते. (b) पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो. (c) स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही. त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. (d) आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.

  • )फक्त (a) आणि (b)
  • )फक्त (a), (b) आणि (c)✓ योग्य
  • )फक्त (c) आणि (d)
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Economy

तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरविण्यासाठी शासन _________ राबवित आहे.

  • )मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना
  • )प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान✓ योग्य
  • )किसान क्रेडीट कार्ड योजना
  • )पोषण मिशन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Economy

भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : (a) शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे. (b) शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

  • )दोन्ही (a) आणि (b) योग्य आहेत
  • )केवळ (b) योग्य आहे✓ योग्य
  • )केवळ (a) योग्य आहे
  • )वरीलपैकी कोणतेही योग्य नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Polity

भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे?

  • )भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक✓ योग्य
  • )वित्त मंत्रालय
  • )नीती आयोग
  • )रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Economy

भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत?

  • )(a) महामारी नियंत्रण / Control of epidemic
  • )(b) मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट / Decline in incidence of malaria and tuberculosis
  • )(c) एकत्र कुटुंब पद्धती / Joint Family System
  • )(d) शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेतील वाढ / Expansion of education and increased literacy✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Current Affairs

सप्टेंबर 2024 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात, 'विश्वशांती बुद्ध विहार' चे उदघाटन केले?

  • )निलंगा
  • )जळकोट
  • )चाकूर
  • )उदगीर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Current Affairs

भारतातील पहिले लव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे?

  • )नागालँड
  • )सिक्कीम
  • )त्रिपुरा
  • )जम्मू काश्मीर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Current Affairs

कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या 'सोलर फ्लोअर मिल' या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळाले आहे?

  • )फिलिप्स
  • )किर्लोस्कर बंधु
  • )शक्ती पंप✓ योग्य
  • )क्रॉम्प्टन ग्रीव्हज

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Current Affairs

19 वी (अलिप्त राष्ट्र चळवळ) शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

  • )ब्राझील – रियो डी जानेरो
  • )दिल्ली – भारत
  • )कंपाला – युगांडा✓ योग्य
  • )घाना – आकरा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०History

पुढीलपैकी कोणत्या अभ्यासाशी प्रसिद्ध अभ्यासक रणजीत गुहा हे संबंधित आहेत?

  • )ट्रान्सजेंडर अभ्यास
  • )सबाल्टर्न अभ्यास✓ योग्य
  • )परिस्थितिकीय अभ्यास
  • )क्वांटम अभ्यास

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Current Affairs

75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली?

  • )132✓ योग्य
  • )128
  • )130
  • )134

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Current Affairs

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण होते?

  • )Jannik Sinner - Serena Williams
  • )Jannik Sinner - Zheng Qinwen
  • )Novak Djokovic - Naomi Osaka
  • )Jannik Sinner - Aryna Sabalenka✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Current Affairs

2024 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते? (a) रिलायन्स फाऊंडेशन (b) अदानी समूह (c) आदित्य बिरला कॅपिटल (d) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) / Only (a)
  • )(a), (b), (d)
  • )(b), (c)
  • )(a), (b), (c), (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Current Affairs

2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला?

  • )डोनाल्ड जी. ट्रुहलर आणि टॉबीन जे. मार्क्स / Donald G. Truhlar and Tabin J. Marks
  • )डेव्हीड बेकर, डेमीस हासाबीस आणि जॉन जम्पर / David Bekar, Demis Hassabis and John Jumper✓ योग्य
  • )मायकल ग्रेटझेल आणि जॉर्ज एम. / Michel Gratzel and George M.
  • )जॉन जे. हॉपफिल्ड आणि जिओफ्री इ. हिटन / John J. Hopfield and Geoffrey E. Hinton

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Current Affairs

नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे (ADB) अध्यक्ष कोण होते?

  • )मासात्सुगु असाकावा / Masatsugu Asakawa✓ योग्य
  • )ताकेहिको नाकाओ / Takehiko Nakao
  • )हारुहिको कुरोडा / Haruhiko Kuroda
  • )ताडाओ चिनो / Tadao Chino

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Current Affairs

लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

  • )अजय माणिकराव खानविलकर / Ajay Manikrao Khanwilkar✓ योग्य
  • )सतीशचंद्र शर्मा / Satish Chandra Sharma
  • )सूर्यकांत वर्मा / Suryakanth Verma
  • )संजीव खन्ना / Sanjeev Khanna

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Current Affairs

पॅरिस येथील 2024 च्या ऑलिंपिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्व्हर आणि 13 ब्रॉंझ पदके जिंकली?

  • )फ्रान्स / France
  • )ऑस्ट्रेलिया / Australia
  • )जपान / Japan✓ योग्य
  • )नेदरलँड्स / Netherlands

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Current Affairs

पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी ‘स्वच्छ दिल्ली’ हे अभियान जोडलेले आहे?

  • )खाजगी शाळांपासून सरकारी शाळांकडे वळणे.
  • )पारंपारिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे.✓ योग्य
  • )कोळसा आधारित उर्जेऐवजी सौर उर्जेकडे वळणे.
  • )खाजगी सुरक्षेपासून सार्वजनिक सुरक्षेकडे वळणे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Polity

कोणती अनुसूची (schedule) केंद्र आणि राज्यमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे? (1) अनुसूची-V (2) अनुसूची-VI (3) अनुसूची-VII (4) अनुसूची-VIII

  • )अनुसूची-V / Schedule-V
  • )अनुसूची-VI / Schedule-VI
  • )अनुसूची-VII / Schedule-VII✓ योग्य
  • )अनुसूची-VIII / Schedule-VIII

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Polity

भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बी.आर. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला ‘भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा’ म्हणून घोषित केले?

  • )कलम – 31
  • )कलम – 32✓ योग्य
  • )कलम – 33
  • )कलम – 34

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Polity

भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? (a) भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे. (b) राष्ट्रपतीने ने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग द्वारा पदावरून काढून टाकता येते. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) / Only (a)
  • )(a) आणि (b) दोन्ही / (a) and (b) both✓ योग्य
  • )फक्त (b) / Only (b)
  • )(a) आणि (b) दोघांपैकी कोणतेही नाही / Neither (a) and (b)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Polity

कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केली?

  • )पहिली घटना दुरुस्ती कायदा – 1951 / First Constitutional Amendment Act - 1951
  • )सातवी घटना दुरुस्ती कायदा – 1956 / Seventh Constitutional Amendment Act - 1956✓ योग्य
  • )चोविसावी घटना दुरुस्ती कायदा – 1962 / Twenty fourth Constitutional Amendment Act - 1962
  • )बेचाळिसावी घटना दुरुस्ती कायदा – 1976 / Forty second Constitutional Amendment Act - 1976

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Polity

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्येतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव ________ मंजूर करावा लागतो.

  • )साध्या बहुमताने / Simple Majority✓ योग्य
  • )विशेष बहुमताने / Special Majority
  • )निम्म्या राज्यांच्या संमतीसह विशेष बहुमताने / Special Majority along with consent of half of the States
  • )विशेष बहुमत आणि सर्व राज्यांच्या विधिमंडळांच्या सहमतीने / Special Majority with consent of all State Legislatures

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Polity

परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे?

  • )वैद्यकीय निगा✓ योग्य
  • )बँकिंग
  • )शिक्षण
  • )पर्यावरण

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Polity

पुढील विधाने विचारात घ्या : (a) 73 व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायतीराज व्यवस्थेबाबत घटनेत भाग '9' समाविष्ट केला आहे. (b) 74 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत घटनेत नवीन भाग '9 अ' जोडण्यात आला आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे?

  • )फक्त (a)
  • )फक्त (b)
  • )(a) आणि (b) दोन्ही✓ योग्य
  • )(a) आणि (b) पैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Polity

भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्षता' या संज्ञाचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला?

  • )41 वी घटनादुरुस्ती
  • )44 वी घटनादुरुस्ती
  • )46 वी घटनादुरुस्ती
  • )42 वी घटनादुरुस्ती✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Polity

यादी-1 (भारतीय राज्य घटनेचे कलम) आणि यादी-2 (तरतुदी) मधील योग्य जोड्या जुळवा. यादी-1 (भारतीय राज्य घटनेचे कलम) (a) कलम - 14 (b) कलम - 15 (c) कलम - 16 (d) कलम - 17 यादी-2 (तरतुदी) (i) राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. (ii) राज्यातील कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्ती या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान संधी असेल. (iii) अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पाळण्यास बंदी. (iv) राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही.

  • )(a) (b) (c) (d) (i) (ii) (iii) (iv)
  • )(iv) (iii) (ii) (i)
  • )(iv) (i) (ii) (iii)✓ योग्य
  • )(iii) (ii) (i) (iv)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Polity

भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे?

  • )कलम – 170 / Article - 170✓ योग्य
  • )कलम – 171 / Article - 171
  • )कलम – 172 / Article - 172
  • )कलम – 173 / Article - 173

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१History

खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते?

  • )सर विल्यम वुड / Sir William Wood✓ योग्य
  • )लॉर्ड पॅथिक लॉरेन्स / Lord Pethick Lawrence
  • )सर स्टॅफोर्ड क्रिप्स / Sir Stafford Cripps
  • )ए.व्ही. अलेक्झांडर / A.V. Alexander

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Polity

भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 (E) प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वी विसर्जित झाली नसेल तर, ________ पाच वर्षांपर्यंत अस्तित्वात राहिल.

  • )निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून / from the date of declaration of election results
  • )निवडणूक जाहीर झाल्याच्या दिनांकापासून / from the date of declaration of elections
  • )तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून / from the date fixed for its first meeting after election✓ योग्य
  • )पंचायत निवडणुकीच्या नंतर सुरु होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून / from the first Financial Year commencing after the Panchayat elections

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Polity

भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे?

  • )कलम 243-B / Article 243-B
  • )कलम 243-C / Article 243-C
  • )कलम 243-D / Article 243-D✓ योग्य
  • )कलम 243-E / Article 243-E

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Polity

भारतीय संविधानाच्या कलम 165 च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे?

  • )सॉलिसिटर जनरल / The Solicitor General
  • )अतिरिक्त सरकारी वकील / Additional Government Pleader
  • )महाधिवक्ता / The Advocate General✓ योग्य
  • )उच्च न्यायालयाचे न्यायाधीश / The High Court Judge

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Science

खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते?

  • )फोटोव्होल्टाइक डायोड (Photovoltaic diode)✓ योग्य
  • )फोटो डायोड (Photodiode)
  • )एल.ई.डी. (L.E.D.)
  • )टनेल डायोड (Tunnel Diode)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Science

बॉल बिअरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो?

  • )स्थितीक घर्षण (Static Friction)
  • )लोटण घर्षण (Rolling Friction)
  • )सर्पी घर्षण (Sliding Friction)✓ योग्य
  • )द्रावु घर्षण (Fluid Friction)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Science

योग्य उत्तर निवडा. (a) मानवास आवाजाच्या 20 ते 20000 Hz इतक्याच वारंवारता ऐकू येतात. (b) Infrasonic waves ची वारंवारता 20000 Hz पेक्षा अधिक असते. (c) Ultrasonic waves ची वारंवारता 20 Hz पेक्षा कमी असते. (d) ध्वनीलहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (d) वाक्य बरोबर आहे. (Only (d) sentence is correct.)
  • )फक्त (c), (d) वाक्य बरोबर आहेत. (Only (c) and (d) sentence is correct.)
  • )सर्व वाक्य बरोबर आहेत. (All sentences are correct.)
  • )फक्त (a) वाक्य बरोबर आहे. (Only (a) sentence is correct.)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Scienceआयोगाने रद्द

कार्बन डायसल्फाईड चा उपयोग

  • )कृत्रिम काम
  • )कीटकनाशक
  • )तणनाशक
  • )बुरशीनाशक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ७०Science

कास्य या मिश्रधातूमध्ये _________ या दोन धातूंचा समावेश असतो.

  • )कॉपर आणि टिन✓ योग्य
  • )कॉपर आणि झिंक
  • )कॉपर आणि निकेल
  • )कॉपर आणि आयर्न

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Science

पेट्रोमायझॉनमध्ये ___________ द्वारे ॲन्टीकोॲगुलंट स्त्रवले जातात.

  • )गॉब्लेट ग्रंथी (Goblet gland)
  • )श्लेष्मल ग्रंथी (Mucous gland)
  • )लाळ ग्रंथी (Salivary gland)✓ योग्य
  • )झायमोजेन पेशी (Zymogen Cells)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Science

“कांगारू” हा प्राणी ___________ या फायलममध्ये समाविष्ट आहे.

  • )सरीसृप (Reptilia)
  • )सस्तन (Mammalia)✓ योग्य
  • )उभयचर (Amphibia)
  • )पक्षी (Aves)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Science

भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे होतो?

  • )फ्युसारियम / Fusarium
  • )सर्कोस्पोरा / Cercospora✓ योग्य
  • )कोलेतोट्रिडियम / Colletotrichum
  • )पक्सिनिया / Puccinia

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Science

खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचे आहे?

  • )ते वनस्पतीसृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जातात. / They are known as amphibians of Plant kingdom.
  • )त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते. / They require water for reproduction.
  • )त्यांना मुळा ऐवजी मुलाभ (रायझॉइड्स) असतात. / They have rhizoids instead of roots.
  • )रायझोपस हे त्यांचे उदाहरण आहे. / Rhizopus is example of them.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Science

तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते? (a) हॉफकिन बायोफार्मास्युटिकल्स कारपोरेशन लिमिटेड (b) पॅनाशिया बायोटीक (c) बायोमेड, गाझीयाबाद (d) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रीशन, हैद्राबाद

  • )(a) फक्त
  • )(a) आणि (b) फक्त
  • )(a), (b) आणि (c) फक्त✓ योग्य
  • )(d) फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Science

ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहचत नाही किंवा फायदा देखील होत नाही, त्याला ________ असे संबोधतात.

  • )परस्परावाद / Mutualism
  • )परजीवी / Parasitism
  • )ॲमेनसालिझम / Amensalism
  • )कॉमेनसालिझम / Commensalism✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Quantitative Aptitude

एका 30 सेमी त्रिज्येचा भरीव घन गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 4 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या, तर _________ वृत्तचित्ती तयार होतील.

  • )100
  • )95
  • )90✓ योग्य
  • )85

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Quantitative Aptitude

एक रेल्वेगाडी 480 कि.मी. अंतर एकसमान वेगाने धावते. रेल्वेगाडीचा वेग 8 कि.मी. ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागलो तर रेल्वेगाडीचा मुळ वेग किती असेल?

  • )ताशी 40 कि.मी. / 40 km/hr✓ योग्य
  • )ताशी 32 कि.मी. / 32 km/hr
  • )ताशी 48 कि.मी. / 48 km/hr
  • )ताशी 36 कि.मी. / 36 km/hr

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Quantitative Aptitude

वाचामुळे एक 21 मीटर उंच वृक्ष त्याचे बुंध्यापासून x मीटर अंतरावरुन अशाप्रकारे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7√3 मीटर अंतरावर टेकल्यामुळे जमिनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. तर झाडाची x उंची काढा.

  • )5√3 मीटर
  • )5 मीटर
  • )7 मीटर✓ योग्य
  • )9 मीटर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Quantitative Aptitude

एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर 11 : 9 आहे. जर त्याने वार्षिक ₹ 36,000 रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न __________ इतके आहे.

  • )₹ 16,000
  • )₹ 20,000
  • )₹ 18,000
  • )₹ 16,500✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Quantitative Aptitude

एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकूण टक्केवारी 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल?

  • )60.1%
  • )56.67%✓ योग्य
  • )30%
  • )55.6%

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Quantitative Aptitude

एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 10 असून मुलींनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती?

  • )10
  • )5
  • )15✓ योग्य
  • )20

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Quantitative Aptitude

अरूणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. तसेच सचिनने एका दिवसात केलेल्या कामाचे राहुलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. जर राहुल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो तर अरूण, सचिन आणि राहुल मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील?

  • )4
  • )6
  • )8✓ योग्य
  • )5

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

प्रश्न ८९Quantitative Aptitude

एक दुकानदार दोन मोबाईल फोन प्रत्येकी ₹ 3,600 ला विकतो. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा तर दुसऱ्यावर 20% तोटा होतो. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला?

  • )₹ 300 तोटा✓ योग्य
  • )₹ 400 तोटा
  • )₹ 250 नफा
  • )₹ 200 नफा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Logical Reasoning

वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्याचा योग्य पर्याय निवडा.

  • )17
  • )21
  • )15
  • )22✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Logical Reasoning

रिकुच्या घड्याळात सकाळी नऊ वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल?

  • )दक्षिण
  • )पश्चिम
  • )उत्तर✓ योग्य
  • )पूर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Quantitative Aptitude

खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शवितो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹ 46,800 आहे, तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे?

  • )₹ 8,840✓ योग्य
  • )₹ 8,820
  • )₹ 4,820
  • )₹ 8,440

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Logical Reasoning

एका सांकेतिक भाषेत ‘UNNATI’ हा शब्द 79 असा लिहिला जातो तर त्याच भाषेत ‘UTKARSH’ हा शब्द कसा लिहिला येईल?

  • )80
  • )90
  • )97
  • )98✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Logical Reasoning

एका वर्गात N हा पाचव्या क्रमांकावर आहे. S हा शेवटून आठव्या क्रमांकावर आहे. जर T हा N नंतर सहावा आणि N आणि S च्या मध्यभागी असेल तर वर्गात किती विद्यार्थी आहेत?

  • )23
  • )24✓ योग्य
  • )25
  • )26

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Quantitative Aptitude

एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील?

  • )84
  • )80✓ योग्य
  • )76
  • )74

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Logical Reasoning

M आणि N हे दोघे भाऊ आहेत. Q आणि R बहिण आहे. M चा मुलगा R चा भाऊ आहे, तर N चे Q बरोबर नाते काय ?

  • )भाऊ
  • )आजोबा
  • )वडील
  • )काका✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2024-combined-prelims