स्पर्धाAI

MPSC गट ब २०२१

STI Paper II · ९३ प्रश्न · रद्द ४ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Geographyआयोगाने रद्द

लाव्हा रसाचे उद्रेक व वहन होऊन दख्खनच्या बंधाची निर्मिती कधी झाली ?

  • )115 दशलक्ष वर्षांपूर्वी
  • )122 दशलक्ष वर्षांपूर्वी
  • )128 दशलक्ष वर्षांपूर्वी
  • )135 दशलक्ष वर्षांपूर्वी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न Current Affairs

______ हा दिवस आणि ______ हे वर्ष जागतिक लोकसंख्या दिन व वर्ष म्हणून साजरा केला जातो.

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त क
  • )फक्त ब
  • )फक्त ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

खालील जोड्या लावा : राष्ट्रीय उद्यान/अभयारण्य अ. संजय गांधी उद्यान ब. तानसा क. फणसाड ड. टिपेश्वर जिल्हा i. रायगड ii. ठाणे iii. यवतमाळ iv. मुंबई पर्यायी उत्तरे :

  • )ii i iv iii
  • )iv ii iii i
  • )ii iv i iii
  • )iv ii i iii✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

औरंगाबाद विभागातील सर्वात कमी व सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते ?

  • )जालना, औरंगाबाद
  • )परभणी, उस्मानाबाद
  • )हिंगोली, बीड✓ योग्य
  • )लातूर, नांदेड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

कोकणात एप्रिल - मे महिन्यात सायंकाळी पडणाऱ्या पावसाला ______ म्हणतात.

  • )आम्रसरी✓ योग्य
  • )कोंकणसरी
  • )प्रतिरोध पर्जन्य
  • )सह्याद्री सरी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

महाराष्ट्रातील ______ जिल्ह्याचा समूह मॅगनीज व लोहखनिजाने संपन्न आहे.

  • )पालघर, नाशिक, धुळे
  • )ठाणे, पुणे, अहमदनगर
  • )सोलापूर, लातूर, नांदेड
  • )सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोहखनिजाचे साठे असते ?

  • )अहमदनगर, बीड, जालना व परभणी
  • )नागपूर, यवतमाळ, कोल्हापूर व सोलापूर
  • )चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व सिंधुदुर्ग✓ योग्य
  • )सातारा, सांगली, औरंगाबाद व लातूर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविणारे 'ग्राम स्वच्छता अभियाना'चा मुख्य उद्देश म्हणजे : अ. ग्रामीण समाजातील जातिवाद कमी करणे. ब. ग्रामीणभागात शौचालयाचा उपयोग करणे. क. माणसाची मने स्वच्छ करणे. ड. ग्रामीण भागातील हवा स्वच्छ करणे. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?

  • )फक्त अ
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त अ आणि ड
  • )फक्त ब✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११History

न्या. रानडे यांनी एका भाषणात महात्मा फुले यांच्या भारतीय राष्ट्रीय सभेला असलेल्या विरोधाबाबत नाराजी व्यक्त केली होती. महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथातून या भाषणाला उत्तर दिले ?

  • )गुलामगिरी
  • )इशारा✓ योग्य
  • )शेतकऱ्याचा आसुड
  • )सार्वजनिक सत्य धर्म

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२History

बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते ?

  • )नाना शंकर सेठ
  • )डॉ. भाऊ दाजी लाड✓ योग्य
  • )बाळकृष्ण मुंजे
  • )बा. गं. टिळक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३History

जमीनदारांच्या निषेधार्थ 500 शेतकऱ्यांनी अलाहाबादमध्ये ________ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला.

  • )राजा मोहम्मद हाजी
  • )वल्लभभाई पटेल
  • )अल्लुरी सीताराम राजू
  • )बाबा रामचंद्र✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४History

आदिवासी उठावाविषयी कोणती विधाने चुकीची आहेत ? अ. 1818 मध्ये भिल्लांनी सातमाळ आणि अजंठा भागात उठाव केला. ब. कॅ. डुसार्टने भिल्लांचा प्रमुख शेख धुल्ला यास पकडून कठोर शिक्षा केली. क. 1822 मध्ये हिरा नावाच्या भिल्लांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरु झाले. ड. कॅ. जेल याने 1845 मध्ये भिल्लांचे बंड शमविण्याचा प्रयत्न केला.

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क
  • )फक्त ब, क आणि ड
  • )फक्त ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५History

धर्मांतरितांना शुद्धीकरणानंतर त्यांच्या जाती परत आपल्यात घेत नसत. हा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदु महासभेने ‘गुरव’ जातीची परिषद कोणत्या गावी भरवली ?

  • )नाशिक
  • )जावळा
  • )पुणे
  • )जेजुरी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६History

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालक्रमानुसार रचना करा. अ. मुंबई येथे पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ब. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह क. ‘शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची’ स्थापना ड. ‘बहिष्कृत हितकारिणी सभेची’ स्थापना

  • )ब, ड, अ, क / b, d, a, c
  • )अ, क, ड, ब / a, c, d, b
  • )ड, ब, क, अ / d, b, c, a✓ योग्य
  • )ड, क, अ, ब / d, c, a, b

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७History

डॉ. आंबेडकर यांनी सुरु केलेल्या ______ या नियतकालिकेने इशारा दिला होता, की “मुंबई इलाख्यात निघत असलेली... बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातींचे हितसंबंध पाहणारी आहेत अशा वृत्तपत्रांना आमचा एवढाच इशारा आहे, की कोणतीही एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींस बसल्याशिवाय राहणार नाही.”

  • )बहिष्कृत भारत / Bahishkrit Bharat
  • )मूकनायक / Mooknayak✓ योग्य
  • )जनता / Janata
  • )प्रबुद्ध भारत / Prabuddha Bharat

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९History

1931 पासून अकोल्यातून मातृभूमी हे वृत्तपत्र निघू लागले. त्याचे संपादक कोण होते ?

  • )अनंतराव गद्रे
  • )वि.दा. सावरकर
  • )डॉ. भी.रा. आंबेडकर
  • )दादासाहेब गोळे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Polity

भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे : अ. राज्यासंसदेला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई. ब. राज्याला धर्म आहे. क. राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे. ड. राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ? पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त अ
  • )फक्त ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Polity

भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कायद्याच्या अथवा तथ्यविषयक प्रश्नाबाबत ________ राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात. (1) स्वतःहून (2) राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर (3) मुलभूत हक्कांच्या संदर्भातील मुद्दा असेल तर (4) देशाची एकता व अखंडतेला बाधा येईल असा मुद्दा असेल तर

  • )स्वतःहून
  • )राष्ट्रपतींनी सल्ला मागितला तर✓ योग्य
  • )मुलभूत हक्कांच्या संदर्भातील मुद्दा असेल तर
  • )देशाची एकता व अखंडतेला बाधा येईल असा मुद्दा असेल तर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Polity

भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 मधील विशेष तरतूदी कोणत्या राज्यांशी संबंधीत आहेत ? अ. महाराष्ट्र व गोवा ब. मणिपूर क. कर्नाटक ड. महाराष्ट्र व गुजरात वरीलपैकी कोणते/ती पर्याय बरोबर आहे/त ?

  • )फक्त ड✓ योग्य
  • )फक्त ब
  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४History

_______ चा इंडियन कौन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

  • )1891
  • )1861✓ योग्य
  • )1871
  • )1881

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Polity

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची संख्या वाढविण्याचा अधिकार _______ आहे.

  • )संसदेला✓ योग्य
  • )राष्ट्रपतींना
  • )विधी आयोगाला
  • )भारताचे सर्वोच्च न्यायाधिशांना

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Polity

घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले, ______ गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली.

  • )दुसऱ्या
  • )सहाव्या
  • )तिसऱ्या✓ योग्य
  • )चौथ्या

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Polity

खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे ?

  • )Fundamental Duties
  • )Fundamental Rights✓ योग्य
  • )Single Citizenship
  • )Parliamentry Government

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Polity

जोड्या लावा (मूलभूत हक्कांसंदर्भात) : वर्ग अ. समतेचा हक्क ब. स्वातंत्र्याचा हक्क क. शोषणा विरुद्धचा हक्क ड. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क समाविष्ट i. कारखान्यांमध्ये बाल मजुरीस प्रतिबंध ii. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार iii. जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण iv. सार्वजनिक क्षेत्रात नोकरीची समान संधी

  • )iii iv ii i
  • )ii iii i iv
  • )iv iii i ii✓ योग्य
  • )iv ii iii i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Polity

भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटकराज्ये यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते ?

  • )मोर्ले-मिंटो सुधारणा, 1909
  • )मॉन्टिग्यू-चेम्सफर्ड कायदा, 1919
  • )गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, 1935✓ योग्य
  • )भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, 1947

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Polity

राज्यपालांच्या कार्यकारी अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्या : अ. राज्यपाल राज्यातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करतात. ब. राज्यपाल राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करतात. क. राज्यपाल मुख्यमंत्री आणि इतर राज्यमंत्री नियुक्त करतात. ड. राज्यपाल राज्यांच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त ब, क आणि ड✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Economy

भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती ? अ. दरडोई उत्पन्न कमी / a. Low Per Capita Income ब. लोकसंख्येचा प्रचंड दबाव / b. Heavy Population Pressure क. तंत्रज्ञानाचा प्रसार कमी / c. Prevalence of Low Level of Technology ड. संपत्तीचे विकृत वितरण / d. Maldistribution of Wealth

  • )फक्त अ / (1) Only a
  • )फक्त अ आणि ब / (2) Only a and b
  • )यापैकी नाही / (3) None of the above
  • )यापैकी सर्व / (4) All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Economy

भारताच्या नियोजन प्रक्रियेत पथदर्शक भूमिका पार पाडणारी ‘जनता योजना’ कोणाची होती ?

  • )श्रीमान नारायण / (1) Shriman Narayan
  • )आठ उद्योगपती / (2) Eight Industrialists
  • )मानवेंद्र नाथ रॉय / (3) Manbendra Nath Roy✓ योग्य
  • )राष्ट्रीय नियोजन आयोग / (4) National Planning Commission

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Economy

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीच्या वेळी ______ यांनी वेतनवस्तू प्रतिमानावर भर दिला.

  • )सी.एन. वकील आणि पी.आर. ब्रह्मानंद / (1) C.N. Vakil and P.R. Brahmananda✓ योग्य
  • )आय.जी. पटेल आणि जे. भगवती / (2) I.G. Patel and J. Bhagwati
  • )सी.एन. वकील आणि पी.सी. महालनोबीस / (3) C.N. Vakil and P.C. Mahalanobis
  • )पी.आर. ब्रह्मानंद आणि जे. भगवती / (4) P.R. Brahmananda and J. Bhagwati

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Economy

नवव्या योजनेत ______ वर अधिक भर देण्यात आला. अ. सेवाक्षेत्राचा विकास ब. औद्योगिक क्षेत्राचा विकास क. पायाभूत सुविधांचा विकास ड. सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Economy

आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते आहेत ? अ. शिक्षण ब. आरोग्य क. अन्न ड. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची वृद्धी

  • )फक्त ड
  • )फक्त अ, ब आणि क✓ योग्य
  • )फक्त अ, ब आणि ड
  • )यापैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Economy

सन 2019 – 20 मध्ये सेवा क्षेत्रातून सर्वाधिक निर्यात ______ ची झाली.

  • )बँकींग सेवा / Banking services
  • )नॉन सॉफ्टवेअर सेवा / Non-Software services
  • )सॉफ्टवेअर सेवा / Software services✓ योग्य
  • )विमा सेवा / Insurance services

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Economy

खालीलपैकी कोणी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक सादर केला आहे ?

  • )जागतिक बँक / World Bank
  • )मानव विकास अहवाल, 2010 / Human Development Report, 2010✓ योग्य
  • )नियोजन आयोग / Planning Commission
  • )भारतीय रिझर्व्ह बँक / Reserve Bank of India

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Economy

भारतात कोणत्या प्रकारची बेकारी आढळते ? अ. छुपी बेकारी ब. हंगामी बेकारी क. शैक्षणिक बेकारी ड. रचनात्मक बेकारी पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ / Only a
  • )फक्त अ, ब आणि क / Only a, b and c
  • )फक्त क / Only c
  • )यापैकी सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Economy

सी. रंगराजन, सीमा आणि ई.एम. बिबीश यांच्या मते ग्रामीण महिलांच्या श्रमशक्तीचा सहभाग दर मुळे घसरला आहे.

  • )बाल विवाह आणि वृद्धी दर घटल्याने
  • )शिक्षणाचा परिणाम आणि उत्पन्न परिणाम✓ योग्य
  • )शिक्षणाचा परिणाम आणि घटते स्त्री-पुरुष प्रमाण
  • )उत्पन्न परिणाम आणि घटते वृद्धी दर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Economy

खालीलपैकी कोणते घटक प्रादेशिक असमतोलाचे निर्देशक आहेत ? अ. निव्वळ राज्यांतर्गत उत्पन्न ब. निव्वळ राज्यांतर्गत दरडोई उत्पन्न क. गुंतवणुकीचे कल ड. पायाभूत सुविधांची असमानता पर्यायी उत्तरे : (1) फक्त अ (2) फक्त अ आणि ब (3) फक्त ब (4) यापैकी सर्व

  • )फक्त अ
  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब
  • )यापैकी सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Economy

खालील दिलेल्या जागतिक बँकेच्या धोरण अभ्यास निष्कर्षांपैकी कोणता योग्य आहे/आहेत ? अ. पायाभूत सुविधा साठ्याच्या वृद्धीवर सकारात्मक परिणाम होतो. ब. पायाभूत सुविधांचा उच्च दर्जा व वाढते प्रमाण यामुळे उत्पन्न असमानता घटते. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )अ आणि ब दोन्ही✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणताही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Economy

खालील विधाने विचारात घ्या : अ. 31 मार्च, 2019 रोजी भारताची रस्ते वाहतूक जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रस्ते वाहतूक आहे. ब. 2019 – 20 मध्ये प्रतिदिन रस्ते बांधणीचे प्रमाण 36.5 किमी वरून 2020 – 21 मध्ये 40.5 किमी इतके लक्षणीय रित्या वाढले आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ? पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ योग्य आहे✓ योग्य
  • )फक्त ब योग्य आहे
  • )दोन्ही अ आणि ब चूक आहेत
  • )दोन्ही अ आणि ब योग्य आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Current Affairs

खालीलपैकी कोणते राष्ट्रीय LED कार्यक्रमाचे घटक आहेत ? अ. सर्वांसाठी माफक दरात उन्नत ज्योती LED (उजाला) ब. राष्ट्रीय रस्ते विद्युतीकरण कार्यक्रम (SLNP)

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )अ आणि ब दोन्हीही✓ योग्य
  • )अ आणि ब दोन्हीही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Current Affairs

भारतातील खालीलपैकी कोणते राज्य 100 टक्के कुटुंबांकडे नळ जोडणी (कनेक्शन) असलेले म्हणजे 'हर घर जल राज्य' म्हणवले जाणारे पहिले राज्य आहे ?

  • )महाराष्ट्र
  • )केरळ
  • )गुजरात
  • )गोवा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Current Affairs

खालील विधाने विचारात घ्या : अ. 2016 मध्ये उडानची सुरुवात केली गेली. ब. उडान हा भारत सरकारचा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कार्यक्रम आहे. क. 2016 मध्ये उडान सुरुवात होई पर्यंत, भारतात 74 विमानतळे नियोजित कार्य करीत होती. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

  • )फक्त अ आणि ब बरोबर आहेत
  • )फक्त ब आणि क बरोबर आहेत
  • )फक्त अ आणि क बरोबर आहेत✓ योग्य
  • )फक्त ब बरोबर आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Current Affairs

दरम्यानच्या समुद्राखालील 2313 किमीच्या ऑप्टीक फायबर आधारित दूरसंचार संलग्नता दुव्याचे उद्घाटन ऑगस्ट 2020 मध्ये करण्यात आले.

  • )कोची आणि लक्षद्वीप बेटे
  • )चेन्नई आणि अंदमान आणि निकोबार बेटे✓ योग्य
  • )चेन्नई आणि लक्षद्वीप बेटे
  • )कोची आणि अंदमान आणि निकोबार बेटे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Geography

मार्गाच्या लांबीनुसार भारतीय रेल्वेचा जगात ______ क्रमांक लागतो. तर मालवाहतुकीनुसार तिचा जगात ______ क्रमांक लागतो.

  • )तिसरा, चौथा
  • )चौथा, तिसरा
  • )चौथा, चौथा✓ योग्य
  • )तिसरा, तिसरा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Maharashtra

महाराष्ट्राच्या ‘व्हिजन 2030’ पत्रिकेनुसार, महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांविषयी खालीलपैकी कोणते मुद्दे योग्य आहेत? अ. डॉक्टर – लोकसंख्या गुणोत्तर – 1 : 1418 ब. बाल लिंग गुणोत्तर – 894 क. पाईपद्वारे पाणी पुरवठा व्यवस्थेने लाभार्थी ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी – 84.9 ड. प्रति वर्ग खोली शालेय विद्यार्थी संख्या – 31 पर्यायी उत्तरे :

  • )अ, ब, क आणि ड✓ योग्य
  • )केवळ अ आणि क
  • )केवळ अ, ब आणि क
  • )केवळ ब, क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Current Affairs

2021 च्या युनिसेफच्या कुटुंब पाहणी अहवालाच्या नुसार, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? अ. 25 वर्षे वयाखालील 220 कोटी मुले व तरुणांना निश्चित इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. ब. ग्रामीण भागात राहणाऱ्या केवळ 23% मुलांना इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. क. 25 पेक्षा अधिक देशांनी फेब्रुवारी 2021 पर्यंत शाळा बंद ठेवल्या होत्या. पर्यायी उत्तरे :

  • )अ, ब आणि क✓ योग्य
  • )केवळ अ आणि ब
  • )केवळ अ आणि क
  • )केवळ ब आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Economy

खालील विधाने विचारात घ्या : अ. 1 एप्रिल, 2005 पासून भारतात व्हॅट लागू करण्यात आला होता. ब. जम्मू आणि काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी व्हॅट लागू केला होता. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ? पर्यायी उत्तरे :

  • )केवळ अ योग्य आहे✓ योग्य
  • )केवळ ब योग्य आहे
  • )दोन्ही अ आणि ब योग्य आहेत
  • )दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Economy

खाजगीकरणार्तगत घेतलेल्या मालकीविषयक उपायात खालीलपैकी कोणते समाविष्ट नाही ?

  • )सार्वजनिक उद्योगाची मालकी खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरीत करणे
  • )संयुक्त उपक्रम
  • )उद्योग अवसायनात काढणे
  • )भाडे पट्ट्याने देणे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Economy

जागतिक व्यापार संघटनेत खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट आहेत ? अ. बँकिंग आणि विमा ब. कृषि उत्पादने क. पेटंट आणि औद्योगिक डिझाइन ड. औषधे आणि रासायनिक उत्पादने पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त अ, ब आणि क
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Economy

खालीलपैकी कोणते जागतिकीकरणाचे मापदंड नाही ?

  • )वस्तू व सेवांचा मुक्त प्रवाह / Free flow of goods and services
  • )भांडवलाचा मुक्त प्रवाह / Free flow of capital
  • )श्रमिकांची मुक्त हालचाल / Free movement of labour
  • )जागतिक स्तरावर सामाजिक-आर्थिक समानता / Socio-economic equality at global level✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Economy

जागतिक व्यापार संघटना करार केव्हा अंमलात आला ?

  • )1 जानेवारी, 1991 / 1st January, 1991
  • )5 फेब्रुवारी, 1994 / 5th February, 1994
  • )1 जानेवारी, 1995 / 1st January, 1995✓ योग्य
  • )26 जानेवारी, 1996 / 26th January, 1996

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Economy

भारतातील आर्थिक सुधारणांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. स्थूलआर्थिक स्थिरीकरणामध्ये चलनवाढीवरील नियंत्रण, वित्तीय आणि व्यवहारतोल यांचे समायोजन यांचा समावेश होतो. ब. संरचनात्मक समायोजनामध्ये व्यापार आणि भांडवली प्रवाह सुधारणा, औद्योगिक नियमन यांचा समावेश होतो. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?

  • )फक्त अ योग्य आहे
  • )फक्त ब योग्य आहे
  • )दोन्ही अ आणि ब योग्य आहेत✓ योग्य
  • )दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Economy

जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने नाहीशी करणे हा आहे. ब. मंत्री परिषद हे सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ आहे. क. डिसेंबर 2005 मध्ये सहावी मंत्री परिषद दोहा येथे झाली होती. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त ?

  • )Only a and b
  • )Only b and c
  • )Only b
  • )Only c✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Economy

खाजगीकरणाच्या पद्धती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. एकूण निर्गुंतवणूककरण (डिनेशनलायझेशन) म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची संपूर्ण मालकी खाजगी हातात हस्तांतरित करणे. ब. व्यवस्थापन खरेदी म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची संपूर्ण मालकी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे हस्तांतरित करणे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त ?

  • )केवळ अ चूक आहे / Only a is incorrect
  • )केवळ ब चूक आहे / Only b is incorrect✓ योग्य
  • )दोन्ही अ आणि ब चूक आहेत / Both a and b are incorrect
  • )दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत / Both a and b are correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Economy

जागतिक बँकेने भारताला सुचवलेले संरचनात्मक सुधारणा उपाय कोणत्या धोरणासाठी होते ?

  • )शैक्षणिक धोरण / Education Policy
  • )श्रमविषयक धोरण / Labour Policy
  • )नवीन आर्थिक धोरण / New Economic Policy✓ योग्य
  • )मौद्रिक धोरण / Monetary Policy

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Economy

2020 – 21 या आर्थिक वर्षासाठी भारतातील थेट परकीय गुंतवणुकीत सर्वाधिक टक्के वाटा असलेल्या खालील गुंतवणूकदार देशांची त्यांच्या महत्त्वा नुसार क्रमवारी लावा. अ. सिंगापूर ब. अमेरिका क. मॉरिशस पर्यायी उत्तरे:

  • )सिंगापूर – प्रथम, अमेरिका – द्वितीय, मॉरिशस – तिसरा✓ योग्य
  • )अमेरिका – प्रथम, मॉरिशस – द्वितीय, सिंगापूर – तिसरा
  • )मॉरिशस – प्रथम, सिंगापूर – द्वितीय, अमेरिका – तिसरा
  • )मॉरिशस – प्रथम, अमेरिका – द्वितीय, सिंगापूर – तिसरा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Economyआयोगाने रद्द

ट्रिप्स (TRIPS) अंतर्गत अन्न, औषधे आणि रासायनिक उत्पादने यांना ________ वर्षांसाठी कॉपीराईट व इतर अधिकारांचे संरक्षण मिळते.

  • )20
  • )50
  • )30
  • )25

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ६३Economy

खाली दिलेल्या माहितीच्या आधारे संस्था ओळखा : अ. याची स्थापना 1999 मध्ये झाली. ब. याची स्थापना 1997 – 99 मधील जागतिक आर्थिक संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी झाली. क. हा एक आंतर-सरकारी मंच आहे (मध्यम उत्पन्न देशांसाठीचा). ड. याची निर्मिती आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी झाली. पर्यायी उत्तरे :

  • )जागतिक बँक
  • )जी 20✓ योग्य
  • )आशियाई विकास बँक
  • )जी 7

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Current Affairs

सन 2015 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची दहावी मंत्री परिषद ________________ येथे भरलेली होती.

  • )हाँगकाँग
  • )सिंगापूर
  • )नैरोबी✓ योग्य
  • )इंडोनेशिया

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Economy

सन 2018 – 19 मध्ये भारतातून आयात करण्याबाबतीत ________ हा देश पहिल्या क्रमांकावर आहे.

  • )अमेरिका / USA✓ योग्य
  • )स्वित्झर्लंड / Switzerland
  • )जपान / Japan
  • )जर्मनी / Germany

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Economy

समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम हा सरकारने पुढील उपाय योजनासाठी राबविला : अ. सोने आयातीवर नियंत्रण ब. भाववाढीवर नियंत्रण क. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी ड. व्यवहारतोलातील स्थिती सुधारण्यासाठी योग्य उत्तरे निवडा.

  • )फक्त अ, क आणि ड / Only a, c and d
  • )फक्त ब, क आणि ड / Only b, c and d✓ योग्य
  • )फक्त ब आणि क / Only b and c
  • )फक्त अ आणि ड / Only a and d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Economy

खालीलपैकी कोण निर्यातदार कर्जदारांना निर्यात कर्ज देण्यामधील जोखमीसाठी बँकांना विमा संरक्षण प्रदान करते ?

  • )भारतीय आयात निर्यात बँक (EXIM Bank)
  • )निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू (EPCG) योजना
  • )एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड✓ योग्य
  • )आपत्कालीन क्रेडिट लाइन हमी योजना

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Current Affairs

भारत-UAE गुंतवणुकीवरील उच्चस्तरीय टास्क फोर्स संबंधित खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. पहिली बैठक 2 ऑक्टोबर, 2021 रोजी दुबई, UAE येथे झाली. ब. विद्यमान गुंतवणुकीशी संबंधित परस्पर समस्यांचे निराकरण करण्यासाठीचे एक व्यासपीठ म्हणून कार्य करते. क. दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गुंतवणूक सुलभिकरणासाठीचे व्यासपीठ म्हणून कार्यरत. ड. 2 ऑक्टोबर, 2021 च्या बैठकीत भारत-UAE सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठी वाटाघाटींच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि मान्य केलेल्या कालवद्धतेवर टिकून राहण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. पर्यायी उत्तरे:

  • )फक्त ब, क आणि ड बरोबर आहेत✓ योग्य
  • )फक्त अ, ब आणि क बरोबर आहेत
  • )फक्त अ, क आणि ड बरोबर आहेत
  • )अ, ब, क आणि ड बरोबर आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Economy

खालीलपैकी कोणती विधाने 'प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी' कराराबाबत बरोबर आहेत ? अ. भारत 2012 मध्ये जेव्हा कराराबाबत वाटाघाटी सुरु झाल्या तेव्हा यात सामील होता परंतु 2019 मध्ये यातून बाहेर पडला. ब. नोव्हेंबर 2020 मध्ये या करारावर स्वाक्षरी झाली. क. यात केवळ आसियान (ASEAN) सदस्य देशांचा समावेश आहे. ड. हे ई-कॉमर्स विकासास गुंतवणूक, व्यापार आणि सेवांना प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदींसह जगातील सर्वात मोठे 'मुक्त व्यापार क्षेत्र' स्थापित करते.

  • )फक्त अ आणि ड बरोबर आहेत
  • )फक्त ब, क आणि ड बरोबर आहेत
  • )फक्त अ, ब आणि क बरोबर आहेत
  • )फक्त अ, ब आणि ड बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Economy

सन 2016 – 17 मध्ये भारतातील __________ हे सर्वाधिक निर्यात उत्पन्न मिळविणारे क्षेत्र होते.

  • )जूट कपडे
  • )तयार कपडे
  • )रत्ने आणि दागिने
  • )अभियांत्रिकी वस्तू✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Economy

अंदाजपत्रकीय तूट म्हणजे

  • )एकूण प्राप्ती – एकूण खर्च✓ योग्य
  • )वित्तीय तूट
  • )महसूली प्राप्ती – महसूली खर्च
  • )प्राथमिक तूट

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Economy

केंद्र सरकारच्या भांडवली खर्चात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? अ. राज्य सरकारांना कर्जे ब. आर्थिक विकासासाठीचा भांडवली खर्च क. प्रशासकीय खर्च ड. विदेशी सरकारांना कर्जे योग्य उत्तरे निवडा.

  • )फक्त ब, क आणि ड
  • )फक्त अ, क आणि ड
  • )फक्त अ, ब आणि ड✓ योग्य
  • )फक्त अ, ब आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Economyआयोगाने रद्द

खालीलपैकी कोणत्या कराची प्रोफेसर काल्डोर यांनी शिफारस केली होती ?

  • )संपत्ती कर
  • )मालमत्ता शुल्क
  • )देणगी कर
  • )सेवा कर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ७७Economy

केंद्र सरकारच्या महसूली खर्चाशी खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधीत आहेत ? अ. चालू कर ब. भांडवली प्राप्ती क. कर्जे ड. आर्थिक विकास पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Economyआयोगाने रद्द

कर विषयक सुधारणा करण्यासाठी भारतात कोणत्या समित्या स्थापन करण्यात आल्या ? अ. चेल्लैय्या समिती ब. एन. के. झा समिती क. भुतलिंगम समिती ड. वांच्छू समिती

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )फक्त क आणि ड
  • )यापैकी सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ८१Economy

केंद्र सरकारची करेतर उत्पन्नाची साधने ___________ आहेत. अ. शासकीय उपक्रमांचा नफा ब. मालमत्ता कर क. राजकोषीय सेवा ड. सर्वसाधारण सेवा योग्य उत्तरे निवडा. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ, ब आणि क
  • )फक्त अ, क आणि ड✓ योग्य
  • )फक्त अ, ब आणि ड
  • )फक्त ब, क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Economy

चौदाव्या वित्त आयोगाची स्थापना यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली :

  • )सी. रंगराजन
  • )राजा चेलय्या
  • )अरुण जेटली
  • )वाय.व्ही. रेड्डी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Economy

सरकारचे अल्पकालीन निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन कोणते ?

  • )सरकारी हुंड्या✓ योग्य
  • )बाजार कर्जे
  • )प्रतिभूती
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Economy

भारतातील अन्नधान्य अनुदाने यात याच समावेश होतो : अ. शेतकऱ्यांसाठीची अनुदाने ब. उपभोक्त्यांची अनुदाने क. भारतीय अन्नधान्य महामंडळासाठीची अनुदाने पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त अ आणि क
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Quantitative Aptitude

दोन उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत 135 मते अवैध ठरली. यशस्वी उमेदवाराला वैध मतांच्या 70% मते मिळाली आणि तो 40000 मतांनी विजयी झाला. तर एकूण किती मतदान झाले ?

  • )100135✓ योग्य
  • )470135
  • )100000
  • )170135

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Logical Reasoning

कोणीतरी एकीने झाड पाडले आहे आणि चौकशी करताना तुम्हाला पुढील प्रतिसाद मिळाले आहेत. जर फक्त एकच प्रतिसाद सत्य असेल, तर कोणी झाड पाडले असले पाहिजे ? प्रतिसाद : तारा : मी हे केले आहे असे सांगताना दया खोटे बोलली. गुणी : मी हे केले नाही. आयशा : हे दयाने केले. दया : हे ताराने केले.

  • )आयशा
  • )दया
  • )गुणी✓ योग्य
  • )तारा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Logical Reasoning

दिलेल्या एका विशिष्ट जानेवारी महिन्यात नेमके 4 सोमवार व 4 शुक्रवार आहेत तर त्या संबंधाने पुढे दिलेली कोणते/ती विधान/ने निश्चितपणे सत्य आहेत ? विधाने : अ. या महिन्याचा पहिला दिवस निश्चितपणे बुधवार आहे. ब. या महिन्यात पाच बुधवार आणि चार शनिवार आहेत. क. या महिन्यातील शेवटच्या गुरुवारी 31 तारीख आहे. ड. हा महिना मंगळवारी सुरू होतो.

  • )फक्त अ व क
  • )ड वगळून सर्व
  • )अ वगळून सर्व✓ योग्य
  • )विधानांची सत्यता पडताळण्यासाठी पुरेशी विदा दिलेली नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Logical Reasoning

श्री सुरेश हे दक्षिणेकडे तोंड करून ते डावीकडे वळले आणि त्यांनी घरापासून 3 किमी प्रवास केला आणि पुन्हा ते उजवीकडे वळले आणि 4 किमी प्रवास केला, नंतर ते त्यांच्या डाव्या बाजूला वळले आणि 9 किमी प्रवास केला. शेवटी ते त्यांच्या उजवीकडे वळले आणि 12 किमी अंतर कापले, तर ते त्यांच्या घरापासून किती अंतरावर आहेत ?

  • )28000 मी.
  • )25000 मी
  • )20000 मी✓ योग्य
  • )2000 मी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Logical Reasoning

एका क्रिकेट स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी एक सामना होऊन त्यातील चार संघ निवडले. त्या चार संघांचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला व शेवटी दोन निवडून त्यांच्यात एक सामना झाला. तर त्या स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले ?

  • )217✓ योग्य
  • )144
  • )219
  • )90

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Logical Reasoning

एका संयुक्त कुटुंबातील सर्वांपैकी 8 सदस्य केळी खात नाहीत, 7 सदस्य पपई खात नाहीत, 6 सदस्य पेरू खात नाहीत, 5 जण पपई व पेरू खात नाहीत, 2 जण केळी व पेरू खात नाहीत, 3 जण पपई व केळी खात नाहीत, 2 जण तिन्ही फळे खात नाहीत. या सर्व कुटुंब सदस्यांची एकूण संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.

  • )21
  • )13✓ योग्य
  • )17
  • )It is not possible to find the number as information about fruits which members eats is not given.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Logical Reasoning

दिलेली उदाहरणे अभ्यासा आणि “I stood” या अभिव्यक्तीचा संकेत निवडण्यासाठी दिलेले नियम वापरा : नियमाला कोणताही अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीच्या आधारे तयार झालेले नियम वापरा. उदाहरणे : koloa ⇒ I lie; kolue ⇒ he lay; आणि satoe = he stands

  • )satoa
  • )kolua
  • )satoe
  • )satua✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Logical Reasoning

मुलांच्या भेटवस्तू वाहून नेण्यासाठी संत निकोलास त्यांच्या आठ रेनडियर्सना दोघा-दोघांच्या चार ओळींत जुंपणार आहेत. त्यांनी त्यांची व्यक्तिगत नावे ठेवली असली तरी वर्णशःनीही निर्देशित केले आहे. ते रेनडियर्सना चांगले ओळखतात आणि त्यांच्या सवयी विचारात घेऊन त्यांना पुढील नियम लक्षात ठेवावे लागतात. Aला नेहमीच डाव्या बाजूला जुंपावे लागते, पण सर्वात मागच्या ओळीत जुंपून चालत नाही. B व C यांना पहिल्या दोनपैकी एका ओळीत जुंपावे लागते पण एकाच ओळीत जुंपण्याची गरज नाही. Dला नेहमीच Eच्या पाठी (लागून) जुंपावे लागते. Fला नेहमीच Gच्या पुढे जुंपावे लागते पण दोघे एकाच बाजूला कधीही नकोत आणि B किंवा Cच्या शेजारी नको. Hला नेहमीच A पासून शक्य तेवढा दूर जुंपावे लागते पण ते एका ओळीत जुंपून चालत नाही. दिलेल्या यादीतून सर्वात पाठची/च्या डावीकडून-उजवीकडेपर्यंत सर्वात शक्य जोडी/ड्या निवडा. अ. D-G ब. G-D क. E-G ड. H-G इ. G-H

  • )फक्त अ व ई
  • )क खेरीज सर्व
  • )फक्त अ, ब व ई✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Logical Reasoning

खालील अक्षर त्रिकोणावरून ती व्यवस्था काय आहे ते ओळखा. त्या व्यवस्थेच्या आधारावर सर्वात खालच्या ओळीवर डावीकडून चौथे अक्षर कोणते ?

  • )C
  • )F
  • )J✓ योग्य
  • )P

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Logical Reasoning

वैध निष्कर्ष निवडा. सत्य विधाने : सर्व कमळे कोआला आहेत. सर्व कोआला बोटी आहेत. काही भिंती बोटी आहेत. निष्कर्ष : अ. काही बोटी कमळे आहेत. ब. काही भिंती कोआला आहेत. क. सर्व कोआला कमळे आहेत.

  • )फक्त अ व क
  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त ब व क
  • )फक्त ब

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Quantitative Aptitude

जर X, Y आणि Z हे चल फक्त 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 या किमतींचे असतील, तर X + Y + Z = 12 या समीकरणाच्या उकलींची संख्या निवडा.

  • )36
  • )37✓ योग्य
  • )38
  • )31

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2021-sti-paper-ii