स्पर्धाAI

MPSC गट ब २०२१

Combined Prelims · ९४ प्रश्न · रद्द ८ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Polity

खालील विधाने विचारात घ्या: अ. सरपंचाचे (ज्याची निवड ग्राम पंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे) अथवा उपसरपंचाचे, रिक्त (राजीनाम्यामुळे) झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांका पासून तीस दिवसांच्या आत भरले पाहिजे. ब. थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांका पासून तीन महिन्यांच्या आत भरले पाहिजे. क. ग्राम पंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्राम पंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त अ आणि क
  • )फक्त ब आणि क
  • )अ, ब आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

'सरकारिया आयोग' यासाठी अनुकूल होते.

  • )राज्यपाल पद रद्द करावे
  • )अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात
  • )आंतर-राज्य परिषद रद्द करावी
  • )वरीलपैकी एकही नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

राज्याच्या महाधिवक्त्यासंबधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

  • )तो राज्याच्या मंत्री परिषदेची ईच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो.
  • )त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते.
  • )तो राज्यशासना विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो.
  • )वरीलपैकी एकही नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

विधान (अ): संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. कारण (ब): प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

  • )'अ' आणि 'ब' दोन्हीही बरोबर आणि 'ब' हे 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
  • )'अ' आणि 'ब' दोन्हीही बरोबर, परंतु 'ब' हे 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.✓ योग्य
  • )'अ' हे बरोबर आहे, परंतु 'ब' हे चुकीचे आहे.
  • )'अ' हे चुकीचे आहे, परंतु 'ब' हे बरोबर आहे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

'अर्थ विधेयक' बाबतीत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ? अ. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो. ब. ते राज्यपालांच्या शिफारशी शिवाय मांडता येत नाही. क. एखादे विधेयक अर्थ विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो. ड. जर दोन्ही सभागृहांमध्ये अर्थ विधेयका बाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलावू शकतात. a. It can be introduced either by a minister or by a private member. b. It cannot be introduced except on the recommendation of the Governor. c. If any question arises whether the bill is a money bill or not, the decision of the Governor is final. d. In case of a deadlock over a money bill, the Governor can summon a joint sitting of Legislative Assembly and Legislative Council.

  • )फक्त अ आणि ब / Only a and b
  • )फक्त ब / Only b✓ योग्य
  • )फक्त अ, ब आणि क / Only a, b and c
  • )फक्त अ, क आणि ड / Only a, c and d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

भारतीय संसदेला राज्यसूचीतल कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी _________ ने ठराव मंजूर केला तर.

  • )लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने / Lok Sabha by a majority of its total membership.
  • )लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने / Lok Sabha by a majority of not less than two-thirds of its total membership.
  • )राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने / Rajya Sabha by a majority of its total membership.
  • )राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या दोन-तृतीयांश सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने / Rajya Sabha by a majority of not less than two-thirds of its members present and voting.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polityआयोगाने रद्द

महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरविता येईल परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत एक महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. ब. जिल्हा परिषद अध्यक्ष एक-पंचमांश पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलावू शकतात. क. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान-अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थिती मध्ये उपाध्यक्षाने भूषविले पाहिजे. ड. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थिती मध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषविल. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त अ, ब आणि क
  • )फक्त ब, क आणि ड
  • )फक्त ब आणि क
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न Polity

सर्वसाधारणपणे, राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि _________ समावेश असतो.

  • )इतर नऊ न्यायाधीशांचा
  • )राज्यपाल ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा
  • )संसद ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा
  • )राष्ट्रपती ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Polity

राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्ये पार पाडण्यासाठी घटनासमितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतिविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले ?

  • )डॉ. बी.आर. आंबेडकर
  • )अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
  • )डॉ. राजेंद्र प्रसाद✓ योग्य
  • )डॉ. के.एम. मुन्शी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११History

योग्य जोड्या लावा : अ अ. बाळशास्त्री जांभेकर ब. गोपाळ हरी देशमुख क. महात्मा ज्योतिबा फुले ड. महर्षी धोंडो केशव कर्वे ब I. विधवागृहाची स्थापना II. स्त्रिशिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते III. पुनर्विवाहोत्तेजक मंडळी IV. अनाथ बालकाश्रम

  • )अ-III, ब-IV, क-II, ड-I
  • )अ-II, ब-III, क-IV, ड-I✓ योग्य
  • )अ-II, ब-III, क-I, ड-IV
  • )अ-III, ब-II, क-IV, ड-I

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Historyआयोगाने रद्द

1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरु केली :

  • )(अ) इंडियन नॅशनल एअरवेज
  • )(ब) टाटा एअरवेज लि.
  • )(क) इम्पीरिअल एअरवेज
  • )(ड) इंडियन ट्रान्स-कॉन्टिनेन्टल एअरवेज लि.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न १३Historyआयोगाने रद्द

“देशाची खरी उन्नती व्हावयाची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही.” असे यांचे मत होते

  • )(अ) डॉ. भांडारकर गो.ग.
  • )(ब) न्यायमूर्ती रानडे
  • )(क) न्यायमूर्ती तेलंग
  • )(ड) डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न १४History

नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली ?

  • )समाचार चंद्रिका
  • )प्रभाकर
  • )दीनबंधु✓ योग्य
  • )ज्ञानप्रकाश

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५History

खालील जोड्या लावा : अ. पंडिता रमाबाई ब. रमाबाई रानडे क. ताराबाई शिंदे ड. जनकाका शिंदे I. 'स्त्री-पुरुष तुलना' ग्रंथ II. निराश्रित सेवासदनाची स्थापना III. शारदा सदन ची स्थापना IV. 'हिंदू लेडीज सोशल क्लब' ची स्थापना पर्यायी उत्तरे:

  • )II III IV I
  • )I IV III II
  • )III IV I II✓ योग्य
  • )IV II III I

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६History

इ.स. 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता ? अ. विधवा पुनर्विवाह ब. स्त्री शिक्षण क. जाती बंधने तोडणे ड. मूर्तीपूजा मान्य वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त क✓ योग्य
  • )फक्त अ, क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८History

वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम संबंधीत खालील विचार/विधान कोणी मांडले ? अ. हिंदुस्थानी लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. ब. आर्थिक नि:सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले आहे. क. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे. ड. हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे.

  • )अ. रमेश चंद्र दत्त, ब. न्यायमूर्ती रानडे, क. सर जॉर्ज ऑक्सेंडन, ड. लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख
  • )अ. न्यायमूर्ती रानडे, ब. सर जॉर्ज ऑक्सेंडन, क. रमेश चंद्र दत्त, ड. लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख
  • )अ. लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, ब. रमेश चंद्र दत्त, क. न्यायमूर्ती रानडे, ड. सर जॉर्ज ऑक्सेंडन✓ योग्य
  • )अ. न्यायमूर्ती रानडे, ब. लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, क. सर जॉर्ज ऑक्सेंडन, ड. रमेश चंद्र दत्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९History

दादाभाई नौरोजींच्या मते, '_______ चे नि:सारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते, तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पहावयास मिळाला असता.' गाळलेल्या जागा खालीलपैकी योग्य पर्यायाने भरा.

  • )हस्तोद्योग उत्पादन
  • )भारतीय चलन
  • )कापसाचे संपुर्ण उत्पादन
  • )संभाव्य अधिशेष✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१History

पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता ?

  • )कैसर-ए-हिंद✓ योग्य
  • )कैसर-ए-हिंदू
  • )कैसर-ए-लेडी
  • )इंडियन सुपर लेडी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२History

आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता ? अ. बाबा भांड ब. बिजनिया क. कजर सिंग ड. तांट्या भिल्ल वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त ब
  • )फक्त ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३History

नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली ?

  • )पंजाब आणि सिंध
  • )महाराष्ट्र आणि कर्नाटक
  • )आंध्र प्रदेश आणि ओरिसा
  • )बंगाल आणि बिहार✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Historyआयोगाने रद्द

खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले, ते ओळखा : अ. 'शारदा' या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. ब. हंटर कमिशनपुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली. क. विधवा स्त्रियांसाठी 'शारदाश्रम' ही संस्था स्थापन केली. ड. 'माझे पुराण' हे आत्मचरित्र लिहिले.

  • )अ. पंडिता रमाबाई, ब. गोविंद बल्लाळ, क. आनंदीबाई कर्वे, ड. रमाबाई रानडे
  • )अ. रमाबाई रानडे, ब. आनंदीबाई कर्वे, क. पंडिता रमाबाई, ड. गोविंद बल्लाळ
  • )अ. विद्याबेन निलकंठ, ब. रमाबाई रानडे, क. आनंदीबाई कर्वे, ड. गोविंद बल्लाळ
  • )अ. गोविंद बल्लाळ, ब. पंडिता रमाबाई, क. रमाबाई रानडे, ड. आनंदीबाई कर्वे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २५History

1857 च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ? अ. भोरचे पंतसचिव चिमणाजी रघुनाथ (प्रथम) यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. ब. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. क. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. ड. रंगो बापूजी गुप्तेचे चिरंजीव सीतारामपंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनीही उठाव केला.

  • )फक्त अ आणि क
  • )फक्त ब, क आणि ड
  • )फक्त अ, क आणि ड✓ योग्य
  • )फक्त क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Maharashtra

औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा : अ. नाशिक ब. कोल्हापूर क. नागपूर ड. औरंगाबाद I. बुटीबोरी II. शेंद्रा III. विंचूर IV. हुपरी पर्यायी उत्तरे : अ ब क ड

  • )IV III II I
  • )III I II IV
  • )III I IV II
  • )III IV I II✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Economy

औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये : अ. सुनियोजित आणि हरितपट्टेयुक्त स्मार्ट शहर. ब. AURIC हे संक्षिप्त रूप आहे. क. प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1,000 कोटी रुपये. ड. दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्याचा (कॉरिडॉरचा) भाग आहे. अचूक पर्याय निवडा :

  • )फक्त अ / Only a
  • )फक्त अ आणि ब / Only a and b
  • )फक्त अ, ब आणि क / Only a, b and c
  • )फक्त अ, ब आणि ड / Only a, b and d✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Geography

सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते ?

  • )उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी, तरीही घटता कल / Period of High growth with declining trend✓ योग्य
  • )जलद लोकसंख्या वाढीचा कालावधी / Period of Rapid growth
  • )लोकसंख्या वाढीतील सातत्य / Period of Steady growth
  • )स्थिर लोकसंख्या कालावधी / Period of Stagnant growth

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Geography

भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी, 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे ?

  • )महाराष्ट्र / Maharashtra
  • )राजस्थान / Rajasthan
  • )मध्य प्रदेश / Madhya Pradesh
  • )उत्तर प्रदेश / Uttar Pradesh✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Geography

खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो ?

  • )द्विपकल्पीय विभाग
  • )काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयीन विभाग✓ योग्य
  • )मध्य विभाग
  • )गंगेचे मैदान

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Maharashtraआयोगाने रद्द

2011 च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते/कोणती वाक्य चुकीचे आहे/आहेत ? अ. नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23 आहे. ब. महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत तिसरा क्रमांक लागतो. क. महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 5,08,27,500 इतकी आहे. ड. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क
  • )फक्त अ आणि क
  • )फक्त ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ३३Maharashtra

महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा : जिल्हा जलसिंचन योजना अ. सातारा I. मुकणे ब. नाशिक II. विष्णुपूरी क. नांदेड III. कणहेर ड. यवतमाळ IV. बेंबला पर्यायी उत्तरे :

  • )II III IV I
  • )III I II IV✓ योग्य
  • )III IV I II
  • )IV II III I

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Geographyआयोगाने रद्द

खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो ?

  • )प्राणहिता, प्रवरा, वर्धा, मांजरा
  • )मांजरा, वर्धा, प्रवरा, प्राणहिता
  • )प्राणहिता, वर्धा, प्रवरा, मांजरा
  • )मांजरा, प्रवरा, वर्धा, प्राणहिता

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ३६Geography

मृदा निर्मितीवर आधारित, महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला ?

  • )डॉ. डी. स्मिथ
  • )डॉ. केलॉग आणि डॉ. थॉर्प
  • )डॉ. डॉकुचेव्ह
  • )डॉ. बसू आणि डॉ. शिरूर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Geography

महाराष्ट्रातील कोंकण प्रादेशिक विभागातील 'मध्य कोंकण' मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या ?

  • )देवगड, आचरा आणि कर्ली खाडी
  • )राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाडी✓ योग्य
  • )धरमतर, कालावळ आणि तेरेखोल खाडी
  • )डहाणू, वसई आणि दातिवरे खाडी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Geography

लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत

  • )आठ अंश चॅनल मुळे
  • )नऊ अंश चॅनल मुळे✓ योग्य
  • )दहा अंश चॅनल मुळे
  • )शून्य अंश चॅनल मुळे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Geography

जी.टी. त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार, पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे ?

  • )पर्वतीय आर्द्र हवामान
  • )उष्ण कटिबंधीय शुष्क हवामान
  • )उष्ण कटिबंधीय पावसाळी (मान्सून) हवामान✓ योग्य
  • )उपोष्ण कटिबंधीय आर्द्र हवामान

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Geography

महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे ?

  • )58%
  • )65%
  • )85%✓ योग्य
  • )95%

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Economy

1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी _________ सुरु करण्यात आली.

  • )विवेकपूर्ण नियम
  • )ग्राहक सेवा समिती
  • )बँकिंग लोकपाल योजना✓ योग्य
  • )आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Economy

खालील विधाने विचारात घ्या. अ. स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. ब. या समितीमध्ये प्रा. पी.सी. महालनोबिस, प्रा. डी.आर. गाडगीळ आणि प्रा. व्ही.के.आर.व्ही. राव यांचा समावेश होता. क. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/कोणती विधाने चुकीची आहे/आहेत ?

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त अ आणि क
  • )फक्त ब आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Economy

ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जपुरवठा करणारी _________ ही शिखर संस्था आहे.

  • )रिझर्व्ह बँक
  • )स्टेट बँक ऑफ इंडिया
  • )नाबार्ड✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Economy

केंद्रीय अर्थसंकल्प 2021 – 22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे ?

  • )वस्तू आणि सेवा कर
  • )कर्ज घेणे आणि इतर दायित्वे✓ योग्य
  • )प्राप्तीकर
  • )कॉर्पोरेट कर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Geography

2011 च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता _________ आहे.

  • )117 प्रति चौ. कि.मी.
  • )157 प्रति चौ. कि.मी.
  • )282 प्रति चौ. कि.मी.
  • )382 प्रति चौ. कि.मी.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Economyआयोगाने रद्द

भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणसंदर्भात कोणते विधान बरोबर नाही ?

  • )दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे. There is positive co-relation between per capital income and urbanisation.
  • )शहरीकरण व रोजगारवाढ यांच्यात सहसंबंध नाही. There is no co-relation between urbanisation and employment.
  • )शहरीकरणासोबत लोकांच्या रहाणीमानांच्या दर्जांत वाढ होते. There is increase in standard of living with urbanisation.
  • )शहरीकरण व दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे. There is negative relationship between urbanisation and population below poverty line.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ४७Economy

भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारेपेठेचा कोणता भाग हा वृद्धीकारक व नफा मिळवून देणारा आहे ?

  • )म्युच्युअल फंड Mutual Funds
  • )मोबाईल बँकिंग Mobile Banking
  • )रिटेल बँकिंग Retail Banking✓ योग्य
  • )इंटरनेट बँकिंग Internet Banking

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Economy

भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने दोन बाबींवर अवलंबून आहे. त्या म्हणजे : अ. तांत्रिक घटक ब. मनुष्यबळ क. संस्थात्मक घटक ड. सिंचन सुविधा

  • )फक्त अ आणि क Only a and c✓ योग्य
  • )फक्त अ आणि ड Only a and d
  • )फक्त अ आणि ब Only a and b
  • )फक्त क आणि ड Only c and d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Economy

खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, 2003 ची कोणती उद्दिष्टे/उद्दिष्ट्ये आहे/आहेत ? अ. कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे. ब. महसुली तुट शून्य गाठणे आणि वित्तीय तुट कमी करणे. क. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनविणे. ड. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे. पर्यायी उत्तरे :

  • )वरीलपैकी एकही नाही / None of the above
  • )वरीलपैकी सर्व / All of the above✓ योग्य
  • )फक्त अ आणि ब / Only a and b
  • )फक्त क आणि ड / Only c and d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Economy

भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्टे नाही ?

  • )जादा आर्थिक क्रिया कलापांची निर्मिती / Generation of additional economic activity
  • )निर्यातीला प्रोत्साहन / Promotion of export
  • )शेतीचा विकास / Development of agriculture✓ योग्य
  • )रोजगार निर्मिती / Creation of employment

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Economy

बालमृत्युदर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एक वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे वया खालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे.

  • )एक वर्ष / One year✓ योग्य
  • )एक महिना / One month
  • )एक आठवडा / One week
  • )एक दिवस / One day

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Economy

मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमण्यम (आर्थिक सर्वेक्षण 2020-21) यांच्या मते आर्थिक पुनप्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते ?

  • )U-आकाराचे / U-shape
  • )S-आकाराचे / S-shape
  • )V-आकाराचे / V-shape✓ योग्य
  • )Z-आकाराचे / Z-shape

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Economy

भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प, 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दरापतातळी किती टक्क्यांपर्यंत आहे ?

  • )5% ते 25%
  • )5% ते 35%
  • )5% ते 30%✓ योग्य
  • )5% ते 20%

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Economy

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरविली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. ब. भारतातील उद्योगांना विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. क. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त अ आणि क
  • )वरीलपैकी कोणतेही नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Economy

खालील विधाने विचारात घ्या. अ. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देश-देशातील वस्तु आणि सेवांच्या किंमती मधील फरकांवर आधारित असतो. ब. व्यापाराच्या अटी वस्तुंच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्याच्या किंमतीच्या गुणोत्तरच्या संदर्भात येतात. क. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहाराशेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. वर दिलेल्या विधान/विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? पर्यायी उत्तरे :

  • )वरील सर्व✓ योग्य
  • )फक्त अ
  • )फक्त क
  • )फक्त अ आणि ब

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Science

0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे

  • )औष्णिक न्यूट्रॉन / Thermal neutron✓ योग्य
  • )एपिथर्मल न्यूट्रॉन / Epithermal neutron
  • )वेगवान न्यूट्रॉन / Fast neutron
  • )मंद न्यूट्रॉन / Slow neutron

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Science

कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत, उष्णता स्थानांतरण

  • )अशक्य आहे / impossible
  • )दोन्ही वस्तू संपर्कात ठेवून शक्य आहे / possible by keeping both the bodies in contact
  • )काही बाह्य कार्य करून ते शक्य आहे / possible by doing some external work✓ योग्य
  • )यापैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Science

ध्वनीची कमीतकमी श्रवणीय वारंवारता म्हणजे

  • )श्रवणक्षमतेची आरंभ तीव्रता / threshold intensity of audibility
  • )ध्वनी श्रवणक्षमतेची न्यूनतम मर्यादा / lower pitch limit of audibility✓ योग्य
  • )ध्वनी श्रवणक्षमतेची उच्चतम मर्यादा / upper pitch limit of audibility
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Science

हिरा _________ आहे.

  • )धात्विक स्फटिक / Metallic Crystal
  • )सहसंयुजी स्फटिक / Covalent Crystal✓ योग्य
  • )आयनी स्फटिक / Ionic Crystal
  • )रेणू स्फटिक / Molecular Crystal

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Science

मिश्र धातूंचे, उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये वापर करण्याची शिफारस करतात.

  • )हलक्या स्टिलच्या / light steel
  • )हलक्या टिटॅनियमच्या / light titanium
  • )हलक्या तांब्याच्या / light copper
  • )हलक्या ॲल्युमिनियमच्या / light aluminium✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Environment

खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड ह्यामध्ये अभिक्रिया होऊन धुवार तयार होतो. ह्याच अन्योऽक्रियेत _________ हे दुय्यम उत्पाद असतात.

  • )फक्त ओझोन आणि अल्डीहाइड / only ozone and aldehydes
  • )फक्त अल्डीहाइड आणि किटोन / only aldehydes and ketones
  • )फक्त अल्डीहाइड, किटोन, परॉक्सिसॲसिल नायट्रेट / only aldehydes, ketones, peroxyacyl nitrate
  • )ओझोन, अल्डीहाइड, किटोन, परॉक्सिसॲसिल नायट्रेट / ozone, aldehydes, ketones, peroxyacyl nitrate✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Science

खालीलपैकी कोणती जोडी/जोड्या वन्यप्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहे/आहेत ?

  • )a. आशियायी सिंह – पँथेरा लिओ परसीका / Asiatic lion – Panthera leo persica
  • )b. पट्टेरी वाघ – पँथेरा टायग्रीस / Royal Bengal Tiger – Panthera tigris
  • )c. भारतीय गेंडा – रायनोसिरस युनिकॉर्निस / Indian Rhinoceros – Rhinoceros unicornis
  • )d. थामीन हरिण – सरवस ईल्डी / Thamin Deer – Cervus eldi✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Science

वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली ?

  • )थिओफ्रास्टस
  • )बेंथम व हुकर✓ योग्य
  • )कार्ल लिनायस
  • )जी.एम. स्मिथ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Science

खालीलपैकी कोणता कारकजीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे ?

  • )पक्सिनिया ग्रामिनीस ट्रिटीकाय✓ योग्य
  • )झँथोमोनास सिट्राय
  • )पक्सिनिया परपूरिया
  • )प्लाझमोपोरा व्हिटीकोल

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Science

खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते ?

  • )LDL कोलेस्टेरॉल
  • )VLDL कोलेस्टेरॉल
  • )LDL व VLDL कोलेस्टेरॉल
  • )HDL कोलेस्टेरॉल✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Science

जेव्हा किडनी (मूत्रपिंड) ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते, तेव्हा भरपूर लघवी होते. या रोगाला (चयापचय विकाराला) काय म्हणतात ?

  • )मधुमेह मेल्तिस
  • )मधुमेह इन्सिपिडस✓ योग्य
  • )किशोरवयीन मधुमेह
  • )नॉन-इन्सुलिन अवलंबीत मधुमेह मेल्तिस

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Quantitative Aptitude

एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता, त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाएवढी फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली, तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील, तर त्या भक्ताजवळ किती फुले होती ?

  • )415
  • )362
  • )346
  • )326✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Logical Reasoning

श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळतो आणि 30 कि.मी. प्रवास करतो. नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 कि.मी. प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 कि.मी. प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 कि.मी. प्रवास करतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?

  • )पूर्व
  • )आग्नेय
  • )नैऋत्य
  • )दक्षिण✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Logical Reasoningआयोगाने रद्द

खालील प्रश्नात पाच विधाने दिली आहेत. तीन विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत. ज्या पर्यायात तिसरे विधान हे अगोदरच्या दोन विधानांवरून अनुमान दर्शविणारे आहे, असा सप्रमाण पर्याय निवडा. विधाने : अ. अमित मुलगा आहे. ब. काही मुले क्रिकेट खेळत नाहीत. क. कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. ड. अमित क्रिकेट खेळतो. इ. जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत. पर्यायी उत्तरे :

  • )ड क अ
  • )क इ ब
  • )अ ब ड
  • )इ ड अ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ७४Logical Reasoning

एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर किती विद्यार्थी दोन्हीही विषयात उत्तीर्ण झाले ?

  • )5
  • )15
  • )8✓ योग्य
  • )16

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Quantitative Aptitude

एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नाहीत. एका वेळी दोन बिंदू जोडणाऱ्या रेषा काढल्या, तर अशा किती रेषा काढता येतील ?

  • )25
  • )29
  • )27
  • )28✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Logical Reasoning

दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन-आकृतीने दाखविता येतील ? शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती

  • )[Venn diagram with three circles, all intersecting each other]✓ योग्य
  • )[Venn diagram with three separate circles]
  • )[Venn diagram with two circles intersecting, and a third circle separate from both]
  • )[Venn diagram with one large circle containing three smaller, separate circles]

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Logical Reasoning

जर A = 1, B = 2, C = 3, ....., Z = 26, तर 'GODFATHER' हा शब्द कसा लिहाल ?

  • )7–15–6–4–20–12–8–5–18
  • )7–15–4–6–20–8–5–18–18
  • )7–15–4–6–2–10–8–5–18
  • )7–15–4–6–1–20–8–5–18✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Quantitative Aptitude

निरजने एकूण 60 कि.मी. अंतरापैकी पहिले 20 कि.मी. अंतर ताशी 10 कि.मी. वेगाने पार पाडले, पुढील 20 कि.मी. अंतर ताशी 12 कि.मी. वेगाने व राहिलेले 20 कि.मी. अंतर ताशी 15 कि.मी. वेगाने कापले, तर निरजचा संपूर्ण 60 कि.मी. अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती ?

  • )ताशी 12 कि.मी. / 12 km/hr✓ योग्य
  • )ताशी 13 कि.मी. / 13 km/hr
  • )ताशी 14 कि.मी. / 14 km/hr
  • )ताशी 11 कि.मी. / 11 km/hr

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Quantitative Aptitude

नेहा एक काम 6 दिवसांत पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसांत पूर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ?

  • )4.5✓ योग्य
  • )4
  • )5
  • )3.5

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Quantitative Aptitude

एका रकमेचे दोन वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे ₹ 1,800 व ₹ 1,890 आहे. तर ती रक्कम द.सा.द.शे. किती व्याज दराने ठेवली होती ?

  • )10✓ योग्य
  • )9
  • )12
  • )15

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Quantitative Aptitude

बागेचे प्रवेश शुल्क 35% ने कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% ने वाढली. तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा :

  • )7% कमी झाला / 7% decrease
  • )9% वाढला / 9% increase
  • )9% कमी झाला / 9% decrease✓ योग्य
  • )5% कमी झाला / 5% decrease

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Current Affairs

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRD) अहवालानुसार बालकांसंबंधी गुन्ह्याची माहिती निम्नप्रमाणे आहे : अ. 2018 मध्ये दरदिवशी 109 बालकांचे लैंगिक शोषण. ब. 2018 मध्ये अशा 39827 घटना नोंदवल्या गेल्या. क. 2018 मध्ये बालिकांवर बलात्कारकाच्या 21401 घटना घडल्या. ड. बालकांवर अत्याचारांच्या सर्वाधिक 2832 घटना महाराष्ट्रात घडल्या (2018). वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त अ, ब आणि क
  • )फक्त ब, क आणि ड
  • )फक्त अ, क आणि ड
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Science

एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी _________________ मध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय म्हणून ओळखला जातो.

  • )भारताची कुटुंब नियोजन संघटना
  • )आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग✓ योग्य
  • )राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम
  • )राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Current Affairs

शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांनीही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या उद्देशाने 'कारागृह पर्यटन' उपक्रम राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?

  • )राजस्थान
  • )उत्तर प्रदेश
  • )महाराष्ट्र✓ योग्य
  • )बिहार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Current Affairs

नीरीद्वारे सन्मानित दीनबंधु साहू यांचे कार्य खालीलप्रमाणे आहे : अ. समुद्रीय शैवाल वर ‘फार्मिंग द ओशियन’ नावाचे पुस्तक. ब. ‘बायोडायव्हर्सिटी ऑफ लाईफ’ मेरी कॉम वर आधारित लघुपट. क. इंटरनॅशनल सोसायटी फॉर एनर्जी एनव्हायर्नमेंट अँड सस्टेनेबिलिटी मध्ये शिष्यवृत्ती व संशोधन. ड. चिल्का प्रकल्पा आधारे समुद्री शेतीचे प्रशिक्षण. वरीलपैकी कोणते वाक्य असत्य आहे/आहेत ?

  • )फक्त अ आणि क / Only a and c
  • )फक्त ब / Only b✓ योग्य
  • )फक्त अ, क आणि ड / Only a, c and d
  • )वरीलपैकी एक ही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Science

जीसॅट-30 ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत ? अ. वजन – 3357 kg ब. उच्च गुणवत्तेची दूरदर्शन, दूरसंचार व प्रसारण सेवा देणार क. 12 सी, 12 केयू बँड ट्रान्सपोन्डर ने सुसज्ज ड. उच्च गुणवत्तेचा दळणवळण उपग्रह पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ आणि क / Only a and c
  • )फक्त ब आणि ड / Only b and d
  • )फक्त अ, क आणि ड / Only a, c and d
  • )वरीलपैकी सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Current Affairs

सोनाली नवनंगुळ लिखित खालीलपैकी कोणत्या कादंबरीला 2021 चा 'मराठी साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाला आहे ?

  • )स्वच्छंद
  • )ड्रीम रनर
  • )प्रकाशवाटा
  • )मध्यरात्रीनंतरचे तास✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Current Affairs

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते (2019) अभिजीत बॅनर्जी यांचा आजवरचा जीवनप्रवास पुढील मुद्द्यांमध्ये दिला आहे. त्याची पुनर्रजुळणी करून योग्य पर्याय निवडा. अ. न्यूनतम आय योजना (न्याय) या भारतातील दारिद्र्य निर्मूलन योजनेच्या निर्मितीत योगदान दिले. ब. 'गरिबीचे अर्थशास्त्र' या ग्रंथाचे लेखन. क. इन्फोसिस पुरस्कार मिळाला. ड. प्रेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता येथून अर्थशास्त्राचे अध्ययन. पर्यायी उत्तरे :

  • )क, ब, ड, अ
  • )ड, ब, अ, क
  • )ड, क, ब, अ✓ योग्य
  • )क, ब, अ, ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Current Affairs

2021 मध्ये लिओनेल मेस्सी याची खालीलपैकी कोणत्या पुरस्कारासाठी सातव्यांदा निवड झाली ?

  • )युरोपीयन गोल्डन शू
  • )वर्ल्ड प्लेयर ऑफ द ईअर
  • )वर्ल्ड सॉकर प्लेयर ऑफ द इअर
  • )बॅलन डी'ओर✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Current Affairs

75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येस शांतीकाळातील वीरतेचे 'अशोक चक्र' पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले ? (अ) ए.एस.आय. बाबू राम (ब) पोलीस कॉन्स्टेबल अल्ताफ हुसेन (क) लेफ्टीनंट गव्हर्नर गिरीश चंद्र मुरमू (ड) मिझोरामचे राज्यपाल, पी.एस. श्रीधरन पिल्लई (a) ASI Babu Ram (b) Police Constable Altaf Hussain (c) Lt. Governor Girish Chandra Murmu (d) Governor of Mizoram, P.S. Sreedharan Pillai

  • )फक्त अ आणि ब / Only a and b
  • )फक्त क आणि ड / Only c and d
  • )फक्त ब / Only b
  • )फक्त अ / Only a✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Environment

खालील विधाने लक्षात घ्या : अ. किवी हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहे. ब. अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहे/आहेत ?

  • )फक्त अ / Only a
  • )फक्त ब / Only b
  • )अ आणि ब दोन्ही / Both a and b✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Current Affairs

प्रधान मंत्री आवास योजना (नागरी) (PMAY-U) अंतर्गत 18 जानेवारी, 2021 पर्यंत ______ घरे मंजूर करण्यात आली होती.

  • )68.1 लाख / 68.1 Lakhs
  • )128.8 लाख / 128.8 Lakhs
  • )165.8 लाख / 165.8 Lakhs
  • )109.2 लाख / 109.2 Lakhs✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Current Affairs

अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग यांनी भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांच्या पहिल्या महिला वैमानिक नियुक्त होऊन कोणत्या वर्षी इतिहास घडविला?

  • )2015
  • )2016✓ योग्य
  • )2017
  • )2018

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Science

कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान ‘एक्स-57 मॅक्सवेल’ चा प्रारंभ केला ?

  • )लॅपॅन / LAPLAN
  • )इस्रो (आय.एस.आर.ओ.) / ISRO
  • )सी.एन.ई.एस / CNES
  • )नासा / NASA✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Science

पी.एस.एल.व्ही.- सी.48 (PSLV – C48) या प्रक्षेपणकाच्या माध्यमातून भारताद्वारे 11 डिसेंबर, 2019 रोजी खालीलपैकी कोणता कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यात आला ?

  • )RISAT – 2BR1✓ योग्य
  • )EMISAT
  • )CARTOSAT – 2B
  • )GSAT – 31

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Current Affairs

93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक व विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवनातील घटनांचा आजअखेरचा क्रम सुयोग्य प्रकारे व्यक्त करणारा अचूक पर्याय निवडा.

  • )(अ) ‘सुबोध बायबल – नवा करार’ ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार.✓ योग्य
  • )(ब) पुणे येथे 15व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • )(क) कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दिक्षा.
  • )(ड) ‘सुवार्ता’ या वार्तापत्राचे मुख्य संपादक.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2021-combined-prelims