स्पर्धाAI

MPSC गट ब २०२१

ASO Paper II · ९४ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Geography

जवळ बॉम्बेहाय हे सागरी तेल क्षेत्र आहे. पर्यायी उत्तरे: (1) फक्त अ (3) फक्त ब आणि क अ. मुंबई ब. वाशी क. ठाणे ड. अलिबाग

  • )फक्त अ✓ योग्य
  • )फक्त क
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

चंद्रपूर जिल्ह्यात ______ कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात.

  • )वन-व्याप्त प्रदेश✓ योग्य
  • )पर्जन्य-छायेचा प्रदेश
  • )अर्ध-शुष्क प्रदेश
  • )दुर्गम भाग

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला ______ म्हणतात. अ. कोंकण क. पश्चिम महाराष्ट्र ब. मराठवाडा ड. विदर्भ पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ / Only a
  • )फक्त ब / Only b
  • )फक्त ड / Only d✓ योग्य
  • )फक्त अ आणि क / Only a and c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

जनगणना 2011 च्या संदर्भात खालील विधाने पहा : अ. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्याचा लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो. ब. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 196 आहे. क. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 700 पेक्षा जास्त आहे. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त विधान अ बरोबर आहे / Only statement a is correct
  • )फक्त विधान ब बरोबर आहे / Only statement b is correct
  • )फक्त विधान क बरोबर आहे / Only statement c is correct
  • )विधान अ आणि ब बरोबर आहेत / Statements a and b are correct✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Geography

कोकणातील ______ या नद्या जास्त लांबीच्या आहेत.

  • )सावित्री व वशिष्ठी
  • )वैतरणा व उल्हास✓ योग्य
  • )काजवी व मुचकुंदी
  • )तानसा व भातसई

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Geography

26 जुलै, 2005 या दिवशी एक दिवसात सर्वात जास्त 944 मी.मी. पाऊस पडण्याची नोंद ______ या ठिकाणी झाली.

  • )सिंधुदुर्ग
  • )मुंबई✓ योग्य
  • )महाबळेश्वर
  • )माथेरान

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११History

डॉ. आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या खालील चळवळींचे कालानुक्रमानुसार आयोजन करा : अ. महाड येथील चवदार तळे आंदोलन ब. मनुस्मृती दहन क. पर्वती मंदिर सत्याग्रह ड. काळाराम मंदिर सत्याग्रह पर्यायी उत्तरे :

  • )a, b, c, d✓ योग्य
  • )b, c, d, a
  • )c, d, a, b
  • )d, a, b, c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२History

1886 च्या कलकत्त्याच्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात महाराष्ट्रातून आलेल्या नेत्यांनी केलेली आवेशपूर्ण भाषणे गाजली. त्यात दिनशा वाचा, दाजी खरे आणि _________ यांचा समावेश होता. (1) अब्दुल अझीझ (3) मोरोपंत जोशी

  • )Abdul Aziz✓ योग्य
  • )Bal Gangadhar Tilak
  • )Moropant Joshi
  • )Gopal Krishna Gokhale

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३History

1920 मध्ये _________ यांनी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ ची स्थापना केली. (1) ना.म. जोशी (3) एम.एन. रॉय

  • )N.M. Joshi
  • )S.A. Dange
  • )M.N. Roy✓ योग्य
  • )R.P. Dutt

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५History

भगवान बाबाजी खुळे, विठ्ठल कुरोळीकर, जाफर हुसेन पिंजारी या क्रांतिकारकांना ________ खटल्यात आठ-आठ वर्षांचा कारावास ठोठावला गेला.

  • )पंढरपूर बॉम्ब खटला / Pandharpur Bomb Case✓ योग्य
  • )नाशिक बॉम्ब खटला / Nashik Bomb Case
  • )औंध बॉम्ब खटला / Aundh Bomb Case
  • )पुणे बॉम्ब खटला / Pune Bomb Case

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६History

1899 मध्ये दोघां चाफेकर बंधूंसोबतच क्रांतिकारक कारवायांमुळे पुण्यात ________ यांना देखील फाशी दिले गेले.

  • )महादेव रानडे / Mahadev Ranade✓ योग्य
  • )राजाबापू म्हसकर / Rajabapu Mhaskar
  • )दामोदर बळवंत भिडे / Damodar Balwant Bhide
  • )भाऊसाहेब घाटगे / Bhausaheb Ghatge

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७History

लॉर्ड ________ याने असे मत मांडले होते की बालविवाह आणि सक्तीचे वैधव्य या एकाच समस्येच्या दोन बाजू होत्या.

  • )रिपन / Ripon✓ योग्य
  • )लिटन / Lytton
  • )बेंटिंक / Bentinck
  • )डलहौसी / Dalhousie

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८History

प्रसिद्ध कामगारनेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पश्चात भिवाजी रामजी नरे, एस.के. बोले आणि हरिश्चंद्र तालचेरकर अशा नेत्यांनी गिरणी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी 1909 मध्ये ______ स्थापन केली.

  • )सोशल सर्व्हिस लीग
  • )बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन
  • )कामगार हितवर्धक सभा✓ योग्य
  • )बॉम्बे पोस्टल युनियन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९History

विष्णुशास्त्री पंडितांच्या पाठिंब्यामुळे इ.स. 1865 मध्ये पुण्यात कोणत्या वकिलाने विधवा विवाह केला होता ?

  • )पांडुरंग करमरकर
  • )नारायण बापट
  • )नारायण भिडे✓ योग्य
  • )मोरोबा विजयकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०History

सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचे नाव काय होते ?

  • )डेक्कन सभा
  • )पूना सार्वजनिक सभा
  • )महाराष्ट्र असोसिएशन
  • )पूना असोसिएशन✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Polity

सध्या खालीलपैकी कोणते 'राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व' आहे ?

  • )राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढील समानतना नाकारणार नाही.
  • )राज्य चौदा वर्षे वयापर्यंतच्या सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देईल.
  • )राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध धर्म, वंश, जात, लिंग अथवा जन्म स्थळ या कारणामुळे भेदभाव करणार नाही.
  • )वरीलपैकी एकही नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Polity

जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो 'उद्दिष्टांचा ठराव' मांडला त्याच्या मध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता ?

  • )भारत हे स्वतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताक असेल. / India as an Independent, Sovereign Republic.
  • )कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही. / No safeguards will be provided to any particular classes.✓ योग्य
  • )स्वतंत्र भारताची सर्व सत्ता व अधिकार जनतेकडून प्राप्त होतील. / All powers and authority of independent India are derived from the people.
  • )भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समता दिली जाईल. / All people of India shall be provided equality before the law.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Polity

खालीलपैकी कोणत्या तरतूदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 25 मध्ये समाविष्ट आहेत ? अ. सद्सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य ब. धर्माचे पालन (पूजा) करण्याचा हक्क क. धर्माचे आचरण करण्याचा हक्क ड. व्यक्तीचे विशिष्ट धर्मात धर्मांतर करण्याचा सुस्पष्ट हक्क

  • )फक्त अ, ब आणि क / Only a, b and c✓ योग्य
  • )फक्त ब, क आणि ड / Only b, c and d
  • )फक्त अ, क आणि ड / Only a, c and d
  • )वरील सर्व / All of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Polity

खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते ?

  • )सुकाणू समिती / Steering Committee
  • )केंद्रीय अधिकार समिती / Union Powers Committee✓ योग्य
  • )मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांची समिती / Committee on Fundamental Rights and Minorities
  • )प्रांतीय संविधान समिती / Provincial Constitution Committee

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Polity

भारतीय राज्यघटनेनुसार नागरिककाचे ________. अ. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही ब. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीद्वारे हिरावून घेतले जावू शकते क. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीने हिरावून घेतले जावू शकते यापैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

  • )फक्त अ / Only a
  • )फक्त अ आणि ब / Only a and b
  • )फक्त क / Only c✓ योग्य
  • )यापैकी एकही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Polity

भारताच्या संविधान सभेत फाळणीपूर्वी खालीलपैकी कोण समाविष्ट होते?

  • )प्रांतिक विधानसभा मधून 292 सदस्य, मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून 4 आणि रियासतीकडून 93✓ योग्य
  • )प्रांतिक विधानसभा मधून 294 सदस्य, मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून 4 आणि रियासतीकडून 91
  • )ब्रिटीश प्रांतांचे 291 सदस्य, मुख्य आयुक्तांकडून 3 आणि रियासतीकडून 95
  • )ब्रिटीश प्रांतांचे 292 सदस्य, मुख्य आयुक्तांकडून 5 आणि रियासतीकडून 92

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Polity

'केन्द्र-राज्य' संबंधांत संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. भारतीय राज्यघटनेने सर्व अधिकार — वैधानिक, कार्यकारी, आर्थिक आणि न्यायालयीन — केन्द्र आणि राज्यांमध्ये विभागून दिले आहेत. ब. भारतीय राज्यघटनेने केन्द्राला आणि राज्यांना दिलेल्या वैधानिक अधिकारांचा क्षेत्रीय विस्तार स्पष्ट केलेला आहे. क. कायदेशीर अर्थाने 'ना संसद सार्वभौम आहे ना राज्य विधीमंडळ सार्वभौम' आहे, असे म्हणता येईल. पर्यायी उत्तरे: (1) विधाने अ आणि ब बरोबर आहे, तर क चुकीचे (2) विधाने ब आणि क बरोबर आहे, तर अ चुकीचे (3) विधाने अ आणि क बरोबर आहे, तर ब चुकीचे (4) सर्व विधाने बरोबर आहेत

  • )विधाने अ आणि ब बरोबर आहे, तर क चुकीचे
  • )विधाने ब आणि क बरोबर आहे, तर अ चुकीचे✓ योग्य
  • )विधाने अ आणि क बरोबर आहे, तर ब चुकीचे
  • )सर्व विधाने बरोबर आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Polity

पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

  • )भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर, 1949 आहे.✓ योग्य
  • )42 व्या घटनादुरुस्ती ने भारतीय राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द जोडला.
  • )42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली.
  • )भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात नोंदवलेली सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची तत्वे सोव्हिएट रशियाच्या घटनेवरून घेतलेली आहेत.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Polity

धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे ______. अ. राज्य हे एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी असेल ब. राज्य हे धर्मानुकूल असते क. राज्य हे कोणत्याही धर्मावर आधारलेले नसेल ड. राज्याची कोणत्याही विशिष्ट धर्माशी निष्ठा नसेल ई. राज्य हे धर्माच्या विरोधी नसेल वरीलपैकी कोणता/कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

  • )फक्त अ
  • )फक्त ब
  • )फक्त ब, क आणि ड
  • )फक्त क, ड आणि ई✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Polity

42 व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणती निर्देशक तत्त्वे जोडली गेली ? (अ) समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत (ब) उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग (क) पर्यावरण, वन आणि वन्य जीवनाचे संरक्षण (ड) कुटीर उद्योगांना प्रोत्साहन (a) Equal justice and free legal aid (b) Participation of workers in management of industries (c) Protection of environment, forests and wildlife (d) Promotion of cottage industries

  • )फक्त अ आणि ब / Only a and b
  • )फक्त अ आणि क / Only a and c
  • )फक्त अ, ब आणि क / Only a, b and c✓ योग्य
  • )अ, ब, क आणि ड / a, b, c and d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Maharashtra

जोड्या लावा : (मुंबई शेरीफ) (कार्यकाळ) अ. डॉ. इंदू सहानी I. 2006 ब. सुनिल गावस्कर II. 2008 क. किरण शांताराम III. 1995 ड. डॉ. विजयपत सिंघानिया IV. 2002

  • )II III IV I✓ योग्य
  • )I II III IV
  • )III IV I II
  • )IV I II III

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Polity

'सचिवालय म्हणजे निर्णय-निर्धारण संस्था आणि संचालनालय म्हणजे अंमलबजावणी करणारी संस्था असा फरक कोणत्या समितीने/आयोगाने केला आहे ?

  • )राजस्थान प्रशासकीय सुधार समिती
  • )मध्यप्रदेश प्रशासकीय सुधार आयोग✓ योग्य
  • )पंजाब प्रशासकीय सुधार आयोग
  • )केरळ प्रशासकीय पुनर्रचना आणि अर्थव्यवस्था समिती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Polity

पुढील विधानांचा अभ्यास करा : अ. अंदाज समितीमध्ये लोकसभेतील सर्व पक्ष आणि गटांचे त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असते. ब. लोकलेखा समितीला अंदाज समितीची 'जुळी बहिण' समजण्यात येते. ही समिती सार्वजनिक विनिमयावर लक्ष ठेवण्याचे काम करते.

  • )फक्त अ बरोबर आहे
  • )फक्त ब बरोबर आहे
  • )अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत✓ योग्य
  • )अ आणि ब दोन्ही चूक आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

भारतीय संसदेच्या कोणत्या कायद्याद्वारे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले ?

  • )मुंबई पुनर्रचना कायदा, 1960 / The Bombay Reorganisation Act, 1960✓ योग्य
  • )गुजरात पुनर्रचना कायदा, 1960 / The Gujarat Reorganisation Act, 1960
  • )महाराष्ट्र पुनर्रचना कायदा, 1960 / The Maharashtra Reorganisation Act, 1960
  • )यापैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

राज्यांनी विधान परिषदेचे गठन करायचे ठरविल्यास सदस्य संख्येविषयी पुढीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ? अ. विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त विधान सभेच्या सदस्यसंख्येच्या एक-तृतीयांश असावी. ब. विधान परिषदेची सदस्य संख्या 40 पेक्षा कमी नसावी. पर्यायी उत्तरे :

  • )अ आणि ब दोन्ही एकाच वेळी लागू होतात / Both a and b apply together✓ योग्य
  • )फक्त अ लागू होते / Only a is applied
  • )फक्त ब लागू होते / Only b is applied
  • )वरीलपैकी कोणतीही तरतूद लागू होत नाही / None of the above provisions apply

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Polity

बलवंत राय मेहता समितीच्या शिफारसी चा अभ्यास करून महाराष्ट्रात त्यांच्या अंमलबजावणी विषयी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण होते ?

  • )यशवंतराव चव्हाण
  • )मरोतराव कन्नमवार
  • )पी.के. सावंत
  • )वसंतराव नाईक✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Polity

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क समितीचे प्रमुख होण्यासाठी पुढीलपैकी कोण पात्र आहे ?

  • )उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश✓ योग्य
  • )उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
  • )जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश
  • )जिल्हा न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Polity

केंद्रीय सचिवालयातील खालील अधिकाऱ्यांची उतरत्या क्रमाने मांडणी करा : अ. अवर सचिव ब. अतिरिक्त सचिव क. सह सचिव ड. उप सचिव पर्यायी उत्तरे:

  • )क – ब – ड – अ
  • )ब – क – ड – अ✓ योग्य
  • )क – ब – अ – ड
  • )ब – ड – क – अ

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Polity

विधान परिषदेबद्दल खालील विधाने विचारात घ्या : अ. विधान परिषद हे कायमचे सभागृह आहे. ब. त्यांचे एक-तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. क. विधान परिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्षपणे निवडले जातात. ड. महाराष्ट्रातून सहा प्रशासकीय विभागातील शिक्षकांमधून सहा सदस्य निवडले जातात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त अ आणि ड
  • )फक्त अ, क आणि ड
  • )फक्त अ आणि ब✓ योग्य
  • )फक्त अ, ब आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Polity

राज्य पुनर्रचना आयोग याबाबत खालील विधाने विचारात घ्या : अ. 1953 मध्ये आयोगाची नियुक्ती करण्यात आली. ब. या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फाजल अली होते. क. राज्य पुनर्रचना अधिनियम 30 मार्च, 1954 रोजी मंजूर झाला. ड. राज्य पुनर्रचना अधिनियम 1 एप्रिल, 1956 रोजी अंमलात आला. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त अ आणि ब✓ योग्य
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त अ आणि ड
  • )फक्त ब आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Polity

राज्याच्या राज्यपालाच्या अधिकारांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. राज्यपाल राज्य विधानसभेला बोलावू शकतात, संस्थगित आणि विसर्जित करू शकतात. ब. राज्यपाल राज्य विधानसभेच्या बैठक स्थगित करू शकतात. क. राज्यपाल निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात. वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त अ आणि क✓ योग्य
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त ब

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Polity

भारतीय संविधानाच्या कलम 210 नुसार घटक राज्यातील विधीमंडळाचे कामकाज पुढीलपैकी कोणत्या भाषांतून चालविता येते ? अ. इंग्रजी ब. हिंदी क. घटक राज्याची अधिकृत भाषा ड. वरील पैकी सर्व पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब आणि क
  • )फक्त अ आणि क
  • )फक्त ड✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Polity

जोड्या लावा : (पंतप्रधान) अ. मोरारजी देसाई ब. मनमोहन सिंग क. राजीव गांधी ड. एच.डी. देवेगौडा (कार्यकाळ) I. 1 जून, 1996 ते 21 एप्रिल, 1997 II. 22 मे, 2004 ते 26 मे, 2014 III. 24 मार्च, 1977 ते 28 जुलै, 1979 IV. 31 ऑक्टोबर, 1984 ते 2 डिसेंबर, 1989

  • )IV I II III
  • )II III I IV
  • )I IV III II
  • )III II IV I✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Polity

भारत सरकारचा पहिला कायदा अधिकारी खालीलपैकी कोण असतो ?

  • )भारताचे सरन्यायाधीश
  • )केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव
  • )महान्यायवादी✓ योग्य
  • )महाधिवक्ता

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Polity

खालील विधानांचा विचार करा : अ. अंदाजसमितीची स्थापना अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 मध्ये झाली. ब. या समितीत सर्व 30 सभासद लोकसभेकडून निवडून दिले जातात. क. मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकत नाही. ड. ही समिती प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणि काटकसर करण्यासाठी पर्यायी धोरणे सुचवते. वरीलपैकी योग्य विधाने निवडा :

  • )फक्त अ, ब आणि क
  • )अ, ब, क आणि ड✓ योग्य
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त ब, क आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Polity

महाराष्ट्र विधिमंडळाच्या समित्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाहीत ? अ. लोकलेखा समितीमध्ये 25 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 5. ब. अंदाजसमितीमध्ये 29 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 9. क. सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये 25 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 5. ड. पंचायत राज समितीमध्ये 25 सदस्य असतात, विधानसभेतून 20 आणि विधान परिषदेतून 5. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त ड
  • )फक्त ब✓ योग्य
  • )फक्त अ आणि ड
  • )फक्त अ आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Polity

भारताच्या महान्यायवादी बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

  • )ते पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात. / He holds office for a term of five years.
  • )मंत्रिमंडळाची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात. / He holds office during the pleasure of the Council of Ministers.
  • )संसद ठरवील त्याप्रमाणे त्यांना मानधन मिळते. / He receives such remuneration as the Parliament may determine.
  • )संसद सदस्यास मिळणारे सर्व विशेषाधिकार संरक्षण व फायदे त्यांना मिळतात. / He enjoys all the privileges and immunities that are available to a Member of Parliament.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Polity

मुख्यमंत्र्याची नियुक्ती यांचेकडून केली जाते ?

  • )राजकीय पक्षाच्या अध्यक्षाकडून / The President of concerned political party
  • )निवडणूक जिंकून आलेले विधानसभेचे सदस्य / Elected members in the Assembly
  • )राज्यपाल कडून नियुक्त / The Governor✓ योग्य
  • )पक्ष श्रेष्ठीकडून / The high command of the party

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Polity

पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही ?

  • )कायदेमंडळाच्या दोन्ही गृहांचे सदस्य निवडणुकीसाठी संयुक्त सभेत जमतात.
  • )उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार संसद सदस्य असला पाहिजे.✓ योग्य
  • )गुप्त मतदान पद्धती.
  • )उमेदवार भारत सरकार, राज्य सरकारे किंवा स्थानिक वा इतर पदांवर कार्यरत नसावा.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Polity

जेव्हा राज्ये घटनादुरुस्ती विधेयकावर मंजुरी अथवा नामंजुरीची मोहोर लावतात, तेव्हा प्रत्यक्षात पुढीलपैकी कोण तो निर्णय घेत असते ?

  • )विधानसभा✓ योग्य
  • )विधान परिषद
  • )मुख्यमंत्री
  • )राज्यपाल

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Polity

खालीलपैकी कोणते योग्यरित्या जुळले नाही ?

  • )कलम 145 - न्यायाधिशांचे वेतन✓ योग्य
  • )कलम 143 - सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार
  • )कलम 141 - सर्वोच्च न्यायालयाचे आदेश भारतातील सर्व न्यायालयांना लागू आहेत
  • )कलम 139 - रिट प्राधिलेख देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Polity

उप विभागीय अधिकाऱ्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

  • )त्यांची नेमणूक आणि नियंत्रण हे राज्यशासनाद्वारा होते.
  • )त्यास न्यायालयीन (Magisterial) अधिकारा व्यतिरिक्त महसूल आणि कार्यकारी अधिकारी प्रदान करण्यात आले आहेत.✓ योग्य
  • )ते प्रादेशिक (territorial) अधिकारी असून बहुउद्देशीय कार्य करणारे अधिकारी आहेत.
  • )ते शांतता आणि सुव्यवस्थेबाबत जिल्हा दंडाधिकारी आणि स्टेशन पोलीस अधिकारी यांना जोडणारा दुवा म्हणून कार्य करतात.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Polity

74 व्या घटनादुरुस्तीमध्ये खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नाही ? अ. नगरपालिकेचे निर्माण ब. राज्य निवडणूक आयोगाची नेमणूक क. ग्राम पंचायत ड. जागांचे आरक्षण पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त क✓ योग्य
  • )फक्त ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Polity

भारतीय दंड विधानाच्या कलम ________ नुसार गुन्हा सिद्ध होणे हे नगरसेवक पदा साठीच्या अपात्रतेचे एक कारण आहे.

  • )150 D
  • )153 A✓ योग्य
  • )154 B
  • )156 C

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Polity

भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 (G) बाबत खालीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ? अ. जागांचे आरक्षण ब. सदस्यत्वासाठी अपात्रता क. पंचायतीच्या निवडणुका ड. पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ आणि ब / Only a and b
  • )फक्त ड / Only d✓ योग्य
  • )फक्त क / Only c
  • )फक्त अ / Only a

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Polity

महानगरपालिकेच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या (महाराष्ट्राच्या संदर्भात) : अ. महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते आणि ते त्यांचे वेतन आणि भत्ते म्युनिसिपल फंडातून स्विकारतात. ब. राज्यशासन आयुक्तांना स्थायी समितीच्या संमतीने अनुपस्थितीची रजा मंजूर करू शकते. क. आयुक्तांचे पद हे रजेमुळे अथवा अन्य तात्पुरत्या स्वरूपात रिक्त झाल्यास महानगरपालिका परिषद (आम सभा) त्याजागी एखाद्या व्यक्तीची आयुक्त म्हणून कार्य करण्यासाठी नियुक्ती करू शकते. वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/आहेत ?

  • )फक्त अ / Only a
  • )फक्त अ आणि ब / Only a and b✓ योग्य
  • )वरील सर्व / All of the above
  • )फक्त ब आणि क / Only b and c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Polity

एक महाविद्यालयीन विद्यार्थी त्याच्या शहरातील नगरपरिषदेचा सदस्य म्हणून निवडून येऊ इच्छितो. त्याचे नामांकन वैध ठरण्यासाठी इतर अटींबरोबर महत्त्वाची अट कोणती? अ. त्याने त्याच्या महाविद्यालयाच्या प्राचार्याची परवानगी घेतली पाहिजे. ब. तो राजकीय पक्षाचा सदस्य असला पाहिजे. क. त्याचे नाव नगरपरिषदेच्या मतदार यादीत असले पाहिजे. ड. तो भारताच्या राज्यघटने प्रति निष्ठा बाळगील, असे त्याने घोषित केले पाहिजे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त क✓ योग्य
  • )फक्त ब

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Polityआयोगाने रद्द

खालीलपैकी कोणते विधाने हे कटक मंडळाच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात बरोबर आहेत ?

  • )a. कटक मंडळे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली काम करतात.
  • )b. छावणीचा प्रमुख लष्करी अधिकारी हा कटक मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.
  • )c. कटक मंडळात लोकप्रतिनिधींपेक्षा नियुक्त आणि पदसिद्ध सदस्यांची संख्या अधिक असते.
  • )d. कटक मंडळाचे त्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरी लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरण केले जाते.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ६५Polity

जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी विशेष सभेत मतदानाचा हक्क असलेल्या किती सदस्यांच्या अनुमतीने राज्य सरकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सेवेतून परत बोलावितो ?

  • )3/4 सदस्य संख्येच्या अनुमतीने
  • )1/3 सदस्य संख्येच्या अनुमतीने
  • )संपूर्ण सदस्य संख्येच्या अनुमतीने
  • )2/3 सदस्य संख्येच्या अनुमतीने✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Polity

गटविकास अधिकारी यांच्याबाबत योग्य पर्यायांची निवड करा : अ. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. ब. गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील विस्तार अधिकाऱ्यांचा कप्तान असतो. क. गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो. ड. गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो.

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त अ, ब आणि ड✓ योग्य
  • )वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Polity

महाराष्ट्रातील पंचायत समिती बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  • )पंचायत समिती सदस्यांच्या एकूण संख्येच्या दोन-तृतीयांश बहुमताने विशेष सभेत अविश्वासाचा ठराव संमत झाल्यास सभापती किंवा उप-सभापती हा, यथास्थिती सभापती किंवा उप-सभापती म्हणून राहणार नाहीत.
  • )जर अविश्वासाचा ठराव फेटाळण्यात आला तर ठराव फेटाळला गेल्यापासून तीन महिन्यांच्या आत पुन्हा नव्याने दुसरा अविश्वासाचा ठराव पंचायत समितीपुढे आणता येत नाही.✓ योग्य
  • )पंचायत समितीच्या सभापतीने किंवा उप-सभापतीने आपली कर्तव्ये पार पाडीत असताना केलेल्या गैरवर्तणुकीबद्दल राज्य शासन त्यांना अधिकार पदावरून दूर करू शकते.
  • )पंचायत समिती सदस्यांच्या कार्यकाळ 5 वर्षांचा असतो.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Polity

खालील विधाने विचारात घ्या (महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या संदर्भात) : अ. ग्रामपंचायतीच्या सेवकाची नेमणूक पंचायत ठराव करून करते. ब. पंचायतीला कोणत्याही सेवकाला लेखी आदेशाद्वारे निलंबित अथवा बडतर्फ करता येईल. क. पंचायतीने दिलेल्या अशा कोणत्याही आदेशाविरुद्ध सेवकाला 15 दिवसांच्या आत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. ड. ग्रामपंचायतीच्या सेवकाचे वेतन हे पंचायत समिती फंडातून दिले जाते. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

  • )फक्त अ
  • )फक्त अ आणि ब✓ योग्य
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त अ, ब आणि ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Polity

ग्रामसभेच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे ? अ. ग्रामसभा स्थापन करण्यामागचा उद्देश ग्रामीण जनतेला एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिक महत्त्वाच्या विषयांची चर्चा करणे. ब. ग्रामसभेची बैठक आयोजित करण्याची वैधानिक जबाबदारी ग्रामसेवकाची आहे. क. ग्रामसभेद्वारे ग्रामीण जनतेला आपले विचार, मते आणि तक्रारी व्यक्त करण्याची संधी दिली जाते. योग्य पर्याय निवडा.

  • )फक्त अ
  • )फक्त ब✓ योग्य
  • )फक्त ब आणि क
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Polity

राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्त्वातील कोणत्या कलमानुसार प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायती स्थापन झाल्या ? अ. कलम 243 नुसार ब. कलम 40 नुसार क. कलम 42 नुसार ड. कलम 124 नुसार वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

  • )फक्त क आणि ड
  • )फक्त अ, ब आणि क
  • )फक्त अ आणि ड
  • )फक्त ब✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Polity

खालील विधानांचे अवलोकन करा : विधान I : भारतीय संविधानातील कलम 149 मध्ये अशी तरतूद आहे की सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करून, त्याच्या समोर प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये पूर्णन्याय देण्यासाठी आवश्यक असे आदेश देऊ शकते. विधान II : न्यायालयाने दिलेला आदेश केंद्रशासित प्रदेश वगळता संपूर्ण देशात लागू होईल. पर्यायी उत्तरे :

  • )विधान I बरोबर आणि II चूक आहे
  • )विधान II बरोबर आणि I चूक आहे
  • )दोन्ही विधाने बरोबर आहेत
  • )दोन्ही विधाने चूक आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Polity

खालील विधानांचे अवलोकन करा : विधान I : सार्वजनिक हित याचिका (जनहित याचिका) म्हणजे गरीब, कमकुवत व सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमीमुळे प्रतिकूल स्थितीत असलेल्या लोकांच्या मूलभूत आणि इतर कायदेशीर अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी आहे. विधान II : अशी याचिका फक्त सार्वजनिक हक्कांच्या आणि राष्ट्रा प्रती अधिकार निवारणासाठी केली जाऊ शकते. पर्यायी उत्तरे :

  • )विधान I बरोबर आणि II चूक आहे✓ योग्य
  • )विधान II बरोबर आणि I चूक आहे
  • )दोन्ही विधाने बरोबर आहेत
  • )दोन्ही विधाने चूक आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Polity

खालीलपैकी कोणते विधान/विधाने खरे आहे/आहेत ? अ. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचे वेतन आणि भत्ते हे विधीमंडळाच्या मताच्या अधीन नाहीत. ब. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला त्यांच्या अवमानाबद्दल कोणत्याही व्यक्तीस शिक्षा करण्याचा अधिकार आहे. क. कलम 122 सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशाला भारतातील कोणत्याही न्यायालयात वकीली करण्यास मनाई करते. ड. सर्वोच्च न्यायालयाला कलम 145 अन्वये नियम बनविण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

  • )फक्त अ आणि ब खरे आहेत
  • )फक्त क खरे आहे
  • )फक्त अ, ब आणि ड खरे आहेत✓ योग्य
  • )फक्त ड खरे आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Polity

खालीलपैकी कोणत्या प्रकरणात न्यायालयाने आपले अधिकार क्षेत्र वापरले, आणि कैद्याने लिहिलेले पत्र याचिका म्हणून मानले गेले. मा. न्यायालयाने असे नमूद केले की, तांत्रिकता न्यायालयाला व्यक्तींच्या नागरी स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यापासून रोखू शकत नाही.

  • )सुनील बत्रा वि दिल्ली प्रशासन✓ योग्य
  • )सलिल चौधरी वि युनियन ऑफ इंडिया
  • )अब्दुल सत्तार वि केरळ राज्य
  • )वरीलपैकी काहीही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Polity

खालील विधाने विचारात घ्या : विधान I : भारतीय संविधानाचे कलम 215 घोषित करते की प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. विधान II : सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुरू करण्याचा उच्च न्यायालयाला अधिकार नाही. पर्यायी उत्तरे :

  • )विधान I बरोबर आणि II चूक आहे
  • )विधान II बरोबर आणि I चूक आहे
  • )दोन्ही विधाने बरोबर आहेत✓ योग्य
  • )दोन्ही विधाने चूक आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Economy

नियोजन आयोगाने सुरुवातीस निश्चित केलेल्या चार दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये खालीलपैकी कोणते उद्दिष्ट समाविष्ट होत नाही ?

  • )पूर्ण रोजगार प्राप्ती
  • )समता व न्यायाधिष्ठित समाजवादी समाजरचना
  • )उत्पन्न व संपत्तीतील विषमता दूर करणे
  • )महिला सक्षमीकरण✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Economy

दहाव्या योजने दरम्यान खालीलपैकी कोणते राज्य देशांतर्गत उत्पादनात सर्वाधिक वृद्धि दर दर्शवित होते ?

  • )दिल्ली✓ योग्य
  • )गोवा
  • )तमिळनाडू
  • )महाराष्ट्र

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Economy

भारतातील गरिबांचे प्रमाण आणि संख्येच्या अंदाजाच्या पद्धतशीर आणि संगणकीय बाबींचा विचार करण्यासाठी नियोजन आयोगाने सप्टेंबर 1989 मध्ये ________ यांच्या अध्यक्षतेखाली एक 'तज्ञ गट' स्थापन केला.

  • )प्रा. दातवाला
  • )प्रा. ब्रह्मानंद
  • )प्रा. अहलुवालिया
  • )प्रा. डी.टी. लकडावाला✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Economy

मागास भागात उद्योग सुरु करण्यासाठी वांचू कार्यगटाने खालीलपैकी कोणती शिफारस केली नव्हती ?

  • )पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्पोरेट आयकरातून सूट देणे
  • )पाच वर्षांच्या कालावधीसाठी उत्पादन शुल्कातून सूट देणे
  • )पाणी पुरवठा अनुदानाची तरतूद✓ योग्य
  • )वाहतूक अनुदानाची तरतूद

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Economy

भारतातील व्यवसाय सेवांच्या जलद वाढीचे मुख्य कारण म्हणजे.

  • )बहुराष्ट्रीय कंपन्या
  • )विमा क्षेत्राची वृद्धी
  • )माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची वाढ✓ योग्य
  • )कृषी क्षेत्रातील वृद्धी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Economy

2001 – 02 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते ?

  • )त्रिपुरा
  • )ओडिशा✓ योग्य
  • )बिहार
  • )मध्य प्रदेश

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Economy

भारतीय अर्थव्यवस्थेत छुप्या बेरोजगारीचा प्रश्न हा प्रामुख्याने

  • )ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आढळतो✓ योग्य
  • )शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आढळतो
  • )औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आढळतो
  • )शहरी काम करणाऱ्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Economy

खालीलपैकी कोणता घटक प्रादेशिक विषमतेचा प्रमुख निर्देशक आहे ?

  • )मूल्य वर्धन
  • )कृषि उत्पादन
  • )निव्वळ राज्यांतर्गत उत्पादन✓ योग्य
  • )लिंग गुणोत्तर प्रमाण

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polityआयोगाने रद्द

24 एप्रिल, 1993 रोजी कोणत्या घटनादुरुस्तीस मंजुरी देण्यात आली ?

  • )71 वी दुरुस्ती
  • )72 वी दुरुस्ती
  • )73 वी दुरुस्ती
  • )74 वी दुरुस्ती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ८६Quantitative Aptitude

मंत्र, जो सेबापेक्षा चार पट मोठा आहे, तो आता वीस वर्षांचा आहे. जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल तेव्हा त्या संख्येची निवड करा.

  • )85
  • )65
  • )45
  • )25✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Quantitative Aptitude

जेव्हा मुलगा त्याच्या नेहमीच्या गतीच्या 5/7 गतीने चालतो, तेव्हा तो शाळेत 6 मिनिटे उशिरा पोहोचतो. शाळेत पोहोचायला त्याला लागणारा नेहमीचा कालावधी निवडा.

  • )30 मिनिटे
  • )21 मिनिटे
  • )15 मिनिटे✓ योग्य
  • )12 मिनिटे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Logical Reasoning

पुढील प्रत्येक तीन विधाने समाविष्ट असलेले चार युक्तिवाद दिले आहेत. ज्या संचात 3 रे विधान हे 1 ल्या दोन विधानांच्या आधारे काढलेला निष्कर्ष आहे त्याची निवड करा. संच: अ. एकही ससा हसत नाही. काही जे हसतात ते वाघ आहेत. काही वाघ ससे नाहीत. ब. सर्व कोल्हे काळे आहेत. काही कोल्हे नाचत नाहीत. काही नर्तक काळे नाहीत. क. A शपथ घेण्याची हौस भागवतात. शपथ घेणाऱ्यांना धमकावले जाते. जे काहीजण धमकावले जातात ते A नाहीत. ड. सर्व E हे S आहेत. सर्व E हे B आहेत. काही B हे S आहेत. पर्यायी उत्तरे:

  • )फक्त अ आणि ब / Only a and b
  • )फक्त अ / Only a
  • )फक्त अ आणि ड / Only a and d✓ योग्य
  • )फक्त ड / Only d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Logical Reasoning

सांकेतिक भाषेत 'blue' या शब्दाचा संकेत कोणता आहे या प्रश्नासंदर्भात दिलेल्या पुढील विदेचा पुरेपणा निश्चित करा ? विदा विधाने: अ. एका सांकेतिक भाषेत 'sea water is blue' चा संकेत 'er pi th dy' असा आहे. ब. वरील भाषेत 'sky is clearly blue' चा संकेत 'dy th ha cb' असा आहे. पर्यायी उत्तरे:

  • )अ आणि ब दोन्ही आवश्यक / Both a and b are necessary
  • )फक्त अ पुरेशी आहे / a alone is sufficient
  • )फक्त अ किंवा ब पुरेशी आहे / Either a or b is sufficient
  • )अ आणि ब दोन्ही पुरेशी नाहीत / Both a and b are insufficient✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Logical Reasoning

जर A + B चा अर्थ A ही B ची बहीण आहे; A × B चा अर्थ A हे B चे वडील आहेत आणि A – B चा अर्थ A हा B चा भाऊ आहे, तर T ही P ची मुलगी आहे या अर्थाचे विधान निवडा.

  • )P × Q ÷ R + S – T
  • )P × Q ÷ R – T + S✓ योग्य
  • )P × Q ÷ R + T – S
  • )P × Q ÷ R + S + T

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Logical Reasoning

राम, श्याम, सुरेश, चंदू आणि कमला हे पाच मित्र एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून क्रिकेट पाहत आहेत; अर्थात ते या नामक्रमाने बसलेले असतील असे नाही. केवळ श्याम हा राम आणि कमला यांच्या मध्ये, तर सुरेश हा कमलाच्या उजव्या बाजूला लागतच आहे आणि चंदू रामच्या डाव्या बाजूला लागूनच आहे. ह्या माहितीच्या आधारावर खालील कोणते विधान निश्चितपणे सत्य आहे ?

  • )श्याम हा रामच्या डाव्या बाजूला आहे
  • )चंदू कमलाच्या डाव्या बाजूला तिसरा आहे✓ योग्य
  • )श्याम कमलाच्या उजव्या बाजूला आहे
  • )राम सुरेशच्या डाव्या बाजूला दुसरा आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Logical Reasoning

पुढील युक्तिवाद अभ्यासा आणि त्यातील वापरलेल्या तर्कशक्ती सारखेपणात सर्वात जवळचा असलेला पर्याय निवडा. सर्व झाडे पाने धारण करतात. सोनमोहोरे हे झाड आहे. म्हणून सोनमोहोरे पाने धारण करतात.

  • )सर्व झाडे पाने धारण करतात. तो वृक्ष झाड नाही. म्हणून तो वृक्ष पाने धारण करत नाही.
  • )सर्व सोनमोहोरे पाने धारण करतात. ते झाड पाने धारण करते. म्हणून ते झाड सोनमोहोरे आहे.
  • )सर्व पाने झाडांवर वाढतात. तो वृक्ष पाने धारण करतो. म्हणून तो वृक्ष झाड आहे.✓ योग्य
  • )सर्व झाडे पाने धारण करतात. तो वृक्ष पाने धारण करतो. म्हणून तो वृक्ष झाड नाही.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Logical Reasoning

वैज्ञानिक आकलन विकसित करत असताना आपण त्रुटींमुळे नेहमीच अडचणीत सापडतो. प्रत्येक पिढीला आकलनवर येणारी त्रुटी मर्यादा फार तर थोडी कमी करण्याची आशा बाळगते आणि त्रुटी मर्यादा लागू पडण्याशी संबंधित सामग्री संचात भर टाकता येते. त्रुटी मर्यादा अटळ असून ती आपल्या ज्ञानाच्या विश्वसनीयतेचे दृश्यमान स्व-मूल्यनिर्धारण असते. यामुळे आपल्याला नेहमीच वैज्ञानिक तथ्यांबाबत अनिश्चितता स्वीकारावी लागते. सार्वजनिक मत सर्वेक्षणात तुम्ही अनेकदा त्रुटी मर्यादा पाहता (जसे 'तीन टक्के धन व ऋण इतकी अनिश्चितता'). ज्यात महासभेच्या नोंदीतील प्रत्येक भाषण दूरदर्शनवरील प्रत्येक जाहिरात, प्रत्येक प्रवचन या गोष्टी अशा त्रुटी सीमा किंवा त्याच्याशी सममूल्य असे काही आहे अशा समाजाची कल्पना करा. पुढीलपैकी वरील युक्तिवादातून जनतेला उपयुक्त निष्कर्ष ठरणारे सर्वात योग्य विधान निवडा.

  • )जर माहिती राजकीय आणि धार्मिक नेत्यांसारख्या प्रबळ अधिकाऱ्यांकडून येत असेल तर लोक ती चिकित्सक मूल्यमापनाशिवाय स्वीकारतात.
  • )दूरदर्शन जाहिराती जनतेला संबंधित त्रुटी मर्यादेचा परिचय करून न देता माहिती पुरवतात.
  • )स्वतःकडून माहिती पुरवली जात असता अधिकारी स्रोतांनी त्यांसंबंधित त्रुटी मर्यादा लोकांना परिचय करून दिला पाहिजे.
  • )कोणत्याही अधिकारी स्रोताकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही युक्तिवादाबरोबर जनतेने संबंधित त्रुटी मर्यादा सांगण्याची मागणी केली पाहिजे.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Quantitative Aptitude

जर n = 1 + X असेल व X हा चार क्रमवार धन पूर्णांकाचा गुणाकार असेल, तर सत्य विधान/ने निवडा. अ. n ही विषमसंख्या ब. n ही मूळसंख्या क. n ही पूर्णवर्गसंख्या ड. n ही समसंख्या पर्यायी उत्तरे : (1) वरीलपैकी सर्व (2) वरीलपैकी एकही नाही (3) ब वगळून सर्व (4) फक्त अ आणि क

  • )वरीलपैकी सर्व
  • )वरीलपैकी एकही नाही
  • )ब वगळून सर्व
  • )फक्त अ आणि क✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Quantitative Aptitude

महाविद्यालयातील कला पदवीधरांचे विज्ञान पदवीधरांशी असलेले गुणोत्तर 3 : 2 आहे. जर 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र ठरले आहेत; तर पात्र नसलेल्यांची टक्केवारी निवडा.

  • )22
  • )60
  • )72
  • )78✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Quantitative Aptitude

मेघाने एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडविले. बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण वजा केले जातात. मेघाला एकूण 150 गुण मिळाले, तर तिच्या बरोबर उत्तरांची संख्या किती ?

  • )50
  • )60
  • )70✓ योग्य
  • )75

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Logical Reasoning

गटाला बैठकीची कार्यवाही करण्यासाठी निळी, गुलाबी, हिरवी, पिवळी, पांढरी व लाल अशा सहा खुर्च्या सुसम षटकोनाकार टेबलाच्या पृष्ठाच्या बाजूंपाशी ठेवलेल्या आहेत. ज्या कडेपाशी निळी खुर्ची ठेवली आहे ती गुलाबी खुर्ची ठेवलेल्या कडेला समांतर आहे व ती पिवळी खुर्ची ठेवलेल्या कडेच्या उजव्या अंत्यबिंदूशी 120° चा कोन करते. पांढरी व लाल या खुर्च्या ज्या कडांपाशी ठेवलेल्या आहेत त्या एकमेकींशी 120° चा कोन करतात आणि लाल व हिरवी खुर्च्या ठेवलेल्या कडा परस्परांशी समांतर आहेत. या माहिती संदर्भात पुढीलपैकी विसंगत असणारा गट निवडा.

  • )पांढरी, पिवळी, हिरवी
  • )लाल, हिरवी, गुलाबी
  • )गुलाबी, निळी, पिवळी
  • )हिरवी, लाल, पांढरी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Environment

मला आश्चर्य वाटते की आपण आपला वेळ व शक्ती वाचवण्यासाठी व्यापारी उड्डाणे वापरतो आणि उड्डाणे वातावरणात इतका कार्बन डायऑक्साईड मिसळतात की जेवढा काही संपूर्ण देश एका वर्षात मिसळतात. आपण वापरत असलेली उड्डाणे मर्यादित करायला हवीत. निमा : मला माहीत आहे .... जेव्हा आपण एक आंतरखंडीय उड्डाण करतो तेव्हा गाडीने केलेल्या वर्षभराच्या प्रवासापेक्षा जास्त प्रदूषणाला कारणीभूत होतो. दीपच्या भाष्यावरील निमाचा प्रतिसाद हा :

  • )त्याला कार्बन डायऑक्साईड प्रदूषण समस्येचे गांभीर्य खरोखरच समजले वा नाही याबाबत प्रश्न उपस्थित करतो.
  • )आपण वापरत असलेल्या उड्डाणांवर आपण मर्यादा घालण्याच्या त्याच्या मुद्याची पुष्टी करतो.
  • )कार्बन डायऑक्साईड प्रदूषण समस्या कमी करण्याचा पर्यायी मार्ग सुचवतो.
  • )वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या पातळीत वाढ होण्यात उड्डाणांचा वाटा मोठा आहे या दीपच्या मुद्याचे प्रबलन करतो.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2021-aso-paper-ii